Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95930
प्रतिक्रिया 592

प्रतिक्रिया

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती.
व्वा मोठ्ठा पराक्रमच केला नाही त्या शिवसेनेने!! खासदाराला उडण्यावर बंदी घातल्यामुळे एकही विमान उडू न देण्याची धमकी (आणि ती प्रत्यक्षात उतरवायची क्षमता) शिवसेनेच्या एकूणच वकुबाला साजेशी आहे. मी तर म्हणतो अशा प्रकारे प्रवाशांना वेठीस धरायला कोणी गेल्यास जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण करून ५-१०-५० लोकांना यमसदनी पाठवावे. एकदा अशी घटना कुठे घडल्यास हे सगळे राजकीय पक्षांमधले गुंड सुतासारखे सरळ येतील आणि भविष्यात कुठे असले प्रकार व्हायचे नाहीत.

In reply to by गॅरी ट्रुमन

जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण करून ५-१०-५० लोकांना यमसदनी पाठवावे.
हाही मोठा पराक्रमच असेल नाही? शिवसेनेने विमानतळ बंद पाडण्याचं समर्थन दिसलं का माझ्या वाक्यात कुठे ? असलेल्या सत्तेच्या जोरावर फक्त संबंधित पक्ष शिवसेना आहे म्हणून भाजपने केलेली ही खेळी आहे हे आले आहेच वर! मग याला संसदेतून, डिप्लोमॅटिक मार्गाने दाद मिळत नसल्यावर शिवसेनेने त्यांचा "वकुब" वापरला तर ती शिवसेनेची खेळी आहे. त्यावर जी काय कायदेशीर कारवाई (सध्यातरी उपलब्ध असलेल्या भारतीय संविधानानुसार, डायरचं बघता येईल नंतर कधीतरी चुकूनमाकून हुकूमशाही आलीच तर) करण्याचा मार्ग आहेच की उपलब्ध. बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.
माझी काहीही हरकत नाही तसे करायला. निदान मिपावर तरी ज्याला इच्छा असेल त्याने धागा जरूर काढावा. फक्त प्रॉब्लेम इतकाच की हा प्रकार बंगालमधल्या खासदारानी केला आहे आणि मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे त्याला शिवसेना खासदाराने केलेल्या गोंधळाइतका टी.आर.पी मिळणे फारच कठिण. एकूणच असे सगळे प्रकार करणारे खासदार, तो परिचारक आणि अजून जो कोणी असेल तो सगळे एका माळेचे मणी.

In reply to by गॅरी ट्रुमन

छेहो, मिपावरच्या चर्चेबद्दल बोलत नाहीये मी. माध्यमांनी एका अरेरावीतुन सुरु झालेल्या भांडणाला असा काही रंग दिला आणि खासदार महाशय म्हणजे जणू या देशातील सर्वात धोकादायक व्यक्ती असा गोंधळ घातला. वरून हि संधी समजून एअर विमान कंपन्यांच्या आडून बंदीचा जो फार्स खेळला गेला त्याबद्दल बोलतोय. टीआरपी हि मराठीमुळे नाही तर टीआरपी हि शिवसेनेबद्दलच्या पूर्वग्रहदूषित भूमिकेमुळे मिळाली. गेली कित्येक वर्षे शिवसेना मनसे च्या विरोधात तथ्यविरहित मते मांडून देशातील इतर भागातील लोकांना चुकीची माहिती पुरवण्याचे काम हि मंडळी सातत्याने करत आहेत, तोच प्रकार यावेळेलाही घडला. या माध्यमांच्या आणि विमान कंपनीच्या भूमिकेबद्दल मी बोलत आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत. . . . . . मला वाटते तृणमूलच्या खासदाराने झालेल्या प्रकारानंतर कोणत्याही टिव्ही कॅमेर्‍यासमोर येऊन "मैने पच्चीस बार उसको सँडलसे मार्‍या" अश्या फुशारक्या मारलेल्या बातम्या कोणत्याही न्युज चॅनेलवर पाहिल्या नाहीत.

In reply to by प्रसाद_१९८२

हो बरोबर आहे. थोडक्यात काय तर काय केले हे कधीच महत्वाचे नव्हते, काय बोलले हेच महत्वाचे होते!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विमानात फक्त गोंधळ घालणे आणि सरकारी विमान कंपनीच्या एका कर्मचार्‍याला मारहाण करुन त्याच्या खुनाचा प्रयन्त करणे ह्या दोन्ही घटनांत काहिच फरक वाटत नाही का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गायकवाडने कर्मचाऱ्याला विमानाच्या शिडीवरुन ढकलून द्यायचा प्रयत्न केला हे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. या गुन्ह्याला खून करण्याचा प्रयत्न करणे असेच म्हणतात.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला हव्या त्या प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितलं असेल, हवाईसुंदरीने सांगितलेले चालणार नाही बहुतेक!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

रविंद्र गायकवाड यांच्यावर दिल्ली पोलीसांनी कलम ३०७, ३०८ खाली गुन्हयाची नोंद केली आहे, आणि ही दोन्ही कलमे Attempt of murder साठी वापरली जातात. ह्या दोन्ही कलमांखाली दिल्ली पोलीसांनी गायकवाड यांना बुक केल्यावर त्यांची गुर्मी एका फटक्यात उतरली व झाल्याप्रकारावर संसदेत माफी मागून, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना "तुम्ही माझ्या आई प्रमाणे आहात" वगैरे म्हणत गायकवाड यांनी ही दोन्ही कलमे मागे घ्यावीत म्हणून सुमित्रा महाजन यांना मध्यस्थी करण्याचीविनंती केली.

