✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

च
चित्रगुप्त यांनी
Sun, 09/04/2011 - 12:17  ·  लेख
लेख
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत...... प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का? घटना १: माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे. घटना २: माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे. घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला. "वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
164003 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

लकम टू द मॅट्रिक्स! म्हन्जे

स्पा
Tue, 09/06/2011 - 20:28 नवीन
लकम टू द मॅट्रिक्स! म्हन्जे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

आवं स्पाजी पायलं नाय व्हं का

विनीत संखे
Tue, 09/06/2011 - 20:45 नवीन
आवं स्पाजी पायलं नाय व्हं का तुमी... म्याट्रिक्स नावाचा एक प्हारीनचा पिक्चर हाय... बगायचा म्हंजी काय सांगू अगदी मेंदूच्या नानाची टांग... झिणझिण्याच यावा डोस्क्यालाच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्पा, परत भेटशील तेव्हा सांग,

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/06/2011 - 22:14 नवीन
स्पा, परत भेटशील तेव्हा सांग, देतो कॉपी करून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

थांबवा!

Nile
Tue, 09/06/2011 - 22:18 नवीन
तुमच्या सारख्या वयोवृद्धांनी अश्या कॉप्या करणं थांबवलं नाही तर तुमच्या नातवंडासमान असलेल्या स्पाच्या पिढीने तुमच्याकडून शिकायचं तरी काय? थांबवा आता असल्या गोष्टी अन तरूणांपूढे काहीतरी चांगले आदर्श ठेवा! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

>>> प्रियाली: सोबतीला आलेले

पाषाणभेद
Tue, 09/13/2011 - 01:53 नवीन
>>> प्रियाली: सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे.... असे म्हणतात की मानवाला एकटे आवडत नाही. अगदी मरतांना देखील कुणीतरी जवळ हवे असावे असे त्याला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि

गवि
Mon, 09/05/2011 - 17:50 नवीन
मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि कंट्रोल्स जातात आणि ऐकू येण्याचे सर्वात शेवटी थांबते असं कुठेतरी ऐकून/वाचून अंगावर काटा आला होता.. म्हणजे आपण अचेतन आणि दृष्टीहीन असू..आणि आपल्या आजुबाजूचे प्रियजन शोक करायला लागल्यावरही ते मरता मरता काही काळ ऐकू येत असेल?
  • Log in or register to post comments

मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि

माझीही शॅम्पेन
Mon, 09/05/2011 - 18:14 नवीन
मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि कंट्रोल्स जातात
मिपा वर एखादा आय-डि बॅन होतो तेव्हा असाच काहीस होत असाव अशी दाट शंका आहे. तुम्ही सर्व वाचू शकता परंतु तुमचा आवाज कोणी ऐकू शकत नाही :) अवांतर :- लोक इकडे इतकी सेंटी का मारुन रहालेत जे व्हायच ते होणारच आहेत :) पण हा धागा अतिशय मनोरंजक आहे हे मान्य करावाच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हल्लीच अमेरिकेत प्रिन्स

माझीही शॅम्पेन
Mon, 04/25/2016 - 05:58 नवीन
हल्लीच अमेरिकेत प्रिन्स नावाच्य प्रसिध्ध गायाकाचा मृत्यू झाला , त्याच्या मित्राची मुलाखत ऐकत होतो त्यात त्याने मृत्यू पुर्वी काही दिवस त्याचे दिवंगत मित्र परिवार आणि नातेवाईकशी तो संवाद साधत होता अस संगितल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हा हि एक अनुभव !

