मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
4 Sep 2011 - 12:17 pm
गाभा: 


.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......

प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का?

घटना १:
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.

घटना २:
माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे.

घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.

"वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?

प्रतिक्रिया

अतिशय चांगल्याप्रकारे (सचित्र) अनुभव मांडले..

conscious and subconscious mind असं काहि असावे काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2011 - 1:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घटना क्रमांक एक बद्दल माझं असं मत आहे की, वार्धक्यात माणसाची स्मृती कमी होत असलेली अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहात असतो. वय झालेल्या माणसांच्या बाबतीत ताज्या घटनांची साठवण करण्याकरिता मेंदूची कार्यक्षमता कमी होत असावी, मात्र पूर्वीच्या बालपणाच्या असंख्य गोष्टी स्मरणात असल्यामुळे तितकेच आठवत असावे असे वाटते.

बाकी, अतर्क्य गोष्टीबद्दल ’सिद्ध’ करणे ही मोठी कठीण गोष्ट असल्यामुळे अशा गोष्टी केवळ चमत्कारिक म्हणून ऐकाव्या आणि पाहाव्या लागतात. विज्ञान आणि काळाच्या ओघात असे चमत्कार विसरावे ही लागतात.

मृत्यूपूर्वी काही लोक बडबडत असतात तो संवाद म्हणजे मृत्यूशी चाललेला असतो असे म्हणतात. खरं खोटं देवाला माहिती. परंतु असे अनेक प्रसंग संत-महंताच्या, थोर विभूतींच्या तोंडून आपण ऐकत असतो.

”आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम” असे म्हणणारा तुकाराम कशाबद्दल बोलतो काही कळत नाही.

-दिलीप बिरुटे

sagarparadkar's picture

5 Sep 2011 - 3:39 pm | sagarparadkar

अशा काही गोष्टी ऐकलेल्या आहेत.
मृत्यू आणि त्यासंबंधानी अनेक गोष्टी ऐकण्या-वाचण्यात आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे सुप्रसिद्ध कलाकार आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याबद्दलची. असं ऐकलं आहे की त्यांच्या मृत्युच्या वेळी त्यांची पत्नी त्यांच्या जवळ नव्हती, पण तिला एक भयानक स्वप्न पडले आणि ती घाबरून जागी होऊन गुरुदत्त ह्यांची भेट घ्यायला गेली .... पण तोवर त्यांचा मृत्यू झालेला होता!

दुसरी गोष्ट ही अमेरिकेचे जगप्रसिद्ध माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांची. त्यांना म्हणे त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच एक स्वप्न पडले होते, त्यात त्यांचा स्वतःचा मृतदेह एका मोठ्या हॉलमधे ठेवला होता वगैरे वगैरे. त्यांनी ते स्वप्न फक्त आपल्या पत्नीला सांगितले होते असं ऐकण्यात आहे. पण नंतर त्यांचा मृतदेह जिथे ठेवण्यात आला होता तेथील एकून वर्णन हे खरोखरच लिंकन ह्यांनी आपल्या स्वप्नात पाहिलं होतं तसंच होतं म्हणे. 'व्हाईट हाउस'मधे लिंकन ह्यांची खोली अजूनही राखून ठेवली आहे आणि काही लोकांना तिथे खरंच लिंकन वावरत आहेत असा भास होतो ... असं म्हणे .... खरं-खोटं त्या लिंकन महाशयांना आणि आता ओबामा महाशयांना(पण) माहिती

संत हे जन्म तसेच मृत्यूच्या पुढे गेलेले असतात. त्यांनी ऐहिक सुखांचा त्याग केलेला असतो, किंवा त्यापेक्षाही असं म्हटलं तर योग्य होईल कि ते परमात्म्याशी म्हणजेच स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. जेंव्हा देहाला हि अवस्था प्राप्त होते त्यावेळी माणसामध्ये असलेले काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, संशय, चिंता आदी विषयही नाहीसे होतात. मनुष्य आत्मज्ञानाने ओतप्रोत भरून जातो. मला वाटत संत तुकाराम, "आपुले मरण पहिले म्या डोळा", म्हणजेच त्यांच्यातील नाहीशा झालेल्या विषयांच्या बद्दल सुचवत असावेत, तसेच " तो जाहला सोहळा अनुपम" म्हणजेच त्यांना प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाबद्दल सुचवत असावेत.
अर्थात संतांनी लिहिलेल्या एका शब्दात देखील अनेक अद्वैत अर्थ असतात, तसेच या ओवीचे देखील अनेक अद्वैत अर्थ असू शकतील.....असतीलच. तूर्तास माझ्या तोडक्या बुद्धीला जेवढं झेपलं तेवढं लिहिलं.

एक शब्द गुरुदेव का, ताका अनंत विचार |
थके मुनि जन पंडिता, वेद न पावे पार ||

आत्मशून्य's picture

4 Sep 2011 - 1:28 pm | आत्मशून्य

हम्म थोडक्यात मेलेले लोक्स दिसू लागले की दीस भरले समजून जायचं तर.... मला तूमच्या अनूभवांवर विश्वास आहे पण अनूमानावर तितकासा नाही, खरं खोट देवा़क काळजी

- (काळजीवाहू) जिवनशून्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2011 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडक्यात मेलेले लोक्स दिसू लागले की दीस भरले समजून जायचं तर....

मेलेले लोक दिसू दे नाही तर थेट मृत्यू आपल्याशी संवाद साधू दे. तसाही, मृत्यू आपल्या शेजारीच असतो. भरधाव जाणारी ट्रक आपल्या अगदी जवळून जाणे, दुकानाच्या पाट्या वाचत आपली बाईक चाललेली असतांना आपल्या समोर करकचून मोठ्या कंटेनरने लावलेला ब्रेक असू दे. बस मधे बसलेलो असू तर मोबाईलवर बोलत गाडी चालवणारा ड्रायव्हर अचानक ब्रेक लावतो तेव्हा आणि अशा अनेक प्रसंगात आपण मृत्यूच्या अगदी जवळ असतो. तर-

संत-महंताप्रमाणे आपण मृत्यूला म्हणायचं की, अजून मानवलोकात माझ्या हातून भरीव असे खूप कार्य होणे बाकी आहे. कृपया मला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह धरु नये ही नम्र विनंती. आत्ता येतो म्हणायचं आणि तिथून कटायचं. :)

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व.

अवांतर : 'मरणात खरोखर जग जगते' या बाळ सामंतांच्या पुस्तकात चित्रगुप्त लिहितात तसे अनेक प्रसंग आहेत. एकदा हे पुस्तक सर्वांनी वाचायला हरकत नाही.

-दिलीप बिरुटे

जेंव्हा डॉक्टर आपल्या बर्थ सर्टिफिकिट वर सही करत असतो ना, तेंव्हाच आपण मरणाबरोबर एका करारावर सही करत असतो, त्यानं बोलावलं की विनातक्रार निघायचं अश्या आशयाचा करार असतो तो, त्यात अगदी व्यवस्थित तारीख वार वेळ पण टाकलेली असते, पण होतं काय आपण या जगात आल्याचा आनंद एवढा असतो की आपण ती तारिख वेळ लक्षातच ठेवत नाही, आणि मग निवांत जगत राहतो, ती तारीख ती वेळ फार लांब असल्याची स्वप्नं पाहात.

पण एखादे वेळी स्वच्छ पाण्याच्या सरोवराचा तळ दिसावा तसं ते करारपत्र नजरेसमोर येतं अन लक्षात येतं की फार तास पण उरलेलं नाहीत आता, मरणाच्या आसपासच्या वेळचं संदर्भ आणि घटना विशेषतः म्हातारपणी मरण येत असेल तर, लक्षात ठेवणं शक्य असलं तरी विसराव्या अशाच असतात , त्यामुळं त्यातल्या त्यात ब-या गोष्टी आठवत असाव्यात.

विझताना दिव्याची वात मोठी होते, त्या मोठं होण्यात जे चमकते ते समईचं पितळ अन वातीवरचं तेल, वातीच्या टोकाची काळजी दिसली काय अन नाहि काय, काही फरक पडत नाही. तसेच याक्षणी कशाला ते काळे क्षण आठवायचे, पितळयासारखी चमकणारी अन तेलासारखी मायेची माणसं आठवली म्हणजे झालं.

अनंत छंदी's picture

4 Sep 2011 - 1:29 pm | अनंत छंदी

विचित्र विश्व हे मासिक पूर्वी पुण्यातून प्रसिद्ध होत असे त्यात मृत्यूनंतरचे जीवन आहे तरी कसे? या नावाची लेखमाला प्रसिद्ध होत होती. त्यात या विषयावर प्रकाश पडू शकेल असा मजकूर प्रसिद्ध झाला होता असे आठवते.

धष्टपुष्ट's picture

9 Aug 2020 - 12:51 pm | धष्टपुष्ट

कुठे मिळतील याची कल्पना आहे का?

विनीत संखे's picture

4 Sep 2011 - 1:43 pm | विनीत संखे

माझा 'याचि देहि याचि डोळा' अनुभव...

माझ्या आईची मावशी जर्जर म्हातारपणी तिच्या गावी मृत्यूघंटेसमीप होती. तिला काही तासांत अग्निवश व्हावे लागणार हे अगदी तय होतं. माझ्या आईचं मावशीआजीशी मायेचं नातं होतं. कधीही आईला तिने फटकारलेलं किंवा ओरडलेलं आठवत नाही. स्वत:च्या मुलांवर मात्र तिची शिस्तीची वेसण होती. तरीही आईसारखी आईच ती.

मावशीला तीन मुलं. सर्वात लहान मुलगी नर्मदा डोक्याने अधू. म्हणूनच मावशी आजीचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. नर्मदा मावशीला शहरात मोठ्या मामाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून ठेवलेलं. गावी सतराव्या वर्षी तिची कूस उजवली गेली होती. कुणी केली काय केलं काहीही माहित नाही. गर्भारपणात काळजी न घेतल्या कारणाने सातव्या महिन्यात अर्भक दगावलं. तेव्हापासून मावशी आजीने मोठ्या मुलाकडे, मामाकडे तिला ठेवलं होतं. मामाकडचे तिची 'त्यांच्या सोयीनुसार' काळजी घेत होते.

आजी निर्वतली तेव्हा मी पंधरा वर्षांचा असेन. गावी सगळे मे महिन्यामुळे सुट्टीवर आलेले असल्याने आजीकडे तिला शेवटचं पाहायला म्हणून आलेले. दहा बारा लोकांचा गोतावळा तिच्या खोलीबाहेर होता. मधली मावशी बाजूच्या गावी दिली होती. तिच इतकी दिवस सांभाळ करत होती आजीचा. मोठा मामा गावी येण्याच्या मार्गावर होता. नर्मदा मावशीसहित सगळ्यांना घेऊन येत होता तो.

संध्याकाळचे सात वाजले असतील. आई आणि मी आजीला बघायला खोलीत शिरलो. आजी जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत होती. आईला बाजूला बसून काहीच क्षण लोटले असतील तोच आजी किंचाळली....

"नमू नमू अगं पाय बघ. ट्रक बघ ट्रक बघ", आणि तशीच नर्मदा मावशीच्या नावाने असंबद्ध बरळू लागली. आईने गोंधळून मला विचारलं तर मीही जे ऐकलं तेच तिला सांगितलं. अर्थातच मर्त्यक्षणाला निकट असणार्‍या व्यक्तीचे बोलणे नेहेमीच लक्षात घेतले जात नाही. म्हणून मी आणि आईने तिच्या बडबडण्याकडे जास्त लक्ष दिले नाही.

थोड्याच वेळात मामी आली. एकटीच मुलांसोबत. आईने विचारलं तर अगदी चिंतीत सुरात म्हणाली, "अगं रेल्वेस्टेशनाकडे हे आणि नर्मदा आमच्या मागून रस्ता क्रॉस करत होते. कडेला थांबलेले तर उलट्या बाजूने ट्रक आला आणि नर्मदेच्या पायाच्या बोटांवरून गेला. कळेचना काय करावं. मग तातडीन हे तिला हॉस्पिटलात घेऊन गेले. मला मुलांसोबत इथे पाठवलं. आठच्या एस्टीने येतील. बिचारी नर्मदा आईंच्या नावाने पाय पकडून बेंबीच्या देठापासून ओरडत होती. रडत होती. फ्रॅक्चर झालीच असणार बोटं..."

ते ऐकून मी आणि आई अगदीच भेदरून गेलो.... नऊ वाजता नर्मदा मावशी आली तेव्हा आजीने प्राण सोडले. आईने नंतर हा प्रकार मामाला सांगितला तर तो घाबरून कोड्यातच पडला. ह्यापूर्वी कधीही नर्मदेला पायाला किंवा ट्रकने कुठलाही अपघात झालेला त्याला आठवत नव्हता की जेणेकरून आजीची ती स्मृती अशीच चाळवली गेली असेल.

दहा मिनिटांपूर्वीची ही आपत्ती आपल्या मायेच्या लेकरावर कोसळलेली ह्या मृत्यूशय्येवरील आईला कशी कळली असेल? त्या काळी तर गावात फोन, मोबाईल वगैरे काहीच नव्हतं....

आजही आठवलं की तो अनुभव मन शहारून जातो.

अर्धवट's picture

4 Sep 2011 - 1:53 pm | अर्धवट

आयला

सहज's picture

4 Sep 2011 - 1:56 pm | सहज

बिकाकाकांची फेड.. कथाआठवली.

विनीत संखे's picture

4 Sep 2011 - 3:38 pm | विनीत संखे

ओएमजी.

:-०

क्राईममास्तर गोगो's picture

10 Sep 2011 - 1:32 pm | क्राईममास्तर गोगो

कथा मस्तच आणि विनीतभाऊंचा अनुभवही...

बावळट's picture

11 May 2013 - 3:22 pm | बावळट

बापरे. असे आहे होय. कल्पनाही केली नव्हती कधी
हे जर सर्व खरे असेल तर फारच आश्च्र्याचे आहे.

प्रियाली's picture

4 Sep 2011 - 5:46 pm | प्रियाली

वरचे चित्र फारच आवडले. विषयाला अगदी चपखल आहे. लहानपणी एकदा, हवायन जमातीतील वृद्ध मरणाची वेळ जवळ आली की होडक्यात बसून बुडत्या सूर्याच्या दिशेने समुद्रात प्रवास करतात असे वाचले होते. (खरे खोटे माहित नाही) पण या चित्रात प्रवाश्याला घेऊन जाणारा जो नावाडी आहे तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.

डिस्क्लेमरः खालील विधाने ही माझी श्रद्धा नाही परंतु मी ती वारंवार ऐकली आहेत. खाली जी गोष्ट देत आहे ती खरीच असेल असे मी सांगत नाही, त्यावर माझा खूप विश्वास आहे असेही नाही पण ज्यांनी मला ती सांगितली त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

अनेकांच्या मते मृत्यूच्या वेळेस तुमचे मृतआप्त तुम्हाला न्यायला येतात. त्या जगात किंवा ट्रान्झिशनच्या काळात तुम्हाला भीती, एकटेपणा किंवा गोंधळल्यासारखे होऊ नये म्हणून. यावर माझा फारसा विश्वास नसला तरी कल्पना अतिशय रोचक आहे हे मी आवर्जून नमूद करेन.

आमच्या कुटुंबातील एकजण जे शिक्षणक्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत होते त्यांचे वडिल (जे प्रथितयश डॉक्टर होते) त्यांच्या मृत्यूसमयी घडलेली ही घटना आहे.

स्थळ कोकणातले. वडिलांचा मृत्यू जवळ आला आहे हे कळल्याने हा मुलगा त्यांच्या जवळच बसला होता. पहाटेची वेळ होती. वडिलांचा हात मुलाच्या हातात होता. वडिलांची मती उत्तम कार्य करत होती पण ते अचानक हात सोडवून म्हणाले, "अरे, भाऊसाहेबा आलेत. तयार आहेस ना विचारताहेत." मुलगा चक्रावला कारण भाऊसाहेब हे त्याच्या वडिलांचे मित्र होते आणि ते वर्ष-दोन वर्षांपूर्वीच निवर्तले होते. थोड्याच वेळात वडिलांचा मृत्यू झाला.

याच वेळी त्यांचे तिसरे मित्र मुंबईत राहत. ते पेशाने किर्तनकार होते (बाबाबुवा नाहीत). ते त्याच दिवशी पहाटे झोपले होते आणि अचानक पलंगावरून तोल जाऊन पडले. त्यांना विशेष लागले नाही परंतु ते आपल्या भाच्यासमवेत राहत (हा भाचा एक प्रसिद्ध लेखक आहे) तो उठून त्यांच्याकडे आला आणि विचारू लागला की 'असे कसे पडलात?'

तेव्हा हे मित्र म्हणाले की "स्वप्नात भाऊ आले होते, म्हणाले 'अरे उठ उठ! झोपतोस काय? डॉक्टर येताहेत!' काहीतरी घडले आहे. मन धास्तावते आहे."

त्यांनी आग्रहाने भाच्याला चौकशी करायला सांगितली असता काही काळाने (तो फोन वगैरेचा जमाना नव्हता) त्यांना वरली गोष्ट कळली.

चित्रगुप्त's picture

4 Sep 2011 - 9:00 pm | चित्रगुप्त

हे चित्र 'Isle of the Dead ' नामक असून 'Arnold Böcklin' या चित्रकाराचे आहे.

प्रियाली's picture

4 Sep 2011 - 11:21 pm | प्रियाली

माहितीबद्दल अतिशय आभारी आहे. फारच सुरेख चित्र आहे. मोहवून टाकणारं. मला मिळालं तर मीही नक्की घरात लावेन.