In reply to by प्रसाद_१९८२

तुम्ही म्हणाल तसं! पोलीसानी ३०७ लावला म्हणजे ते दोषी असा तुम्हाला समज करून घ्यायचा असेल तर त्याला माझा नाईलाज आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

अरे वा, म्हनजे लोकसभा अध्यक्षांना विनंती केलि तर किंवा त्यांनी मध्यस्थी केली तर खुनाचे कलम काढतात पोलिस? इंटरेस्टिंग

In reply to by अभ्या..

लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केलेली नाही आणि खुनाचे कलम काढले गेलेले नाही. एकदा पोलिसांच्या फिर्याद पुस्तकात गुन्ह्याची नोंद झाली की न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणतेही कलम काढता येत नाही. वाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युनंतर पालघरच्या एका महाविद्यालयीन तरूणीने बंदविरूद्ध प्रतिक्रिया दिली होती व तिच्या एका मैत्रिणीने त्या प्रतिक्रियेला लाईक केले होते. नंतर शिवसैनिकांच्या दबावामुळे पोलिसांनी काहीतरी कलमे लावून त्या दोघींना अटक केली होती. त्याविरूद्ध प्रचंड आरडाओरडा झाला. वाचाळवीर काटजूंनी त्याविरूद्ध न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर न्यायाधीशांनी पोलिसांना परखड शब्दात सुनावून ती कलमे काढून टाकायला लावली होती.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हसून घ्या! पर्याय नाही हो, बंदी तर उठली आहेच. त्या शिवसेनाप्रेमी माध्यमाने काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती. त्याची लिंक कुठे मिळाली तर देतो ;).
हीच ती बातमी दिसतेय. याच्यात खालीलप्रमाणे लिहिलं आहे (वैधानिक इशारा- वाचताना मोठ्याने हसू नये. आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज होईल.) गैरवर्तन करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला ‘शिवसेना स्टाइल’ने धडा शिकवणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी आज उठवण्यात आली. त्या बंदीच्या विरोधात शिवसेना खासदारांनीं गुरुवारी लोकसभेत रणकंदन केले होते. इतकेच नव्हे तर, गायकवाड यांच्यावरील प्रवासबंदी उठवली नाही तर मुंबईतून एकाही विमानाचे उड्डाण होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला होता. त्यानंतर विमान कंपन्यांची चांगलीच टरकली होती आणि केंद्र सरकारही बॅकफूटवर गेले होते. मुंबई विमानतळावरून विमाने उडू न देण्याच्या शिवसेनेच्या पोकळ धमकीला कोणीही घाबरले नव्हते. शिवसेनेच्या धमक्या म्हणजे सादळलेला, भिजलेला, फुसका फटाका ज्याची वात सुद्धा जळत नाही. विमान कंपन्या हवालदिल होण्याचा प्रश्नच नव्हता. १५ दिवस बंदी सुरू होती. शिवसेनेच्या फुसक्या बारांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. विमानतळावर पोलिसांबरोबर अर्धसैनिक दल सुद्धा संरक्षणासाठी असते. तिथे कोणी राडा करायला गेले असते तर त्यांच्याकडून योग्य तो प्रसाद मिळाला असता. मातोश्रीत वातानुकुलीत खोलीत बसून वाईन किंवा बीअरचे घुटके घेत यॅव करू, त्यॅव करू अशा धमक्या द्यायला अक्कल लागत नाही, कारण खरोखरच राडा करण्याची वेळ आली तर राडा करायला जाणारे दुसरेच असतात. त्यांच्यावरच लाठ्या खाण्याची, तुरूंगात जायची किंवा खटल्याला सामोरे जायची वेळ येते. मातोश्रीत आरामात राहून स्वतःच स्वतःची मुलाखत घेऊन स्वतःच्यात वृत्तपत्रात स्वतःच छापून स्वतःचेच कौतुक करणारे किंवा भुवया उंचावून गरागरा डोळे फिरवत एअर इंडियाच्या सीएमडीची औकात विचारणारे रॉडी राऊत कधी रस्त्यावर उतरून आंदोलनात किंवा राड्यात सहभागी झाल्याचे अगदी 'सामना'त सुद्धा छापून आलेले नाही. विमाने उडू न देण्याची धमकी प्रत्यक्षात आणण्याचा शिवसेनेच्या पार्श्वभागात खरोखरच दम असता तर त्यांनी १५ दिवस इतकी मानहानी सहन करून बेअब्रू करून घेतली नसती. गायकवाडांचे तिकिट एअर इंडिया व इतर कंपन्यांनी ७-८ वेळा रद्द केले, १५ दिवस त्यांना विमानप्रवास करता आला नाही, शेवटी रेल्वेने जावे लागले, १५ दिवस लपून रहावे लागले. अगदी २ दिवसांपूर्वी संसदेत सुद्धा त्यांना माध्यमांपासून लपूनछपून जावे लागले. शेवटी माफीपत्र लिहून दिल्यावर व परत असे करणार नाही असे लिहून दिल्यानंतरच माफी मिळाली. तोवर त्यांची व पक्षाची देशभर पुरती नाचक्की व बेअब्रू झाली होती. या निमित्ताने शिवसेनेची व त्यांच्या नेत्यांची लायकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर चघळली गेली आणि त्यांची पुरती शोभा झाली. एकीकडे महाराष्ट्रात भाजपसमोर शिवसेनेची सातत्याने अवहेलना सुरू असताना या प्रकरणामुळे त्यांची पुरती मानहानी झाली. असे असूनसुद्धा 'जितं मया'च्या थाटात आनंदोत्सव साजरा करणे घोट्यात मेंदू असणार्‍या शिवसेनेलाच शोभून दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्याला हव्या त्या बातम्यांचे संदर्भ बरोबर, नको त्याचे काहीतरी लांबलचक विश्लेषण, असो. खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा प्रयत्न केला हि धादांत खोटी बातमी संदर्भासाठी आणि निंदेच्या स्वसोयीसाठी वापरताना विश्लेषण होत नाही. तिकीट बुक झाले असते तरी मला विमानतळावर कोण ओळ्खतंय, त्यामुळे एकदा तिकीट बुक झाले की मी जाईनच असं गृहीत धरून खासदारांनी असले प्रयत्न केले असतील नाही? बाकी १५ दिवस फुटकळ बंदी काय लादली तर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांचा मेंदू कुठे असेल हे न विचारलेलेच बरे! शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर चघळली गेली म्हणे असल्या प्रकरणांनी, हहपुवा! पण काय करणार आता, इतकी डोईफोड करूनही, एवढा चिखल फेकुनही हवा तो रिझल्ट मिळाला नाही ना, मग काय काढा दुसऱ्याच्या मेंदूची लेवल, पकवा खयाली पुलाव!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा प्रयत्न केला हि धादांत खोटी बातमी संदर्भासाठी आणि निंदेच्या स्वसोयीसाठी वापरताना विश्लेषण होत नाही. धादांत खोटी बातमी? बाकी १५ दिवस फुटकळ बंदी काय लादली तर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांचा मेंदू कुठे असेल हे न विचारलेलेच बरे! शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर चघळली गेली म्हणे असल्या प्रकरणांनी, हहपुवा! पण काय करणार आता, इतकी डोईफोड करूनही, एवढा चिखल फेकुनही हवा तो रिझल्ट मिळाला नाही ना, मग काय काढा दुसऱ्याच्या मेंदूची लेवल, पकवा खयाली पुलाव! हवा तो रिझल्ट मिळालाच की. १ दिवस बंदी लावली असती तरी त्याचे स्वागतच होते. जितके जास्त दिवस बंदी लावली गेली तो बोनसच होता. मग्रुरीला, मूर्खपणाला आणि फुशारक्यांना योग्य ते उत्तर मिळालेले आहे. १५ दिवस लपून राहून, अनेकवेळा तिकीट रद्द होऊन, सर्वत्र मानहानी होऊन आणि शेवटी माफीपत्र लिहून दिल्यानंतरच माफी मिळाल्यानंतरसुद्धा सुद्धा अब्रूला अजिबात धक्का लागलेला नाही, उलट प्रतिष्ठेत भरघोस वाढ झाली आहे असे वाटत असेल तर धन्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अर्थातच धादांत खोटी बातमी! पुरावे असतील तर द्या तुमच्याकडे काही. संसद सदस्याने जबाबदारीवर हे संसदेत सांगितले आहे की असे कुठलेही बुकिंग त्यांनी केले नाही. म्हणजे काय तर कोणीतरी त्यांच्या नावाने किडे करायचे आणि अंध विरोधक लगेच ढोल घेऊन तयार! त्यांनी बुकिंग केले असते तरी विमानतळावर त्यांना बोर्ड केले गेले नसते हे लहान लेकरालादेखील कळले असते.
शेवटी माफीपत्र लिहून दिल्यानंतरच
याचा काही पुरावा असेल तर द्या, नाहीतर परत हि धादांत खोटी बातमी आहे हे सिद्ध होईल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

