Skip to main content
साहित्य
१ कप रात्रभर भिजवलेला सोया
१ कप सोया चंक्स
१ कप मैदा
१ कप गव्हाचे पीठ
१ मोठा चमचा प्रत्येकी, आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
१ चमचा प्रत्येकी, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला
४ ते ५ चमचे घट्ट दही
२ ते ३ चमचे तेल/तूप
चवीनुसार मीठ
आइस्क्रीम च्या काड्या, लागतील तश्या
कृती
एका मोठ्या भांड्यात पाणी तापवायला ठेवा. पाण्याला उकळी आली कि त्यात ३/४ चमचे मीठ टाकून, सोया चंक्स साधारण ५ ते १० मिनिटे उकळून घ्या.
चंक्स, गरम पाण्यातून काढून, गार पाण्यात थोडा वेळ गार करत ठेवा.
चंक्स गार झाले कि मग हाताने दाबून पाणी काढून, त्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्या.
रात्रभर भिजवलेले सोया, निथळून, मिक्सर मधून बारीक वाटून घ्या (लागल्यास थोडं पाणी घाला).
सोया चंक्स मध्ये हे वाटलेले सोया घाला. चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. ह्या मिश्रणात, आता हळू हळू मैदा, आणि पीठ घालून हे कणकेसारखं मळून घ्या. मळून झाला कि त्यावर ओलं फडकं टाकून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.
ह्या मिश्रणाच्या आता आपल्याला जाडसर पोळ्या लाटायचा आहेत (मी ह्या साठी साधा रोटी मेकर वापरला, पण तुम्ही पोळपाट-लाटणे वापरून जराश्या जाडसर पोळ्या लाटून घेऊ शकता)
ह्या पोळ्यांचे लांब तुकडे कापून, ते आइस्क्रीम च्या काड्यांवर गोल फिरवून बसवा. सगळी कणिक अश्या प्रमाणे पोळ्या लाटून, तुकडे कापून चांप तयार करून घ्या. तयार चांप फ्रीज मध्ये १० ते १५ मिनिटे ठेऊन द्या.
एका मोठ्या पातेल्यात पाण्याला उकळी येऊ द्या [पाणी भरपूर घ्या]. पाण्याला उकळी आली कि सोया चांप गरम पाण्यात घालून, साधारण १५ ते २० मिनिटे उकळून, शिजवून घ्या. गरम पाण्यातून चांप काढून गार करून घ्या.
हे असे तयार चांप हवाबंद पिशवीत घालून फ्रीजर ला ठेऊ शकता. लागतील तसे बाहेर काढून वापरू शकता. फ्रीजर मध्ये साधारण २० ते २५ दिवस सहज टिकतात.
एका भांड्यात घट्ट दही, आलं, लसूण, मिरची पेस्ट, सगळे मसाले, २ चमचे तेल/तूप आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
ह्यात चांप घालून मसाला सगळ्या बाजूने नीट लावून घ्या. हे साधारण ३० ते ४५ मिनिटे मॅरीनेट करत ठेवा.
ग्रिल पॅन गरम करून त्याला ब्रश ने थोडंसं तूप/तेल लावून घ्या. ग्रिल पॅन नसल्यास साध्या तव्यावर सुद्धा थोडं तेल/तूप लावून हे चांप दोन्ही बाजूने छान भाजून घ्या (साधारण ४ ते ५ मिनिटे दोन्ही बाजूने). ओव्हन असल्यास ओव्हन मध्ये ब्रॉईल मोड मध्ये भाजून घेऊ शकता.
शेवटी एकदा वरून ब्रशने तेल/तूप लावून गरम गरम तंदूरी सोया चांप, पुदिना चटणी, कांद्याचे काप, बारीक कोथिंबीर आणि लिंबू पिळून आणि तव्यावर केलेल्या गार्लिक नान मध्ये गुंडाळून खायला घ्या!
[ह्या चांप ला गरम कोळसा आणि तुपाची धुरी दिली तर अजून छान चव येते. धुरी कशी द्यायची हे मी मागे बिना ओव्हन तंदूरी चिकन च्या पाककृतीत दिलेलं आहे.]
[ह्या चांप चे अफगाणी सोया चांप पण मस्त होतात. तव्यावरचे नान आणि अफगाणी सोया चांप ची पाककृती टाकेन पुढे कधीतरी]
वाचने
19515
प्रतिक्रिया
30
प्रतिक्रिया
तोंडाला पाणी सुटलंय .... एवढं
कहर हो निव्वळ कहर!!!
धन्यवाद!
In reply to कहर हो निव्वळ कहर!!! by जेम्स वांड
वेगळीच पाकृ आहे. मस्त असणार.
आहा!!
मस्त पाकृ आहे
स्लsssर्प !!! मांसाहारी
:-)) धन्यवाद!!
In reply to स्लsssर्प !!! मांसाहारी by डॉ सुहास म्हात्रे
अगदी मस्त
परवाच एका हाटेलात मेनुवर चिकन
...
व्वाह! मजा आया.
हे समजले नाही.
Binding
In reply to हे समजले नाही. by रमेश आठवले
धागाकर्त्याने असे लिहिले आहे.
हो.
In reply to धागाकर्त्याने असे लिहिले आहे. by रमेश आठवले
सोया सोया चाप , खुला आसमान !
In reply to हो. by manguu@mail.com
वाह क्या बात है.
असलं काही टाकत जाऊ नको रे.
:-)) बाकी आभारी आहे!
In reply to असलं काही टाकत जाऊ नको रे. by अभिजीत अवलिया
मस्त हो शेफ केडि..
कहर !
मामाश्री ...
In reply to कहर ! by देशपांडेमामा
मस्त
पीठ फार अन काड्या कमी
वाह, आता ते चांप वापरून पाकृ
In reply to पीठ फार अन काड्या कमी by manguu@mail.com
व्हेज खाणार्यांची सोय झाली.
वैच.
In reply to व्हेज खाणार्यांची सोय झाली. by सूड
ह्या वर्षी (आणि निदान
In reply to व्हेज खाणार्यांची सोय झाली. by सूड
तोंपासु