चॉकलेट मूस

गणपा's picture
गणपा in पाककृती
4 Oct 2016 - 10:09 am

चॉकलेट मूस.

 

 

    चॉकलेट मूस हा पदार्थ जेव्हा पहिल्यांदा पाहिला होता तेव्ह तो दिसायला केकसारखा वाटला होता. गोडाचा फारसा चाहता नसल्याने खावं की न खावं या विचारात होतो. मनाचा हिय्या करुन एकदाचा चमचा उपसला आणि त्या पदार्थावर ठेवला तर एकदम लोण्याच्या गोळ्यावरुन वर तापलेली सुरी फिरवावी तद्वत तो आत शिरला. इतकं सॉफ्ट... क्षणभर वाटलं अरे हे आईस्क्रिम तर नाही ना?
    पहिला चमचा तोंडात गेला तो एकदम लख्ख स्वच्छ होऊनच बाहेर आला. त्या क्षणापासुन आस्मदिक या डेझर्ट्चे दिवाने झालो. पदार्थ चवीला येवढा भारी म्हणजे त्याची बनवण्याची कृती तेवढीच क्लिष्ट असणार असं समजून आजवर याच्या वाटे गेलो नव्हतो. परवा सहज म्हटलं पाहू तरी काय कौशल्य पणाला लावावं लागतं या आवडत्य पदर्थासाठी आणि म्हणून रेसीपी शोढून काढली. मग मनात विचार आला अरेच्चा इतका सोप्पा पदार्थ आपण या पुर्वी का बरं नाही ट्राय केला? खोटं वाटतय ना? चला तर मग दाखवतोच तुम्हाला किती सोप्पा आहे हा पदर्थ.

 

साहित्यः

३०० ग्रॅम चॉकलेट  
२०० ग्रॅम क्रिम
२ अंड्यांचा पांढरा भाग
डार्क चॉकलेट (मर्जीनुसार आवडत असल्यास - सजावटीसाठी)
१५-२० चॉकलेट बिस्कीट
थोडी पीठी साखर
(जिलेटीन वापरल्यास मुस केक सारखा उभा राहू शकतो, कप मधेच सर्व्ह करणार असाल तर हा पदार्थ वगळला तरी चालेल)

 

कृती :

 

 

बिस्कीटं मिक्सरमध्ये फिरवून त्याचा चुरा करुन घ्यावा.

 

 

हा बिस्किटांचा चुरा ज्यात मूस सर्व्ह करायचय त्यात भांड्यात खाली दाबून भारावा. फार जाड थर नको १/२ सेंटीमिटर पुरे.

 

 

चॉकलेट ओव्हनमधे दिड ते दोन मिनीटं गरम करुन घ्यावं. (प्रत्येक ओव्हनचं हिटींग वेग वेगळ असल्याने एखाद मिनीटानंतर उघडून बघावं.) जर ओव्हन नसेल तर सरळ एका खोलगट भांड्यात पाणी उकळवावे त्यावर दुसरं भांडं ठेऊन त्यात चॉकलेट वितळवून घावं. चॉकलेटच्या भांड्याच स्पर्श खालच्या भांड्यातल्या उकळत्या पाण्याला होणार नाही याची दक्षता घ्या.

 

क्रिम फेटून घ्यावं. त्यात चवीनुसार थोडी पीठी साखर टाकावी.
फेटलेलं क्रिम वितळलेल्या चॉकलेटमधे टाकून ते ही फेटून घावं. गुठळ्या रहाणार नाही याची काळजी घ्या.
(जिलेटीन वापरायचं झाल्यास चमचा भर जिलेटीन २-३ चमचे पाण्यात विरघळवून ते क्रिमसोबत चॉकलेट्मध्ये फेटुन घ्यावं.)

 

अंड्यांतला बलक वेगळा काढुन उरलेला भाग तो आगदी हलका होईस्त्व फेटून घ्यावा.  

 

 

फेटलेलं अंड अलगदपणे चॉकलेटमधे चमच्याने एकजीव करुन घ्यावं. शक्यतो हातानेच करावं. बीटर/ब्लेंडर वापरु नये.

 

 

तयार झालेलं मिश्रण डावाने/चमच्याने सर्व्हिंग भांड्यात सोडावं.

