उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
27 Mar 2017 - 11:04 am
गाभा: 

चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-b...)

माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.

मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

28 Mar 2017 - 5:41 pm | गॅरी ट्रुमन

नो फ्लाय मागे घेतला होता का?

नो फ्लाय मागे घेतला नसला तरी तो मागे घेतला जाणार अशा बातम्या होत्या.

नसेल घेतला तर तिकीट रद्द केलं म्हणजे काय विशेष केलं, याची बातमी का व्हावी?

नो फ्लाय मागे घेतला जाणार अशा बातम्या आल्याच्या पार्श्वभूमीवर परत गायकवाडांनी एअर इंडियाचेच तिकिट काढायचा प्रयत्न केला. त्यांचे तिकिट रद्द केले गेले नसते तर मग "बघा एअर इंडियाला कसे झुकायला लावले" वगैरे बढाया पेंग्विनसेना समर्थकांनी मारल्याच असत्या.

तसेच "नो फ्लाय" यादीमध्ये नाव समाविष्ट करूनही परत तिकिट काढायला गेले याचा अर्थ गायकवाडांना स्वाभिमान नाही किंवा आपले तिकिट मान्य केले जाऊन नंतर बढाया मारायला मिळतील हा फाजील आत्मविश्वास या दोन सोडून तिसरा मला तरी काढता येत नाही. जर गायकवाडांना स्वाभिमान नसेल तर असेच लोक पुढे भविष्यात महाराष्ट्राचा ताठ कणा, मराठी बाणा वगैरे गोष्टींविषयी बोलायला लागले तर त्यापेक्षा विजय मल्ल्याने दारूबंदीवर दिलेले प्रवचन अधिक विश्वासार्ह वाटेल. आणि फाजील आत्मविश्वास असेल तर मात्र त्यांना चपराक दिली हे फारच उत्तम झाले.

या एका घटनेमुळे आयुष्यभरासाठीचा नो फ्लाय ही शिक्षा पण जास्त होईल हे मान्य. तरीही काही काळापुरता-- ६ महिने/१ वर्ष वगैरे नो फ्लाय त्यांच्यावर टाकायलाच हवा. जर त्यांनी माफी मागून ती बंदी उठवावी अशी मागणी केली तर हे प्रकरण अधिक न ताणता बंद करायला हरकत नसावी. पण काहीही झाले तरी गायकवाडांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी. काहीही झाले तरी असल्या मुजोर लोकप्रतिनिधींपुढे कुठली सरकारी संस्था झुकली असे चित्र उभे राहता कामा नये. असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Mar 2017 - 6:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

ओके. मला तर खरंच उत्सुकता लागून राहिली आहे की इथून पुढच्या कुठल्या कुठल्या पक्षाच्या कोणत्या कोणत्या लोकांवर कशीकशी बंदी आणली जातेय ती :).

तिकिट काढायला गेले होते आणि दुसऱ्यांदा तिकीट कॅन्सल झालं याचं काही अधिकृत कंफर्मेशन कोणाला सापडलं तर टाकावं इथे. बाकी ते विजय मल्ल्या, फाजील आत्मविश्वास वगैरे शुद्ध आकस आणि द्वेष प्रकारात टाकावं वाटलं. जर नो फ्लाय उठवला तर त्याच्यावरील खासदारांची किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकांची प्रतिक्रिया म्हणजे बढाया, आणि दोन दिवसांचा का होईना बॅन लावून दाखवला कि नाही, दोनदा तिकीट कॅन्सल करून दाखवले कि नाही याला बढाया म्हणणार नाही का?

बाकी, काहीही झालं तर खासदारांना शिक्षा मिळायलाच हवी यावर आपलं एकमत (अर्थात गुन्हा कोणता हे कोर्ट ठरवेल)! याव्यतिरिक्त, संसद सदस्याला धक्काबुक्की करून, "मा....त" सारख्या शिव्या देणाऱ्याला, याला आत घेऊन याचं तोंड फोडू कोणालाच कळणार नाही असे म्हणणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांना काहीही झाले तरी शिक्षा व्हायलाच हवी. आणि खासदारांनी याबाबतीत (बॅन आणि धक्काबुक्की) कायदेशीर कारवाई करावीच अशी अपेक्षा आहे.

गॅरी ट्रुमन's picture

28 Mar 2017 - 7:39 pm | गॅरी ट्रुमन

ते विजय मल्ल्या, फाजील आत्मविश्वास वगैरे शुद्ध आकस आणि द्वेष प्रकारात टाकावं वाटलं.

ओक्के.

कुंदन's picture

28 Mar 2017 - 5:45 pm | कुंदन

आता सामान्य जनतेला कोणी वेठीस धरले नाही म्हणजे मिळवली.

नाही तर रास्ता रोको , रेल रोको इ इ करुन लोकांचे जगणे अवघड केले जाइल....

अत्रे's picture

30 Mar 2017 - 8:48 am | अत्रे

एअर इंडियाचे खमकेपणा दाखविल्याबद्दल अभिनंदन.

ज्या सदस्यांना एअर इंडिया ची कृती योग्य वाटत असेल ते खालील वेबसाइट वर जाऊन Appreciation चा फीडबॅक फॉर्म भरू शकतात.
http://www.airindia.in/feedback-form.htm

जनतेचे समर्थन त्यांना आहे हे त्यांना कळाले म्हणजे इथूनपुढे ही असाच खमके पणा दाखवत राहतील आणि गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना वठणीवर आणतील.

एअर इंडियाच्या डायरेक्टर चे अभिनंदन करायचे असल्यास त्यांचा ई-मेल आयडी इथे मिळेल
http://www.airindia.in/Images/pdf/RTI-Manual-8-new.pdf

सुबोध खरे's picture

30 Mar 2017 - 9:36 am | सुबोध खरे

तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ सेवेबद्दल हि लिहिता येईल का? कारण पूर्वी जितक्या वेळेस तक्रार केली आहे त्याची पोच पावती सुद्धा देण्याची एअर इंडियाने तसदी घेतलेली नाही. गिगाबायटी प्रतिसाद लिहिता येतील.
मुजोर उडपी कर्मचारी, भिकार स्वच्छता. सुमार जेवण, चालत नसलेल्या वातानुकूलन यंत्रणा, बेपर्वा बेदरकार आणि संवेदनशील जमिनीवरील कर्मचारी इ इ.
हा धाग्याचा विषय नसल्याने अगोदर लिहिले नव्हते आणि अधिकही लिहीत नाही.

तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ सेवेबद्दल हि लिहिता येईल का?

नक्की लिहिता येईल! आणि तसे करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर सोशल मीडिया आहेच आपल्याकडे. झक मारत प्रतिसाद द्यावा लागेल मग त्यांना.

एकदा दिल्लीहून येताना यांनी उगाच लेट केला होता एवढा एकच माझा पर्सनल वाईट अनुभव आहे. पण यांचे तिकीट प्रायव्हेट एअरलाईनपेक्षा स्वस्त असते आणि चेकिन लगेज ची लिमिट पण जास्त असते (ज्या रूट ने मी प्रवास करतो त्या रूट वर).

तिमा's picture

28 Mar 2017 - 4:11 pm | तिमा

खूप नावं आठवत आहेत आता काय करावे बरे ??

सोप्पं आहे. 'मा'. चा ,जनसामान्यांच्या मनांत असलेला अर्थ घ्यावा आणि खुश व्हावे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Mar 2017 - 5:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मारहाण झालेला कर्मचारी मराठी असता तर? म्हणजे 'बिहारी खासदाराने ६० वर्षाच्या मराठी कर्मचार्याला दिल्लीत चपलेने बडवले' अशी बातमी असती तर वर 'एयर इन्डियाची सेवा लय वाईट' म्हणणार्या लोकांची काय प्रतिक्रिया असती ? असा ह्यांचा सवाल.

गॅरी ट्रुमन's picture

28 Mar 2017 - 5:11 pm | गॅरी ट्रुमन

माईसाहेब कधीकधी तुम्ही अगदी नेमके प्रश्न विचारता. मानले तुम्हाला.

असे काही खरोखर घडले असते तर एअर इंडियाची ढिसाळ सेवा वगैरे मुद्दे गेले असते तेल लावत आणि मराठी बाणा उफाळून आला असता या सगळ्यांचा. सामनामध्ये अग्रलेख आले असते-- या बिहारी खासदाराचे पोट फाडून कोथळा बाहेर काढला पाहिजे, बोटे तोडली पाहिजेत इत्यादी इत्यादी.

कुंदन's picture

28 Mar 2017 - 5:48 pm | कुंदन

त्याची बातमी नाही आली कुठे....
सगळा टी आर पी ह्यांच मानमियांनी खाल्ला , बरोबर बोलतोय ना माई मी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Mar 2017 - 7:03 pm | हतोळकरांचा प्रसाद

ज्याची मते स्पष्ट असतात त्याला "असे नेमके प्रश्न, तसे नेमके प्रश्न" असलं काही नसतं हो माई. मराठी कर्मचारी असता तर काय वाट्टेल तशी सेवा द्यायचा आणि वागण्याचा अधिकार मिळाला असता काय? तसेच खासदारालाही मुजोरगिरी करायचा अधिकार मिळालेला नसतो.

बाकी या प्रकरणात शिवसेना आणणं, मग सरसकटीकरण करून शिवसेनेवर यथेच्छ टीका करून घेणं जसं अजेंडायुक्त पोळी भाजून घेणे आहे तसेच मराठी वि. बिहारी आणणेही.

>>म्हणजे 'बिहारी खासदाराने ६० वर्षाच्या मराठी कर्मचार्याला दिल्लीत चपलेने बडवले' अशी बातमी असती तर वर 'एयर इन्डियाची सेवा लय वाईट' म्हणणार्या लोकांची काय प्रतिक्रिया असती ? असा ह्यांचा सवाल.<<

चांगला प्रश्न आहे. याच धर्तीवर जेंव्हा योगी आदित्यनाथांनी दंगे केले, घडवुन आणले, मारहाण केली - मग त्यांच्यावर बंदि का नाहि? त्यांना तर अँगर मॅनेज्मेंटच्या कोर्सची जास्त गरज आहे. असले प्रश्न तुमच्या "ह्यांना" का आणि कसे पडले नाहि, हा प्रश्न मला पडलेला आहे... :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Mar 2017 - 11:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पुन्हा तेच. त्यांनी तसे केले मग आम्ही केले तर काय प्रॉब्लेम आहे असेच ना?
खासदाराने विमान कंपनीच्या कर्मचार्याला चपलेने (२५ वेळा) मारणे व त्याचे उघडपणे समर्थन करणे निंदनीय आहे हे मान्य आहे की नाही?एयर ईंडियाची सेवा फार खास नाही पण कर्मचार्याला चपलेने मारावे ईतकी वाईट नक्कीच नसावी.
मुंबईतील रस्त्यांवर असंख्य खड्डे असतात. त्याबद्दल सेनेच्या नगरसेवकांना चपलेने लोकांनी हाणले तर चालणार का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Mar 2017 - 11:26 pm | हतोळकरांचा प्रसाद

"तुमची विमानसेवा खराब आहे, थांबा तुम्हाला झोडपून काढतो चपलेने" असेच होते ना ते, होय ना माई?

अनुप ढेरे's picture

29 Mar 2017 - 2:39 pm | अनुप ढेरे

खासदाराने विमान कंपनीच्या कर्मचार्याला चपलेने (२५ वेळा) मारणे व त्याचे उघडपणे समर्थन करणे निंदनीय आहे हे मान्य आहे की नाही?

हे मान्यच नाही हे दिसतं आहे.

मुंबईतील रस्त्यांवर असंख्य खड्डे असतात. त्याबद्दल सेनेच्या नगरसेवकांना चपलेने लोकांनी हाणले तर चालणार का?

हा हा हा! मस्तं प्रश्न! पण उत्तर "इतर शहरातलं काय" असं येईल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 3:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला हवे ते अर्थ काढण्यास मोकळीक आहेच! नीट वाचून प्रतिक्रिया देत चला हा आणखी एक फुकटचा सल्ला!