वरील धाग्यात म्हटल्याप्रमाणे मलाही आधी ग्रीक पुराणांतील केरन हा मृतात्म्यांना पाताळाकडे नेणारा नावाडी वाटला पण त्याच्यासोबत असणारे मृतात्मे वरील चित्रातील मृतात्म्याप्रमाणे निर्धास्त दिसत नाहीत. वरील चित्रातील मृतात्म्याची जी स्थिती आहे ती डुचमळणार्‍या होडक्यातही अतिशय सहजपणे आणि निर्धास्त असणारी आहे. केवळ नावाड्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारी व्यक्तीच त्या होडक्यातही इतक्या शांत आणि धीरगंभीर अवस्थेत उभी राहू शकते.

अप्रतिम! फारच आवडले मला हे चित्र.

हॅरी पॉटर मध्ये डेथ्ली हॅलोचा दगड अशाच प्रकारे मेलेल्या पूर्वजांना जवळ आणतो. व मृत्युची तयारी करतो...

आत्मशून्य's picture

5 Sep 2011 - 7:22 am | आत्मशून्य

मृत्यूच्या भेटवस्तूंमूळच असं घडत हे काही माहीत नाही पण हॅरी जेव्हां मरणाला सामोरा जायला तयार होतो तेव्हां त्याचे (मेलेले) आइ, वडील, गॉडफादर व आवडते शिक्षक समोर अवतरतात व त्याच्याशी संभाषण करतात हे मात्र खरयं. ते बघता आपण मरण्यापूर्वी आधीच मेलेले लोक्स दिसू शकतात म्हणायला जागा आहे ;) बाकी पितृपंधरवडा वगैरे बाबतही माहीती मिळाली तर बरं होइल.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2012 - 8:50 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू.....................त ;-) अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार....

सुरवात-नेहमी स्वतःपासून करायची असते,असे म्हणतात ना कायसे? म्हणून पहिला खेळ आमचा---

स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घर हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक येते)

काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ

वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... ही:हा... :-)

चला........सगळी पूर्व तयारी तर ठीक झाली अता आपण शरीराची त्वचा,....त्वचाच म्हणतात ना तीला? :-p स्वारी त्याला?...अं...अं...हं....तर त्वचा थरथरे पर्यंत त्या वातावरणात राहू.चला तर मग त्या ऐतीहासीक पडवीत,,पडवीच्या मागे १ 'आड' आहे,त्यामागे वाडी...आज कुणाचं तरी वर्षश्राद्ध झालेलं आहे आणी वाडीचा नैवेद्य कुत्र्यानी वगैरे खाल्लेला नसून तो आपोआप गायब झाल्याची वदंता आहे,,,या पार्श्व-भूमीवर काही स्त्रीया गुप्त खलबंतं केल्याप्रमाणे पडल्या/पडल्या सुरू होतात...

स्त्री १-काय गं झोप लागत्ये?
स्त्री २- नाय बा,,,लागेल कशी?तुला कळ्ळ नाय?
स्त्री१- (दबक्या आवाजात) का$$$$य? ते पान ना? त्यात काय कळायचय मेलं? अत्रुप्ती हो...दुसरं काही नाय
स्त्री२-मला वाट्टं,पलीकडचे मामा
स्त्री१- कोण? गेल्या आषाढात गेले ते?
स्त्री२-नाय तं काय? इतका अत्रुप्त दुसरा होता का तरी कोणी गावात?
स्त्री१-हो बाई,ती पलीकडची कुमुद आहे ना,ती म्हणत होती दुपारी शेणकीत शेण टाकायला आली तेंव्हा तीला हे आपण वाडीला ठेवलेलं पान हलताना दिसलं म्हणे...
स्त्री२-होय की काय? आणी गं म ?
स्त्री१- तिचं तेच म्हणण हो,,,मामांचं त्यांच्या पोरांनी काही मंजे का...ही केलन नाई ना,त्याचा परिणाम
स्त्री२-जळो मेलं,तरीच मी म्हण्ट्ये...स्वतःचा चहा ढोसल्यावर सुधा,दुसय्राच्या कपावर मेल्याची भारी नजर असायची,,,माणसं जगतात ती जगतात आणी मेल्यावर सुद्धा स्वभाव जरा देखिल बदलत नाही हो...

एवढ्यात स्त्री क्रमांक-१ चा दिवटा (वय-साधारण-८/९) ''आई पोटात मळमळतय...'' म्हणुन रडत उठतो..
स्त्री१- जरा मेलं निजल्ये नाई त आली ही ब्याद ...पोराला - काय रे मेल्या,काय झाल?वावडींग घातलवतं ना संध्याकाळी तूला?
पोरगा-आई,,उलटी होत्ये...वळचणीचा लाइट लाव ना..आणी तू पण ये...हो... मला भीती वाट्टे एकट्याला...स्त्री१ पोराच्या पाठीत धपाटा घालत...'चल हो पुढे'....बाहेर जाऊन पोर बकाबका ओकतं....आणी स्त्री१ला धक्का बसतो....
स्त्री१-(मोठ्यांदी ओरडते)काय कार्ट आहे मेलं
स्त्री२-(लगबगीनं बाहेर येउन)- काय गं आता उलटी झाली त पोरावर चिडत्येस कसली?
स्त्री१-अगो...काल पासून पोट दुखत होत म्हणून लंघन करायला भाग पाडल ना याला,,,आणी उलटी मधे हे भरड्याच्या वड्याचे भरा भरा खाताना अर्धे चावलेले तुकडे पडलेत...अगो ते पान दुसय्रा कुणी खाल्लन नाइ...हाच आमचा मेला भस्म्या...अता गोठ्यात डांबते...आणी चांगलं २/४ दिवस ठेवते हो उपाशी.....वगैरे वगैरे.....

देन चिंटू, ट्येल मी,,,व्हाट इज दी मॉराल आफ श्टोरी...?---
खय्रा गोष्टी जो पर्यंत उजेडात येत नाहीत तोपर्यंत खोट्या गोष्टीच खय्रा असतात ;-)

अगोचर's picture

5 Sep 2011 - 12:45 am | अगोचर

माझे आजोबा काही दिवसांपुर्वी वारले.

जाण्यापुर्वी काही वेळ मी त्यांच्या जवळच आहे असे त्यांना जाणवत होते. प्रत्यक्षात मी त्या खोलीत सुमारे पंधरा दिवसांनी पोचलो. ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2011 - 1:22 am | अत्रुप्त आत्मा

त्यात कसा काय येणार भविष्य काळ?....अहो मरण समयी (आणी म्हातारपणी सुद्धा) माणसाची बुद्धी अपंग झालेली आणी भावनेच्या ताब्यात असते,,,त्यामुळे सारखी जवळची माणसं भेटावीत असं जे मनापासून वाट्टं ,त्याचाच तो परीणाम,की त्या व्यक्तीला वारंवार चिंतन केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आहेत असा भास होतो....हा सगळा विषय मानस शास्त्राचा आहे...आपण मन आणी मनाचे रोग/आजार यावरील पुस्तकं वाचा आपल्यालाही कळुन येइल...

अवांतर-@- ''मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान ''

हे तुमच आवडतं तत्वज्ञान आहे काय? मग त्याच्या विसंगत तुंम्ही स्वतः तरी का वागता? तर्काचा विचार ''यात'' चालत नाही असं म्हणता,तर मग तुमच्या बाबतीतल्या वरील घटनेचा अन्वयार्थ तुंम्ही ''ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?'' असा तर्क बांधुन का बंरं काढता?

अगोचर's picture

5 Sep 2011 - 12:46 am | अगोचर

माझे आजोबा काही दिवसांपुर्वी वारले.

जाण्यापुर्वी काही वेळ मी त्यांच्या जवळच आहे असे त्यांना जाणवत होते. प्रत्यक्षात मी त्या खोलीत सुमारे पंधरा दिवसांनी पोचलो. ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?

चित्रगुप्त's picture

5 Sep 2011 - 4:15 am | चित्रगुप्त

या चित्राची आणखी एक आवृत्ती:

ही चित्रे इथे वा इथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

स्पंदना's picture

5 Sep 2011 - 7:09 am | स्पंदना

आपण जस जसे वाढत जातो तस तसे याचे अनेकविध अनुभव आपल्याला येतात अन हलकेच का असेना पण आपल वि़ज्ञान कर्मठ मन स्वतःलाच प्रश्नांची फैर झाडु लागत.

माझ्या आज्जी वारल्या तो क्षण ! सकाळी अगदी संपल सार म्हणुन रडारड झाली पण बस एक मंद श्वास चालु होता. दुपारी अगदी रात्र असल्या सारख सार घरदार झोपी गेल, अर्थात त्यातच मीही. अचानक स्वप्न पडल, एक तुळशी वृंदावन फुटुन माझ्या हाती दागिन्यांची संदुक आल्याच , मी त्या स्वप्नातही त्या संदुकी पेक्षा वृंदावनाच्या फुटण्यान धसकले अन जागी झाले. तशीच वर, जेथे मोठ्या आईंना ठेवल होत तिथे गेले. खोलीत कुणीही नव्हत, सारे काका आत्या, अन वडील सार्‍या खोल्यां मधुन विखुरलेले. जाउन त्यांच्या कॉट च्या दांड्याला धरुन उभी होते अन बघता बघता आईंचा चेहरा बदलला, वार्धक्यान सुरुकुतलेला तो चेहरा बघता बघता तजेलदार, झर झर बदलत गेला, झटदीशी डोळे उघडले, ( त्या आधी त्या आठ पंधरा दिवस कोमात होत्या) मी पाहिलेले त्यांचे डोळे हे काहीसे पांढरट...पण हे डोळे अगदी ठसठशीत्...पण त्या कुणाकडेही वा कुठेही पहात नव्हत्या. नजर वर्...अन बघता बघता आ वासला गेला , शरीर थोडस वर उचलल्या सारख, छाती पर्यंत , अन त्या तोंडातुन एक दिर्घ श्वास वा आवाज, वा मला नेमक नाही सांगता येत, काही तरी , जणु कुणी त्या आ वासलेल्या तोंडातुन काही ओढुन घेत आहे. अर्ध्या मिनिटाचा खेळ असेल हा सर्व. मी अवाक ! अन त्या परत खाली होत्या तश्या बेडवर, मला आवाज फुटला, आईंनी डोळे उघडले, आईंनी डोळे उघडले ! सारे धावले, पण त्या गेल्या होत्या. का कुणास ठाउक पण अस वाटल नेणार कुणी तरी तिथे होत, अदृष्य !
तेंव्हा हा मनाचा खेळ मानावा की काय हा प्रश्न पडला, पण मग असाच एक प्रसंग पुन्हा आयुष्यात आला. माझ्या मोठ्या आत्या..ज्या रुईया कॉलेज मध्ये इतिहास शिकवत, ब्रेन हॅमरेज नंतर तश्या ठिक झाल्या होत्या. व्यवस्थित चालत बोलत, पण त्यांनी ज्या त्यांच्या एका मुला साठी हा जीव सांभाळला होता तो साधारण रिटार्ड मुलगा अचानक वारला. त्याच्या मृत्युच्या सोळाव्व्या दिवशी या अचानक कोसळल्या, मुंबई ती. लगेच अँब्युलन्स आली अन त्यांना अ‍ॅडमिट केल. मी ही तेंव्हा मुंबईतच अन भावाच्या मृत्यु मुळ त्यांच्या कड रहात असलेली, माझी त्यांच्या जवळ बसायला नियुक्ती. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी डोळे उघडले, अन मला म्हणाल्या शंकर मामा आलेत, मग म्हणाल्या सुशी मावशीच्या भाकरी वाजताहेत. आता हे सर्व जण मरुन साधारण दशक लोटलेल. मला भिती वाटली , मी म्हंटल, राहु दे तुम्ही पाणी घ्या थोड , मला म्हणाल्या अग आता नको पाणी ती लोक वरवंटा रेटताहेत. आता मात्र मी घाबरले. पण एव्हढ्या सकाळी घरुन कुणी आल ही नव्हत. त्या सारा वेळ ती दोघेजण वरवंटा रेटताहेत हे सांगत राहिल्या. आणि मग झोपुन गेल्या, सायंकाळी अक्षरशः पल्स नुसती खाली खाली जात राहिली, अन मग एका क्षणी स्थिरावली, तशीच लो पल्स रात्रभर, अन पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी माझी नेमणुक दवाखान्यात. आज त्यांनी डोळे उघडले अन ती सारी माणस कुठ गेली ? हा पहिला प्रश्न .
त्या नंतर त्या दोन वर्ष राहिल्या, पण एकदाही बोलु नाही शकल्या. एकदाच, त्यांचे अजुन एक नातेवाईक वारले; जे आम्ही त्यांना सांगितल नव्हत, तेंव्हा ते बाहेरच्या खोलीत बसलेत अस म्हणाल्या. पण तिथुन पुढे कधीही वाचेने संभाषण झालच नाही.
अर्थात हे कुठे ऐकिव अस नाही, जे अनुभवल, अन खरच अतर्क्य वाटल ते सांगायचा प्रयत्न.

आहेत. आपल्याला नजरेला दिसतं आणि तर्काने जाणता येतं त्यापेक्षा बरंच काही आजूबाजूला असू शकेल असं वाटत राहतं हे मात्र खरं आहे.

-रंगा

अप्पा जोगळेकर's picture

10 Sep 2011 - 3:55 pm | अप्पा जोगळेकर

खूप प्रयत्न करुनसुद्धा विश्वास ठेवता येत नाहीये. विशेषतः पहिल्या अनुभवाबाबत.

चित्रगुप्त's picture

10 Sep 2011 - 4:35 pm | चित्रगुप्त

अपा जोगळेकर यांचा प्रतिसाद....
.......खूप प्रयत्न करुनसुद्धा विश्वास ठेवता येत नाहीये. विशेषतः पहिल्या अनुभवाबाबत.....
कुणाच्या पहिल्या अनुभवाबाबत म्हणता ?

यात काही गूढ असेलच असं नाही. पण मरण्यापूर्वी काही लोक एकदम वेगळं काहीतरी बोलतात हे पाहिलेलं आहे.

माझी आजी माझ्या घरीच असताना गेली. ती अनेक दिवस हाल सोसून गेली. शेवटी ती वेळ जवळ आली आहे असं आम्हाला नक्की कळलं होतं. तरीही त्यानंतर सात दिवस ती जगली. त्यावेळी तिच्या असंबद्ध बोलण्यात शेतजमिनीचे संदर्भ यायचे. चल लगेच तिकडे जाऊन येऊ शेतावर.. इथेच जवळच तर आहे गाव वगैरे असं ती म्हणायची.

आमची शेतजमीन ३० वर्षे कोर्टप्रविष्ट होती आणि त्यामुळे ती आमची नव्हतीच. नंतर ती गेल्यातच जमा असल्याने तिचा नाद सर्वांनीच सोडून दिला होता. त्यानंतर वडील, आजोबा असे सगळेच स्वर्गवासी झाले. आजी एकटीच उरली होती. तिला बहुतेक त्या शेतजमिनीचं मनात राहिलं असावं. ती गेल्यावर एका वर्षातच त्या केसची तारीख पडल्याचं मला योगायोगाने कळलं.. (मूळ व्यक्तींपैकी कोणीच हयात नाही आणि पत्ताही सत्रांदा बदललेला). आणि एकाच तारखेत निकाल लागून जमीन परत मिळून गेली. आजी मात्र ते पहायला नव्हती.

नंतर नंतर शेवटचे दोनतीन दिवस इथे अनेकांनी उल्लेख केल्याप्रमाणे तंतोतंत ती सर्व मृत लोकांशी तपशीलवार बोलत असताना ग्लानीअवस्थेत दिसायची. तिची दोन्ही मुले अकाली गेली होती. त्यांच्याशी म्हणजे माझ्या बाबा आणि काकांशी ती बोलत असायची. तू माझ्याआधी कसा गेलास रे वगैरे असं.

आणखी कुणीतरी म्हटल्याप्रमाणे (मृत व्यक्तींपैकी पण तिच्या दृष्टीने सत्य) कोणीकोणी इथे आले आहेत, त्यांना चहा कर, भात टाक वगैरे असं बर्‍याचदा झालं होतं.

हे सर्व मी पूर्वी इतरांबाबतीत ऐकलं पाहिलं असल्याने मला त्यात काही अनएक्स्प्लेनेबल वाटलं नाही. तिच्या मेंदूला रक्तपुरवठा अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे मेंदूचं काम बिघडून भास होणं ही सरळ शक्यता नाकारुन काहीतरी अतींद्रीय असेल असं मला त्यावेळीही वाटलं नाही आणि आताही वाटत नाही. शिवाय माझ्या आजीच्या दीर्घायुष्यामुळे (सुमारे ८५) तिच्या आठवणीतले आणि सोबतचे (अतएव भासांमधे जाणवू शकणारे) जास्त लोक ऑलरेडी मृत आणि फार कमी लोक जिवंत होते हीदेखील लक्षात घेण्याजोगी बाब आहे.

साधारण मरणार्‍या व्यक्तीबाबत गूढ अनुभव यांच्याबाबतीत खालील गोष्टी होत असाव्यात:

१) व्यक्तीच्या मरणाचा एक करुण पडदा या अनुभवकथनाच्या पार्श्वभूमीवर असल्याने त्याला एक सहानुभूती आपोआप मिळते
२) आता ती व्यक्ती हयात नसल्याने तर्क/वाद/प्रतिवाद यांचा प्रश्नच नसतो. मृताविषयी जास्त विश्लेषण नकोच म्हणून.

आपल्याला एक्स्प्लेन करता येत नाही अशा असंख्य गोष्टी जगात आहेत. देव, आत्मे वगैरे सगळं असू शकेल. पण हा प्रकार त्यातला वाटत नाही असं मत मांडू इच्छितो.

त्यापेक्षा गूढ अशा अनेक गोष्टी आपल्या जिवंतपणीच घडत असतात, पण त्या किती विलक्षण गूढ आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही. आपलं जिवंत असणं आणि जिवंत राहाणं हे त्यापैकी एक. त्यामागे असलेली शरीरयंत्रणा.
गर्भावस्थेत हृदयाची ठकठक पहिल्यांदा सुरु होते तो क्षण आणि त्यामागची प्रेरणा.. अशा असंख्य गोष्टी जास्त गर्द गूढ आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

10 Sep 2011 - 3:59 pm | अप्पा जोगळेकर

व्वा. तर्कशुद्ध प्रतिसाद आवडला.