 

 

आवडत असल्यास डार्क चॉकलेट वितळवून वरून त्याचा पातळसा थर द्यावा.
त्यार सर्व्हिंग्स फ्रिजमध्ये २-४ तास सेट करायला ठेवावं.

 

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

4 Oct 2016 - 10:22 am | गणामास्तर

लै भारी. हा प्रकार ग्लास मधून बाहेर काढताना चिकटत नाही ना?
ग्लास ला आतून काही बटर वगैरे लावायची गरज आहे का?
रच्याकने मी पयला. .

ग्लासातच खायला द्यावे. ते बाहेर नाही काढता येणार.

शेवटाच्या फोटोत दिसणारं मी रिंग कटर वापरुन केलय.

आई गं! अरे किती ते अत्याचार! दुष्ट माणूस.

सामान्य वाचक's picture

4 Oct 2016 - 11:10 am | सामान्य वाचक

काळजाच्या जवळचा प्रकार
रेसिपी पण मस्त

पद्मावति's picture

4 Oct 2016 - 11:23 am | पद्मावति

आहा!! सूपर यम्मी दिसतंय. मस्तं रेसेपी.

स्वाती दिनेश's picture

4 Oct 2016 - 11:25 am | स्वाती दिनेश

तुझी पाकॄ छानच! मूस मस्त दिसतो आहे.
थोडी माहिती- मूस बनवण्याच्या अनेक पाकृ आहेत, पारंपरिक मूस मध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या पोताची आणि कडसरपणाची कोको पावडर वापरतात, पण आता (युरोपातील) बाजारात मूससाठीचे स्पेशल चॉकलेट बार्स किवा स्पेशल कोको पावडरही उपलध झाली आहे. त्याने मूस करणे आणखी सोपे झाले आहे.
स्वाती

मेघना मन्दार's picture

4 Oct 2016 - 11:39 am | मेघना मन्दार

भारी दिसतंय !! करून पाहीन नक्की .. अंड्याला दुसरा काही पर्याय ?

भुमी's picture

4 Oct 2016 - 8:34 pm | भुमी

पण बिगरअंड्याचे कसे करावे?

हा धागा अप्रकाशित करण्यात यावा. Disturbing images.

नीलमोहर's picture

4 Oct 2016 - 2:36 pm | नीलमोहर

इमोसनल अत्याचार..

नीलमोहर's picture

4 Oct 2016 - 2:42 pm | नीलमोहर

मर्डर बाय चॉकोलेट..

त्रिवेणी's picture

4 Oct 2016 - 2:52 pm | त्रिवेणी

अनुमोदन.
अन मी गरिबान आज वांगंयाची दिव्य फोटोसहित रेसिपी टाकली.
छ्या किती तो फरक.
अशा काॅम्प्लेक्स ने अजुन मार खातात राव माझ्या रेसिपी.

अमृत's picture

4 Oct 2016 - 11:54 am | अमृत

करून बघायला हवी.

सत्याचे प्रयोग's picture

4 Oct 2016 - 12:39 pm | सत्याचे प्रयोग

मस्त आहे नक्की प्रयोग केला जाईल

इशा१२३'s picture

4 Oct 2016 - 12:50 pm | इशा१२३

मस्त मस्त!

इशा१२३'s picture

4 Oct 2016 - 12:51 pm | इशा१२३

मस्त मस्त!

पाकृ ब्येष्टच आहे... पण अंडं कच्चंच ??
वास येत नाही मूसला ?

सामान्य वाचक's picture

4 Oct 2016 - 1:16 pm | सामान्य वाचक

शिजवले तर त्याचे ऑम्लेट होईल कि

विनोद जाऊ दे, पण वास नाही येत

त्रिवेणी's picture

4 Oct 2016 - 2:55 pm | त्रिवेणी

hi hi

वेदांत's picture

4 Oct 2016 - 1:22 pm | वेदांत

मस्त.

सविता००१'s picture

4 Oct 2016 - 2:00 pm | सविता००१

मस्तच रेसिपी

अप्रतिम चॉकलेट मुस. नक्की ट्राय करणार.

रेवती's picture

4 Oct 2016 - 3:41 pm | रेवती

छान झालय.

गणामास्तर's picture

4 Oct 2016 - 4:26 pm | गणामास्तर

नवरात्रामुळे अंडी वापरायला बंदी आलीये सुप्रिम कोर्टातून, दुसरा काय पर्याय असू शकतो अंड्याला?

