Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95930
प्रतिक्रिया 592

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

गायकवाड माध्यमांना टाळण्यासाठीच लपून आहेत.
वरचा प्रतिसाद नीट वाचा.
म्हणून तर गायकवाडांच्या मारहाणीचं उघड समर्थन करता येत नाहीय्ये.
म्हणजे सगळ्यांनी (शिवसेनेसकट) या मारहाणीचा समर्थन करावं अशी अपेक्षा होती कि काय? अहो मारहाणीचा समर्थन करण्याचा प्रश्नच कुठे येतो, तो गुन्हा आहे आणि त्यावर केस चालू आहे. तसाच गुन्हा समोरच्या बाजूवर हि दाखल आहे. कोर्ट ठरवेल ना पुढचं. बाकी ते वेलमध्ये घुसणं, अध्यक्ष्यानी खडसावण वगैरे लोकसभेतल्या रोजच्या गोष्टी आहेत. दहा वर्ष भाजप तेच करत होते आणि त्याआधी इतर विरोधीही तेच करत होते, मग मुद्दा कसलाही असो. खासदारांना सक्तमजुरी व्हावी कि अजून काही हे कोर्ट ठरवतं आणि सुदैवाने कोर्ट कुणाच्या आकसयुक्त भावना लक्षात घेत नाही. त्या तशा घेतल्या गेल्या असत्या तर आकस असणाऱ्या लोकांनी सक्तमजुरीची नाही तर या प्रकरणात फाशीचीही मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

शिवसेना आपल्या प्रत्येक कृतीचे समर्थन करते. पूर्वी बाळासाहेब ठाकरे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करण्यासाठी संभाजीनगरला गेले असताता एका स्थानिक उर्दू दैनिकाने "बाल ठाकरेका औरंगाबादमे ठंडा स्वागत" अशी बातमी दिली होती. त्यामुळे संतापून दुसर्‍या दिवशी पत्रकार परीषदेत शूर शिवसैनिकांनी त्या वृत्तपत्राच्या बातमीदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून (त्याच्या गुप्तांगावर सुद्धा लाथा मारल्या होत्या) जबर जखमी केले होते. त्या मारहाणीचे बाळासाहेबांसकट सर्वांनी समर्थन केले होते. या प्रकरणात संपूर्ण चूक गायकवाडांचीच असल्याने शिवसेनेला मारहाणीचे समर्थन करणे अशक्य झाले आहे.

In reply to by अनुप ढेरे

तो बंद कधीच संपला. सध्या गायकवाडांचे सार्वजनिक दर्शन बंद आहे आणि त्यांचा सर्व वर्गातील विमानप्रवास बंद आहे.

वरुन आठवले आमच्या भागातली अपेयपानाची दुकाने बंद झाली आहेत .. विकांताची सोय कशी करणार ह्या विचारात आहे देश