नगरीनिरंजन's picture

10 Sep 2011 - 7:33 pm | नगरीनिरंजन

या निर्जीव विश्वात जिवंतपणा हाच चमत्कार आहे. पण आपण तो इतका गृहीत धरतो की त्यात काही विशेष आहे असे आपल्याला वाटत नाही.

शिल्पा ब's picture

10 Sep 2011 - 8:54 pm | शिल्पा ब

निर्जीव विश्व? ते कसं काय बॉ? निसर्गात तर सतत काही ना काही घडतच असते आणि ते निर्जीव असते तर काहीच घडले नसते...माणसाचा मेंदू जरा जास्तच काम करत असल्याने असले काय काय अनुभव येतात अन शिवाय ते असे दुसर्यांना सांगता येतात.

नगरीनिरंजन's picture

11 Sep 2011 - 6:22 am | नगरीनिरंजन

पृथ्वी सोडून इतरत्र जिवंतपणाची खूण अजून सापडलेली नाही. अब्जावधी ग्रह-तार्‍यांमध्ये जिवंतपणाचे प्रमाण अतिनगण्य आहे.

शिल्पा ब's picture

11 Sep 2011 - 8:08 am | शिल्पा ब

<<<पृथ्वी सोडून इतरत्र जिवंतपणाची खूण अजून सापडलेली नाही. अब्जावधी ग्रह-तार्‍यांमध्ये जिवंतपणाचे प्रमाण अतिनगण्य आहे.

अजुन हा शब्द महत्वाचा आहे. विश्वाचा पसारा प्रचंड आहे आणि अजुन मानवाचे यान त्याच्या सुर्यमालेबाहेर गेले नाही; जिथे पृथ्वी अन त्यावरील जिवजंतु निर्माण करण्याची उर्जा आहे ते निर्जीव कसे?

नगरीनिरंजन's picture

11 Sep 2011 - 2:47 pm | नगरीनिरंजन

>>जिथे पृथ्वी अन त्यावरील जिवजंतु निर्माण करण्याची उर्जा आहे ते निर्जीव कसे?
आपण रूढार्थाने ज्याला जिवंत असणे म्हणतो त्याबद्दल मी बोलतोय. सजीव निर्माण करण्याची ऊर्जा आहे म्हणून विश्व निर्जीव नाही असे म्ह्टले तर माणूस कधी मरतच नाही असे म्हणावे लागेल. कारण, त्याची ऊर्जा आणि शरीरघटक अस्तित्वात राहतातच.
इतरत्र जीवसृष्टी सापडली तरी प्रत्येक ग्रहगोलावर सजीव नसल्याने विश्व हे मुख्यतः निर्जीवच म्हणावे लागेल.

Nile's picture

11 Sep 2011 - 2:59 pm | Nile

अजुन मानवाचे यान त्याच्या सुर्यमालेबाहेर गेले नाही

सुर्यमालेची डेफिनीशन जरा प्राब्लेमाटिक आहे, पण आमचं पह्यलं वोयाजर गेलंकी कवाच प्लुटो फिटोच्या फुडं!! फकस्त निरीक्षण नोंदवून राह्यलो, बाकी ते तुम्हा दोघांचं चालूंद्या.

lakhu risbud's picture

12 Sep 2011 - 12:02 am | lakhu risbud

तुमचा नाय गेल भायेर ? आमचं तर गेला होतं की वो, पर दोन क्वाटर ज्यास मारायला लागलं इतकच.

रेवती's picture

5 Sep 2011 - 10:36 am | रेवती

माझ्या आजीनं (आईची आई) होळीच्या दिवशी पुरणपोळी मन लावून खाल्ली आणि पुढच्या होळीला ती नसणार हे (तब्येत ठणठणीत असताना) जाहिर केलं होतं. पुढं दोनेक दिवसातच काहीही झालेलं नसताना अचानक गेली. ती गेल्या दिवशीचे सोपस्कार उरकून आई घरी आली आणि रात्रभर दोघी मायलेकी गप्पा मारत होत्या. मी शेजारीच झोपलेली असून काही समजले नाही पण आई जागी असल्याचे मात्र माहीत होते. दुसरी आजी मात्र हाल सोसूनच गेली पण माझ्या आईकडून खूप सेवा करून घेतली. काही काळजी वाटत असेल तर मला कधीही बोलव असं आईला निवर्तण्याच्या आधी सांगून गेली होती.
एकदोन वेळा काही काळज्यांनी आई रात्री जागी असताना आजीची आठवण आली तर ही दाराशी बसून जप करताना आईला दिसली. मला सांगितल्यावर अंगावर सरसरून काटा आला. वरच्या दोन्ही घटनांमध्ये आधी गेलेल्या कुणाशी बोलणं झालं होतं की नाही हे माहित नाही पण हे अगदी घरात घडलेले प्रसंग आहेत. मला समजल्यावर अजूनही घाबरायला होते.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Sep 2011 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार

रोज तुमचा एकतरी विचार करायला लावणारा, एक वेगळीच दृष्टी देणारा लेख मिपावर येतोच. त्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

योगी९००'s picture

5 Sep 2011 - 4:30 pm | योगी९००

विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही..

माझ्या आई वडिलांबाबत असेच झाले. वडिल गेल्यावर १५ दिवसांत आई गेली. जायच्या आधी आई दोन दिवस ग्लानीतच होती. त्यावेळी मला म्हणायची की तुझे बाबा आहेत येथे..तसेच दादा (म्हणजे आईचे वडिल) पण आहेत..
त्यावेळी वाटत होते की तापातच बोलत असेल..

माझ्या आईला खुप स्वप्ने पडायची. दर महिन्या दोन महिन्यातून कोणतरी गेलेली व्यक्ती तिच्या स्वप्नात येऊन काहीतरी सांगायची..त्यामुळे मला आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिचे असे सांगणे म्हणजे नेहमीचाच प्रकार वाटला होता.

थोडे अवांतर :
माझ्या बाबांची आई माझे बाबा लहान असतानाच गेली. पण ती मात्र माझ्या आईच्या स्वप्नात यायची. माझ्या आईने तिचा (म्हणजे तिच्या सासूचा) फोटो पण पाहिला नव्हता पण त्या कश्या दिसतात हे सर्वांना सांगितले होते. असे बरेच गेलेले नातेवाईक आईच्या स्वप्नात यायचे आणि बरेच काही सांगायचे. जसा जसा मी मोठा झालो, तसे मला आईचे ते स्वप्नांबद्दल सांगणे या गोष्टी म्हणजे तिच्या मनाचे खेळच वाटायचे. . म्हणूनच आईच्या शेवटच्या दिवसात यावर विश्वास बसला नव्हता. पण आज इथे बाकीच्या लोकांचे अनुभव वाचून असे वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी...

आज इथे बाकीच्या लोकांचे अनुभव वाचून असे वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी...

------ मलाही असेच वाटते.

प्रियाली's picture

5 Sep 2011 - 5:21 pm | प्रियाली

अशा गोष्टींत तथ्य असते की नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही. कदाचित, वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ती केवळ मनाची स्थिती असेल. पण अशाप्रसंगी आपण दु:खी असतो. सारासार विवेक दूर ठेवलेला असतो. जाता जीव जातो पण विचार करायला आपल्याला मागे ठेवतो. अशावेळी, त्या जिवांना तारून नेणारे, सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे या विचाराने आपल्याला दिलासा मिळत असेल तर तो मिळवावा असे वाटते.

योगी९००'s picture

5 Sep 2011 - 5:42 pm | योगी९००

अशावेळी, त्या जिवांना तारून नेणारे, सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे या विचाराने आपल्याला दिलासा मिळत असेल तर तो मिळवावा असे वाटते.
+१०००००००० या वरील वाक्याने मला खरोखर दिलासा मिळाला.

असे कोठेतरी वाचले की गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते की आपण हे जग सोडले आहे. किंवा ती व्यक्ती हे मानायला तयार नसते की आपले निधन झाले आहे...त्यामुळे त्याला समजावयाला त्याचे जवळचे आधी गेलेले मित्र, नातेवाईक त्याला येऊन भेटत असावेत.

आत्मशून्य's picture

5 Sep 2011 - 11:20 pm | आत्मशून्य

गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते की आपण हे जग सोडले आहे.

हा हा हा तूम्ही नाइट शामलन चे चित्रपट फार मनावर घेता बूआ ;) तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते :)

अवांतर:- जन्माला आल्यावर अस्तित्वात आलो आहोत याचीच मूळात जाणीव/स्मृती नसते. तसं काही मेल्यावर होतं काय ?

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Sep 2011 - 11:23 pm | बिपिन कार्यकर्ते

वेलकम टू द मॅट्रिक्स! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2011 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा

@---''तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते''---@

या टाकलेल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या ।ह्ही ह्ही ह्ही .....हा हा हा। (आसूरी आनंद झाल्याची स्माइली) :bigsmile:

वाहव्वा,,,क्या विकेट निकाल्या है,आत्मशून्य .....वो मौके पे चौका मार रहे थे,लेकीन तुमने तो उनकी तीनो डंडीयां उडा दी...

चित्रगुप्त's picture

6 Sep 2011 - 5:45 pm | चित्रगुप्त

आत्मशून्य यांच्या प्रतिसादात खालील दोन्ही वाक्ये आहेतः

....तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते ....
आणि
..... जन्माला आल्यावर अस्तित्वात आलो आहोत याचीच मूळात जाणीव/स्मृती नसते......

आत्मशून्य's picture

6 Sep 2011 - 7:59 pm | आत्मशून्य

चित्र गूप्त साहेब, ती दोन वाक्ये जाणिवपूर्वक टाकली आहेत आणि समान वाटत असली तरी फरक आहेच. आणि कूठेतरी माझ्या मनातल्या शंकेला वाटही देतोय.... :)

फरक हा की नवजात बालक स्वतःला मृत मानत/घोषीत करत नसतं(मृत प्रिटेंड करत नसतं) तर शारीरीक द्रूश्ट्याच त्याच मन कोणताही विचार करायला, समजायला वास्तवाचे संपूर्ण भान यायला अपरीपक्व व दूर्बळ असतं. पण मृत झालेल्या व्यक्तीच्या मनाचा आधीच पूरेसा विकास झालेला असेल तर तो मेल्या नंतरही स्वतःच जड शरीर तितकच जिवंत समजत असेल असं वाटत नाही.

असं म्हणतात की मेल्या वर आधी बाकीचे सर्व सेन्सेस आणि कंट्रोल्स जातात...
ही गंमत आहे खरी... म्हणजे असं बघा की तूम्ही स्वतः अद्रूश झालात तर तूम्ही आंधळेही बनणार. कारण नीयमच असा आहे की जर द्रूष्टी पटलावर प्रकाश कीरणे आदळतात व त्याचे ज्ञान आपल्या मेंदूला म्हणजेच आपल्याला होते. पण जर ही प्रकाश किरणे द्रूष्टी पटलाला न थडकता त्याच्या पलीकडे आर पार गेली तर आपल्याला काही दिसणारच नाही म्हणजेच आपण अद्रूश्य असू तर आंधळेही बनू. हीच गोश्ट मृत्यूमूळे इतर सर्व ज्ञानेंद्रीयांबाबत लागू पडते.

आणि शंका ही की आता शरीर गेले तर आपण संवेदनाहीन बनणार यात संशय नाय.. पण जर जागृत मनाचं अस्तीत्व मृत्यूनंतरही रहात असेल तर असं काही घडायची शक्यता नाही कारण.. आपलं मन आपल्याला स्वप्नात गूंगवून ठेवायला पूरेसं आहे, जे आपण सत्यच मानत राहू वा थोडक्यात आपल्याला शरीर आहे असं भास निर्माण करायला पूरेसं आहे ... आपले मृत नातेव्वैक व इतर लोकही भेटवायला पूरेसं आहे... मग मृतच लोक का व कशाला ? जर खेळ केवळ मनाचा आहे तर ते जिवंत लोकही भेटवू शकेल ना... थोडक्यात बिकांनी मस्त प्रतीक्रीया लिहली आहे वेलकम टू द मॅट्रिक्स! :)

लकम टू द मॅट्रिक्स!

म्हन्जे काय?

विनीत संखे's picture

6 Sep 2011 - 8:45 pm | विनीत संखे

आवं स्पाजी पायलं नाय व्हं का तुमी... म्याट्रिक्स नावाचा एक प्हारीनचा पिक्चर हाय... बगायचा म्हंजी काय सांगू अगदी मेंदूच्या नानाची टांग... झिणझिण्याच यावा डोस्क्यालाच...

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Sep 2011 - 10:14 pm | बिपिन कार्यकर्ते

स्पा, परत भेटशील तेव्हा सांग, देतो कॉपी करून.

Nile's picture

6 Sep 2011 - 10:18 pm | Nile

तुमच्या सारख्या वयोवृद्धांनी अश्या कॉप्या करणं थांबवलं नाही तर तुमच्या नातवंडासमान असलेल्या स्पाच्या पिढीने तुमच्याकडून शिकायचं तरी काय? थांबवा आता असल्या गोष्टी अन तरूणांपूढे काहीतरी चांगले आदर्श ठेवा! ;-)

पाषाणभेद's picture

13 Sep 2011 - 1:53 am | पाषाणभेद

>>> प्रियाली: सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे....

असे म्हणतात की मानवाला एकटे आवडत नाही. अगदी मरतांना देखील कुणीतरी जवळ हवे असावे असे त्याला वाटते.

मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि कंट्रोल्स जातात आणि ऐकू येण्याचे सर्वात शेवटी थांबते असं कुठेतरी ऐकून/वाचून अंगावर काटा आला होता.. म्हणजे आपण अचेतन आणि दृष्टीहीन असू..आणि आपल्या आजुबाजूचे प्रियजन शोक करायला लागल्यावरही ते मरता मरता काही काळ ऐकू येत असेल?

माझीही शॅम्पेन's picture

5 Sep 2011 - 6:14 pm | माझीही शॅम्पेन

मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि कंट्रोल्स जातात

मिपा वर एखादा आय-डि बॅन होतो तेव्हा असाच काहीस होत असाव अशी दाट शंका आहे. तुम्ही सर्व वाचू शकता परंतु तुमचा आवाज कोणी ऐकू शकत नाही :)

अवांतर :- लोक इकडे इतकी सेंटी का मारुन रहालेत जे व्हायच ते होणारच आहेत :) पण हा धागा अतिशय मनोरंजक आहे हे मान्य करावाच लागेल.

माझीही शॅम्पेन's picture

25 Apr 2016 - 5:58 am | माझीही शॅम्पेन

हल्लीच अमेरिकेत प्रिन्स नावाच्य प्रसिध्ध गायाकाचा मृत्यू झाला ,
त्याच्या मित्राची मुलाखत ऐकत होतो त्यात त्याने मृत्यू पुर्वी काही दिवस त्याचे दिवंगत मित्र परिवार आणि नातेवाईकशी तो संवाद साधत होता अस संगितल :)

केशवराव's picture

5 Sep 2011 - 6:51 pm | केशवराव

माझी आई [ मृत्यु समयी वय - ८६] जेव्हा अखेरची आजारी होती ( काळ - ६ महीनें ) तेव्हा तिला सतत भास होत असत. समोर अस्तित्वात नसलेली माणसे दिसायची.
डॉक्टरांच्या मते याला हेलिस्युलेशन असे म्हणतात. मेंदुला रक्त पुरवठा कमी झाल्यास असे होवू शकते.
एकुण हा विषय मनोरंजक + ज्ञानवर्धकही आहे.
लगे रहो !

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Sep 2011 - 9:03 pm | बिपिन कार्यकर्ते

तुम्ही उल्लेख केलेल्या तीनही अनुभवांमधे मला गूढ काही फारसे वाटले नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळच्या शारिरीक अवस्थेप्रमाणे काही भास होणे, जुन्या आठवणी अचानक जागृत होणे वगैरेचे काही स्पष्टीकरण शक्य आहे. तसे असेलच असे नाही, पण एक शक्यता म्हणून नक्कीच प्रबल आहे. पण तुम्ही माझ्या 'फेड' या कथेबद्दल विचारले आहे त्याबद्दल मात्र मला अजूनही काही स्पष्टीकरण सुचत नाहीये. ती घटना साक्षात माझ्याच घरात खरोखर घडलेली आहे. ज्याक्षणी काकाने तिकडे गावाला पैसे चुकते केले त्याचवेळी साधारण आजी (जिच्या हातापायाच्या काड्या झाल्या आहेत आणि खूपच अशक्त झाली आहे) उठून सरळ बाथरूम मधे गेली. भरलेली पाण्याची बादली उचलून डोक्यावर उचलून उपडी केली आणि बाहेर आली. काकूला म्हणाली "संपलं गं सगळं! फिटलं!" ... त्यानंतर बर्‍याच वेळाने काकाचा फोन आला गावावरून की पैसे दिले आणि कर्ज फिटल्याचं कबूल करून घेतलं म्हणून.

अजून एक अनुभव आहे. हा माझा नाही पण ज्यांना आला त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊच शकत नाही. एक अतिशय उच्च अध्यात्मिक अधिकार असलेली व्यक्ती मुंबईमधे देह सोडती झाली. त्याचवेळी, मुंबईपासून अतिशय दूर असलेल्या एका गावात जिथे त्या व्यक्तीच्या सद्गुरूंचे समाधीस्थान होते तिथे सकाळची काकडआरती चालू होती. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला मृत पावलेली व्यक्ती देवळाच्या दारात उभी राहून आरतीला टाळ्या वाजवून आणि मग नमस्कार करताना दिसली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ते आजारी होते हे सर्वश्रुत होते आणि त्याकाळी (१९६७ साली) मुंबईहून तिथे जायच्या सोयीही फार नव्हत्या. ती व्यक्ती थोडा वेळ तिथे थांबली आणि एकदम दिसेनाशी झाली. २-४ तासात तार आली तेव्हा त्यांच्या मृत्युबद्दल सगळ्यांना कळले.