नुसतं जिलेटीन पुरावं, तरी तज्ञांचं मत घ्यावं.

बरेच जिलेटीन शाकाहारी नसतात.

तुमच्याकडे तुमच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टाच्या वरच कोर्ट असेल तर अपील करुन बघा.

गणामास्तर's picture

5 Oct 2016 - 8:55 am | गणामास्तर

आमच्याकडे फक्त दोनचं कोर्ट आहेत, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट.
हाय कोर्टाला आम्ही जुमानत नाही आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला जुमानत नाही :)

पैसा's picture

4 Oct 2016 - 4:31 pm | पैसा

मस्त पाकृ!

टुकुल's picture

4 Oct 2016 - 5:01 pm | टुकुल

जबरद्स्त..

गणपाला किडनॅप करायचा विचार चालु आहे ;-)

--टुकुल

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2016 - 9:09 pm | पिलीयन रायडर

अहाहा!!!

रुपी's picture

4 Oct 2016 - 11:01 pm | रुपी

मस्त दिसत आहे.. अंडं असल्यामुळे पास ..

नूतन सावंत's picture

4 Oct 2016 - 11:22 pm | नूतन सावंत

व्वा!क्या बात है!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2016 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे

चॉकलेट मूस जीव की प्राण हाय !

एखादा कट्टा करून हे खिलविल्याशिवाय इतक्या सुंदर पाकृवर विश्वास ठवणार नाही... सांगून ठेवतो :)

निवेदिता-ताई's picture

5 Oct 2016 - 1:36 am | निवेदिता-ताई

मस्तच

विशाखा राऊत's picture

5 Oct 2016 - 2:31 am | विशाखा राऊत

क्या बात है :)

गणपा's picture

5 Oct 2016 - 7:06 am | गणपा

अंड हे जिलेटीनप्रमाणेच आॅप्शनल आहे.
अंड्या एेवजी व्हिप्ड क्रिम असेल तरी चालेल.
अंड्यातला पिवळा बलक मात्र मी मुद्दम वापरला नाही, त्यामुळे थोडा वास येऊ शकतो
मात्र पांढ-या भागामुळे वास येत नाही.

गणपा's picture

5 Oct 2016 - 7:12 am | गणपा

समस्त वाचक प्रतिसादकांचे आभार.
स्वातीताई मूसच्या अधिक माहिती बद्दल धन्यवाद.
डाॅक कधी करायचा कट्टा?

सुखीमाणूस's picture

5 Oct 2016 - 7:46 am | सुखीमाणूस

हा पदार्थ घरी करायचा आता. भिशी च्या dessert ची पण सोय झाली.
मुलाना अन्ड खायला घालायचा मस्त उपाय
ते उरलेल पिवळ्या बलकाच काय करता ओ तुम्ही

सपे-पुणे-३०'s picture

5 Oct 2016 - 9:10 am | सपे-पुणे-३०

खासच!
वर म्हात्रेकाकांना पण अनुमोदन.

दिपक.कुवेत's picture

5 Oct 2016 - 11:48 am | दिपक.कुवेत

तोंपासू पाकॄ. फोटो तर लाजवाब....एगलेस जरुर ट्राय करण्यात येईल.

अनन्न्या's picture

5 Oct 2016 - 1:56 pm | अनन्न्या

अंड्याशिवाय करून पाहण्यात येईल.

देखणी पाकृ. सोपी वाटतेय.करुन बघावी का काय वाटतंय फोटो बघून.

दक्षिणा's picture

26 Oct 2016 - 2:18 pm | दक्षिणा

जबरी आहे पाकृ. नुसते फोटो पाहून वजन वाढले.

मराठमोळा's picture

27 Oct 2016 - 4:23 am | मराठमोळा

गंपाशेट.. _/\_
त्या मूसमधे घूस बनून घुसावे आणि फडशा पाडावा असे वाटते आहे. =))
फोटो नेहमीप्रमाणेच लाजवाब. :)

राम राम मिपा's picture

16 Nov 2016 - 10:43 am | राम राम मिपा

नक्की try..करणार ~~!!! येत्या वीकएंड चा प्लॅन fix.............. ;)