केशवराव
Mon, 09/05/2011 - 18:51 नवीन
माझी आई [ मृत्यु समयी वय - ८६] जेव्हा अखेरची आजारी होती ( काळ - ६ महीनें ) तेव्हा तिला सतत भास होत असत. समोर अस्तित्वात नसलेली माणसे दिसायची. डॉक्टरांच्या मते याला हेलिस्युलेशन असे म्हणतात. मेंदुला रक्त पुरवठा कमी झाल्यास असे होवू शकते. एकुण हा विषय मनोरंजक + ज्ञानवर्धकही आहे. लगे रहो !
  • Log in or register to post comments

अनुभव! अनुभव!! अनुभव!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 09/05/2011 - 21:03 नवीन
तुम्ही उल्लेख केलेल्या तीनही अनुभवांमधे मला गूढ काही फारसे वाटले नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळच्या शारिरीक अवस्थेप्रमाणे काही भास होणे, जुन्या आठवणी अचानक जागृत होणे वगैरेचे काही स्पष्टीकरण शक्य आहे. तसे असेलच असे नाही, पण एक शक्यता म्हणून नक्कीच प्रबल आहे. पण तुम्ही माझ्या 'फेड' या कथेबद्दल विचारले आहे त्याबद्दल मात्र मला अजूनही काही स्पष्टीकरण सुचत नाहीये. ती घटना साक्षात माझ्याच घरात खरोखर घडलेली आहे. ज्याक्षणी काकाने तिकडे गावाला पैसे चुकते केले त्याचवेळी साधारण आजी (जिच्या हातापायाच्या काड्या झाल्या आहेत आणि खूपच अशक्त झाली आहे) उठून सरळ बाथरूम मधे गेली. भरलेली पाण्याची बादली उचलून डोक्यावर उचलून उपडी केली आणि बाहेर आली. काकूला म्हणाली "संपलं गं सगळं! फिटलं!" ... त्यानंतर बर्‍याच वेळाने काकाचा फोन आला गावावरून की पैसे दिले आणि कर्ज फिटल्याचं कबूल करून घेतलं म्हणून. अजून एक अनुभव आहे. हा माझा नाही पण ज्यांना आला त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊच शकत नाही. एक अतिशय उच्च अध्यात्मिक अधिकार असलेली व्यक्ती मुंबईमधे देह सोडती झाली. त्याचवेळी, मुंबईपासून अतिशय दूर असलेल्या एका गावात जिथे त्या व्यक्तीच्या सद्गुरूंचे समाधीस्थान होते तिथे सकाळची काकडआरती चालू होती. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला मृत पावलेली व्यक्ती देवळाच्या दारात उभी राहून आरतीला टाळ्या वाजवून आणि मग नमस्कार करताना दिसली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ते आजारी होते हे सर्वश्रुत होते आणि त्याकाळी (१९६७ साली) मुंबईहून तिथे जायच्या सोयीही फार नव्हत्या. ती व्यक्ती थोडा वेळ तिथे थांबली आणि एकदम दिसेनाशी झाली. २-४ तासात तार आली तेव्हा त्यांच्या मृत्युबद्दल सगळ्यांना कळले. या सगळ्याबद्दल सकृद्दर्शनी तरी काही संगती लागत नाही! आता कोणी भास, योगायोग वगैरे म्हणेल तर मग असोच!
  • Log in or register to post comments

हम्म

चित्रा
Mon, 09/05/2011 - 22:04 नवीन
'चित्रगुप्तां'नी असा धागा काढावा याची गंमत वाटली. तुम्ही उल्लेख केलेल्या तीनही अनुभवांमधे मला गूढ काही फारसे वाटले नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळच्या शारिरीक अवस्थेप्रमाणे काही भास होणे, जुन्या आठवणी अचानक जागृत होणे वगैरेचे काही स्पष्टीकरण शक्य आहे. असेच म्हणते. माणसाच्या इच्छा या सर्वाधिक प्रबळ असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे असे काहीतरी होत असावे. स्वप्नी म्हणजे स्वप्नावस्था - असेच असले पाहिजे असे नाही. कुठच्यातरी वेगळ्या मानसिक स्थितीत सध्याची स्थितीची जाणीव लुप्त होत असेल. इ. इ. अवांतरः माझ्या लहानपणी माझी एक मावस आजी असे म्हणे की तिला भुते दिसत, आणि ती वार्‍यासारखी असतात. तिच्याकडून भुते पाहिल्याचा एखादा किस्सा ऐकला आहे. पण तिला एकदा विचारले की तुला भिती नाही का वाटली तेव्हा तिने मला उत्तर दिले की जिवंत माणसे भुतांपेक्षा भयंकर असतात. आता त्यात तथ्य वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चित्रगुप्त जी धागा आवडला

jaypal
Tue, 09/06/2011 - 15:52 नवीन
ह्या धाग्यावरील काही प्रतीसाद ही तितकेच खिळवुन ठेवणारे आहेत. मी अनेकदा माझ्या स्वप्नात हे बघतो पण कधीच भिती वाटली नाही उलट पक्षी कुतुहलच आहे की आता पुढे काय? Image removed.
  • Log in or register to post comments

