२g केस मधून सर्वजण निर्दोष

साहना's picture
साहना in काथ्याकूट
21 Dec 2017 - 5:02 pm
गाभा: 

तडफदार पत्रकार गोपीकृष्णन, शालिनी आणि प्रवीण जैन , एकाकी योद्धे स्वामी ह्यांनी अथक प्रयत्नांनी आणि स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता २g घोटाळा उघडकीस आणला होता. नेहमी प्रमाणे भाजप आणि मोदींच्या गलथान कारभाराने त्याच्या कष्टावर पाणी पडले आहे. आधीच मोदींनी स्वामींना वगैरे दूर ठेवले त्यानंतर २०१४ मध्ये मुकुल रोहतगी ह्यांना AG म्हणून ठेवले (जे सध्या बचावपक्षाचे वकील आहेत).

सुप्रीम कोर्टने CBI चे तळी उचलून धरत १२२ परवाने रद्द सुद्धा केले होते. परवाने रद्द केले तर आता घोटाळा नाही असे कोर्ट कसे म्हणू शकते ? ज्यांचे परवाने रद्द झाले त्यांना आता नुकसान भरपाई द्यायला नको का ?

महत्वाचा मुद्दा : कोर्टाने आरोपीना पुराव्याच्या अभावी निर्दोष ठरवले आहे. IPC प्रमाणे आरोपीनी लांच घेतली हे CBI सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे सिब्बल आणि इतर काँग्रेसी मंडळी scam झालेच नाही असा धिंगाणा घालत आहेत ती निव्वळ धूळफेक आहे. scam झाले पण नक्की कुणी केले ठाऊक नाही हा प्रकार आधी बोफोर्स, अगस्टा, चारा घोटाळा इत्यादी गोष्टींत झाला होता तोच इथे घडला आहे.

भ्रष्ट नेत्यांना कोठडीत टाकण्याची मोदी ह्यांना अभूतपूर्व संधी होती. ती संधी त्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्र्यांच्या निष्क्रियते मुळे गमावली आहे. २G ह्या सर्व प्रकरणात भाजपने कमालीची apathy दाखवली होती. कदाचित अरुण जेटली सारखे घरभेदी भाजपात घर करून आहेत आणि त्याची किंमत मोदींना चुकवावी लागेल असेच चित्र आहे.

इतिहास :
१. २G प्रकरणाला सर्वप्रथम पायोनीर चे गोपीकृष्णन ह्यांनी वाचा फोडली.
२. सुनील जैन आणि शालिनी ह्यांनी त्यानंतर प्रकरण वाढवले. (business standard)
https://realitycheck.wordpress.com/2009/10/26/sunil-jain-on-the-spectrum...
३. हा विषय सर्वप्रथम संसदेत कुणी मांडला तर कर्नाटकचे अपक्ष खासदार राजीव चंद्रशेखर ह्यांनी
https://twitter.com/rajeev_mp/status/943694266940907520
४. मुकुल रोहतगी ह्यांना मोदी ह्यांनी २०१४ साली AG म्हणून नेमले ह्याला स्वामी आणि इतर लोकांनी कडाडून विरोध केला होता
https://twitter.com/timesofindia/status/943785744597786625

हा पराभव मोदी ह्यांना थोडे आत्मचिंतन करायला भाग पाडेल अशी आशा आपण करू शकतो.

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

21 Dec 2017 - 5:08 pm | अनुप ढेरे

अगदी. खूप सॅड दिवस. :(
मोदी हे व्हीपी सिंग २.० आहेत असं कोणीसं म्हटलेलं वाचलं अलिकडेच. प्रचंड अपेक्षांनी सत्तेत आले पण आल्यावर काही फार बदल घडलेला नाही.

तिमा's picture

21 Dec 2017 - 5:35 pm | तिमा

अतिशय निराश करणारी बातमी. भारत हा एकच देश असा आहे जिथे ९९ अपराधी सुटतात आणि फक्त एकाच दोषीला शिक्षा होते.

पगला गजोधर's picture

28 Dec 2017 - 11:47 am | पगला गजोधर

भारत हा एकच देश असा आहे जिथे ९९ अपराधी सुटतात आणि फक्त एकाच दोषीला शिक्षा होते.

२७ Dec २०१७:
मुंबई की एक विशेष एनआइए अदालत ने मालेगांव बम विस्फोटकांड की आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर एवं लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित सहित अन्य छह आरोपियों से मकोका एवं हथियार अधिनियम की धाराएं हटा ली हैं।

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2017 - 1:08 pm | श्रीगुरुजी

चंपाबाई?

स्वधर्म's picture

21 Dec 2017 - 6:10 pm | स्वधर्म

हे सरकार, खरंच सभेत सांगितले जातात, तशा चांगल्या हेतूंनी काम करतं का, असा प्रश्न निर्माण होतो. राॅबर्ट वद्राबाबत पण तेच अन् सिंचन घोटाळ्याबाबत पण तेच! भाजपाच्या निष्ठावंतांबद्दल कोडे पडते.

विशुमित's picture

21 Dec 2017 - 6:44 pm | विशुमित

https://www.ndtv.com/india-news/timing-of-pm-narendra-modis-meeting-with...

हे साहेब समर्थकांचा अपेक्षाभंग करतंय राव.
..
मागच्या महिन्याच्या ७ नोव्हेंबर ला हे साहेब जाऊन भेट घेतात आणि १२ डिसेंबर ला निर्दोष.
--
दया कूच तो गडबड हे..!!
--
मध्यंतरी गडकरी म्हणालेच होते भ्र्रष्टाचाराचे आरोप राजकीय हेतूने करून सत्तेत आले आहेत.
--
तरी ते कसे डिप्लोमॅट आहेत याचे समरथनीय जिलब्या पडतील. असो...

नाखु's picture

21 Dec 2017 - 7:51 pm | नाखु

१.खरोखर जर या सरकारच्या हलगर्जीपणा आणि सहेतुक तडजोडीची परिणिती या निकालात असेल तर फार गंभीर परिणाम भोगावे लागतील.तीव्र निषेधार्ह​ हाताळणी
२.जर तपास संस्थेने सुरवातीपासून शेवटपर्यंत गलथानपणा आणि पळवाट ठेवली असेल तर या संस्था सरकारच्या तालावर नाचत नाहीत हीच चांगली बाब पण नि:पक्ष , सक्षमही नाहीत​ ही अत्यंत गंभीर बाब
३.आधिचे लिलाव रद्दबातल ठरवायचे कारण काय होते याचा न्यायालयात विचार केला असेल तर मग निर्दोष मुक्तता करून नक्की काय संदेश दिला आहे
४.सुब्रमण्यम स्वामी गप्प बसणारे नाहीत,आणि भाजप यांच्या राजकीय फायदा उगाच सोडून देणार नाही

शिक्के न मारता उघड्या डोळ्यांनी पहा इतकीच किरकोळ इच्छा असलेला जुनाट नाखु बिनसुपारीवाला

सुबोध खरे's picture

21 Dec 2017 - 8:20 pm | सुबोध खरे

वस्तुस्थिती --
२००९ साली २G घोटाळ्याबद्दल पहिल्यान्दा उघडकीस आले आणि दिल्ली उच्च न्यायालयाने तरंग पंक्तीसाठी अर्ज देण्याची तारीख चूक आहे असे सांगितले. २००९ मध्ये एफ आय आर दाखल झाला २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राजा याना नोटीस पाठवली २०१० मध्ये कॅग ने घोटाळा आहे असा ठपका ठेवला २०११ मध्ये विशेष CBI न्यायालयाचे गठन झाले आणि २०११मध्येच एकंदर तीन आरोपपत्रे दाखल झाली. ऑगस्ट २०१४ मध्ये चौथे आरोपपत्र दाखल झाले.
केसच्या तारखा लागत लागत शेवटी त्याचा निकाल आता आला आहे.
एक मूलभूत शंका-- कायदेतज्ज्ञांनी उत्तर द्यावे अशी अपेक्षा
एकदा आरोपपत्र दाखल झाले कि (त्यात फार तर पुरवणी जोडता येईल पण) ते पूर्ण रद्द करता येईल का ? ( माझ्या माहितीप्रमाणे तसे नाही आणि असले तरीही मोदी सरकारने असे काहीही केलेले नाही). आरोपपत्र दाखल झाले याचा अर्थ सर्व परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयात सादर झालेला आहे (२०११ ते २०१४ मध्येच).
मग या स्थितीत केस "ढिसाळपणे" मांडली याचा दोष मोदी सरकारला कसा देता येईल? किंवा हा दोष कोणत्या सरकारवर येईल?
बाकी धुळवड आणि धुणी धुणे चालू द्या.

सर टोबी's picture

21 Dec 2017 - 11:57 pm | सर टोबी

खटला CBI कडे सोपविला याचा अर्थ सर्वोच्च् न्यायालयाने अंग काढून घेतले असा होत नाही. आणि ढिसाळ हाताळणीचाच प्रश्न असेल तर तो न्याय गोध्रा कांडाच्या चौकशीला पण लावता येईल ना?

ट्रेड मार्क's picture

22 Dec 2017 - 2:38 am | ट्रेड मार्क

गोध्रा "कांडाचा" उल्लेख आल्यामुळे आता कसं मस्त वाटतंय, नाहीतर चर्चेत उगाच काहीतरी कमी आहे असं वाटत होतं.