पुन्हा तेच काय? दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ शोधण्याआधी प्रत्येकाने आपल्या डोळ्यातलं मुसळ बघावं - हा मुद्दा होता माझा. समजायला एव्हढा कठीणहि नव्हता, पण ते असो. आणि खड्ड्यांच्या बाबतीतंच का, जनतेच्या तोंडाला चुना लावणार्या, चुनावी जुमला करणार्यांनाहि चपलांनी हाणा - शनिवार्वाड्यावर सात सवाश्णिंकडुन तुमची खणा-नारळांनी ओटि भरण्याची व्यवस्था करु...

सुबोध खरे's picture

29 Mar 2017 - 10:45 am | सुबोध खरे

माई साहेब
हाच जर खासदार अनुसूचित जातीचा असता तर मायावती पासून केजरीवाल पर्यंत आणि ममता दीदी पासून सीताराम येचुरींपर्यंत सर्वानी मागास्वर्गीयांवर अन्याय म्हणून टाहो फोडला असता. किंवा हाच खासदार जर मुसलमान असता तर एम आय एम च्या ओवैसी पासून मुलायम सिंह पर्यंत सर्वानी अल्पसंख्यांकांवर अन्याय म्हणून रडणं कढणं सुरु केलं असतं.
प्रत्येक जण आपले पूर्वग्रह मनात धरून या प्रश्न कडे पाहत आहे हे सिद्ध होत आहे.
मला एकच मुद्दा मांडायचा आहे कि या खासदारांना दोषी ठरवून त्यांच्यावर उड्डाण बंदी एकतर्फी आणण्याचा एअर इंडिया (सरकारी विमान कंपनी) ला कायदेशीर अधिकार आहे का? यात मूलभूत अधिकारांची पायमल्ली होते आहे असे वाटते.
दोष सिद्ध न होता त्याला शिक्षा दिली जात आहे.
मला शिवसेना किंवा त्यांच्या एक घाव दोन तुकडे या विचारसरणी बद्दल अजिबात प्रेम नाही कि मी त्यांचा समर्थक हि नाही. ( खासदार कोणत्या पक्षाचा आहे हा माझ्या दृष्टीने मुद्दा गौण आहे) त्याने केलेले कृत्य ही असमर्थनीय आहे आणि त्याबद्दल त्याची रीतसर चौकशी होऊन त्याला शिक्षाही झाली पाहिजे यातही शंका नाही. पण त्याच्यावर अनिश्चित कालीन उड्डाण बंदी घालणे हे कोणत्या कायद्याच्या तत्वात बसते?
याचीच एक पुरवणी म्हणून एक प्रश्न मनात आला. सरकारी रुग्णालयात एखादा eczema एक्झिमा चा रुग्ण डॉक्टरना मारहाण करत असेल तर त्याला उपचार देण्यास रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला अमर्यादित काळासाठी बंदी करता येईल का? एक्झिमा हा अतिशय जुनाट सहज बरा न होणार त्वचारोग असून त्याने माणसाच्या जीवाला धोका नसतो आणि त्याला तातडीच्या उपचारांची गरज नसते.
सरकारी रुग्णालय आणि सरकारी विमान कंपनी आहेत दोन्ही स्थिती आपत्कालीन नाहीत हे गृहीत धरा.
याचा सध्या झालेल्या डॉक्टरांच्या संपाशी संबंध नाही. ( उगाच ते धुणे इथे धुवू नये. सगळेच डॉक्टर हरामखोर आहेत असे आपण सध्या धरून चालू)
मूळ मुद्दा "मूलभूत हक्क आणि कायदा" याबद्दल आहे.

अत्रे's picture

29 Mar 2017 - 11:07 am | अत्रे

सॉरी , तुमचा प्रश्न मला उद्देशून नाही आणि मला यातला कायदा हि माहित नाही पण एअर इंडिया चे डायरेक्टर काय म्हणाले हे मी इथे वाचले

Air India and the member airlines of the Federation of Indian Airlines (FIA) that includes IndiGo, Jet Airways, SpiceJet and Go Air, condemn the assault on an Air India staff member by a passenger who happens to be a Member of Parliament on March 23, 2017. The airlines demand that strict action be taken against the Member of Parliament by law enforcement agencies. We believe that an assault on any one of our employees is an assault on all of us and on ordinary law abiding citizens of our country who work hard to earn a living.
Air India and FIA member airlines have decided to ban this Member of Parliament from flying on all our flights with immediate effect. We believe that exemplary action should be taken in such incidents to protect employee morale and public safety.
In the interest of the safety and security of our colleagues and other customers we also propose the promulgation of a "no fly" list which shall include the names of all unruly passengers. Such customers are not welcome on our carriers and we seek the support of the Government and security agencies to enforce such a "no fly" list.

मला असे वाटते कि हि जी FIA (http://www.fiaindia.in/) आहे, तिला नो - फ्लाय लिस्ट चे अधिकार असावेत. आणि अजून पर्यंत नसतील तर मग प्रकरण कोर्टात जाईल आणि मग कोर्ट काय सांगेल त्याची वाट बघावी लागेल.

सुबोध खरे's picture

29 Mar 2017 - 11:27 am | सुबोध खरे

असेच अधिकार सरकारी रुग्णालयांनी जर सरकारकडे मागितले तर चालेल काय? (मारामारी करणाऱ्या माणसाचा आधार क्रमांक घेऊन यापुढे त्याला कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार घेता येणार नाहीत)
मी खाजगी विमान कंपन्या किंवा खाजगी रुग्णालये याबद्दल बोलत नाही. तसेच आपत्कालीन परिस्थिती बद्दल हि बोलत नाही हे " कृपया" लक्षात घ्यावे
हे मला वाटते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.

अत्रे's picture

29 Mar 2017 - 11:53 am | अत्रे

असेच अधिकार सरकारी रुग्णालयांनी जर सरकारकडे मागितले तर चालेल काय?

अत्यावशक सेवेसाठी सोडून इतर सेवेसाठी (जसे तुम्ही उदाहरण दिले एक्झिमाचे) असे डिसक्लेमर लावून सरकारी रुग्णालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या लोकांना बॅन करण्यात मला तरी काही चुकीचे वाटत नाही. पण हा निर्णय घेण्याएवढी एवढी एकजूट त्यांच्यात हवी.

मी वाचलं होता कि इथून पुढे काही रुग्णालयात फक्त दोन नातेवाईक रुग्णासोबत जाऊ शकतील. त्या टाईपचे नियम मला वाटतं लावता येतील. कारण रुग्ण बिचारा डॉक्टरांना का मारेल? मारलं तर त्याचे नातेवाईक/ समर्थकच मारतील (नेता वगैरे असेल तर) . अशावेळी योग्य ती सुरक्षा पुरवली तर अशा मारहाण करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त होईल.

उडणाऱ्या विमानात कोणी गोंधळ घालत असेल (किंवा अशा गोधळाची पार्श्वभूमी त्याला असेल) तर परिस्थिती सोपी नसते. बाकी लोकांच्या जीवाचा ही प्रश्न असतो. विमानात गोळी पण चालवता येत नाही, विमानच खाली पडेल.

हे मला वाटते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.

असेल. पण ट्रेडऑफ बघा ना.

सुबोध खरे's picture

29 Mar 2017 - 12:00 pm | सुबोध खरे

विमानात एखादा गैरवर्तन करत असेल तर त्याला "त्या" वेळेस विमानातून उतरवण्याचे अधिकार (इतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या साठी) विमान कंपन्यांना दिलेले आहेत. पण म्हणून अनिश्चित कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला विमानाचे तिकीटच नाकारणे हे बरोबर नाही असेच वाटते.

अनिश्चित कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला विमानाचे तिकीटच नाकारणे हे बरोबर नाही असेच वाटते

सहमत.

बादवे नो फ्लाय लिस्ट ची सुरुवात अमेरिकेत झाली असे वाचले. त्यावरही बऱ्याच केसेस सुरु आहेत . https://en.wikipedia.org/wiki/No_Fly_List#Lawsuits

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 12:12 pm | हतोळकरांचा प्रसाद

आहेच हे उल्लंघन मूलभूत अधिकारांचे. रादर माझ्यासाठी हा विमान कंपन्यांच्या उद्दामपणाचा पुरावा आहे. यापेक्षा गलिच्छ प्रकार कर्मचाऱ्यांची चूक नसताना घडलेले आहेत विमानात. काय दिवे लावले तेव्हा? आताच बारा तो सात्विक संताप येतो? गायकवाडांवर तर गुन्हा दाखल आहेच, पण या कर्मचाऱ्यांबद्दल कोण बोलणार? संसद सदस्याला धक्काबुक्की करून शिवीगाळ करणाऱ्या आणि वरून आत नेऊन तोंड फुटेपर्यंत मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार?

अत्रे's picture

29 Mar 2017 - 12:45 pm | अत्रे

आत नेऊन तोंड फुटेपर्यंत मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार?

असे खरेच झाले असेल - तर

Law will take its own course

:D ;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 1:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

आता कसं बोललात बगा! अगदी हेच फक्त दोन्ही बाजूंसाठी लागू होतं! उठ कि लाव बॅन असं नसतं, मोगलाई नाहीये ही!

ठीक आहे ना. गायकवाड साहेबांना जमत असेल तर बॅन काढून दाखवावा (त्यासाठी शुभेच्छा). फक्त लोकांकडून सहानुभूतीची अपेक्षा करू नये.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 1:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

ते तर ते करतच आहेत हो, संसदेत हक्कभंगावर चर्चा चालू आहेच (अर्थात हक्कभंग फेटाळलाच जाणार आहे). आणि सहानुभूतीचं म्हणाल तर खासदार काय, कर्मचारी काय कोणीच सहानुभूती मागताना दिसले नाहीत. जशी तुम्हाला गायकवाडांना सहानुभूती द्यावी वाटत नाही तशी काही लोकांना विमान कंपनीला द्यावी वाटत नाही. प्रकरणाला दुसरी बाजू असू शकते हे मान्यच नसेल तर मग काय बोलणार?

अत्रे's picture

29 Mar 2017 - 1:38 pm | अत्रे

कर्मा इज अ बिच, का काय म्हणतात ते.

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 3:01 pm | श्रीगुरुजी

मला एकच मुद्दा मांडायचा आहे कि या खासदारांना दोषी ठरवून त्यांच्यावर उड्डाण बंदी एकतर्फी आणण्याचा एअर इंडिया (सरकारी विमान कंपनी) ला कायदेशीर अधिकार आहे का? यात मूलभूत अधिकारांची पायमल्ली होते आहे असे वाटते.

विमानात गोंधळ करणे, मारामारी करणे, इतर प्रवाशांना धोका होईल असे वर्तन करणार्‍या प्रवाशांना बंदी करण्याचे अधिकार विमान कंपन्यांकडे आहेत. २-३ दिवसांपूर्वीच याबद्दल एके ठिकाणी वाचले होते. ती लिंक परत मिळाली तर देईन.

दोष सिद्ध न होता त्याला शिक्षा दिली जात आहे.

आपल्या कृत्याची त्याने स्वतःच जाहीर कबुली दिली आहे. त्यावर विसंबूनच बंदी घातलेली आहे. समजा त्याने कर्मचार्‍याला मारहाण केली नसेल व विमानातून ढकलायचा प्रयत्न केला नसेल तर त्याने तसे कॅमेर्‍यापुढे येऊन जाहीररित्या सांगावे. शिवसेनेच्या नेहमीच्या पद्धतीने तो फुशारक्या मारायला गेल्या आणि त्याच फुशारक्या आता अंगलट आल्या आहेत. आता मी तसे केले नाही हे सांगायला पण त्याच्याकडे तोंड नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Mar 2017 - 7:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

या खासदारांच्या वागणुकीवरही चर्चा व्हावी. इथे नेमका कसला बॅन लावता येईल बरे? दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पुढे भाजपला खड्ड्यात घालायची तयारी चालू आहे का?

https://youtu.be/s4YCVk1g418

वरून हे त्यांचे स्पष्टीकरणही पाहावे -

https://youtu.be/gICrRHYx5BI

http://m.navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/politics/manoj-tiwari...