आपली स्वप्नावस्था कूतूहल चाळवते आहे थोडं विस्तारून सांगाल काय

आत्मशून्य
Tue, 09/06/2011 - 20:49 नवीन
मला स्वतःला लूसीड ड्रीमिंगचा (मराठीत त्याला जागृत स्वप्न म्हणायच का ?) सराव आहे अनूभव आहे, याची संपूर्ण वैधता विज्ञानही मान्य करतं. त्यामधे खरोखर केवळ आश्चर्य म्हणता येइल असे भास (स्वप्न) निर्माण करता येतात पण मी त्या अवस्थेची तूलना मृत्यू वा प्रत्यक्ष अ‍ॅस्टल बॉडी प्रोजेक्शन सोबत कंपेअर करू शकत करू शकत नाही कारण तसा अनूभव घेता येतो पण एक महत्वाचा फरक आहे. लूसीड ड्रीमिंगमधे माझा मेंदू काम करत असतो, शरीरात रक्ताभीसरण चालूच असते. मृत्यू याच्या उलट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

तुम्ही जे स्वप्नात बघता

अप्पा जोगळेकर
Mon, 09/12/2011 - 22:42 नवीन
तुम्ही जे स्वप्नात बघता त्याचा फोटो कसा काय काढला ? आंतरजालावरुन घेतला असल्यास त्याचा दुवा द्याल का ? कॉपी इमेज लोकेशन करुन पाहिले तेंव्हा इमेजचे नाव just-before-death.jpg असे आहे हे कळले. माफ करा पण या धाग्याशी संबंधित नावाचे चित्र शोधून ते डकवले तर नाही ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

आंतरजालावरुन घेतला असल्यास त्याचा दुवा

चित्रगुप्त
Tue, 09/13/2011 - 13:49 नवीन
अप्पा जोगळेकर यांचा जयपाल यांना प्रश्नः तुम्ही जे स्वप्नात बघता त्याचा फोटो कसा काय काढला ? आंतरजालावरुन घेतला असल्यास त्याचा दुवा द्याल का ? हा घ्या दुवा: http://joanofarc86.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

मी अनेकदा माझ्या स्वप्नात हे बघतो ....

चित्रगुप्त
Tue, 09/06/2011 - 20:24 नवीन
जयपाल यांच्या प्रतिसादात त्यांनी एक चित्र दिले आहे, आणि म्हटले आहे की "मी अनेकदा माझ्या स्वप्नात हे बघतो" .... ....याबद्दल जरा जास्त तपशील, माहिती द्यावी, ही विनंती.
  • Log in or register to post comments

म्हातार्‍या अन मरणोन्मूख

Nile
Tue, 09/06/2011 - 21:47 नवीन
म्हातार्‍या अन मरणोन्मूख लोकांच्या फँटसींबद्दलची एव्हढी चर्चा वाचून..आपलं ते... पाहून ड्वाळे पाणावळे! “For me, it is far better to grasp the universe as it really is than to persist in delusion, however satisfying and reassuring.” - Carl Sagan
  • Log in or register to post comments

:)

आत्मशून्य
Sat, 09/10/2011 - 11:18 नवीन
Imagination is more important than knowledge- Albert Einstein
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आंधळ्याचा चष्मा...

Nile
Sat, 09/10/2011 - 14:22 नवीन
१. “Imagination is more important than knowledge. For knowledge is limited to all we now know and understand, while imagination embraces the entire world, and all there ever will be to know and understand.” २. delusion: A false belief strongly held in spite of invalidating evidence, especially as a symptom of mental illness: delusions of persecution. ३.imagination :the faculty or action of producing ideas. Get well soon, O deluded mind.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

डोळसपणाचि नाटकं....