विकास's picture

22 Dec 2017 - 4:59 am | विकास

नाहीतर चर्चेत उगाच काहीतरी कमी आहे असं वाटत होतं.

अगदी! :)

गोध्रा दंगली संदर्भातपण मोदींवर प्रत्यक्षात कुठलेच आरोपपत्र (charge sheet) नव्हते. कुठल्याच सरकारने म्हणजे वाजपेयी अथवा मनमोहनसिंग सरकारने आरोप ठेवले नव्हते. किंबहूना मनमोहनसिंग सरकारने आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमेरीकेच्या व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. जो काही आरडाओरडा केला तो टिस्टा आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांनी केला होता आणि नंतर त्याचा उपयोग करत सोनीया गांधी मोदींना (कुठलेच आरोप हे कायद्याने ठरवलेले नसताना) मौत का सौदागर म्हणाल्या होत्या.

गंमत इतकीच आहे की त्यांच्यावर आरोप पण ठेवता येत नाहीत हे एस आय टी ने सांगितल्यावर कधी काँग्रेसजनांनी आणि सोनीयांनी मोदींची माफी मागितल्याचे ऐकीवात नाही! ;)

या उलट येथे आज ही भ्रष्टाचार झालेला आहे हे कोर्टाने नाकारलेले नाही. आणि १७५लाख कोटी चे नुकसान झाले होते हे देखील सिद्ध झालेले आहे. याचा अर्थ जरी तेव्हढे पैसे हे कुणाच्या खिशात गेले असा होत नसला तरी, सरकारी तिजोरीत त्यावेळेस गेले नाहीत (आणि आत्ताच्या सरकारने ते मिळवून सरकारी तिजोरीत घातले) ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तत्कालीन सरकारचा भ्रष्टाचारच ठरतोय.

वास्तवीक काँग्रेसच्या नेत्यांनी या निर्णयामुळे घाबरायला हवे. कारण जर आज राजा आणि इतर हे दोषी ठरले असते तर ते तुरूंगात गेले असते. मनमोहनसिंगांनी आधीच हात झटकले होते. त्यामुळे ते यात कुठे होते असे म्हणता आले नसते. फार तर सरकारच्या गलथान कारभारमुळे (कंट्रोल न ठेवल्यामुळे) भ्रष्ट मंत्र्याला काहीही करण्याची संधी उपलब्ध झाली असे म्हणता आले असते.

मात्र आता हा खटला वरच्या न्यायालयात जाणार. आता नव्याने पुरावे आणण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही. त्यामुळे जर वरच्या कोर्टाने परत ताशेरे झोडले तर ते २०१९ च्या सुमारास असतील!

साहना's picture

22 Dec 2017 - 3:28 am | साहना

मग २०१४ पासून अश्या बेजबाबदार CBI अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली गेली आहे ? एक तर बाप दाखवायला पाहिजे श्राद्ध घालायला पाहिजे.

रमेश आठवले's picture

22 Dec 2017 - 12:09 pm | रमेश आठवले

मी सुबोध खरे यांच्याशी सहमत आहे.
भारताचे तत्कालीन नियन्त्रक एवं महालेखापरीक्षक, विनोद राव यांनी १ लाख ७६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे नमूद केले. या विधानाचा आधार घेऊन केजरीवाल यांचे त्यावेळचे मित्र व वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचना केली.त्यावर न्यायालयाने तत्कालीन सरकारवर ताशेरे झाडले आणि सी बी आय ने चवकशी करण्याचे आदेश दिले. चवकशी अंति सीबीआय च्या न्यायालयात गुन्हा दाखल झाला. न्यायाधीशाने आरोपपत्र स्वीकारले आणि खटल्याची सुनावणी सुरु केली. हे सर्व मोदी सरकार येण्याच्या बरेच आधी घडले. चालू असलेल्या खटल्यात मोदी सरकारने दखल देऊन काय करायला हवे होते ?
अजून उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात केस जाणार हे नक्की आहे.
मोदींची नालस्ती करण्यासाठी टपलेले महानुभाव या निकालाचा उपयोग त्यांच्या विरुद्ध करू पहात आहेत इतकेच.

सर्वसाक्षी's picture

22 Dec 2017 - 12:13 pm | सर्वसाक्षी

सी पी सी ३२० अन्वये 'तडजोड वा समझोता मान्य' गुन्हे संबंधात आरोपी व फिर्यादी परस्पर संमतीने न्यायालयापरोक्ष वा न्यायालयात्रफे व न्यायालयाच्या संमतीने (गुन्ह्याच्या स्वरुपानुसार) खटला मिटवु शकतात. हे गुन्हे कमी गंभीर स्वरुपाचे वा किरकोळ असे असतात, बहुधा वैयक्तिक स्वरुपाचे असतात. एखाद्याने दुसर्‍याचे पैसे उसने घेतले वा परस्पर खिशात घातले तर असा गुन्हा आरोपीने पिर्यादीचे पैसे परत केल्यास व फिर्यादीचे त्याने समाधान होत असल्यास परस्पर मिटवले जाउ शकतात.

सदर घोटाळा प्रकरण हे राष्ट्राच्या अर्थिक स्थितीवर परिणाम करत असल्याने तडजोडीने मिटवण्यासारखे नाही. अर्थातच आरोपपत्र मागे घेता येत नाही, खटला चालवावा लागतो. या प्रकरणात खटला दाखल करणे, आरोपपत्र निश्चित करणे, पुरावे गोळा करणे व ते परिणाम कारकरित्या सादर करणे हे सर्व आधीच्या राजवटीत झालेले आहे. एकदा अरोपपत्र दाखल केले गेले की कालांतराने ते बदलता येत नाही, अन्य काही गुन्हा उघडकीला आल्यास वा नवे आरोपी आढळुन आल्यास नवे स्वतंत्र आरोपपत्र प्रथम आरोपपत्राव्यतिरिक्त व त्याला बाधा न येता दाखल करावे लागते. आज जरी विद्यमान सरकारने प्रयत्न केला तरी पुरावे वा साक्षीदार मिळणार नाहीत व ते प्रभावीही ठरणार नाहीत. अनेक गुन्ह्यांमध्ये एफ प्राथमिक माहिती अहवाल बनवितानाच संगनमताने कमी गंभीर स्वरुपाच्या व जामिन्पात्र ठरेल अशा गुन्ह्याची कलमे लावली जातात. अनेक महत्त्वाचे मुद्दे सैल सोडले जातात, कागदपत्रे नष्ट करायला वेळ दिला जातो अर्थातच न्यायाधिश समोर आलेल्ल्या साक्षी पुराव्या आधारेच निर्णय करायला बद्ध असल्याने आरोपी सुटतात.

रामदास२९'s picture

21 Dec 2017 - 8:50 pm | रामदास२९

पहिली गोष्ट , हा निकाल अंतिम नसल्याची खुद्द न्यायमुर्तींनीच ग्वाही दिलेली आहे. यापुर्वी पण सी.बी.आय कोर्टाने दिलेल्या निकालन्चे वरच्या कोर्टात धिन्डवडे निघाले आहेत. आरुषी हेमराज हत्या प्रकरणात पण सी.बी.आय च्याच कोर्टाने आरुषीच्या आई-वडिलान्ना खुनी ठरवले होते व जन्मठेपेची शिक्षा फ़र्मावलेली होती. त्यावर अपील झाले आणि त्यात त्या मातापित्यांची अलाहाबाद हायकोर्टाने अगदी २ महिन्यानपूर्वी निर्दोष मुक्तता केलेली होती.

त्यावेळी हायकोर्टाने दिलेल्या निकालात खालच्या म्हणजे सी.बी.आय कोर्टाच्या निवाड्यासह , न्यायाधीशांवरही ताशेरे झाडलेले आहेत. अनेक पुरावे व गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, की त्यातून आरोपींना निर्दोष ठरवणे न्यायव्यवस्थेच्या उदासीनतेचा अतिरेक आहे.

सर्वप्रथम ह्या प्रकरणाचा उल्लेख कॅग अहवालात आला आणि त्यावर युपीए सरकारने पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून सुब्रमण्यम स्वामी सुप्रिम कोर्टात दाद मागायला गेले होते. पुढे सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि त्यातून हा खटला उभा राहिलेला आहे. सी.बी.आय या संबंधी एकही ठोस पुरावा सादर करु शकली नाही याचा अर्थ घोटाळा झाला नाही असा नाही.

सरकारची परवाना वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे भ्रष्ट होती. लिलावाद्वारे परवाने वाटप करण्यात आले नव्हते. अनियमितता झाल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानेही २०१२ मध्ये ही १२२ परवान्यान्ची प्रक्रिया रद्द केली होती.तत्कालीन सरकारने २००१ च्या बाजारभावानुसार परवान्यांचे वाटप केले होते. लिलावाद्वारे नव्हे तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या आधारावर परवान्यांचे वाटप केले होते. यात काही कम्पन्यान्चा भला करण्याचाच हेतू असू शकणार..

२०१५ , २०१६ साली सरकारला मिळालेल्या रकमेवरून दिसून येतय कि आधीच्या सरकारच्या धोरणान्मुळे सरकारी तिजोरीला किती तोटा झाला..

