Skip to main content

परदेशी पाहूण्यांना फिरवून आणण्याकरिता स्थळ सुचवा

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 07/02/2018 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर आमच्या हिंजवडी (पुणे)स्थित कार्यालयाला भेट देण्यास काही परदेशी (युरोपीय) पाहुणे येणार आहेत (यात तीन स्त्रिया , तीन पुरुष आहेत). चार-पाच दिवसांच्या भेटीत एकदा त्यांना साधारण सहा ते सात तासात फिरवून आणता येईल असे स्थळ कृपया सुचवा.
  • हे फिरणे कामाच्या दिवशी असेल
  • दुपारी तीनच्या सुमारास हिंजवडीमधून निघावे असे नियोजन आहे
  • फिरुन झाल्यावर रात्रीचे जेवण (यात मद्यपान असेल) करुन रात्री दहापर्यंत पाहूण्यांना हिंजवडीतील हॉटेलपर्यंत पुन्हा सोडता यावे
  • वाहनांची सोय आमच्या कार्यालयाकडून करण्यात येईल त्यामुळे त्याची चिंता नाही पण प्रवास फार दूरचा नसावा. खास करुन रात्री मद्यपानानंतर कुणाला जास्त दूर प्रवास नको असतो.
मी जाधवगडचा विचार करत होतो, पण गुगल मॅप्स जरी दीड ते पावणे दोन तास प्रवास दाखवत असला तरी प्रत्यक्षात हिंजवडीपासूनचा एका बाजूचा प्रवास अडीच तासापर्यंत आहे असे कळाले. म्हणजे येण्या जाण्यात पाच तास जातील, इतका मोठा प्रवास नको आहे. आणखी काय पर्याय असू शकतील ? धन्यवाद

वाचने 17319
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

In reply to by मराठी कथालेखक

बेडसे निश्चित करणार असाल तर तिथून २-३ किलोमीटरवर पवनाहट्स नावाचा ऍग्रोपिकनिक स्पॉट आहे. एकदा वेबसाईट पाहून घ्या, जनरली आवडेल असं ठिकाण आहे.

मोराची चिंचोली. अगदी 'भारत स्पेशल' होईल. बाकी गार्डन, मॉल ह्यात आपल्याला इंटरेस्ट. त्यांना त्यात नाविन्य वाटणार नाही. त्यांना खरेदी करायचीच असेल तर ethnicity दुकान परफेक्ट आहे, 'भारत स्पेशल' म्हणून. Phoenix mall मध्ये आहे ते.

ह्या अश्या क्लायंट व्हिजिट होत असतात, त्यामुळे अनुभवावरून सांगतोय, दुपारी ३ ला निघून फार लांब लांबचे प्रवास टाळा. एकतर ते जेट ल्याग मध्ये असतात, त्यात दिवस भर प्रेसेंटेशन मिटींग्स करून कंटाळलेले असतात. खूप लांबचा प्रवास त्यांना त्रासदायक ठरेल. तुम्ही लिहिलंय वर कि ३ महिला आहेत, त्यांना एखाद्या स्त्री कलीग सोबत लक्ष्मी रोड ला पाठवा. तिथे त्या मनसोक्त शॉपिंग करू शकतील. तो पर्येंत पुरुष मंडळींना (त्यांना शॉपिंग मध्ये इंटरेस्ट नसल्यास) पुणे दर्शन धावती विझिट द्या (सारस बाग, पार्वती, पाताळेशवर इत्यादी). रात्रीच्या मेजवानी साठी बार्बेक्यू नेशन किंवा सीग्री मध्ये मनसोक्त बिअर आणि कबाब इत्यादी साठी अवश्य घेऊन जा. त्यांना निश्चित आवडेल. त्या साठी आधीच टेबल राखून ठेवा. बहुदा ते हिंजवडीत कुठल्या तरी हॉटेल ला राहणार असतील, तर त्यांना सयाजी मधल्या बार्बेक्यू नेशन ला नेलेलं उत्तम, म्हणजे लवकर हॉटेल वर पोचून आराम करता येईल.

In reply to by केडी

बार्बेक्यू नेशन किंवा तत्सम लाईव्ह ग्रिलवाली ठिकाणे शक्यतो टाळा. कलकलाट फार असतो अशा ठिकाणी, कोपा कबाना किंवा मेझा नाईन सारख्या ठिकाणी हट बुक करून निवांत जेवा.

In reply to by केडी

चार दिवसाच्या भेटीत तिसर्‍या दिवशी ही सहल असेल.. त्यामुळे जेट लॉग वगैरे आटोपलेलं असेल. बाकी युरोपातील बायका लक्ष्मी रोडला काय शॉपिंग करणार ? साडी की सलवार ? असो. तसंही इतक्या गर्दीत त्या गोंधळून जातील. सयाजीतल्या बार्बेक्यूतच नेण्याचा विचार आहे.

त्यांना मराठी येत असेल तर हा धागाच वाचायला द्या (तुमच्या सटीप अनुवाद विश्लेषण सह) एकतर भारतातच राहतील. पाहुण्यांसकट सर्वांनी गमतीजमतीत घेणे, लगेच मोर्चा काढण्यात येईल असे नको, चर्चेत सुटणारे प्रश्न मोर्च्याने जटील समस्या बनतात हे माहीत असलेला मिपाकर नाखु

मला वाटते "कात्रज सर्पोद्यान" योग्य राहिल. एकतर दिवसभर काम केल्यानंतर लेणी पहाण्यासाठी डोंगर चढणे जीवावर येईल. त्यातून प्रत्येकाला ते आवडेल का ते पहा. प्राणी पहाणे आणि ते सुध्दा साप, नाग, वाघ असे खास ईंडियन स्पेशल जास्त आवडेल.आधी त्यांच्या आवडीचा अंदाज घ्या ईतकेच सुचवेन. शेवटी प्रश्न देशाच्या प्रतिष्ठेचा आहे.

सिंहगड मस्त आहे ना. शहरापासून जवळच आहे. तिकडे का घेऊन जात नाही आहात ???

एव्हढ्या लोकांनी सुचविले, शेवटी कुठे नेले पाहुण्यांना ? मिपा कट्टया सारखा वृत्तांत येऊ द्या ☺

सर्वांचे आभार. मी बेडसे लेणी जवळपास निश्चित केली होती. पण काही कारणानी पाहुण्यांची ही भेट पुढे ढकलली गेली. आता हे पाहुणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतील. त्यावेळी उन्हाळा सुरु झालेला असेल त्यामुळे वाढत्या तापमानाचा विचार करुन बाहेर फिरण्याचा बेत आखावा लागेल किंवा कदाचित रद्दही करावा लागेल...बघू..

अर्रर्र मक्ले सर, आम्ही एका देशस्थ मिपाकराचा परदेशस्थ सहकाऱ्यांबरोबर देशी कट्टा या वृत्तांताची उत्सुकतेने वाट पाहत होतो. असो, आता आणखी थोडे कळ काढावी लागेल !