परदेशी पाहूण्यांना फिरवून आणण्याकरिता स्थळ सुचवा

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in काथ्याकूट
7 Feb 2018 - 5:35 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर
आमच्या हिंजवडी (पुणे)स्थित कार्यालयाला भेट देण्यास काही परदेशी (युरोपीय) पाहुणे येणार आहेत (यात तीन स्त्रिया , तीन पुरुष आहेत). चार-पाच दिवसांच्या भेटीत एकदा त्यांना साधारण सहा ते सात तासात फिरवून आणता येईल असे स्थळ कृपया सुचवा.

  • हे फिरणे कामाच्या दिवशी असेल
  • दुपारी तीनच्या सुमारास हिंजवडीमधून निघावे असे नियोजन आहे
  • फिरुन झाल्यावर रात्रीचे जेवण (यात मद्यपान असेल) करुन रात्री दहापर्यंत पाहूण्यांना हिंजवडीतील हॉटेलपर्यंत पुन्हा सोडता यावे
  • वाहनांची सोय आमच्या कार्यालयाकडून करण्यात येईल त्यामुळे त्याची चिंता नाही पण प्रवास फार दूरचा नसावा. खास करुन रात्री मद्यपानानंतर कुणाला जास्त दूर प्रवास नको असतो.

मी जाधवगडचा विचार करत होतो, पण गुगल मॅप्स जरी दीड ते पावणे दोन तास प्रवास दाखवत असला तरी प्रत्यक्षात हिंजवडीपासूनचा एका बाजूचा प्रवास अडीच तासापर्यंत आहे असे कळाले. म्हणजे येण्या जाण्यात पाच तास जातील, इतका मोठा प्रवास नको आहे.
आणखी काय पर्याय असू शकतील ?
धन्यवाद

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 Feb 2018 - 5:55 pm | कपिलमुनी

सदाशिव पेठ , लक्ष्मी रोड , तुळशीबाग फिरवून आणा !
टू व्हीलरने प्रवास केल्यास अजुन मजा येइल.

पुणे दर्शन सहलीतली ठिकाणे थोडी अधिक उणे करून स्वत:च्या वाहनाने करता येईल.

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2018 - 5:58 pm | मराठी कथालेखक

ही कोणती ठिकाणे आहेत?मुख्य म्हणजे परदेशी पाहूण्यांना आवडू शकेल अशी ठिकाणे त्यात आहेत का ?
स्वतःच्या वाहनाने जाण्याची गरज भासणार नाही. कंपनीकडून वाहनांची सोय केली जाईल.

त्यांना घाट दाखवा, एखादा गड किल्ला दाखवा (शनिवार वाडा सोडून) ! काहीही दाखवा पण भारताची खराब इमेज मनात घेऊन जातील असे कटाक्षाने टाळा.

सगळे बघुन झाल्यावर रात्री इमेज विसरायचा पोग्राम आहेच की.
डोन्ट वरी धर्मराजा.

स्मिता.'s picture

7 Feb 2018 - 7:40 pm | स्मिता.

तुमच्या प्रतिसादाचा रोख विनोदी असला तरी मूळ प्रतिसाद दुर्लक्ष करण्यासारखा नाही.

पाश्चिमात्य लोकांना आपल्याकडच्या गरीबी, गर्दी, गलिच्छपणा, प्रदूषण, इ. नकारात्मक गोष्टीच प्रकर्षाने दिसत असतात आणि त्यावरच चर्चा करायला आवडते. त्यामुळे शक्य असल्यास आपल्या देशाची प्रगत आणि सुंदर बाजूच दाखवा असा आग्रह मी करेन!

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2018 - 10:54 pm | मराठी कथालेखक

कोणता घाट ?

कपिलमुनी's picture

7 Feb 2018 - 6:07 pm | कपिलमुनी

हिन्जेवाडी मधुन लवासा ला जावून या , सनसेट सुंदर दिसेल , येताना चांगले हॉटेल आहेत.