अर्धवटराव's picture

22 Dec 2017 - 1:09 am | अर्धवटराव

राहुल गांधींचं व्यवस्थीत ब्रँडींग सुरु झालय. गुजरातमधे भाजपचं पानिपत झालय. आता युपीए सरकारवर लागलेले भ्रष्टाचाराचे धुवायला लागले आहेत. काँग्रेसने २०१४ साली एक एक करत जे मुद्दे भाजपाच्या, विशेषतः मोदिंच्या हाती दिले, ते सर्व सव्याज काँग्रेसला परत करताहेत प्रधानसेवक.
दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ते असं.

विकास's picture

22 Dec 2017 - 4:41 am | विकास

भाऊ तोरसेकरांचा आजचा या विषयावरील लेख वाचनीय आहे...

महत्वाचा भाग म्हणजे: "मुक्तता देतानाच प्रत्येकाने पाच लाखाचा जातमुचलका लिहून देण्याचाही आदेश दिला आहे." - अर्थात जामिनावर निर्दोष मुक्तता आहे! म्हणजे काय कोणास ठाऊक!

त्यांनी नंतर या खटल्याची तुलना ही मालेगाव बाँब संदर्भातील पुरोहीत आणि साध्वी प्रग्या च्या आरोपासंदर्भात केलेली आहे. खटला न भरताच किंबहूना आरोपपत्र दाखल न करताच त्यांना अनेक वर्षे तुरूंगात डांबले होते.

निर्दोष व्यक्तिस जामिन का बुवा भरावा लागावा?
विचित्रच प्रकार वाटतोय. मिपावरील विधिज्ञांनी खुलासा करावा.

साहना's picture

22 Dec 2017 - 3:13 pm | साहना

ह्यांत विशेष काही नाही. खालच्या कोर्टांत सुटल्यानंतर सुद्धा वरील कोर्टांत अपील करायला कोर्ट काही कालावधी देते. ह्या कालावधींत सर्व आरोपीना निर्दोष मानले जाते. ह्याचा फायदा घेऊन त्यांनी देश वगैरे सोडून जाऊ नये म्हणून बेल बॉण्ड भरायला कोर्ट सांगते. समजा वरील कोर्टांत अपील झाले नाही तर तो परत मिळतो. आता राजा आणि कांहीमोळी सारख्या लोकांना झोपाळ्यावर बसून हलवले तर त्यांच्या खिशांतून ५ लाखांची चिल्लर खाली पडेल. पण ती गोष्ट अलाहिदा.

इथे नक्की कुठले कलम लागू केले आहे ठाऊक नाही पण CrPC Section 437A प्रमाणे निर्दोष मुक्तता कोर्टाने केली म्हणून आरोपीना जेल मधून सोडले जात नाही. कोर्टाने सांगितल्या प्रमाणे त्यांना बॉण्ड भरावा लागतो. आमच्या जेल मध्ये अनेक लोक अश्या प्रकारे निर्दोष मुक्त होऊन सुद्दा बॉण्ड साठी पैसे नाहीत म्हणून अडकून पडले आहेत.

काही वर्षां मागे एका मराठी माणसाने सुप्रीम कोर्ट मध्ये ह्या प्रकाराला चॅलेंज केले होते पण काय झाले ठाऊक नाही.

आमच्या जेल मध्ये अनेक लोक अश्या प्रकारे निर्दोष मुक्त होऊन सुद्दा बॉण्ड साठी पैसे नाहीत म्हणून अडकून पडले आहेत.

हे भयानक आहे. सरळसरळ मानवाधिकारांचे उल्लंघन आहे हे तर.

सुबोध खरे's picture

23 Dec 2017 - 6:52 am | सुबोध खरे

https://medicaldialogues.in/rajasthan-doctors-strike-rs-1-crore-surety-f...
मानवाधिकार?
संपावर जाऊ नये म्हणून प्रतिबंधित अटक केलेल्या सरकारी डॉक्टरांना ज्यांच्यावर अजून आरोप आयुद्धा नाही त्यांना जामीन 1 कोटी 10 लाख रुपयांचा.
कोर्टात न्याय मिळत नाही
कोर्टात जे मिळतं त्याला न्याय म्हणायचं

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2017 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोर्टात जे मिळतं त्याला न्याय नाही निकाल म्हणतात. :)

ट्रेड मार्क's picture

22 Dec 2017 - 5:02 am | ट्रेड मार्क

विरोधी पक्ष, पोलीस, CBI ई कोणालाही नंतर त्रास होऊ नये म्हणून स्कॅम करताना राजा, कानिमौळी आणि इतर सर्वांनी एवढे ढळढळीत पुरावे मागे सोडले असताना मोदी किंवा भाजपच्या एकाही मंत्र्याला पुरावे सापडू नयेत? लानत है।

आपल्याला शिक्षा व्हावी अशी या सर्वांपासून ते वद्रा, सोनिया या सगळ्यांची अतीव इच्छा आहे. त्यामुळे ते स्वतःहून पुरावे देतात, पूर्ण सहकार्य करतात. पण या बीजेपी सरकारलाच त्यांना शिक्षा होऊ नये असं वाटतंय.

तसं पण काय गरज आहे पुरावे शोधायची, केस दाखल करायची वगैरे? सरळ आरोपी जाहीर करून शिक्षा देऊन टाकायची. लोक काय तसेही हुकूमशहा म्हणून ओरडत असतातच.

अतिशय खेदजनक निर्णय. १.७६ लाख कोटीच्या आकड्यात किती तथ्य आहे हे वादातित असले तरीही वाटपात भ्रष्टाचार झाला होता हे तरी सर्वमान्य होते आतापर्यंत. नक्की कुणी दिरंगाई केली हे कळेलच पण तोपर्यंत संशयाची सुई सरकारकडेच जाते. विशेषतः मुकुल रोहतगी २ जी केस मधील आरोपींचे वकिल असणे वगैरे.
हाय कोर्टात तरी ताकदीनी बाजू लावून धरावी आणिभ्प्रकरण धसास न्यावे.
बाकी, या प्रकरणात न्यायमुर्तींना दोष देणे योग्य नाही. जश्या प्रकारे खटल्यात बाजू मांडल्या जातात, साक्षी- पुरावे होतात त्यावर निकाल अवलंबून असतो.
तसेच, तसेच भुतपुर्व कॅग यांना भाजपचे एजंटम्हणन्णे त्यांच्यावर अन्यायकारक होईल असे वाटते.

मालोजीराव's picture

22 Dec 2017 - 12:29 pm | मालोजीराव

मोदूकाका करुणानिधीला भेटायला गेले तेव्हाच पाल चुकचुकली होती ....२०१९ ला मोठा सहकारी पक्ष म्हणून सेना ऐवजी डीएमके असू शकते.

बाकी काँग्रेस भिकार असेल तर भाजप डबल भिकार आहे हे दिसले

अमितदादा's picture

22 Dec 2017 - 1:57 pm | अमितदादा

मोदुकाकानी पवार साहेबांना गुरु मानल्यापासून ७०००० कोटींचा (भ्रष्टाचाराचा आकडा फुगवला आहे २G प्रमाणे) सिंचन घोटाळा असाच थंड्या डब्यात गेलाय. बैलगाडी भर पुरावे आहेत, ट्रक भरून पुरावे आहेत, कुठे गेले ते ? खाल्ले कि काय? या घोटाळ्यातील मोठ्या माश्यांना कधी पकडणार? सिंचन घोटाळ्याविषयी सरकारची भूमिका कशी संशयी आहे हे इथे वाचा
लेख
विरोधी पक्ष्यात असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांनी पुरावासकट बाहेर काढलेली ११६ जमीन घोटाळ्यांची चौकशी थंड्या बस्त्यात गेलीय, याबद्दल इथे वाचा
लेख
विश्वास पाटील, मोपालकर हि बडे अधिकारी कधी कारवाई ला सामोरे जाणार कधी शिक्षा होणार?
आदर्श घोटाळा , मागील सरकारचे घोटाळे यावर कधी कारवाई होणार?
भ्रष्ट लोकांना तुरंगात पाठवू असे आश्वासन देवून सत्तेत आलेल्यांनी ह्याच लोकाशी साटेलोटे सुरु केले आहे. आता असे वाटते कि सरकार थापाडे आहे, कॉंग्रेस आणि यांच्यातील गुणात्मक फरक वेगाने कमी होतोय.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Dec 2017 - 3:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

भ्रष्ट लोकांना तुरंगात पाठवू असे आश्वासन देवून सत्तेत आलेल्यांनी

हे तुम्ही तुमच्या सोयीने वापरत आहात! ज्यांनी निवडून दिले त्यांना भाजपने एकमेव आश्वासन/जाहीरनामा दिला होता असा आपला दावा आहे काय?

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2017 - 3:32 pm | श्रीगुरुजी

भाजप सरकारने कितीही प्रयत्न केला तरी न्यायालय त्यात अडथळे आणून भ्रष्टाचार्‍यांना मोकळे सोडत आहे. २-जी मधील सर्वजण काल सुटले, आज अशोक चव्हाणांवरील खटल्याला परवानगी नाकारली, २०१५ मध्ये मनमोहन सिंग आरोपी असलेल्या खटल्याला स्थगिती दिली . . . न्यायाधीशांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

ही कमाल झाली गुरूजी, सरकारी पक्षाच्या वकिलांनी पूर्ण अभ्यास करून, तपासात सर्व शक्यता पडताळून पाहून अन डिफेन्स कुठल्या कुठल्या पळवाटा वापरू शकेल त्या बंद करून युक्तीवाद करायला हवा ना? न्यायाधिश काय साक्षीपुरावे पाहून जेवढे कायद्यात बसते तेवढेच करू शकणार. आपल्या आवडीचा निकाल नाही म्हटल्यावर न्यायाधिशांना शिव्या देण्यात काय अर्थ?

