(हे कोहल्यांच्या विराटा)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
3 Feb 2018 - 8:03 am

पेर्णा
शांत निवांत ग्राऊंड
अस्ताला जाणारा धोनी
येऊ घातलेल्या अनुष्काची पॅव्हेलियनमध्ये अस्पष्ट कुजबुज
आताशा डोकं भडकत नाही
आठवते अक्राळविक्राळ वादळ
सहवागचं, धावा पिळवटून काढणारं
उन्मळून टाकणारं
सचिनचं अफाट दर्शन
खरं काय म्हणावं
मन रिझवणारं आयपीएल की मन उध्वस्त करणारं आयपीएल
पैसेवाल्यांच्या या खेळाचा आयोजक कोण
हे कोहल्यांच्या विराटा,
भारताला जिंकून दे!

eggsवीररसविडंबन

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

3 Feb 2018 - 6:48 pm | चांदणे संदीप

तूफान... कडक... चाबूक

Sandy

पैसा's picture

3 Feb 2018 - 7:16 pm | पैसा

दमामी फॉर्मात!

नाखु's picture

3 Feb 2018 - 11:26 pm | नाखु

म्हणून दमानी घेत नाहीत!!!

अशाने नवकवी मोर्चा काढतील म्हणजे.
सध्या लोक चर्चेने प्रश्न सोडवण्याचा भोट पर्याय अडगळीत टाकून मोर्चा पर्याय अंगिकारत आहेत याची नोंद घ्यावी

कविता आवडलीच आहे
चुकार नाखु

अनिंद्य's picture

4 Feb 2018 - 10:21 am | अनिंद्य

:-)