दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
2 Oct 2017 - 9:19 am

http://www.misalpav.com/node/40787

दम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी -

१.दमा निदान होण्यास उशीर का होतो

२.श्वसननलिकेची रचना

दमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत.

A.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते.

B.अंधश्रद्घा - ह्याचं सर्वात मजेदार उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा दुध प्यायला लागले होते ... जगभर दुध पिलं बाप्पानी ,भारतातून जे सुरू झालं ते पार सातासमुद्रापार अमेरिका आणि आॅस्ट्रेलीयातून बातम्या आल्या होत्या , मग काय भाव होता दुधाला !! Cherry on the top म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यानी पण दुजोरा दिला होता ह्या प्रकाराला ..... असा देश आपला अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला आहे.दम्याबद्दल तर ईतके गैरसमज आहेत की त्यावर तासभर बोलता येईल ,असो ... त्यातल्या त्यात दम्याबद्दल ची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणजे ७ जून ला हैद्राबाद ला दिली जाणारी फिश therapy ( its phishing ) आणि शाकाहारी लोकांसाठी केळ्यातून औषध दिलं जातं.... असा जर दमा बरा झाला असता तर किमान हैद्राबादमध्ये तरी दमा संपून गेला असता ना ? पण असं झालेलं नाही.
मध्यंतरी भोपाळ मध्ये छातीचं operation करून दमा बरा करण्याचं तंत्र वापरून लोकांची दिशाभुल केली गेली होती, मंतरलेली भाकरी काय , जादूटोणा काय , पुर्वजन्माची फळं काय ... आजार आणि पेशंट राहातात बाजूला आणि उरतो फक्त मन:स्ताप ....

C.प्रचारमाध्यमांचा गैरवापर - Fair & Lovely हे जातीवंत उदाहरण आहे , कळस म्हणजे पुरूषांसाठी काढलेलं नवं क्रिम ...
वर्तमानपत्रात बरेचदा जाहिरात येते अमुक डाॅक्टर रेल्वेस्टेशन किंवा बसस्टॅंड जवळच्या हाॅटेल मध्ये येणार आहे त्याच्या औषधांनी BP,लकवा,कॅन्सर,संधिवात,मधुमेह,दमा आणि एड्स (हो बरोबर वाचलंत !!) बरा होतो .... ४-५ हजार ₹ ची औषधं (पुड्या) देणार तो गृहस्थ (डाॅक्टर नाही म्हणणार मी) ... तिथे १००-१५० लोकं जाणार कारण जाहीरात तंत्रच प्रभवीपणे वापरलं गेलेलं असतं.... अश्या पेशंटचं पुढे काय होतं ह्यावर बोलायलाच नको ... हे दुष्टचक्र कधी थांबेल देवच जाणे _/\_.

थोडक्यात श्वासनलिकेची रचना :

सुरूवात होते ती नाकापासून , पुढे घशातून जाते (गळ्यात कडक/ टणक जो भाग लागतो तो trachea / wind pipe , थोडासा दाबून पाहीलात तर खोकला येईल ) ती जाते छातीमध्ये आणि दुभागते , एका फुफ्फुसात एक आणि दुसऱ्यात एक .... पुढे ती दुभागत जाते ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या दुभागत जातात ... १६/१७ वेळा दुभागल्यानंतर जी येते ती सुक्ष्म श्वासनलिका (bronchioles)तिच्या पुढे येतात वायुकोष (Alveoli) हे श्वसनयंत्रणेचं शेवटचं unit ... Alveoli/वायुकोष ह्या आपण लहानपणी केलेल्या साबणाच्या बुडबुड्यांपेक्षा तलम आणि नाजूक असतात... एका फुफ्फुसात १-१.५ कोटी ( हो कोटी) असतात ..... अश्याप्रकारे २-३ कोटी वायुकोष, सुक्ष्म श्वसननलिका,रक्तवाहीन्या असा सगळा लवाजमा मिळून तयार होतं फफ्फुस !!....

एका फफ्फुसातले वायुकोष जर जमिनी अंथरले तर आख्खं फुटबाॅल मैदान व्यापलं जाईल एवढी जागा घेतात .... निसर्गाची ही किमया आम्ही रोज बघत असतो _/\_......