साहना's picture

24 Dec 2017 - 12:24 pm | साहना

भाजप आणि मोदी सोडून इतर सर्वानी आत्मपरीक्षण करायला पाहिजे.

अमितदादा's picture

22 Dec 2017 - 5:54 pm | अमितदादा

Upa 2 कोणत्या कारणाने बदनाम झाले?, लोकांनी कोणत्या कारणावरून मोठाले मोर्चे काढले? 2014 साली मोदींनी कोणता मुद्दा सभांमध्ये सतत मांडला?, नोटबंधी सारखा चुकीचा निर्णय कोणत्या गोष्टी साठी घेण्यात आला? या सर्व घटनामागे फक्त भ्रष्टाचार आणि त्याला जबाबदार असणारी लोक हाच मुद्दा केंद्रस्थानी होता। माझ्या सारख्या अनेक लोकांनी हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आणि त्या मुद्याला इतर काही महत्वाच्या मुद्यांची जोड देऊन मतदान केले होते त्यामुळे भ्रमनिरास साहजिक आहे.
लष्कराने केलेल्या सर्जिकल स्राईक चे श्रेय घ्यायला हे पुढे मात्र तपास यंत्रणा गलथानपणा केला की फक्त cbi आणि न्यायालय दोषी आम्ही नाही, हे कातडी बचाव धोरण आहे। काल निकाल देताना जज असे बोले की शेवटच्या काही वर्षात तपास दिशाहीन आणि भरकटलेला होता. (संदर्भ: Ndtv वर न्यायाधीश चे कोट केलेलं वाक्ये होती)

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Dec 2017 - 11:41 pm | हतोळकरांचा प्रसाद

थोडक्यात 2जी प्रकरण संपले असा आपला दावा आहे तर! शिवाय हेच एकमेव प्रकरण होते ज्यात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे असे आपल्याला वाटते का? कोळसा प्रकरणाचा तर निकालही लागला. आणि बाकी प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. 2जी प्रकरण ढिसाळपणे मांडल्याने तूर्तास थंड झाले असेलही पण पुढेही ते तसेच राहील असे आपले म्हणणे आहे का? लिलावानंतर आलेला पैसाही खोटाच आहे आणि तो पैसा जवळजवळ बुडण्यास आधीचे सरकार कारणीभूत नाहीये/नव्हते असे आपले म्हणणे आहे का? मुळात तो भ्रष्टाचार होता की नाही हे नक्की ठरवा आणि मग भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचार्यांना शिक्षा करण्यात अपयशी ठरलेले यातले कोण योग्य हेही ठरवा!!

अमितदादा's picture

23 Dec 2017 - 12:23 am | अमितदादा

मी जे सांगतोय त्याचावर न बोलता , तुम्ही काहीही interpret करता का हो? कधी बोलो मी २G घोटाळा नाही म्हणून? कोळसा घोटाळ्यावर मी काही बोलोय का? आधीचे सरकार निर्दोष आहे हे मी बोलोय का? लिलावानंतर आलेला पैसा खोटा आहे हे मी बोलोय का?
पहिल्यांदा तुम्ही माझे प्रतिसाद नीट वाचा हि विनंती. मुळात २G हा घोटाळाच आहे (आकडा फुगवलेला आहे हे वेगळी गोष्ट), यात कॉंग्रेस दोषी न शिक्षा देण्यात कमी पडली आणि भाजप सुधा कमी पडली असे माझे मत आहे. आणि फक्त २G नाही तर राज्यातील अनेक घोटाळ्या बाबत दुर्दैवाने हीच स्थिती आहे.

कपिलमुनी's picture

23 Dec 2017 - 12:48 am | कपिलमुनी

जगात दोनच प्रकारची माणसे असतात भाजपच्या बाजूने बोलणारे बरोबर किंवा भाजपच्या विरोधात बोलणारे चूक !
समर्थक व्हा किंवा विरोधक . सामान्य माणूस व्हायला आंतरजालावर परवानगी नाही.

अमितदादा's picture

23 Dec 2017 - 12:54 am | अमितदादा

:)

नाखु's picture

23 Dec 2017 - 8:51 am | नाखु

त्याच तत्वानुसार सरकारच्या एखाद्या चांगल्या कामाची प्रशंसा केली तर आयुष्यभर साठी भाजपेयी हा शिक्का बसेल नक्की
भले तुम्ही सरकारच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले होते (चुकीचे कामाबद्दल) हे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते

चांगल्या कामाची चांगली अणि वाईटावर खुली चर्चा व्हावी यासाठी अट्टाहास असलेला अतिसामान्य सदस्य नाखु बिनसुपारीवाला

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Dec 2017 - 9:52 am | हतोळकरांचा प्रसाद

नाखु, यालाच दांभिकपणा म्हणतात! आपले ते लेकरू...

अमितदादा - ह्या 2जी प्रकरणाच्या निकालाला "मोदुकाका" कसे जबाबदार होते जरा विस्ताराने सांगाल का? नाही म्हणजे मला ठरवता येईल की तुम्ही वर लिहिलेल्या प्रतिसादातून दुसरा कुठला अर्थ भ्रमित होतो. कोर्टाने जलद काम करण्यासाठी काय करावे हा विषय तर वेगळाच...

कपिलमुनी's picture

23 Dec 2017 - 10:57 am | कपिलमुनी

आपण जो झेंडा घेऊन फिरतोय तो तिरंगा असावा .
ना हात ना कमळ ना झाडू !
कोणीही चांगला केला तर चांगले म्हणावे , वाईट केले तर वाईट ! इथे काही मंडळी टीव्ही वरच्या 9 च्या चर्चेतील आहेत. एकाच गुऱ्हाळ ! ते काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करावे

सुबोध खरे's picture

27 Dec 2017 - 1:00 pm | सुबोध खरे

हि उपरती "झाडू" च्या काड्या गळल्यावर झाली काय?

कपिलमुनी's picture

28 Dec 2017 - 12:43 am | कपिलमुनी

झाडू कमीत कमी फेकत तरी नाही, जिथे घाण केली तिथे केजारीला पण ठोकला आहे,
झाडूने अजून तरी भ्रष्टाचार केला नाही, सीबीआय पासून ते एल जी पर्यंत सगळे कुत्रे सोडून झाले, धाड घातलेले रिपोर्ट कुठे पब्लिक केले ??
त्यामुळे झाडूच्या काड्याची फिकीर करण्यापेक्षा कमळाच्या पाकळ्यांची करा , गुजराथेंत बऱ्याच पडल्या

सुबोध खरे's picture

28 Dec 2017 - 12:29 pm | सुबोध खरे

जिथे घाण केली तिथे केजारीला पण ठोकला आहे,
काय सांगताय ?

सुबोध खरे's picture

28 Dec 2017 - 12:30 pm | सुबोध खरे

म्हणजे मुळात त्यांनी घाण केली हे तुम्हाला मान्य झालंय तर.
हेही नसे थोडके

अमितदादा's picture

23 Dec 2017 - 1:51 pm | अमितदादा

@प्रसादजी
सरकार म्हणजे काय असतो हो? फक्त पंतप्रधान आणि मंत्री का? नाही ना. विविध सरकारी विभाग, संस्था, आस्थापने यांचं मिळून सरकार नावाची यंत्रणा बनते. याच यश आणि अपयश हे त्या संस्था बरोबर सरकार च आणि पर्यायाने त्याच्या प्रमुखाच असते. याच उत्तम उदाहरण लष्कराने जेंव्हा सर्जिकल स्राईक केला तेंव्हा मोदींनी ते आपलं यश म्हणून सर्वत्र प्रचार केला ना. ते यश स्वतः कडे घेतलं ना. याच न्यायाने cbi ने जो 2G आणि आदर्श घोटाळ्यात गलथानपणा केलाय त्याच अपयश हे cbi, सरकार आणि पर्यायाने मोदींच आहे. मोदींनी जरी ह्यात वयक्तिक रित्या हस्तक्षेप केला नसला तरी.
मोदी सरकार भ्रष्टाचार्यांना शिक्षा कोणत्या मार्गाने करणार होत? तपास यंत्रणेकडून पुरावे मांडून न्यायालायतर्फे शिक्षा करूनच ना? की डायरेक्ट घरातून उचलून फाशी देणार होत? नाही ना. तपास यंत्रणा न्यायालय हा एकमेव मार्ग आहे आणि जर त्यात अपयश येत असेल तर ह्या संस्था बरोबर सरकार दोषी नाही का? जर भ्रष्टाचार्यांना सरकार बदलून शिक्षा होत नसेल तर सामान्य लोकांनी काय देवाचा धावा करायचा का आता?