>>> संसद सदस्याने जबाबदारीवर हे संसदेत सांगितले आहे की असे कुठलेही बुकिंग त्यांनी केले नाही. "मी विनम्र स्वभावाचा आहे" असे फार्सिकल विधानही त्यांनी संसदेत केले होते, जे ऐकल्यावर नेहमी चेहऱ्यावर संतप्त भाव असणारे उधोजी सुद्धा खो खो हसत जमिनीवर गडबडा लोळले होते. >>> याचा काही पुरावा असेल तर द्या, नाहीतर परत हि धादांत खोटी बातमी आहे हे सिद्ध होईल. पत्राची प्रत आधीच दिलेली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मी विनम्र स्वभावाचा आहे......
मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट जास्त फार्सीकल आहे. म्हणजे एखाद्याच्या उद्घाटपणाला उत्तर दिले तर तो माणूस विनम्र असू शकत नाही? स्वतःच्या मतदारसंघातील खासदारांबद्दल माहिती नासणाऱ्यांनी उगाच माहिती नसताना जेनेरिक स्टेटमेंट्स टाकणं जास्त फार्सीकल आहे.
पत्राची प्रत आधीच दिलेली आहे.
ओके म्हणजे भाषांतर हवे का हा त्यावरचा प्रश्न सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आला. परत विचारतो, तुम्हाला वरील पत्राचे मराठी भाषांतर समजले का? नसेल तर कोणीतरी देईलच करून. त्यात कुठे माफी हा शब्द आहे ते दाखवून देणे. धादांत खोट्या बातम्या स्वसोयीसाठी वापरण्याआधी खात्री करून घ्यावी.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट जास्त फार्सीकल आहे. म्हणजे एखाद्याच्या उद्घाटपणाला उत्तर दिले तर तो माणूस विनम्र असू शकत नाही? स्वतःच्या मतदारसंघातील खासदारांबद्दल माहिती नासणाऱ्यांनी उगाच माहिती नसताना जेनेरिक स्टेटमेंट्स टाकणं जास्त फार्सीकल आहे.
मी त्याला फक्त धक्का दिला, मोदींविरूद्ध बोलला म्हणून मी संतापलो, मी बुकिंग केलेच नव्हते इ. विधाने तर जास्त फार्सिकल आहेत. एखाद्याच्या कथित उद्धटपणाला उत्तर म्हणून चपलेने मारणे, माझ्याविरूद्ध आधीच अनेक केसेस आहेत . . . होऊ देत अजून एक केस, परत अशी वेळ आली तर हेच करीन इ. गोष्टी करणारा आणि बोलणारा माणूस विनम्र??????? शिवसेनेची विनम्रतेची व्याख्या जगावेगळी दिसतेय. ओके म्हणजे भाषांतर हवे का हा त्यावरचा प्रश्न सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आला. परत विचारतो, तुम्हाला वरील पत्राचे मराठी भाषांतर समजले का? नसेल तर कोणीतरी देईलच करून. त्यात कुठे माफी हा शब्द आहे ते दाखवून देणे. धादांत खोट्या बातम्या स्वसोयीसाठी वापरण्याआधी खात्री करून घ्यावी. टाका भाषांतर म्हणजे तुम्ही स्वतः करीत असलेला शब्दांचा खेळ स्वतःच्याच लक्षात येईल.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला परत विनंती आहे, माफी या अर्थाचा (आणि तोही एअर इंडियाची माफी) शब्द दाखवून द्या! लेटरची सुरवातच "जे झालं त्याचा खेद वाटतो आणि असं घडेल किंवा घडावं असा कोणाचाच हेतू नसावा" अशी आहे. आणि त्यापुढेही त्यासंदर्भातच लिहिलेले आहे. माफीनामा हा शब्द स्वतःचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वापरायचा असेल तर खुशीने वापरा, पण जे धादांत खोटे ते खोटेच!