शिक्षणलेखमाहितीआरोग्य

प्रतिक्रिया

आगाऊ म्हादया......'s picture

2 Oct 2017 - 9:43 am | आगाऊ म्हादया......

डॉक्टर म्हणाले होते, बालदमा आहे, १५ व्या वर्षी दूर होईल पण तसं काहीच झालं नाही.
आता नेहमी त्रास होत नाही. पण थंडीच्या दिवसात रोज सकाळी rotacap घ्यावी लागते, नाहीतर नुसता श्वास घेत येत नाही, व्यायाम वगैरे तर दूरच.
पोहायला पण जात होतो वर्षभर, विशेष फायदा जाणवला नाही.

धूळ, धुरळा, परागकण ह्याची पण ऍलर्जी आहे. सगळाच आनंदी आनंद आहे. पुढील लेखात प्रभावी उपचार पण सांगा.

डॉ श्रीहास's picture

2 Oct 2017 - 7:35 pm | डॉ श्रीहास

तीन प्रकार चे आजार असतात
१. बरे होणारे : टीबी ,टायफॉईड ,मलेरिया आणि इतर आजार जे औषधउपचारानी बरे होतात ... १०० टक्के

२.बरे न होणारे पण आटोक्यात येणारे : Hypertension (हाय BP),Arthritis (संधिवात ), डायबेटिस (मधुमेह) आणि दमा .... पण ह्यात दमा असा आजार आहे कि जो योग्य उपचारांनी आटोक्यात आला तर औषधी बंद होतात (अशी अनेक उदाहरणं आहेत).... त्यामुळे अस्थमा किंवा दमा असणाऱ्यांनी डिप्रेस न होता इनहेलर्स नियमित घेणं फार महत्वाचं आहे .... हा आजार लवकर निदान झाल्यास योग्य औषधांनी चांगला आटोक्यात आणला तर औषधांशिवाय कंट्रोल मध्ये राहू शकतो , पण त्या आधी किती कालावधीसाठी औषध घ्यावं लागेल हे नक्की सांगता येत नाही.... काही रुग्णांना काही महिने तर काहींना काही वर्ष लागतात, बालदमा ८/१५/१८ व्या वर्षानंतर बरा होतो अस नाही पण नक्कीच लवकर कंट्रोल होतो आणि स्टेबल होतो.

३. बरे न होणारे पण वाढत जाणारे : एड्स , ILD (Interstitial Lung Disease : फुफ्फुसाचा एक अतिगंभीर आजार) आणि काही प्रकारचे कॅन्सर ....

तुम्ही दमा आहे हे जर एकसेप्ट करू शकलात तर बरेच लवकर दम्याला कंट्रोल करू शकाल आणि हवा तो व्यायाम करू शकाल अगदी हवा तो न दमता ... मदत लागल्यास व्यनि करा

आगाऊ म्हादया......'s picture

2 Oct 2017 - 9:49 am | आगाऊ म्हादया......

माझ्या एका काकांकडे एक गृहस्थ येतात, हातात एक मोठा दगड असतो. लोकांच्या समस्या दूर करतात म्हणे. मलाही बोलावलेलं काका ने,

त्यांनी मला समोर बसवलं, त्या दगडाला सांगितलं ह्याचा दमा काढ, मग मलाही हळू हळू हलकं वाटलं (वातावरणाचा प्रभाव), ते म्हणाले जा गेला दमा. पैसे वगैरे नाही घेतले त्यांनी.
नंतर मात्र मला दमा आहे तसा जाणवत होता. आजवर त्या काकांकडे पुन्हा गेलो नाही, त्यांची त्या गृहस्थांवर फारच श्रद्धा आहे

गुण येतो ते औषध एवढंच सामान्य माणसास कळतं. हैदराबादचा तोडगा खरंच काम करतो हे सत्य आहे. टॅान्सिल्सवर आयुर्वेद,अॅलोपथि आटापिटा करते पण होमिओपथी चुटकीसरशी आटोक्यात आणते.

सुबोध खरे's picture

2 Oct 2017 - 1:49 pm | सुबोध खरे

The medicines contained heavy metal like lead and arsenic. The extra medicines that was given did not have traces of steroids. But steroids were found in the medicine that was stuffed inside the fish. Prednisone, Prednisolone and methylprednisolone were present in the medicine. These steroids are used for asthma treatment and should be prescribed by a licensed medical practitioner. Abuse of these steroids can lead to muscle weakness, osteoporosis, diabetes and growth suppression.
https://rationalistdebashis.wordpress.com/2017/06/30/fish-medicine-to-cu...