या सगळ्याबद्दल सकृद्दर्शनी तरी काही संगती लागत नाही! आता कोणी भास, योगायोग वगैरे म्हणेल तर मग असोच!

चित्रा's picture

5 Sep 2011 - 10:04 pm | चित्रा

'चित्रगुप्तां'नी असा धागा काढावा याची गंमत वाटली.

तुम्ही उल्लेख केलेल्या तीनही अनुभवांमधे मला गूढ काही फारसे वाटले नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळच्या शारिरीक अवस्थेप्रमाणे काही भास होणे, जुन्या आठवणी अचानक जागृत होणे वगैरेचे काही स्पष्टीकरण शक्य आहे.

असेच म्हणते.

माणसाच्या इच्छा या सर्वाधिक प्रबळ असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे असे काहीतरी होत असावे. स्वप्नी म्हणजे स्वप्नावस्था - असेच असले पाहिजे असे नाही. कुठच्यातरी वेगळ्या मानसिक स्थितीत सध्याची स्थितीची जाणीव लुप्त होत असेल. इ. इ.

अवांतरः माझ्या लहानपणी माझी एक मावस आजी असे म्हणे की तिला भुते दिसत, आणि ती वार्‍यासारखी असतात. तिच्याकडून भुते पाहिल्याचा एखादा किस्सा ऐकला आहे. पण तिला एकदा विचारले की तुला भिती नाही का वाटली तेव्हा तिने मला उत्तर दिले की जिवंत माणसे भुतांपेक्षा भयंकर असतात. आता त्यात तथ्य वाटते. :)

ह्या धाग्यावरील काही प्रतीसाद ही तितकेच खिळवुन ठेवणारे आहेत.
मी अनेकदा माझ्या स्वप्नात हे बघतो पण कधीच भिती वाटली नाही उलट पक्षी कुतुहलच आहे की आता पुढे काय?
g

मला स्वतःला लूसीड ड्रीमिंगचा (मराठीत त्याला जागृत स्वप्न म्हणायच का ?) सराव आहे अनूभव आहे, याची संपूर्ण वैधता विज्ञानही मान्य करतं. त्यामधे खरोखर केवळ आश्चर्य म्हणता येइल असे भास (स्वप्न) निर्माण करता येतात पण मी त्या अवस्थेची तूलना मृत्यू वा प्रत्यक्ष अ‍ॅस्टल बॉडी प्रोजेक्शन सोबत कंपेअर करू शकत करू शकत नाही कारण तसा अनूभव घेता येतो पण एक महत्वाचा फरक आहे. लूसीड ड्रीमिंगमधे माझा मेंदू काम करत असतो, शरीरात रक्ताभीसरण चालूच असते. मृत्यू याच्या उलट आहे.

अप्पा जोगळेकर's picture

12 Sep 2011 - 10:42 pm | अप्पा जोगळेकर

तुम्ही जे स्वप्नात बघता त्याचा फोटो कसा काय काढला ? आंतरजालावरुन घेतला असल्यास त्याचा दुवा द्याल का ?
कॉपी इमेज लोकेशन करुन पाहिले तेंव्हा इमेजचे नाव just-before-death.jpg असे आहे हे कळले.
माफ करा पण या धाग्याशी संबंधित नावाचे चित्र शोधून ते डकवले तर नाही ना ?

अप्पा जोगळेकर यांचा जयपाल यांना प्रश्नः
तुम्ही जे स्वप्नात बघता त्याचा फोटो कसा काय काढला ? आंतरजालावरुन घेतला असल्यास त्याचा दुवा द्याल का ?

हा घ्या दुवा:
http://joanofarc86.blogspot.com/

जयपाल यांच्या प्रतिसादात त्यांनी एक चित्र दिले आहे, आणि म्हटले आहे की "मी अनेकदा माझ्या स्वप्नात हे बघतो" ....
....याबद्दल जरा जास्त तपशील, माहिती द्यावी, ही विनंती.

म्हातार्‍या अन मरणोन्मूख लोकांच्या फँटसींबद्दलची एव्हढी चर्चा वाचून..आपलं ते... पाहून ड्वाळे पाणावळे!

“For me, it is far better to grasp the universe as it really is than to persist in delusion, however satisfying and reassuring.”
- Carl Sagan

आत्मशून्य's picture

10 Sep 2011 - 11:18 am | आत्मशून्य

Imagination is more important than knowledge- Albert Einstein

Nile's picture

10 Sep 2011 - 2:22 pm | Nile

१. “Imagination is more important than knowledge. For knowledge is limited to all we now know and understand, while imagination embraces the entire world, and all there ever will be to know and understand.”

२. delusion: A false belief strongly held in spite of invalidating evidence, especially as a symptom of mental illness: delusions of persecution.

३.imagination :the faculty or action of producing ideas.

Get well soon, O deluded mind.

आत्मशून्य's picture

10 Sep 2011 - 7:37 pm | आत्मशून्य

Good to see finally you trying to find your own cure... Let me know if I could help you. Google is not enough, neither knowledge without wisdom.

Nile's picture

11 Sep 2011 - 1:08 am | Nile

तुमची गरज नाही. शून्यात अडकून पडायचं नाहीए आम्हाला. बाकी तुम्हाला क्यूअर काय सापडेल असं वाटत नाही. काळजी घ्या.

हा सगळा धागा काल रात्री वाचला, अन् झोपताना अंगावर काठा उभा राहिला. (मी अजून तसा अनुभव घेतलेला नाही, म्हणून असेल कदाचित) ह्यात ब-याच जणांचे अनुभव कमी अधिक प्रमाणात सारखेच आहेत. एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती (२०-३० च्या आसपास) मरताना पाहण्याचा अनुभव आहे का? कारण वरील सर्व अनुभव वृद्धापकाळातील नैसर्गिक मृत्यूशी निगडित आहेत. अनैसर्गिक, अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत.

सुधीर यांनी अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत, असे विचारले आहे.
वरील मूळ लेखात घटना क्र. ३ मधील तरूण विशीतीलच होते:

घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.

स्मिता.'s picture

10 Sep 2011 - 2:44 pm | स्मिता.

घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.

याला त्या मुलाची मानसीक स्थिती जबाबदार असू शकते, नव्हे तर तेच कारण असावे असे वाटते.

जिवाभावाच्या ३ मित्रांना डोळ्यादेखत अपघातात मृत्युमुखी पडताना बघून त्या तरूणाच्या मनावर (की डोक्यावर?) त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे तो सतत त्यांच्याच विचारात राहून तशी बडबड करत असेल आणि एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार.

अवांतरः अपघातात वाचलेला तरूण नंतर दगावला यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली.

..... यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली....
व्वा.... तर मग येउ द्या ना या सिनेमाचे परिक्षण. वाचायला नक्कीच आवडेल, आणि या विषयावर आणखी जरा प्रकाश पडेल.

चित्राताईने म्हटले आहे की " एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार"

......आता प्रश्न असा की अश्या ताणाने समजा अगदी मेंदू काम करायचा थांबला, (तात्पुरता 'हँग' झाला) तर चक्क मरणच ओढवते का डायरेक्ट? भोवळ वा चक्कर येणे, बेशुद्धावस्था वा कोमात जाणे, असले काही न होता? मग योगी मंडळी समाधीत जातात तेंव्हा काय होते? 'जीव जाणे' आणि 'प्राण जाणे' हे वेगवेगळे असते म्हणतात, ते नेमके काय?

वेगवगळ्या वेळी आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील विविध स्थितीत मनुष्याची संवेदनशीलता व ग्रहणक्षमता वेगवेगळी असते, असे दिसते. अर्भकावस्था व मृत्यूच्या उंबरठ्यावरील अवस्था, यात काय काय जाणिवा होत असतात, हे जाणणे तसे कठीणच.
Dr. Brian Weiss यांचे Many Lives, Many Masters' हे पुस्तक वाचावे, असा आजच सल्ला मिळाला आहे. कुणी वाचले असल्यास या पुस्तकाची ओळख करून द्यावी.

स्मिता.'s picture

11 Sep 2011 - 12:24 pm | स्मिता.

चित्राताईने म्हटले आहे की " एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार"

......आता प्रश्न असा की अश्या ताणाने समजा अगदी मेंदू काम करायचा थांबला, (तात्पुरता 'हँग' झाला) तर चक्क मरणच ओढवते का डायरेक्ट?

ते वरचं वाक्य मी लिहिलंय म्हणून मी उत्तर देत आहे ;)

ते वाक्य लिहिल्यानंतर 'असा माझा अंदाज आहे.' हे वाक्य लिहायचे राहून गेले. मला वैद्यकिय क्षेत्रायलं ज्ञान शून्य आहे. त्यामुळे असह्य मानसिक ताणामुळे मेंदूवर नक्की काय परिणाम होत असावा याची माहिती नाही. पण ऐकीव माहितीनुसार (ही माहिती धडधडीत चुकीची असू शकते) अश्या ताणामुळे ब्रेन हॅमरेज का नर्व्हस ब्रेकडाउन होवून जीव दगावू शकतो, असे वाटते.

शाम भागवत's picture

21 May 2020 - 1:05 am | शाम भागवत

@चित्रगुप्त,
जून २०१८ ला मराठी अनुवाद प्रसिध्द झाला आहे.
अनुवादक निता कुलकर्णी
किंमत ₹२२५
डाॅ. विज यांची माहिती प्रस्तावनेत पाहू शकाल.

अप्पा जोगळेकर's picture

12 Sep 2011 - 11:00 pm | अप्पा जोगळेकर

एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती (२०-३० च्या आसपास) मरताना पाहण्याचा अनुभव आहे का?
१ मे, २००९ या दिवशी महिपतगड येथे मला स्वतःलाच (वय २० ते ३० च्या मधेच) मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा अनुभव आलेला आहे. मला तरी अशा प्रकारचा कोणताही अनुभव आला नाही. संकटातून बाहेर पडल्यावर २-३ मिनिटे काही सुचत नव्हते आणि कपाळावर घाम डवरला होता. कोणतीही अतींद्रिय घटना घडली नाही की कोणतेही पूर्वज भेटायलासुद्धा आले नाहीत. आणि माझ्यावर कोसळलेले संकट ज्यांनी पाहिले त्यांनादेखील असे काही जाणवले नाही.

तुमचा अनुभव हा 'मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा' अनुभव आहे.
मी दिलेल्या तीन घटना व अन्य प्रतिसादातील उदाहरणे प्रत्यक्ष मृत्यूची आहेत.

यावरून असे म्हणू शकतो, की मनुष्याची खरोखरच प्रत्यक्षात मरणाची वेळ येते, तेंव्हाच असे अनुभव येतात.

या विश्वाच्या विराट योजनेत/पसार्‍यात मनुष्याला अद्याप अज्ञात अशी कोणकोणती रहस्ये आहेत, हे सांगणे ती जोवर प्रत्यक्ष ज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत, तोवर अशक्य. परंतु अश्या अनुभवांवर संशोधन करण्याऐवजी वा संशोधन करण्यापूर्वीच नाकारणे, ही सुद्धा एक अंधश्रद्धाच म्हणावी लागेल.

सुमारे वीस वर्षांपूर्वी माझ्या परिचयातील एका तरूण मुलीला एखाद्या व्यक्ती बद्दल असे स्वप्न पडायचे, की त्याच्या भोवती पांढरे बुरखे घातलेल्या व्यक्ती बसल्या आहेत. हे स्वप्न काही दिवस रोज दिसायचे, आणि लवकरच ती व्यक्ती मृत व्हायची.तिला खूप भिती वाटायची या सर्व प्रकाराची. ती अगदी सरळ स्वभावाची, साधी मुलगी होती, अविश्वास करण्याजोगे तिचे व्यक्तिमत्व नव्हते. आता ती कुठे आहे, ठाऊक नाही.

मराठी कथालेखक's picture

21 Jul 2014 - 4:54 pm | मराठी कथालेखक

माझ्या तिशीतल्या एका नातेवाईक तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवले. या मुलीत व तिच्या भावंडांत खूप जिव्हाळ्याचे , घट्ट प्रेम होते. पण मृत्यूसमयी , आधी काही दिवस किंवा नंतरही कुणाला काही भास झालेले मला माहीत नाही.

भेंडी!!!! आपण तर मरताना* स्वतःचं संपूर्ण व्हिडिओ (विथ ऑडिओ) शूटिंगच करणार ब्वॉ. उगाच नंतर वरती अनेकांनी लावल्यात तसल्या थापा माझ्या नावाने कोणी खपवायला नकोत!!

*जास्त आगावूपणा करून कधी हा प्रश्न विचारू नये.

सेरेपी's picture

11 Sep 2011 - 6:09 am | सेरेपी

डॉकिन्स काकांची लय भारी आयड्या आहे ही!

५० फक्त's picture

11 Sep 2011 - 10:40 am | ५० फक्त

@ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न विचारायचा नाही हे मान्य, पण माझं तर ठरलेलं आहे आणि मला माहित पण आहे, त्यावेळी अशी काही शुटिंगची सोय वगैरे करता येईल का, अर्थात त्यावेळि कुठं कसा आणि का असेन हे माहित नाही, आज तरी.

तोपर्यंत संपर्क राहिला तर महिनाभर आधी फोन करेन तुम्हाला, हां फक्त त्या शुटिंगचे अधिकारविक्रीतुन आलेल्या रकमेपैकी ५०% रक्कम माझ्या वारसांना द्यावि लागेल.पण शुटिंगसाठी कुणि खर्च करणार नाही.

प्रचेतस's picture

11 Sep 2011 - 10:48 am | प्रचेतस

@ निळे, शूटींगसाठी प्रेक्षक म्हणून हौशे, नवशे, गवशे लागतीलच, तेव्हा आम्हाला पण बोलवा त्यासाठी, मानधन वैग्रे काही नको, फक्त जायचे यायचे भाडे आणि फस्क्लास जेवण असू द्या.

अन्या दातार's picture

11 Sep 2011 - 10:54 am | अन्या दातार

त्या कुठल्याश्या हॉलिवूडमधल्या नटीने असेच काहीसे केले होते. त्यातून काही क्लु लागतो का ते बघ रे निळ्या. आपणही तुझे अगदी तस्सेच करु. (तिने भारी जेवण दिले होते म्हणे ;) )

५० फक्त's picture

11 Sep 2011 - 11:09 am | ५० फक्त

'त्या कुठल्याश्या हॉलिवूडमधल्या ' - त्या कुठल्याश्या हॉलिवुडमधल्या म्हणजे किती हॉलिवुड आहेत असं म्हणायचं आहे तुम्हाला श्री. अन्या दातार.

आणि ती नटि कोण हे सांगा की, कारण हॉलिवुडमधल्या नट्या ब-याच गोष्टींच शुटिंग करुन ठेवतात असं ऐकलं आहे.

प्रचेतस's picture

11 Sep 2011 - 11:14 am | प्रचेतस

आता ते निळेरावांनाच माहिती असेल ना हो ५०, त्यांचा हॉलिवूडबाबत बराच अभ्यास आहे म्हणे.

Nile's picture

11 Sep 2011 - 2:49 pm | Nile

काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना अन पर्यायाने संपादकांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत.

शशिकांत ओक's picture

12 Sep 2011 - 5:01 pm | शशिकांत ओक

मित्र हो,
या विषयावर चित्रगुप्तांनी मला म्हटले होते की प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
खरे तर माझा हा विषय नाही.
म्हणून मी माझ्या वाचनातील एका पुस्तकाचा संदर्भ देत आहे तो वाचकांना आवडेल.
'मनुष्य मेल्यानंतर संपतो हेच करे असून त्याचा आत्मा उरतो हे म्हणणे खोटे आहे' असे म्हणणाऱ्या जडवाद्यांचे मेल्यानंतर मत परिवर्तन होते व तसे मत परिवर्तन झाल्याचा संदेशही त्यांचे मरणोत्तर आत्मे देऊ शकतात, या बद्दल हॅरी हुदिनी या प्रसिद्ध अमेरिकन जादुगाराचे उदाहरण अतींद्रिय संशोधन क्षेत्रात गाजलेले आहे. (असा करार करून दिलेला संदेश - म्हणजे मरणोत्तर आत्मरुपाने असे अस्तित्वात असल्याचा हुदिनीने आपल्या पत्नीला सादर केलेला पुरावा - हुदिनीने फोर्ड या माध्यमा मार्फत दिलेला संदेशच होता.)
येथे असाच करार करून मेलेल्या व मरणोत्तर आपण आत्मा म्हणून अस्तित्वात असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करणाऱ्या एका प्रसिद्ध चित्रपट लेखकाचे अलिकडील उदाहरण देत आहे.
"डॉ. झिवॅगो (१९६५) व ए मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६६) या प्रसिद्ध ऑस्कर विजेत्या चित्रपटांचा कथा लेखक रॉबर्ट बोल्ट हा नास्तिक होता. तो फेब्रुवारी १९९५ साली वयाच्या ७०व्या वर्षी वारला. त्याच्या पत्नीच्या कथनानुसार तिने आपले (मृत्युनंतर आत्मा उरतो) हे म्हणणे खरे असेल तर आत्म्याच्या रुपाने परत येऊन ते आपल्यापुढे पुराव्यानिशी सिद्ध करावे असा आपल्या पतीशी करार केला होता आणि आश्चर्य म्हणजे त्या करारानुसार मेल्यानंतर तिचे म्हणणे खरे असल्याचे पुरावे तिला दिले. उदा. तो मेल्यानंतर घरातील वस्तू आपोआप इकडच्या तिकडे विचित्र रितीने स्थलांतर करीत असत. तो पिण्याचा भारी शौकीन असल्यामुळे तिने पेल्यात दारू ओतली तर ती आपोआप अदृष्य होई. 'अशा घटना हल्ली वरचेवर घडत असून मी घरात एकटी नाही, नवरा माझ्या अजून सोबतीला आहे' असे बोल्टची विधवा पत्नी सर्रा माईल्स म्हणते. Ref. (Indian Express, Sunday, November 1995.)