In reply to by श्रीगुरुजी

इंग्रजी कळत नाही हे मान्य आहे तर! टाकतो भाषांतर, त्यात काय वेळ लागतो. पण प्रश्न असा पडला आहे की, जर कळत नाही भाषा तर मग तो माफीनामा आहे कसे ठरवले? आणि मग भाषांतर टाकल्यावर कळेल याची काय शाश्वती? उगाच वेड घेऊन पेडगावला जायचे ठरले असेल तर, भाषांतरावरवरही येईलच एखादं विश्लेषण.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही इंग्रजी कळत नाही एवढं कन्फर्म करा की टाकतोच भाषांतर! शिवाय इंग्रजी कळत नाही तर मग तो माफीनामा आहे हे कसं ताडलं यामागचं गुपितही सांगून टाका जमलं तर!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गायकवाडचा इंग्लिशमध्ये लिहिलेला माफीनामा समजलेला नाही याचीच ही कबुली दिसतेय (अर्थात इंग्लिशमध्ये लिहिलेल्या माफीनाम्यात काय लिहिलंय ते गायकवाडला सुद्धा समजलं नसणारच. त्याने ते पत्र नुसतं वाचून दाखविलं.). म्हणून तर भाषांतर टाकायला खळखळ करताय.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला कळाला आहे ना अर्थ मग माफी या अर्थाचा शब्द (आणि तेही एअर इंडियाला उद्देशून) दाखवून द्या की! नसेल कळला तर तसे सांगा लगेच टाकतो भाषांतर, कशाला खळखळ करताय?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गायकवाडने स्वतःच्याच तोंडाने लोकसभेत माफी मागितली आहे. भाषांतर तुम्हाला समजलेले नाही ते दिसतेच आहे. म्हणून तर इथे भाषांतर टाकायला खळखळ सुरू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विषयांतर करू नका, वरचे सगळे प्रतिसाद परत वाचा आणि स्पष्टपणाने सांगा कि कुठे एअरइंडियाची माफी मागितली आहे. तुम्ही पत्राचा संदर्भ दिलात, मला कळत नाही विचारत आहात तर दाखवा ना माफी शब्द. आता संसदेत संसदेची कुठे प्रतिमा हनन झाली असेल तर त्याबद्दल मागितलेल्या माफीचा संदर्भ इथे कशाला देत आहात? कुठे माफी मागितली याला संसदेत असं उत्तर न देता तुम्ही वरच्या पत्राचा संदर्भ दिलात. मग माफी शब्द दाखवायला एवढी खळखळ का करत आहात? तात्पुरतं मला इंग्रजी येत नाही हे गृहीत धरलंत तरी माझी काहीच हरकत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच लिहिलं आहे की "शिवाय लोकसभेतलं निवेदन बघून घ्या लगेहाथ, अर्थात फरक काही पडणार नाही म्हणा. हे भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार वगैरे काही नसून भाजप विरुद्ध शिवसेना आहे हे वर आलेलेच आहे." गायकवाडने लोकसभेतच माफी मागितली आहे. भाषांतर टाकायला एवढी खळखळ का?

In reply to by श्रीगुरुजी

दुसरं म्हणजे जेव्हा एका वार्ताहराने गायकवाडला विचारलं की केलेल्या कृत्याचा तुम्हाला पश्चापात होतो का, तेव्हा गायकवाडने अत्यंत गुर्मीत उत्तर दिलं होतं की "पश्चाताप? काहेका पश्चाताप?". त्यानंतर विमानप्रवासबंदी करून गायकवाडच्या ** आवळल्या गेल्यावर तो भानावर आला व नंतर लोकसभेत माफी मागून वर लेखी निवेदन पण दिलं. ते जाऊ देत. भाषांतर कधी टाकताय?

In reply to by श्रीगुरुजी

गायकवाडच्या ** आवळल्या गेल्यावर तो भानावर आला >> हीच काय ती सुसंस्कृत भाषा जी नसली तर मिपा हे सुसंस्कृत लोकांचे संस्थळ आहे असा समज रसातळाला जाईल असे इथे कढ काढले जातात? ह्या धाग्याकडे वाचक लक्ष देत नसतील, संपादकही देणार नाहीत असे वाटते... चालुद्या...!