इरसाल कार्टं's picture

2 Oct 2017 - 12:55 pm | इरसाल कार्टं

एक विनंती, पुढल्या भागात श्वसन संस्थेचे चित्रही डकवा.

वामन देशमुख's picture

2 Oct 2017 - 2:15 pm | वामन देशमुख

>>> त्यातल्या त्यात दम्याबद्दल ची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणजे ७ जून ला हैद्राबाद ला दिली जाणारी फिश therapy ( its phishing ) आणि शाकाहारी लोकांसाठी केळ्यातून औषध दिलं जातं.... असा जर दमा बरा झाला असता तर किमान हैद्राबादमध्ये तरी दमा संपून गेला असता ना ? पण असं झालेलं नाही.

आपल्याबद्धल पूर्ण आदर आहे, तथापि, माझ्या किमान तीन परिचितांचा दमा, हैदराबादच्या औषधीने पूर्णतः बरा झालाय व पून्हा उद्भवला नाहीय.

कंजूस's picture

2 Oct 2017 - 7:38 pm | कंजूस

स्टिरिअडस चा प्रसार होण्याअगोदरपासून ते हैदराबादी उपचार आहेत.

डॉ श्रीहास's picture

2 Oct 2017 - 8:48 pm | डॉ श्रीहास

खरे सरानी ह्यावर जे उत्तर दिलाय तेच माझा उत्तर आहे... मी ,हैदराबाद ला जाऊन आलेले १५-२० रुग्ण पहिले आहेत त्यांना कोणालाच फायदा झालेला पहिला नाहीये , ह्याउलट ते रुग्ण इनहेलर्स वापरून समाधानी आणि well controlled आहेत. अजूनहि सांगायचं झाल्यास माझे असे रुग्ण आहेत कि जे एकदाच उपचार घेऊन गेले आहेत आणि परत कधीच दम्याचा त्रास झाला म्हणून आले नाहीत आणि आलेच परत तर कोण्या दुसऱ्या पेशंट सोबत म्हणून आले आणि आवर्जून सांगून गेलेत कि एकाच भेटीत बरे झाले म्हणून , असे पेशंट कमी असतात .....

देशपांडेमामा's picture

2 Oct 2017 - 3:58 pm | देशपांडेमामा

भारी प्रकार आहे फफ्फुसातले वायुकोष म्हणजे !
स्मोकिंग नी नेमका काय परीणाम होतो ह्या वायुकोषांवर ?

देश

सोमनाथ खांदवे's picture

2 Oct 2017 - 9:06 pm | सोमनाथ खांदवे

ख्याक !!!! , माझ्या बी मनात हाच प्रश्न व्हता

डॉ श्रीहास's picture

3 Oct 2017 - 9:42 am | डॉ श्रीहास

केवळ वायुकोषांवरच नाही तर श्वासनलिका आणि रक्त वाहिन्यांवर धुराचा विपरीत परिणाम होतो... वायुकोष आणि श्वासनलिका यांचा लवचिक पणा नाहीसा होतो आणि श्वास घेणं/सोडणं हे फार अवघड होऊन बसतं... breathing becomes nightmare .... अजून सोपं करून सांगतो , तुम्ही संपूर्ण छाती भरून श्वास घ्या आता श्वास सोडू नका आणि सामान्य श्वसन चालू करा ( करूनच पाहा , धुम्रपानामुळे जो दम्याचा त्रास होतो तो असाच असतो अगदी असाच) ....

वाचतोय. पण फारच छोटे भाग टाकत आहात. कृपया थोडे मोठे भाग टाकाल का?

डॉ श्रीहास's picture

3 Oct 2017 - 9:44 am | डॉ श्रीहास

प्रयत्न करतो आहे .... पण सलग लिखाण होत नाहीये .... पुढचा भाग थोडा मोठा आणि जास्त माहीतीपूर्ण असेल _/\_

उगा काहितरीच's picture

2 Oct 2017 - 6:02 pm | उगा काहितरीच

दमा हा आजार अनुवांशीक आहे का ? आईकडून/वडिलांकडून येण्याची किती शक्यता असते ?

कधी कधी दीर्घ श्वास घेऊनही गुदमरल्यासारखे होते, अगदी क्वचित, असे कशामुळे होते?