सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
18 May 2018 - 4:48 pm

बघूच धावतो कसा? खट्याळ चांदवा...
सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!

अजून पाहिली न मी भरात पौर्णिमा
उगाच दावतो मला घड्याळ चांदवा!

नभावरुन एकदाच हात फेरला
उद्या कळेल बातमी..'गहाळ चांदवा!'

शशीस चेहरा तुझा म्हणू कसा? प्रिये,
तुझ्यापुढे दिसे मला गव्हाळ चांदवा!

निळ्या नभावरी पिठूर साय पांघरु...
उधाणला उरातुनी दुधाळ चांदवा!

तनू-तनू तहानली सहाण वाटते
हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा!

पहाटही नभावरी गुलाल रंगते
मिठीत लाजला तिच्या मधाळ चांदवा!

—सत्यजित

gazalमराठी गझलशृंगारकवितागझल

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

18 May 2018 - 5:31 pm | सस्नेह

दिल चांदवा चांदवा हो गया !

सत्यजित...'s picture

22 May 2018 - 4:30 am | सत्यजित...

छोटासाच पण खूप सुंदर बोलका प्रतिसाद!
वाह् म्हणून दाद द्यावासा! खूप धन्यवाद!

शाली's picture

18 May 2018 - 6:25 pm | शाली

आवडली! सुरेख!

प्राची अश्विनी's picture

18 May 2018 - 7:32 pm | प्राची अश्विनी

आहा!

प्रचेतस's picture

18 May 2018 - 8:21 pm | प्रचेतस

क्या बात...!
जबरीच.

तनू-तनू तहानली सहाण वाटते
हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा!

जियो! अप्रतिम कल्पना...! एकेक शब्द मनात घोळवत घोळवत हे कडवं म्हणतोय केव्हापासून.

सये तुझ्या तनूवरी हा चंद्र मी उगाळतो
चांदण्यांच्या वणव्यात साऱ्या जीव कसा पोळतो

सत्यजित...'s picture

22 May 2018 - 4:22 am | सत्यजित...

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद एस!
आपण लिहिलेल्या ओळीही सुंदर आहेत!
त्यांतील पहिल्या ओळीवरुन अजून दोन ओळी सुचल्या,ज्या सदर गझलेसाठीच,दुसरा मतला—'हुस्नेमतला',असू शकतील...

"सये तुझ्या तनूवरी उगाळ चांदवा,
दिसेन मग जरा तरी नव्हाळ चांदवा!"

धन्यवाद!

"सये तुझ्या तनूवरी उगाळ चांदवा,
दिसेन मग जरा तरी नव्हाळ चांदवा!"

अहाहा! केवळ अप्रतिम!

पद्मश्री चित्रे's picture

19 May 2018 - 8:10 am | पद्मश्री चित्रे

छानच अगदी.

शिव कन्या's picture

19 May 2018 - 8:32 am | शिव कन्या

+१११

संजय पाटिल's picture

19 May 2018 - 10:07 am | संजय पाटिल

अप्रतिम....

श्वेता२४'s picture

19 May 2018 - 1:39 pm | श्वेता२४

शशीस चेहरा तुझा म्हणू कसा? प्रिये,
तुझ्यापुढे दिसे मला गव्हाळ चांदवा!

हे भारी आवडलं. असं कधी वाचनात नव्हतं आलं. मस्तच

दुर्गविहारी's picture

19 May 2018 - 10:03 pm | दुर्गविहारी

मस्तच. नेहमीप्रमाणे सुरेख.

सत्यजित...'s picture

22 May 2018 - 4:35 am | सत्यजित...

दुर्गविहारी,आपण अवर्जून दाद देता,त्याबद्दल मनःपूर्वक आभार!

सविता००१'s picture

21 May 2018 - 6:04 am | सविता००१

सुरेख

अप्रतिम खरोखरच.
फार आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2018 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रचना.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

21 May 2018 - 6:14 pm | यशोधरा

सुरेख!

शाली,प्राची,प्रचेतस,पद्मश्री,शिव कन्या,संजय पाटिल,सविता,अभ्या,बिरुटे सर,यशोधरा...
आपण सर्वांनी अनेकवेळा अवर्जून प्रतिसाद नोंदवून दाद दिलीत,लिखाणास प्रोत्साहन दिलेत,त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

सत्यजित साहेब , आपल्या कविता मला फार भावतात . आपण फारच सुंदर विचार करता . सुंदर कविता ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

वीणा३'s picture

23 May 2018 - 8:10 am | वीणा३

मस्तच !!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 May 2018 - 4:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुरेख आणि रेखिव रचना.

उगा काहितरीच's picture

23 May 2018 - 7:12 pm | उगा काहितरीच

मी सहसा या विभागात चक्कर मारत नाही. पण आज आल्याचं चीज झालं . कविता आवडली.

धनावडे's picture

1 Jul 2020 - 10:14 am | धनावडे

फारच छान