व्हेजिटेबल मुर्ग मुसल्लम

Primary tabs

केडी's picture
केडी in पाककृती
29 May 2018 - 2:25 pm

MurghMissallam-1

साहित्य
१ छोटी कोंबडी, साधारण ६०० ते ७०० ग्राम, स्किन सकट

मॅरिनेशन साठी
१/२ वाटी दही
१ लिंबाचा रस
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लाल तिखट
२ चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची ची पेस्ट
२ मोठे चमचे तेल
मीठ, चवीनुसार

सारणासाठी साहित्य
१/४ वाटी मटार
१ छोटा बटाटा, चौकोनी छोटे तुकडे करून
१ छोटा गाजर, चौकोनी तुकडे करून
१ छोटा टोमॅटो, चिरून
२ मध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ इंच आलं, बारीक उभं चिरून
१ चमचा तूप
२ मोठे चमचे तेल (कांद्या साठी)
मीठ, चवीनुसार

मुर्ग मुस्स्लम, हि एक खास मुघलाई पाककृती, ज्यात अख्खी कोंबडी वापरून, त्यात अंडी भरून, कोरडी किंवा मसालेदार घट्ट साँस मध्ये शिजवली जाते. हि पाककृती, रणजित राय ह्यांच्या "तंदूर, दि ग्रेट इंडियन बार्बेक्यू" पुस्तकातली आहे. ह्यात आपण भाज्या वापरून कोंबडी भरतो, म्हणून व्हेजिटेबल मुर्घ् मुसल्लम.

कृती
चिकन स्वच्छ धुवून, कोरडं करून घ्या. एका भांड्यात मॅरीनेशनच साहित्य एकत्र करून, ते चिकनला आतून आणि बाहेरून लावून घ्या. हे चिकन फ्रीज मध्ये किमान २ तास मुरत ठेवा.

Step1  Step2

step3  Step6

पॅन मध्ये २ चमचे तेल तापवून उभा चिरलेला कांदा खरपूस भाजून घ्या.

Step3  Step4

पॅन मधून कांदा बाजूला काढून, त्याच पॅन मध्ये १ चमचा तूप गरम करून, त्यात हिरव्या मिरच्या, आल्याचे काप टाकून, २ मिनिटे परतून घ्या. ह्यात आता भाज्या घालून, त्या साधारण ८०% मंद आचेवर शिजवून घ्या. चवीनुसार मीठ घालून, मिश्रण थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झालं कि त्यात तळलेला कांदा कुस्करून घाला.

Step6  Step7

हे सारण आता आपल्याला कोंबडीत भरून घायचे आहे. सारण आत भरून, कोंबडी सुई दोऱ्याने शिवून घ्या, म्हणजे सारण बाहेर पडणार नाही.

Step8  step8

कोंबडीचे पाय एकत्र बांधून, हि कोंबडी आपण ओव्हन मध्ये साधारण १८० ते १९० डिग्री वर, ४५ ते ५० मिनिटे भाजून घायची आहे. [ओव्हन नसल्यास, ग्रिल पॅन वर, किंवा कुकर मध्ये थोडं तेल टाकून भाजून घ्या. पॅन किंवा कुकर मध्ये कोंबडी शिजवताना दर १० ते १५ मिनिटांनी परतत राहा, म्हणजे कोंबडी सगळीकडून छान भाजली जाईल.

Step9  step10

मस्त तवा पराठ्या सोबत आणि एखाद्या रायत्या सोबत खायला घ्या!

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

29 May 2018 - 2:37 pm | पिलीयन रायडर

आपण काही चिकन बिकन खत नाही बरं का, फक्त फोटो पहायला चक्कर मारली. फोटो छान!

पाकृ मध्ये सुई दोऱ्याचा वापर मिपावर पहिल्यांदाच झाला असेल नै!

मी पण वश्याट खात नाही पण फक्त केडीचे फोटो आणि गार्निशिंग पाहायला आलो होतो..
===
मुर्ग ऐवजी दुसरा काही वापरून हे शाकाहारी व्हेजिटेबल मुर्ग मुसल्लम बनावट येईल का ?

एक दीर्घ उसासा टाकल्याची स्मायली कल्पावी. असलं काही बनवायलाही जमायचं नाही आणि कुठे खायलाही मिळायचं नाही. असो. बापुडे दीनवाणे वाचक.

कुकरमध्ये भाजताना शिटी ना लावता व झाकण ना लावता ठेवायचे ना? कुकरऐवजी मोठे पसरट असे, घट्ट झाकण असलेले भांडेही चालेल ना?

झाकण ठेवायचं, शिट्टी लावायची नाही आणि कुकर बंद करायचा नाही....मोठं पसरट जाड बुडाचे भांडे असेल तर उत्तम...

जेम्स वांड's picture

29 May 2018 - 6:44 pm | जेम्स वांड

_______________/\________________

कहर आहात तुम्ही, काय ती निगुतीनं घातलेली मेहनत, काय ते कलासक्त फोटो, काय त्या क्लिष्ट डिशेस सोप्या करून सांगणे, सगळेच उत्तम!

केडी's picture

29 May 2018 - 9:23 pm | केडी

मंडळ आभारी आहे!
_/\_

जेडी's picture

29 May 2018 - 9:44 pm | जेडी

+१०००

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2018 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो बघूनच माणुस गारद झाला तर मग कोंबडी खायला तो कसा शिल्लक राहील ? सांगा, सांगा, कसा शिल्लक राहील ???