आत्मशून्य
Sat, 09/10/2011 - 19:37 नवीन
Good to see finally you trying to find your own cure... Let me know if I could help you. Google is not enough, neither knowledge without wisdom.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हॅ हॅ हॅ.

Nile
Sun, 09/11/2011 - 01:08 नवीन
तुमची गरज नाही. शून्यात अडकून पडायचं नाहीए आम्हाला. बाकी तुम्हाला क्यूअर काय सापडेल असं वाटत नाही. काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू

सुधीर
Sat, 09/10/2011 - 11:39 नवीन
हा सगळा धागा काल रात्री वाचला, अन् झोपताना अंगावर काठा उभा राहिला. (मी अजून तसा अनुभव घेतलेला नाही, म्हणून असेल कदाचित) ह्यात ब-याच जणांचे अनुभव कमी अधिक प्रमाणात सारखेच आहेत. एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती (२०-३० च्या आसपास) मरताना पाहण्याचा अनुभव आहे का? कारण वरील सर्व अनुभव वृद्धापकाळातील नैसर्गिक मृत्यूशी निगडित आहेत. अनैसर्गिक, अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत.
  • Log in or register to post comments

अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत

चित्रगुप्त
Sat, 09/10/2011 - 13:56 नवीन
सुधीर यांनी अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत, असे विचारले आहे. वरील मूळ लेखात घटना क्र. ३ मधील तरूण विशीतीलच होते: घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

मानसीक

स्मिता.
Sat, 09/10/2011 - 14:44 नवीन
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला. याला त्या मुलाची मानसीक स्थिती जबाबदार असू शकते, नव्हे तर तेच कारण असावे असे वाटते. जिवाभावाच्या ३ मित्रांना डोळ्यादेखत अपघातात मृत्युमुखी पडताना बघून त्या तरूणाच्या मनावर (की डोक्यावर?) त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे तो सतत त्यांच्याच विचारात राहून तशी बडबड करत असेल आणि एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार. अवांतरः अपघातात वाचलेला तरूण नंतर दगावला यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

..... यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली....

चित्रगुप्त
Sat, 09/10/2011 - 23:38 नवीन
..... यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली.... व्वा.... तर मग येउ द्या ना या सिनेमाचे परिक्षण. वाचायला नक्कीच आवडेल, आणि या विषयावर आणखी जरा प्रकाश पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

मेंदूला विचार असह्य होवून काम करायचा थांबला, तर मनुष्य मरतो ?

चित्रगुप्त
Sun, 09/11/2011 - 10:22 नवीन
चित्राताईने म्हटले आहे की " एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार" ......आता प्रश्न असा की अश्या ताणाने समजा अगदी मेंदू काम करायचा थांबला, (तात्पुरता 'हँग' झाला) तर चक्क मरणच ओढवते का डायरेक्ट? भोवळ वा चक्कर येणे, बेशुद्धावस्था वा कोमात जाणे, असले काही न होता? मग योगी मंडळी समाधीत जातात तेंव्हा काय होते? 'जीव जाणे' आणि 'प्राण जाणे' हे वेगवेगळे असते म्हणतात, ते नेमके काय? वेगवगळ्या वेळी आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील विविध स्थितीत मनुष्याची संवेदनशीलता व ग्रहणक्षमता वेगवेगळी असते, असे दिसते. अर्भकावस्था व मृत्यूच्या उंबरठ्यावरील अवस्था, यात काय काय जाणिवा होत असतात, हे जाणणे तसे कठीणच. Dr. Brian Weiss यांचे Many Lives, Many Masters' हे पुस्तक वाचावे, असा आजच सल्ला मिळाला आहे. कुणी वाचले असल्यास या पुस्तकाची ओळख करून द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