श्रीगुरुजी's picture

28 Mar 2017 - 9:02 pm | श्रीगुरुजी

तो कार्यक्रम बसविलेल्या सीसीटीव्हींच्या उद्घाटनाचा होता असं दिसतंय. अशा प्रसंगी मनोज तिवारींना गाणे गाण्याचा आग्रह करणे हे औचित्याला धरून नव्हते. त्याचप्रमाणे मनोज तिवारींनी कडक शब्दात त्या महिला शिक्षिकेला सुनावणेही पूर्णपणे अयोग्य होते. सौम्य शब्दात शिक्षिकेची मागणी नाकारता आली असती. तिवारींनी महिलांशी व सर्वांशीच उद्धटपणे न बोलता नम्रपणे बोलावे अशी समज त्यांना भाजपने द्यावी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Mar 2017 - 9:17 pm | हतोळकरांचा प्रसाद

मुद्दा एक मनोज तिवारी हे एक कलाकार आहेत, खासदार असतानाही त्यांनी गाण्याचे कार्यक्रम केलेले आहेत. मुद्दा दोन, आधीच शाळेत ठरलेल्या कार्यक्रमाच्या रुपरेखेनुसार, सूत्रसंचलन करणाऱ्या या शिक्षिकेने गाणं म्हणण्याचा आग्रह नाही विनंती केली. यावर खासदार साहेबांनी त्या महिलेची चारचौघात अक्षरशः तमीज काढली आणि स्टेजवरून हाकलून काढले. बरोबर आहे, त्या महिलेला इतक्या लोकांसमोर असं अपमानित करून स्टेजवरून खाली उतरवणे, तिच्यावर कारवाई करण्याचा जणू आदेशच देणं, आणि वरून माध्यमांनी असा अपमान करणं योग्य आहे का विचारल्यावर, त्या महिलेने काय आत्महत्या केली का? असे विचाराने हे सर्व "शिव्या देऊन अरेरावीने बोलणाऱ्याला दोन थप्पड लागवण्यापेक्षा" सौम्य असल्याने पक्षाने समज देण्यावर भागू शकते (रच्याकने अशी समज सेनेने गायकवाडांना दिली होती आणि कारणे दाखवा नोटीसही बजावली होती).

गेलाबाजार सर्व शाळांनी या खासदारांना शाळेत यायची बंदी घ्यालायला हवी होती :)

निष्पक्ष सदस्य's picture

28 Mar 2017 - 8:05 pm | निष्पक्ष सदस्य

असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना असेच वठणीवर आणले पाहिजे. समजतात काय लेकाचे स्वतःला.

मुजोर लोकप्रतिनिधींची तशी टक्केवारी काढायला गेली तर ती जास्त भाजप मध्येच आढळेल.
पण भाजपने मिडिया वगैरे सगळं हायजॅक केलं असल्याने ते दाखवत नसतात.
उगाच निरीक्षण करीत होतो,ते हिंदी चॅनेलवाले किती तिरस्काराने गायकवाड प्रकरणाची बातमी प्रेझेंट करत होते,हरामखोर लेकाचे आहेत सगळे.तो योगी तिकडे कायतरी गोमाता,मानसरोवर,इ.थेरं करत बसला आहे,त्याचे ह्यांना फार कौतुक.

इन्द्र's picture

28 Mar 2017 - 9:42 pm | इन्द्र

उस्मनबद चि मन्दलि चन्गलि अहेत

पुंबा's picture

30 Mar 2017 - 4:58 pm | पुंबा

श्म्त..

श्रीगुरुजी's picture

28 Mar 2017 - 11:23 pm | श्रीगुरुजी

काल सकाळी कधीतरी हा धागा वाचला होता. अभ्याचे प्रतिसाद आवड्ले :-P

अत्रे's picture

29 Mar 2017 - 6:17 am | अत्रे

Why the Shiv Sena won't say sorry

२०१४ चा लेख आहे पण अजूनही तेवढाच लागू होतो.

In this case, the MPs' anger was provoked at a range of grievances that might turn out to be legitimate, though the person on whom they vent their anger could hardly be held responsible for them. But through the years, their anger has been provoked by anything, from Muslims/Dalits demanding their rights or merely asserting themselves, to officials refusing favours, to a railway station being painted green.

For Shiv Sainiks see themselves as Maharashtra's first citizens, and also as inheritors of Shivaji's legacy. For them, Shivaji is a symbol of Marathi Hindu pride, of independence from a perpetually hostile Delhi. Thus, being treated as nobodies in Delhi's Maharashtra Sadan, and that too by a non-Marathi official (Resident Commissioner Bipin Mallick), was the ultimate insult. It had to be avenged by the 'mards', as the Saamna editorial described them.

बाकी या पूर्ण प्रकरणात सामना मधे जी "स्मशानशांतता" आहे ती बघून थोडे चांगले वाटते. नशीब तिथे तरी समर्थन केले नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 12:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

एकूण काय, आम्ही पहिल्यापासूनच म्हणतोय कि या प्रकरणात ते खासदार, कर्मचारी आणि घडलेला प्रकार हे काहीच महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे ते "शिवसेना" :):).

याबाबद्दल मी इथे मत व्यक्त केलं होतं
http://www.misalpav.com/comment/929102#comment-929102

थोडक्यात माझ्यासारख्या शांतताप्रिय नागरिकांसाठी हा दुग्धशर्करा योग्य आहे :)

टायपिंग मिस्टेक - दुग्धशर्करा योग

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 12:20 pm | हतोळकरांचा प्रसाद

ओक्के! बाकी ही शांतताप्रियता पक्षसापेक्ष कशी काय असते कुणास ठाऊक :)

ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो एक वेगळा विषय, असो :) पण आजघडीला शिवसेनेला जी रिस्पेक्ट आहे ती अतिशय कमी आहे. यावर चिंतन त्यांनीच करावे, म्हणजे थोड्या अजून निवडणूक जिंकतील. जाऊदे.

ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो एक वेगळा विषय, असो :)
वेगळा कसा, धागाच पक्षसापेक्ष अन खुनशीपणाने काढलाय की.
पण आजघडीला शिवसेनेला जी रिस्पेक्ट आहे ती अतिशय कमी आहे.
कशाच्या तुलनेत कमीय? स्व. बाळासाहेबांच्या काळात अन नंतर अशी का? का इतर पक्षाच्या तुलनेत? ते टोटल तुमचे वैयक्तिक मत झाले. रिस्पेक्ट मोजायचे मीटर खासदारसंख्येवरुन ठरते काय?
यावर चिंतन त्यांनीच करावे,
ऑ..
म्हणजे थोड्या अजून निवडणुका जिंकतील. जाऊदे.
आता काय एक राष्ट्रपतीची इलेक्शन सोडली तर दुसरी काय नाय दृष्टीपथात. मध्यावधी वगैरे झाली तर बघतील त्यांचे ते.
अन धागा काढायच्याच आधी जाऊ दे म्हणून सोडायचे असते हो. इतकी पूर्वग्रहदूषित धुळवड आटपल्यावर कीती ती घाण असा आव कशाला?

अत्रे's picture

29 Mar 2017 - 1:17 pm | अत्रे

रिस्पेक्ट मोजायचे मीटर खासदारसंख्येवरुन ठरते काय?

फेसबुक लाईक्स मधून तरी मोजता येईल असे वाटते. या प्रकरणावर आलेल्या बातम्या आणि त्यावरच्या देशभरातून आलेल्या लाइक्स, प्रतिक्रिया बघून रिस्पेक्ट बद्दल निष्कर्ष काढता येईल .

धागाच खुनशीपणाने काढलाय की.

सामना चे अग्रलेख वाचूनच शिकलोय :)

विशुमित's picture

29 Mar 2017 - 2:15 pm | विशुमित

फेसबुक लाईक्स मधून तरी मोजता येईल असे वाटते

==> फेसबुकवर विसंबून राहण्यापेक्षा तुम्ही एकदा उस्मानाबादला जाऊन या.

तिथे जाऊन एक दिवस लाक्षणिक उपोषण वगैरे केले तरी चालेल. जीवाला आनंद वाटेल.

असेल असेल. समाजप्रबोधनाची गरज सगळीकडेच असते.

अभ्या..'s picture

29 Mar 2017 - 2:34 pm | अभ्या..

सामना चे अग्रलेख वाचूनच शिकलोय :)

अरारारारा,
अहो ते स्वतःचे नाव पत्ता देऊन लिहून छापणारे पब्लिक आहेत हो. काय झाले गेले तर निस्तरायची धमक आहे त्यांची. कशाला उगा न झेपणारे आदर्श घेताहात?

अत्रे's picture

29 Mar 2017 - 2:41 pm | अत्रे

हे मात्र बरोबर बोललात. इंटरनेट anonimity मुळे माझ्यासारख्या नागरिकांना फायदाच झालेला आहे. जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते. सध्या तरी मी यांचा तात्पुरता माज उतरलेला पाहून संतुष्ट आहे. मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही.

जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते.
ह्याला निर्भयपणा म्हणत नसतात हो, ट्रोलिंग म्हणतात.
असल्या भाषेत लिहून मोकळे व्हायचीच भावना होत असेल तर मग डायरी ठेवा ना.

अत्रे's picture

29 Mar 2017 - 3:16 pm | अत्रे

मग डायरी ठेवा ना.

कशाला. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे ना मला! फुकट कशाला घालवू ते.

आणि इतरांना व्यक्त होताना बघून जे व्यक्त झाले नाहीत त्यांनाही हुरूप येईल.

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 3:12 pm | श्रीगुरुजी

मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही.

नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबईत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे एका महाविद्यालयीन मुलीने चेपुवरील आपल्या भिंतीवर "बाळासाहेब ठाकरे गेले म्हणून बंद पाळणे योग्य नाही" अशा अर्थाची १-२ वाक्ये लिहिली होती. तिच्या एका मैत्रिणीने तिची पोस्ट लाईक केली होती. शिवसेनेच्या एका स्वाभिमानी, मर्दमावळा, शिवाजी महाराजांचा चेला, वाघ वगैरे असलेल्या कार्यकर्त्याने ही पोस्ट पाहिल्यावर त्याचे डोके फिरले आणि लगेच त्याने पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली. त्यानंतर लगेच सेनेच्या टोळक्याने तिच्या काकांच्या रुग्णालयात धुडगूस घालून मोडतोड केली. त्या दोन्ही मुली नंतर इतक्या घाबरल्या की त्यांनी पालघर सोडून गुजरातमध्ये शिकायला गेल्या.

२००१ मध्ये आनंद दिघेंचे सिंघानिया रूग्णालयात निधन झाल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे हल्ला करून रूग्णालयाला आग लावली व प्रचंड मोडतोड केली ज्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले.

सर्वसामान्य नागरिकांनी असल्या गुंडांच्या टोळीला घाबरूनच राहिले पाहिजे.

पक्षात सर्वसाधारणपणे कीती गुंड कार्यकर्ते अन त्यांच्यावर एफायार असल्यावर त्याला गुंडांची फौज म्हणायची पध्दत आहे?
आगी लावणे अन कोट्यावधींचे नुकसान करण्याच्या घटनांबद्दल ते काम पक्षाच्या गुंडानीच केले, ह्यात चिडलेले जनमानस वगैरे काही नव्हते असे आपणास म्हणायचे आहे का?

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 8:33 pm | श्रीगुरुजी

आगीसाठी कारणीभूत पक्षातील गुंडांनी न करता चिडलेल्या जनमानसाने केले!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

छान युक्तीवाद!

अप्पा जोगळेकर's picture

30 Mar 2017 - 12:09 pm | अप्पा जोगळेकर

आनंद दिघे गेले, का गेले त्याबद्दल अनेक सुरस कथा ऐकल्या आहेत.
मला नक्की आठवत नाही पण बहुधा शिशिर शिंदेंच्या गाडीशी टक्कर झाली होती.
एकवेळ डॉक्टर बद्दल राग पण समजू शकतो पण जनक्षोभ असेल तरी काहीही संबंध नसलेल्या रुग्णांना त्रास देणे हा तर सरळ रानटीपणाच.

अहो माझा नाही हा युक्तीवाद.
आठवत नसेल तर ताण द्या बरं जरा. कुठे झाला होता बरं असा जनक्षोभ? ठाण्यापेक्षा बराच मोठा होता हो तो.

मोदक's picture

30 Mar 2017 - 2:10 pm | मोदक

गोध्रा का बाबरी..?

अप्पा जोगळेकर's picture

30 Mar 2017 - 4:07 pm | अप्पा जोगळेकर

मी इन जनरल लिहिले आहे. तुम्हाला उद्देशून नाही.

