Skip to main content

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 04/09/2011 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत...... प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का? घटना १: माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे. घटना २: माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे. घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला. "वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?

वाचने 164463
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by प्रकाश घाटपांडे

आपली मते मधून मधून तपासत राहावी त्यात बदल करावासा वाटला तर तोही करावा असे माझे मत आहे.
अहो असे मोघम उल्लेख करता म्हणून मी खुलाशासाठी नाडीग्रंथाबद्दलचे मत आधून मधून तपासणी करून आधीच्या मतात बदल करावासा वाटून झाला आहे का हे नक्की करायला विचारणा केली असता आता त्यात रस नाही असे म्हणता!म्हणजे नाडीग्रंथ भविष्य विषयावर आपण हरून काडीमोड घेतला आहे का? तर ते ही दिसत नाही.. सध्याच्या काळात हा विषय प्राधान्य क्रमांकावर नाही म्हणजे खाली कुठेतरी तोआहे का? नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण पुस्तक लिहून असल्याने बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधीत्व आपण करता आहात. ती बाब फक्त वैयक्तिक आवडी निवडीची राहात नाही. हे आपण जाणता.

In reply to by शशिकांत ओक

नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण पुस्तक लिहून असल्याने बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधीत्व आपण करता आहात. ती बाब फक्त वैयक्तिक आवडी निवडीची राहात नाही. हे आपण जाणता.
असहमत आहे. मी असे मानत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

असहमत आहे. मी असे मानत नाही.
वन लाईनर उत्तर देता आहात. त्यामुळे अडकायला नको इतपत अंनिसवाल्यांच्या बाजूने पुस्तके लिहायचा छकडा हाकायचा. पण नंतरच्या जबाबदारीचे जू मानेवर बसायला नको... ही खबरदारी दाखवत. अंनिससोबत सामाजिक जबाबदारी अंगावर यायला नको अशी खबरदारीची वाक्य रचना इथे किंवा तत्सम माध्यमातून करायला जागा करून ठेवायची.... छान... चालू द्या मतपरिवर्तन करायची मोहीम! जन्म दिलेल्या मुलांचे भरण पोषण करायची जबाबदारी पालकांची तसेच प्रकाशित पुस्तक हे त्याच्या लेखकाचे वैचारिक अपत्य असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या जबाबदार्‍या टाळता येत नाहीत! तशी जबाबदारी तुमच्या न मानण्याने टळत नाही?

In reply to by शशिकांत ओक

पुस्तक वाचणार्‍या प्रत्येक वाचकाचे मतपरिवर्तन झाले पाहिजेच व ती लेखकाची जबाबदारी असे मानणार्‍यातला मी नाही. जबाबदारी झटकतो असे समजायचे असल्यास आपण तसे समजू शकता. मी वर राजा भिकारी चे उदाहरण दिले आहेच. हा वाद म्हणजे चर्‍हाट आहे. आपली मते वेगळी आहेत हे परस्परांना माहित आहे तर उगाच किती उगाळत बसायच?

In reply to by प्रकाश घाटपांडे

मला वाचकांचे मत परिवर्तन अपेक्षित नाही. पुस्तक लेखकाने आपले मत तपासून पाहिले व त्यांत बदल करावासा वाटला तर तो प्रांजळपणे कबूल करून विविध माध्यमातून प्रकाशित करावा. राजा आणि टोपी कथानकात शाब्दिक विजय मिळवल्याचे समाधान आपल्याला असेल. स्वतःच्या पट्टीचा शोध पूर्ण झालेला नाही म्हणता व नाडीग्रंथातील भविष्यकथनाला प्रत्यक्ष प्रमाण न अवलोकन करता पुस्तक प्रकाशित करता याचा संदर्भ कसा लावायचा यावर विचार वाचायला आवडेल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाडीपट्टी एक थोतांड असा नवीन लेख लिहाच पुन्हा मिपावर तुम्ही. नवीन लोक तरी वाचतील आणि नाडीच्या नादीतरी किमान लागणार नाहीत. काय म्हणता ? -दिलीप बिरुटॆ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ. प्रा दिलीप बिरुटे सर, पका काका लागतील असे वाटत नाही! नाडीग्रंथातील विविध पैलूंवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. ब्लॉग्ज, वेबसाईट्स, अॅड्रॉईड अॅप्स वगैरे... कदाचित आपल्याला वाचनात आली असलील...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाडीवरील जुन साहित्यच इतक प्रचंड होतय आणि नवीन असे मुद्दे त्यात कालौघात आले आहेत असे वाटत नाही. नवीन फक्त वाचक असू शकतो. उत्सुकतेपोटी नाडीचा अनुभव घेणे व नाडी अ‍ॅडिक्ट होणे यातील फरक लोकांना अधूनमधून सांगत राहणे एवढेच. नाडीपट्टीतील मजकूर आपोआप बदलतो या ओकांच्या स्पष्टीकरणामुळे मी अगदी दिग्मूढ झालो होतो त्याकाळात व आताही.तेच तेच उगाळत राहणे हा एक मनोविकार ( ओसीडी) आहे. हल्ली संगणकावर फारसे बसवत नाही. ओक साहेबांच्या नाडी भविष्याच्या कार्यक्रमाला मधे मी श्रोता म्हणून गेलो होतो तेव्हा गप्पा झाल्या. मतभेद मतभेदाच्या जागी.

