पाककृती
खेचयाचे बोम्बिल
खेचयाचे बोम्बिल
ही पाककृती माझ्या बाबाची आहे. पावसात ताजे मासे मिळत नाहीत पण जीभ खवऴते तेंव्हा आम्ही तेव्हा आम्ही बर्याचदा हे तोंडीलावाण करतो
फार फार वर्षापूर्वी बाबा सूरतला गेले होते , तिथे त्यानी एका होटेलात हा पदार्थ खाल्ला.
खुप पाउस पडत असताना गर्मागरम भात आणि मग सुक्या सुगंताची कढ़ी हा बेत सहसा असतोच.
उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम!
डिस्क्लेमरः-
इथे तुम्ही नेहमीच एकाहुन एक सरस पाकृ पहाता. पण ते म्हणजे कसं की सेलेब्रेटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहिल्या सारखं आहे. सामान्यांच्या व्यथा तुम्हाला कशा कळाव्यात? तर समाजातलया तळागाळातल्या लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण ह्या पाकृ मध्ये आहे. हृदय हेलावणारे काही फोटो आहेत. कोमल मनाच्या लोकांनी पाहु नका!
स्वादिष्ट आटा नूडल्स
काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते. मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण मैदा वाले नूडल्सच्या जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा बाहेर पडला.
ब्रायनिंग (Brining)
चिकन, हा माझा विकपॉइंट आणि त्यात तंदुरी म्हंटल कि मग बघायलाच नको. बऱ्याचदा मात्र चिकन हे असं तंदूर किंवा ओव्हन मध्ये भाजल्यावर कोरडं पडतं, आणि मग खाण्याचा मज्जा निघून जातो. ह्या पुढे मात्र अश्या कोरड्या चिकनला आपण टाटा बाय बाय करूयात!
काही तोंडी लावणी
जर घरात पोळी आणि भाताशी काहीही खायला नसेल तर खालील पदार्थ करता येतील.
स्वतःच्या जबाबदारीवर हे पदार्थ करावेत. मी केले तेव्हा मला आवडले. ते तुम्हाला आवडतीलाच अस काही नाही.
लोणचे+दाणे
भाताबरोबर खायला उत्तम. साधे शेंगदाणे भाजून घ्यायचे मग त्यावर लोणच्या चे तेल घालायचे. सगळे एकदम मिक्स करा. मग आनंदाने खाणे.
अळूची चिंचगुळातली मसाला देठी
तसा मला रेसिपी द्यायला उशीर झालाय, श्रावणात शाकाहार असल्याने अनेकांना भाज्या काय करायच्या हा प्रश्न पडतो. त्यासाठी ही वेगळी कृती!
साहित्यः
अळूची नुसती देठी २५/३० नग, चिंचेचा कोळ तीन चमचे, गूळ तीन चमचे, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला दोन चमचे, शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, ओले खोबरे अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, तेल फोडणीसाठी,फोडणीचे साहित्य, कोथिंबीर.
कोकोनट पुलाव विथ जिंजर-गार्लिक डॅश अँड क्रिस्पी रोस्टेड स्वीटकॉर्न
नेहमीप्रमाणे नारळीपौर्णिमेला नारळाच्या वड्या केल्या. आता पुढचा नंबर नारळीभाताचा होता. पण वड्यांच्या गोड वासामुळे अजून काही गोड पदार्थ करण्याची इच्छाच राहिली नाही आणि त्यातूनच हा पदार्थ सुचला. पदार्थाच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की, ह्याचं स्फूर्तिस्थान 'मास्टरशेफ' चे वेगवेगळ्या देशांतले कार्यक्रम आहेत. त्यामुळे वाचताना पाककृती ओळखीची वाटणे स्वाभाविक आहे.
व्हेज नुडल्स्
व्हेज नुडल्स
साहीत्य:
नुडल्स - ३ पाकीट
व्हिनेगार - ४ चमचे
ग्रीन चीली सॉस - ४ चमचे
टमाटो सॉस - २ चमचे
लसुण - १२/१५. बारीक चिरुन
तेल - ४ /५ मोठे चमचे
मीठ - चवीनुसार
मिरपुड - १ चमचा
भाज्या आवडी प्रमाणे. मी खालील घेतल्या
कांदा १
ढब्बु मिर्ची - १
गाजर - १
पत्ता कोबी - वाटी भर बारीक चीरुन
वाटाणे - १/२ वाटी
अननसाला सद्गती!
घरी, आमच्या परिचितांच्या शेतातून अननस आले. पहिले दोन दिवस दुर्लक्ष्य केल, कारण ते कापणे साफ करणे कधी करून माहित नाही. ;) टिनातल्या चकत्याच वापरल्या होत्या. दोन दिवसांनी अननसाचा घमघमाट सुटला स्वैपाकघरात. मग म्हटल ह्याला सद्गती द्यावीच.
हमखास हिट - दाल बाटी!
कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा!
पाककृती सुचवा वात प्रकृती साठी
माझी पत्नी आमवाताने त्रस्त आहे. खाण्यावर बरीच बंधने आहेत नेहमीच तेच तेच पदार्थ साळीच्या लाह्या वगैरे खाऊन कंटाळली आहे सबब समस्त बल्लवाचार्याना / बंधुभगिनींना विनंती आहे कि काही तरी नवीन पदार्थ सुचवावे . माझे हे पहिलेच लेखन आहे काही चुकल्यास क्षमा असावी
- ‹ previous
- 22 of 122
- next ›