आजानुकर्ण's picture

29 Mar 2017 - 5:59 pm | आजानुकर्ण

गुरुजींशी सहमत. शिवसेना ही गुंडांचीच एक टोळी आहे. इथे त्या खासदाराच्या वागण्याचे समर्थन करणारे लोक पाहून जुन्या चर्चांची आठवण आली.

http://www.misalpav.com/node/23211
http://www.misalpav.com/node/23207

(अलीकडे गुरुजींशी काही काही बाबतीत सहमत होत असल्याचे मला आश्चर्य वाटत आहे.)

वरुण मोहिते's picture

29 Mar 2017 - 3:33 pm | वरुण मोहिते

टुकार पक्षच कार्यकर्ते ? कुठले कुठले पक्ष आहेत ?
लिस्ट द्या माझ्याकडे १० -२० गुंडांची फौज आहे
नक्की हा खरं..जस्ट एक चर्चा म्हणून. म्हणजे कुठले पक्ष कुठले कार्यकतें ??

अत्रे's picture

29 Mar 2017 - 3:35 pm | अत्रे

जाऊ द्या ना बाळासाहेब!

विशुमित's picture

29 Mar 2017 - 4:37 pm | विशुमित

तंतरली वाटते धागा लेखकाची. डायरेक्ट बाळासाहेबांचाच धावा चालू केला.

माणसाने सोसेल एवढ्याच फुशारक्या माराव्यात.

शेवटचे वाक्य मस्त आहे. लक्षात नाही ठेवले तर विमानातून उडता येत नाही. :)

अनुप ढेरे's picture

29 Mar 2017 - 4:58 pm | अनुप ढेरे

हा हा हा!

अभ्या..'s picture

29 Mar 2017 - 5:29 pm | अभ्या..

एकदा नावगाव लपवले की निर्लज्जपणे कसेही उडता येते हे मात्र लक्षात आले.

सेम, सेम! एकदा गुंडांची फौज पाळली की कसेही अग्रलेख लिहिता येतात. :)

वरुण मोहिते's picture

29 Mar 2017 - 3:41 pm | वरुण मोहिते

किती दिवसांपासून असे वाद चालू असतात त्यात बोलताना भाजप समर्थकांनी जी पातळी सोडली लोकांना नावे ठेवताना ती कोणीच सोडली नाही .
बाकी एकदा काय झालं माहितीये बजरंग दलामुळे अनेक मुली पळून गेल्या . आपण वरील घटना जी सांगत आहेत पालघर ची त्यात त्यांच्या आक्षेपार्ह कमेंट्स होत्या ते पण चुकीच्या वेळेला . मुलींच्या बाबतीत संघीय भूमिका माहिती असावी अशी अशा करतो .
अजून एकदा काय झालं संघामुळे ना एक हॉस्पिटल फोडावे लागले बंगलोर ला.
अजून एकदा काय झालं ते तुम्ही सांगा मी सांगत राहतो .

मराठी_माणूस's picture

29 Mar 2017 - 3:45 pm | मराठी_माणूस

एक विचार

त्या अधिकार्‍याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ?

विशुमित's picture

29 Mar 2017 - 4:34 pm | विशुमित

हा सयंत विचार अगदी पटला.

त्या अधिकाऱ्यासाठी गायकवाड हे प्रथम त्यांचे ग्राहक होते नंतर खासदार एवढा संकेत पाळला असता तर त्याला २५ जोडे खावे लागले नसते.

आणि मोदीजी काय कॉल सेंटर ऑपरेटर आहेत का विमान वाहतूक वाल्यांचे?

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 8:35 pm | श्रीगुरुजी

त्या अधिकार्‍याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ?

चूक मान्य केली असती???????

त्या कर्मचार्‍याने नक्की कोणती चूक मान्य करायला हवी होती व त्या चुकीतून मार्ग काढायला हवा होता?

मानले... पेंग्विनसेना समर्थकांना मानले.

कोणत्याही परिस्थितीत आपल्याच पक्षाचे कडवे समर्थन कसे करावे, संबंधित मनुष्य खासदार असल्यामुळे या प्रकरणात कायद्याची बूज राखायची जास्त जबाबदारी त्याच्याकडे होती वगैरे प्रश्नांना मनात जराही येऊ न देता वर इतर पक्षांच्या समर्थकांना भक्त कसे म्हणावे हे पेंग्विनसेना समर्थकांकडूनच शिकावे.

मानले... पेंग्विनसेना समर्थकांना मानले.

अमर विश्वास's picture

29 Mar 2017 - 5:08 pm | अमर विश्वास

अभ्या / मोहिते / विशुमित

प्रतिक्रिया वाचुन गम्मत वाटली

भाजप ला फाटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना एक गोष्ट लक्षात नाही का?

या खासदारसाहेबांनी एका माणसाला २५ वेळा चपलेने मारले .. वर ही गोष्ट अभिमानाने सांगितली ...

ह्या गोष्टीचे तुम्ही अप्रत्यक्षपणे समर्थन करीत आहात

विशुमित's picture

29 Mar 2017 - 5:40 pm | विशुमित

भाजपचा इथे कसा संबंध जोडला कळले नाही ? उलट भाजप वासियांनाच जास्त जोर चढलेला दिसला आहे. वरून आम्ही गुंडाना घाबरतो म्हणून पदरा आडून ठुसक्या सोडत आहेत.
अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ?
प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला?

सर्वात महत्वाचं आम्ही (पक्षी: मी) कोणाचं आणि कशाचं समर्थन करायचं याची पण परवानगी घ्यावी लागणार का मिपावर?

अप्पा जोगळेकर's picture

29 Mar 2017 - 6:00 pm | अप्पा जोगळेकर

प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला?
गायकवाडने तर फुशारक्या मारल्या होत्या. निषेध केल्याचे आठवत नाही. एक नंबरचा उद्दाम, बिनडोक माणूस आहे.
(माझे नाव सौरभ जोगळेकर असून मी चिंचवडमधे राहतो. मी पेंग्विनसेना, गायकवाड, राष्ट्रवादी, शरद पवार यांचा जाहीर विरोधक आहे. नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचा जाहीर समर्थक आहे. मी गायकवाड बद्दल केलेल्या सगळ्या विधानांची जबाबदारी घेतो. (संपादित) )

विशुमित's picture

29 Mar 2017 - 6:03 pm | विशुमित

चिंचवड मध्ये कोठे?

विशुमित's picture

29 Mar 2017 - 6:07 pm | विशुमित

<em>(संपादित)</em>

<em>"सभासदांनी आपल्या भाषेवर ताबा ठेवावा आणि वैयक्तिक शेरे मारणे टाळावेत. संभाषण केवळ मुद्द्यांपुरते सीमीत ठेवावे."
--- संपादक मंडळ</em>

अमर विश्वास's picture

29 Mar 2017 - 6:14 pm | अमर विश्वास

<<परत आम्ही २५ वेळा जोड्याने मारल्यावर सहन नाही होयचा अप्पाना..!!>>>
ही जाहीर धमकी समजायची का?

गॅरी ट्रुमन's picture

29 Mar 2017 - 8:27 pm | गॅरी ट्रुमन

अप्पा आपली लायकी आणि लेवल समजली...!!

हे आणि

संपादकांनी लक्ष घालावे..

हे

ही दोन वाक्ये एकाच दमात कसे लिहू शकता हो?तुमच्या कॉन्फिडन्सचे (की फाजील आत्मविश्वासाचे) खरोखरच कौतुक वाटते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 8:48 pm | हतोळकरांचा प्रसाद

सर्व जुन्या जाणत्या सदस्यांना (लहान तोंडी मोठा घास घेऊन) विनंती करतो की थोडं सबुरीने घ्यावे. उगाच वैयक्तिक मुद्दे आणि गुद्दे कशाला? सर्वांचेच वेगवेगळे दृष्टिकोन आणि मतं असू शकतात आणि त्याला मुद्देसूदपणे काउंटर केलं जाऊ शकतंच ना? बाकी आपण सगळे सुज्ञ आहोतच!

आक्षेपार्ह्य वक्त्यव्य गाळल्याबद्दल संपादकांचे आभार!

गॅरी ट्रुमन's picture

29 Mar 2017 - 8:54 pm | गॅरी ट्रुमन

उगाच वैयक्तिक मुद्दे आणि गुद्दे कशाला? सर्वांचेच वेगवेगळे दृष्टिकोन आणि मतं असू शकतात आणि त्याला मुद्देसूदपणे काउंटर केलं जाऊ शकतंच ना?

सहमत आहे. पण ज्यांनी इतरांची लायकी आणि लेवल काढली त्यांना हे सर्वप्रथम लागू आहे असे वाटत नाही का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 9:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो, म्हणूनच सर्व जुन्या जाणत्या असा उल्लेख केला. तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देताना फक्त तुम्हालाच उद्देशून असा हेतू नव्हता. गैरसंजबद्दल दिलगिरी.

सहमत आहे. पण ज्यांनी इतरांची लायकी आणि लेवल काढली त्यांना हे सर्वप्रथम लागू आहे असे वाटत नाही का?
==>> अप्पानी आणि मी आमचा प्रश्न सोडवला आहे. संपादकांनी पण त्यांचे काम चोख बजावले आहे. तुम्ही का एवढे टरिला लागले समजले नाही.

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 9:02 pm | श्रीगुरुजी

(संपादित)

हे वक्तव्य सुद्धा आक्षेपार्ह आहे. ही तर उघडउघड धमकीच आहे. हे वक्तव्या सुद्धा काढून टाकले पाहिजे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 9:04 pm | हतोळकरांचा प्रसाद

सहमत!

गॅरी ट्रुमन's picture

29 Mar 2017 - 9:09 pm | गॅरी ट्रुमन

सहमत आहे.

अशाप्रकारच्या धमक्या मिपावर राहू दिल्या तर मिपा हे सुसंस्कृत लोकांचे संकेतस्थळ आहे या समजाला तडा जाईल.

विशुमित's picture

30 Mar 2017 - 10:33 am | विशुमित

चर्चा चांगली चालली असताना त्यांनी अपशब्द वापरले आणि आम्ही फक्त त्याचे परिणाम काय होतील हे नमूद केले होते.

असो... आम्ही आमची पातळी सोडणार नाही, याची ग्वाही देतो..!!

अप्पा जोगळेकर's picture

30 Mar 2017 - 11:08 am | अप्पा जोगळेकर

मी ड-३०५, डीएसके कुंजबन, पुनावळे, चिंचवड येथे राहतो.
माझ्याकडून चुकीची भाषा वापरली गेली त्याबद्दल. दिलगीर आहे.
ही दिलगीरी रविंद्र गायकवाड बद्दल केलेल्या विधानासाठी नाही. माझ्या प्रतिसादातील चुकीच्या भाषेसाठी आहे. हे लक्षात घ्यावे.
गायकवाड बद्दलची माझी मते ठाम आहेत. माझ्यापुरता विषय संपला. तुम्हाला जे योग्य वाटते ते करावे.

अमर विश्वास's picture

29 Mar 2017 - 6:06 pm | अमर विश्वास

विशुमित

<<<सर्वात महत्वाचं आम्ही (पक्षी: मी) कोणाचं आणि कशाचं समर्थन करायचं याची पण परवानगी घ्यावी लागणार का मिपावर?>>>
माझ्या प्रतिसादात परवानगी असा उल्लेख तरी आहे का?

बाकी तुम्ही तुमच्या विचारसरणीनुसार कशालाही / कुणालाही सपोर्ट करा .. काय फरक पडतो ?

पण विरोधी मते ऐकायची तयारी ठेवा ..

या खासदारसाहेबांच्या वागण्याचे कुठल्याच पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही. सर्वप्रथम त्यांनी आपल्या कृत्याची माफी मागितली पाहिजे

तुमच्या आणि माझ्या समर्थनाला कोण विचारतो इथे?

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 8:43 pm | श्रीगुरुजी

अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ?