बरं हा एकमेव घोटाळा आहे का? तर नाही आपल्या राज्यातील कित्येक भ्रष्टाचाराचे प्रकरणे धूळ खात पडलेत? कधी होणार कारवाई? आपल्याला याच काही वाटत नाही हे पाहून मलाच आश्चर्य वाटलं.म्हणून वर मी म्हटलं की काँग्रेस आणि भाजप यातील गुणात्मक फरक कमी होतोय वेगाने. असो मला वाटत मला काय म्हणायचं आहे ते क्रिस्टल क्लीअर आहे, तुम्ही तुमचे मत मांडू शकता.

आज लालू चा निकाल आहे, जर त्याला योग्य शिक्षा झाली तर तपास यंत्रणा, न्यायालय आणि मोदी सरकार च अभिनंदन. आणि नाही झाली शिक्षा तर वरची सर्व टीका ह्या खटल्याला सुद्धा लागू.

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Dec 2017 - 2:58 pm | हतोळकरांचा प्रसाद

मुद्दा नं १ : एक सल्ला : तुम्हाला सरकारची व्याख्या माहित आहे तर अंध विरोधक (अथवा अंध समर्थकांप्रमाणे) मोदुकाका वगैरे द्वेषयुक्त विशेषणे टाळायला हरकत नसावी. बरं असतं न्यूट्रल भूमिकेसाठी.
मुद्दा नं २: तुमची सरकारची व्याख्या गृहीत धरूनही २०१४ नंतर हा खटला यशस्वीरीत्या लढवण्यासाठी काय करायला हवे होते याचे उत्तर मिळाले नाही.
मुद्दा नं ३ : तुमची नेमकी भूमिका काय? जर २जी चे अपयश तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे मोदींचे अपयश आहे अशी तुमची भूमिका असेल तर वरील न्यायाप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक हे मोदींचेच यश आहे ही तुमची स्पष्ट भूमिका नको का? हे त्यांचे तर ते त्यांचे का नाही वगैरे कशाला? तुम्ही सर्जिकल स्ट्राईक मोदींचे यश मानत नसाल तर मग तुम्ही २ जी ला त्यांना जबाबदार धरू नये.
मुद्दा नं ४: मोदींनी नेमकं कुठे सर्जिकल स्ट्राईकचं यश हे सैन्यांचं यश नसून आमचं आहे असं म्हणून त्याचा फायदा उठवला आहे हे जरा सांगाल का? भाजपाच्या कुठल्यातरी नेत्याने अतिउत्सहात केलेल्या वक्तव्याच्या उदाहरणांचा इथे संदर्भ नक्कीच नसावा. तरीही सैन्याने योजिलेल्या सर्जिकल स्ट्राईकला डिप्लोमॅटिक संबंधांची गणिते घालून हिरवा कंदील दाखवणे (ज्याशिवाय सर्जिकल स्ट्राईक होऊ शकला नसता) हे त्यांचे यश नाहीये का?
मुद्दा नं ५ : मीही २जी निकाल हे मोदी सरकारचे अपयश मानायला तयार आहेच फक्त मला २०१४ नंतर काय करायला हवे होते जे न झाल्याने हा निकाल फिरला हे कळायला हवे ना? तुम्ही त्या निष्कर्षाला कसे पोहोचला आहात हे सांगितलेत तर मलाही कळेल. त्याउपरही हे सरकार आता पुढे काय पाऊल उचलते हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे. पिक्चर इज नॉट ओव्हर!
मुद्दा नं ६ : भ्रष्टाचाराची प्रकरणे धूळ खात पडली आहेत याचं मला काहीच वाटत नाही हा निष्कर्ष आपण कसा काढला कोण जाणे? फरक एवढाच आहे की ती का धूळ खात पडली आहेत, अशी प्रकरणे मी पाहत असलेल्या 25-30 वर्षात नेहमीच धूळ खात पडलेली असतात आणि त्याचा खेद/संताप नेहमीच वाटतो. पण हा प्रकार सरकारशी निगडित आहे की न्यायालयांशी हे निदान मला तरी स्पष्ट नाही. तुम्हाला असल्यास तुम्ही त्याचा खुलासा करावा.

बाकी भाजपने निवडणुकांमध्ये केलेले दावे म्हणजे त्यांनी दिलेली वचने आहेत असं समजून त्यांनी ती पाच वर्षात पूर्ण नाही केली तर ते खोटारडे आहेत वगैरे फक्त स्वतःचा विरोध कुठल्या न कुठल्या मार्गाने बाहेर काढायचाच आहे म्हणून आहे असे मला वाटते. वास्तविक तळागाळापासून भ्रष्टाचार आणि अनितीने पोखरून निघालेला देश एका वेगळ्या दृष्टीकोनातून सध्या जसा चालवला जातोय हे निदान माझ्या तरी त्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांपेक्षा किंचित जास्तच आहे.

Nitin Palkar's picture

25 Dec 2017 - 8:25 pm | Nitin Palkar

+१११

सुबोध खरे's picture

27 Dec 2017 - 10:17 am | सुबोध खरे

तुमची सरकारची व्याख्या गृहीत धरूनही २०१४ नंतर हा खटला यशस्वीरीत्या लढवण्यासाठी काय करायला हवे होते याचे उत्तर मिळाले नाही.
बहुतेक मोदी रुग्ण हाच एक अजेंडा राबवतात. यंव करायला पाहिजे होतं त्यंव करायला पाहिजे होतं. कसा करायचं ते विचारायचं नाही.

नितिन थत्ते's picture

27 Dec 2017 - 11:11 am | नितिन थत्ते

सुधारित आरोपपत्र दाखल करणे हे शक्य होते असे वाटते.

उदाहरणार्थ बाबरी प्रकरणी आरोपपत्रातून अडवाणी यांचे नाव ते गृहमंत्री झाल्यावर वगळले गेले. तेव्हा ज्याप्रकारे आरोपपत्र बदलले जाऊ शकले तसे याहीवेळी जाऊ शकले असते. त्याचप्रमाणे या वर्षीच्या मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने त्यांचे नाव वगळण्याला आक्षेप घेऊन त्यांच्यावर खटला चालवण्यास सांगितले आहे. यासाठी मूळचे आरोपपत्र बदलावे लागेल. त्या अर्थी नव्या परिस्थितीत आरोपपत्र बदलले जाणे ही काही अशक्य गोष्ट नाही.

सुबोध खरे's picture

27 Dec 2017 - 11:26 am | सुबोध खरे

खालच्या प्रतिसादात आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे तेच उद्धृत करतो आहे
पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरावा कोण गोळा करीत होतं? सी बी आय च. मग त्यांच्या कडे असा पुरावा मागणे हा त्यांच्या कामगिरीत हस्तक्षेप झाला असता आणि त्यावर तर विरोधक बोम्ब मारायला टपलेलेच आहेत.

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2017 - 2:18 pm | श्रीगुरुजी

पुरवणी आरोपपत्र २०११ मध्येच दोनवेळा दाखल केले होते. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा खटल्याची निम्मी सुनावणी संपली होती. मोदी सरकारने सुद्धा अजून एक पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते, परंतु न्यायालयाने ते मान्य केले नव्हते. त्यामुळे २०११ मध्ये दाखल झालेल्या आरोपपत्रातील आरोपांवर व कलमांवर आधारीतच खटला चालविला गेला.

मराठी_माणूस's picture

22 Dec 2017 - 12:39 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/agralekh-news/what-is-2g-spectrum-scam-1604723/

अमुक झाले असते तर तमुक झाले असते असा काहीसा प्रकार असवा असे वाटते. पण लेखात म्हटल्या प्रमाणे ,ज्यांना कंत्राटे मिळाली त्यांनी ती नंतर विकुन बख्खळ पैसा कमावला त्याचे काय ?
हे ठरवुन (कट ?)केले नसेल कशावरुन ?

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2017 - 2:56 pm | श्रीगुरुजी

२-जी भ्रष्टाचाराच्या खटल्यातून सर्व आरोपी दोषी नसल्याचा सीबीआय न्यायालयाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात घोटाळा झाला होता व त्यामुळे देशाचे नुकसान झाले होते हे १०० टक्के निर्विवाद सत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. देशातील सर्वोच्च न्यायासन असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने या घोटाळ्यातील तथ्य लक्षात घेऊन २००७-०८ मध्ये दिलेले सर्व परवाने रद्द करून तरंगलहरींचे वाटप लिलाव पद्धतीतून करण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात तथ्य वाटले नसते तर असा आदेश दिलाच नसता. २००८ मध्ये प्रथम येणार्‍यास प्राधान्य हे तत्व आयत्यावेळी निश्चित करून परवाने आपल्या मर्जीतील कंपन्यांना खिरापतीसारखे वाटून जेमतेम ६-७ हजार कोटी रूपये मिळाले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधीचे परवाने रद्द करून लिलाव केल्यानंतर लिलावाच्या पहिल्या फेरीतच ६१ हजार कोटींहून अधिक रक्कम मिळाली होती. घोटाळा झाला व त्यातून सरकारचे प्रचंड नुकसान झाले हे अगदी उघड होते. दुर्दैवाने सीबीआय न्यायालयाने ही सर्व वस्तुस्थिती व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून या आरोपींना मोकळे सोडलेले दिसते. नवल म्हणजे घोटाळा झाला नाही असे न्यायालयाने म्हटलेले नाही. या प्रकरणातील आरोपींविरूद्ध पुरेसा पुरावा नाही असे न्यायालयाने सांगितले आहे. म्हणजे घोटाळा झाला आहे, पण नक्की कोणी हा घोटाळा केला ते सांगता येत नाही ही न्यायालयाची भूमिका अनाकलनीय आहे.