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2018 - 10:55 pm | मराठी कथालेखक

लवासाचा विचार चांगला वाटतोय , पण या महिन्यात तिथे फिरण्यासारखे आहे का ? साधारणपणे लोक तिथे पावसाळ्यातच जातात ना

आगाखान पॅलेस आणि राजा केळकर म्युझियम दाखवु शकता. तुमच्या लिमिटेड वेळामधे हे होऊ शकते. वेळ असेल ते पु.ल. देशपांडे उद्यान ही दाखवू शकता. छान आहे.

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2018 - 7:11 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.. केळकर म्युजियमचा विचार करतो.

पुंबा's picture

7 Feb 2018 - 7:12 pm | पुंबा

शनिवार वाडा
भुलेश्वर मंदीर
पु ल देशपांडे उद्यान

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2018 - 10:56 pm | मराठी कथालेखक

हं.. दगडी बांधकामाचे भुलेश्वर मंदिर चांगले आहे पण परदेशी लोकांना मंदिर बघण्यात रस असेल का ?

पुंबा's picture

8 Feb 2018 - 1:07 pm | पुंबा

भारतीय मुर्तीकलेबद्दल पाश्चात्यांना आकर्षण असते. भुलेश्वर मंदीरात अतिशय सुंदर कोरीव शिल्पे आहेत. नक्कीच आवडतील.

भुलेश्वर आवडण्यासारखेच आहे मात्र तुमच्या वेळेत ते बसणारे नाही, हिंजवडीपासून साधारण शंभर सव्वाशे किमी आहे.

पुंबा's picture

8 Feb 2018 - 3:52 pm | पुंबा

अरे हो!
वेळेचा मुद्दा ध्यानात यायला हवा होता. तीन वाजता निघून होण्यासारखे नाही.

चाणक्य's picture

8 Feb 2018 - 10:19 pm | चाणक्य

भाजे,कार्ला, बेडसे लेणी होऊ शकतील. लोहगड पण.होईल कारण वरपर्यंत गाडी जाते आता.

अभिजीत अवलिया's picture

7 Feb 2018 - 8:30 pm | अभिजीत अवलिया

मगरपट्टा दाखवा.

manguu@mail.com's picture

7 Feb 2018 - 8:36 pm | manguu@mail.com

परदेशी लोकाना म्युझियम फार चांगला चॉइस ठरेल असे वाटत नाही.

अनुप ढेरे's picture

7 Feb 2018 - 8:53 pm | अनुप ढेरे

केळकर संग्रहालय आणि पाताळेश्वर दाखवा. पाताळेश्वर लय भारी आहे आणि फिरंग्यांना जनरली बघता येत नाही अशा प्रकारची जागा आहे. आगाखान प्यालेस अगदीच सामान्य आहे यापुढे.

निशाचर's picture

7 Feb 2018 - 10:15 pm | निशाचर

हेच लिहिणार होते.

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2018 - 10:50 pm | मराठी कथालेखक

पाताळेश्वरबद्दल मलाच माहिती नाही.. काय आहे हे, कुठे आहे ?

दासबोध.कॊम's picture

13 Feb 2018 - 1:49 pm | दासबोध.कॊम

जंगली महाराज मन्दिराला लागून जी लेणीवजा मन्दिरे आहेत तीच पाताळेश्वर

चौथा कोनाडा's picture

13 Feb 2018 - 5:06 pm | चौथा कोनाडा

पुण्यनगरीतील कातळशिल्प : पाताळेश्वर लेणी

http://www.shantanuparanjape.com/2016/07/blog-post.html

लवासा आणि मगरपट्टा दाखवू नका. पवारांची ईमेज घेऊन गेल्याने येथील काही सन्माननीय सदस्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
अॅग्रो टुरिजम ची एखादी साईट दाखवा हे सुचवू इच्छितो.

लवासा आणि मगरपट्टा दाखवू नका. पवारांची ईमेज घेऊन गेल्याने येथील काही सन्माननीय सदस्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
अॅग्रो टुरिजम ची एखादी साईट दाखवा हे सुचवू इच्छितो.