In reply to by संदीप डांगे

काय उपयोग नाही. सगळ्यात बेस्ट आयडीया. तीन धागे काढून द्यावेत. एक शिवसेनेला शिव्या, दुसरा केजरीवालना शिव्या आणि जमलेच तर मोदीकाकांना सूचना. रोज घाला म्हणाव रतीब. ना रहेगा संपादन, ना रहेगा विरोधी मत, ना होगी चर्चा

In reply to by अभ्या..

फक्त ३ धाग्यांनी काय होणार? भाजपला शिव्या द्यायला पण एक धागा पाहिजे. गेलाबाजार शेतकर्‍यांविषयी पण एक वेगळा धागा हवा.

In reply to by श्रीगुरुजी

गेलाबाजार शेतकर्‍यांविषयी पण एक वेगळा धागा हवा.
नै नै. आता शेतकरी "भिक नको पण कुत्रे आवर" ह्या मनस्थितीला आले आहेत. राहु द्या ते.

In reply to by अभ्या..

इथे साफसफाई झालेली दिसते. संदिप डांगेंनी स्वत: विषयी सांगितलेली माहिती (आणि / किंवा महती) "त्यांच्या स्वतःच्या तोंडातून शेणाचे गोळेच बाहेर पडतात.." अशा अर्थाचा प्रतिसाद उडण्याचे कारण नव्हते. असो.. माझा मूळ आक्षेप गुरूजींच्या प्रतिसादाला आहे, गुरूजींनी अशी भाषा वापरून शेण स्पेशलिस्ट सदस्यांची बरोबरी करू नये, असे सुचवतो.

In reply to by मोदक

प्रशासनाचे मित्र, सवंगडी असल्याचा गैरफायदा दिसत आहे. मित्र म्हणून असले ट्रोल्स चालवून घ्यायची प्रशासनाची मजबुरी समजू शकतो, मिपाप्रशासं इतक्या हलक्या दर्जाचे असेल असे वाटले नव्हते. पण प्रत्यय आलाच....शेवटी. कितीही तक्रारी करा ट्रोलिंग च्या, मिपाप्रशासनाच्या मित्रांना इथे पूर्ण संरक्षण आहे हो.......

एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अश्वनी लोहानी यांची आमच्यापुढे औकात काय असा निर्लज्ज प्रश्न शिवसेनेने विचारला. त्यांची औकात काय? बरोबर आहे त्यांनी कधी गुंडगिरी केली नाही, मवालीपणा केला नाही, खंडण्या गोळा केल्या नाहीत की सत्तेची मस्ती कधी दाखवली नाही. तर त्यांनी काय केले? तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटालर्जिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या चार इंजिनिअरींग पदव्या (त्यातील काही ए.एम.आय.ई मधून) मिळवल्या. राजस्थानात रेवडी येथे जुन्या स्टीम इंजिन लोकोशेडला हेरीटेज लोकोशेड म्हणून नावलौकिक मिळवून दिला, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये असताना मध्य प्रदेशातील हेरिटेज वास्तूंचे संवर्धन आणि जतन केले, २००२-०३ मध्ये गाळात गेलेल्या इंडिअन टुरिझम डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनला जुना नावलौकिक प्राप्त करून दिला, मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन मंत्रालयात सचिवपदी असताना मध्य प्रदेशला देशातील पर्यटनासाठी त्या वर्षाचे देशातील 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' असे पारितोषिक मिळाले. गाळात गेलेल्या संस्थांचा 'टर्न-अराऊंड' करून दिल्याचा त्यांचा नावलौकिक लक्षात घेता मोदी सरकारने त्यांची गाळात गेलेल्या एअर इंडियाचा 'टर्न-अराऊंड' करायला नियुक्ती एअर इंडियामध्ये केली. याविषयी अधिक इथे. अर्थात पेंग्विनसेनेच्या समर्थकांना हे सगळे समजेल असे वाटत नाही आणि असल्या गुडघ्यातल्या पक्षाच्या समर्थकांना हे समजेल अशी अपेक्षाही नाही. जर का असले गुंड प्रवृत्तीचे हलकट लोक आणि त्यांचे समर्थक एखाद्यावर टिका करत असतील तर तो माणूस नक्कीच चांगला असणार यात शंका नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

संपला का काही लोकांचा नाहीतर सात्विक संताप असा एक वेगळा विभाग मिपा वर काढावा हे मिपा प्रशासनाला सुचवतो ह्या ठिकाणी .

In reply to by गॅरी ट्रुमन

जर का असले गुंड प्रवृत्तीचे हलकट लोक आणि त्यांचे समर्थक एखाद्यावर टिका करत असतील तर तो माणूस नक्कीच चांगला असणार यात शंका नाही. == सहमत ! अनेक ठिकाणी नाक घासून माफी मागितल्यानंतर ह्या चप्पलमार खासदाराची विमानप्रवास बंदी मागे घेतली एअर इंडीयाने. कॅमेर्‍या समोर २५ वेळा चप्पलने मारले असे म्हणनारा खासदार, कलम ३०८ चा गुन्हा दाखल झाल्यावर आपण त्या कर्मचार्‍याला फक्त ढकलले असे घुमजाव करतो आणि ह्या पक्षाचे समर्थक अश्या खासदाराची विमान प्रवास बंदी हटवली म्हणून आनंदोत्सव साजरा करतायत.