संदर्भ - विज्ञान आणि चमत्कार (पान २२७ व २२८) लेखक प्रा. अद्वयानंद गळतगे.
वैचारिक रंगित खाद्य - 'मृतात्मा' हा शब्द कर्मधारय समास आहे कि षष्ठीतत्पुरुष समास आहे? तज्ञांनी आपली मते मांडावीत...
परलोकाच्या म्हणजे स्वतंत्र अतींद्रिय जगाच्या अस्तित्वाचा पुरावा देणारे संदेशही काही वेळा मृतात्म्यांकडून मिळतात.

चित्रा's picture

12 Sep 2011 - 6:29 pm | चित्रा

आलात? चित्रगुप्तांनी आमंत्रण देऊन बोलावले आणि तुम्ही आलात म्हणजे या धाग्याचे खरे सार्थक झाले.

>>तो पिण्याचा भारी शौकीन असल्यामुळे तिने पेल्यात दारू ओतली तर ती आपोआप अदृष्य होई.

हाहा. ही आयडीया मस्त आहे.
मरावे परी दारू पीण्या उरावे.

वरला प्रतिसाद वाचून उगीच मला चित्राच्या शरीरात नाईल, परा किंवा तत्सम प्रभृतींचे आत्मे घुसल्यासारखे वाटले. ;)

शिल्पा ब's picture

12 Sep 2011 - 10:07 pm | शिल्पा ब

ह्म्म.
दारु अदृश्य होऊन कुठे जात असेल? नाही म्हणजे दृश्य दारु अदृश्य व्यक्तीने प्यायल्यावर ती त्याच्या अदृश्य शरीराचा स्पर्श झाल्यावर अदृश्य होते? हे सगळं कैच्या कैच.

चित्रगुप्त's picture

13 Sep 2011 - 12:13 am | चित्रगुप्त

अहो, असे काय करता? मागे गणपतीने नाही का प्यायली?
दुधाची चरवी?
डोळ्यादेखत दुधाच्या चरव्या च्या चरव्या अदृष्य झाल्या होत्या म्हणे.

अप्पा जोगळेकर's picture

12 Sep 2011 - 11:12 pm | अप्पा जोगळेकर

का हो, आमचा नाडीपट्टीवर आता विश्वास बसला आहे असं सांगणारे आत्मेसुद्धा कदाचित संबंधित लोकांना भेट देत असतील. :)

या प्रतिसादाने या धाग्याला नवजीवन मिळणार असे भाकित (मरायच्या आधीच) वर्तवतो. ;)

मित्रांनो,
भले आत्म्यांना झिंग चढलेली असेल वा नसेल, इथे अनेकांना नाडीचा नशा असा काही सिर चढलाय कि ओकांच्या लिखाणाचा धसका व नाडीचा हिसका यामुळे अनेकांची झोप उडून गेली आहे.

जडवाद्यांचे मेल्यानंतर मत परिवर्तन होते व तसे मत परिवर्तन झाल्याचा संदेशही त्यांचे मरणोत्तर आत्मे देऊ शकतात, या बद्दल हॅरी हुदिनी या प्रसिद्ध अमेरिकन जादुगाराचे उदाहरण अतींद्रिय संशोधन क्षेत्रात गाजलेले आहे.

जर मेल्यानंतर जडवाद्यांचे मत परिवर्तन होते असा अनुभव आहे तर मग जीवंतपणी नाडीचा अनुभव घेऊन न मरताच मतपरिवर्तन व्हायला काही प्रॉब्लेम नसावा.
चित्रगुप्ता,
आपल्या (बो)जड वादी मित्रांना आज्ञा द्या की माझ्यासमोर यायच्या आधी नाडीची ताडी घेऊन का आला नाहीस.
यमदूतांनो, त्या जडवादी त्याला किंवा तिला पुन्हा खाली दामटा. संदेश द्यायला की लई मज्जा आली वर ... पण नाडी सोडल्याची काही और मजा असते....हलके करून पाठवा. करवा त्याना हिम्मत...

त्या अनूशंगाने लेखन का करत नाही ? ऑटोरायटींगमूळे आपला मृतात्म्यांसोबत संपर्क झाला असेलच की ? म्हणूनच प्रत्यक्ष तूम्हाला याबाबत काही गोश्टी अधीकाराने बोलायचा हक्क असताना असताना उगीच इतरांची उदाहरणे देण्यात वेळ का वाया घालवत आहात ? उत्सूकता आहे तूमच्या ऑटोरायटींग बद्दल.

ओक साहेब, आता जे नवीन यमदूत रिक्रूट होतील, त्यांचेसाठी आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक, अशी अट घातलेली आहे.
बघा:

http://misalpav.com/node/19117#comment-338087

शशिकांत ओक's picture

13 Sep 2011 - 10:33 am | शशिकांत ओक

लोका सांगे ब्रह्मज्ञान...
नव्या दूतांसाठी नाडीची अट केलेली सोय छान.
आपण व आपल्या यजमानांना - दस्तूरखुद्द राज यम - ज्यांना प्राण घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट कायमस्वरुपी मिळालेले आहे - त्यांनाही ती अट लागू करावी नाही तर , .... लोका सांगे ब्रह्मज्ञान... असे व्हायचे....
अण्णां तेथे पोचले की उपोषणाला बसतील तेंव्हा आधीच सावध व्हा म्हणजे तुमची नोकरी पक्की बघा ...

चित्रगुप्त's picture

13 Sep 2011 - 11:34 am | चित्रगुप्त

....आपण व आपल्या यजमानांना - दस्तूरखुद्द राज यम, त्यांनाही ती अट लागू करावी ......

पटले, अगदी यमरा़जांनासुद्धा पटले.
आता भारतातील सगळ्या शहरात जशी नाडी केन्द्रे उघडली आहेत, तसे इकडे स्वर्गलोकात उघडण्यासाठी यमराजांनी जागा सुद्धा अलॉट केली.
बोला, तुमचे ते लुंगीधारी व नाड्यांची बंडले 'उचलून' आणायला यमदूतांना केंव्हा पाठवू ?

चित्रगुप्त जी,

तुमचे ते लुंगीधारी व नाड्यांची बंडले 'उचलून' आणायला यमदूतांना केंव्हा पाठवू ?

मला का विचारत आहात. ते आपले काम आहे. हिशोब चुकता झाला असेल तर कानावरची पेन्सिल काढून, आपण ठरवा अन उचला एकेकांना.
पण तेथे आधी पोहोचलेल्या अंनिसवाल्याची नाडी पट्टीनिघाली व त्यांची पळता भुई झाली तर ते बिचारे पृथ्वीतलावर परतू शकणार नाहीत. तेंव्हा ठरवा नक्की काय ते.

चित्रगुप्त's picture

22 Apr 2012 - 8:57 pm | चित्रगुप्त

सध्या चाललेल्या धाग्यांशी हा विषय काहीसा संबंधित आहेसे वाटल्याने हा धागा पुन्हा वर काढत आहे.

चौकटराजा's picture

14 May 2013 - 1:10 pm | चौकटराजा

माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.
माझी आई मे ४ २०१३ रोजी जग सोडून गेली. वरील प्रकारच्या अनुभवाच्या जवळ जवळ ८५ टक्के अनुभव मलाही आला. आमच्या आईच्या बाबतीत दादा आले ऐवजी बाबुराव ( मृत्यू ४० वर्षापूर्वी) असे येई. यावर शास्त्रीय कारण असे की शेवट आला असता बाह्य मेंदू मृत पावत जातो.अंतर्भागात जुन्या आठवणी असल्याने त्याच भागाचा वापर होतो.

महेश नामजोशि's picture

16 May 2013 - 11:43 am | महेश नामजोशि

वरील विषयाला धरूनच एक माझ्या आठवणीत आहे.
माझे आईवडील लवकरच गेले. मी तेवीस वर्षाचा असताना ते एकापाठोपाठ वारले. काही वर्षानंतर माझ्या लग्नाच्या वेळची आठवण आहे. मुलगी पाहायला माझ्या काकांबरोबर आम्ही एका ठिकाणी गेलेलो असतांना, त्या ठिकाणी पहिले कधीही गेले नसतांना काका म्हणाले मी येथे अगोदरच येउन गेलो आहे. माझ्या वडिलांना भाऊ म्हणत. काका म्हणाले माझ्या स्वप्नात भाऊ आले होते व मला म्हणाले चल महेशकरिता मुलगी बघायची आहे. मी व भाऊ याच बिल्डींगमध्ये आलो होतो व भाऊंनी मुलगी लांबूनच बघून छान आहे म्हणाले. आणि स्वप्न संपले. आज आपण या ठिकाणी आलो तेव्हा मला स्वप्नात मी भावूंच्याबरोबर येथे मुलगी बघायला आलो होतो ती आठवण झाली. हा जिना, हि बिल्डींग पूर्ण लक्षात आहे. काय आश्चर्य आहे या पूर्वी आपण येथे कधीही आलो नव्हतो. तरी मला हि जागा पाहिल्याचे पूर्ण आठवते.

उगा काहितरीच's picture

4 Jan 2016 - 3:24 pm | उगा काहितरीच

असे धागे मिपावर येछृणं कमी झालंय राव !

नितीनचंद्र's picture

4 Jan 2016 - 4:37 pm | नितीनचंद्र

नैसर्गीक कारणाने/ वाढत्या वयाने जेव्हा मृत्यु होणार असतो तेव्हा माणसाच्या शरीरात अनेक बदल होत असतात. शरीरातले सोडीयम्/पोटॅशियमचे प्रमाण घटणे हा त्या पैकी एक असावा.

माझ्या वडीलांचे मृत्यु पुर्वी असेल सोडीयम्/पोटॅशियम घटले आणि ते एक दिवस लोकांना ओळखणे त्यांना कठीण झाले. प्रश्नांना उत्तरे असयुक्टिक होती. माझा मेहुणा ( बायकोचा भाऊ ) भेटावयास आल्यावर मी विचारले पहा कोण आले आहे ? त्यांनी महाराष्ट्रातल्या एका प्रतिथयश नेत्याचे नाव घेतले जो जिवंत होता आणि त्यांचा माझ्या वडीलांशी कुठलाही वैयक्तीक स्ंपर्क नव्हता. डॉक्टरांनी काही औषधे सलाईन द्वारे दिल्याने सोडीयम्/पोटेशियम नियंत्रणात आले. यानंतर मात्र डॉक्टरांनी वडीलांना घरी घेऊन जा म्हणुन सांगईतले

पुढे आणखी काही महत्वाची चिन्हे दिसली ज्यामुळे मृत्यु जवळ आला हे समजले.

१. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे.
२. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे.
३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे.

यातुन मृत्युचे निदान करता येते.

प्रत्यक्ष मृत्यु होण्याचे आधी काही लक्षणे दिसतात.

१. घर घर लागणे ( श्वास घेताना मोठा आवाज होणे )
२. पाय गार लागणे

या लक्षणावरुन मृत्यु दिवसांवरुन काही तासांवर आल्याचे निश्चित होते.

प्रदीप's picture

6 Jan 2016 - 6:48 pm | प्रदीप

पुढे आणखी काही महत्वाची चिन्हे दिसली ज्यामुळे मृत्यु जवळ आला हे समजले.

१. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे.
२. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे.
३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे.

ह्यातील १ विषयी काही माहिती नाही. पण २ हे काही मृत्यू जवळ आल्याचे लक्षण नाही. एकाच पोझिशनमधे दिवसेंदिवस झोपल्याने हे सोअर्स होतात. तसे ते होऊ नयेत, म्हणून उत्तम नर्सिंगची जरूरी असते. बेड सोअर्स होऊनही अनेक वर्षे जगलेली माणसे माझ्या पहाण्यात आहेत. ३ बद्दलचा माझा अनुभव वेगळा आहे. दुर्धर रोगामुळे बिछान्याला खिळलेली, तसेच केवळ वयामुळे अशक्त झालेली माणसे 'आता मला मरू द्या रे' असे अनेकदा म्हणत असतात. जगण्याची उर्मी जाऊनही अनेक वर्षे काढलेली माणसेही माझ्या पहाण्यात आहेत. तेव्हा तुमचे हे दोन्ही निकष चुकीचे व अपुर्‍या माहितीवर/ विदा असतांना बेतलेले आहेत.

साती ह्या तिन्हींविषयी व्यवस्थित सांगू शकतील.

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2016 - 11:03 pm | श्रीगुरुजी

१. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे.
२. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे.
३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे.

यातुन मृत्युचे निदान करता येते.

प्रत्यक्ष मृत्यु होण्याचे आधी काही लक्षणे दिसतात.

१. घर घर लागणे ( श्वास घेताना मोठा आवाज होणे )
२. पाय गार लागणे

माझी आजी १९८९ साली वृद्धापकाळामुळे गेली. मृत्युच्या साधारणपणे २४ तास आधी तिचे पाय तळपायापासून थंडगार पडायला सुरूवात झाली होती. ३-४ ब्लँकेट्स पायावर घालुन सुद्धा गुडघ्यापासून खालचे पाय थंडगार पडले होते. मृत्युपूर्वी ६-७ दिवस पूर्ण दिवसरात्र तिचे डोळे पूर्ण मिटलेले असायचे व डोळे मिटलेल्या अवस्थेतच ती बोलत होती, परंतु हाकेला ओ देऊनसुद्धा डोळे उघडत नव्हती. मात्र मृत्युपूर्वी साधारण दीड तास आधी तिचे डोळे लख्ख उघडले होते व दोन्ही बाजूला सतत नजर फिरवित ती सर्वांकडे पहात होती. जणू ती जाण्यापूर्वी सर्वांना डोळ्यात सामावून घेत होती. दीड तासानंतर तिचा श्वास हळूहळू संथ होत गेला व एका क्षणी पूर्ण थांबला आणि एक आत्मा परतात्म्यात विलीन झाला. ती जेथून आली तिथेच परत गेली. म्रुत्युनंतर तिचे कान बरेच काळे पडले होते. या संपूर्ण घटनेच्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो म्हणून अजूनही सर्व नीट आठवते.

तिमा's picture

4 Jan 2016 - 6:40 pm | तिमा

धागा वर काढलाच आहे तर माझा अनुभव नोंदवतो.

माझी आई १९९९ साली गेली. ती धडधाकट असताना आम्ही एक करार केला होता. मरणानंतर जर अस्तित्व असेल तर तिने ते कुठल्याही प्रकारे माझ्यापर्यंत पोचवायचं. त्यावर ती गंमतीने असे देखील म्हणाली ती, आत्म्याला जर हात पाय, वाणी, स्पर्श हे काहीच नसेल तर मी कम्युनिकेट कसं करणार ? त्यावर मी तिला म्हणालो, की बघ, जे काही करता येईल ते कर.
आमच्या घरांत एक मोठा डबा होता. तो तिने बोहारणीकडून घेतल्यामुळे, त्याचे झाकण नीट लागत नसे आणि लागलेच तरी कधी, मोठ्ठा आवाज करुन उडत असे. तिच्या अंतकाळात आम्ही हे बोलणे विसरुन गेलो होतो. ज्या दिवशी रात्री ती गेली, त्यावेळेस तिच्या उशाशी माझी पत्नी होती. आई तर कोमातच होती. मी घरी मुलांना बघायला थांबलो होतो, पण अस्वस्थ होतो. बरोबर रात्री ८ वाजता फोन वाजला. ही सांगत होती, एक मिनिटापूर्वीच आई गेल्या. मी फोनवर बोलत असतानाच स्वयंपाकघरांत मोठ्ठा आवाज होऊन त्या डब्याचे झाकण निघून आवाज करत खाली पडले होते.

याचा अर्थ कसा लावायचा, ते प्रत्येकाने ठरवावे.

जिन्क्स's picture

5 Jan 2016 - 7:51 pm | जिन्क्स

योगायोग. दुसरं काय !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2016 - 7:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येऊ द्या अनुभव.

-दिलीप बिरुटे

याॅर्कर's picture

4 Jan 2016 - 7:21 pm | याॅर्कर

I Hope कि मिपावर सगळे well educated आहेत.

सावि's picture

4 Jan 2016 - 8:28 pm | सावि

माझे आजोबा (वय ८४) असतांना त्यांना एकदा अति दक्षता विभाग मध्ये होते. डॉक्टर ने सांगितले दिलेल्या औषधांमुळे पुढचे ५-७ दिवस थोडा असंबद्ध बडबड करतील. मेंदू ला कमी रक्तप्रवाह आणि शक्तिशाली औषधे यामुळे असे होते हेही सांगितले. नंतर ३-४ दिवस ते ३०-३५ वर्षापूर्वी च्या काळात पोचले होते. मला ते त्यांचा लहान मुलगा म्हणून बोलत होते. घरच्यांना पुरेपूर कल्पना दिल्यामुळे आम्हीही तसेच वागत होतो. नंतर ते ठीक झाले पुढचे २ वर्ष अगदी ठणठणित घालवले. शेवटच्या क्षणी मात्र अशी काही बडबड वगैरे केल्याचा आठवत नाही. सगळे सुप्त मेंदू चे खेळ असतात, कोणी केमिकल लोचा म्हणतं तर कोणी भास …

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jan 2016 - 7:23 pm | प्रकाश घाटपांडे

अवयव दान करा आपले मरणानंतरचे अस्तित्व इतरांना जाणवेल
https://www.facebook.com/JaanAryaa/videos/10153332404900682/

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2016 - 7:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१०००

मेलेल्या माणसाच्या शरीराचा, शरीरदान अथवा अवयवदान यासारखा उत्तम उपयोग दुसरा नाही !