सुखीमाणूस's picture

7 Feb 2018 - 10:27 pm | सुखीमाणूस

लोकांपुढे सगळे भारतीय आहोत.
त्याना कोण पवार आणि कोण फडणवीस?
त्यान्चा मतलब स्वस्तात चांगले काम करून मिळण्याशी

परदेशात मोर्चे काढून आपण जातो त्याना दाखवायला कसे आम्ही जाती मध्ये विभागले गेलो आहोत...

सुखीमाणूस's picture

7 Feb 2018 - 10:42 pm | सुखीमाणूस

अर्थात 8 वर्षापूर्वीचा..
मी जिथे काम करत होते त्या टीम चा ग्लोबल प्रमुख फार भारताच्या प्रेमात होता. त्याने ग्लोबल मीट ठेवली पुण्यात.
एकूण 22 जण होते
मग एक दिवस पुणे दर्शन अपरिहार्य होते.
मला आठवतंय त्याप्रमाणे आम्ही खालील ठिकाणी त्याना फिरवले जे बहुधा आवडले.

पर्वती
राजा केळकर सन्ग्रहालय
पाताळेश्वर
आगाखान पॅलेस

शेवटी त्याना क्याम्प भागात नेले. तिथे शोप्पिन्ग व रात्रीचे जेवण.

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2018 - 11:01 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.. पाताळेश्वरचा विचार करतो.. मी आधी एकदा बघून येईन जमल्यास.
जेवायला बार्बेक्यू नेशन असा विचार आहे.

कपिलमुनी's picture

7 Feb 2018 - 10:57 pm | कपिलमुनी

गांधीजी बद्दल खूप आकर्षण असते बऱ्याच लोकांना . त्यामुळे त्या संबंधी दाखवा. अर्धा दिवस खूप कमी आहे.

अरविंद कोल्हटकर's picture

8 Feb 2018 - 1:00 am | अरविंद कोल्हटकर

राका केळकर म्यूझिअम, कात्रजचे सर्पोद्यान ह्यामध्ये ३ तास सहज जातील. नंतर श्रमपरिहार सुरू.

कार्ल्याची लेणी आणि चाकणमधील एखादा (माहितीचा) कारखाना असा पुण्याचा जुना + नवा भाग दाखवून तुम्हाला सयाजीला बार्बेक्यू नेशनला नक्कीच ५-६ तासात परतता येईल. आणखी एक पर्याय : महादजी शिन्द्यान्ची छत्री (जुने पुणे) + National War Museum + एखाद्या microbrewery मध्ये सन्ध्याकाळ + जेवण (Effingut ?) + जाता येताना जमतील तेव्हढ्या data centresच्या इमारती बाहेरून बघणे (नगर रोडच्या सुरवातीला अनेक आहेत).

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 11:57 am | मराठी कथालेखक

कार्ल्याची लेणी पण चांगला पर्याय होवू शकेल माझ्या ध्यानातच नाही आले. शिवाय येता जाता तळेगाव-वडगाव ई मधला निसर्गरम्य परिसर बघता येईल. ट्रॅफिकही जास्त नसेल ..

कंजूस's picture

8 Feb 2018 - 6:00 am | कंजूस

विश्रामबाग वाडा
शिंदे छत्री
बनेश्वर
केळकर संग्रहालय
( मला असं म्हणायचं आहे की पुणे दर्शन पिएमटी करवते यातून ठिकाणं आणि क्रम घ्या आणि स्वत: कारने त्यातली मोजकी करा म्हणजे वेळेचं आयोजन करता येईल. बनेश्वर अशासाठी घेतलं आहे की वरती घाटातून पुणे शहर दिसते तसेच खेड शिवानगर रोडवर एखादे चांगले गर्दी नसलेले रेस्तरां झाले असेल तर आवडेल.)

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 11:58 am | मराठी कथालेखक

धन्यवाद.