गेल्या २-३ वर्षात अनेकवेळा असे दिसून आले आहे की मोदी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू इ. नेत्यांशी ट्विटर किंवा इतर माध्यमातून आपल्या समस्यांबद्दल संपर्क साधला तर ते तातडीने त्यात लक्ष घालतात. एका उदाहरणात रेल्वेचा एक टीसी पैसे मागत असताना त्या प्रवाशाने सुरेश प्रभूंच्या ट्विटर खात्यावर याची माहिती दिल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्‍यांशी संपर्क केला व त्या टीसीला पुढील स्थानकावर उतरवून निलंबित करण्यात आले. दुसर्‍या एका प्रकरणात एका महिलेला रेल्वेत प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तिच्या यजमानांनी ट्विटरवरून प्रभूंशी संपर्क केल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. परदेशस्थ भारतीयांना परदेशात येणार्‍या समस्यांबद्दल सुषमा स्वराजांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. शस्त्रक्रिया किंवा इतर काही गोष्टींसाठी मोदींच्या ट्विटर खात्यावर माहिती दिल्यानंतर मोदींनी व्यक्तिशः लक्ष घालून मदतीची व्यवस्था केल्याचेही वाचले आहे.

मोदी किंवा इतर काही नेते आपल्या समस्येत व्यक्तिश: लक्ष घालून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात हे आता सर्वश्रुत असल्याने, या खासदार महाशयांनी विमान अडवून ठेवून अरेरावी सुरू केल्यावर त्या कर्मचार्‍याने मोदींकडे तक्रार करीन असे सांगणे योग्यच आहे कारण त्यामागे मोदींनी कमावलेला विश्वास आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 9:02 pm | हतोळकरांचा प्रसाद

मोदकजी, मोदींचं नाव हे त्या "इतर" प्रकरणांसारखे पोजीटीव्ह स्पिरिट मध्ये घेतले गेले होते असे आपल्याला खरेच वाटते का? "आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे. तिथून ते शिवीगाळ आणि धक्काबुक्कीमुळे वाढतच गेले असावे. याला राजकीय रंग व फक्त सेवा दिली नाही म्हणून चपलेने फोडून काढले असा रंग देणे पटत नाही. त्यांनी मारहाण केली असेल तर त्यांच्यावर मारहाण केल्याबद्दल कायद्यात असते ती शिक्षा व्हायला हवीच, पण त्याच वेळी एका संसद सदस्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि अरेरावी झाली असेल तर ती करणार्यांना सोडले जाऊ नये असे वाटते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 9:08 pm | हतोळकरांचा प्रसाद

दुरुस्ती : चुकून मोदकजी लिहिलं, श्रीगुरुजी असं म्हणायचं होतं

काय राव हतोळकर... माझ्या भावना दुखावल्या की वो..! =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 11:49 am | हतोळकरांचा प्रसाद

आय मायस्वारी बर्र का, घ्या सांभाळून :):).

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 9:12 pm | श्रीगुरुजी

"आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे.

ही वाक्ये ज्या चित्रफितीत ऐकू येतात त्या चित्रफितीची लिंक आहे का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 9:18 pm | हतोळकरांचा प्रसाद

चपलेने २५ वेळा (२५ वेळा सोडून द्या एक वेळाही) मारले हे कुठल्या चित्रफितीत दिसले? खासदारांनी सांगितले म्हणूनच ते वापरले जातेय ना? मग हे खासदारांनीच सांगितले आहे (त्यांच्या प्रतिक्रियांचे विडिओ बघून घ्या). शिवाय त्या हवाईसुंदरीने साधारण ह्याच लाईनवर सांगितले आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 10:56 pm | श्रीगुरुजी

मी कर्मचाऱ्याला २५ वेळा चपलेने मारले, हे खासदारांनी स्वतःबद्दल सांगितले आहे. इतरांनी त्यांच्यावर हे आरोप केलेले नाहीत. त्यामुळे इतरांनी ते सिद्ध करणे अपेक्षित नाही.

मात्र हेच खासदार कर्मचारी अमुक बोलला, तमुक बोलला असे सांगत आहेत. ते आरोप त्यांनी सिद्ध करणे अपेक्षित आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Mar 2017 - 11:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

परत वाचा. आपल्याला हवे तसे अर्थ व्हिडिओतून निघतात, पेपरमधून निघतात, प्रतिक्रियांमधून निघतात.

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 11:45 pm | श्रीगुरुजी

इथे मला कोणता अर्थ हवा आहे हा प्रश्नच उद्भवत नाही. आपण अमुक एक पराक्रम गाजविला याची जाहीर कबुली खासदार महाशयांनी दिली आहे. त्यामुळे इतरांनी ते सिद्ध करण्याचा प्रश्नच नाही.

त्याचवेळी कर्मचारी काहीतरी वावगे बोलला असा त्यांचा आरोप आहे. त्या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी सबळ पुरावे देणे आवश्यक आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 12:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

का बुआ, "मी मारले" हा त्यांचा स्वतःबद्दलचा क्लेम मान्य आणि "मी त्यांना शांततेने आदराने बसून बोलू, तुम्ही बुजुर्ग आहात...." हा स्वतःबद्दलचा क्लेम अमान्य? बाकी जसे मारल्याचे फक्त खासदारांचे म्हणणे हा पुरावा मान्य आहे तसे का मारले हे म्हणणे तत्त्वता: विरोधी पुरावा मिळेपर्यंत तरी गृहीत धरायला नको का? इथे कोणी वकील मंडळी असतील तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून असल्या फुशारक्यांचे स्थान सांगू शकतील. बाकी ज्यांना फक्त त्यांच्या वाक्याचा वापर करायचा आहे त्यांना विरोधी पुराव्यांची गरजच नसावी.

परत एकदा समजून घ्या, गायकवाडांनी जर मारहाण केली असेल मग ती २ चापट असू कि २५ चपला, तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याची न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हावी. पण जशी विमान कंपनीने केस टाकली आहे तशीच ती खासदारांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याबद्दल टाकली आहे. हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून एकांगी फटकेबाजी चालू ठेवायचीच असल्यास त्याला पर्याय नाही. मग व्हिडिओत हवे ते दिसते, ऐकायला येते, पेपर पक्षप्रेमी होऊ शकतो आणि प्रतिक्रिया ह्या पेंग्विनसेनासमर्थनार्थ होऊ शकतात.

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 2:51 pm | श्रीगुरुजी

का बुआ, "मी मारले" हा त्यांचा स्वतःबद्दलचा क्लेम मान्य आणि "मी त्यांना शांततेने आदराने बसून बोलू, तुम्ही बुजुर्ग आहात...." हा स्वतःबद्दलचा क्लेम अमान्य? बाकी जसे मारल्याचे फक्त खासदारांचे म्हणणे हा पुरावा मान्य आहे तसे का मारले हे म्हणणे तत्त्वता: विरोधी पुरावा मिळेपर्यंत तरी गृहीत धरायला नको का? इथे कोणी वकील मंडळी असतील तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून असल्या फुशारक्यांचे स्थान सांगू शकतील. बाकी ज्यांना फक्त त्यांच्या वाक्याचा वापर करायचा आहे त्यांना विरोधी पुराव्यांची गरजच नसावी.

एक सांगा. त्यांनी कर्मचार्‍याला चपलेने मारले का नाही मारले. त्यांनी मारले हा आरोप त्यांच्यावर इतर कोणीही करत नसून त्यांनी स्वतःहूनच हे सांगितले आहे. या क्षणापर्यंत त्यांनी ते नाकारलेले नाही. त्यांनी कर्मचार्‍याला खरंच मारले होते का हे सिद्ध करण्याची जबाबदारी इतरांवर नाही कारण इतर कोणीही हा आरोप केलेला नाही. त्यांनी स्वतःहूनच कबुली दिल्याने आता त्याच्यात कोणीही काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.

परंतु कर्मचारी बेताल वागला, अपशब्द वापरले हे आरोप त्यांनी कर्मचार्‍यावर केले आहेत. जो दुसर्‍यावर आरोप करतो, त्याच्यावरच ते आरोप सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी असते. ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर ही जबाबदारी नसत. त्याने नुसते आरोप नाकारले तरी ते पुरेसे असते. त्यामुळे खासदार महाशय कर्मचार्‍यावर जे आरोप करीत आहेत, ते सिद्ध करणे हे कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यावर बंधनकारक आहे.

परत एकदा समजून घ्या, गायकवाडांनी जर मारहाण केली असेल मग ती २ चापट असू कि २५ चपला, तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याची न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हावी. पण जशी विमान कंपनीने केस टाकली आहे तशीच ती खासदारांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याबद्दल टाकली आहे. हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून एकांगी फटकेबाजी चालू ठेवायचीच असल्यास त्याला पर्याय नाही. मग व्हिडिओत हवे ते दिसते, ऐकायला येते, पेपर पक्षप्रेमी होऊ शकतो आणि प्रतिक्रिया ह्या पेंग्विनसेनासमर्थनार्थ होऊ शकतात.

आपल्याला धक्काबुक्की व शिवागीळ झाली हे सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी खासदार महाशयांवर आहे. त्याचवेळी विमान कंपनीने आपल्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याची व विमानाला खोळंबा केल्याची केस टाकली आहे त्यात फार काही सिद्ध करण्यासारखे नाही कारण दस्तुरखुद्द खासदार महाशयांनीच कॅमेर्‍यासमोर या गुन्ह्याची जाहीर कबुली दिली आहे व ती कबुली न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईलच. अर्थात शिक्षा टाळण्यासाठी, "मी मारहाण केलीच नव्हती. फुशारक्या व पोकळ बढाया मारणे ही आमच्या पक्षाची व पक्षनेतृत्वाची संस्कृती आहे व त्याला अनुसरूनच मी मारहाण केलेली नसतानाच कॅमेर्‍यासमोर मारहाण केल्याच्या फुशारक्या मारल्या. अशा फुशारक्या मारल्या तर माझा व माझ्या पक्षाचा भाव वाढेल असे मला वाटले." असा खासदार महाशयांनी न्यायालयात स्टँड घेतला तर मात्र मारहाण झाली हे सिद्ध करण्याची जबाबदारी कर्मचार्‍याची राहील.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 3:12 pm | हतोळकरांचा प्रसाद

मग हाच तर मुद्दा सांगण्याचा प्रयत्न आहे ना? मी अमुक केले तमुक केले ह्या नुसत्या कबुलीला न्यायालयात काहीही स्थान नाही, त्याला परिस्थितीजन्य पुरावे किंवा प्रत्यक्ष साक्षीदार लागतात. तेव्हा न्यायालयाला करू देत ना त्यांचे काम. आधी तुम्हाला राग कशाचा आहे ते ठरवा. त्यांनी फुशारक्या मारल्या म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कि त्यांनी मारले म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे? कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत का? हवाईसुंदरीने विमान अधिकाऱ्याच्या तोंडून काहीतरी अपमानास्पद गेले आणि मग भांडण सुरु झाले असे सांगितले नाही का? ह्या सगळ्या गोष्टींचा निवाडा न्यायालयात होणे गरजेचे आहे. त्याआधीच तुम्हाला शिवसेना आवडत नाही आणि सदर प्रकरणातील खासदार हे त्या पक्षाचे आहेत म्हणून लगेच त्यांच्यावर आसूड ओढणे मला तरी पटत नाही.

बाकी फुशारक्या मारणे आणि पोकळ बढाया मारणे अजून कोण कोणत्या पक्षाची संस्कृती आहे हे वेगळे सांगणे न लगे. तो इथला मुद्दाच नाहीये, तुमचा तो शिवसेनेवरचा वैयक्तिक राग आहे असे मला वाटते.

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 3:33 pm | श्रीगुरुजी

मग हाच तर मुद्दा सांगण्याचा प्रयत्न आहे ना? मी अमुक केले तमुक केले ह्या नुसत्या कबुलीला न्यायालयात काहीही स्थान नाही, त्याला परिस्थितीजन्य पुरावे किंवा प्रत्यक्ष साक्षीदार लागतात. तेव्हा न्यायालयाला करू देत ना त्यांचे काम.

चुकीची माहिती आहे. कोणत्याही खटल्याची सुनावणी सुरू होताना सर्वात प्रथम न्यायाधीश आरोपीला त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवितात व त्यावर "गिल्टी ऑर नॉट गिल्टी?" असे त्याला विचारतात. जर "नॉट गिल्टी" असा त्याने दावा केला तर पुढील सुनावणी सुरू होतो व फिर्यादीला आरोपीच्या विरूद्ध असलेले पुरावे सादर करावे लागतात. जर आरोपीने या प्रश्नावर "गिल्टी" असे पहिल्याच फटक्यात कबूल केले तर खटला पुढे चालविण्याची गरजच नसते.