नितीनचंद्र's picture

6 Jan 2016 - 10:33 am | नितीनचंद्र

मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचा नक्कीच देहदाना साठी उपयोग आहे. चर्चा आहे आत्मा विषयाची. मृत्यु नंतरचे जीवन या बाबत. आपल्या माहिती साठी लिहतो की ही व्यक्ती ( अनिस किंवा अन्य लोकांनी ) कितीही वादग्रस्त ठरवली असली तरी ते नुसतेच एम बी बी एस नाहीत तर पुण्यात अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत/ होते. आज त्यांचे वय ९० च्या पुढे असेल. डॉ प. वि. वर्तक त्यांचे नाव. त्यांनी पुनर्जन्म या विषयावर पुस्तक लिहले आहे. आपण जर पुर्वग्रह दुषीत न करता वाचले तर आपल्याला अतिशय तर्क शुध्द वाटेल.

या शिवाय पुण्यातल्याच मेधा खासगीवाले नावाच्या स्त्री विदुषी २०० तिकीट लाऊन या विषयावर व्याख्यान देतात.

आपण वाचावे आणि अनुभव घ्यावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2016 - 10:47 am | डॉ सुहास म्हात्रे

माहितीसाठी धन्यवाद ! माझा प्रतिसाद घाटपांडे याच्या देहदानासंबंधीच्या प्रतिसादावर होता... पुनर्जन्माबाबत नव्हता, वा त्यांत तसा उल्लेखही नाही.

पुनर्जन्म, मृत्युसमीपचे (नियर डेथ) अनुभव व अश्या सर्वच अतर्क्य वाटणार्‍या घटनांकडे मी नेहमीच कुतुहलाने पाहतो व त्यांची कारणपरंपरा आधुनिक शास्त्राच्या परिघात बसेल काय हे शोधण्याचा प्रयत्न करतो.

मोदक's picture

6 Jan 2016 - 1:44 pm | मोदक

डॉ प. वि. वर्तक

मंगळावर जावून आलेले ते हेच का?

आनन्दा's picture

6 Jan 2016 - 1:21 pm | आनन्दा

माझा एक अनुभव, ऐकलेला.
एक वृद्ध गृहस्थ, तसे ठणठणीत, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अचानक सन्ध्याकाळी म्हणाले, चला पटपट आवरा, माझी जायची वेळ झाली. त्यांनी घाई करून लक्ष्मीपूजन लवकर करायला लावले, आणि १-२ तासांमध्ये गेले पण.

नितीनचंद्र's picture

6 Jan 2016 - 2:22 pm | नितीनचंद्र

@ मोदक,

बरोबर आहे. डॉ प वि वर्तकांचे या विषयातले मुळ लेखन वाचावे. त्याच्या आत्मचरित्रात त्यांनी म्हणले आहे की योगाभ्यासात खालील सुत्र आहेत. यांचा अभ्यास सुरु असताना त्यांनी मंगळ ग्रहावर संयम केला ( धारणा म्हणजे सातत्याने त्याचा विचार - ध्यान म्हणजे एकाग्रता- व समाधी म्हणजे त्या पुढची अवस्था - या तिन्हीच्या एकत्रीकरणाला संयम असे योगसुत्रात म्हणले आहे. )

एक दिवस डॉ प वि वर्तक यांना त्यांच्या सुक्ष्म देहाने मंगळावर पोहोचलो हे जाणवले. त्या अवस्थेत त्यांनी मंगळाची २१ निरिक्षणे केली. जसे मंगळावर कधी काळी पाणी होते इ. परंतु तुमच्या सारखे लोक उपहास करतील म्हणुन मानवाने सोडलेले यान मंगळावर पोहोचण्या आधी एक लेख छापुन २१ निरिक्षणे प्रसिध्द केली. या पैकी २० निरीक्षणे नासा च्या निरीक्षणाशी जुळणारी होती म्हणुन माझा प्रयोग यशस्वी झाला असे ते म्हणतात.

या नंतर निव्वळ असुये पोटी लोकांनी त्यांना आव्हान दिले जे त्यांनी मानले नाही. मग तुमच्या सारखे लोक हेटाळणी करत राहिले परंतु एकाही सुशिक्षीत माणसाने त्यांचे तर्कसंगत लेखन वाचुन ते किमान तर्कसंगत असल्याचा निर्वाळा दिला नाही. अर्थातच डॉ वर्तकांना त्याची आवश्यकता वाटली नाही.

योगसुत्रातल्या विभुती पादातल्या अनुक्रमे ४२ आणि ४८ सुत्रे व त्याचे विवरण - लेखांक एकूण ४ पैकी ३ रा http://www.maayboli.com/node/12306 घेतले आहे या करीता मायबोली आणि मुळ लेखकांना धन्यवाद.

४२. कायाकाशयोः संबन्धसंयमाल् लघुतूलसमापत्तेश्चाकाशगमनम् ।
शरीर आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता आणि कापसासारख्या हलक्या असणार्‍या पदार्थावर समापत्तिरूप तन्मयता प्राप्त करून घेतल्याने योग्याला 'आकाशगमन' हि सिद्धी प्राप्त होते.

४८. ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च ।
मनाच्या वेगासारखा गतीलाभ शरीरास होणे हे मनोजवित्व आणि कोणत्याही देशांतील आणि काळांतील विषयांचे सेवन इंद्रिय-निरपेक्ष घडू शकणे हा विकरणभाव. मागील सूत्रांत सांगितलेला इंद्रियजय प्राप्त झाला असता मनोजवित्व आणि विकरणभाव ही व्यष्टिनिष्ठ संयमाची फले आणि प्रधानजय हे समष्टिनिष्ट संयमाचे फल अशी तीन प्रकारची फले योग्यास प्राप्त होतात.

डॉ म्हात्रे - मृत्यु पुर्वीच्या विषयावर आपली चर्चा सुरु होती. देहदान विषयावरच्या आपल्या म्हणण्याला मी दुजोराच दिला आहे. केवळ सुरवात तिथुन होती म्हणुन मी आपले नाव घेतले इतकेच.

यार्कर यांनी I Hope कि मिपावर सगळे well educated आहेत. असे लिहले म्हणुन मी उच्च शिक्षीत व्यक्तीचा हवाला देत पुढचे लिहले.

प्रकाश घाटपांडे त्यांनी मृत्यु पुर्वीच्या विषयाला मृत्युनंतर देहदान अशी बगल दिली . मृत्युनंतर जिवात्मा आणि शरीर वेगळे होतात. त्यांनी शरीरासंदर्भात लिहले म्हणुन मी मृताम्या संदर्भात लिहले. लिहताना माझे स्वतः चे संशोधन नसल्यामुळे त्या संदर्भात डॉ प वि वर्तकांच्या पुनर्जन्म पुस्तकाचा उल्लेख केला. हा केला रे केला की मंगळ येणार हे उघड होते म्हणुन त्यावरही लिहले.

आता मुळ विषयावर चर्चा सुरु रहाण्यास हरकत नाही.

प्रसाद१९७१'s picture

6 Jan 2016 - 2:54 pm | प्रसाद१९७१

सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त जाऊन दाऊद कुठे लपला आहे ते रॉ/छोटा राजन /अजित डोवल ह्यांना सांगण्याची विनंती करणार का वर्तक साहेबांना ( त्यांना डॉक्टर म्हणणे बरोबर वाटत नाही )

सूड's picture

6 Jan 2016 - 6:43 pm | सूड

+१

एक सामान्य मानव's picture

7 Jan 2016 - 12:15 pm | एक सामान्य मानव

दाउदचा ठावठिकाणा सरकारला नीट माहीत आहे. प्रश्ण त्याला पकडून आणण्याचा किंवा मारण्याचा आहे. त्यासाठी सुक्ष्म देहाचा उपयोग नाही. तिथे "टायगर" सल्लुमिया, एजंट विनोद सैफ किंवा कमांडो अक्षयकुमार यांना पाठवायला हवे.

प्रसाद१९७१'s picture

7 Jan 2016 - 1:45 pm | प्रसाद१९७१

अहो मालक - ते उपहासानी लिहीले होते. मला इतकेच म्हणायचे होते की जर मंगळावर जाऊन निरीक्षण करण्यापेक्षा इथल्याच मानवजाती साठी उपयोगी पडतील अशी निरीक्षणे केली वर्तक बाबांनी तर कीती बरे होईल. अमेरीके ने ओसामाचा ठावठीकाणा शोधण्यासाठी कीती कष्ट केले, त्यापेक्षा भारतानी अमेरीकेला वर्तक बाबा १ दिवस भाड्यानी दिले असते तर कीती सोप्पे झाले असते.

तुम्ही उपहास (आणि / किंवा) हेटाळणी का करत आहात?

परंतु तुमच्या सारखे लोक उपहास करतील म्हणुन

मग तुमच्या सारखे लोक हेटाळणी करत राहिले

मी उपहास केला किंवा हेटाळणी केली हे अनुमान कशावरून काढलेत?

नितीनचंद्र's picture

6 Jan 2016 - 3:01 pm | नितीनचंद्र

हे शोधायला डॉ वर्तकांची आवश्यकता नाही. त्याला मारण्याचा प्लॅन मुंबई पोलीसांनी फोडला आणि तो वाचला ही कथा वाचली असेलच. तुम्ही त्यांना डॉ म्हणले नाही म्हणुन काही बिघडणार नक्कीच नाही. वैशम्य अशाचे की त्यांचे लेखन न वाचता हे लिहायचे.

जिवात्म जगाचे कायदे नावाचे पुस्तक एका पारशि स्त्रि ने लिहिले आहे. तिचे जुळे मुलगे अपघातात एकदम गेले त्यानंतर
तिचे अनुभव यात सांगितले आहेत. पुढे आत्म्याचे काय होते, त्यांच्या हि लेवल असतात वगेरे आहे.

योगी९००'s picture

7 Jan 2016 - 8:44 am | योगी९००

ते पुस्तक मी वाचले आहे. त्या पारशी बाईचे नाव खोर्दशेड भावनगरी आहे.

अनिरुद्ध प्रभू's picture

25 Apr 2016 - 10:54 am | अनिरुद्ध प्रभू

कहि वर्षापूर्वी तरुण भारत या व्रुत्तपत्रात गूढ्जाल नावाच एक सदर येत असे. त्याचे लेखक बहुदा अ.वि.साठे होते.(९९% खात्रि आहे पण १% नाहि. जाणकार प्रकाश टाकतिलच.) त्यात अशा विषयावर लेख येत असे. अब्राहम लिन्कन आणि त्याच भूत हे प्रकरण तिथेच कळाल. तसच अत्रे यान्च्या बाबत हि कळाल. ते गेल्यानन्तर त्यान्च्या बन्ग्ल्यात ते नोकराला हाका मारत असत अस ऐकिवात आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Feb 2017 - 12:35 pm | प्रकाश घाटपांडे

मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते? तो जिवंत असतो म्हणजे काय असते? हे चैतन्य म्हणजे नेमके काय? मी कोण आहे? असे प्रश्न मला पुर्वीही पडत असत. अलिकडे ही पडतात. विज्ञान या प्रश्नाकडे कसे पहाते? अध्यात्म कसे पहाते? तत्वज्ञान कसे पहाते?
असो शतकानुशतके हे प्रश्न असेच आहेत

मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते? तो जिवंत असतो म्हणजे काय असते? हे चैतन्य म्हणजे नेमके काय?

+१

संदीप डांगे's picture

10 Feb 2017 - 1:15 pm | संदीप डांगे

+१

शशिकांत ओक's picture

16 Feb 2017 - 8:44 pm | शशिकांत ओक

नमस्कार प्रकाशजी,
मृत्यू नंतर काय किंवा मृत्यू म्हणजे काय या प्रकरणी विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान काय म्हणतात हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून सुचवतो. प्रा अद्वयानंद गळतगेंची यावर तिन्हीअंगांनी विपुल लेखन केले आहे. ते वाचले तर काही खुलासे होण्यासाठी मदत होईल. आपल्याला गळतगे सरांचे वावडे नसेल तर इतर तपशील सांगता येईल.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Feb 2017 - 1:34 pm | प्रकाश घाटपांडे

गळतगे सरांचे लेखन परिचित आहेच. त्यांची काही मते पटत नसली तरी त्यांच्याविषयी आदर आहेच. विपुल, चिकाटीने व सातत्याने लेखन हे फार कमी लोक करतात. मी,रिसबूड व ते असा पत्रव्यवहार आठवतो. त्यांच नवीण विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन पुस्तक वाचायला पाहिजे एकदा. http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5607134768146518443?BookNa...

नमस्कार प्रकाशजी, जेंव्हा आपण (कै रिसबुड आणि तुम्ही) हे पुस्तक वाचा म्हणून आम्ही म्हटलं तेंव्हा वाचलेत कि नाही माहित नाही. कदाचित असेल. पण आता ही वाचायची उत्सुकता आहे ते ही चांगले आहे. नाडी ग्रंथांवर आपले विचार सध्या काय आहेत माहिती नाही. पण प्रत्यक्षात प्रमाण पहायला, आपले नाव वअन्य माहिती घेतली पाहिजे आहे. ती घेतली काय? आता माझा इंटरेस्ट संपला आहे. असे म्हणून आपण पळ काढू शकत नाही. कारण आपले नाडीग्रंथांचे खंडन करणारे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. म्हणून नाडी ग्रंथांवर 'मला काय त्याचे?' अशी भूमिका घेऊन चालणार नाही. म्हणून आपल्याला विनंती करतो आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Feb 2017 - 10:16 am | प्रकाश घाटपांडे

आता माझा इंटरेस्ट संपला आहे. असे म्हणून आपण पळ काढू शकत नाही. कारण आपले नाडीग्रंथांचे खंडन करणारे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे.

असेल ना! त्यातील मते सर्वांना पटतील असे नाही हे ही उघड आहे. पण ती कोणत्याही परिस्थितीत पटलीच पाहिजे असाही आग्रह नस्तो. तेच तेच प्रतिवाद करण्याचाही कंटाळा येतोच की! प्रतिवाद केला नाही म्हणजे पळ काढला अशी समजूत कोणी करुन घेतली तर घेवो. राजा भिकारी माझी टोपी चोरली राजा घाबरला माझी टोपी दिली ही गोष्ट आपल्याला माहित असतेच.
आपली मते मधून मधून तपासत राहावी त्यात बदल करावासा वाटला तर तोही करावा असे माझे मत आहे. विज्ञानात अंतिम सत्य शाश्वत सत्य अशी भानगड नस्से. आता काही विज्ञानांध ही लोक असतात. असो!

आपण असे म्हणता का की मी नाडीग्रंथ प्रत्यक्ष अनुभवून पाहून मत तपासणी करून बदल करायला तयारआहे. तर वरील इश्वरन यांनी केलेले निवेदन वाचून पूर्व ग्रह न ठेवता प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करावा ही विनंती.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Feb 2017 - 12:06 pm | प्रकाश घाटपांडे

आपण असे म्हणता का की मी नाडीग्रंथ प्रत्यक्ष अनुभवून पाहून मत तपासणी करून बदल करायला तयारआहे

मी अस म्हणालोच नाही. मी फक्त एक जनरल विधान केल. त्याचा तुम्ही तो अर्थ काढलात. माझी नाडी सापडलीच नव्हती तेव्हा. असो पण त्यासाठी वेळ व श्रम खर्च करायची तयारी नाही. कारण त्यात रस नाही. प्राधान्यक्रमावर ही ते नाही

शशिकांत ओक's picture

19 Feb 2017 - 5:56 pm | शशिकांत ओक

आपली मते मधून मधून तपासत राहावी त्यात बदल करावासा वाटला तर तोही करावा असे माझे मत आहे.

अहो असे मोघम उल्लेख करता म्हणून मी खुलाशासाठी नाडीग्रंथाबद्दलचे मत आधून मधून तपासणी करून आधीच्या मतात बदल करावासा वाटून झाला आहे का हे नक्की करायला विचारणा केली असता आता त्यात रस नाही असे म्हणता!म्हणजे नाडीग्रंथ भविष्य विषयावर आपण हरून काडीमोड घेतला आहे का? तर ते ही दिसत नाही.. सध्याच्या काळात हा विषय प्राधान्य क्रमांकावर नाही म्हणजे खाली कुठेतरी तोआहे का? नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण पुस्तक लिहून असल्याने बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधीत्व आपण करता आहात. ती बाब फक्त वैयक्तिक आवडी निवडीची राहात नाही. हे आपण जाणता.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2017 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे

नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण पुस्तक लिहून असल्याने बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधीत्व आपण करता आहात. ती बाब फक्त वैयक्तिक आवडी निवडीची राहात नाही. हे आपण जाणता.

असहमत आहे. मी असे मानत नाही.

असहमत आहे. मी असे मानत नाही.

वन लाईनर उत्तर देता आहात. त्यामुळे अडकायला नको इतपत अंनिसवाल्यांच्या बाजूने पुस्तके लिहायचा छकडा हाकायचा. पण नंतरच्या जबाबदारीचे जू मानेवर बसायला नको... ही खबरदारी दाखवत. अंनिससोबत सामाजिक जबाबदारी अंगावर यायला नको अशी खबरदारीची वाक्य रचना इथे किंवा तत्सम माध्यमातून करायला जागा करून ठेवायची.... छान... चालू द्या मतपरिवर्तन करायची मोहीम!
जन्म दिलेल्या मुलांचे भरण पोषण करायची जबाबदारी पालकांची तसेच प्रकाशित पुस्तक हे त्याच्या लेखकाचे वैचारिक अपत्य असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या जबाबदार्‍या टाळता येत नाहीत! तशी जबाबदारी तुमच्या न मानण्याने टळत नाही?

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2017 - 9:19 pm | प्रकाश घाटपांडे

पुस्तक वाचणार्‍या प्रत्येक वाचकाचे मतपरिवर्तन झाले पाहिजेच व ती लेखकाची जबाबदारी असे मानणार्‍यातला मी नाही. जबाबदारी झटकतो असे समजायचे असल्यास आपण तसे समजू शकता. मी वर राजा भिकारी चे उदाहरण दिले आहेच. हा वाद म्हणजे चर्‍हाट आहे. आपली मते वेगळी आहेत हे परस्परांना माहित आहे तर उगाच किती उगाळत बसायच?