या प्रकरणाविरूद्ध न्यायालयात आरोपपत्र २०११ मध्येच दाखल झाले होते. तत्कालीन युपीए सरकारच्या कारकीर्दीत हे आरोपपत्र दाखल झाले होते. आपल्या लोकांना वाचविण्यासाठी आरोपपत्र व साक्षीपुरावे ठिसूळ ठेवण्यात आले असावे. नवीन सरकार मे २०१४ मध्ये आले तरी नवीन सरकार त्यात फारसा हस्तक्षेप करू शकत नव्हते. एकंदरीत या प्रकरणाची चौकशी, आरोपपत्र व निकाल संशयास्पद आहे.

काही जण या सुटकेचा संबंध मोदी व करूणानिधींच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भेटीशी लावत आहेत. द्रमुक व भाजपची युती होणार असाही काही जणांनी निष्कर्ष काढला आहे. या दोन्ही निष्कर्षांमध्ये अजिबात तथ्य नाही. ९३ वर्षीय करूणानिधी आता विस्मॄतीचा बळी आहेत. द्रमुकची सर्व सूत्रे आता स्टॅलिनच्या हातात आहेत. द्रमुक व काँग्रेसची युती अभेद्य असून भाजप-द्रमुक युती होण्याची सुतराम शक्यता नाही. समजा अशी युती होणार असली तरी ७ वर्षे सुरू असलेल्या खटल्याचा निकाल मोदींनी बदलला असा निष्कर्ष काढणे अत्यंत हास्यास्पद आहे.

या निर्णयाला आता उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल. परंतु उच्च न्यायालयाचा निकाल येण्यास अजून ६-७ वर्षे लागतील.

काल निकाल आल्यापासून काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. आपल्या 'झिरो लॉस' थिअरीला न्यायालयानेच मान्यता दिली आहे असे सिब्बल आनंदाने सांगत होता. तरंगलहरींच्या लिलावाच्या पहिल्या फेरीतच जेव्हा ६१ हजार कोटींहून अधिक किंमत मिळाली तेव्हाच सिब्बलची 'झिरो लॉस' थिअरी वार्‍यावर उडून गेली होती. सर्वात आश्चर्य म्हणजे घोटाळा होत असताना व त्यामुळे देशाचे नुकसान होत असताना जे मनमोहन सिंग डोळे मिटून मौन धारण करून बसले होते तेच मनमोहन सिंग आपली पाठ थोपटून घेत भांगडा करीत आहेत. आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केल्यामुळे २०१४ मध्ये आपण हरलो असे ते सांगत होते. आपल्या कारकीर्दीत झालेल्या असंख्य महाघोटाळ्यांपैकी २-जी हा फक्त एक घोटाळा होता हे ते सोयिस्कररित्या विसरले होते. त्यांच्याच कारकीर्दीत झालेल्या कोळसा खाणी वाटप घोटाळा प्रकरणातील दोन खटल्यांचा निकाल आधीच लागलेला असून त्यात काही दोषींना शिक्षा झालेली आहे (नुकतीच मधू कोडालाही शिक्षा झाली). अजून काही प्रकरणांचा निकाल यायचा आहे. राजेंद्र दर्डा व काँग्रेसचे इतर काही खासदार काही प्रकरणात आरोपी आहेत. दस्तुरखुद्द मनमोहन सिंग एका प्रकरणात आरोपी आहेत. २०१५ मध्ये मनमोहन सिंगाचे नाव एका आरोपपत्रात आल्यानंतर "मी कायद्याच्या मार्गाने जाऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करेन" असे राणा भीमदेवी थाटात सांगणार्‍या मनमोहन सिंगांनी दुसर्‍याच दिवशी स्वतःवरील खटल्याला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. खटला लढून स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याऐवजी स्थगितीचा पळपुटा मार्ग त्यांनी स्वीकारला. स्वतः स्वच्छ असल्याच्या कितीही गप्पा त्यांनी मारल्या तरी कोळसा खाण घोटाळा प्रकरणातल्या आरोपपत्रात त्यांचा आरोपी असा उल्लेख आहे.

एकंदरीत अनेक प्रकरणात न्यायालयाची भूमिका अनाकलनीय आहे. भांडारकर संस्थेवरील हल्ल्याच्या प्रकरणात ७२ आरोपींचे फोटो एका संकेतस्थळावर छापून त्यांचा नासधूस केल्याबद्दल गौरव करण्यात आला होता. आम्हीच नासधूस केली असे ते जाहीररित्या सांगत होते. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त पोलिसांनी समोर ठेवलेल्या कागदांचा आधार घेऊन सर्वांना निर्दोष सोडण्यात आले. नितीन आगे खून प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले.

आताच आदर्श प्रकरणासंबंधी बातमी आली आहे. आदर्श इमारतीतील सदनिका बळकावण्याच्या गुन्ह्यातील आरोपपत्रातून अशोक चव्हाणांचे नाव वगळण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या इमारतीतील एकूण ४ सदनिका अशोक चव्हांणांनी बळकावल्या होत्या. अधिकृत कागदपत्रांवर त्यांचे नाव आहे. असे असताना न्यायालयाने या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून केवळ राज्यपालांना या खटल्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार आहे का या तांत्रिक मुद्द्यावरून चव्हाणांची सुटका केली आहे. भारतातील न्यायालयांच्या अनाकलनीय निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्याऐवजी भ्रष्टाचाराला राजरोस कायदेशीर मान्यता मिळत आहे. उद्या लालूवरील खटल्याचा निकाल आहे. त्यातून लालू निर्दोष सुटणार अशी शक्यता वाटत आहे.

एकंदरीत खांग्रेसला अचानक 'अच्छे दिन' आलेले आहेत. गुजरातमध्ये १६ जागा वाढल्या, पंजाबमध्ये तीन महापालिकांमध्ये बहुमत मिळाले, २-जी खटल्यातून सर्वजण निर्दोष सुटुन खाल्लेला माल पचला आणि आता अशोक चव्हाण ४ सदनिका बळकावूनही सुटले. निदान आतातरी 'अच्छे दिन' कोठे आहेत असे मोदींना विचारायचे खांग्रेसने थांबवावे.

आताच आदर्श प्रकरणासंबंधी बातमी आली आहे. आदर्श इमारतीतील सदनिका बळकावण्याच्या गुन्ह्यातील आरोपपत्रातून अशोक चव्हाणांचे नाव वगळण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या इमारतीतील एकूण ४ सदनिका अशोक चव्हांणांनी बळकावल्या होत्या. अधिकृत कागदपत्रांवर त्यांचे नाव आहे. असे असताना न्यायालयाने या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून केवळ राज्यपालांना या खटल्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार आहे का या तांत्रिक मुद्द्यावरून चव्हाणांची सुटका केली आहे. भारतातील न्यायालयांच्या अनाकलनीय निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्याऐवजी भ्रष्टाचाराला राजरोस कायदेशीर मान्यता मिळत आहे. उद्या लालूवरील खटल्याचा निकाल आहे. त्यातून लालू निर्दोष सुटणार अशी शक्यता वाटत आहे.

राज्यपालांना अधिकर नाही मग कोणाला आहे? की कोणालाच नाही?

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2017 - 3:21 pm | श्रीगुरुजी

एखाद्या लोकप्रतिनिधीवर खटला चालवायचा का नाही हे ठरविण्याचा अधिकार राज्यपालांना का असावा? राज्यपाल हे न्यायाधीश आहेत का? राज्यपाल हे सरकारने नेमलेले व सरकारची तळी उचलणारे असतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज्यपाल असा निर्णय घेताना तो घटनात्मक दृष्टीकोनातून न घेता पक्षीय चष्म्यातून घेतात ही सुद्धा वस्तुस्थिती आहे.

ती पाच लाखाची भानगड आहे काही कळायला मार्ग नाही. पाच लाखाच्या बाँडवर निर्दोष मुक्तता झाली म्हणजे नेमके काय झाले?

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2017 - 3:15 pm | श्रीगुरुजी

भ्रष्ट नेत्यांना कोठडीत टाकण्याची मोदी ह्यांना अभूतपूर्व संधी होती. ती संधी त्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्र्यांच्या निष्क्रियते मुळे गमावली आहे. २G ह्या सर्व प्रकरणात भाजपने कमालीची apathy दाखवली होती. कदाचित अरुण जेटली सारखे घरभेदी भाजपात घर करून आहेत आणि त्याची किंमत मोदींना चुकवावी लागेल असेच चित्र आहे.

मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा खटल्याची निम्मी सुनावणी पूर्ण झाली होती. एकदा आरोपपत्र दाखल होऊन सुनावणी सुरू झाली की सरकार त्यात काहीही करू शकत नाही. मनमोहन सिंग सरकारच्याच काळात खटल्याला सुरूवात झाली होती. दुर्दैवाने असं दिसतंय की त्यांनी मुद्दामच आरोपपत्र व साक्षीपुरावे ठिसूळ ठेवले होते. न्यायाधीशांनी सर्व वस्तुस्थिती व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लक्षात न घेतात निकाल दिलेला आहे. हा निकाल किंवा आजच आलेला आदर्श प्रकरणावरील निकाल, यावरून असं दिसतंय की न्यायालय वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून निकाल देत आहे व त्यामुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन व राजमान्यता मिळत आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Dec 2017 - 3:31 pm | हतोळकरांचा प्रसाद

मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा खटल्याची निम्मी सुनावणी पूर्ण झाली होती.