In reply to by प्रकाश घाटपांडे

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/2010/02/blog-post.html?m=1 . Saturday, February 20, 2010 आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे. प्रेषक – जी. ईश्वरन पुण्या व मुंबईतील नाडी केंद्राचे संचालक. वाचक मित्रहो, नुकतेच मला इंटरनेटवर एका नाडी ग्रंथप्रेमी फोरमवर काही मते प्रदर्शित केली गेल्याचे कळले. त्या संदर्भात माझ्या जवळची माहिती मी आपणांशी शेअर करू इच्छितो. प्रथम मी माझी ओळख करून देतो. सन १९९९ पासून माझा संपर्क मुंबईतील नाडी ग्रंथांशी आला. प्रथम भाषांतरकार व त्यानंतर संचालक या नात्याने मी अंबरनाथला एक व पुण्यात सध्या दोन केंद्रे गेल्या ९-१० वर्षांपेक्षा अधिक काळ चालवतो. त्यामधून अगस्त्य, वसिष्ठ, महाशिव, कौशिक आदि अनेक महर्षींच्या नाडी पट्ट्या आम्ही हाताळतो व वाचायला घेतो. याशिवाय गेली ६-७ वर्षे अत्री जीव नाडीमधून अनेकांना आमच्या केंद्रातून मार्गदर्शन केले जाते. या व्यवसायात येण्याआधी मी एक फॅशन डिझायनर म्हणून परदेशातही नाव कमावले. मी तमिळ असलो तरी जन्म मराठी मुलखातील असल्याने मला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. त्या ज्ञानाचा फायदा मित्रत्वाच्या नात्याने माझ्या घराशेजारील नाडी केंद्र थाटल्यांनी घ्यायला सुरवात केली. नंतर मी माझी नाडी ग्रंथ पट्टी पाहिली. त्यात तुला हेच काम आता या पुढे करावयाचे आहे. असे आल्यावर थोड्याशा नाराजीने मी या कामाला लागलो. नंतर मला या कामात रस आला व मी या व्यवसायात पडलो. माझे दोनही भाऊ सध्या मला या कामात मदत करतात. मोठा पशुपती थेरगावचे तर कृपानंद डोंबिवलीला केंद्र चालवतो. अशा तऱ्हेने माझी इथल्या अनेक केंद्रातील नाडीवाचकांशी व तमिळनाडू मधील त्यांच्या पालक नाडीकेंद्रांच्या संचालकांशी व्यावसाय़िक संबंध आहेत. नाडीभविष्यामुळे माझी विंग कमांडर ओकांशी ओळख झाली. त्यांच्या विविध भाषेतील लेखांमुळे, चर्चांमधून भाषणांमधून प्राचीन अनेक महर्षींच्या दिव्यज्ञान चक्षूंच्याज्ञानव भांडाराचे देशातील अनेक भागातील लोकांना मार्गदर्शन झाले. त्यांच्या बोलण्यातून असे कळले की श्री. बसव प्रेमानंद नावाचे एक आंतरराष्ट्रिय कीर्तीचे नास्तिकवादी संस्थाचालक इंडियन स्केप्टिक या नावाच्या मासिकातून आपले विचार प्रकट करत असतात. अनेक भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील निरीश्वरवादी चळवळीची ज्योत सन ८२-८३मधे पेटवण्याला त्यांचे मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यामुळे त्यांचा दरारा व प्रभाव संपूर्ण भारतात फार मोठा मानतात. त्यांची मते ही दगडावरील रेघ मानणारे अनेक मराठी नेते मंडळी आहेत. अशा या नरोत्तमांची नाडी ग्रंथांवरची मते अंतिम सत्य मानली गेली तर नवल नाही. अशा या बी. प्रेमानंदांचा व महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले.) पत्रव्यवहारातून जी चर्चा झाली ती नोव्हेंबर १९९६च्या अंकातून एकत्रिक प्रसिद्ध झाली. फलज्योतिषशास्त्राचे अभ्यासक श्री रिसवबूड अंनिस संस्थेतर्फे ज्योतिषाच्या विरोधाचा गड तेंव्हा सांभाळत असत. बी प्रेमानंदांनी संकलित केलेल्या ‘एस्ट्रॉलॉजी सायन्स ऑर ईगो ट्रिप’ नावाच्या पुस्तकात त्यांनी ज्योतिष विषयावर संयुक्तपणे लेखन केले होते. उभयतांची इतकी वैचारिक घनिष्ठता असूनही या लेखात बी.प्रेमानंद त्यांच्याशी कसे वागतात हे रंजक आहे. असो. नोव्हेंबरच्या अंकातील सादरीकरण प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. ते साधारणतः तसेच ठेऊन त्यांच्या विचारांवर मी माझे स्पष्टीकरण / प्रतिक्रिया देत आहे. रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. आशयाप्रमाणे काही प्रश्नांना एकत्रिक करण्याची स्वतंत्रता घेतली आहे. एकंदरीत असे वाटते की बी प्रेमानंदांनी दिलेल्या उत्तरानी रिसबुड समाधानी नसावेत वा सहमत नसावेत. या लेखाची दखल इतक्या वर्षांनी घेण्याचे कारण एक तर मला कळले इतक्या उशीरा. पण हा विषय न शिळा होणारा व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने उत्तर देणे माझ्यासारख्याला उशीरा का होईना क्रमप्राप्त आहे. असो. 1. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? बी.प्रेमानंदांचे उत्तर – मला काही मोजके (a few) प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळाल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला आणि त्याने आतून एक ताडपट्टी आणली. त्यातून त्याने जी वाचायला सुरवात केली त्यातून माझ्या जीवनाचा संपूर्ण भूतकाळ अगदी १००टक्के बरोबर होता. पण ते नाडीवाचन जे केले गेले ते चुकीच्या म्हणजेच माझ्याबरोबर आलेल्या एका लेडी डॉक्टरच्या पत्रिकेवरून केले गेले होते.(बी प्रेमानंद आपल्या लेखात म्हणाले होते की नाडीवाचकाला गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी व बरोबर आलेल्या लेडी डॉक्टरनी आपल्या पत्रिकांची आदलाबदल करण्याची हातचलाखी केली होती.) नंतर असे समजले की आमची व आमच्या आई-वडिलांची नावे त्या पत्रिकांवर लिहिलेली होती. ती व अन्य माहिती नाडी वाचकांनी बेरकेपणाने गर्भित (सटल) प्रश्न विचारून विचारून आमच्याकडून मिळवली होती. खरेतर नाडीभविष्य पहायला आलेल्यात आपली काही माणसे (stooges) बेमालूमपणे मिसळून त्यांच्याकडून व नाडीवाचकाकडून माहिती अलगदपणे मिळवून ती ताडपत्रे बनवली गेली होती. (अधोरेखित माझे) य़ात आश्चर्यचकीत होण्याची काहीच गरज नाही. कारण जातकाकडून चलाखीने माहिती काढून तीच त्याला पत्रिकात पाहून भविष्य म्हणून सांगण्याची युक्ती अन्य ज्योतिषी देखील इतकी सर्रास वापरतात. हीच साधी चलाखी नाडीवाले करतात. माझे स्पष्टीकरण – 1. अशा तऱ्हेचा लेखात की ज्यात नाडी पट्टयांचे खोटेपणा उघड केला गेल्याचा दावा केला जातो, अचुक व नेमकी माहिती अतिशय महत्वाची ठरते. मात्र संपूर्ण लेखात ते दोघे कोणत्या तारखेला, कोठल्या नाडी केंद्रात जाऊन आपली नाडी पट्टी पाहिली, त्यावेळी नाडीरीडर कोण होता. याचा सालेम या गावाच्या नावाव्यतिरिक्त पुसटसा उल्लेखही त्यात नाही. 2. दक्षिण भारतातील प्रचलित नाडी पट्टी शोधण्याचे काम व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याच्या ठशांवरून केले जाते. त्यासाठी नाडीकेंद्रात जाताच ठसे घेतले जातात. पत्रिका किंवा कुंडली जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती नाडीपट्टीतून येणाऱ्या कुंडलीशी ताडून पहायला उपयोगी पडते. कुंडलीची-पत्रिकेची मागणी नाडीपट्टी शोधायला केंद्रातून केली जात नाही. बी प्रेमानंदांच्या संपूर्ण लेखात त्यांनी व बरोबरच्या व्यक्तीने अंगठ्याचा ठसा दिला असा ते उल्लेख करत नाहीत. हे नमूद करण्यासारखे आहे. 3. त्यांनी नाडी भविष्याला ठोकभावात थोतांड ठरवण्याबद्दलचे त्यांचे मत फक्त एका नाडी पट्टीच्या अनुभवावरून आधारित आहे. एका कुठल्यातरी निनावी केंद्रात कुंडलीवरून घेतलेल्या अशा परीक्षणातून नाडी पट्टीत व्यक्तीची नावे व अन्य मजकूर कोरून लिहिलेला असतो का नसतो हे ठरवण्यासाठीचा तो अंतिम पुरावा म्हणून मानता येणार नाही. २. प्रश्न – जेंव्हा त्या नाडी वाचकाने त्या लेडी डॉक्टरच्या नावाचा व व्यसायाचा अचुक उल्लेख सांगितला त्यात ती बालरोगतज्ञ( Paediatrician) आहे की बाळंतपणाची (gynec) तज्ञ आहे ह्या फरकाला फारसे महत्व रहात नाही. उत्तर – नाही कसा, त्यामुळे फार मोठा फरक पडतो. कारण नाडी वाचक तिच्या बद्दलचे भविष्यकथन माझ्या कुंडलीवरून करत होता. यारून असे सिद्ध होते की तो ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून ते करत नव्ह्ता. आम्ही आमच्या कुंडल्या आमची व आमच्या पालकांची नावे खोडून त्याला दिल्या होत्या. त्याच्या चुकीच्या कुंडल्यांवर आधारित भविष्यकथनामुळे आम्हाला हसू दाबुन ठेवणे अशक्य झाले. माझे स्पष्टीकरण – 1. श्री.प्रेमानंद आपण केलेल्या हातचलाखीचा उगीचच गवगवा करत आहेत. कारण त्यांनी कुंडल्यांची अदलाबदल केल्याने नाडी वाचकाच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. बऱ्याचदा अनेकजण आपल्याजवळच्यांच्या नाडी पट्ट्यापहायला त्यांचे हाताच्या आंगठ्याचे ठसे आणतात. जेंव्हा नाडीपट्टी सापडते तेंव्हा भविष्य कथन करताना त्याचा अर्थ असा होत नाही की ज्याने ते ठसे प्रस्तूत केले त्याचे ते भविष्यकथन असते. पट्टी वाचली जात असताना ती व्यक्ती समोर हजर आहे किंवा नाही याचा यामुळे फरक पडत नाही. 2. या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही आमच्या कुंडल्यांवरील नावे खोडून त्याला दिल्या होत्या. पण त्या आधीच्या उत्तरात ते म्हणतात (अधोरेखित केलेले वरील वाक्य वाचा ) की आमच्या कुंडल्यांवरील नावे वाचून त्यांनी नाडी पट्टीतील माहिती असल्याचे भासवले. यातले खरे काय ? प्रश्न - मला तर उलट त्या नाडीवाचकाच्या हातचलाखीवर हसण्याऐवजी त्याने १०० सत्यमाहिती शोधण्याच्या त्याच्या कसबाचे कौतुक वाटले असते. पुढे आपण असे ही म्हटले आहे की त्या नाडीवाचकाच्या हातून तुम्ही ती नाडीपट्टी हिसकाऊन घेतलीत व त्यात वाचनाच्या वेळी त्या खोलीत एक व्यक्ती पायात सँडलघालून आल्यामुळे केंद्राच्या शुचितेचा भंग केला गेला असे जे त्या आलेल्या एका व्यक्तिच्या संदर्भातील कथन होते ते त्या पट्टीत नसल्याचे आढळले असे म्हटले आहेत. याचा अर्थ त्या पट्टीवरील लिखाण व त्याची भाषा आपणांस वाचता येते असा होतो. तसे असेल तर मी एक फोटो आपणांस पाठवू इच्छितो. हा फोटो श्री. ‘ओका’ यांनी डॉ. जयंत नारळीकर(ज्या खगोलशास्त्रज्ञाला २००४ साली ‘पद्मविभूषण’ म्हणून सम्नान्मानित केले गेले होते.) यांना पाठवला होता.(श्री. रिसबुड विंग कमांडर ओक (Oak) नावाचा उच्चार ‘ओका’ असा मुद्दाम करून त्यांचा शक्यतो पाणउतारा करण्याचा प्रयत्न करत असत. त्याचा हा पुरावा) आणि नंतर तो फोटो डॉ दाभोळकर (जे गेले अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची निरीश्र्वरवादी संस्था महाराष्ट्रात चालवतात) यांनी एका सभेत पुण्यातील तमिळभाषा जाणणाऱ्या लोकांनी त्या पट्टीतील मजकूर वाचावा असे जाहीर आवाहन केले होते. उत्तर – जर मला आपण चांगल्या दर्जाची फोटोची कॉपी पाठवली तर मी त्यात काय लिहिले आहे ते कळवीन. जर मला नाडीपट्टीचे ताडपत्र पाठवलेत तर त्याची कार्बन कसोटी करून त्या पट्टीचे आयुष्य किती हे देखील शोधून सांगेन. पण तुम्ही ते पाठवण्याची तसदी घेतली नाहीत. माझे स्पष्टीकरण - 1. श्री बी. प्रेमानंदांनी त्यांना स्वतःला तमिळभाषेतील मजकूर वाचायला येतो किंवा नाही ही बाब मुद्दामच गुलदस्तात ठेवली आहे. अर्थातच येत नाही. कारण त्यांना कूटतमिळ वाचायला आले असते तर तात्काळ लक्षात आले असते की जे भविष्य म्हणून सांगितले जात आहे, ते ग्राहकाकडून कोणत्या ना कोणत्या युक्तीने मिळवून सांगितले जात नसून ते त्या पट्टीत खरोखरच कोरलेले आहे. हे मान्य करावे लागले असते. कधी क्वचित प्रसंगी वाचनाच्या वेळी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख ही केला जातो. पायात सँडल घालून त्या खोलीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीबाबत तसे झाले असण्याची शक्यता आहे. 2. श्री रिसबुडांनी त्यांना तो फोटो न पाठवण्यामागे कारण असावे. पुण्यात २९ सप्टेंबर १९९५ रोजी जो फोटो शो केला गेला त्याचे ते कारण असावे. त्या सभेत अंनिसचे १००हून जास्त सभासद हजर होते. त्यामधे वर्तमानपत्रातील आवाहन वाचून तीन तमिळ भाषा जाणणारे लोक उपस्थित होते. त्यांना तो फोटो दाखवण्यात आला तेंव्हा मीडियाच्या दोन कॅमेऱ्यासमोर (नंतर लेखी) त्यांनी जाहीर केले की त्या फोटोतील भाषा तमिळच आहे. जुनी लिपी असल्याकारणाने ती वाचायला सामान्यपणे अवघड आहे. 3. कोणतेही नाडी केंद्र आपल्याकडील नाडी पट्ट्यांची कार्बन कसोटी करायला देण्याच्या फंदात पडणार नाही कारण ज्या संस्थांचा मूळ हेतूच नाडी भविष्याला कोणत्याही थराला जाऊन बदनाम करण्याचा आहे अशांना सहकार्य कोण का म्हणून करील? मात्र विंग कमांडर ओकांसारख्या निस्पृह व सचोटीने वागणारऱ्यां शोधकांना प्राचीन महर्षींनी केलेल्या या लोकोत्तरसेवेचा शोध घेण्यासाठी आमच्यापैकी कितीतरी नाडीकेंद्रांनी त्यांना आपणहून फोटो काढायची नुसती परवानगी दिली नाही तर त्यांना फोटो उपलब्ध करून देण्याला तत्परतेने मदत केली आहे. 