भाजे किंवा बेडसे लेणी उत्तम पर्याय वाटत आहे. एकतर २००० वर्षापूर्वीचे अजूनही सुस्थितीत असलेले स्थापत्य, हिंजवडीपासून जवळ. ३ वाजता निघूनही आरामात दिवसाउजेडी सगळे बघून होता येते, बेडसे त्यातले त्यात अधिक उत्तम. अतिशय स्वच्छ परिसर. माफक चढण. भोवतालचा आसमंतही सुंदर. गर्दी जवळजवळ नाहीच.

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2018 - 10:13 am | चौथा कोनाडा

पाहुण्यांचे साधारण इन्टरेस्टस काय आहेत हे पण पाहून घ्या.

माझ्या मते भाजे पर्फेक्ट !!! कमी दमणुक (फक्त २५० पायर्‍या) वाली भाजे लेणी अतिशय सुंदर ट्रिप होईल.
कार्ला उंच व गर्दीचे ठिकाण आहे. भाजे हे बेडसे पेक्षा जास्त महत्वाचे लेणे समजले जाते.

अन हा रुट भारी राहिल (कमी ट्रॅफिक अन जाता जाता शेती, फ्लॉरिकल्चर फार्म, ग्रामिण भाग इ. )

हिंजवडी - मारुंजी - कासारसाई (धरणही पाहता येईल.) - बबेडओहळ - शिवणे - कडधे - काळे कॉलनी - पवना डॅम (जलाशयाचे सुंदर दर्शन) लोहगडच्या हिरव्या परिसरातून भाजे लेणी. इथं येई पर्यंत साडेचार -पाच वाजतील. सुर्यास्ताच्या कलत्या उन्हात लेणी व सुर्यास्त पाहुन होइल.
वेळ हाताशी असेल दुधिवरे खिंडीच्या अलीकडंच डोंगराच्या कुशीतलं हभप बाबामहाराज सातारकर स्थापित विठठल मंदिर पाहता येईल.
(तुमचे अध्यात्मिक इंप्रेशन पडेल. पुढे मागे आयटीकामाला कंटाळून बुवा झालाच तर हे रेडीमेड ग्राहक :-)

तुमच्याकडं वेळ कमी आहे (अन नंतर तीर्थप्रसादाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही) नाही तर मारुंजीत शेतकर्‍याच्या रानात ग्रामिण भोजनाची सोय करता आली असती.

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 11:59 am | मराठी कथालेखक

भाजे पेक्षा कार्ल्याला कमी चालावं लागतं बहूधा.. शिवाय कार्ल्याच्या लेण्या मोठ्या आहेत ना ?

चौथा कोनाडा's picture

9 Feb 2018 - 2:52 pm | चौथा कोनाडा

भाज्याची चढण मला कार्ल्यापेक्षा सोपी वाटली.

कार्ल्याच्या लेण्याजवळ एकवीरा देवीचं मंदिर असल्यामुळं तिथं भावकांची गर्दी, घाई असते. बाजरूपणा आलाय. पायर्‍या पायर्‍यावर पुजासाहित्याची दुकानं आहेत.
मला आठवतंय त्यानुसार काही लेण्या (बहुधा उंचीवरील) वासे लावून बंद केलेत, अपघात होऊ नये म्हणुन !
या कारणांसाठी मला भाजे लेणी बरी वाटतात.

.. शिवाय कार्ल्याच्या लेण्या मोठ्या आहेत ना ?

या बाबत प्रचेतस साहेब्च टिपण्णी करू शकतील !

अणि हो ..... कार्ला, भाजे, बेडसे या पैकी काही ठरलंतर प्रचेतससाहेबांनाच गाईड म्हणुन बरोबर न्या की ( अर्थात त्यांना वेळ असेल तर )

सिरुसेरि's picture

8 Feb 2018 - 9:33 am | सिरुसेरि

पाताळेश्वर , आगाखान पॅलेस , गोल्फमैदान

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Feb 2018 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आगाखान पेलेस वा वर सुचवल्याप्रमाणे एखादा किल्ला वा सिंहगड ?.. आपली वाचनालये, धरणे..ह्यात भव्य्,दिव्य ऐतिहासिक काही नाही.