हे सांगायची आवश्यकताच नाही. हे विरोधकांना आणि लेखकांना माहित असायलाच हवं आहे. पण मोदींना आणि भाजपला शिव्या घालायची संधी का दवडावी?

मलातर प्रश्न पडलाय कि ६-७ हजार कोटींच्या ऐवजी आधीचे वाटप रद्द करून सरकारी खजिन्यात लाख कोटी वगैरे घालणारं सरकार वाईट आणि आधीचं सरकार यापेक्षा बरं किंवा असंच होतं म्हणणाऱ्यांच्या मानसिकतेची कीव करावी कि करू नये?

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2017 - 3:35 pm | श्रीगुरुजी

२०१३ मध्ये मंत्रालयाला आग लावून सिंचन घोटाळ्यासंबंधी बरीचशी कागदपत्रे नष्ट करण्यात आली. मनमोहन सिंग पायउतार होण्यापूर्वी कोळसा खाण वाटप प्रकरणातील बर्‍याच फाईल्स गहाळ करण्यात आल्या. भरपूर घोटाळे करून सर्व पुरावे नष्ट करून आता मनमोहन सिंग आपण निर्दोष असल्याचे सांगत आनंदाने बेहोष होऊन भांगडा करीत आहेत.

आणि कोणती कागदपत्रे नष्ट झाली यांची यादी आहे का ?
क्ष माणसाने भरपूर माणसे मारून , दंगली करून मग पुरावे नष्ट केले असे म्हणणे आणि मनमोहन सिंगाबद्दल वरचे विधान करणे सेम आहे.

गॅरी ट्रुमन's picture

22 Dec 2017 - 11:02 pm | गॅरी ट्रुमन

मलातर प्रश्न पडलाय कि ६-७ हजार कोटींच्या ऐवजी आधीचे वाटप रद्द करून सरकारी खजिन्यात लाख कोटी वगैरे घालणारं सरकार वाईट आणि आधीचं सरकार यापेक्षा बरं किंवा असंच होतं म्हणणाऱ्यांच्या मानसिकतेची कीव करावी कि करू नये?

त्याचे कसे आहे देशात होणार्‍या यच्चयावत वाईट गोष्टींसाठी मोदी जबाबदार असतात. त्यामुळे युपीए सरकार बरे होते असे अनेक सुशिक्षित लोकांना वाटायला लागते.

मोदी सरकारने यु पी ए सरकार भ्रष्टयाचारी आहे असे सांगून सत्ता मिळवली मग याना शिक्षा का होत नाही? आता तामिळनाडू त जयललिता राहिल्या नाहीत मग द्रमुक बरोबर स्युटि कारून दक्षिणेत चंचू प्रवेश करायचा विचार आहे असं वाटत

गामा पैलवान's picture

22 Dec 2017 - 7:20 pm | गामा पैलवान

अवांतर :

विकास,

त्यामुळे जर वरच्या कोर्टाने परत ताशेरे झोडले तर ते २०१९ च्या सुमारास असतील!

मला वाटतं की २०१९ साठी मोदी सर्वोच्च न्यायालयावर विसंबून राहायची शक्यता कमी आहे. माझ्या मते आसारामबापूंना निवडणुकींच्या साधारण वर्षभर आधी सोडलं जाईल. २०१४ साली तुरुंगात गेलेल्या बापूंनी चमत्कार घडवला होता. २०१९ साली तुरुंगाबाहेर आलेले बापू चमत्कार घडवतील अशी अपेक्षा आहे.

आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

22 Dec 2017 - 8:29 pm | अमितदादा

गामा महाराज,
सदगुरु कसला चमत्कार करणार आहेत म्हणे? त्यांचे साक्षीदारांचे खून पाडणे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे हे चमत्कार माहीत आहेत. आणखी नवा काही चमत्कार करणार आहेत काय?
त्यांनी जिवंत समाधी घेऊन एक शेवटचा चमत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. ह्या शूद्र मानवजातीस त्यांची गरज नाही, त्यांनी त्यांचं कार्य पाताळात चालवावे.
मोदींच्या यशाशी या बाबाचा काही संबंध नाही.
अति अवंतराबद्दल आणि भावना दुखवल्याबद्दल क्षमा असावी.

गामा पैलवान's picture

22 Dec 2017 - 10:35 pm | गामा पैलवान

अमितदादा,

आसारामबापू गेले ४+ वर्षे तुरुंगात असूनही त्यांच्यावर आरोपपत्र दाखल नाही. तुम्ही केलेले सर्व आरोप चक्क निराधार आहेत. कोणालाही कसलाही पुरावा सापडला नाहीये. प्रसाद पुरोहित व साध्वी प्रज्ञा यांचंही असंच विनापुरावा तुरुंगवासाचं प्रकरण होतं. तुम्हाला आठवंत असेलंच.

आ.न,
गा.पै.

ते शंकराचार्य राहिलेच. पण ते बहुधा खटला चालवून सुटले

साहना's picture

24 Dec 2017 - 12:31 pm | साहना

माझा आसाराम बापुना १००% पाठिंबा आहे. ४ वर्षे त्यांना आरोपपत्राशिवाय डांबून ठेवले आहेच पण विनाकारण त्यांच्यावर बलात्कारी असण्याचा आरोप लावला गेला आहे.

त्यांनी कुठल्याही महिलेवर बलात्कार केला नाही. माझ्या माहितीप्रमाणे कुना अल्पवयीन मुलीला नको तिथे हात लावला असा आरोप आहे. अश्या प्रकारचा आरोप सिद्ध करणे जवळ जवळ अशक्य आहे.

सर टोबी's picture

23 Dec 2017 - 10:54 am | सर टोबी

हताश होण्याचा अनुभव काहींना येतोय हि चांगली गोष्ट आहे. सध्याच्या सरकारच्या विरोधकांच्या मनस्थीची त्यांना कल्पना येऊ शकते. जैन हवालाच्या डायऱ्यांमधील संक्षिप्त टिपण हा पुरावा होतो पण त्याहीपेक्षा स्पष्ट असणाऱ्या सहारा डायर्या पुरावा होऊ शकत नाही. निवडणूक खर्चाची तर आता चाड राहिली नाही. प्रधान सेवकांच्या भपकेबाज प्रचार कुणाच्या डोळ्यात खुपत नाही. सत्तेवर आल्यापासून काय केलं याचा हिशोब धोरण लकवा म्हणून ज्यांची संभावना केली त्यांच्यापेक्षा वाईट आहे.

घ्या.थोडा आमचाही अनुभव घ्या.

The black buck who was driving Salman’s car, had killed Arushi Talwar because she did 2G scam. It later committed suicide. The case is thus resolved. Now court should work on more important issues like Holi Festival Ban.

माहितगार's picture

23 Dec 2017 - 1:58 pm | माहितगार

ब्लॅक बक वर चारा खाल्ल्याचा आरोप लावण्याचे अनवधानाने राहून गेले का ? ( लालूं बद्दलचे हे वृत्त रोचक आहे. )

माहितगार's picture

23 Dec 2017 - 2:11 pm | माहितगार

थॉमस नास्ट या व्यंगचित्रकाराचे इस.१८७१ मध्ये न्युयॉर्क टाईम्स मध्ये आलेले व्यंगचित्रात
(सौजन्य :विकिमिडीया कॉमन्स दुवा)

थॉमस नास्ट या व्यंगचित्रकाराचे इस.१८७१ मध्ये न्युयॉर्क टाईम्स मध्ये आलेले व्यंगचित्रात तो विचारतोय ' सांगा, जनतेचा पैसा कुणी चोरला ?' तर व्यंगचित्रातील पात्रे चक्राकार उभे राहून प्रत्येकजण दुसर्‍याकडे बोट दाखवत 'त्याने' असे म्हणतोय.

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2017 - 3:57 pm | श्रीगुरुजी

चाराघोटाळा प्रकरणातील एका खटल्याचा निकाल लागला. खांग्रेसचा जगन्नाथ मिश्रा सुटला, पण लालूवरील आरोप सिद्ध झाले.

गॅरी ट्रुमन's picture

23 Dec 2017 - 6:52 pm | गॅरी ट्रुमन

भाऊ तोरसेकरांनी लिहिलेला 'पुरोगाम्यांच्या जीवात जीव आला' या लेखात ( http://jagatapahara.blogspot.in/2017/12/blog-post_23.html ) हा लेख वाचण्यासारखा आहे.

भाऊ म्हणतातः

रणजीत सिन्हा या दिवट्या सी.बी.आय प्रमुखाच्या कारकिर्दीत आरोपपत्र दाखल झाले. २०१४ पूर्वीच ते दाखल झाले होते आणि त्यात हस्तक्षेप करण्याचा मोदी सरकारला अधिकार नव्हता. पण पुरवणी आरोपपत्र मात्र मोदी सरकारने दाखल केले नाही हा गुन्हा म्हणता येईल. " याचा अर्थ असा, की मोदी सरकार सूडबुद्धीने वागून या लोकांना गोत्यात घालण्यात हलगर्जी राहिले, हा पुरोगामी सूडबुद्धीचा सर्वात सज्जड पुरावा आहे."