हा खटला भविष्यात कधीकाळी सुरू झाला व खासदार महाशय आपल्या दाव्यावर ठाम राहिले तर एका मिनिटात खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन त्यांना शिक्षा ठोठावली जाईल. "आपण मारहाण केलीच नाही. कर्मचार्‍याला मारहाण केल्याची नुसती फुशारकी मारली." असा त्यांनी न्यायालयात दावा केला तर मात्र आपल्याला मारहाण झाली हे कर्मचार्‍याला सिद्ध करावे लागेल.

जोपर्यंत खासदार आपल्या कबुलीला चिकटून आहेत तोपर्यंत पुरावे, साक्षीदार इ. ची गरज नाही.

आधी तुम्हाला राग कशाचा आहे ते ठरवा. त्यांनी फुशारक्या मारल्या म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कि त्यांनी मारले म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे?

दोन्ही गोष्टींचा राग आहे. परंतु फुशारक्या मारणे हा कायदेशीर गुन्हा नाही. ही एक मानसिक प्रवृत्ती आहे. परंतु मारहाण करणे हा गुन्हा असल्याने याच गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी.

कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत का? हवाईसुंदरीने विमान अधिकाऱ्याच्या तोंडून काहीतरी अपमानास्पद गेले आणि मग भांडण सुरु झाले असे सांगितले नाही का? ह्या सगळ्या गोष्टींचा निवाडा न्यायालयात होणे गरजेचे आहे. त्याआधीच तुम्हाला शिवसेना आवडत नाही आणि सदर प्रकरणातील खासदार हे त्या पक्षाचे आहेत म्हणून लगेच त्यांच्यावर आसूड ओढणे मला तरी पटत नाही.

सदर प्रकरणातील खासदार कोणत्याही पक्षाचे असते तरी मी टीका केलीच असती. हवाईसुंदरीने जे काही सांगितले ते फक्त मटा, लोकसत्ता याच वृत्तपत्रातील आंतरजाल आवृत्तीत दिसले. त्यांच्या छापील आवॄत्तीत त्यांनी हे छापलेले नाही. इतर माध्यमांनी सुद्धा त्या निवेदनाची दखल घेतल्याचे वाचण्यात आले नाही. तिची ओळखही लपविलेली आहे. त्यामुळे ते जे निवेदन होते ते कितपत जेन्युईन आहे याविषयी साशंक आहे.

बाकी फुशारक्या मारणे आणि पोकळ बढाया मारणे अजून कोण कोणत्या पक्षाची संस्कृती आहे हे वेगळे सांगणे न लगे. तो इथला मुद्दाच नाहीये, तुमचा तो शिवसेनेवरचा वैयक्तिक राग आहे असे मला वाटते.

शिवसेनेवर माझा राग आहेच व मी तो कधीच लपविलेला नाही. परंतु हा राग विनाकारण किंवा अनाठायी नाही हे या व आधीच्या इतर अनेक प्रकारणांवरून सिद्ध झाले आहे. शिवसेनेवर टीका करण्याची संधी शिवसेनेच्याच खासदार महाशयांनी मिळवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला नावे का ठेवता हा इतरांना प्रश्न न विचारता शिवसेनेलाच विचारणे योग्य ठरेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 5:11 pm | हतोळकरांचा प्रसाद

क्लॉजेस काढायचे असतील तर खूप निघतात. बाकी ते हवाईसुंदरीचं मटात आल्याचं तुम्ही फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. हि घ्या अजून काही वर्तमानपत्रे -

http://www.mid-day.com/articles/air-india-air-hostess-defends-osmanabad-...

आणि हे पण वाचाच -
http://myvoice.opindia.com/2017/03/why-did-english-media-ignore-the-fact...

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2017 - 8:47 pm | श्रीगुरुजी

प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला?

बापरे. म्हणजे आता कोणत्याही खासदाराशी बोलताना हा कधीही चपलेने मारू शकतो याची जाणीव ठेवूनच कर्मचार्‍यांनी बोलले पाहिजे आणि ते सांगतील त्यापुढे मान तुकविली पाहिजे.

खरं तर त्या कर्मचार्‍याचीच चूक आहे. हे खासदार मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून इतरांना चपलेने बडविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख कर्मचारी विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.

श्रीगुरुजी,

अहो काहीतरीच काय म्हणताय!

१.

म्हणजे आता कोणत्याही खासदाराशी बोलताना हा कधीही चपलेने मारू शकतो याची जाणीव ठेवूनच कर्मचार्‍यांनी बोलले पाहिजे आणि ते सांगतील त्यापुढे मान तुकविली पाहिजे.

यापुढे एअर इंडियाने प्रवास करतांना व्यवसायवर्गाचं तिकीट हातात असतांना जनता वर्गानं जावं लागलं तरी उपकारांच्या ओझ्याखाली दबून जाऊन मुकाटपणे प्रवास केला पाहिजे. जरी बोर्डिंग पासवर व्यवसायवर्ग छापलेलं असलं तरीही तोंडातनं चकार शब्द काढता कामा नये. तक्रारपुस्तिका मागितल्यावर मिळाली नाही तरी गप्प बसून राहिलं पाहिजे. कारण की कोणी कर्मचारी मारायला अंगावर धावून आला असता प्रतिकार केल्यास प्रवाशास विमानबंदी होऊ शकते.

२.

खरं तर त्या कर्मचार्‍याचीच चूक आहे. हे खासदार मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून इतरांना चपलेने बडविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख कर्मचारी विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.

खरंतर खासदाराची चूक आहे. एअर इंडिया मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून तक्रारपुस्तिका न देता मोदींकडे उलट गाऱ्हाणं मांडण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख खासदार विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.

आ.न.,
-गा.पै.

शार्दुल_हातोळकर's picture

30 Mar 2017 - 12:52 am | शार्दुल_हातोळकर

पण हे पुर्वग्रहदुषित आणि एकांगी विचार असणाऱ्या तथाकथीत तज्ञांना पटणार नाही.

कारण मुळातच चर्चा ही निकोप आणि संतुलित असावी हे काही लोकांच्या खिजगिणतीतही नसते.

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 2:35 pm | श्रीगुरुजी

यापुढे एअर इंडियाने प्रवास करतांना व्यवसायवर्गाचं तिकीट हातात असतांना जनता वर्गानं जावं लागलं तरी उपकारांच्या ओझ्याखाली दबून जाऊन मुकाटपणे प्रवास केला पाहिजे. जरी बोर्डिंग पासवर व्यवसायवर्ग छापलेलं असलं तरीही तोंडातनं चकार शब्द काढता कामा नये. तक्रारपुस्तिका मागितल्यावर मिळाली नाही तरी गप्प बसून राहिलं पाहिजे. कारण की कोणी कर्मचारी मारायला अंगावर धावून आला असता प्रतिकार केल्यास प्रवाशास विमानबंदी होऊ शकते.

विमानात मुळात बिझनेस क्लासची आसनेच नसताना केवळ हे महाशय विमानात येणार म्हणून त्यांच्याकरता आयत्यावेळी तशा आसनांची सोय करायची होई का? व्यवसायवर्गाचं कूपन हातात असलं तरी विमानात ती सोय असल्याशिवाय यांना व्यवसायवर्गात कसं बसविणार? जर त्यांना जनता क्लासमधून प्रवास करायची इच्छा नव्हती तर त्यांनी त्या विमानातून दिल्लीला न जाता ज्यात व्यवसायवर्गाची सोय आहे असे विमान बघून त्यातून प्रवास करायला हवा होता. ते न करता हे जनता क्लासमध्ये बसून दिल्लीला पोहोचले आणि नंतर मला व्यवसाय वर्ग का दिला नाही म्हणून वादविवाद सुरू केला.

जर विमानात व्यवसायवर्गाची आसने असतानासुद्धा यांना ते आसन न देता जनता क्लासमधून प्रवास करायला लावला असेल तर ते नक्कीच चु़कीचे आहे व त्यांची तक्रार योग्य आहे. पण विमानात तशी आसने नसताना सुद्धा हे त्याबद्दल तक्रार कसे करू शकतात. मुंबईत बोरीबंदर स्थानकावरून फास्ट लोकलची घोषणा ऐकूनसुद्धा फास्ट लोकलमध्ये बसून नंतर ती लोकल दादरनंतर थेट अंधेरीलाच थांबली, मला तर माटुंग्याला उतरायचे होते, पण यांनी मुद्दामच लोकल माटुंग्याला थांबवली नाही अशी तक्रार एखाद्याने केली तर ते हास्यास्पद होणार नाही का? किंवा "शुद्ध शाकाहारी भोजन" असा फलक लावलेल्या उपाहारगृहात शाकाहारी थाळी चेपल्यानंतर बिल द्यायची वेळ आल्यावर "माझ्यावर अन्याय झाला. मला मटण वाढलेच नाही. मला तक्रार करायची आहे." अशी भूमिका किती हास्यास्पद होईल. इथेही तसेच झाले आहे.

खरंतर खासदाराची चूक आहे. एअर इंडिया मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून तक्रारपुस्तिका न देता मोदींकडे उलट गाऱ्हाणं मांडण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख खासदार विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.

मोदींकडे तक्रार केल्यास मोदी व्यक्तिशः लक्ष घालून तक्रारीची दखल घेतात हा विश्वास मोदींनी कमावला आहे. त्यामुळे मोदींचे नाव सांगणे अजिबात चुकीचे नाही. खासदार ज्या शाळेत जातात त्या शाळेचे मोदी मुख्याध्यापक आहेत. या महाशयांनी अत्यंत हास्यास्पद कारणावरून विमान अडवून धरले होते व त्यामुळे इतर प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे कर्मचार्‍याने योग्य तेच केले आहे.

वरुण मोहिते's picture

30 Mar 2017 - 3:16 pm | वरुण मोहिते

पणा आणि भाजप ने योगीची केलेली निवड , भाजप च्या अनेक मारहाणीचे प्रकरण .. नुसतं बीजेपी बिटिंग टाकलं तरी लिंक येतात . ह्यावर विस्तृत लेखाच्या प्रतीक्षेत .
उद्दाम आणि सडकछाप अमित शहा ह्यावर एक लेख लिहाच माझं नाव ऍड्रेस अनेक लोकांना माहित आहे . नालायक अमित शहा ला मारलं पाहिजे असं शीर्षक ठेऊ . नेट आहे अभिव्यक्ती आहे . पण मी खऱ्या नावाने लिहितो ना . ते इंटरनेट मुळे लोकांना स्वातंत्र्य मिळालं असं नाही . मी बोलतो अमित हरामखोर मग काय ?? भक्त पार्टी ... काय ते पेंग्विन ना मग गो पार्टी म्हणू का भाजप ला ? नाव सुचवा कोणी >>>विनंती आहे

उद्दाम आणि सडकछाप अमित शहा ह्यावर एक लेख लिहाच

मी काय म्हणतो मोहिते साहेब.. तुम्ही सतत दुसर्‍याला लेख लिहायला का सांगता..?

तुम्हाला एखादा विषय / व्यक्ती / घटना टोचत असेल तर तुम्ही अभ्यास करून लेख लिहा आणि मग जी काय चर्चा व्हायची ती होवूदे.
लोकांनी लेख लिहावेत मग मी मते मांडणार ही भूमीका किती दिवस चालणार..?

वरुण मोहिते's picture

30 Mar 2017 - 3:58 pm | वरुण मोहिते

भूमिका आपली असते मोदक साहेब . अभ्यासुपूर्ण..मी काही अश्या विषयांवर लेख लिहीत नाही प्रतिसादांसाठी . अनेक विषय आहेत वेगळे .
आणि मला कोण टोचत नाही , दुटप्पी भूमिका टोचते .
मी भाषा सोडून पण बोलत नाही कधी

लेख लिहा लेख लिहा हि भूमिका आपली असते मोदक साहेब .

हो असते आणि फक्त तुमच्या बाबतीत, कारण तुम्ही स्वत: दुसर्‍याला तशी आवाहने करता म्हणून.

अभ्यासुपूर्ण..मी काही अश्या विषयांवर लेख लिहीत नाही प्रतिसादांसाठी . अनेक विषय आहेत वेगळे .

हे नक्की काय लिहिले आहे ते मला कळाले नाही. प्रतिसादांसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या भूमीकेसाठी आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी लेख लिहावा असे पूर्वी / आत्ता सुचवले आहे.

आणि मला कोण टोचत नाही , दुटप्पी भूमिका टोचते .