In reply to by प्रसाद_१९८२

बाकी ह्या प्रकारामुळे रविंद्र गायकवाड ह्यांना भारतीय मिडियाने "चप्पलमार सांसद", "जुतामार सांसद" व "सँडलमार सांसद" ह्या तीन सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले, ह्या बद्दल शिवसेना व त्यांच्या समर्थकांचे हार्दिक अभिनंदन. :))

In reply to by प्रसाद_१९८२

अनेक ठिकाणी नाक घासून माफी मागितल्यानंतर ह्या चप्पलमार खासदाराची विमानप्रवास बंदी मागे घेतली एअर इंडीयाने.
याचा काही संदर्भ असेल तर द्याल का?

In reply to by गॅरी ट्रुमन

यांची आमच्यापुढे औकात काय असा निर्लज्ज प्रश्न शिवसेनेने विचारला.
या बातमीत संदर्भ दिलेली पूर्ण पत्रकार परिषद पहिली, तुम्ही म्हणता तसा उल्लेख सापडला नाही. दुसरा कुठला संदर्भ असला तर द्याल का प्लिज? शिवसेनेने असे वक्त्यव्य सीएमडी बाबत असे वक्त्यव्य केले असेल तर ते निषेधर्ह्यच आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गुगल करणे मला जमत असल्यामुळे हे मी अर्थातच केलेले आहे. वरील लिंक मध्ये आलेल्या बातम्यांपैकी वरच्या दोन तीन बातम्या सोडल्या तर खालच्या बातम्या नक्कीच या प्रकरणाशी निगडित नाहीत. वरच्या ज्या आहेत त्यात ज्या पत्रकारपरिषदेचा हवाला देऊन हि बातमी देण्यात येत आहे तो पूर्ण विडिओ पहिला, वरील वाक्य आढळले नाही. माझ्याकडून अनावधानाने वाक्य ऐकायचे राहून गेले असल्यास तुम्ही विडिओ पाहून सांगितल्यास चालेल. मी आधीच म्हटले आहे, असे वाक्य आले असल्यास ते निषेधार्ह्य आहेच, पण ते वाक्य म्हटले आहे का हेही तितकेच महत्वाचे आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पण ते वाक्य म्हटले आहे का हेही तितकेच महत्वाचे आहे.
आतापर्यंत वेगवेगळ्या वेबसाईटवर याच बातम्या येत आहेत. तसेच आपण असे काही बोललो नव्हतो असे संजय राऊतांकडून खंडनही आलेले नाही. कालपरवाच स्वतः रविंद्र गायकवाडांनी त्यांनी ७ वेळा एअर इंडियाचे तिकिट काढायचा प्रयत्न केल्याच्या मिडियामध्ये आलेल्या बातम्या खोट्या होत्या असे म्हटले . तशाप्रकारचे काहीही स्पष्टीकरणही संजय राऊतांकडून आलेले नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

तसे खंडन होईपर्यंत वाट बघायची गरज नसावीच बहुतेक? तिकीट बुक करण्याच्या बातमीचा पण असाच मुद्दा घाईघाईने सिद्ध करण्यासाठी वापर केला गेला आहेच वर. असो, माध्यमांवर अंधपणाने मलातरी विश्वास ठेवावा वाटत नाही. बातमीची खात्री नको का करायला?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

या व्हिडीओमध्ये २ मिनिटे १५ सेकंद ते २ मिनिटे २०-२२ सेकंदादरम्यान संजय राऊत म्हणत आहेत की एअर इंडियाच्या सी.एम.डी ने सोशल मिडियावर खासदार गायकवाडांचा अपमान केला. त्यावर संजय राऊत "औकात" काढत आहेत. एअर इंडियाच्या सी.एम.डी ने नक्की कोणता व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला आहे तो इथे दिल्यास अधिक चर्चा करता येईल. शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता त्यांच्या मान-अपमान यांच्या व्याख्या सामान्य जनतेच्या व्याख्यांप्रमाणे असतील असे वाटत नाही. म्हणजे कोणालाही विमान अडवून ठेवायचा, मारहाण करायचा अधिकार नाही मग भले तो खासदार का असेना असे म्हटले तरी शिवसेनावाले त्याला अपमान समजतील इतपत खात्री शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड बघता वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

बाळासाहेबांच्या निधनानंतर एका मुलीने मुंबईत बंद पाळण्याची गरज काय अशा अर्थाचे चेपुवर पोस्ट लिहिले होते. त्या पोस्टला तिच्या मैत्रिणीने लाईक केले होते. त्या दोन वाक्यांवरून सेनेच्या गुंडांनी त्या दोघींविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली व तिच्या काकांच्या नर्सिंग होमची नासधूस केली. या मूर्खपणाच्या कृत्याबद्दल न्यायाधीशांना पोलिसांविरूद्ध कडक ताशेरे ओढून ती फिर्याद रद्द करायला लावली. त्या दोघी महाविद्यालयीन मुली या गुंडगिरीमुळे इतक्या घाबरल्या की त्यांनी मुंबई सोडून गुजरातमध्ये स्थलांतर केले. असल्या पोस्ट ज्यांना स्वतःचा अपमान वाटतो त्या लोकांच्या मानापमानाच्या कल्पना किती क्षुद्र असतील याची कल्पना येते. दुसरं म्हणजे एअर इंडियाच्या सी.एम.डी. कडे सोशल मिडियावर जाऊन गायकवाडांचा अपमान वगैरे करण्यासाठी फालतू रिकामा वेळ असेल का आणि गायकवाड हा माणूस त्यांच्या खिजगणतीत तरी असेल का?