मोदक,
काय ठरले मग..?
यासंबंधी माझं आकलन सांगतो. प्रा. गायकवाडांची प्रमुख चूक म्हणजे त्यांची शक्ती कमी पडली. सध्यातरी एअर इंडिया गायकवाडांहून बलिष्ठ दिसते आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण करू नये अशा मताचा मी आहे. मात्र यापुढे जर कोणावर अशी वेळ आली तर एअर इंडियाच्या संदर्भात आपले बलाबल जाणून असणे अत्यंत जरुरीचे आहे. हे बलाबल कसे जोखावे ते मला थेटपणे ठाऊक नाही. मात्र अंदाज लावता येतो. जर एखाद्या मंत्र्याला थोबाडून काढायची आपली औकात असेल तर एअर इंडियाचे बळ आपल्याहून कमी आहे असे खुशाल धरून चालावे. हा माझा केवळ अंदाज आहे. माझा सल्ला स्वत:च्या जबाबदारीवर वापरावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी माझे आकलन सांगू का..? गायकवाड किती वेळा पुणे-दिल्ली करतात आणि किती वेळा मुंबई-दिल्ली करतात ते पाहिले पाहिजे. कारण त्या फ्लाईट अटेंडंटचा चेहरा लपवलेला एक व्हिडीओ आहे ज्यात ती सांगत आहे की "फर्स्ट क्लास शीटा पुणे-दिल्ली रूटवर नसतात" त्यामुळे असे असेलच तर हा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आलेला नाही. (मला तो व्हिडीओ नंतर सापडलेला नाही - मी गंभीरपणे शोधलेलाही नाही, कोणी शोधून देणार असेल तर आगाऊ धन्यवाद देतो) गायकवाडांनी मुंबई-दिल्ली सारखी पुणे-दिल्ली प्रवासाची अपेक्षा केली असेल. पुणे-दिल्ली फर्स्ट क्लासच्या शीटा नसलेले विमान आहे हे त्यांना आधी कळवले असेल तर त्यातून जाणे आणि नंतर CMD ला बोलवा अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे यात कोणताही संदेह नाही. विमान रोखून धरणे तर निव्वळ वेडेपणा आहे. एक विमान असे विनाकारण अडकून राहणे - ते पण फालतू कारणांमुळे, याचे किती काय काय प्रमाणात परिणाम होतात आणि किती पटीत नुकसान होते याची माहिती नेते साहेबांना असणे अपेक्षित असले तरी ती माहिती असेलच असे नाही. त्यातून ते पडले खळ्ळ-खट्ट्याक परंपरेतले. त्यामुळे "ठासून सांगण्याच्या नादात" नेहमीप्रमाणे राडा केला गेला. यात सुकुमार यांच्या वागणुकीची भर पडली असावी. (सुकुमार यांनी उद्धटपणा केला आहे असे त्यांचीच सहकारी म्हणत आहे) गायकवाडांनी या प्रकरणाला खूपच हलके घेत, "२५ वेळा मारले" "स्लीपरने मारले" वगैरे बढाया मारल्या त्यामुळे हे प्रकरण असेच पेटत राहिले आहे, त्यात सेनेचे विद्वान टीव्हीवर चर्चेमध्ये जाऊन "निदान एअर होस्टेसला तर मारले नाही" असे तारे तोडत आहेत. (देव त्यांचे भले करो) या भानगडीत सेनेचे नाक चेचण्याची संधी सहज न सोडणार्‍या भाजपाकडे करण्यासारखे फारसे शिल्लक राहिले नाहीये. अर्थात एअर इंडीयाला / स्टाफला भाजपाने मदत केली तरी आता त्याला सेनाविरोधाची झालर नसेल. उलट भाजपा पडद्याआडून सुत्रे हलवत असेल. यात १००% बरोबर बाजू कुणाचीच नाही. गायकवाडांनी अडेलतट्टूपणा करून सुरूवात केली आणि त्यात त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे आणखी गाळात रूतले आहेत व सुकुमार यांचे उद्धट वागणे साईडलाईन झाले आहे. ..आता तर काय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आई भवानी त्यांना आणखी संकटे सोसण्याचे बळ देवो. एकूण काय... म्हशीला औषधाचा गोळा नळीतून देताना नेमकी म्हशीने दुसरीकडून (ठासून) फुंकर मारलेली आहे. =))

In reply to by मोदक

मोदक, तुमचं मत सांगितल्याबद्दल धन्यवाद! :-) तुम्हाला हवं असलेलं चेहरा धूसर केलेलं चलचित्र सापडत नाहीये. मात्र संबंधित बातमी इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-dont-think-he-wante… प्रा. गायकवाडांचा आक्षेप व्यवसायवर्ग का नव्हता असा नसून त्याची आगाऊ माहिती का दिली गेली नाही असा आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की प्रा. गायकवाडांनी तक्रारपुस्तिकेत लिहिलेली तक्रार नेमकी काय आहे ते माध्यमं का उघड करंत नाहीयेत? शिवाय चेहरा धूसर केलेलं चलचित्रही हटवण्यात असेलं दिसतंय. बहुधा गायकवाडांच्या बदनामीमध्ये जास्त रस आहेसं दिसतंय. भरीस भर म्हणून गायकवाडांवर सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल झालाय. पण तरीही त्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला नाहीये. एकंदरीत गोंधळ वाढतोय. माध्यमांचं वर्तन (नेहमीप्रमाणे) शंकास्पद आहेच. आ.न., -गा.पै.

________________________________________________________________ हे पहा खासदारांची मुजोरी मोडून काढून त्यांना थेट शिंगावर घेणारे एअर इंडियाचे प्रमुख अश्वानी लोहानी. २०१५ मध्ये त्यांनी तिरूपती विमानतळावर विमानतळ व्यवस्थापकाच्या कानाखाली मारणार्‍या काँग्रेसच्या खासदार मिथुन रेड्डींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायला लावली होती. गायकवाडांच्या प्रकरणात सुद्धा ते खासदारांच्या गुंडगिरीला न घाबरता आपल्या कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

करेक्शन पाहिजे वर - गायकवाडांच्या प्रकरणात सुद्धा ते खासदारांच्या गुंडगिरीला न घाबरता आपल्या कर्मचार्‍यांच्या उद्दामपणाच्या पाठीशी उभे आहेत. इथून पुढेही त्यांनी हाच पॅटर्न लागू करावा का? दोनच पर्याय ठेवायचे का? - १. कोणी तक्रार केली कि अरेरावी करायची, शिवीगाळ करायची, मग त्याचे पर्यवसन भांडणात झाले कि मग बंदी घालायची. किंवा २. कोणी तक्रार केली कि खोपच्यात घ्यायचा आणि कोणालाही ना कळू देता तोंड फुटेपर्यंत मारायचा. सेवा सुधारण्यात लक्ष द्यायला नको का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