तेच. जे काही टोचत असेल त्यासाठीच सांगतोय. लेख लिहा आणि मग टोचणे बंद होते का ते बघा. तुम्हाला टोचत असलेल्या गोष्टींवरपण दुसर्‍याने इलाज शोधावा अशी अपेक्षा आहे का..?

मी भाषा सोडून पण बोलत नाही कधी

हे मी बोललो नाहीये. त्यामुळे पास.

वरुण मोहिते's picture

30 Mar 2017 - 4:39 pm | वरुण मोहिते

१)कितीशी आवाहने केली आहेत कळेल का ??का लिहा लिहा म्हणून मागे पडलोय .
काही विषय आवडतात त्यावर लिहा कोणाला बोलो असें त्यात काय आवाहन झाले का ??
२)प्रतिसादांसाठी म्हणजे एकांगी लिखाण राजकीय धोरणांचे असे लेख मी लिहणार नाही बोलो .जसा हा लेख .
३)इलाज कोणी शोधून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली का?? मी फक्त दुट्टपी भूमिकेबद्दल बोलो .बाकी आम्हाला काही टोचत नाही ,इंजेक्शन सोडून:)))

मोदक's picture

30 Mar 2017 - 4:51 pm | मोदक

जशी तुमची इच्छा..!

वरच्या प्रस्तावाला आमचे अनुमोदक :)

रेफरन्स साठी एक पुस्तक सुचवतो - गुजरात फाइल्स ( https://www.amazon.in/Gujarat-Files-Rana-Ayyub-ebook/dp/B01FWD9F2I)

फुकट पण मिळेल इबुक ऑनलाइन शोधल्यास.

भाजपाचे घोटाळे - देशाचे वाटोळे

या नांवाचे पुस्तक माझ्या संग्रही आहे. कोणाला लेख लिहायचे असल्यास मी देऊ शकतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 3:29 pm | हतोळकरांचा प्रसाद

त्यामुळे कर्मचार्‍याने योग्य तेच केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, अरेरावी, शिवीगाळयुक्त वागण्याचे आणि धक्काबुक्कीचे हे उघड समर्थन आहे, नाही का?

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 3:36 pm | श्रीगुरुजी

कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, अरेरावी, शिवीगाळयुक्त वागण्याचे आणि धक्काबुक्कीचे हे उघड समर्थन आहे, नाही का?

नाही. कर्मचार्‍याने असे केले आहे हे सिद्ध झालेले नाही किंवा मी हे केले अशा फुशारक्या कर्मचार्‍याने मारलेल्या नाहीत.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 5:15 pm | हतोळकरांचा प्रसाद

एखाद्याने उद्या मी या देशाचा पंतप्रधान आहे म्हणून फुशारक्या मारल्या तर तुम्ही मानालच ना? सिद्ध हे कोर्टात होत असते आणि ते व्हायची वाट बघायची तुमची इच्छा दिसत नाही. त्याआधीच त्याने काय केले हे स्वतःला हवे तसे गृहीत धरून चांगले केले असे उघड समर्थन तुम्ही करत आहात.

श्रीगुरुजी,

आपण समजतो त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत.

१.

व्यवसायवर्गाचं कूपन हातात असलं तरी विमानात ती सोय असल्याशिवाय यांना व्यवसायवर्गात कसं बसविणार?

मग 'जे' वर्गाचं चढपत्र (=बोर्डिंग पास ) कशाला छापलं? प्रवाशांना योग्य माहिती का दिली गेली नाही? ही सुविधा न पुरवल्याने गायकवाडांना तक्रार करावीशी वाटली असेल असं मानण्यास जागा आहे.

२.

मोदींकडे तक्रार केल्यास मोदी व्यक्तिशः लक्ष घालून तक्रारीची दखल घेतात हा विश्वास मोदींनी कमावला आहे.

हा विश्वास मोदींनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी पीडितांची तातडीने दखल घेतल्याने कमावला आहे. मात्र प्रस्तुत प्रसंगात मोदींचं नाव घेणारा पीडित नाही.

आ.न.,
-गा.पै.

मुंबईत काळ्या शाईचा स्टॉक संपला वाटतं. नाही, अजून मुंबई एअरपोर्टवर काही राडा झालेला नाही म्हणून विचारलं :D

विशुमित's picture

30 Mar 2017 - 10:39 am | विशुमित

राडा व्हावा हीच 'श्रीं'ची इच्छा दिसतंय. लांबून मजा बघायला बरं.
नकळतपणे हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत याचे भान विसरले आहेत बहुदा.

नकळतपणे हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत याचे भान विसरले आहेत बहुदा.

मिपावरच्या कमेंट वाचून कोणी माथेफिरू सैनिक हल्ले करणार असेल, तर त्याला लगेच कोठडीत पाठवण्यात येईल :)

ही २८ मार्च बातमी वाचा -
http://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-mp-ravindra-gaikwad-b...

मुंबई विमानतळावर राडा करण्याचा गर्भित इशारा शिवसेनेने दिल्याचे समजते.

एअरपोर्ट युनिअन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेनेचे आहेत म्हणून राड्याबदल बोलण्याची हिम्मत झाली असावी. एकदा चोप बसला आणि कामावरून काढून टाकले कि बसतील बोंबलत!

एकदा चोप बसला आणि कामावरून काढून टाकले कि बसतील बोंबलत!

"राडा केला तर" जे शब्द आधी घालायचे राहिले.

किसन शिंदे's picture

30 Mar 2017 - 10:47 am | किसन शिंदे

पण तुम्ही जाणून बुजून धागा पेटत ठेवण्याचा प्रयत्न करताय असं दिसतं.

अत्रे's picture

30 Mar 2017 - 10:52 am | अत्रे

काय करू सांगा मला! यापूर्वीच्या आयुष्यात एखाद्या राजकारण्याला इतक्या लवकर शिक्षा झाल्याचे कधी पहिलेच नव्हते. म्हणून माझा आनंद अनिवार झाला आहे. आणि आपण सामान्य नागरिकांकडे चीड व्यक्त करण्यासाठी शब्द सोडून दुसरे काय आहे? आपण काही नेतेलोकांसारखे चपलेने बडवू शकत नाही इतरांना. आणि बडवले तरी लगेच अटक होते.

आपण काही नेतेलोकांसारखे चपलेने बडवू शकत नाही इतरांना

आणि बडवण्याची भाषाही कोणी करू नये, कृती तर लांबच राहिली.

च्यायला, ते मारणारं चपलेने बडवून गेलं (25 कि काय वेळा वगैरे ) आणि इथं सदाचारी शार्दूलजींनी भाषेचा मुद्दा लावून धरलाय.

चपलामर्दनकार यांचा आदराने उल्लेख त्यांना हवा असावा.

देव न करो पण सदाचारींचे मुखमंडल जर आदरणीय च.म.का नी रंगवले असते तरीही त्यांनी भाषेचा आग्रह धरला असता का??

लोकांची प्रतिक्रिया जेव्हा सच्ची असते तेव्हा मुद्दा काय हे पहायचे असते हे सदाचारींना कधी कळणार.

त्या सडकछाप गायकवाडाने केलं ते कुठल्याही परीस्थीतीत (provoking / injustice असला तरी ही) चुकी चे च आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 11:43 am | हतोळकरांचा प्रसाद

हे मुद्द्याला सोडून लिहिण्याचं कारण काय? चांगल्या भाषेत लिहिण्याचा आग्रह करण्यात काय प्रॉब्लेम असू शकतो तुम्हाला? देव न करो तुम्हाला आईवर शिवी दिली असती आणि धक्काबुक्की केली असती तर तुम्ही काय केलं असतं? तुमचा तुमच्या मतांबद्दलचा आग्रह उतू जातोय हे खेदाने नमूद करतो. संपादक मंडळींनी असल्या वैयक्तीक हल्ल्यांकडे लक्ष ठेवावे हि विनंती. शिवाय बाजीगर साहेब आपला सात्विक संताप व्यक्त करण्याचा मार्ग तुम्हाला हवा तो स्वीकारता येतो, दुसऱ्यावर वैयक्तिक टीका करण्याची मुळीच आवश्यकता नाही. तुम्हाला हवी असेल तर वर लिहिलेल्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा तुम्ही वापरू शकताच, संपादक मंडळ समर्थ आहेच.

शार्दुल_हातोळकर's picture

30 Mar 2017 - 1:04 pm | शार्दुल_हातोळकर

चाललेय काय आणि लिहिताय काय?

म्हणजे मांडायला योग्य मुद्दे नसले की असे हे वैयक्तिक हल्ले सुचतात. विचारांना विचारांनी उत्तर द्यायलासुद्धा तेवढी कुवत असावी लागते.

आम्ही तुमच्या पातळीवर उतरुन लढु शकत नाही हे आधीच कबुल करतो. कारण आम्हाला आमची मते थेटपणे आणि स्वच्छ भाषेत मांडायला आवडतात, असे वैयक्तिक हल्ले करुन नाही.

आणि मी केवळ स्वच्छ भाषेचा नाही तर निकोप आणि संतुलित चर्चेचाही आग्रह धरला आहे. तुम्हाला आम्ही आमंत्रण दिले नाही आमच्या भूमिकेवर तुमचे मत मांडण्यासाठी. बरे आगंतुक म्हणुन का असेना मत योग्य भाषेत मांडावे तर तेही नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात तरी कुठुन येणार?

आणि आमचे मुखमंडल रंगवुन घेण्याइतकी पातळी आम्ही कधीच सोडत नाही, सबब त्याची चिंता तुम्ही करु नये. शिवाय सदाचारी म्हणवुन घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही.

आणि चर्चा वैयक्तिक हल्ले करुन भलतीकडेच भरकटविल्याने तुम्हाला आत्मिक समाधान मिळत असेल तर मग विषयच मिटला.

तुमचा मुद्दा बरोबर आहे पण तिसरं वाक्य अनावश्यक आहे असे नमूद करतो. इतर मिपा सदस्यांबद्दल शक्य होईल तेवढी वैयक्तिक टिप्पणी टाळावी. (मी वरती एका ठिकाणी केली होती पण त्याचा मला नन्तर पश्चाताप झाला.)

शार्दुल_हातोळकर's picture

30 Mar 2017 - 4:41 pm | शार्दुल_हातोळकर

तुम्ही माननिय बाजीगर यांच्या "च्यायला, ते मारणारं चपलेने बडवून गेलं (25 कि काय वेळा वगैरे ) आणि इथं...." या वाक्यावर "तुमचा मुद्दा बरोबर आहे" असे म्हणुन स्पष्ट सहमती दर्शविलीत.

मग प्रश्न हाच उरतो की जर तुमचा या प्रकरणाबद्दल अशाच प्रकारचा दृष्टीकोन होता, तर इथे हा असा विखारी धागा काढायला आलातच कशाला?

तर इथे हा असा धागा काढायला आलातच कशाला?

यायचे होते म्हणून :) तुम्ही पण आपल्या प्रतिसादांनी धाग्याला हातभार लावलात म्हणून आभार.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 11:48 am | हतोळकरांचा प्रसाद

वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या उद्दामपणाच्या बातमीकडे दुर्लक्ष झालेले दिसते. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे विश्लेषण करून आधीचा खासदार कसा फालतू आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रतिसादांच्या पायघड्या घालण्यात आल्या, पण या दुसऱ्या खासदारांकडे कसे काय बुवा दुर्लक्ष झाले असेल? यालाच पक्षसापेक्षता म्हणत असतील का? हा असा सिलेक्टिव्ह सात्विक संताप करायला कसे काय जमत असेल बुआ?

वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या उद्दामपणाच्या बातमीकडे दुर्लक्ष झालेले दिसते.

माफ करा. तेवढी बॅण्डविड्थ माझ्याकडे नाही. तुम्ही पाहिजे असल्यास नवीन धागा काढा त्या तिवारीवर आणि जे वाट्टेल ते लिहा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 12:03 pm | हतोळकरांचा प्रसाद

का बुआ? नवीन धागा का काढू मी? आणि नवीन धागा काढण्याचा, तुमच्या प्रतिक्रिया देण्याचा आणि बॅण्डविड्थचा काय संबंध? धागा तुम्ही टाकलेला आहे म्हणून तुम्हाला हव्या त्याच प्रतिक्रिया आणि त्याही तुम्हीच द्याव्यात असा काही नियम आहे का?