In reply to by गॅरी ट्रुमन

धन्यवाद! अपेक्षेप्रमाणेच हवे तसे वाक्य तोडून गोंधळ घालण्यात आलेला आहे. आता ही खोडच झाली आहे माध्यमांची म्हणा. आणि त्याचा वापर करणारे समर्थक मग त्याचा हवा तसा वापर करतात. "कौन है ये एअरइंडिया, कौन है सीएमडी, क्या इनकी औकात है जो सदन चल रहा है और एक संसद के बरे मी अपमानास्पद पोस्ट सोशल मीडिया पे डाल रहे है" असे ते वाक्य आहे. आता "जर" राऊत म्हणतात तशी कुठली पोस्ट जर सीएमडींनी टाकली असेल तर ती काय टाकली आहे, खरच आक्षेपार्ह्य आहे का त्यात काही वगैरे जाणून घेण्याची अजिबात गरज वाटत नाही. लगेच सीएमडींना सहानुभूती, त्यांचा बायोडेटा आणि शिवसेनेला शिव्या. वरील वाक्य "कौन है सीएमडी जो सांसद पे बंदी लगा रहा है" असे म्हटल्याच्या थाटात ते नाचवयाचे. पूर्वग्रहादोषापेक्षा काय वेगळे म्हणावे याला?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

>>> आता "जर" राऊत म्हणतात तशी कुठली पोस्ट जर सीएमडींनी टाकली असेल तर ती काय टाकली आहे, खरच आक्षेपार्ह्य आहे का त्यात काही वगैरे जाणून घेण्याची अजिबात गरज वाटत नाही. लगेच सीएमडींना सहानुभूती, त्यांचा बायोडेटा आणि शिवसेनेला शिव्या राऊत म्हणतोय याचा अर्थ ते खोटंच असणार. नसेल तर "योग्य" वेळी (म्हणजे कधीच नाही) राऊत ते उघड करेलच.

In reply to by श्रीगुरुजी

परत एक फार्सीकल आणि पूर्वग्रहदोषीत विधान! इतर वेळेस हव्या त्या लिंका शोधाता येतात, पण नको असल्या कि राऊतांनी उघड करायची वाट बघावी लागते.

In reply to by श्रीगुरुजी

राऊत कसे आहेत याबद्दल एक वेगळा धागा होऊ शकेल. कदाचित त्या धाग्यावर मी तुमच्या बाजूच असेल. सध्यातरी हे विषयांतर आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

"जर" राऊत म्हणतात तशी कुठली पोस्ट जर सीएमडींनी टाकली असेल तर ती काय टाकली आहे, खरच आक्षेपार्ह्य आहे का त्यात काही वगैरे जाणून घेण्याची अजिबात गरज वाटत नाही. लगेच सीएमडींना सहानुभूती, त्यांचा बायोडेटा आणि शिवसेनेला शिव्या.
याचे कारण शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड. जर परीसरात कुठली गुंडगिरीची घटना घडली तर पहिला संशय त्याच भागातील अट्टल गुंडावरच येतो. त्याचप्रमाणे जर कुठेही दहशतवादाशी संबंधित घटना घडली तर पहिला संशय पाकिस्तानवरच येतो. तसेच काही कारणाने तणाव निर्माण झाल्यास परिसरातल्या गुंडांना ते भविष्यात कासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नयेत म्हणून तडीपारही केले जाते. ही अगदी कायद्याला मान्य आहे अशीच प्रक्रीया आहे. त्यामुळे मारहाण वगैरे काही घटना घडल्यास ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट आहे त्यांच्यावरच त्यात त्यांचा काहीही संबंध नाही हे सिध्द करायची जबाबदारी येते. आता याला पूर्वग्रहदूषितपणा म्हणत असाल तर खुषाल म्हणा. आय डोन्ट गीव्ह अ डॅम!! या चर्चेत मला मांडायचे होते ते सगळे मुद्दे मांडून झाले आहेत. आता यापुढे या चर्चेला माझ्याकडून पूर्णविराम. यापुढे या चर्चेतील प्रतिसादही मी उघडून बघणार नाही. धन्यवाद.

In reply to by गॅरी ट्रुमन

एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अश्वनी लोहानी यांची आमच्यापुढे औकात काय असा निर्लज्ज प्रश्न शिवसेनेने विचारला. त्यांची औकात काय? बरोबर आहे त्यांनी कधी गुंडगिरी केली नाही, मवालीपणा केला नाही, खंडण्या गोळा केल्या नाहीत की सत्तेची मस्ती कधी दाखवली नाही. तर त्यांनी काय केले? तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटालर्जिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या चार इंजिनिअरींग पदव्या (त्यातील काही ए.एम.आय.ई मधून) मिळवल्या. राजस्थानात रेवडी येथे जुन्या स्टीम इंजिन लोकोशेडला हेरीटेज लोकोशेड म्हणून नावलौकिक मिळवून दिला, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये असताना मध्य प्रदेशातील हेरिटेज वास्तूंचे संवर्धन आणि जतन केले, २००२-०३ मध्ये गाळात गेलेल्या इंडिअन टुरिझम डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनला जुना नावलौकिक प्राप्त करून दिला, मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन मंत्रालयात सचिवपदी असताना मध्य प्रदेशला देशातील पर्यटनासाठी त्या वर्षाचे देशातील 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' असे पारितोषिक मिळाले. गाळात गेलेल्या संस्थांचा 'टर्न-अराऊंड' करून दिल्याचा त्यांचा नावलौकिक लक्षात घेता मोदी सरकारने त्यांची गाळात गेलेल्या एअर इंडियाचा 'टर्न-अराऊंड' करायला नियुक्ती एअर इंडियामध्ये केली.
हा परिच्छेद सगळीकडे फिरतोय व्हॉट्सअपवरून. =)) अजून काय पाहिजे क्लिंटन भौ, आता तरी धीराने घ्या !! :)