कर्मचार्‍याचा कसला उद्दामपणा? एक माणूस मूर्खपणाची मागणी करत विमानातून उतरायला नकार देऊन विमानात बसून राहतो व इतरांचा खोळंबा करतो. त्याला उतरायला सांगितल्यावर कर्मचार्‍याला चपलेने मारहाण करून विमानातून ढकलून द्यायचा प्रयत्न करतो. नंतर कॅमेर्‍यासमोर अभिमानाने आपले कर्तृत्व सांगतो आणि ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे अशा फुशारक्या मारतो. त्याचे वागणे योग्य आणि कर्मचारी उद्दाम!!!! सेवा सुधारण्यात जरूर लक्ष द्यायला हवे. परंतु व्यवसाय वर्गाची सुविधा नसलेल्या विमानात व्यवसाय वर्गाची मागणी करणे म्हणजे शुद्ध शाकाहारी भोजनालयात मटण थाळी ची सेवा का नाही अशी तक्रार करून वेटरला बदडण्यासारखे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला हवं ते वाक्य बरोबर गाळता! कर्मचाऱ्याने उतरायला सांगितल्यावर नाही, कर्मचाऱ्याने अरेरावी करून उद्दामपणाने काहीतरी बोलल्याने "मारा एक" असे आहे ते. बाकी शुद्ध शाकाहारी हॉटेलने मटन थाळी चे कुपन विकायचे कशाला मग? मग विचारल्यावर चलंय तुला वेज खायचे तर खा नाहीतर हो बाहेर, उतरला नाहीस आत नेऊन तोंड फुटेपर्यंत मारेन म्हटल्यावर भांडण होणार नाही का? आणि हो हॉटेलचा विषय काढलाच आहे तर, असं एका हॉटेलच्या वेटरशी भांडण झाल्यावर शहरातल्या सगळ्याच हॉटेल्सनी बंदी घालणं योग्य वाटतं ना?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

इथे फक्त शाकाहारी जेवण मिळत असताना व मटणथाळी पलीकडच्या गल्लीतल्या हाटेलात मिळत असताना, इथे येउन शाकाहारी भोजन चेपल्यानंतर कांगावा करण्यात काय अर्थ आहे? अशा गुंडावर शहरातल्या सगळ्याच हॉटेल्सनी बंदी घालणं योग्यच आहे.

गायकवाडांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हा वाद आता मिटला आहे. गायकवाडांनी स्वाभिमान दाखवून आता स्वतःच एअर इंडियावर बहिष्कार टाकला आहे. यातून एअर इंडियाला चांगलाच धडा मिळेल. इतर आमदार खासदारांनी देखील गायकवाडांचे अनुकरण करावे.

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्येक खासदाराला एक इमान आणि एक हेलीकेप्टर साठी सरकारी अनुदान द्यायला पैजे. उड़ा म्हणावे स्वखर्चाने. . बाकी जाउद्या गुरूजी आता, त्येन्चे ते उडले उगी तुम्ही लिबन्ध लिहित बसलाव. तेवढया शाईत एक विमान रंगले असते आख्खे.

In reply to by अत्रे

अपेक्षेप्रमाणे शिवसेना खासदारांनी लोकसभेत यथेच्छ धुडगूस घातला. इतके दिवस शांत असलेल्या अनंत गीतेंनी तर कहरच केला. ते चक्क विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर धावून गेले व त्यांची कॉलर धरायचा प्रयत्न केला असे सर्व वाहिन्यांवर (मराठी सुद्धा) सांगत होते. मराठी वृत्तपत्रांच्या आंतरजाल आवृत्तीतही असेच सांगितले आहे. या गीतेंना मंत्रीमंडळातून हाकलून लावावे अशी इच्छा आहे. मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. मुंबई विमानतळ यांच्या तीर्थरूपांचा असावा बहुतेक. आपल्या पक्षाच्या खासदाराच्या गुंडगिरीबद्दल व माजाबद्दल एक कणभरही शब्द नाही, खंत नाही आणि इतरांनाच धमक्या देताहेत. गायकवाडांनी तर एकापाठोपाठ एक षटकार मारले. म्हणे मी शिक्षक असून विनम्र स्वभावाचा आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला आपण २५ वेळा चपलेने मारले, भविष्यातही असेच मारू, ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नसून शिवसेनेचा आहे, मी कशाबद्दल माफी मागू अशी उन्मत्त मुक्ताफळे यांनी उधळलेली सर्वांनी पाहिलेली आहेत. ही यांची विनम्रता! म्हणे त्या कर्मचार्‍याने नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला म्हणून मी त्याला मारले. मोदींबद्दल एवढा आदर होता तर उधोजींनी मोदींचा उल्लेख अफझलखान असा करून त्यांचा बाप काढला होता. त्यावेळी उधोजींना यांनी किती चपला मारल्या? अर्थात एका थर्डक्लास पक्षाच्या थर्डक्लास खासदाराकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही. असले गावठी आणि उन्मत्त खासदार मराठी आहेत याची लाज वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