कंजूस's picture

8 Feb 2018 - 10:44 am | कंजूस

पण एक शंका -
परदेशी तुमचे/कंपनीचे पाहुणे आहेत पण प्रवेश शुल्क इकडच्यांना दहा रु परदेशींना दहा डॅालर ( ६५०रु~~) काय करणार?

बेडसे लेणी पाहायला शुल्क नाही.

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 12:00 pm | मराठी कथालेखक

जे काही पैसे पडतील ते आम्हीच भरु नंतर कंपनीकडे क्लेम करायचेत ..

पिलीयन रायडर's picture

8 Feb 2018 - 11:31 am | पिलीयन रायडर

लेण्या किंवा पाताळेश्वर इत्यादी जागाच सुचवेन. परदेशी लोकांसाठी ते नक्कीच खास असेल.

म्युझियम दाखवू नका, त्यात फार काही राम नाही.

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 12:03 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद... पाताळेश्वर अथवा कार्ला वा बेडसे अशा पर्यायाचा विचार करतो आहे . पण पाताळेश्वराला जायचे म्हणजे उगाच कंटाळवाण्या ट्रॅफिकमधून जावे लागेल त्यामुळे बेडसे वा कार्लाला झुकते माप. दोन्हीत जास्त चांगले काय आहे ? शिवाय कुठे कमी चालावे लागेल ?

कार्ले लेणी अतीव सुंदर आहेत पण प्रचंड गर्दी, पायथ्याला गलिच्छता आहे.

कार्ले लेणीचा चैत्यगृह एकमेवाद्वितीय, पण बेडसेचे पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभही अतिशय सुंदर.

निवांतपणा बेडसेलाच मिळेल. कार्ले भाजे दोघांचीही चढाई सारखीच आहे, बेडसेला किंचित अधिक पायऱ्या आहेत इतकेच.

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 1:41 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.
गुगल मॅप्सवरही बेडसेचे फोटोज अधिक चांगले दिसत आहेत. बेडसेचा विचार करतो

हिंजेवाडी मधून निघून लोणावळा गाठा, लोणावळा फिरून झाले की येताना मुळशी मार्गे परत या. २-३ तास छान भटकंती होईल. वाटेत जमल्यास हाडशी मंदिर दाखवा.

सतिश पाटील's picture

8 Feb 2018 - 3:46 pm | सतिश पाटील

हिंजवडीचा उल्लेख "हिंजेवाडी" केल्याबद्दल निषेध.

पुंबा's picture

8 Feb 2018 - 3:51 pm | पुंबा

++१११
अतीशय डोक्यात जातो 'हिंजेवाडी' हा उच्चार.
बाकी, तिथल्या लोकल रेमडोक्यांच्या दादागिरीचा व गुंठामंत्र्यांच्या माजाचा निषेध करत असतो पण याबाबतीत त्यांचे म्हणणे सर्वथा योग्य आहे.

नाखु's picture

9 Feb 2018 - 4:33 pm | नाखु

लोकांच्या एकूण वृत्ती बद्दल खरंच राग येतो पण त्यांच्या हिंजेवाडी बद्दल आक्षेप आहे तो सर्वदा योग्य आहे

मुद्दाम उपद्रव देण्यासाठी चुकीचे उच्चार/लिखाण यांच्या प्रसारास अटकाव करण्यासाठी कटिबद्ध नाखु पांढरपेशा

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2018 - 4:41 pm | मराठी कथालेखक

हिंजेवाडी तसंच लोहेगाव...
असले चुकीचे उच्चार मुद्दाम पसरविण्यात काही लोकांना काय आनंद मिळतो कुणस ठावूक.
हिंजवडी फेज १ मध्ये STPI चं कार्यालय आहे , तिथल्या स्पेलिंगमध्ये Hinjawadi मधला j नंतरचा "a"नंतर चिकटवलेला दिसून येतो. हिंजवडीतील लोकांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम असावा.