अत्रे's picture

30 Mar 2017 - 12:26 pm | अत्रे

तुम्हाला पाहिजे ते करा प्रसादराव. (शाब्दिक) गोंधळ घाला. इथे घाला, दुसऱ्या धाग्यात घाला, नका घालू. तुम्हाला पूर्ण अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे.

बॅण्डविड्थचा काय संबंध?

मेंटल बॅण्डविड्थ हो! मला हे तिवारी प्रकरण काय आहे ते माहित नाही आणि आत्ता त्यावर वादविवाद करण्यात मी वेळ खर्चू इच्छित नाही. इथे फक्त मी चप्पल आणि प्रवासबंदी यावर काँसंट्रेट केलं आहे.

बाकी तुम्हाला जी चर्चा करायची ती करा. ज्यांना इंटरेस्ट असेल ते प्रतिसाद देतीलच.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 2:39 pm | हतोळकरांचा प्रसाद

ज्यांना इंटरेस्ट असेल ते प्रतिसाद देतीलच.

बास, हे समजलं की झालं! बाकी गोंधळ आणि राडा मग तो शाब्दिक का असेना घालण्यात मला काडीचाही रस नाही, तुम्हाला तो आहे हे वर तुम्ही सांगितलेच आहे. त्यामुळे, चालू द्या!

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 2:16 pm | श्रीगुरुजी

तिवारीच्या बातमीवर मी आधीच उत्तर दिलेले आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 2:55 pm | हतोळकरांचा प्रसाद

तोच तर मुद्दा आहे, श्रीगुरुजी! तुमच्या ह्या "थोडक्यात" उरकलेल्या प्रतिसादामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न आहे. दोन उद्दाम खासदार, एकाबद्दल एवढी आगपाखड आणि दुसऱ्याला पक्षाने समज दिली आहे एवढ्यातच उरकायचे? काय बरे असेल कारण? पक्षाने समज गायकवाडांना पण दिली होती, वरून तो कायद्याने गुन्हा असल्याने गुन्हा पण दाखल आहे. मग या अशा खासदारांवर गुन्हा दाखल होऊन शिक्षा झालीच पाहिजे एवढेच म्हणून न थांबता, त्याची आणि त्याच्या पक्षाची एवढी लांबलचक चिरफाड करण्यामागचे कारण लपून राहू शकते का? आपला पक्षीय द्वेष प्रत्येक ठिकाणीच लागू करणे गरजेचे आहे का?

वास्तविक मनोज तिवारीने केलेला उद्दामपणा हा अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका महिलेचा केलेला विनयभंग नाही वाटत का? इथे तर दोन व्यक्तीत शिवीगाळ, धक्काबुक्की वगैरे काहीच झाले नव्हते. वरून एवढ्या लोकांसमोर असे एका खासदाराने महिलेला अपमानित करणे योग्य नाही असे निदर्शनास आणून दिल्यावर आधीच्या उद्दामपणापेक्षा जास्त उद्दामपणाने खासदारांनी "काय झाले , त्या महिलेने आत्महत्या केली का? तिला प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला का आहे?" असे विचाराने हे पक्षाने समज देण्याइतके छोटे आहे, हो ना? वास्तविक उत्तर दिले आहे, बॅण्डविड्थ नाही वगैरे मुखवटे आहेत, त्यावर चर्चा वाढली नाही कारण तो शिवसेनेचा नसून भाजप चा खासदार आहे. असा अजेंडायुक्त पक्षसापेक्ष युक्तिवाद करून काय होणार?

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 3:13 pm | श्रीगुरुजी

दोन घटनांमध्ये बराच फरक आहे. एका घटनेत सरकारी नोकराला मारहाण करणे, त्याच्या खुनाचा प्रयत्न करणे व विमानोड्डाणाला खोळंबा करणे हे प्रमुख आरोप आहेत. कायदेशीरदृष्ट्या हे गुन्हे आहेत.

दुसर्‍या घटनेत खासदाराचा उर्मटपणा व उद्दामपणा आहे व एका महिलेला कडक शब्दात सुनावून तिला खजील करणे आहे. हे कृत्य सुद्धा निषेधार्ह आहे. त्याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. परंतु कायद्यानुसार हा गुन्हा होऊ शकत नाही. "विनयभंग" हा फार भयंकर शब्द आहे. अपमानास्पद बोलणे म्हणजे "विनयभंग" नाही. महिलेला अश्लील शब्द ऐकविणे, तिच्याशी तिच्या इच्छेविना शारिरीक लगट करणे, अश्लील हावभाव इ. गोष्टी "विनयभंग" या गुन्ह्याखाली येतात. केजरीवाल किंवा इतर काही जण ट्विटर व इतर माध्यमातून मोदींबद्दल वाटेल त्या शब्दात टीका करतात. तसे करणे संतापजनक असले तो गुन्हा होऊ शकत नाही. इथेही तसेच झाले आहे.

जरी कायदेभंग झालेला दिसत नसला तरी तिवारीचे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 5:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहेत? पुरावे आहे त का आपल्याकडे काही? मनोज तिवारी हे भाजपचे असल्यामुळे त्यांचं वागणं कायदेशीर गुन्हा ठरतो कि नाही हे ठरवायची गरजच पडत नाही ना? शिवाय मनोज तिवारी तसं वागले म्हणजे भाजप हा पक्षच तसला आहे, मुजोर लोकांचा, महिलांचा सन्मान करणे वगैरे माहीतच नाही, त्यांचे नेतेच तसले आहेत तर अजून काय होणार...वगैरे वगैरे आलं नाही.

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 8:51 pm | श्रीगुरुजी

खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहेत? पुरावे आहे त का आपल्याकडे काही?

विमानातून उंचावरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे हे एखाद्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेच समजले जाते.

__________________________________________________________________________________________

कर्मचार्‍याचे व्हर्जन असे आहे.

Mr. Gaikwad had travelled by Air India Pune-Delhi flight (AI 852) on Thursday and hit the employee with his slippers after the plane landed in Delhi. He was travelling on an open ticket and was miffed with the fact that he was not allotted a business-class seat on the all-economy flight.

He also refused to deboard from the aircraft for an hour, following which a team of airline officials tried to reason with him as the plane was to fly on the Delhi-Goa sector next.

“When I asked my crew what was causing the delay, they told me all passengers, except one, had disembarked from the plane. They told me he was sitting in the front row and was saying he was an MP and that wanted to meet the senior management,” he recalled.

Mr. Sukumar then went into the aircraft to talk to the MP. “He asked me who I was and that he would only speak to the senior management. He also asked me to call the CMD,” the employee added.

“I told him I couldn’t and that I would complain to his higher-ups, if required to Modiji. As soon as I said that, he took out his slippers and started hitting me,” Mr. Sukumar said.

He also tried to push me through a door of the aircraft. I ducked and came to another door where the step-ladder was positioned. But he tried to lift me and throw me off the ladder. My colleagues then stopped him,” he added.

The MP also broke Mr. Sukumar’s spectacles and tore his sweater. The MP later boasted that he slapped the AI employee “25 times” and refused to apologise.

- आपण त्या कर्मचार्‍याला चपलेने २५ वेळा मारले असे दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी सांगितले आहे.

- गायकवाडांनी त्या कर्मचार्‍याला चपेलेने मारले व विमानाच्या दारातून शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न केला असे त्या तुमच्या हवाईसुंदरीनेच सांगितले आहे.

- http://www.timesnow.tv/india/video/watch-shiv-sena-mp-threatens-to-push-...

The video shows Gaikwad first threatening to push the staffer off the stairs leading out of the aircraft.

"No no, don't do that sir, don't do that," an Air India staff member is heard shouting when the MP tries push the staff member towards the exit of the flight.

Ravindra Gaikwad, Shiv Sena's Lok Sabha MP, boasted about this incident when he was confronted by the media earlier in the day.

"Yes. I hit him. I wanted to throw him out of the plane," the Shiv Sena MP told TIMES NOW. "Is he really an officer. He is not even a buffalo cart driver. He doesn't know how to deal with customers,"

Gaikwad had even demanded an apology from Air India.

"I have no regrets. First, that person should ome and apologise to me and then the Air India CMD should also come and apologise. "

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 9:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

परत एकदा तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढले आहेत. पुरावे कशाला म्हणतात हे सांगावे लागेल काय? ते कर्मचारी महोदय काहीही सांगतील, त्याला पुरावा काय? आणि हवाईसुंदरीच्या बातमीवर शेवटी तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्राचा आणि हव्या त्या अर्थाचा पुरावा मिळाला म्हणून आता विश्वास बसतोय का? मी टाकलेल्या सर्व लिंकस् परत एकदा वाचण्यास हरकत नसावी.

शेवटी काय तुम्हाला फुशारक्या आणि घडलेला प्रसंग यातला फरक ओळखता येत नाहीये. अर्थात कोर्टाला तो येतो, त्यामुळे तिथे काय होते ते बघूच. खरतर कर्मचार्यांनीच खासदारांना विमानात नेऊन मारहाण करण्याचा (याला तुमच्या लॉजिकने खून करण्याचा असे म्हणता येईल का?) उल्लेख विडिओत स्पष्ट ऐकू येत आहे.

"The air hostess said that the Shiv Sena MP was only trying to pull up the duty manager for his misdemeanour and said that he had no intentions of throwing him down the ladder."

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 2:27 pm | श्रीगुरुजी

परत एकदा तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढले आहेत. पुरावे कशाला म्हणतात हे सांगावे लागेल काय? ते कर्मचारी महोदय काहीही सांगतील, त्याला पुरावा काय? आणि हवाईसुंदरीच्या बातमीवर शेवटी तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्राचा आणि हव्या त्या अर्थाचा पुरावा मिळाला म्हणून आता विश्वास बसतोय का? मी टाकलेल्या सर्व लिंकस् परत एकदा वाचण्यास हरकत नसावी.

तुम्हीच विचारलं होतंत की खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहात. म्हणूनच मी वेगवेगळे संदर्भ दिले. हवाईसुंदरी त्याबद्दल सांगतेच आहेत. परंतु दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी देखील आपण कर्मचार्‍याला ढकलण्याचा प्रयत्न केला याची कबुली दिली आहे. कर्मचार्‍याने देखील हेच सांगितले आहे. या प्रकरणातील फिर्यादी, आरोपी व साक्षीदार हे तिघेही ही घटना घडल्याचे सांगत आहेत.

शेवटी काय तुम्हाला फुशारक्या आणि घडलेला प्रसंग यातला फरक ओळखता येत नाहीये. अर्थात कोर्टाला तो येतो, त्यामुळे तिथे काय होते ते बघूच. खरतर कर्मचार्यांनीच खासदारांना विमानात नेऊन मारहाण करण्याचा (याला तुमच्या लॉजिकने खून करण्याचा असे म्हणता येईल का?) उल्लेख विडिओत स्पष्ट ऐकू येत आहे.

कोणत्या चित्रफितीत? मी पाहिलेल्या कोणत्याही चित्रफितीत असा उल्लेख ऐकलेला नाही.

"The air hostess said that the Shiv Sena MP was only trying to pull up the duty manager for his misdemeanour and said that he had no intentions of throwing him down the ladder."

मटा ने दिलेल्या वृत्तात खासदार महाशयांनी कर्मचार्‍याला मारहाण केली व विमानाच्या शिडीवरून ढकलायचा प्रयत्न केला असे हवाईसुंदरीने सांगितल्याचे लिहिले आहे. मी वर दिलेल्या संदर्भात सुद्धा हवाईसुंदरीने हेच सांगितले आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Mar 2017 - 2:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

म्हणूनच मी म्हणालो कि तुम्ही वरच्या सगळ्या लिंक पहा. ती हवाई सुंदरी काय म्हणाली, गायकवाड काय म्हणाले (शब्द न शब्द नीट ऐकावा, हिंदी चॅनेलसारखं नको आपल्याला हवं ते) आणि शिव्या काय/कोणी दिल्या सगळे कळेल. तुमच्याकडे इअरफोन्स अव्हेलेबल असतील ते लावून जरूर पहा.

बाकी आधी मटा म्हणजे शिवसेना प्रेम, सॉफ्ट कॉर्नर आणि आता हवा तसा संदर्भ लागला कि तेच खरे बाकी काही नाही हे पाहून मज्जा वाटली.