ते चक्क विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर धावून गेले व त्यांची कॉलर धरायचा प्रयत्न केला असे सर्व वाहिन्यांवर (मराठी सुद्धा) सांगत होते.
उत्तर प्रदेश विधानसभेत मागे माईक काढून एकमेकांवर फेकणे, खुर्च्या एकमेकांवर फेकणे असे प्रकार झाले होते. तसा प्रकार लोकसभेत झाला नाही आणि नुसते मंत्र्यांच्या अंगावर धावून जाण्यावरच थांबले ही काय कमी महत्वाची गोष्ट आहे का? :(
मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली.
गायकवाडांवरची बंदी मागे घेतली नाही तर मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. एअर इंडियाच्या एका कर्मचार्‍याबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर्व विमानकंपन्यांनी बंदी घालणे बरोबर नाही असे म्हणणार्‍यांची यावरील प्रतिक्रिया बघायला हवी. एका शिवसेना खासदाराला उडायला बंदी घातली म्हणून या घटनेशी काहीही संबंध नसलेल्या लाखो प्रवाशांना वेठीस धरणे समर्थनीय आहे का? बाय द वे, श्रीगुरूजी, आपल्याला शिवसेनेविरूध्द लिहिताना आखडता हात घ्यायला हवा. नाहीतर ते गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी द्यायचे की मिपावर शिवसेनेविरूध्द लिहून येते म्हणून आम्ही मिपा हे संकेतस्थळच चालू देणार नाही!!

In reply to by गॅरी ट्रुमन

एअर इंडियाच्या एका कर्मचार्‍याबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर्व विमानकंपन्यांनी बंदी घालणे बरोबर नाही असे म्हणणार्‍यांची यावरील प्रतिक्रिया बघायला हवी.
नाहींचाये ते बरोबर आणि हेच तर सुरुवातीपासून सांगणे आहेना? आता शिवसेना म्हणाली म्हणून अशा बंदीतली चुकीची बाजू समोर आली का?
बाय द वे, श्रीगुरूजी, आपल्याला शिवसेनेविरूध्द लिहिताना आखडता हात घ्यायला हवा. नाहीतर ते गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी द्यायचे की मिपावर शिवसेनेविरूध्द लिहून येते म्हणून आम्ही मिपा हे संकेतस्थळच चालू देणार नाही!!
बाकी हे मात्र अत्यंत अनपेक्षित आणि अकारण वाटलं! ह्या हिशेबाने साधारण सगळी माध्यमे आणि वृत्तपत्रे बंदच व्हायला हवी होती, नाही का?

In reply to by श्रीगुरुजी

या बातमीत लिहिल्याप्रमाणे, शिवसेनेच्या गायकवाड नावाच्या चप्पलमार खासदाराचा, उंदीर झालेला दिसतोय, "एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं." २५ वेळा चपलेने मारले असे कॅमेर्‍यासमोर फुशारक्या मारणार्‍या ह्या खासदारांने संसदेत तर सरळ-सरळ घूमजाव केले आहे. सध्याच्या शिवसेनेची हि सवयच झालेली दिसतेय, कॅमेर्‍यासमोर फुशारक्या मारायला एक बोलायचे व प्रकरण अंगाशी आल्यावर शेपुट घालायचे, पुर्वी बाळासाहेब त्यांनी मांडलेल्या विधानावर ठाम तरी असत पण सध्या फक्त बोलबच्चन लोकच उरलेत शिवसेनेत.

In reply to by श्रीगुरुजी

असले गावठी आणि उन्मत्त खासदार मराठी आहेत याची लाज वाटते.>>> ==>> त्या शिवसेनेच्या खासदारांचे जे होयचे ते होवो, मला त्याचे काय देणे घेणे नाही पण तुम्ही "गावठी" शब्द वापरून गाव आणि शहर यांच्यातल्या अमंगळ भेदभावाला खतपाणी घालत आपली वैचारिक दिवाळखरी मात्र सिद्ध केलीत. शहरी लोकांनी किती ही सभ्यपणाचा आव आणला तरी दुसऱ्यांना नीच दाखवण्यात कधीच कसर सोडत नाहीत. काही अपवाद सोडून. तसे ही शहरात गुंठा आणि फ्लॅट घेऊन राहणारे स्वतःला शहरी समजणारे कधी काळचे गावाकडचे उपरेच (गावठी?) आहेत हे सोयीस्करपणे विसरतात. असो...

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेनेचे खासदार एकत्र नाहीत आणि या गोष्टींवर गायकवाडांसोबत नाहीत हि तुमची अपेक्षा फोल ठरल्याबद्ल खेद वाटला. बाकी शिवसेनेच्या खासदारांना आणि मंत्र्यांना हाकलून द्यावा हा तुमचा आणि भाजपचा मत बर्राबर जुळता :):)

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मातोश्रीवरून दट्टया बसलेला दिसतोय, म्हणून तर आता गीते आणि इतर काही जणांनी तोंड उघडलेलं दिसतंय. अर्थात सेना खासदार संसदेत दांडगाई करून कांगावा करणार ही अपेक्षा अजिबात फोल ठरली नाही. ही बंदी तूर्तास तरी उठविली जाणार नाही असे एअर इंडियाने निर्णय घेतल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवित आहेत. एअर इंडियाचे अभिनंदन!