मेंदू

स्मिता.
Sun, 09/11/2011 - 12:24 नवीन
चित्राताईने म्हटले आहे की " एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार" ......आता प्रश्न असा की अश्या ताणाने समजा अगदी मेंदू काम करायचा थांबला, (तात्पुरता 'हँग' झाला) तर चक्क मरणच ओढवते का डायरेक्ट? ते वरचं वाक्य मी लिहिलंय म्हणून मी उत्तर देत आहे ;) ते वाक्य लिहिल्यानंतर 'असा माझा अंदाज आहे.' हे वाक्य लिहायचे राहून गेले. मला वैद्यकिय क्षेत्रायलं ज्ञान शून्य आहे. त्यामुळे असह्य मानसिक ताणामुळे मेंदूवर नक्की काय परिणाम होत असावा याची माहिती नाही. पण ऐकीव माहितीनुसार (ही माहिती धडधडीत चुकीची असू शकते) अश्या ताणामुळे ब्रेन हॅमरेज का नर्व्हस ब्रेकडाउन होवून जीव दगावू शकतो, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@चित्रगुप्त,

शाम भागवत
गुरुवार, 05/21/2020 - 01:05 नवीन
@चित्रगुप्त, जून २०१८ ला मराठी अनुवाद प्रसिध्द झाला आहे. अनुवादक निता कुलकर्णी किंमत ₹२२५ डाॅ. विज यांची माहिती प्रस्तावनेत पाहू शकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती

अप्पा जोगळेकर
Mon, 09/12/2011 - 23:00 नवीन
एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती (२०-३० च्या आसपास) मरताना पाहण्याचा अनुभव आहे का? १ मे, २००९ या दिवशी महिपतगड येथे मला स्वतःलाच (वय २० ते ३० च्या मधेच) मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा अनुभव आलेला आहे. मला तरी अशा प्रकारचा कोणताही अनुभव आला नाही. संकटातून बाहेर पडल्यावर २-३ मिनिटे काही सुचत नव्हते आणि कपाळावर घाम डवरला होता. कोणतीही अतींद्रिय घटना घडली नाही की कोणतेही पूर्वज भेटायलासुद्धा आले नाहीत. आणि माझ्यावर कोसळलेले संकट ज्यांनी पाहिले त्यांनादेखील असे काही जाणवले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा अनुभव

चित्रगुप्त
Wed, 09/14/2011 - 00:15 नवीन
तुमचा अनुभव हा 'मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा' अनुभव आहे. मी दिलेल्या तीन घटना व अन्य प्रतिसादातील उदाहरणे प्रत्यक्ष मृत्यूची आहेत. यावरून असे म्हणू शकतो, की मनुष्याची खरोखरच प्रत्यक्षात मरणाची वेळ येते, तेंव्हाच असे अनुभव येतात. या विश्वाच्या विराट योजनेत/पसार्‍यात मनुष्याला अद्याप अज्ञात अशी कोणकोणती रहस्ये आहेत, हे सांगणे ती जोवर प्रत्यक्ष ज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत, तोवर अशक्य. परंतु अश्या अनुभवांवर संशोधन करण्याऐवजी वा संशोधन करण्यापूर्वीच नाकारणे, ही सुद्धा एक अंधश्रद्धाच म्हणावी लागेल. सुमारे वीस वर्षांपूर्वी माझ्या परिचयातील एका तरूण मुलीला एखाद्या व्यक्ती बद्दल असे स्वप्न पडायचे, की त्याच्या भोवती पांढरे बुरखे घातलेल्या व्यक्ती बसल्या आहेत. हे स्वप्न काही दिवस रोज दिसायचे, आणि लवकरच ती व्यक्ती मृत व्हायची.तिला खूप भिती वाटायची या सर्व प्रकाराची. ती अगदी सरळ स्वभावाची, साधी मुलगी होती, अविश्वास करण्याजोगे तिचे व्यक्तिमत्व नव्हते. आता ती कुठे आहे, ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

माझ्या तिशीतल्या एका नातेवाईक

मराठी कथालेखक
Mon, 07/21/2014 - 16:54 नवीन
माझ्या तिशीतल्या एका नातेवाईक तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवले. या मुलीत व तिच्या भावंडांत खूप जिव्हाळ्याचे , घट्ट प्रेम होते. पण मृत्यूसमयी , आधी काही दिवस किंवा नंतरही कुणाला काही भास झालेले मला माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

भेंडी!!!! आपण तर मरताना*

Nile
Sat, 09/10/2011 - 14:44 नवीन
भेंडी!!!! आपण तर मरताना* स्वतःचं संपूर्ण व्हिडिओ (विथ ऑडिओ) शूटिंगच करणार ब्वॉ. उगाच नंतर वरती अनेकांनी लावल्यात तसल्या थापा माझ्या नावाने कोणी खपवायला नकोत!! *जास्त आगावूपणा करून कधी हा प्रश्न विचारू नये.
  • Log in or register to post comments

ब्याटरी नीट चार्ज करणे!