केडी's picture

29 May 2018 - 10:01 pm | केडी

:-))
:-))
_/\_

चामुंडराय's picture

30 May 2018 - 6:37 am | चामुंडराय

लय भारी ! फोटू बघूनच तोंपासु.

बाकी या दोरीच्या रेसिप्या बघितल्यावर एक विचार मनात येतो, आजकालच्या फूड ग्रेड अमुक आणि फूड ग्रेड तमुक च्या जमान्यात फूड ग्रेड दोरी देखील मिळते काहो केडी सर ?

केडी's picture

30 May 2018 - 8:15 am | केडी

अर्थातच... मिळतो की...

MAXGOODS Cooking Butcher's Twine for Meat Prep and Trussing Turkey 100% cotton https://www.amazon.in/dp/B01M5H375T/ref=cm_sw_r_cp_apa_i_t6GdBbVM7Z364

पण मी असल्या भानगडीत पडत नाही, एवढ्या तापमानाला फक्त दोरा पेट घेऊन जळणार नाही ना एवढेच बघायचे...
आपला पुड्या बांधायचा किंवा हार वाला दोरा उत्तम...

अबब, साडे पाचशे रुपयांचा दोरा ??
हे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा दोरा असे झाले तर !
त्यापेक्षा वाण्याकडून अर्धा किलोची पुडी बांधून आणली तर दोरा हि मिळेल आणि पुडीतील जिन्नस देखील :)

वांगे नायतर कोबी

फोटो भारी दिसत आहेत ! क्षणभर व्हेजिटेबल मुर्ग मुसल्लम हे व्हेज मुर्ग मुसल्लम असं वाचल गेल ! म्हंटल हे काय नविन ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गुरुवारंम सायंकालम कलिसोचिनद्दरा... :- Kirrak Party

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2018 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते तसंच आहे ! त्या कोंबडीने आयुष्यभर केवळ व्हेजिटेरियन पदार्थच खाल्ले आहेत. ;)

रायनची आई's picture

31 May 2018 - 10:40 am | रायनची आई

दोन प्रश्न आहेत- 1) कोंबडी स्कीनसकट का घ्यायची? स्कीन काढूनपण करता येईल ना?
2) चिकन marinate करायला फ्रीज मधे का ठेवतात? खर तर ते बाहेर जास्त मुरू शकते ना?

स्किन चिकन ला मॉईस्ट ठेवते. अर्थात स्किन नको असल्यास काढून टाकणे, पण मग चिकन ड्राय पडणार नाही ह्याची काळजी घेणे
कच्चे मांस रूम टेम्प ला ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया ची पैदास वाढू शकते, थंड तापमान हि वाढ कमी करते.

श्वेता२४'s picture

2 Jun 2018 - 1:02 pm | श्वेता२४

तुमच्या पाककृती 'पाहणे ' हा अत्यंत सुखद अनुभव असतो दंडवत घ्यावा

केडी's picture

2 Jun 2018 - 5:09 pm | केडी

आभारी आहे
_/\_

केडी's picture

2 Jun 2018 - 5:09 pm | केडी

आभारी आहे
_/\_

गवि's picture

2 Jun 2018 - 1:08 pm | गवि

छान.

पण शेवटच्या फोटोतला ऐवज पराठ्यासोबत as is basis वर कसा खायचा. काही उलगडून, कापून, पराठ्याला लावण्यास फ्रेंडली करावा लागेल ना?

केडी's picture

2 Jun 2018 - 5:07 pm | केडी

plate

गवि's picture

2 Jun 2018 - 6:34 pm | गवि

उत्तम.

यावरून गणपाशेटच्या बियर बम चिकनची आठवण झाली.

उगा काहितरीच's picture

2 Jun 2018 - 6:12 pm | उगा काहितरीच

हे असं काही बनवायची शक्यताच नाही. पण कुणी करून दिली तर ... (क्षणभर विचार करूनच दिल गार्डन गार्डन हो गया ! ) बाकी तुमचं प्रेझेंटेशन , पाकृ खरंच अप्रतिम ! तुमच्या सारख्याचे लेख वाचून / पाहून स्वयंपाकघरात लूडबूड करायची प्रेरणा मिळते.

प्रोत्साहाना बद्दल आभारी आहे!

शंकासुर's picture

8 Jun 2018 - 12:00 am | शंकासुर

नाव वाचून मला वाटलं हॅ हे कसं केलं व्हेज ?
बिर्याणी व्हेज केली हे ठीक आहे मुर्ग मुसल्लम मधलं मुर्ग काढून टाकला तर काय मजा. त्यापेक्षा व्हेज कोल्हापुरी बरी...
पण वाचल्यावर फार बरे वाटले...चांगला बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्कीच करून बघीन

आनंदी गोपाळ's picture

14 Jun 2018 - 9:20 pm | आनंदी गोपाळ

स्वारी.
याला मुर्ग मुसल्लम नाही म्हणणार.
व्हेज स्टफ्ड बेक्ड चिकन म्हणेन हवं तर.

मुर्ग मुसल्लम चा अंगी रस्सा नसेल तर ती डिश बदलते.

किरण कुमार's picture

19 Jun 2018 - 3:25 pm | किरण कुमार

भारी आहे डीश आणि सजवली पण मस्त

डॉ श्रीहास's picture

19 Jun 2018 - 5:36 pm | डॉ श्रीहास

आणि कधीतरी खायला मिळेल ह्या आशेवर सुस्कारा सोडतो.