4. हे मात्र नक्कीच आश्चर्य आहे की बी. प्रेमानंदांसारख्या व्यक्तीने, ज्याने आपले सर्व आयुष्य पत्रिकेवरून किंवा अन्य मार्गांनी केल्या जाणाऱ्या भविष्यकथनाला थोतांड म्हणून सिद्ध करण्याचा वसा घेतला आहे, त्यांनी जर-तरची भाषा वापरून, ‘मला जर कोणी नाडी पट्टीचे पान आयते आणून दिले तर मी माझ्या मर्जीच्या प्रयोगशाळेतून त्या पट्टीची तपासणीकरून त्या ताडपट्टीचे आयुष्य ठरविन’ अशी नुसती गर्जना करणे, त्यांना किंवा त्याच्या सारख्या विचारांच्या व्यक्तींना व संस्थांना किती लांछनास्पद आहे? अशांना आपणहून शोधकाम करायला कोणी अडवले आहे ? जर ते आमच्या केंद्रात नाडी महर्षींच्याकडे श्रद्धाभावाने नाडी भविष्याचे रहस्य जाणून घ्यायला आले तर आम्ही त्यांना नक्कीच योग्य ती मदत करू. पण नाडी वाचकांची व पर्यायाने नाडी महर्षींची मस्करी करायला आलात तर मात्र आपल्याकडून सहकार्य मिळणार नाही. प्रश्न – असे मानले जाते की शके ३०० च्या सुमारानंतर भविष्यशास्त्राच्या संदर्भात ऋर्षींचा उल्लेखांना सुरवात होते.त्यामुळे अस्सल नाडी पट्यांचे आयुष्य १७०० वर्षांपेक्षा जुने नसावे. हे मात्र नक्की की नाडी पट्ट्यात ऋषींचे उल्लेख येतात. उत्तर – ओरिजिनल किंवा अस्सल ताडपट्टया असतात हे मानणेच मुळात चुकीचे आहे. त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात. पण त्या प्राचीन दिसाव्यात यासाठी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. तथापि त्या पट्यांचे आयुष्य मात्र शोधता येईल. त्यावरून नाडी पट्टयांचा खोटेपणा सिद्ध करता येईल. माझी प्रतिक्रिया – 1. या ठिकाणी नोंद करायला हवी की जर्मनीतील एका थॉमस रिटर नावाच्या व्यक्तीने भारतातून एक नाडी पट्टी मिळवून त्याची कार्बन १४ कसोटी त्यांच्या देशातील अत्यंत प्रगत अशा प्रयोग शाळेत केली आहे. शिवाय त्यांनी त्या नाडी पट्टीतील मजकुराची जर्मनीतील तमिळभाषा तज्ज्ञांकडून स्वतंत्रपणे करवून घेतली आहे. त्यात त्या तज्ज्ञांनी असे म्हटले की पट्टीतील मजकूर कोणत्या तरी धार्मिक ग्रंथांचा किंवा पौराणिक कथांचा नसून खरोखरच कोणा एकाचे भविष्यकथन आहे. कार्बन कसोटीच्या निर्णयात असे म्हटले गेले की ती पट्टी कमीतकमी ३५० ते ४०० वर्षे जुनी असावी. जर एका परदेशी व्यक्तीला कार्बन कसोटी करता येत असेल तर आम्हा भारतीयांना ती करायला कोणी आडवले आहे? 2. विविध नाडी केंद्रातून असे अनेकदा सांगितले जाते की सध्याच्या उपलब्ध नाडी पट्ट्या तंजावूरच्या सर्फोजी राजे भोसले (१७९२ ते १८३२) या मराठा राजाच्या काळात पुनर्लेखित केल्या गेल्या. त्यामुळे असे शक्य आहे की ताडपट्टयावरीन मजकूर प्राचीन असावा मात्र त्यामानाने ताडपट्ट्या ३०० वर्षांच्या आसपासच्या जुन्या असाव्यात. हे म्हणणे जर्मनीतील कार्बन १४ कसोटीच्या शोधकार्याच्या उपपत्तीवरून ही सिद्ध होते. प्रश्न - मी आपणांकडून हे जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही म्हणता की तुमचा भूतकाळ त्यांनी अगदी १०० टक्के तंतोतंत सांगितला. त्याने तुमच्या कडून सर्व माहिती कशी काढून घेतली (थोडक्यात तुम्ही त्याच्या खोटेपणाला कसे उघडे पाडू शकला नाहीत) त्याचे तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? आपल्या लेखात याचे उत्तर मिळत नाही. उत्तर – वस्तुस्थिती अशी आहे की आपण माझा लेख अत्यंत काळजीपुर्वक वाचलेला नाही.(श्री. प्रेमानंदांनी रिसबुडांनी आपला लेख नीट काळजीपुर्वक वाचलेला नाहीत असे लेखात आधुनमधून फटकारले आहे. त्यातलाच हा एक उल्लेख) ती अशी - 1. नंतर असे लक्षात आले की कुंडल्यांवर आमची व आमच्या आई-वडिलांची नावे लिहिलेली होती. अन्य माहिती गर्भित (सटल) प्रश्न विचारून मिळवली गेली. 2. काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे मिळवल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला.त्याने एक (सुटी) ताडपट्टी आणली. (म्हणजे प्रश्न विचारते वेळी वाचल्या गेलेल्या माळेसारख्या दोरीने ओवून बंद केलेल्या ताडपट्टयांच्या व्यतिरिक्त) आणि त्यातून त्याने आमचे भूतकाळाचे वर्णन वाचले जे १०० टक्के सत्य होते. 3. सत्यता ही आहे की नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. चुकीची उत्तरे दिली गेली तर भविष्य कथन ही चुकेल. तुम्ही दुसऱ्याची पत्रिका आपली म्हणून दिलीत तर भविष्यकथन तुमच्याकडून काढलेल्या माहितीच्या आधारे होईल ना की त्या पत्रिकेच्या आधारावरून. आपले नाव व व्यवसाय सोडता जी बरीचशी माहिती सांगितली जाते ती त्या ताडपट्टीवर नसणार. जे भविष्य कथन म्हणून केले जाते ते ढोबळमानाने सर्वांना लागू पडेल असेच असते. माझी प्रतिक्रिया – 1. मी आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीची नाडीपट्टी स्त्रियांच्या डाव्या व पुरुषांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून शोधली जाते. पत्रिका वा कुंडलीवरून नाही. श्री. प्रेमानंदांनी अंगठ्याच्या ठशांचा पुसटसा देखील उल्लेख आपल्या लेखात केलेला नाही. हे कसे काय? खरे तर त्यांच्यासारख्या प्रखर बुद्धिवादी व्यक्तीने या बाबत खुप ढोल पिटायला हवे होते, कि अंगठ्यांच्या ठशांच्यावरून भविष्य कथन करतो असे म्हणणे म्हणजे निव्वळ देखावा असावा. आदि. 1. त्यांचे हे कथन की तो नाडीवाचक आत गेला व त्याने आतून आणलेल्या एका ताडपट्टीतून त्यांचे भविष्यकथन करण्यात आले. त्यात त्यांचा भूतकाळ १०० टक्के बरोबर आला. यात काही गफलत आहे. कारण सर्व नाडी पट्टयांना असलेल्या भोकातून दोरी माळेप्रमाणे ओवून बंद केलेल्या असतात. अशा ताडपट्ट्या दोन लाकडी बॅटन सारख्या पट्ट्यांच्यामधे घट्ट बंद करुन वर उरलेल्या दोरीने ते पॅकेट जाम गच्च बांधून टाकले जाते. जेंव्हा केंव्हा नाडी पट्टीत आपली पट्टी सापडली असे ग्राहक म्हणतो तेंव्हा ती पट्टी त्या ओवून बांधलेल्या पॅकेटमधलीच असते. त्त्यामुळे श्री. प्रेमानंद कोणत्या नाडीकेंद्रात गेले होते याबद्दल प्रश्न पडतो. अशी एक सुटी नाडीपट्टी आतल्या खोलीतून आणून जर भविष्यकथन केले जात होते तर त्याच वेळी त्यांनी वाचकाला व केंद्र प्रमुखाला तशी विचारणा का केली नाही? आश्चर्य असे की त्यांच्यासारखा प्रत्येकाचा खोटारडेपणे उघडे पाडण्याच्या कलेत तज्ञ, शिवाय जो स्वतः कुंडल्यांची अदलाबदल करण्याची हातचलाखी करतो त्यालाही नाडी वाचकांच्या खोटेपणाला उघड करता आले नाही ? ‘असे असेल-तसे असेल’ असे शुष्क तर्क करण्यापलिकडे ते गप्प बसतातच कसे? आणि त्या नाडी वाचकाने केलेल्या ‘भविष्यकथनात १०० टक्के सत्य सांगण्यात आले’ या भुलावणीला बळी कसे पडलो असे सांगतातच कसा व का? पुन्हा पुन्हा नाडी केंद्रांना स्वतः वा आपले तरबेज चेले पाठवून नाडी केंद्रांचा खोटेपणाचा धंदा आजही चालवू का देतो? 2. याचे साधे व सोपे कारण असे आहे की श्री. प्रेमानंदांनी वर सुचवलेला पर्याय नाडी पट्टया ऑर्डर प्रमाणे आत खोलीत बसून तयार केल्या जातात वगैरे सर्व अत्यांतिक कल्पनाविलास आहेत. नाडी केंद्राचे लोक बाहेर बसवून त्यांच्यामार्फत व नाडी वाचकाने चतुराईने प्रश्न विचारून मिळवलेल्या माहितीवरून केंद्रातल्या एका खोलीत बसून गुप्ततेने ताडपट्ट्यावर लिखाण करून काहीतरी कारण काढून नाडीवाचकाच्या हाती गुपचुप पोचवल्या जातात हे म्हणणे इतके हास्यास्पद आहे की त्यांच्या सारख्या आंतरराष्टीय दर्जाच्या कृतीशील बुद्धिवाद्याला ते शोभत नाही. अशी फालतू कारणे दाखवून नाडी केंद्रवाचकांना ताडपट्ट्यात कूटलिपित त्वरित लेखनाची कला अवगत असल्याचा मान देऊन त्यांचा भाव मात्र त्यांनी उगीचच वाढवला आहे. 3. नाडीकेंद्रातील वाचक फक्त नाडीपट्टयातील मजकूर वाचू शकतात. त्यांना तो मजकूर कोरुन लिहिता येत नाही असे ते स्वतः प्रांजळपणे वेळोवेळी कबूल करतात. पण श्री. प्रेमानंदांसारखे लोक आपले तर्क खरे आहेत असे भासवण्याकरता त्यांना जबरदस्तीने ताडपट्ट्यात कोरून लेखनकरण्याच्या कार्यातील तज्ञ मानतात! श्री. प्रेमानंदांना ते ताडपट्टया लिहित असतात असे जर वाटत होते तर त्यांनी नाडी केंद्रवाल्यांना आत जाऊन पकडले का नाही त्यामुळे पुराव्याशिवाय बोलण्यात काय मतलब आहे? 4. या संदर्भात एक नाडी केंद्रचालक व नाडीपट्टयांचा सांभाळकरणारा म्हणून मी यावर प्रकाश टाकू शकतो. जेथे नाडी पट्टया ठेवल्या जातात त्या खोलीत अन्य कोणाला प्रवेश दिला जात नसला तरी तेथे काय असते व काय चालते याचा खुलासा माझ्यासारखा नाडी केंद्रसंचालकच करू शकतो. त्या खोलीत गुप्तपणे लिखाण वगैरे काहीही चालत नाही. पुण्यासारख्या शहरात गेली १०-१२ वर्षे नाडी केंद्रचालवणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तिचे जबाबदारीपुर्वक हे लेखन आहे याचे भान ठेऊन मी जे सांगतो त्याचे महत्व वाचकांनी जाणावे. कोणत्याच नाडीकेंद्रातून असे लपवून नव्या ताडपट्ट्या तयार करण्याचे काम केले जात नाही. 5. नाडीपट्यांची पॅकेट्स नीट व्यवस्थित एकावर एक लावून ठेवलेली असतात. नाडी वाचक कधी कधी बसून तर बहुतेक वेळा उभ्याने त्या पट्ट्याच्या पॅकेट्स मधून योग्य त्या अंगठ्याच्या ठशाच्या समुहाच्या पट्ट्यांचे पॅकेट शोधत राहतो. तमिळनाडूच्या बाहेर चालू असलेल्या नाडीकेंद्रात एकावेळी नाडी पट्यांची सीमित पॅकेट्स मागवली जातात. त्या अनेकदा सुटकेसेसमधे ठेवलेल्या असतात. या व्यतिरिक्त काही पाने झाडावरून उतरवलेल्या झावळ्या, पैकी काही एक सारख्या कापून तयार ठेवलेल्या, मजकूर न लिहिलेल्या वा काही जागा मजकूर लिहायला मोकळा ठेवलेल्या, अशा ताडपट्ट्या जर नाडीकेंद्रात ग्राहकाच्या मिळवलेल्या माहितीस तात्काळ लिहायला ठेवलेल्या असाव्या लागतील पण तशा त्या नसतात. त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया (म्हणजे नेमके काय?) करण्याचा प्रश्नच येत नाही. 6. नाडी भविष्य पहायला आलेल्यात केंद्रातील आपल्या माणसे बसवायची शक्कल तमिळनाडू राज्यात कदाचित अमलात आणणे शक्य होईल.(तशी ती केली जात नाही तो भाग वेगळा) मात्र युक्तीने एखाद्या अनोळख्या व्यक्तीच्या नकळत त्याच्यी व त्याच्या आई-वडिलांचे, पत्नी-पतीचे नावे, शिक्षण, नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, संततीची संख्या, जन्मदिवस आदि माहिती अत्यंत कमी वेळात काढण्यासाठी असामान्य वाकपटुत्व व तमिळभाषेवर प्रभुत्व असावे लागेल. त्याशिवाय अशी मिळवलेली माहिती जशीच्या तशी लक्षात ठेऊन ती एका ताडपत्रावर कोरून तयार करायची आदि तर्क करायला सोपे पण अमलात आणायला अशक्य आहेत. माणसे पेरण्याची शक्कल तमिलळनाडू राज्याबाहेरील भागातील केंद्रात चालवणे तर सर्वस्वी अशक्य आहे. कारण तमिळेतर भागात परिस्थिती नेमकी उलटी आहे. तेथे बाहेर बसलेल्या ग्राहकांची भाषा नाडीकेंद्रातील लोकांना येत नाही. नाडीवाचकांच्या संकोची स्वभावामुळे व भाषेच्या दुराव्यामुळे अनेक वेळा तोडक्यामोडक्या संभाषणांतून गैरसमज निर्माण होतात. या उप्पर कोणा नाडीकेंद्रातील माणसाने ग्राहकांशी घोळात घ्यायचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या भाषेच्या-बोलण्याच्या धाटणीवरून व सामान्यतः रंगावरून तो केंद्राचा माणूस म्हणून तात्काळ पकडला जाईल. 7. या शिवाय हे ही लक्षात ठेवले पाहिजे की नाडी भविष्य पहायला गेलेला व्यक्ती इतका मूर्ख वा भोळसट नक्कीच नसतो की परक्याला आपली माहिती तो आपणहून देईल. खरे तर नाडी भविष्य प्रथम पहायला गेलेला प्रत्येकजण नाडीकेंद्राच्या व ते पहायला आलेल्या अन्य लोकांकडे साशंकतेने व सावधानतेने इतरांकडे पहात असतो. या शिवाय आम्ही, नाडीकेंद्रातील कर्मचारी, अंगठ्याचा ठसा घेताना ग्राहकांना सावध करतो की पट्टी शोधायची पद्धती काय असते व त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना फक्त हो किंवा नाही यातच उत्तरे द्या. आपणहून माहिती आम्हाला किंवा इथे जमलेल्या कोणाला देऊ नका. 8. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्या अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा बोलणारी माणसे मिळत नाहीत. भविष्य कथन टेप करून देताना भाषांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते. 9. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील. 10. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यंच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात. 11. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाली आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही. 12. या इथे मी सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की जर कोणाला नाडी ग्रंथांचा अभ्यास करायची इच्छा असेल तर अशा अभ्यासकार्याला मी आनंदाने तयार आहे. मात्र ते अभ्यास कार्य पुर्वग्रहदूषित नसलेल्या श्रेष्ठ व नामवंत शास्त्रज्ञांच्या मंडळाच्या निर्देशनाखाली एकत्र येऊन करावे. त्यात नाडी ग्रंथ भविष्याला थोतांड असा शिक्का मारून खोटे ठरवणाऱ्या संस्था वा व्यक्तींचा समावेश नसावा. (श्री. जी. ईश्वरन यांचे विचार - विंग कमांडर शशिकांत ओकांचा शब्दांकन) Shashikant Oak at 5:31 PM ‹ › Home View web version About Me My photo Shashikant Oak View my complete profile Powered by Blogger.

In reply to by शशिकांत ओक

महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले.)
रिसबूडांचे निधन १६ मार्च २००३ रोजी झाले. केवळ चुकीची माहिती लोकांपर्यंत जाउ नये म्हणून हा प्रतिसाद ज्यांना रिसबूड म्हणजे नेमके कोण असा प्रशन पडला असेल त्यांनी कै. माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक हा लेख वाचावा

लेख व सगळे प्रतिसाद वाचले. interesting तसंच अनाकलनिय वाटतंय हे सगळं. कोणी 'ship of theseus' तसंच 'I Origins' हे movies पाहिलेत का? अवयवदान केल्यानंतर ज्याला ते अवयव मिळालेत त्याला गेलेल्या व्यक्तिचे काही आठवत असेल का? I Origins मधे दाखवलंय तसं डोळे transplant केल्यानंतर ते डोळे ज्या मुलीला मिळाले तिला ते डोळे जिचे होते, तिने जे पाहिलं होतं तेही आठवत असतं. तसंच जर brain transplant केलं तर ज्याला मेंदू सकट त्या माणसाच्या आठवणीही transplant होतात का?

लेख आणि प्रतिसाद वाचून काही कळेना झालंय. पण माझया आजी आणि आजोबा, या दोघांच्या मृत्यूच्या वेळी मी उपस्थित होतो. मला आहि जाणवले नाही.

तसच अत्रे यान्च्या बाबत हि कळाल. ते गेल्यानन्तर त्यान्च्या बन्ग्ल्यात ते नोकराला हाका मारत असत अस ऐकिवात आहे. पुण्याच्या वाड्यात,'काका मला वाचवा ' असे ऐकू येते म्हणे असे लहानपणी ऐकले होते. आता मात्र या बाबतीत काही माहीत नाही.

माझे वडील पण जाण्याअगोदर सतत माझे नाव घेउन विचारत होते कि ़किती वाजले.दिवसभर असेच बोलत होते आणि सन्ध्याकळि गेले.ते.पण मला अजुन कलले नाही कि ते असे वगत होते

In reply to by कळस

मृत्यू हा फार सुरेख विषय आहे. सार्थक जगण्याचा तो क्लायमॅक्स पॉइंट आहे. झोपेवर प्रयोग करुन जाणीव नेणीवेत नेता आली (म्हणजे शरीर झोपलं आहे आणि आपल्याला कळतंय), तर मृत्यू शरीराला आहे आणि आपण जसेच्या तसे आहोत हा अनुभव मृत्यूसमयी येऊ शकतो. त्याला सजग मृत्यू म्हटलंय आणि मग मृत्यू एक अवर्णनीय आनंद सोहळा होतो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥ या श्लोकाचा खरा अर्थ तो आहे. पण इथे अध्यात्मिक लेखन करणार नाही असं ठरवल्यामुळे यापेक्षा सविस्तर लिहीत नाही.

दशक १० समास ६ : भ्रमनिरूपण समास सहावा : भ्रमनिरूपण || १०.६ || ॥श्रीराम॥ उत्पत्ती स्थिति संव्हार | याचा निरोपिला वेव्हार | परमात्मा निर्गुण निराकार | जैसा तैसा ||१|| होतें वर्ततें आणी जातें | याचा समंध नाहीं तेथें | आद्य मध्य अवसाने तें | संचलेंचि आहे ||२|| परब्रह्म असतचि असे | मध्येंचि हा भ्रम भासे | भासे परंतु अवघा नासे | काळांतरी ||३|| उत्पत्तीस्थितीसंव्हारत | मधेंही अखंड होत जात | पुढें सेवटीं कल्पांत | सकळांस आहे ||४|| यामधें ज्यास विवेक आहे | तो आधींच जाण- ताहे | सारासार विचारें पाहे | म्हणोनियां ||५|| बहुत भ्रमिष्ट मिळाले | त्यांत उमजल्याचें काय चाले | सृष्टीमधें उमजले | ऐसें थोडे ||६|| त्या उमजल्यांचे लक्षण | कांहीं करूं निरूपण | भ्रमाहून विलक्षण | माहापुरुष ||७|| भ्रम हा नसेल जयासी | मनीं वोळखावे तयासी | ऐक आतां भ्रमासीं | निरोपिजेल ||८|| येक परब्रह्म संचलें | कदापी नाहीं विकारले | त्यावेगळें भासलें | तें भ्रमरूप ||९|| जयासी बोलिला कल्पांत | त्रिगुण आणी पंचभूत | हें अवघेंचि समस्त | भ्रमरूप ||१०|| मी तूं हा भ्रम | उपासनाही भ्रम | ईश्वरभाव हाही भ्रम | निश्चयेंसीं ||११|| ३७] भ्रमेणाहं भ्रमेण त्वं | भ्रमेणोपासका जनाः | भ्रमेणेश्वरभावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ||१|| याकारणें सृष्टि भासत | परंतु भ्रमचि हा समस्त | यामध्यें जे विचारवंत | तेचि धन्य ||१२|| आतां भ्रमाचा विचारु | अत्यंतचि प्रांजळ करूं | दृष्टांतद्वारे विवरूं | श्रोतयांसी ||१३|| भ्रमण करितां दुरीं देसीं | दिशाभूलि आपणासी | कां वोळखी मोडे जीवलगांसी | या नांव भ्रम ||१४|| कां उन्मत्त द्रव्य सेविलें | तेणें अनेक भासों लागलें | नाना वेथां कां झडपिलें | भूतें तो भ्रम ||१५|| दशावतारीं वाटती नारी | कां ते मांडली बाजीगरी | उगाच संदेह अंतरीं | या नांव भ्रम ||१६|| ठेविला ठाव तो विसरला | कां मार्गीं जातां मार्ग चुकला | पट्टणामधें भांबावला | या नांव भ्रम ||१७|| वस्तु आपणापासीं असतां | गेली म्हणोनि होये दुचिता | आपलें आपण विसरतां | या नांव भ्रम ||१८|| कांही पदार्थ विसरोन गेला | कां जें सिकला तें विसरला | स्वप्नदुःखें घाबिरा जाला | या नांव भ्रम ||१९|| दुश्चिन्हें अथवा अपशकुन | मिथ्या वार्तेनें भंगे मन | वचके पदार्थ देखोन | या नांव भ्रम ||२०|| वृक्ष काष्ठ देखिलें | मनांत वाटें भूत आलें | कांहींच नस्तां हडबडिलें | या नांव भ्रम ||२१|| काच देखोन उदकांत पडे | कां सभा देखोन दर्पणीं पवाडे | द्वार चुकोन भलतीकडें जाणें | या नांव भ्रम ||२२|| येक अस्तां येक वाटे | येक सांगतां येक निवटे | येक दिसतां येक उठे | या नांव भ्रम ||२३|| आतां जें जें देइजेतें | तें तें पुढें पाविजेतें | मेलें माणुस भोजना येतें | या नांव भ्रम ||२४|| ये जन्मींचें पुढिले जन्मीं | कांहीं येक पावेन मी | प्रीती गुंतली मनुष्याचे नामीं | या नांव भ्रम ||२५|| मेलें मनुष्य स्वप्नीं आलें | तेणें कांहीं मागितलें | मनीं अखंड बैसलें | या नांव भ्रम ||२६|| अवघें मिथ्या म्हणौन बोले | आणी सामर्थ्यावरी मन चाले | ज्ञाते वैभवें दपटले | या नांव भ्रम ||२७|| कर्मठपणें ज्ञान विटे | कां ज्ञातेपणें बळें भ्रष्टे | कोणीयेक सीमा फिटे | या नांव भ्रम ||२८|| देहाभिमान कर्माभिमान | जात्याभिमान कुळाभिमान | ज्ञानाभिमान मोक्षाभिमान | या नांव भ्रम ||२९|| कैसा न्याय तो न कळे | केला अन्याय तो नाडळे | उगाच अभिमान खवळे | या नांव भ्रम ||३०|| मागील कांही आठवेना | पुढील विचार सुचेना | अखंड आरूढ अनुमाना | या नांव भ्रम || ३१|| प्रचीतिविण औषध घेणे | प्रचित नस्तां पथ्य करणे | प्रचीतिविण ज्ञान सांगणें | या नांव भ्रम ||३२|| फळश्रुतीवीण प्रयोग | ज्ञानेंवीण नुस्ता योग | उगाच शरीरें भोगिजे भोग | या नांव भ्रम ||३३|| ब्रह्मा लिहितो अदृष्टीं | आणी वाचून जाते सटी | ऐशा प्रकारीच्या गोष्टी | या नांव भ्रम ||३४|| उदंड भ्रम विस्तारला | अज्ञानजनीं पैसावला | अल्प संकेतें बोलिला | कळावयाकारणें ||३५|| भ्रमरूप विश्व स्वभावें | तेथें काय म्हणोन सांगावें | निर्गुण ब्रह्मावेगळें अघवें | भ्रमरूप ||३६|| ज्ञात्यास नाहीं संसार | ऐसें बोलती अपार | गत ज्ञात्याचे चमत्कार | या नांव भ्रम ||३७|| येथें आशंका उठिली | ज्ञात्याची समाधी पूजिली | तेथें कांहीं प्रचित आली | किंवा नाहीं ||३८|| तैसेचि अवतारी संपले | त्यांचेंही सामर्थ्य उदंड चाले | तरी ते काये गुंतले | वासना धरूनी ||३९|| ऐसी आशंका उद्भवली | समर्थें पाहिजे निरसिली | इतुकेन हे समाप्त जाली | कथा भ्रमाची ||४०|| इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भ्रमनिरुपणनाम समास सहावा ||१०.६||

In reply to by Jabberwocky

नाडी ग्रंथ भविष्य विषयावर वरील ओवीतील वर्णन एकदम फिट्ट बसते... प्रत्यक्ष अनुभूती न घेता बुद्धिवादी कसे भ्रम निर्माण करतात. वर आम्हाला अनुभव घ्यायची गरज नाही असे म्हणणे योग्य आहे का यावर विचार व्हावा...

In reply to by Jabberwocky

उत्पत्ती स्थिति संव्हार | याचा निरोपिला वेव्हार | परमात्मा निर्गुण निराकार | जैसा तैसा ||१|| या प्रथम श्लोकाचा अर्थ सांगता येईल का ? किंवा मी तूं हा भ्रम | उपासनाही भ्रम | ईश्वरभाव हाही भ्रम | निश्चयेंसीं ||११|| दशक १० समास ६ : भ्रमनिरूपण, या समासाची सुरुवातच ॥श्रीराम॥ अशी झाली आहे. मार्क केलेल्या शब्दांचा एकमेकाशी मेळ कसा बसतो ?

उत्पत्ती स्थिति संव्हार | याचा निरोपिला वेव्हार | परमात्मा निर्गुण निराकार | जैसा तैसा ||१|| या आधीच्या म्हणजे पाचव्या समासामध्ये समर्थांनी उत्पत्ती स्थिति आणि संव्हार यावर निरूपण केले आहे. त्याचा संदर्भ पुढे घेत ही या सहाव्या समासाची सुरुवात आहे. उत्पत्ती, स्थिति, संव्हार हे नियम सृष्टीला लागू होतात ते परमात्म्याला लागू होत नाहीत. तो निर्गुण निराकार स्वरूप आहे. दशक १० समास ६ : भ्रमनिरूपण, या समासाची सुरुवातच ॥श्रीराम॥ अशी झाली आहे. मार्क केलेल्या शब्दांचा एकमेकाशी मेळ कसा बसतो ? - हे समजून घेण्यासाठी १० वा दशक पूर्ण समजून घ्यावा लागेल ते ही एखाद्या जाणकारांकडून. तसेच समर्थानी इथे "ईश्वरभाव" हा भ्रम असे म्हंटले असून "ईश्वर" हा भ्रम आहे असे म्हंटलेले नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

In reply to by Jabberwocky

ते परमात्म्याला लागू होत नाहीत. तो निर्गुण निराकार स्वरूप आहे. हा परमात्मा कोण ? त्याला मृत्यू नसेल तर त्याचा आपल्या मृत्यूशी संबंध काय ? समर्थानी इथे "ईश्वरभाव" हा भ्रम असे म्हंटले असून "ईश्वर" हा भ्रम आहे असे म्हंटलेले नाही, ईश्वरभाव भ्रम असेल तर ईश्वराचा उपयोग काय ? स्वत : ला 'रामदास' म्हणणं हा ईश्वरभाव आहे की नाही ?

In reply to by संजय क्षीरसागर

उपासनाही भ्रम असं ही म्हटलंय मग 'श्रीराम जय राम जयजय राम ' हा जप करणं उपासना आहे किंवा नाही?

In reply to by संजय क्षीरसागर

उपासनाही भ्रम असं ही म्हटलंय मग 'श्रीराम जय राम जयजय राम ' हा जप करणं उपासना आहे किंवा नाही?

संजयजी, आपल्याला जीवनाचा (म्हणजेच मृत्युचाही) उलगडा झाला आहे तर त्याआधारे हे स्पष्ट करा की असे अनुभव खरे असु शकतात की हा मनाचा खेळ आहे ? मृत्यूनंतर अस्तित्वा असते का ? ह्याचा आपल्याला काही उलगडा झालाय का? प्रश्न थेट आहे,आध्यात्मिक उत्तर नको. धन्यवाद.

In reply to by कळस

असे अनुभव खरे असु शकतात की हा मनाचा खेळ आहे ? मृत्यूनंतर अस्तित्वा असते का ? मानवी मेंदू हा बायोकंप्युटर आहे. देहदहनामुळे ती संपूर्ण डिस्क फॉरमॅट होते. काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो. वास्तविकात पुनर्जन्म अशी काही घटना अस्तित्वात नाही. मृत्यूसमयी बहुतेक जण एकतर भयभीत झालेले असतात किंवा त्यांची शुद्ध हरपलेली असते. सजग व्यक्तीला, आपल्याला जशी झोपेची चाहूल लागते तशी मृत्यूची चाहूल लागू शकते. (वर श्लोक उधृत केला आहे). अशी व्यक्ती कोणत्याही भ्रमात जात नाही त्यामुळे उपरोल्लेखित घटना त्या व्यक्तीच्याबाबतीत घडत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

मानवी मेंदू हा बायोकंप्युटर आहे. देहदहनामुळे ती संपूर्ण डिस्क फॉरमॅट होते. काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो. मग त्या स्ट्रिंग्ज फक्त आणि फक्त नवजात अर्भकाच्या (अभ्रक नाही हां...!) मेंदूवरच का पेस्ट होतील..? तुमच्या किंवा आमच्यासारख्या अतिसामान्य जनतेच्या मेंदूवर का पेस्ट होणार नाहीत..?

In reply to by मोदक

मग त्या स्ट्रिंग्ज फक्त आणि फक्त नवजात अर्भकाच्या मेंदूवरच का पेस्ट होतील..? दुसर्‍याचे विचार मेंदूत शिरायला, व्यक्ती एकतर त्याप्रती रिसेप्टीव हवी (उदा. संमोहन किंवा माइंड रिडींग) किंवा बालकासारखी डॉरमंट हवी. सामन्यांच्या मेंदूत आधीच इतका ट्रॅफिक चालू असतो की अशा स्ट्रींग्ज शिरायला अवधी मिळत नाही. कधीकधी एखादी व्यक्ती डिप्रेशनमधे गेली तर तिचा विचार करण्याच्या क्षमतेवरचा ताबा जातो (ज्याला मन कमकुवत होणं म्हणतात) आणि अशी व्यक्ती सुद्धा अस्तित्वात इतस्तः भटकणार्‍या विचारांची शिकार होऊ शकते, ज्याला भूतबाधा वगैरे म्हणतात.

In reply to by संजय क्षीरसागर

एक चमत्कारिक 'फर्स्ट हॅन्ड' अनुभव देतो. विपश्यनेला गेलो होतो, तेव्हा अगदी पहिल्या क्षणापासून आपल्यासोबतची इतर शिबिरार्थी कोण, काय करतात, कामधंदा, शि़क्षण, नावगाव काहीही माहित नसते. ते थेट दहाव्या दिवशी बोलायची परवानगी मिळाल्यावरच. मी कटाक्षाने सर्वत्र मौन पाळले. तेव्हा चौथ्या-पाचव्या दिवशी, जेव्हा मन निर्विचार होऊ लागतं, तेव्हा अगदी एका सेकंदासाठी माझ्या मनात एक हिशोबाचा विचार चमकून गेला, एका औषध कंपनीच्या प्रतिनिधीला काहीतरी ऑर्डर द्यायची आहे, व त्याचे मागचे बील बघायचे आहे, असा एक अंधुक-पुसट पण ठाशीव विचार येऊन गेला. जणू मी कोणी मेडिकल/औषधांच्या क्षेत्रातला माणूस आहे. आश्चर्याचा धक्का मला दहाव्या दिवशी बसला जेव्हा कळले की माझ्या अगदी बाजूलाच नियमित बसणारा व्यक्ति हा मेडिकलच्या दुकानाचा मालक आहे व त्याची बायको त्याच्या अनुपस्थितीत दहा दिवस ते दुकान सांभाळत आहे आणि त्याला हे दहाही दिवस दुकान नीट चालू असेल काय ह्याची चिंता लागून होती. हे कसे घडले ह्याबद्दल मला आजही संभ्रम आहे. दहाव्या दिवशीच कळले की तो व्यक्ती बोलणे, व्यक्त होणे ह्याबाबतीत खूप अग्रेसिव, लाउड आहे. पण दहाव्या दिवसापर्यंत त्याचे तोंडून एक शब्दही मी कधी ऐकला नाही, तोही सर्वत्र मौनातच होता. कदाचित ते त्याचे विचार असे बाहेर येऊन माझ्या डोक्यापर्यंत पोचले की काय....? म्हणजे विचारांचे तरंग असतात असे जे म्हणतात ते खरे मानायचे? ;-)

In reply to by संदीप डांगे

तुम्ही तुमचा अनुभव एखाद्या या विषयातील संशोधन संस्थेस कळवा. मग अशी संस्था इतर कुणाला असा काही अनुभव आला का याचा अभ्यास करु शकेल. बाकी विपश्यनेबद्दल मलाही बरच कुतुहल आहे.
चौथ्या-पाचव्या दिवशी, जेव्हा मन निर्विचार होऊ लागतं
ह्याबद्दल अधिक सांगाल काय ?

In reply to by संजय क्षीरसागर

>> काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो. हे संशोधन कुणी केले? याबद्दल अधिक कुठे वाचता येईल?

संजय क्षीरसागर,
वास्तविकात पुनर्जन्म अशी काही घटना अस्तित्वात नाही.
वास्तविक म्हणजे काय? भास म्हणजे काय? जर सर्व जगत भ्रम आहे तर वास्तविक आणि भास या दोहोंत फरक काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दहनानंतर सर्व देह राख होऊन मातीत मिसळतो, पाणी बाष्पीभूत होऊन पाण्यात, हवा हवेत, उष्णता वातावरणात आणि चेतना चेतनेत मिसळते. त्यामुळे देह पंचमहाभूतात विलीन होतो असं म्हणतात. वर म्हटल्याप्रमाणे मेंदू संपूर्णपणे फॉरमॅट होतो. थोडक्यात, एक जीवनपट पूर्णपणे संपतो. इट इज अ कंप्लीट कट ऑफ त्यामुळे एका जीवनाची दुसर्‍यात कंटीन्यूटी होत नाही. म्हणून वास्तविकात पुनर्जन्म असं काही नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

असं कसं? तुम्हीच वर म्हटलं आहे:
काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो.
खरं तर हे विधान मला प्रचंड विनोदी वाटत आहे. हे जर संजय उवाच असेल तर दिव्याखाली अंधारच म्हणायचा. जर याला काही शास्त्रीय आधार असेल तर वाचायला आवडेल.

आयडींचा पुनर्जन्म होतो हे नक्की परंतु माणसांचा होतो कि नाही ते प्रा.अद्वयानंद गळतगे व्यवस्थित सांगू शकतील असे वाटते.

माझी आजी माझ्या आत्याकडे गेली होती. दोन दिवसातच ती आत्याला म्हणाली कि मला घरी जायचं आहे. खूपच मागे लागली. आणि येता येता आत्याला म्हणाली कि परत येईन असं वाटत नाही. घरी आल्यावर माझ्या बाबांच्या नुसतं मागे लागली कि कचेरीत घेऊन चल. कागदांवर सह्या करायच्या आहेत. कोणाला काय द्यायचं हे पण सांगून ठेवलं. नंतर सगळं झाल्यावर ४-५ दिवसांनी ती मागच्या दारी पाय घसरून पडली. डोक्याला खूप लागलं. आणि ती कोमात गेली. जवळजवळ १ महिना ती कोमात होती, त्यानंतर ती गेली. ८२ वर्षाची होती पण चांगली धडधाकट होती, इकडून तिकडून तुरुतुरु चालायची. काम करायची हौस भारी होती तिची. कुठलाही आजारपण नव्हतं तरी तिला असं का वाटलं ? हा निव्वळ योगायोग होता कि विधिलिखित?

संजय क्षीरसागर,
एका जीवनाची दुसर्‍यात कंटीन्यूटी होत नाही. म्हणून वास्तविकात पुनर्जन्म असं काही नाही.
पण स्मृती तर एका देहातून दुसऱ्या देहात रोपण झालेल्या आढळून येतात. ही स्वैर घटना ( = रँडम इव्हेण्ट) मानावी का? आ.न. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पण स्मृती तर एका देहातून दुसऱ्या देहात रोपण झालेल्या आढळून येतात म्हणजे नक्की काय ?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, स्मृतीरोपण म्हणजे काय ते इथे तुम्ही सांगितलं आहे :
काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या
हे रोपण स्वैर घटना आहे का तिच्या मागे काही नियम आहे, असा माझा प्रश्न होता. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हे रोपण स्वैर घटना आहे का तिच्या मागे काही नियम आहे, अस्तित्वातल्या अनेक न उलगडणार्‍या रहस्यांपैकी ते एक आहे.

धन्यवाद संजयजी. या विषयाच्या संदर्भाने एक जाणून घ्यायला आवडेल की जी व्यक्ती मृत्युसमयी सजग असेल ,तिच्याबाबतीत काय संभावना आहेत ? तिच्याकडे अस्तित्वात विलीन होऊन जाण्या व्यतिरीक्त ईतर काही पर्याय उपलब्ध असतील का ?

In reply to by कळस

झोप म्हणजे रोज होणारा मृत्यू आहे आणि मृत्यू ही शेवटची झोप आहे. मेंदू हा बायोकंप्युटर आहे त्यात प्रत्येक बायो-सेल रेकॉर्डींगला टेल आणि हेड अ‍ॅड्रेसेस आहेत. त्यामुळे झोपेतला शेवटचा विचार हा सकाळी उठल्यावर पहिला विचार असतो. इन द सेम वे, मरतांना जाणीवेनं धरलेला शेवटचा विचार (ब्रेन संपूर्ण फॉरमॅट झाला तरी) स्टीम्युलस बनून पुढच्या देह निर्मितीला कारणीभूत होतो. वास्तविकात मरतांना प्रत्येकाची अजून जगावं (जीवेष्णा) अशीच इच्छा असते, हीच इच्छा कामेच्छेत रुपांतरीत होऊन पुढच्या देह निर्मितीला सहाय्य करते. सजगपणे जगणार्‍यानं जीवनाचा फुल स्पेक्ट्रम उपभोगलेला असतो. त्याला मरण शांत झोपेप्रमाणे येतं. आता जीवेष्णा धरायची की सोडायची ही त्याची मर्जी असते. म्हणून सजग व्यक्तीला जन्म-मरणाचा फेरा सुटतो असं म्हटलंय. वर म्हटल्याप्रमाणे, वास्तविकात, पुनर्जन्म वगैरे काही भानगड नाही पण माणसाची जीवेष्णा इतकी अपरंपार आहे की राहीलेले उपभोग आणि फँटास्टिक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला पुन्हा एक चान्स मिळावा असं त्याला मृत्यूसमयी वाटतं. या सगळ्या गदारोळातून माणसाला दिलासा मिळावा म्हणून पुनर्जन्माची कल्पना निघाली आहे. आता यापलिकडे मी या विषयावर लिहू इच्छित नाही तरी जेवढं लिहीलं तेवढं गोड मानून घ्यावं.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या जिवेषणा वाल्या परिच्छेदावरून मला एका ऋषींची गोष्ट आठवली. मृत्यूसमयी त्यांचा जीव त्यांनी बाळगलेल्या एका हरणाच्या पाडसात अडकतो. त्याच्या या जीवेष्णेमुळे त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळतो. पुढचा जन्म म्हणजे पुनर्जन्म झाला ;)

In reply to by सतिश गावडे

त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळतो.
पुढच्या जन्माच्या बुकींगसाठी जीव कुठे अडकवायचा ? गहन प्रश्नात कंफुज झालोय :)

In reply to by कपिलमुनी

कुठेच अडकवू नका देवा... उगा आपलं कायतरी व्हायचं आणि होत्याचं नव्हतं व्हायचं... =)) एक किस्सा... एका गावात एक साधू माणूस होता.. प्रचंड जपजाप, पूजासाधना करायचा. पाहावे तेव्हा त्याची साधना चालू असायची... त्या गावात एक वेश्या होती. ती याच्या घरासमोरुन जातांना, ह्याला ध्यान करतांना बघून म्हणायची.. "गुरुजी.. आखीरकी की संभालना". कधीही येता-जाता. "गुरुजी.. आखीरकी की संभालना" बस्स! एवढंच. आखीरकी काय, कशाबद्द्ल, काय संभालना.. काय नाही.. हा सज्जन, चरफडायचा, पण ती वेश्या तिच्या काय तोंडी लागायचे म्हणून गप्प बसायचा... सगळ्या गावात चर्चा असायची. काय बुवा ही बया ह्या सज्जन माणसाला का अशी चिडवते ते... अशी अनेक वर्षे गेली... बुवा म्हातारा झाला... खाटेला लागला. शेवटच्या घटका समीप आल्या... तरी वेश्या.. आखीरकी संभालना काही सोडलं नव्हतं तीने... अशाच एका समयी म्हातारा सज्जन गचकला... काही दिवसांनी चांभाराच्या घरी पुत्ररत्न झाले... पण ते लेकाचे जन्मल्यापासून जे बेंबाटायचे सुरु झाले ते काही थांबतच नव्हते... वैद्य झाले, मांत्रिक् झाले, झाडपाला, आजीबाईचा तजुर्बा, सगळं पिसून झालं... पोराला काय गुण येईना.. बाहेरची बाधा म्हणून गंडेदोरे बांधले, बोकडं कापून वाहिले पण आराम काय पडंना... सगळं गाव कावलं.. लेकराला नेमकं काय झालं... रडायचं थांबंच ना... ही चर्चा वेश्येच्या कानी पडली.. म्हणे मी बघते... लोक बोल्ले, बघूद्या बोवा... हीला पण काय समजत असेल.. कोणाच्या का कारणे उपाय मिळू दे... पोर शांत होऊ दे... वेश्या आली... पोराच्या जवळ बसली... हळूच कान पकडला आणि पिरगाळला... कानात खुसफुसली..."बोला था ना, आखीरकी संभालना.. सारा जनम संभालते रहे लेकिन आखीरी वक्त जब जान जाने लगी तो दरवाजे में रखी चमडे की चप्पलमें ध्यान अटका ना...? के इसको कोई ले जायेगा,, इसका क्या होगा, कोई चुरायेगा क्या...! अब, भुगतो चमडे में मन अटका.. चमडेमें जान अटकी... चमडे के साथ अब वापस जिंदगी अटकी... जनम-मरण के फेरेसे छुटने वाले थे... वापस अटक गये... अब रोकर क्या फायदा... इस बार जरुर याद रखना.. अब की बार तो आखीरकी संभालना..." ते तान्हुलं नंतर कधीच रडलं नाही....

In reply to by कपिलमुनी

अडकून पडूच नका. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कसे सुटता येईल हा विचार करा. एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी एका नगरामध्ये एक ब्राम्हण राहत होता. त्याला काही संतान नव्हते. नवस सायास उपास तापास असे सारे काही तो ब्राम्हण आणि त्याची पत्नी करत होते. अशाच एका नवसाला देव पावला आणि त्यांना मुलगा झाला. नारायणाच्या कृपेने झाला म्हणून त्या मुलाचे नाव नारायण ठेवले. महत्प्रयासाने झालेल्या या मुलाचा बापाला लळा लागला. बसता उठता "नारायण" असे मुलाचे नाव तो ब्राम्हण घेऊ लागला. वर्षे गेली. ब्राम्हणाच्या मुखीचा मुलाच्या नावाचा नारायण हा जप काही कमी झाला नाही. अखेर ब्राह्मणाची मृत्यू घटका आली. अगदी शेवटच्या क्षणीही ब्राम्हणाने "नारायण" असे म्हणून प्राण सोडला. झाले, ही खबर वैकुंठाला गेली आणि भगवंतांनी गरुडाला या ब्राह्मणाच्या लिंगदेहास वैकुंठी आणावयास पाठवले.

संजय क्षीरसागर,
अस्तित्वातल्या अनेक न उलगडणार्‍या रहस्यांपैकी ते एक आहे.
कर्मसिद्धांत नेमकं हेच रहस्य नियमांत बसवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला पुनर्जन्म हा शब्द आवडंत नसल्यास प्रत्यारोपित स्मृती असं म्हणू शकता. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्हाला पुनर्जन्म हा शब्द आवडंत नसल्यास प्रत्यारोपित स्मृती असं म्हणू शकता.
शब्द आवडला आहे या अवयवदानाच्य विडिओला लागू होईल

मंडळी, गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो. एक तर मेंदुला हो णारा रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे असं अर्धवट बोलणं होतं असं समजू पण मृत्यु झालेल्या व्यक्तीचा वावर, त्यांच्या काही खाणाखुणा, असं काही पुढे दिसत नाही. म्हणजे, हे सर्व मनाचे खेळ म्हणावे लागतील. पण, मला या सृष्टीत काही अद्भूत असावं असं सारखं वाटत असतं. -दिलीप बिरुटे (भित्रा )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