सेरेपी
Sun, 09/11/2011 - 06:09 नवीन
डॉकिन्स काकांची लय भारी आयड्या आहे ही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

@ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न

५० फक्त
Sun, 09/11/2011 - 10:40 नवीन
@ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न विचारायचा नाही हे मान्य, पण माझं तर ठरलेलं आहे आणि मला माहित पण आहे, त्यावेळी अशी काही शुटिंगची सोय वगैरे करता येईल का, अर्थात त्यावेळि कुठं कसा आणि का असेन हे माहित नाही, आज तरी. तोपर्यंत संपर्क राहिला तर महिनाभर आधी फोन करेन तुम्हाला, हां फक्त त्या शुटिंगचे अधिकारविक्रीतुन आलेल्या रकमेपैकी ५०% रक्कम माझ्या वारसांना द्यावि लागेल.पण शुटिंगसाठी कुणि खर्च करणार नाही.
  • Log in or register to post comments

शूटिंग

प्रचेतस
Sun, 09/11/2011 - 10:48 नवीन
@ निळे, शूटींगसाठी प्रेक्षक म्हणून हौशे, नवशे, गवशे लागतीलच, तेव्हा आम्हाला पण बोलवा त्यासाठी, मानधन वैग्रे काही नको, फक्त जायचे यायचे भाडे आणि फस्क्लास जेवण असू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

त्या कुठल्याश्या

अन्या दातार
Sun, 09/11/2011 - 10:54 नवीन
त्या कुठल्याश्या हॉलिवूडमधल्या नटीने असेच काहीसे केले होते. त्यातून काही क्लु लागतो का ते बघ रे निळ्या. आपणही तुझे अगदी तस्सेच करु. (तिने भारी जेवण दिले होते म्हणे ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

'त्या कुठल्याश्या

५० फक्त
Sun, 09/11/2011 - 11:09 नवीन
'त्या कुठल्याश्या हॉलिवूडमधल्या ' - त्या कुठल्याश्या हॉलिवुडमधल्या म्हणजे किती हॉलिवुड आहेत असं म्हणायचं आहे तुम्हाला श्री. अन्या दातार. आणि ती नटि कोण हे सांगा की, कारण हॉलिवुडमधल्या नट्या ब-याच गोष्टींच शुटिंग करुन ठेवतात असं ऐकलं आहे.
  • Log in or register to post comments

आता

प्रचेतस
Sun, 09/11/2011 - 11:14 नवीन
आता ते निळेरावांनाच माहिती असेल ना हो ५०, त्यांचा हॉलिवूडबाबत बराच अभ्यास आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

डील!!

Nile
Sun, 09/11/2011 - 14:49 नवीन
काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना अन पर्यायाने संपादकांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत.
  • Log in or register to post comments

आपुले मरण पाहिले म्या डोळा....