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Dec 2017 - 10:32 pm | हतोळकरांचा प्रसाद

नीट काही कळले नाही वरचे वाक्य पण मोदी सरकारने पुरवणी आरोपपत्र का दाखल केले नसावे बरे? म्हणजे दाखल केलेले आरोपपत्र २जी घोटाळ्याचा निकाल आपल्या बाजूने येण्यास पुरेसे आहे हा आत्मविश्वास नडला असावा का? आंध्र/तमिळनाडू निवडणुकांसाठी सेटलमेन्ट वगैरे वक्तव्य उथळ वाटतात. भाजप काँग्रेसला परत उभा राहण्याची संधी अशी देईल हे पटत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

23 Dec 2017 - 11:03 pm | गॅरी ट्रुमन

नक्की काय ते समजत नाही. पण मोदींनी धाडसी निर्णय घेऊन आपल्या कोअर व्होटबँकला धक्का लावायलाही मागेपुढे बघितले नव्हते. सुरवातीला मोदी म्हणजे भारताचे रेगन होतील असे म्हटले जात होते. पण रेगन ज्या गोष्टी बोलत होते त्या प्रत्यक्षात आणायचे धाडस त्यांनाही झाले नाही. कारण तेच--- आपल्या व्होटबँकला धक्का कसा लावायचा. आणि दुसर्‍या टर्ममध्ये 'इतिहास आपल्या कारकिर्दीचे मूल्यमापन कसे करेल' ही भिती. असल्या कुठल्याही कारणांना न जुमानता आपण जे काही करत आहोत हे देशाच्या भवितव्यासाठी चांगले आहे हे कन्व्हिक्शन मोदींमध्ये आहे आणि त्याप्रमाणे ते वागत आहेत. असे असताना टूजी मध्ये नक्की काय चुकले असावे? आपल्यासारख्या सामान्यांना तरी तो प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

अल्पमतातील सरकार चालवण्यासाठी पि. व्ही नरसींव्हरावांनी आधी (राजकीय) तडजोडी केल्या - राजकारणात तत्वा पेक्षा स्टॅबीलिटीला प्राधान्य हे प्रॅक्टीकल ठरत असावे - आणि सत्तेतील काळ संपत येताना भ्रष्टाचारावर कारवाई पण केली बहुतेक मनमोहन सिंगांनी हा धडा गिरवण्याचा प्रयत्न स्वतःचे सरकार चालवताना केला असेल का ?

मोदींच्या बाबतीत लोकसभेत बहुमत असले तरी राज्यसभेत अल्पमतातच आहेत तिथे गोष्टी पारीत करून घेणे ते विवीध छोट्या राज्यात स्व पक्षची राजवट आणणे आणि टिकवणे हे किमान राज्यसभेतील बहुमत आणण्यासाठी आवश्यक आहे आणि तत्वांना मुरड घातल्या शिवाय कितपत शक्य होत असावे या बद्दल शंका वाटते.

बेसिकली राजकारण चालवण्यासाठी पैसा लागतो त्यासाठी बरेच काही करावे लागते हा न हाताळले ला सिस्टेमीक प्रॉब्लेम आहेच.

माझ्या मते मोदी हे "टास्क थिंकर" आहेत. म्हणजे एखादा प्रकल्प कसा तडीस न्यायाचा हे त्यांना ठाऊक आहे पण स्टॅटेजिक थिंकिंग मध्ये ते इतर लोकांवर विसंबून राहतात आणि ती मंडळी एकतर डांबिस आहे (अरुण जेटली) किंवा मूर्ख आहे (राम माधव, मोहन भागवत इत्यादी). मोदी रस्ते बांधून घेतील, ऊर्जा प्रकल्प बांधतील ह्यांत शंका नाही पण काँग्रेसी अजगराने ज्या विविध संस्थांना विळखा घातलाय त्याला ते हात लावू शकत नाहीत हे सत्य आहे.

न्यायव्यवस्थेवर ताबा ठेवायचा असेल तर निवृत्तीनंतर ह्या न्यायमूर्तींना काय काम मिळते, न्यायमूर्ती कुठ्याला विद्यापीठांतून शिकतात, तिथे कसल्या प्रकारचे प्राध्यापक आहेत? इत्यादी गोष्टीवर बारीक नजर पाहिजेच तसेच आगाऊ न्यायमूर्तींना कात्रीत पकडण्यासाठी तसाच चतुर कायदामंत्री पाहिजे. साधायचे कायदामंत्री एकदम डेड पेन आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर जालिकट्टूवार तामिळ जनतेने प्रेशर आणला म्हणून मोदींनी ऑर्डीनन्स आणले. खरे तर ते कायदा मंत्र्यांनी तातडीने स्वतःहून आधीच आणायला पाहिजे होते. त्यातून सरकार न्यायव्यवस्थेला खपवून घेणार नाही हा संदेश गेला असता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Dec 2017 - 10:47 am | हतोळकरांचा प्रसाद

काही अंशी सहमत!

त्यातून सरकार न्यायव्यवस्थेला खपवून घेणार नाही हा संदेश गेला असता.

कधी कधी वाटते की विरोधक सरकारने हेच करावे याची वाट बघत असावेत म्हणजे सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही असा प्रचार करता येईल.

सुबोध खरे's picture

27 Dec 2017 - 10:30 am | सुबोध खरे

@गॅरी ट्रुमन
पण पुरवणी आरोपपत्र मात्र मोदी सरकारने दाखल केले नाही हा गुन्हा म्हणता येईल.
पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरावा कोण गोळा करीत होतं? सी बी आय च. मग त्यांच्या कडे असा पुरावा मागणे हा त्यांच्या कामगिरीत हस्तक्षेप झाला असता आणि त्यावर तर विरोधक बोम्ब मारायला टपलेलेच आहेत.
मोदींना काहीही करणे शक्य नव्हते.
असे "अतिरिक्त पुरावे" सादर न करता राज्यपालांनी श्री. अशोक चव्हाण यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी अनुमती दिली या कारणास्तव उच्च न्यायालयाने ती रद्दबातल ठरवली आहे. मग अशोक चव्हाणांचे आदर्श मध्ये फ्लॅट आहेत असा स्पष्ट सकृत दर्शनी पुरावा असतानाही न्यायालय केवळ तांत्रिक बाबींवर परवानगी नाकारते हि गोष्ट पचत नाही. कारण एखादी गोष्ट "कायद्यात बसवायची ठरवली तर ती बसवता येते". ज्यांनी न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज पहिले आहे ते माझ्याशी सहमत होतील
कोणत्याही सरकारी यंत्रणेतील लोकांचे बोलविते धनी वेगवेगळे असतात. संपूर्ण यंत्रणा जर किडलेली आहे तर त्यातून चांगले अधिकारी शोधून काढून त्यांना महत्त्वाच्या पदावर आणण्यातच श्री मोदींची अर्ध्याहून अधिक शक्ती खर्च होत आहे. बाकीच्या अधिकाऱ्यांच्या चरण्याच्या कुरणावर मर्यादा आल्यामुळे किंवा अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बडतर्फ करणे अशा कारवायामुळे नोकरशाहीत त्यांचे अधिकच शत्रू तयार होत आहेत.
बाकी विरोधकांनी कितीही बोंब मारली तरी मोदी सरकारच्या बहुतांश मंत्रांवर अजूनतरी भ्रष्टाचाराचे "सबळ" आरोप झालेले नाहीत हे हि नसे थोडके.

गॅरी ट्रुमन's picture

27 Dec 2017 - 11:46 am | गॅरी ट्रुमन

सहमत आहे. एकूणच काँग्रेसी संस्कृतीची पाळेमुळे फारच खोलवर गेलेली आहेत.

पगला गजोधर's picture

27 Dec 2017 - 12:48 pm | पगला गजोधर

ट्रुमनजी सहमत आहे, एकूणच काँग्रेसी संस्कृतीची पाळेमुळे फारच खोलवर गेलेली आहेत, इतकी की सो कॉल्ड राष्ट्रप्रेमी (पक्षी बिजेपीचे) लोकं/समर्थकही त्यात नखशिखान्त मुरलेले आहेत. इतकी वर्षे काँग्रेसी संस्कृतीचा पाऊस पडत असताना,हे काय रेनकोट घालून फिरत नव्हते, त्यामुळेच असेल कदाचित....

The Yogi Adityanath government in Uttar Pradesh has ordered the withdrawal of a 1995 case related to defying prohibitory orders against Yogi Adityanath himself and 14 others, including a Union minister and a BJP MLA.

मोदींनी इतक्या गोष्टी म्यानेज केल्या आहेत आणि ते देखील बिनदिक्कत. अगदी मागच्या तिमाहीतील GDP चा दर देखील. आणि हा आरोप दस्तूर खुद्द सुब्रमण्यम स्वामींचा आहे. तरीदेखील 'बिचारे' मोदी म्हणे CBI पुढे हतबल होते यावर परस्परांना पूरक असणारे लोकच सहमत होऊ शकतात.

हा वैक्तिक हल्ला नाही. एक निरीक्षण आहे.