शशिकांत ओक's picture

20 Feb 2017 - 11:56 pm | शशिकांत ओक

मला वाचकांचे मत परिवर्तन अपेक्षित नाही. पुस्तक लेखकाने आपले मत तपासून पाहिले व त्यांत बदल करावासा वाटला तर तो प्रांजळपणे कबूल करून विविध माध्यमातून प्रकाशित करावा. राजा आणि टोपी कथानकात शाब्दिक विजय मिळवल्याचे समाधान आपल्याला असेल. स्वतःच्या पट्टीचा शोध पूर्ण झालेला नाही म्हणता व नाडीग्रंथातील भविष्यकथनाला प्रत्यक्ष प्रमाण न अवलोकन करता पुस्तक प्रकाशित करता याचा संदर्भ कसा लावायचा यावर विचार वाचायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2017 - 11:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाडीपट्टी एक थोतांड असा नवीन लेख लिहाच पुन्हा मिपावर तुम्ही. नवीन लोक तरी वाचतील आणि नाडीच्या नादीतरी किमान लागणार नाहीत. काय म्हणता ?

-दिलीप बिरुटॆ

शशिकांत ओक's picture

21 Feb 2017 - 12:03 am | शशिकांत ओक

डॉ. प्रा दिलीप बिरुटे सर,
पका काका लागतील असे वाटत नाही!
नाडीग्रंथातील विविध पैलूंवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. ब्लॉग्ज, वेबसाईट्स, अॅड्रॉईड अॅप्स वगैरे... कदाचित आपल्याला वाचनात आली असलील...

प्रकाश घाटपांडे's picture

21 Feb 2017 - 11:28 am | प्रकाश घाटपांडे

नाडीवरील जुन साहित्यच इतक प्रचंड होतय आणि नवीन असे मुद्दे त्यात कालौघात आले आहेत असे वाटत नाही. नवीन फक्त वाचक असू शकतो. उत्सुकतेपोटी नाडीचा अनुभव घेणे व नाडी अ‍ॅडिक्ट होणे यातील फरक लोकांना अधूनमधून सांगत राहणे एवढेच. नाडीपट्टीतील मजकूर आपोआप बदलतो या ओकांच्या स्पष्टीकरणामुळे मी अगदी दिग्मूढ झालो होतो त्याकाळात व आताही.तेच तेच उगाळत राहणे हा एक मनोविकार ( ओसीडी) आहे. हल्ली संगणकावर फारसे बसवत नाही.
ओक साहेबांच्या नाडी भविष्याच्या कार्यक्रमाला मधे मी श्रोता म्हणून गेलो होतो तेव्हा गप्पा झाल्या. मतभेद मतभेदाच्या जागी.

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/2010/02/blog-post.html?m=1

.
Saturday, February 20, 2010
आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे.
(संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य)
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्या व मुंबईतील नाडी केंद्राचे संचालक.

वाचक मित्रहो,

नुकतेच मला इंटरनेटवर एका नाडी ग्रंथप्रेमी फोरमवर काही मते प्रदर्शित केली गेल्याचे कळले. त्या संदर्भात माझ्या जवळची माहिती मी आपणांशी शेअर करू इच्छितो. प्रथम मी माझी ओळख करून देतो. सन १९९९ पासून माझा संपर्क मुंबईतील नाडी ग्रंथांशी आला. प्रथम भाषांतरकार व त्यानंतर संचालक या नात्याने मी अंबरनाथला एक व पुण्यात सध्या दोन केंद्रे गेल्या ९-१० वर्षांपेक्षा अधिक काळ चालवतो. त्यामधून अगस्त्य, वसिष्ठ, महाशिव, कौशिक आदि अनेक महर्षींच्या नाडी पट्ट्या आम्ही हाताळतो व वाचायला घेतो. याशिवाय गेली ६-७ वर्षे अत्री जीव नाडीमधून अनेकांना आमच्या केंद्रातून मार्गदर्शन केले जाते.

या व्यवसायात येण्याआधी मी एक फॅशन डिझायनर म्हणून परदेशातही नाव कमावले. मी तमिळ असलो तरी जन्म मराठी मुलखातील असल्याने मला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. त्या ज्ञानाचा फायदा मित्रत्वाच्या नात्याने माझ्या घराशेजारील नाडी केंद्र थाटल्यांनी घ्यायला सुरवात केली. नंतर मी माझी नाडी ग्रंथ पट्टी पाहिली. त्यात तुला हेच काम आता या पुढे करावयाचे आहे. असे आल्यावर थोड्याशा नाराजीने मी या कामाला लागलो. नंतर मला या कामात रस आला व मी या व्यवसायात पडलो.

माझे दोनही भाऊ सध्या मला या कामात मदत करतात. मोठा पशुपती थेरगावचे तर कृपानंद डोंबिवलीला केंद्र चालवतो. अशा तऱ्हेने माझी इथल्या अनेक केंद्रातील नाडीवाचकांशी व तमिळनाडू मधील त्यांच्या पालक नाडीकेंद्रांच्या संचालकांशी व्यावसाय़िक संबंध आहेत.

नाडीभविष्यामुळे माझी विंग कमांडर ओकांशी ओळख झाली. त्यांच्या विविध भाषेतील लेखांमुळे, चर्चांमधून भाषणांमधून प्राचीन अनेक महर्षींच्या दिव्यज्ञान चक्षूंच्याज्ञानव भांडाराचे देशातील अनेक भागातील लोकांना मार्गदर्शन झाले. त्यांच्या बोलण्यातून असे कळले की श्री. बसव प्रेमानंद नावाचे एक आंतरराष्ट्रिय कीर्तीचे नास्तिकवादी संस्थाचालक इंडियन स्केप्टिक या नावाच्या मासिकातून आपले विचार प्रकट करत असतात. अनेक भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील निरीश्वरवादी चळवळीची ज्योत सन ८२-८३मधे पेटवण्याला त्यांचे मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यामुळे त्यांचा दरारा व प्रभाव संपूर्ण भारतात फार मोठा मानतात. त्यांची मते ही दगडावरील रेघ मानणारे अनेक मराठी नेते मंडळी आहेत. अशा या नरोत्तमांची नाडी ग्रंथांवरची मते अंतिम सत्य मानली गेली तर नवल नाही. अशा या बी. प्रेमानंदांचा व महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले.) पत्रव्यवहारातून जी चर्चा झाली ती नोव्हेंबर १९९६च्या अंकातून एकत्रिक प्रसिद्ध झाली. फलज्योतिषशास्त्राचे अभ्यासक श्री रिसवबूड अंनिस संस्थेतर्फे ज्योतिषाच्या विरोधाचा गड तेंव्हा सांभाळत असत. बी प्रेमानंदांनी संकलित केलेल्या ‘एस्ट्रॉलॉजी सायन्स ऑर ईगो ट्रिप’ नावाच्या पुस्तकात त्यांनी ज्योतिष विषयावर संयुक्तपणे लेखन केले होते. उभयतांची इतकी वैचारिक घनिष्ठता असूनही या लेखात बी.प्रेमानंद त्यांच्याशी कसे वागतात हे रंजक आहे. असो.

नोव्हेंबरच्या अंकातील सादरीकरण प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. ते साधारणतः तसेच ठेऊन त्यांच्या विचारांवर मी माझे स्पष्टीकरण / प्रतिक्रिया देत आहे. रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. आशयाप्रमाणे काही प्रश्नांना एकत्रिक करण्याची स्वतंत्रता घेतली आहे. एकंदरीत असे वाटते की बी प्रेमानंदांनी दिलेल्या उत्तरानी रिसबुड समाधानी नसावेत वा सहमत नसावेत. या लेखाची दखल इतक्या वर्षांनी घेण्याचे कारण एक तर मला कळले इतक्या उशीरा. पण हा विषय न शिळा होणारा व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने उत्तर देणे माझ्यासारख्याला उशीरा का होईना क्रमप्राप्त आहे. असो.

1. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी?

बी.प्रेमानंदांचे उत्तर – मला काही मोजके (a few) प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळाल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला आणि त्याने आतून एक ताडपट्टी आणली. त्यातून त्याने जी वाचायला सुरवात केली त्यातून माझ्या जीवनाचा संपूर्ण भूतकाळ अगदी १००टक्के बरोबर होता. पण ते नाडीवाचन जे केले गेले ते चुकीच्या म्हणजेच माझ्याबरोबर आलेल्या एका लेडी डॉक्टरच्या पत्रिकेवरून केले गेले होते.(बी प्रेमानंद आपल्या लेखात म्हणाले होते की नाडीवाचकाला गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी व बरोबर आलेल्या लेडी डॉक्टरनी आपल्या पत्रिकांची आदलाबदल करण्याची हातचलाखी केली होती.) नंतर असे समजले की आमची व आमच्या आई-वडिलांची नावे त्या पत्रिकांवर लिहिलेली होती. ती व अन्य माहिती नाडी वाचकांनी बेरकेपणाने गर्भित (सटल) प्रश्न विचारून विचारून आमच्याकडून मिळवली होती. खरेतर नाडीभविष्य पहायला आलेल्यात आपली काही माणसे (stooges) बेमालूमपणे मिसळून त्यांच्याकडून व नाडीवाचकाकडून माहिती अलगदपणे मिळवून ती ताडपत्रे बनवली गेली होती. (अधोरेखित माझे) य़ात आश्चर्यचकीत होण्याची काहीच गरज नाही. कारण जातकाकडून चलाखीने माहिती काढून तीच त्याला पत्रिकात पाहून भविष्य म्हणून सांगण्याची युक्ती अन्य ज्योतिषी देखील इतकी सर्रास वापरतात. हीच साधी चलाखी नाडीवाले करतात.

माझे स्पष्टीकरण –

1. अशा तऱ्हेचा लेखात की ज्यात नाडी पट्टयांचे खोटेपणा उघड केला गेल्याचा दावा केला जातो, अचुक व नेमकी माहिती अतिशय महत्वाची ठरते. मात्र संपूर्ण लेखात ते दोघे कोणत्या तारखेला, कोठल्या नाडी केंद्रात जाऊन आपली नाडी पट्टी पाहिली, त्यावेळी नाडीरीडर कोण होता. याचा सालेम या गावाच्या नावाव्यतिरिक्त पुसटसा उल्लेखही त्यात नाही.
2. दक्षिण भारतातील प्रचलित नाडी पट्टी शोधण्याचे काम व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याच्या ठशांवरून केले जाते. त्यासाठी नाडीकेंद्रात जाताच ठसे घेतले जातात. पत्रिका किंवा कुंडली जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती नाडीपट्टीतून येणाऱ्या कुंडलीशी ताडून पहायला उपयोगी पडते. कुंडलीची-पत्रिकेची मागणी नाडीपट्टी शोधायला केंद्रातून केली जात नाही. बी प्रेमानंदांच्या संपूर्ण लेखात त्यांनी व बरोबरच्या व्यक्तीने अंगठ्याचा ठसा दिला असा ते उल्लेख करत नाहीत. हे नमूद करण्यासारखे आहे.
3. त्यांनी नाडी भविष्याला ठोकभावात थोतांड ठरवण्याबद्दलचे त्यांचे मत फक्त एका नाडी पट्टीच्या अनुभवावरून आधारित आहे. एका कुठल्यातरी निनावी केंद्रात कुंडलीवरून घेतलेल्या अशा परीक्षणातून नाडी पट्टीत व्यक्तीची नावे व अन्य मजकूर कोरून लिहिलेला असतो का नसतो हे ठरवण्यासाठीचा तो अंतिम पुरावा म्हणून मानता येणार नाही.

२. प्रश्न – जेंव्हा त्या नाडी वाचकाने त्या लेडी डॉक्टरच्या नावाचा व व्यसायाचा अचुक उल्लेख सांगितला त्यात ती बालरोगतज्ञ( Paediatrician) आहे की बाळंतपणाची (gynec) तज्ञ आहे ह्या फरकाला फारसे महत्व रहात नाही.

उत्तर – नाही कसा, त्यामुळे फार मोठा फरक पडतो. कारण नाडी वाचक तिच्या बद्दलचे भविष्यकथन माझ्या कुंडलीवरून करत होता. यारून असे सिद्ध होते की तो ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून ते करत नव्ह्ता. आम्ही आमच्या कुंडल्या आमची व आमच्या पालकांची नावे खोडून त्याला दिल्या होत्या. त्याच्या चुकीच्या कुंडल्यांवर आधारित भविष्यकथनामुळे आम्हाला हसू दाबुन ठेवणे अशक्य झाले.

माझे स्पष्टीकरण –

1. श्री.प्रेमानंद आपण केलेल्या हातचलाखीचा उगीचच गवगवा करत आहेत. कारण त्यांनी कुंडल्यांची अदलाबदल केल्याने नाडी वाचकाच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. बऱ्याचदा अनेकजण आपल्याजवळच्यांच्या नाडी पट्ट्यापहायला त्यांचे हाताच्या आंगठ्याचे ठसे आणतात. जेंव्हा नाडीपट्टी सापडते तेंव्हा भविष्य कथन करताना त्याचा अर्थ असा होत नाही की ज्याने ते ठसे प्रस्तूत केले त्याचे ते भविष्यकथन असते. पट्टी वाचली जात असताना ती व्यक्ती समोर हजर आहे किंवा नाही याचा यामुळे फरक पडत नाही.
2. या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही आमच्या कुंडल्यांवरील नावे खोडून त्याला दिल्या होत्या. पण त्या आधीच्या उत्तरात ते म्हणतात (अधोरेखित केलेले वरील वाक्य वाचा ) की आमच्या कुंडल्यांवरील नावे वाचून त्यांनी नाडी पट्टीतील माहिती असल्याचे भासवले. यातले खरे काय ?

प्रश्न - मला तर उलट त्या नाडीवाचकाच्या हातचलाखीवर हसण्याऐवजी त्याने १०० सत्यमाहिती शोधण्याच्या त्याच्या कसबाचे कौतुक वाटले असते. पुढे आपण असे ही म्हटले आहे की त्या नाडीवाचकाच्या हातून तुम्ही ती नाडीपट्टी हिसकाऊन घेतलीत व त्यात वाचनाच्या वेळी त्या खोलीत एक व्यक्ती पायात सँडलघालून आल्यामुळे केंद्राच्या शुचितेचा भंग केला गेला असे जे त्या आलेल्या एका व्यक्तिच्या संदर्भातील कथन होते ते त्या पट्टीत नसल्याचे आढळले असे म्हटले आहेत. याचा अर्थ त्या पट्टीवरील लिखाण व त्याची भाषा आपणांस वाचता येते असा होतो. तसे असेल तर मी एक फोटो आपणांस पाठवू इच्छितो. हा फोटो श्री. ‘ओका’ यांनी डॉ. जयंत नारळीकर(ज्या खगोलशास्त्रज्ञाला २००४ साली ‘पद्मविभूषण’ म्हणून सम्नान्मानित केले गेले होते.) यांना पाठवला होता.(श्री. रिसबुड विंग कमांडर ओक (Oak) नावाचा उच्चार ‘ओका’ असा मुद्दाम करून त्यांचा शक्यतो पाणउतारा करण्याचा प्रयत्न करत असत. त्याचा हा पुरावा) आणि नंतर तो फोटो डॉ दाभोळकर (जे गेले अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची निरीश्र्वरवादी संस्था महाराष्ट्रात चालवतात) यांनी एका सभेत पुण्यातील तमिळभाषा जाणणाऱ्या लोकांनी त्या पट्टीतील मजकूर वाचावा असे जाहीर आवाहन केले होते.

उत्तर – जर मला आपण चांगल्या दर्जाची फोटोची कॉपी पाठवली तर मी त्यात काय लिहिले आहे ते कळवीन. जर मला नाडीपट्टीचे ताडपत्र पाठवलेत तर त्याची कार्बन कसोटी करून त्या पट्टीचे आयुष्य किती हे देखील शोधून सांगेन. पण तुम्ही ते पाठवण्याची तसदी घेतली नाहीत.

माझे स्पष्टीकरण -

1. श्री बी. प्रेमानंदांनी त्यांना स्वतःला तमिळभाषेतील मजकूर वाचायला येतो किंवा नाही ही बाब मुद्दामच गुलदस्तात ठेवली आहे. अर्थातच येत नाही. कारण त्यांना कूटतमिळ वाचायला आले असते तर तात्काळ लक्षात आले असते की जे भविष्य म्हणून सांगितले जात आहे, ते ग्राहकाकडून कोणत्या ना कोणत्या युक्तीने मिळवून सांगितले जात नसून ते त्या पट्टीत खरोखरच कोरलेले आहे. हे मान्य करावे लागले असते. कधी क्वचित प्रसंगी वाचनाच्या वेळी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख ही केला जातो. पायात सँडल घालून त्या खोलीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीबाबत तसे झाले असण्याची शक्यता आहे.
2. श्री रिसबुडांनी त्यांना तो फोटो न पाठवण्यामागे कारण असावे. पुण्यात २९ सप्टेंबर १९९५ रोजी जो फोटो शो केला गेला त्याचे ते कारण असावे. त्या सभेत अंनिसचे १००हून जास्त सभासद हजर होते. त्यामधे वर्तमानपत्रातील आवाहन वाचून तीन तमिळ भाषा जाणणारे लोक उपस्थित होते. त्यांना तो फोटो दाखवण्यात आला तेंव्हा मीडियाच्या दोन कॅमेऱ्यासमोर (नंतर लेखी) त्यांनी जाहीर केले की त्या फोटोतील भाषा तमिळच आहे. जुनी लिपी असल्याकारणाने ती वाचायला सामान्यपणे अवघड आहे.
3. कोणतेही नाडी केंद्र आपल्याकडील नाडी पट्ट्यांची कार्बन कसोटी करायला देण्याच्या फंदात पडणार नाही कारण ज्या संस्थांचा मूळ हेतूच नाडी भविष्याला कोणत्याही थराला जाऊन बदनाम करण्याचा आहे अशांना सहकार्य कोण का म्हणून करील? मात्र विंग कमांडर ओकांसारख्या निस्पृह व सचोटीने वागणारऱ्यां शोधकांना प्राचीन महर्षींनी केलेल्या या लोकोत्तरसेवेचा शोध घेण्यासाठी आमच्यापैकी कितीतरी नाडीकेंद्रांनी त्यांना आपणहून फोटो काढायची नुसती परवानगी दिली नाही तर त्यांना फोटो उपलब्ध करून देण्याला तत्परतेने मदत केली आहे.
4. हे मात्र नक्कीच आश्चर्य आहे की बी. प्रेमानंदांसारख्या व्यक्तीने, ज्याने आपले सर्व आयुष्य पत्रिकेवरून किंवा अन्य मार्गांनी केल्या जाणाऱ्या भविष्यकथनाला थोतांड म्हणून सिद्ध करण्याचा वसा घेतला आहे, त्यांनी जर-तरची भाषा वापरून, ‘मला जर कोणी नाडी पट्टीचे पान आयते आणून दिले तर मी माझ्या मर्जीच्या प्रयोगशाळेतून त्या पट्टीची तपासणीकरून त्या ताडपट्टीचे आयुष्य ठरविन’ अशी नुसती गर्जना करणे, त्यांना किंवा त्याच्या सारख्या विचारांच्या व्यक्तींना व संस्थांना किती लांछनास्पद आहे? अशांना आपणहून शोधकाम करायला कोणी अडवले आहे ? जर ते आमच्या केंद्रात नाडी महर्षींच्याकडे श्रद्धाभावाने नाडी भविष्याचे रहस्य जाणून घ्यायला आले तर आम्ही त्यांना नक्कीच योग्य ती मदत करू. पण नाडी वाचकांची व पर्यायाने नाडी महर्षींची मस्करी करायला आलात तर मात्र आपल्याकडून सहकार्य मिळणार नाही.

प्रश्न – असे मानले जाते की शके ३०० च्या सुमारानंतर भविष्यशास्त्राच्या संदर्भात ऋर्षींचा उल्लेखांना सुरवात होते.त्यामुळे अस्सल नाडी पट्यांचे आयुष्य १७०० वर्षांपेक्षा जुने नसावे. हे मात्र नक्की की नाडी पट्ट्यात ऋषींचे उल्लेख येतात.

उत्तर – ओरिजिनल किंवा अस्सल ताडपट्टया असतात हे मानणेच मुळात चुकीचे आहे. त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात. पण त्या प्राचीन दिसाव्यात यासाठी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. तथापि त्या पट्यांचे आयुष्य मात्र शोधता येईल. त्यावरून नाडी पट्टयांचा खोटेपणा सिद्ध करता येईल.

माझी प्रतिक्रिया –

1. या ठिकाणी नोंद करायला हवी की जर्मनीतील एका थॉमस रिटर नावाच्या व्यक्तीने भारतातून एक नाडी पट्टी मिळवून त्याची कार्बन १४ कसोटी त्यांच्या देशातील अत्यंत प्रगत अशा प्रयोग शाळेत केली आहे. शिवाय त्यांनी त्या नाडी पट्टीतील मजकुराची जर्मनीतील तमिळभाषा तज्ज्ञांकडून स्वतंत्रपणे करवून घेतली आहे. त्यात त्या तज्ज्ञांनी असे म्हटले की पट्टीतील मजकूर कोणत्या तरी धार्मिक ग्रंथांचा किंवा पौराणिक कथांचा नसून खरोखरच कोणा एकाचे भविष्यकथन आहे. कार्बन कसोटीच्या निर्णयात असे म्हटले गेले की ती पट्टी कमीतकमी ३५० ते ४०० वर्षे जुनी असावी. जर एका परदेशी व्यक्तीला कार्बन कसोटी करता येत असेल तर आम्हा भारतीयांना ती करायला कोणी आडवले आहे?
2. विविध नाडी केंद्रातून असे अनेकदा सांगितले जाते की सध्याच्या उपलब्ध नाडी पट्ट्या तंजावूरच्या सर्फोजी राजे भोसले (१७९२ ते १८३२) या मराठा राजाच्या काळात पुनर्लेखित केल्या गेल्या. त्यामुळे असे शक्य आहे की ताडपट्टयावरीन मजकूर प्राचीन असावा मात्र त्यामानाने ताडपट्ट्या ३०० वर्षांच्या आसपासच्या जुन्या असाव्यात. हे म्हणणे जर्मनीतील कार्बन १४ कसोटीच्या शोधकार्याच्या उपपत्तीवरून ही सिद्ध होते.

प्रश्न - मी आपणांकडून हे जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही म्हणता की तुमचा भूतकाळ त्यांनी अगदी १०० टक्के तंतोतंत सांगितला. त्याने तुमच्या कडून सर्व माहिती कशी काढून घेतली (थोडक्यात तुम्ही त्याच्या खोटेपणाला कसे उघडे पाडू शकला नाहीत) त्याचे तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? आपल्या लेखात याचे उत्तर मिळत नाही.

उत्तर – वस्तुस्थिती अशी आहे की आपण माझा लेख अत्यंत काळजीपुर्वक वाचलेला नाही.(श्री. प्रेमानंदांनी रिसबुडांनी आपला लेख नीट काळजीपुर्वक वाचलेला नाहीत असे लेखात आधुनमधून फटकारले आहे. त्यातलाच हा एक उल्लेख)

ती अशी -

1. नंतर असे लक्षात आले की कुंडल्यांवर आमची व आमच्या आई-वडिलांची नावे लिहिलेली होती. अन्य माहिती गर्भित (सटल) प्रश्न विचारून मिळवली गेली.
2. काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे मिळवल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला.त्याने एक (सुटी) ताडपट्टी आणली. (म्हणजे प्रश्न विचारते वेळी वाचल्या गेलेल्या माळेसारख्या दोरीने ओवून बंद केलेल्या ताडपट्टयांच्या व्यतिरिक्त) आणि त्यातून त्याने आमचे भूतकाळाचे वर्णन वाचले जे १०० टक्के सत्य होते.
3. सत्यता ही आहे की नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. चुकीची उत्तरे दिली गेली तर भविष्य कथन ही चुकेल. तुम्ही दुसऱ्याची पत्रिका आपली म्हणून दिलीत तर भविष्यकथन तुमच्याकडून काढलेल्या माहितीच्या आधारे होईल ना की त्या पत्रिकेच्या आधारावरून. आपले नाव व व्यवसाय सोडता जी बरीचशी माहिती सांगितली जाते ती त्या ताडपट्टीवर नसणार. जे भविष्य कथन म्हणून केले जाते ते ढोबळमानाने सर्वांना लागू पडेल असेच असते.

माझी प्रतिक्रिया –

1. मी आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीची नाडीपट्टी स्त्रियांच्या डाव्या व पुरुषांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून शोधली जाते. पत्रिका वा कुंडलीवरून नाही. श्री. प्रेमानंदांनी अंगठ्याच्या ठशांचा पुसटसा देखील उल्लेख आपल्या लेखात केलेला नाही. हे कसे काय? खरे तर त्यांच्यासारख्या प्रखर बुद्धिवादी व्यक्तीने या बाबत खुप ढोल पिटायला हवे होते, कि अंगठ्यांच्या ठशांच्यावरून भविष्य कथन करतो असे म्हणणे म्हणजे निव्वळ देखावा असावा. आदि.

1. त्यांचे हे कथन की तो नाडीवाचक आत गेला व त्याने आतून आणलेल्या एका ताडपट्टीतून त्यांचे भविष्यकथन करण्यात आले. त्यात त्यांचा भूतकाळ १०० टक्के बरोबर आला. यात काही गफलत आहे. कारण सर्व नाडी पट्टयांना असलेल्या भोकातून दोरी माळेप्रमाणे ओवून बंद केलेल्या असतात. अशा ताडपट्ट्या दोन लाकडी बॅटन सारख्या पट्ट्यांच्यामधे घट्ट बंद करुन वर उरलेल्या दोरीने ते पॅकेट जाम गच्च बांधून टाकले जाते. जेंव्हा केंव्हा नाडी पट्टीत आपली पट्टी सापडली असे ग्राहक म्हणतो तेंव्हा ती पट्टी त्या ओवून बांधलेल्या पॅकेटमधलीच असते. त्त्यामुळे श्री. प्रेमानंद कोणत्या नाडीकेंद्रात गेले होते याबद्दल प्रश्न पडतो. अशी एक सुटी नाडीपट्टी आतल्या खोलीतून आणून जर भविष्यकथन केले जात होते तर त्याच वेळी त्यांनी वाचकाला व केंद्र प्रमुखाला तशी विचारणा का केली नाही? आश्चर्य असे की त्यांच्यासारखा प्रत्येकाचा खोटारडेपणे उघडे पाडण्याच्या कलेत तज्ञ, शिवाय जो स्वतः कुंडल्यांची अदलाबदल करण्याची हातचलाखी करतो त्यालाही नाडी वाचकांच्या खोटेपणाला उघड करता आले नाही ? ‘असे असेल-तसे असेल’ असे शुष्क तर्क करण्यापलिकडे ते गप्प बसतातच कसे? आणि त्या नाडी वाचकाने केलेल्या ‘भविष्यकथनात १०० टक्के सत्य सांगण्यात आले’ या भुलावणीला बळी कसे पडलो असे सांगतातच कसा व का? पुन्हा पुन्हा नाडी केंद्रांना स्वतः वा आपले तरबेज चेले पाठवून नाडी केंद्रांचा खोटेपणाचा धंदा आजही चालवू का देतो?
2. याचे साधे व सोपे कारण असे आहे की श्री. प्रेमानंदांनी वर सुचवलेला पर्याय नाडी पट्टया ऑर्डर प्रमाणे आत खोलीत बसून तयार केल्या जातात वगैरे सर्व अत्यांतिक कल्पनाविलास आहेत. नाडी केंद्राचे लोक बाहेर बसवून त्यांच्यामार्फत व नाडी वाचकाने चतुराईने प्रश्न विचारून मिळवलेल्या माहितीवरून केंद्रातल्या एका खोलीत बसून गुप्ततेने ताडपट्ट्यावर लिखाण करून काहीतरी कारण काढून नाडीवाचकाच्या हाती गुपचुप पोचवल्या जातात हे म्हणणे इतके हास्यास्पद आहे की त्यांच्या सारख्या आंतरराष्टीय दर्जाच्या कृतीशील बुद्धिवाद्याला ते शोभत नाही. अशी फालतू कारणे दाखवून नाडी केंद्रवाचकांना ताडपट्ट्यात कूटलिपित त्वरित लेखनाची कला अवगत असल्याचा मान देऊन त्यांचा भाव मात्र त्यांनी उगीचच वाढवला आहे.
3. नाडीकेंद्रातील वाचक फक्त नाडीपट्टयातील मजकूर वाचू शकतात. त्यांना तो मजकूर कोरुन लिहिता येत नाही असे ते स्वतः प्रांजळपणे वेळोवेळी कबूल करतात. पण श्री. प्रेमानंदांसारखे लोक आपले तर्क खरे आहेत असे भासवण्याकरता त्यांना जबरदस्तीने ताडपट्ट्यात कोरून लेखनकरण्याच्या कार्यातील तज्ञ मानतात! श्री. प्रेमानंदांना ते ताडपट्टया लिहित असतात असे जर वाटत होते तर त्यांनी नाडी केंद्रवाल्यांना आत जाऊन पकडले का नाही त्यामुळे पुराव्याशिवाय बोलण्यात काय मतलब आहे?
4. या संदर्भात एक नाडी केंद्रचालक व नाडीपट्टयांचा सांभाळकरणारा म्हणून मी यावर प्रकाश टाकू शकतो. जेथे नाडी पट्टया ठेवल्या जातात त्या खोलीत अन्य कोणाला प्रवेश दिला जात नसला तरी तेथे काय असते व काय चालते याचा खुलासा माझ्यासारखा नाडी केंद्रसंचालकच करू शकतो. त्या खोलीत गुप्तपणे लिखाण वगैरे काहीही चालत नाही. पुण्यासारख्या शहरात गेली १०-१२ वर्षे नाडी केंद्रचालवणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तिचे जबाबदारीपुर्वक हे लेखन आहे याचे भान ठेऊन मी जे सांगतो त्याचे महत्व वाचकांनी जाणावे. कोणत्याच नाडीकेंद्रातून असे लपवून नव्या ताडपट्ट्या तयार करण्याचे काम केले जात नाही.
5. नाडीपट्यांची पॅकेट्स नीट व्यवस्थित एकावर एक लावून ठेवलेली असतात. नाडी वाचक कधी कधी बसून तर बहुतेक वेळा उभ्याने त्या पट्ट्याच्या पॅकेट्स मधून योग्य त्या अंगठ्याच्या ठशाच्या समुहाच्या पट्ट्यांचे पॅकेट शोधत राहतो. तमिळनाडूच्या बाहेर चालू असलेल्या नाडीकेंद्रात एकावेळी नाडी पट्यांची सीमित पॅकेट्स मागवली जातात. त्या अनेकदा सुटकेसेसमधे ठेवलेल्या असतात. या व्यतिरिक्त काही पाने झाडावरून उतरवलेल्या झावळ्या, पैकी काही एक सारख्या कापून तयार ठेवलेल्या, मजकूर न लिहिलेल्या वा काही जागा मजकूर लिहायला मोकळा ठेवलेल्या, अशा ताडपट्ट्या जर नाडीकेंद्रात ग्राहकाच्या मिळवलेल्या माहितीस तात्काळ लिहायला ठेवलेल्या असाव्या लागतील पण तशा त्या नसतात. त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया (म्हणजे नेमके काय?) करण्याचा प्रश्नच येत नाही.
6. नाडी भविष्य पहायला आलेल्यात केंद्रातील आपल्या माणसे बसवायची शक्कल तमिळनाडू राज्यात कदाचित अमलात आणणे शक्य होईल.(तशी ती केली जात नाही तो भाग वेगळा) मात्र युक्तीने एखाद्या अनोळख्या व्यक्तीच्या नकळत त्याच्यी व त्याच्या आई-वडिलांचे, पत्नी-पतीचे नावे, शिक्षण, नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, संततीची संख्या, जन्मदिवस आदि माहिती अत्यंत कमी वेळात काढण्यासाठी असामान्य वाकपटुत्व व तमिळभाषेवर प्रभुत्व असावे लागेल. त्याशिवाय अशी मिळवलेली माहिती जशीच्या तशी लक्षात ठेऊन ती एका ताडपत्रावर कोरून तयार करायची आदि तर्क करायला सोपे पण अमलात आणायला अशक्य आहेत. माणसे पेरण्याची शक्कल तमिलळनाडू राज्याबाहेरील भागातील केंद्रात चालवणे तर सर्वस्वी अशक्य आहे. कारण तमिळेतर भागात परिस्थिती नेमकी उलटी आहे. तेथे बाहेर बसलेल्या ग्राहकांची भाषा नाडीकेंद्रातील लोकांना येत नाही. नाडीवाचकांच्या संकोची स्वभावामुळे व भाषेच्या दुराव्यामुळे अनेक वेळा तोडक्यामोडक्या संभाषणांतून गैरसमज निर्माण होतात. या उप्पर कोणा नाडीकेंद्रातील माणसाने ग्राहकांशी घोळात घ्यायचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या भाषेच्या-बोलण्याच्या धाटणीवरून व सामान्यतः रंगावरून तो केंद्राचा माणूस म्हणून तात्काळ पकडला जाईल.
7. या शिवाय हे ही लक्षात ठेवले पाहिजे की नाडी भविष्य पहायला गेलेला व्यक्ती इतका मूर्ख वा भोळसट नक्कीच नसतो की परक्याला आपली माहिती तो आपणहून देईल. खरे तर नाडी भविष्य प्रथम पहायला गेलेला प्रत्येकजण नाडीकेंद्राच्या व ते पहायला आलेल्या अन्य लोकांकडे साशंकतेने व सावधानतेने इतरांकडे पहात असतो. या शिवाय आम्ही, नाडीकेंद्रातील कर्मचारी, अंगठ्याचा ठसा घेताना ग्राहकांना सावध करतो की पट्टी शोधायची पद्धती काय असते व त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना फक्त हो किंवा नाही यातच उत्तरे द्या. आपणहून माहिती आम्हाला किंवा इथे जमलेल्या कोणाला देऊ नका.
8. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्या अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा बोलणारी माणसे मिळत नाहीत. भविष्य कथन टेप करून देताना भाषांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते.
9. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील.
10. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यंच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात.
11. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाली आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही.
12. या इथे मी सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की जर कोणाला नाडी ग्रंथांचा अभ्यास करायची इच्छा असेल तर अशा अभ्यासकार्याला मी आनंदाने तयार आहे. मात्र ते अभ्यास कार्य पुर्वग्रहदूषित नसलेल्या श्रेष्ठ व नामवंत शास्त्रज्ञांच्या मंडळाच्या निर्देशनाखाली एकत्र येऊन करावे. त्यात नाडी ग्रंथ भविष्याला थोतांड असा शिक्का मारून खोटे ठरवणाऱ्या संस्था वा व्यक्तींचा समावेश नसावा.

(श्री. जी. ईश्वरन यांचे विचार - विंग कमांडर शशिकांत ओकांचा शब्दांकन)
Shashikant Oak at 5:31 PM



Home
View web version
About Me

My photo
Shashikant Oak

View my complete profile

Powered by Blogger.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Feb 2017 - 1:28 pm | प्रकाश घाटपांडे

महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले.)

रिसबूडांचे निधन १६ मार्च २००३ रोजी झाले. केवळ चुकीची माहिती लोकांपर्यंत जाउ नये म्हणून हा प्रतिसाद
ज्यांना रिसबूड म्हणजे नेमके कोण असा प्रशन पडला असेल त्यांनी कै. माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक हा लेख वाचावा