In reply to by श्रीगुरुजी

हाहाहा! चित भी मेरी पट भी मेरी! बाकी तुम्ही कुठले चॅनेल बघता माहित नाही. पण आताची ब्रेकिंग न्युज अशी दाखवत आहेत की जर हि बंदी १० तारखेच्या एनडीएच्या मिटिंग आधी उठवली नाही तर शिवसेना या मीटिंगमध्ये सहभागी होणार नाही या भूमिकेनंतर बंदी उठवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बंदी अजून उठविलेली नाही. मांजर उंदराला जसे खेळविते, तसा भाजप शिवसेनेला खेळवित आहे. संजय राउतांनी भुवया उंचावून गरागरा डोळे फिरवत बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या कितीही फुसक्या धमक्या दिल्या, तरी भाजप त्यांना कणभरही किंमत देणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

च्यामारी ही सगळी भाजपाची प्लान्ड गेम आहे होय? तरिच म्हणले....... (संपादित), लगेच कशी एक्टिव्हेट झाली. चालु दया चालु दया......

In reply to by अभ्या..

(संपादित).....
काय वेळ आली आहे. साहित्य संपादकांचे प्रतिसादही संपादित करावे लागत आहेत!!

In reply to by गॅरी ट्रुमन

संपादक साहित्याचा आहे हो, महापालिकेच्या उंदीरमार विभागात बसून ट्रम्प चुकलाच असल्या वांझोट्या चर्चेचा नाही. . जाऊ दे...ते साहित्य वगैरे तुमचा नाही विषय. तरीही फारच चिंता वगैरे वाटत असेल तर बेस्ट लक नेक्श्ट टैम. ;)

In reply to by श्रीगुरुजी

काही माध्यमांनी तर बंदी उठवली अशी बातमीही दाखवली आहे. आणि कसं आहे बरं का कोणी आज मांजर असतं कोणी उद्या, त्यात माज करण्यासारखं असं काही नाही. आणि कौतुक करण्यासारखं तर अजिबात नाही. बाकी भाजप खेळवायचा प्रयत्न करतेय हे मान्य केले हेही नसे थोडके. थोडक्यात काय या प्रकरणात दम काहीच नव्हता, भाजपला खेळायची लहर आली होती एवढेच. म्हणजे शिवसेनेचा राग योग्य आहे तर!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

शिव्यासेनेने स्वतःला खेळविण्याची स्वतःहून भाजपला संधी दिली. कायम मगरुरी व मूर्खपणा सुरु ठेवला की इतरांना काहीच प्रयत्न न करता संधी मिळते.

आय विश कि नुकतीच गोरक्षकांनी एकाची जी राजरोस हत्या केली त्याचाही आता अशीच हिरीरीने चर्चा, एवढा गिगाबायटी गूळ पाडून, एवढे शेकडो प्रतिसाद देऊन, परत परत तेच तेच लिहून, थयथयाट करून समाचार घेतल्या जाईल... आय जस्ट विश.,

In reply to by संदीप डांगे

मोदींनी यावर थेट भूमिका जाहीर केल्यावर अशा घटनांना चाप बसेल असं वाटलं होतं पण परत परत त्याच घटना घडत आहेत. पाठलाग करून पकडून देण्यापर्यंत ठीक आहे पण मारहाण हि निषेधार्ह्यच आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पाठलाग करून पकडून देण्यापर्यंत ठीक आहे पण मारहाण हि निषेधार्ह्यच आहे.
हप्र, एखाद्या गावगुंडांच्या टोळक्याने केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तिला पाठलाग करून पकडून देणे (जर गुन्हेगार रंगेहाथ गुन्हा करताना पकडला गेला नसेल) ठीक आहे? पोलिसांना बातमी देणे एक वेळ समजू शकतो जेणेकरून पोलिस तपास करतील पण पाठलाग करून पकडून देणे? नक्की कायद्याचेच राज्य अपेक्षीत आहे ना तुम्हाला?