In reply to by किसन शिंदे

हा परिच्छेद सगळीकडे फिरतोय व्हॉट्सअपवरून. =))
अरे एवढ्यात फिरायलाही लागला? दोन-अडीचच तास झाले आहेत हे लिहून!! म्हणजे आपले मिपा वाचून काही जण व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश फॉरवर्ड करतात असे दिसते. मागे एकदा मीच लिहिलेला कुठलातरी प्रतिसाद एका फेसबुकच्या ग्रुपवर वाचला होता. आणि एकदा आमच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कोणीतरी फॉरवर्डही केला होता :)

In reply to by शार्दुल_हातोळकर

इथे स्क्रिनशॉट पेस्ट करता का जरा? शिवसेनेने त्यांची औकात काढल्यानंतर माझ्यासारख्या अनेकांनी रेडिफ किंवा अन्य कुठली ती लिंक बघून या स्वरूपाचे मुद्दे लिहिले असणे सहज शक्य आहे. पण तुम्ही म्हणत आहात की "कालच पाहिला होता हा मेसेज" यातून मी तो मेसेज इथे पेस्ट केला आहे असे ध्वनित होत आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

माफ करा. इथे थोडीशी गल्लत झाली माझी. तुमच्या प्रतिसादाची वेळ आणि तारीख मी पाहिली नव्हती, ती तुमच्या प्रतिसादानंतर पाहिली. मला वाटलं तुम्ही दिलेला प्रतिसादच व्हॉट्सअपवर फिरतोय सगळीकडे. पण तो थोडा वेगळा आहे. अगदी असाच्या असाच नाही, पण वाक्य हीच, पण थोडी फार आलटून पालटून टाकलेली, संपूर्ण आशयही असाच. तो मॅसेज आमच्या ऑफिसच्या ग्रुपवर एकाने काल दुपारी टाकला होता.

In reply to by किसन शिंदे

इथे थोडीशी गल्लत झाली माझी.
ठिक आहे. तरीही तुम्हीही इथे स्क्रिनशॉट टाकाच असे म्हणतो. मुद्दे एकच असणे सहज शक्य आहे कारण संदर्भ एकच असेल आणि लोहानींनी आय.टी.डी.सी, मध्य प्रदेश टी.डी.सी इत्यादी त्याच ४-६ संस्थांमध्ये काम केले असेल तर त्याचा उल्लेख एकच संदर्भ वापरल्यावर येणे सहज शक्य आहे. आणि त्यामुळे वाक्येही आलटून पालटून टाकलेली वाटू शकतात. याचा अर्थ मी तो प्रतिसाद कॉपी करून इथे लिहिला आहे असे अजिबात नाही. मी माझ्या प्रतिसादात रेडिफच्या त्या लेखाचा संदर्भही दिला होता. तो संदर्भही व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणार्‍या त्या लेखात दिला असेल की नाही शंकाच आहे. बहुसंख्य व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसमध्ये संदर्भ वगैरे दिले जात नाहीत. मी मिपावर आजपर्यंत कधीही इतर कोणाची आयडीया संदर्भ न देता माझी म्हणून खपविलेली नाही. दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ दे. मी शैक्षणिक वर्तुळात वावरत असल्यामुळे प्लेजिअ‍ॅरिझम हा गुन्हा आहे हे मला माहित आहे आणि मी प्लेजिअ‍ॅरीझम केले आहे असे कोणाला वाटायला नको. आणि स्क्रिनशॉट टाकता येणे शक्य नसल्यास तो प्रतिसाद व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असल्याच्या संदर्भातले सगळे प्रतिसाद काढून टाकावेत ही संपादकांना विनंती.

In reply to by गॅरी ट्रुमन

मी जे कॉपी पेस्ट बद्दल लिहिले आहे, ते whatsapp वरील मेसेजच्या आशयासंदर्भात आहे. आणि त्यातही केवळ अधिकाऱ्याचीच भलामण केल्याचा संदर्भ होता. तुम्ही कॉपी पेस्ट करुन टाकल्याचे आम्ही कुठेही म्हटलेले नाही. "हा" मेसेज म्हणजे अशा आशयाचा मेसेज असे मला म्हणायचे होते. दुसरे म्हणजे तुम्ही जे प्रतिसाद वगळण्याची संपादकांना विनंती करत आहात, त्या न्यायाने या धाग्यावरील आक्षेपार्ह गलिच्छ भाषा वापरलेले आणि वैयक्तिक हल्ले असलेले भरमसाट प्रतिसाद उडवावे लागतील. जे मी सुरुवातीपासुन नमुद केले आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

इथे स्क्रिनशॉट देण्याची पद्धत मला पाहावी लागेल. विकिपेडिया च्या पानावरील मजकुराचे सरळ साधे भाषांतर आहे ते. लिंक खालीलप्रमाणे आहे. कोणीतरी तिथुन कॉपी पेस्ट करुन मेसेज टाकला आहे हे काल पाहताक्षणीच लक्षात आले, कारण मी लगेच गुगल वर सर्च केले होते. https://en.m.wikipedia.org/wiki/Ashwani_Lohani

In reply to by अत्रे

अवांतर प्रश्न - ट्रुमन यांचे दुसरे नाव क्लिंटन आहे का?
नाही. क्लिंटन यांचे दुसरे नाव ट्रुमन आहे :) मी पूर्वाश्रमीचा क्लिंटन आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी हिलरी क्लिंटन निवडणुक लढविणार हे थोडेफार स्पष्ट झाल्यावर २०१५ मध्येच मी हा नवा आय.डी घेतला. कारण माझा हिलरींना विरोध होता आणि "क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा" वगैरे मुद्दे येऊ नयेत म्हणून नवा आय.डी घेतला :)