कपिलमुनी's picture

9 Feb 2018 - 5:24 pm | कपिलमुनी

वानवडीचे वानोरी केले आहे , पुण्यात लोकल रेडियो चॅनेलमुळे बरेच गैर उच्चार पसरतात.

श्रीगुरुजी's picture

8 Feb 2018 - 3:23 pm | श्रीगुरुजी

शनिवारवाडा, ताम्हिणी घाट, मुळशी धरण, एम्प्रेस उद्यान

विशुमित's picture

8 Feb 2018 - 3:36 pm | विशुमित

एम्प्रेस उद्यान>>???
काहीतरी वेगळेच चित्र डोळ्यासमोर आले. जाऊ द्या.

भुलेश्वर म्हटलं असतं, लांब आहे हे एक कारण आणि आता तिथे इतर मंदिरांसारखाच बाजार असतो. दोन-चार फूलवाले, आत एक भटजी!!
तीन साडेतीन वर्षांपूर्वी गेलो होतो असलं काही नव्हतं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Feb 2018 - 4:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

एखाद्या रिसॉर्ट ला घेउन जा, लवासा पण चालेल. तिकडेच गप्पा टप्पा करा, खा प्या आणि परत या. ऑक्सफोर्ड गोल्फ कोर्स हे ठिकाण मस्त आहे, आम्ही गेलेलो एकदा क्लायंटला घेउन दिवसभर

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Feb 2018 - 4:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 4:48 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद... हे पण चांगले ठिकाण वाटत आहे. जेवण कसे असते ? मद्य मिळते का ?

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 4:50 pm | मराठी कथालेखक

खूप महाग असेल असे वाटतेय...

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Feb 2018 - 6:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

मद्य---विचारावे लागेल बहुतेक बियर आहे. पण आम्ही संध्याकाळ होईपर्यंत थांबलो नाही त्यामुळे बाकी अल्कोहोल बद्दल नक्की सांगु शकत नाही. फोन करुन विचारा.

संक्रांतीच्या जवळपास गेलात तर पतंग उडवणे वगैरे प्रकारही असतात, मजा येते एकुण

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Feb 2018 - 6:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

पंचशिल टेक पार्क मध्ये एक्झॉटिका म्हणुन, नगर रोडला आगाखान पॅलेस नंतर समोरच्या फिनिक्स मॉल मधे जा, किंवा मगरपट्टा मध्ये फिरवा

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2018 - 7:35 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद. पण बहूतेक बेडसे लेणी निश्चित करु ..
तसंही युरोपीयन पाहुण्यांना मॉल मध्ये काय नावीन्य वाटणार ?

चांगली माहिती रंजक पद्धतीने देणारा गाईड घेऊन लेणी दाखवा.
वेळ मिळाला आणि शक्य असेलतर एखादी शेती आणि दुग्धव्यवसाय? ते त्यांना कितपत आवडेल माहित नाही.

पण शहरात शक्यतो नेऊ नकाच!

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2018 - 1:30 pm | मराठी कथालेखक

इंग्लिश बोलता येवू शकणारा गाईड मिळाला तर घेवू.
बेडसे + वेळ मिळाल्यास पवना धरण/तलाव असा विचार आहे.. बॉसला विचारुन निश्चित करतोय आता

भाजे लेणीतील गूढ शिल्प:
https://www.misalpav.com/node/20767

प्राचीन भारतः भाजे लेणी :
https://www.misalpav.com/node/17433

प्राचीन भारतः बेडसे लेणी
http://www.misalpav.com/node/16902

प्राचीन भारतः कार्ले लेणी
http://www.misalpav.com/node/17159

प्रचेतस's picture

9 Feb 2018 - 3:30 pm | प्रचेतस

कार्ले लेणीवर अजून एक तपशीलवार लेख :)

मामाडे लेनेस वलुरकेस

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2018 - 5:37 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, प्रचेतस इथं लिंक दिल्याबद्दल.
वेळ काढून लेख आवर्जून वाचला.

खुप सुंदर लेख !
जबरदस्त शैली !
इतिहासाच्या गर्भात शिरून उत्कटपणे हा केलेला हा जिवंत महापट !
वाचताना भूतकाळ, वर्तमान काळ चित्रपटासारखे डोळ्यांपुढं तरळू लागले !
हे सर्व परिच्छेद वाचताना खिळवून ठेवतात ! वल्ली-प्रचेतसने निर्मिलेला हा भव्यपटात गुंगून मंत्रमुग्ध सोडतो आपल्याला !

खरंच त्या स्वच्छंदी मनोजचे आभार मानायला हवेत ज्यांनी मागे लागून हा सुंदर लेख लिहून घेतला !

मामलेदारचा पंखा म्हणतात त्या नुसार " हे जे प्रचेतस उर्फ वल्ली सर आहेत ना त्यांचा हा पुनर्जन्म आहे.... ते अगम्य शिलालेख त्यांनीच गतजन्मी लिहिलेले असावेत आणि या जन्मात त्यांचा अर्थ समजावून सांगायला ते परत आलेत..."
+ १ मामलेदारचा पंखा !

फोटोज आणि त्या अनुषंगाने लिहिलेली माहिती अप्रतिम !
सर्व शिलालेख अन त्याचा अर्थ उलगडत असताना स्तिमित व्हायला होते.

यवन म्हणजे मुसलमान ही माहिती प्रथमच समजली. इतरांप्रमाणे मी देखील यवन म्हंजे मुसलमान समजत होतो.
लेखाखालील प्रतिसाद देखील सुंदर आहेत.

प्रचेतस साहेब, या लेखाच्या नांवात "कार्ले लेणी" या शब्दांचा समावेश करता येईल का ?
समावेश केल्यास सर्च करताना सहजपणे सापडेल व आणखी वाचकांसमोर पोहोचेल !
धन्यवाद !

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2018 - 4:11 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद... बेडसे मधले "प्रासाद व गवाक्षांची जाळीदार रचना" विशेष आवडले.

बिटाकाका's picture

9 Feb 2018 - 4:59 pm | बिटाकाका

बेडसे निश्चित करणार असाल तर तिथून २-३ किलोमीटरवर पवनाहट्स नावाचा ऍग्रोपिकनिक स्पॉट आहे. एकदा वेबसाईट पाहून घ्या, जनरली आवडेल असं ठिकाण आहे.

सुमित्रा's picture

9 Feb 2018 - 5:20 pm | सुमित्रा

मोराची चिंचोली. अगदी 'भारत स्पेशल' होईल. बाकी गार्डन, मॉल ह्यात आपल्याला इंटरेस्ट. त्यांना त्यात नाविन्य वाटणार नाही. त्यांना खरेदी करायचीच असेल तर ethnicity दुकान परफेक्ट आहे, 'भारत स्पेशल' म्हणून. Phoenix mall मध्ये आहे ते.

ह्या अश्या क्लायंट व्हिजिट होत असतात, त्यामुळे अनुभवावरून सांगतोय, दुपारी ३ ला निघून फार लांब लांबचे प्रवास टाळा. एकतर ते जेट ल्याग मध्ये असतात, त्यात दिवस भर प्रेसेंटेशन मिटींग्स करून कंटाळलेले असतात. खूप लांबचा प्रवास त्यांना त्रासदायक ठरेल.

तुम्ही लिहिलंय वर कि ३ महिला आहेत, त्यांना एखाद्या स्त्री कलीग सोबत लक्ष्मी रोड ला पाठवा. तिथे त्या मनसोक्त शॉपिंग करू शकतील. तो पर्येंत पुरुष मंडळींना (त्यांना शॉपिंग मध्ये इंटरेस्ट नसल्यास) पुणे दर्शन धावती विझिट द्या (सारस बाग, पार्वती, पाताळेशवर इत्यादी).

रात्रीच्या मेजवानी साठी बार्बेक्यू नेशन किंवा सीग्री मध्ये मनसोक्त बिअर आणि कबाब इत्यादी साठी अवश्य घेऊन जा. त्यांना निश्चित आवडेल. त्या साठी आधीच टेबल राखून ठेवा. बहुदा ते हिंजवडीत कुठल्या तरी हॉटेल ला राहणार असतील, तर त्यांना सयाजी मधल्या बार्बेक्यू नेशन ला नेलेलं उत्तम, म्हणजे लवकर हॉटेल वर पोचून आराम करता येईल.