In reply to by पुंबा

पोलिसांची एकूणच अवस्था आपण सर्व जाणतोच, त्यामुळे त्याबद्दल बोलणेच नको. गोहत्याबंदी असताना ट्रक भरून गायीबैल घेऊन जाणे हि संशयास्पद हालचाल गृहीत धरली जाऊ शकते. नुसतं पोलिसांना कळवून त्या हत्या थांबतीलच याची खात्री दिली जाऊ शकते का? त्यापेक्षा समजा पाठलाग करून ट्रक अडवून जर समजा पोलिसांना बोलावले आणि त्याचा कायद्याने सोक्षमोक्ष लावला तर त्यात चुकीचे काय? कायद्याला मदतच आहे ती! मारहाण समर्थनीय नाहीच हे वर मांडलेच आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आजिबात नाही. एखादा कायदा मोडला जात आहे हे केवळ त्या कायद्यासंबंधी दायित्व असलेल्या संस्थेला(इथे पोलिस) कळवणे एवढेच नागरिकाचे कर्तव्य आहे. पाठलाग करून पकडणे, कोण काय खातंय याची देखरेख करून त्याच्या घरावर हल्ला करणे इत्यादी प्रकार स्टेटलेस सोसायटीज मध्ये घडत असतील, भारत एक संविधानाने स्थापीत, कायद्याचे राज्य(rule of the law and not of men) आहे. इथे केवळ संवैधानिक व्यवस्थेलाच कायदे निर्माण करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, व त्यांचे अर्थान्वयन करणे हे अधिकार हवेत.
पोलिसांची एकूणच अवस्था आपण सर्व जाणतोच, त्यामुळे त्याबद्दल बोलणेच नको.
यासाठी पोलीस दलामध्ये सुधारणा घडवून आणायचा आग्रह धरणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे ना की स्वत: पोलीसांचे अधिकार आपल्या ताब्यात घेणे. अखलाक हत्या, उना येथे झालेली दलितांना मारहाण आणि अलवार येथील नृशंस हत्या हे तीनही प्रकार सरकार या संस्थेचे राज्याचा(state) एजंट म्हणून आपले कर्तव्य निभावण्यात आलेले अपयश आहे.

In reply to by पुंबा

पाठलाग करून पकडणे
मी फक्त एवढ्याच गोष्टीला धरून बोललो आहे, त्यामुळे बाकीच्या वर लिहिलेल्या गोष्टी गैरलागू आहेत. म्हणजे थोडक्यात आपले म्हणणे आहे की एखाद्याच्या बाजूच्या घरात चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न चालू असेल (किंवा त्याला तसा संशय असेल तर)तर त्याने त्याला पकडण्याच्या ऐवजी फक्त पोलिसांना कळवून गप्प राहावे(परिस्थितीजन्य आणि थेट पुरावा गायब). मला हे पटत नाही, आणि तसे घडतही नाही. तसे पकडने हा कायदेशीर गुन्हा असेल तर व्हावी की कायदेशीर कारवाई, त्याबाबतीत कोणाचा आक्षेप आहे? बाकी आग्रह धरावा म्हणजे नेमके काय करावे हे सांगितलेत तर समजेल नीट!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

एखाद्याच्या बाजूच्या घरात चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न चालू असेल (किंवा त्याला तसा संशय असेल तर)
हप्र, ह्या केसमध्ये प्रस्तुत संशयिताला पकडणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे योग्य ठरते. गोरक्षकांचं व्हिजिलांटिझम मला बरोबर वाटत नाही. असल्या कुठल्याही संघटनेला, मॉबला धरपकडीचे अधिकार नसावेत असे वाटते.

In reply to by पुंबा

माझ्या पहिल्या प्रतिसादापासून मी माझे हेच म्हणणे स्पष्टपणे मांडले आहे. पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे योग्य ठरते, मग ते हे प्रकरण ते प्रकरण असं असू शकत नाही. मारहाण करणे वगैरे गुंडगिरी प्रकार कायद्याने गुन्हा आहेच. पोलिसांनी त्यावर योग्य ती कारवाई करावीच! ते गोरक्षक आहेत म्हणून त्यांना कायद्याने सूट दिलेली नाहीचाये!

करण्या योग्यच आहे व या हत्येला जबाबदार असणार्‍या सर्व दोषी लोकांना कायदेशीर शिक्षा ही व्हायलाच हवी. पण, मुळातच राजस्थान व इतर राज्यात गोहत्या, गांयीची अवैध तस्करी यांना कायदेशीररित्या बंदी असताना अशी तस्करी ही लोक करतातच का? शिवाय या अश्या गोष्टींनी आजकाल भुछत्रांप्रमाणे जिथे-तिथे उगवलेल्या तथाकथित गोरक्षकांच्या हातात आयते कोलित मिळते. मग त्यातूनच झालेल्या मारहाणीतून एकाद्याचा मृत्यु होतो व आजकाल भू छत्रांप्रमाणे जिथे-तिथे उगवलेल्या तथाकथित ढोंगी सेक्युलर लोकांना हे बेकायदेशीर कृत्य करणार्‍या लोकांचा पुळका येऊन अवार्ड वापसी सारख्या नौटंकी करायचा आयताच चांन्स मिळतो.

