दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)
http://www.misalpav.com/node/40787
दम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी -
१.दमा निदान होण्यास उशीर का होतो
२.श्वसननलिकेची रचना
दमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत.
A.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते.
B.अंधश्रद्घा - ह्याचं सर्वात मजेदार उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा दुध प्यायला लागले होते ... जगभर दुध पिलं बाप्पानी ,भारतातून जे सुरू झालं ते पार सातासमुद्रापार अमेरिका आणि आॅस्ट्रेलीयातून बातम्या आल्या होत्या , मग काय भाव होता दुधाला !! Cherry on the top म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यानी पण दुजोरा दिला होता ह्या प्रकाराला ..... असा देश आपला अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला आहे.दम्याबद्दल तर ईतके गैरसमज आहेत की त्यावर तासभर बोलता येईल ,असो ... त्यातल्या त्यात दम्याबद्दल ची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणजे ७ जून ला हैद्राबाद ला दिली जाणारी फिश therapy ( its phishing ) आणि शाकाहारी लोकांसाठी केळ्यातून औषध दिलं जातं.... असा जर दमा बरा झाला असता तर किमान हैद्राबादमध्ये तरी दमा संपून गेला असता ना ? पण असं झालेलं नाही.
मध्यंतरी भोपाळ मध्ये छातीचं operation करून दमा बरा करण्याचं तंत्र वापरून लोकांची दिशाभुल केली गेली होती, मंतरलेली भाकरी काय , जादूटोणा काय , पुर्वजन्माची फळं काय ... आजार आणि पेशंट राहातात बाजूला आणि उरतो फक्त मन:स्ताप ....
C.प्रचारमाध्यमांचा गैरवापर - Fair & Lovely हे जातीवंत उदाहरण आहे , कळस म्हणजे पुरूषांसाठी काढलेलं नवं क्रिम ...
वर्तमानपत्रात बरेचदा जाहिरात येते अमुक डाॅक्टर रेल्वेस्टेशन किंवा बसस्टॅंड जवळच्या हाॅटेल मध्ये येणार आहे त्याच्या औषधांनी BP,लकवा,कॅन्सर,संधिवात,मधुमेह,दमा आणि एड्स (हो बरोबर वाचलंत !!) बरा होतो .... ४-५ हजार ₹ ची औषधं (पुड्या) देणार तो गृहस्थ (डाॅक्टर नाही म्हणणार मी) ... तिथे १००-१५० लोकं जाणार कारण जाहीरात तंत्रच प्रभवीपणे वापरलं गेलेलं असतं.... अश्या पेशंटचं पुढे काय होतं ह्यावर बोलायलाच नको ... हे दुष्टचक्र कधी थांबेल देवच जाणे _/\_.
थोडक्यात श्वासनलिकेची रचना :
सुरूवात होते ती नाकापासून , पुढे घशातून जाते (गळ्यात कडक/ टणक जो भाग लागतो तो trachea / wind pipe , थोडासा दाबून पाहीलात तर खोकला येईल ) ती जाते छातीमध्ये आणि दुभागते , एका फुफ्फुसात एक आणि दुसऱ्यात एक .... पुढे ती दुभागत जाते ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या दुभागत जातात ... १६/१७ वेळा दुभागल्यानंतर जी येते ती सुक्ष्म श्वासनलिका (bronchioles)तिच्या पुढे येतात वायुकोष (Alveoli) हे श्वसनयंत्रणेचं शेवटचं unit ... Alveoli/वायुकोष ह्या आपण लहानपणी केलेल्या साबणाच्या बुडबुड्यांपेक्षा तलम आणि नाजूक असतात... एका फुफ्फुसात १-१.५ कोटी ( हो कोटी) असतात ..... अश्याप्रकारे २-३ कोटी वायुकोष, सुक्ष्म श्वसननलिका,रक्तवाहीन्या असा सगळा लवाजमा मिळून तयार होतं फफ्फुस !!....
एका फफ्फुसातले वायुकोष जर जमिनी अंथरले तर आख्खं फुटबाॅल मैदान व्यापलं जाईल एवढी जागा घेतात .... निसर्गाची ही किमया आम्ही रोज बघत असतो _/\_......
Book traversal links for दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हं, मला आहे दमा
तीन प्रकार चे आजार असतात
आता आणखी एक अंधश्रद्धा पण सांगतो
गुण येतो ते औषध एवढंच सामान्य
The medicines contained heavy
छान माहिती
सध्या जमत नाहीये.... तो पर्यंत खालील लिंक बघू शकाल...
>>> त्यातल्या त्यात
स्टिरिअडस चा प्रसार
खरे सरानी ह्यावर जे उत्तर
बापरे !
ख्याक !!!! , माझ्या बी मनात
केवळ वायुकोषांवरच नाही तर
वाचतोय. पण फारच छोटे भाग टाकत
प्रयत्न करतो आहे .... पण सलग
दमा हा आजार अनुवांशीक आहे का
कधी कधी दीर्घ श्वास घेऊनही