बार्बेक्यू नेशन किंवा तत्सम लाईव्ह ग्रिलवाली ठिकाणे शक्यतो टाळा. कलकलाट फार असतो अशा ठिकाणी, कोपा कबाना किंवा मेझा नाईन सारख्या ठिकाणी हट बुक करून निवांत जेवा.

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2018 - 7:31 pm | मराठी कथालेखक

चार दिवसाच्या भेटीत तिसर्‍या दिवशी ही सहल असेल.. त्यामुळे जेट लॉग वगैरे आटोपलेलं असेल.
बाकी युरोपातील बायका लक्ष्मी रोडला काय शॉपिंग करणार ? साडी की सलवार ? असो. तसंही इतक्या गर्दीत त्या गोंधळून जातील.
सयाजीतल्या बार्बेक्यूतच नेण्याचा विचार आहे.

नाखु's picture

9 Feb 2018 - 7:52 pm | नाखु

त्यांना मराठी येत असेल तर हा धागाच वाचायला द्या (तुमच्या सटीप अनुवाद विश्लेषण सह) एकतर भारतातच राहतील.

पाहुण्यांसकट सर्वांनी गमतीजमतीत घेणे, लगेच मोर्चा काढण्यात येईल असे नको, चर्चेत सुटणारे प्रश्न
मोर्च्याने जटील समस्या बनतात हे माहीत असलेला मिपाकर नाखु

दुर्गविहारी's picture

9 Feb 2018 - 8:42 pm | दुर्गविहारी

मला वाटते "कात्रज सर्पोद्यान" योग्य राहिल. एकतर दिवसभर काम केल्यानंतर लेणी पहाण्यासाठी डोंगर चढणे जीवावर येईल. त्यातून प्रत्येकाला ते आवडेल का ते पहा. प्राणी पहाणे आणि ते सुध्दा साप, नाग, वाघ असे खास ईंडियन स्पेशल जास्त आवडेल.आधी त्यांच्या आवडीचा अंदाज घ्या ईतकेच सुचवेन. शेवटी प्रश्न देशाच्या प्रतिष्ठेचा आहे.

राघवेंद्र's picture

10 Feb 2018 - 1:30 am | राघवेंद्र

सिंहगड मस्त आहे ना. शहरापासून जवळच आहे. तिकडे का घेऊन जात नाही आहात ???

बबन ताम्बे's picture

10 Feb 2018 - 2:17 pm | बबन ताम्बे

एव्हढ्या लोकांनी सुचविले, शेवटी कुठे नेले पाहुण्यांना ? मिपा कट्टया सारखा वृत्तांत येऊ द्या ☺

मराठी_माणूस's picture

10 Feb 2018 - 4:58 pm | मराठी_माणूस

जिथे जाणार असाल तिथे वॉशरुम च्या सुविधे बद्दल खात्री करा.

मराठी कथालेखक's picture

18 Feb 2018 - 10:05 pm | मराठी कथालेखक

सर्वांचे आभार.

मी बेडसे लेणी जवळपास निश्चित केली होती. पण काही कारणानी पाहुण्यांची ही भेट पुढे ढकलली गेली. आता हे पाहुणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतील. त्यावेळी उन्हाळा सुरु झालेला असेल त्यामुळे वाढत्या तापमानाचा विचार करुन बाहेर फिरण्याचा बेत आखावा लागेल किंवा कदाचित रद्दही करावा लागेल...बघू..

अर्रर्र मक्ले सर,

आम्ही एका देशस्थ मिपाकराचा परदेशस्थ सहकाऱ्यांबरोबर देशी कट्टा या वृत्तांताची उत्सुकतेने वाट पाहत होतो.

असो, आता आणखी थोडे कळ काढावी लागेल !