In reply to by श्रीगुरुजी

मला वाटतं त्याचा मराठी अर्थ नक्कीच कळत असेल, नाही माध्यमांना आणि खासकरून सो कॉल्ड शिवसेनप्रेमी माध्यमांना कळला नाही म्हणून विचारलं! शिवाय लोकसभेतलं निवेदन बघून घ्या लगेहाथ, अर्थात फरक काही पडणार नाही म्हणा. हे भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार वगैरे काही नसून भाजप विरुद्ध शिवसेना आहे हे वर आलेलेच आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार असंच होतं. ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नसून शिव्यासेनेचा आहे असे बरळून गायकवाडने विनाकारण त्यात पक्ष आणला.

प्रकरण ताणून स्वतःचे हसे करून घ्ययची सवयच आहे शिवसेनेला.राज्याबाहेर दादागिरी चालणार नाही हे उद्धवने त्याच्या आमदार्,खासदारांना निक्षून सांगायला हवे. काल रविण्द्रने लोकसभेत केलेले भाषण ऐकले. "तू एयर इण्डियाका सी.एम.डी. है क्या ? तू बॅग उठानेवाला है ना ?" असे उद्धट्पणे रविंद्र म्हणाला. त्यावर तो कर्मचारी चिडला व त्याने 'तू नरेंद्र मोदी है क्या?' असे प्रत्युत्तर दिले. थोडक्यात सुरूवात खासदार साहेबांनीच केली होती असे दिसते.

In reply to by मराठी_माणूस

"माझा स्वभाव विनम्र आहे" रविंद्र गायकवाड. लेख 'हे' वाचत होते .वरील वाक्य वाचल्यावर हे जे हसत सुटले ते काही थांबायला तयार नाहीत. कामे आटपली की मग स्वतःहून वाचेन.

In reply to by मराठी_माणूस

"माझा स्वभाव विनम्र आहे" रविंद्र गायकवाड.
--- "मैने सँडलसे पच्चीस बार मारा" असे म्हणनार्‍याचा स्वभाव विनम्र आहे, हे विधान किती हास्यास्पद आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रकरण ताणून स्वतःचे हसे करून घ्ययची सवयच आहे शिवसेनेला.
सहमत आहे.
थोडक्यात सुरूवात खासदार साहेबांनीच केली होती असे दिसते.
पण इथल्या पेंग्विनसेना समर्थकांना हे समजावणार कोण आणि कसे?

फक्त दिलगिरी वर काम भागणार नाही असे वाटते. http://www.livemint.com/Politics/bSS2yhlxoh6woQeTgIvRtO/Ravindra-Gaikwa…
“Unless he tenders an unconditional apology to AI employees, and undertakes in writing to abide by the Chicago and Tokyo Conventions & Rules of the Air and follow all cabin safety and public behaviour norms, we must not let him on board,” says the letter. “Ravindra Gaikwad is and will continue to be a risk to flight safety and flight operations and to Cabin Crew safety on board, and hence Government must think long and hard about letting him back on,” the letter added. The association said it would be a “crying shame” if he is let off “without even a rap on the knuckles”. “For either the ministry or the Parliament to allow such a person to get away without even a rap on the knuckles or even forcing an apology to all Air- Indians and indeed all Indians, would be a crying shame. “It would also crush the morale of all employees and indeed all fair minded Indians. We do not wish to be flying such a person,” the association wrote in the letter.

In reply to by मराठी_माणूस

अगदि पदर खोचुन आणि मिशीला तुप लावुन एयर इंडियाची तळी उचलणार्यांची प्रतिक्रिया आता काय असेल बरे? शेवटी सेनेची "धमकी" कामाला आली कि काय? गायकवाडांनी फक्त संसदेची माफि मागितली, एयर इंडिया किंवा त्या सुकुमारची मागितलेली नाहि... ;)

In reply to by अनुप ढेरे

१५ दिवस बंदी घालून इतकी मानहानी झाल्यानंतर आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतर बंदी उठविल्यावर आपलाच 'विजय' झाला असे सेना नेत्यांना वाटून आता मातोश्रीच्या बाहेर फटाके फुटत असतील. गायकवाड आता दिल्लीहून मुंबईला विमानाने आल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत होऊन मातोश्रीपर्यंत मिरवणूक निघेल. या प्रकारात गायकवाड व सेनेची पुरती इज्जत निघाली. देशभर गायकवाड व सेनाविरोधात वातावरण निर्माण झाले व निदान १५ दिवस तरी राजकारण्यांना एअर इंडियाने शिंगावर घेतले हेही नसे थोडके. आता भविष्यात अशी दांडगाई करण्याची गायकवाडांची हिंमत होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आता भविष्यात अशी दांडगाई करण्याची गायकवाडांची हिंमत होणार नाही.
हेच म्हणतो! ती पोलीस केस संथ गतीने चालू राहील पण या प्रवासबंदीने चांगलाच धडा शिकवला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