शशिकांत ओक
Mon, 09/12/2011 - 17:01 नवीन
मित्र हो, या विषयावर चित्रगुप्तांनी मला म्हटले होते की प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. खरे तर माझा हा विषय नाही. म्हणून मी माझ्या वाचनातील एका पुस्तकाचा संदर्भ देत आहे तो वाचकांना आवडेल. 'मनुष्य मेल्यानंतर संपतो हेच करे असून त्याचा आत्मा उरतो हे म्हणणे खोटे आहे' असे म्हणणाऱ्या जडवाद्यांचे मेल्यानंतर मत परिवर्तन होते व तसे मत परिवर्तन झाल्याचा संदेशही त्यांचे मरणोत्तर आत्मे देऊ शकतात, या बद्दल हॅरी हुदिनी या प्रसिद्ध अमेरिकन जादुगाराचे उदाहरण अतींद्रिय संशोधन क्षेत्रात गाजलेले आहे. (असा करार करून दिलेला संदेश - म्हणजे मरणोत्तर आत्मरुपाने असे अस्तित्वात असल्याचा हुदिनीने आपल्या पत्नीला सादर केलेला पुरावा - हुदिनीने फोर्ड या माध्यमा मार्फत दिलेला संदेशच होता.) येथे असाच करार करून मेलेल्या व मरणोत्तर आपण आत्मा म्हणून अस्तित्वात असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करणाऱ्या एका प्रसिद्ध चित्रपट लेखकाचे अलिकडील उदाहरण देत आहे. "डॉ. झिवॅगो (१९६५) व ए मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६६) या प्रसिद्ध ऑस्कर विजेत्या चित्रपटांचा कथा लेखक रॉबर्ट बोल्ट हा नास्तिक होता. तो फेब्रुवारी १९९५ साली वयाच्या ७०व्या वर्षी वारला. त्याच्या पत्नीच्या कथनानुसार तिने आपले (मृत्युनंतर आत्मा उरतो) हे म्हणणे खरे असेल तर आत्म्याच्या रुपाने परत येऊन ते आपल्यापुढे पुराव्यानिशी सिद्ध करावे असा आपल्या पतीशी करार केला होता आणि आश्चर्य म्हणजे त्या करारानुसार मेल्यानंतर तिचे म्हणणे खरे असल्याचे पुरावे तिला दिले. उदा. तो मेल्यानंतर घरातील वस्तू आपोआप इकडच्या तिकडे विचित्र रितीने स्थलांतर करीत असत. तो पिण्याचा भारी शौकीन असल्यामुळे तिने पेल्यात दारू ओतली तर ती आपोआप अदृष्य होई. 'अशा घटना हल्ली वरचेवर घडत असून मी घरात एकटी नाही, नवरा माझ्या अजून सोबतीला आहे' असे बोल्टची विधवा पत्नी सर्रा माईल्स म्हणते. Ref. (Indian Express, Sunday, November 1995.) संदर्भ - विज्ञान आणि चमत्कार (पान २२७ व २२८) लेखक प्रा. अद्वयानंद गळतगे. वैचारिक रंगित खाद्य - 'मृतात्मा' हा शब्द कर्मधारय समास आहे कि षष्ठीतत्पुरुष समास आहे? तज्ञांनी आपली मते मांडावीत... परलोकाच्या म्हणजे स्वतंत्र अतींद्रिय जगाच्या अस्तित्वाचा पुरावा देणारे संदेशही काही वेळा मृतात्म्यांकडून मिळतात.
  • Log in or register to post comments

या!

चित्रा
Mon, 09/12/2011 - 18:29 नवीन
आलात? चित्रगुप्तांनी आमंत्रण देऊन बोलावले आणि तुम्ही आलात म्हणजे या धाग्याचे खरे सार्थक झाले. >>तो पिण्याचा भारी शौकीन असल्यामुळे तिने पेल्यात दारू ओतली तर ती आपोआप अदृष्य होई. हाहा. ही आयडीया मस्त आहे. मरावे परी दारू पीण्या उरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

चित्राच्या शरीरात वेगळा आत्मा

प्रियाली
Mon, 09/12/2011 - 19:01 नवीन
वरला प्रतिसाद वाचून उगीच मला चित्राच्या शरीरात नाईल, परा किंवा तत्सम प्रभृतींचे आत्मे घुसल्यासारखे वाटले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

ह्म्म. दारु अदृश्य होऊन कुठे

शिल्पा ब
Mon, 09/12/2011 - 22:07 नवीन
ह्म्म. दारु अदृश्य होऊन कुठे जात असेल? नाही म्हणजे दृश्य दारु अदृश्य व्यक्तीने प्यायल्यावर ती त्याच्या अदृश्य शरीराचा स्पर्श झाल्यावर अदृश्य होते? हे सगळं कैच्या कैच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

दारु अदृश्य होऊन कुठे जात असेल?