होतं हो हे कधी कधी... प्रत्येक मरणार्‍याबद्दल होत नाही. त्यामुळे शास्त्रिय दृष्ट्या सिद्ध करणं शक्य नाही. माझ्या पत्नीचे आजोबा (आईचे वडील), अतिशय सज्जन माणूस, एमटीएनएल मध्ये नोकरीला होते. भिक्षुकीही करायचे पण कुणाकडून पैसे घेत नसत. सर्व भावभावंडांना लागेल तशी मदत निर्विकार भावाने करायचे. देवपूजा, मंत्रसाधना सगळं उच्चदर्जाचं, ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजासाधना करायचे. त्यांना सकाळी चहा-पाव खायला आवडायचा, सकाळचे सर्व सोपस्कार झाले की ७ वाजता ते चहा-पाव खायचे. आजवर मी कोणाकडूनही त्यांच्याबद्दल वाकडा शब्द ऐकला नाही. वयाच्या ८२ वर्षीपर्यंत अगदी ठणठणीत होते, कधीही हॉस्पिटल पाहिले नाही. पण अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि दवाखान्यात नेल्यावर दुसर्‍या दिवशी गेले. त्यानंतर सलग १३ दिवस एक कावळा किचनच्या खिडकीत सकाळी सात वाजता यायचा. पहिल्या दिवशी ह्या लोकांना काही कळले नाही. पण त्या कावळ्याची धिटाई चमत्कारिक होती, उडवूनही तो गेला नाही. मग त्याला पावाचा तुकडा दिला तर पुढे येऊन त्याने तो चहात बुडवून खाल्ला... मग तेराव्या दिवसापर्यंत हा कार्यक्रम रोज सकाळी सुरु होता. चौदाव्या दिवसानंतर तो कावळा कधीच दिसला नाही. ह्याची साक्षीदार आजी, माझी पत्नी व तीची एक मावशी अशा तिघी होत्या. ही २००७ ची घटना आहे. त्याआधी तो कावळा कधीच आला नाही, नंतरही नाही. आता ह्यात बुद्धीप्रामाण्यवादी ना ना प्रकारचे किंतुपरंतु काढू शकतात. माझी पत्नीही काही दैववादी, अंधश्रद्धाळू नाही पण हा प्रकार तिच्यासाठीही चकरावणारा होता. अशा अनुभवांचे डॉक्युमेन्टेशन व कार्यकारणभाव शास्त्रिय कसोटीवर सिद्ध होणे कठिण असते. ह्याचबरोबर हेही आहेच की काही लोक भावभावनांच्या आहारी जाऊन, किंवा दिखाव्यासाठी म्हणून, किंवा स्वतःचे अस्तित्व जाणवून देण्यासाठी म्हणून अशा चमत्कारिक अनुभवांच्या काहीही टेपा लावतात. ती लोकं साधारण ओळखू येतात त्यांनी मारलेल्या थापांवरुन किंवा त्यांच्या नेहमीच्या स्वभावावरुन...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो. मिपाच्या सद्य, भूतपूर्व (आणि सद्गती प्राप्त झाल्याने आता भूत झालेल्या) आणि ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्‍या आयड्यांशी इथेच मिपावर चर्चा करताना या सद्य आणि पुनर्जन्मित लोकांशी भेट घेतल्याचा अनुभव याची आभासी संस्थळी घेता येतो. ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्‍या लोकांशी प्रत्यक्ष ओळख असल्यास याची देही याची डोळा सगळ्या (तिन्ही) लोकांना भेट दिल्याचे भाग्य लाभते. =))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो. मिपाच्या सद्य, भूतपूर्व (आणि सद्गती प्राप्त झाल्याने आता भूत झालेल्या) आणि ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्‍या आयड्यांशी इथेच मिपावर चर्चा करताना या सद्य आणि पुनर्जन्मित लोकांशी भेट घेतल्याचा अनुभव याची आभासी संस्थळी घेता येतो. ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्‍या लोकांशी प्रत्यक्ष ओळख असल्यास याची देही याची डोळा सगळ्या (तिन्ही) लोकांना भेट दिल्याचे भाग्य लाभते. =))

संजय क्षीरसागर,
कर्मसिद्धांतावर बोलायला लागलो तर ते एक नवीन प्रकरण होईल! सो आय स्टॉप.
होऊ द्या खर्च. कर्मसिद्धांतावर तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे त्यामुळे कर्मसिद्धांताबद्दल लिहून पुन्हा वाद ओढवून घ्यायची इच्छा नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, कर्मसिद्धांताचं विवेचन अध्यात्मिक चौकटीच्या बाहेर राहूनही करता येणं शक्य असावं. किंबहुना तुम्हाला जमायला हरकत नाही, असा आपला माझा अंदाज. घेताय मनावर? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सगळं जीवन हे क्षणोक्षणी कृत्यच आहे ! कृत्याची मजा यायला कर्मसिद्धांत कळून काहीही उपयोग नाही कारण तो, क्षणोक्षणी बदलणार्‍या अस्तित्वाच्या अब्जावधी पॅरामिटर्सचा वेध घेण्याची मूढता आहे. अ‍ॅनॅलिसिस पूर्ण होण्यापूर्वीच सर्व पॅरामिटर्स एखाद्या कॅलीडोस्कोपप्रमाणे बदलेले असतात. तस्मात, कृत्यामागचं कार्यकारण शोधायचा प्रयत्न पूर्णतः व्यर्थ आहे. सूज्ञ व्यक्ती अकर्ता शोधते जो कोणत्याही कर्मानं कायम अलिप्त आहे, जो कार्यकारणाच्या बाहेर आहे...... आणि तो अध्यात्माचा विषय आहे!

संजयजी, कर्मसिद्धांताचं सखोल विवेचन वाचायला खरचं आवडलं असतं . असो .अध्यात्म्यावर न लिहीण्याच्या आपल्या निर्णयाचा आदरच आहे. अध्यात्माच्या चौकटीबाहेर राहून जमेल तितके विवेचन केले त्यासाठी धन्यवाद. "अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे " याविषयी मात्र तीव्र असहमती ..

In reply to by कळस

अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे " याविषयी मात्र तीव्र असहमती .. आता इथेच पाहा : मृत्यू शरीराला आहे आणि आपण जसेच्या तसे आहोत हा अनुभव मृत्यूसमयी येऊ शकतो. अशा माझ्या सर्वोपयोगी प्रतिसादाला ..... तुमचा हा उपप्रतिसाद ! प्रश्न थेट आहे,आध्यात्मिक उत्तर नको

In reply to by संजय क्षीरसागर

तो प्रतिसाद त्या मुददयापुरता होता. कारण मला त्या ठीकाणी अध्यात्माव्यतिरीक्त चा पैलू जाणून घ्यायचा होता.

In reply to by कळस

हे दाखवून द्यायचं होतं ! आणि अध्यात्माशिवाय जीवनाला सार्थकता नाही. पण द फोरम हॅज लॉस्ट द अपॉरच्युनिटी नाऊ.

In reply to by संजय क्षीरसागर

द फोरम हॅज लॉस्ट द अपॉरच्युनिटी नाऊ.
>> द्रूष्य और अद्रूष्य सभी के जिवका मंगल होए रे !! जल के थल के और गगनके ! प्राणी सुखिया होए रे !! दश दिशाओ के सभी प्राणी ! मंगला लाभी होए रे !! निरभय हो निरवय बने ! सभी निरामय होए रे !! सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे ! तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे !! फिर से जाने धरम जगत में ! फिर से होवे जन कल्याण !! जागे जागे धरम जगत में ! होवे होवे जन कल्याण !! राग द्वेष और मोह दूर हो ! जागे शील, समाधी ज्ञान !! जन जन के दुःख मिट जावे ! फिर से जाग उठे मुस्कान !! सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे ! तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे !! जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होय रे !!! भवतु सब्ब मंगलम् , भवतु सब्ब मंगलम् ,भवतु सब्ब मंगलम् सबका मंगल हो , सबका भला हो , सबका कल्याण हो शुभम् भवतु शुभम् भवतु शुभम् भवतु

In reply to by कळस

बाबा बुल्ले शहा म्हणतात "हुं तो यु जाणा की हु कुछ नहीं जाणा" क्षीरसागरांचा 'मला जे समजलयं तेच सत्य आहे.' किंवा 'मला जे समजलयं ते सत्यच आहे.' असा अविर्भाव कायमच असतो. अहं गळून पडला नाही आणि उगाच जडजड शब्द वापरुन दावे केले तर ते निव्वळ पुस्तकी पांडित्य ठरते. तस्मात अजून मडके कच्चे आहे असे नोंदवावे वाटते. कबीर म्हणतो "आपणो घर फुंक और फिर चौराहे पर मिल " शब्दशः घराला आग लावायची नसून मी पणाचा र्हास झाला पाहिजे अन्यथा निव्वळ शब्दांचे बुडबुडे !

In reply to by कळस

बाबा बुल्ले शहा म्हणतात "हुं तो यु जाणा की हु कुछ नहीं जाणा" क्षीरसागरांचा 'मला जे समजलयं तेच सत्य आहे.' किंवा 'मला जे समजलयं ते सत्यच आहे.' असा अविर्भाव कायमच असतो. अहं गळून पडला नाही आणि उगाच जडजड शब्द वापरुन दावे केले तर ते निव्वळ पुस्तकी पांडित्य ठरते. तस्मात अजून मडके कच्चे आहे असे नोंदवावे वाटते. कबीर म्हणतो "आपणो घर फुंक और फिर चौराहे पर मिल " शब्दशः घराला आग लावायची नसून मी पणाचा र्हास झाला पाहिजे अन्यथा निव्वळ शब्दांचे बुडबुडे !

संजय क्षीरसागर,
सूज्ञ व्यक्ती अकर्ता शोधते जो कोणत्याही कर्मानं कायम अलिप्त आहे, जो कार्यकारणाच्या बाहेर आहे...... आणि तो अध्यात्माचा विषय आहे!
तुम्ही स्वत:ला काय समजता? जीवनकृत्याची मजा घेणारा समजता? की कर्मफळ न चिकटणारा असा (जो कार्यकारणाच्या बाहेर आहे) तो समजता? उत्तर द्यायचं नसेल तर तुमच्या इच्छेचा आदर आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

फक्त एक निर्वैयक्तिक उपस्थिती आहे. त्यामुळे मला जीवनाची मजा तर येतेच पण कर्मलेपन होत नाही . ते काहीसं आकाशासारखं आहे , प्रेझेंट बट अनाफेक्टेड बाय इवेंटस

In reply to by संजय क्षीरसागर

जर कर्मलेपन होत नाहीये, तर मग या व्यासपीठावर बेधडकपणे मतं मांडायला कसली अडचण आहे? -गा.पै.