१५ दिवस बंदी घालून इतकी मानहानी झाल्यानंतर आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतर बंदी उठविल्यावर आपलाच 'विजय' झाला असे सेना नेत्यांना वाटून आता मातोश्रीच्या बाहेर फटाके फुटत असतील. गायकवाड आता दिल्लीहून मुंबईला विमानाने आल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत होऊन मातोश्रीपर्यंत मिरवणूक निघेल.
याविषयी एकाच्या फेसबुक भिंतीवर वाचले--- "मुलगा वर्गात दांडगाई करतो, गुंडगिरी करतो म्हणून त्याला शिक्षकाने वर्गात यायला बंदी घातली. पण नंतर मुख्याध्यापकांनी सांगितल्यावर त्याला वर्गात परत यायला परवानगी दिली. त्यानंतर त्या मुलाने मोठा पराक्रम केला आणि जणू काही स्कॉलरशीपच मिळाली असे त्याच्या घरच्यांना वाटायला लागून ते त्याचा आनंद साजरा करायला लागले"!! मला वाटते की एअर इंडियाने या घटनेमुळे आयुष्यभरासाठी बंदी घालणे समर्थनीय नव्हतेच.पण दुर्दैवाने एअर इंडियाने या प्रकरणी पाहिजे तितका खमकेपणा दाखवलेला नाही. अजून काही काळ म्हणजे ६ महिने/१ वर्ष वगैरे काळ तरी बंदी घालायला पाहिजे होती. आता मला ६ महिने/१ वर्ष हा बंदीचा काळ पुरेसा आहे असे वाटत आहे तर काहींना १५ दिवस बंदी पुरेशी आहे असे वाटत असेलच!! येशूदासने गायलेले एक सुंदर गाणे आहे. त्या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची स्तुती करतानाच भगवंताचीही स्तुती करतो. त्या गाण्याचे बोल आहेत---"जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा"!! त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते की "ज्या पक्षाचे समर्थक असे **** असतील तर त्या पक्षाचे नेते आणि तो पक्ष किती **** असेल"!! या **** च्या जागी मी थर्डक्लास, उद्दाम, उद्धट, शिवराळ असे शब्द टाकले. त्याजागी इतर कोणतेही शब्द टाकता येतील :)

In reply to by गॅरी ट्रुमन

येशूदासने गायलेले एक सुंदर गाणे आहे. त्या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची स्तुती करतानाच भगवंताचीही स्तुती करतो. त्या गाण्याचे बोल आहेत---"जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा"!!
चित्रपटः सावन को आने दो. गाणं तुझे देखकर.रामायणातील राम अरुण गोविल या चित्रपटात हिरो होता. :)

In reply to by गॅरी ट्रुमन

काय बोलणार? मुद्दे सोडून आपल्या विरोधातील विचारधारेचा क्लास काढायची वेळ का येत असेल बरे? खेद वाटतो, अजाबात पटलं नाय!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अजाबात पटलं नाय!
ओक्के. नको पटू दे.
मुद्दे सोडून आपल्या विरोधातील विचारधारेचा क्लास काढायची वेळ का येत असेल बरे?
तो पक्ष आणि विचारधारा? ख्खो ख्खो ख्खो ख्खो. ज्यांचा जन्म नुसती गुंडगिरी करण्यात केला त्यांची कसली डोंबलाची आली आहे विचारधारा.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्ही इथे या विषयावर त्या पक्षाच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांचा क्लास काढलात, ते त्या पक्षाचे समर्थकच आहेत असे गृहीत धरून. त्यांच्या विचारधारेबद्दल मी बोलत आहे. कि इथे बोलणाऱ्या लोकांची काही विचारधारा असू शकते हेही तुम्हाला मान्य नाही (शिवसेनेची काही विचारधारा नाही ह्या तुमच्या वैयक्तिक मताचा मी आदर करतो)? माझा मुद्दा सरळ होता, मिपावरच्या आदरणीय आयडींनी असे एखाद्या पक्षाच्या समर्थकांना थर्डक्लास कशाला संबोधावे? असो, मी लहान तोंडी मोठा घास घेणे योग्य नाही. तुम्हाला योग्य वाटेल तसे.

In reply to by श्रीगुरुजी

आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतर
तुम्हाला इंग्लिश वाचता आणि समजता येते असा माझा समाज आहे, तो गैरसमज असेल तर त्या पत्राचे भाषांतर लिहून देण्याइतकी इंग्रजी येणारे बरेच लोक असतील इथे.
निदान १५ दिवस तरी राजकारण्यांना एअर इंडियाने शिंगावर घेतले हेही नसे थोडके
हाहाहा...भल्या मोठ्या अपेक्षा फोल झाल्या की असे होते. ह्या असल्या मुजोर कंपन्या सामान्य लोकांना नेहमीच शिंगावर घेत असतात. कोणी आवाज उठवत नाही, इथे आवाज उठवला गेला नाही तर आवाज काढला गेला म्हणून तंतरली!

In reply to by श्रीगुरुजी

हसून घ्या! पर्याय नाही हो, बंदी तर उठली आहेच. त्या शिवसेनाप्रेमी माध्यमाने काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती. त्याची लिंक कुठे मिळाली तर देतो ;).