चित्रगुप्त
Tue, 09/13/2011 - 00:13 नवीन
अहो, असे काय करता? मागे गणपतीने नाही का प्यायली? दुधाची चरवी? डोळ्यादेखत दुधाच्या चरव्या च्या चरव्या अदृष्य झाल्या होत्या म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

का हो, आमचा नाडीपट्टीवर आता

अप्पा जोगळेकर
Mon, 09/12/2011 - 23:12 नवीन
का हो, आमचा नाडीपट्टीवर आता विश्वास बसला आहे असं सांगणारे आत्मेसुद्धा कदाचित संबंधित लोकांना भेट देत असतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

या प्रतिसादाने या धाग्याला

गणपा
Tue, 09/13/2011 - 00:01 नवीन
या प्रतिसादाने या धाग्याला नवजीवन मिळणार असे भाकित (मरायच्या आधीच) वर्तवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आत्मे दारु प्यायला लागले हो...मग मी का नाडी पाहू नये....

शशिकांत ओक
Tue, 09/13/2011 - 00:12 नवीन
मित्रांनो, भले आत्म्यांना झिंग चढलेली असेल वा नसेल, इथे अनेकांना नाडीचा नशा असा काही सिर चढलाय कि ओकांच्या लिखाणाचा धसका व नाडीचा हिसका यामुळे अनेकांची झोप उडून गेली आहे.
जडवाद्यांचे मेल्यानंतर मत परिवर्तन होते व तसे मत परिवर्तन झाल्याचा संदेशही त्यांचे मरणोत्तर आत्मे देऊ शकतात, या बद्दल हॅरी हुदिनी या प्रसिद्ध अमेरिकन जादुगाराचे उदाहरण अतींद्रिय संशोधन क्षेत्रात गाजलेले आहे.
जर मेल्यानंतर जडवाद्यांचे मत परिवर्तन होते असा अनुभव आहे तर मग जीवंतपणी नाडीचा अनुभव घेऊन न मरताच मतपरिवर्तन व्हायला काही प्रॉब्लेम नसावा. चित्रगुप्ता, आपल्या (बो)जड वादी मित्रांना आज्ञा द्या की माझ्यासमोर यायच्या आधी नाडीची ताडी घेऊन का आला नाहीस. यमदूतांनो, त्या जडवादी त्याला किंवा तिला पुन्हा खाली दामटा. संदेश द्यायला की लई मज्जा आली वर ... पण नाडी सोडल्याची काही और मजा असते....हलके करून पाठवा. करवा त्याना हिम्मत...
  • Log in or register to post comments

ओक साहेब, आपण ऑटोरायटींग केलय ना ? मग नाडी सोडून परलोकाबाबत

आत्मशून्य
Tue, 09/13/2011 - 01:22 नवीन
त्या अनूशंगाने लेखन का करत नाही ? ऑटोरायटींगमूळे आपला मृतात्म्यांसोबत संपर्क झाला असेलच की ? म्हणूनच प्रत्यक्ष तूम्हाला याबाबत काही गोश्टी अधीकाराने बोलायचा हक्क असताना असताना उगीच इतरांची उदाहरणे देण्यात वेळ का वाया घालवत आहात ? उत्सूकता आहे तूमच्या ऑटोरायटींग बद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आधी नाडीची ताडी घेऊन का आला नाहीस....

चित्रगुप्त
Tue, 09/13/2011 - 00:47 नवीन
ओक साहेब, आता जे नवीन यमदूत रिक्रूट होतील, त्यांचेसाठी आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक, अशी अट घातलेली आहे. बघा: http://misalpav.com/node/19117#comment-338087
  • Log in or register to post comments

लोका सांगे ब्रह्मज्ञान...

शशिकांत ओक
Tue, 09/13/2011 - 10:33 नवीन
लोका सांगे ब्रह्मज्ञान... नव्या दूतांसाठी नाडीची अट केलेली सोय छान. आपण व आपल्या यजमानांना - दस्तूरखुद्द राज यम - ज्यांना प्राण घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट कायमस्वरुपी मिळालेले आहे - त्यांनाही ती अट लागू करावी नाही तर , .... लोका सांगे ब्रह्मज्ञान... असे व्हायचे.... अण्णां तेथे पोचले की उपोषणाला बसतील तेंव्हा आधीच सावध व्हा म्हणजे तुमची नोकरी पक्की बघा ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा