काही ठिकाणे काही आठवणी - २ [खादाडी स्पेशल भाग]

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
30 Aug 2016 - 10:27 pm

आपण पहिला भाग वाचू शकता ह्या लिंक वर:-
http://www.misalpav.com/node/37088

०१: श्री हनुमान डेअरी - ठाणे \ श्रद्धा सर्व्हिसेस ठाणे
गोड प्रचंड आवडत असल्यामुळे राम मारुती रोड वरची श्री हनुमान डेअरी म्हणजे जन्नत. गरम गरम जिलबी , काजूकातली , कलिंगड बर्फी ह्या सगळ्या गोष्टी प्राणाहून प्रिय. हनुमान डेअरी मध्ये नमकीन सुद्धा मिळत. पोहे चिवडा / कचोरी तर अगदी उत्तम.
दुसरे ठिकाण म्हणजे श्रद्धा सर्विसेस. आता हे पण मिठाईचे दुकानच आहे. पण माझ्या लहानपणि ते घंटाळी बागेच्या मागे असलेल्या लष्करी बाराक सारख्या ठिकाणी असायचे सध्या ते घंटाळी देवी मंदिर समोर आहे. इथे मी आजी आणि आई बरोबर जायचो , बाकरवडी तर चितळेंपेक्षा उत्तम मिळायची आणि ताजी ताजी मिळायची.
तसाच खुशखुशीत पोहे चिवडा , चकली , कडबोळी , केला वेफेर्स नारळ वाडी आहाहा तोंडाला आत्तापण पाणी सुटलंय.

०२: वृंदावन सोसायटी- ठाणे
१९९७ साली आम्ही वृंदावन सोसायटी मध्ये राहायला गेलो.. मुंबई मध्ये आरे चे स्टॉल फेमस आहेत ( होते) तसेच दोन स्टॉल वृंदावन मध्ये पण होते . तिथे मी आरे मसाला दूध प्यायचो. २०० मिली च्या टिपिकल काचेच्या बॉटल मध्ये मिळायचे. 'वृन्दावन मधला अजून एक स्पॉट म्हणजे जोशी स्वीट्स सामोसा हि इथली खासियत . तसा मला सामोसा आवडत नाही पण त्याचा कव्हर खूप आवडत. मग रविवारी खास बाबांच्या मागे लागून मी सामोसा आणायला सांगायचो. मग भातात ते सामोसा कव्हर कुस्करून खायला खूप मजा यायची. वृन्दावन मध्ये एक मॉन्जिनीस पण होते इथे दांडके घायला जायचो ( ब्रेड स्टिक ना मी दांडके म्हणायचो).

०३: खंडेलवाल स्वीट्स ठाणे
जेव्हा ठाण्यात टीप-टॉप हे फक्त थाळी हॉटेलक होते तेव्हा ठाण्याच्या हलवाई विश्वात खंडेलवाल स्वीट्स चा नाव मानाने घेतले जात होते. माझे आजोबा नेहेमी सुतार फेणी , सोन-पापडी अनंत असत. पण मग खराब मावा पकडला गेला आणि मग खंडेलवाल चा विश्व उध्वस्त झाला आणि टीप-टॉपचा उदय झाला.

०४: गोखले उपहार गृह- ठाणे
गोखले रोड वरचे गोखले यांचे कोवळे उपहार गृह! मराठी पदार्थांसाठीचा दादर च्या प्रकाश च्या तोडीस तोड अस ठाणे मधला हे उपहार गृह . उत्तम प्रतीचे उपासाचे पदार्थ , पियुष , कोथिंबीर-अळू वाडी , दही आणि साधी मिसळ , झालेच तर सदा आणि मेंदू वाद अश्या पदार्थासाठी ठाण्यातले उत्तम दुकान . दुकान तास कळकट होता . म्हणजे एका भिंतीला कला कडाप्पा लावून तिथे लोकांना प्लेट्स ठेवायाला जागा आणि बरोब्बर दुसऱ्या बाजूला मोठा काऊंटर. आद्य ठाणेकरांना ते नक्की आठवत असेल कसा होता ते . आता मात्र एकदम पॉश झालाय रामवाडी-विष्णूनगर मध्ये गोखले हॉलच्या खाली नवीन ठिकाणी चालू झाला आहे . उत्तम आहे . खरंतर मिपाकरांच्या कट्ट्या साठी उत्तम जागा आहे. पुढचा ठाणे कट्टा इथे करूया का?

०५: कात्रज डेअरी - पुणे
माझे डोंबिवली चे आजोबा-आजी पुण्याला शिफ्ट झाले आणि मग मला एक नवीन ठिकाण मिळाले . पुण्यातल्या सर्पोद्यान च्या बरोब्बर समोर कात्रज डेअरी आहे इथे सुगंधी दूध मिळते ते प्यायला मी आजोबा आणि माझे दोन्ही मावस भाऊ एकवेळ डुक्कर रिक्षा आणि एकवेळ चालत असे जायचो . आता खरंतर आमच्या तिघांच्या प्यायलेल्या दुधाची किंमत हि आमच्या रिक्षा भाड्यापेक्षा कमीच होई पण माझ्या हट्टाखातर दार वेळी मी पुण्याला धनकवडी ला गेलो कि आजोबा मला इथे घेऊन जात.

तर असा ह्या खादाडी स्पेशल भाग . पुढचा भाग लवकरच टाकीन बाकी तुमच्या पप्रतिक्रियांचा नेहेमीच स्वागत आहे . मिपाकरांना विनंती आहे कि त्यांनी मागील भागाप्रमाणेच या हि भागात भरभरून प्रतिक्रिया द्याव्यात.

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

औरंगजेब's picture

30 Aug 2016 - 10:32 pm | औरंगजेब

* गोखले रोड वरचा गोखले उपहार गृह आहे.

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 2:28 pm | महासंग्राम


बाकरवडी तर चितळेंपेक्षा उत्तम मिळायची

जाहीर निषेध... बाकरवडी खावी ती चितळेंनी तयार केलेली.

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Aug 2016 - 2:34 pm | अनिरुद्ध.वैद्य

ठाणेकर आहेत ते! उगा चितळ्यांशी कंपेअर करुन टी आर पी वाढवायचा असेल ;)

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 2:36 pm | महासंग्राम

हो तसंही ठाणे तिकडचं सदाशिवपेठ म्हणून उदयाला येतेय. पण वर्जिनल ते वर्जिनलच म्हाराजा. चितळेंच्या बाकरवडीची सर कुणालाच नाही.

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 4:11 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

चितळेच्या बाकरवडीला जगात तोड नाही.

थोडी वेगळ्या प्रकारची बाकरवडी खायची असेल तर चिंचवडची यशवंत.

चिंचवड मध्ये ?

औरंगजेब's picture

31 Aug 2016 - 9:31 pm | औरंगजेब

ही मते माझी आहेत आणी राहता राहिला प्रश्न टिआरपीचा तर मला व्यक्तिशः त्याची गरज भासली नाही.आणी गरजही पडणार नाही.

औरंगजेब's picture

4 Sep 2016 - 10:58 pm | औरंगजेब

आजच एका नातेवाईकांकडे कोल्हापुरी पुडवडी खाल्ली काय सुरेखा चव होती हो.

असंका's picture

6 Sep 2016 - 2:41 pm | असंका

पुडाची वडी मंताय काय?

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2016 - 8:52 pm | पिलीयन रायडर

यशवंत!! वादच नाही...

आम्चे अंबेजोगाई-लातुरचे लोक नेहमी यशवंतची बाखरवडी मागवतात. चितळेही आवडतेच, पण यशवंत खमंग आहे जास्त!

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2016 - 7:58 pm | बोका-ए-आझम

मुंबईची स.पे. म्हणजे पार्ले पूर्व. अगदी नखशिखांत.

औरंगजेब's picture

26 Sep 2016 - 6:49 pm | औरंगजेब

ख्या ख्या ख्या खरं आहे

मृत्युन्जय's picture

31 Aug 2016 - 5:52 pm | मृत्युन्जय

एकदम. चितळ्यांच्या बाकरवडीला तोड नाही. इतर कुठे चांगली बाकरवडी मिळत नाही असे काही आम्ही म्हणत नाही पण चितळे इज द बेस्ट

चितळेंनी मशिनीवर बाखरवडी बनवायच्या आधी किंवा खरेखुरे सुके खोबरे, खसखस हे इनग्रेडियंटस असत तेंव्हाच्या बा व ची सवय झाल्यावर आताची त्यामानाने डावी वाटते.

तसंही पुणं विद्या बालनचं माहेरघर आहेच ना!

हो ना, अजून दागिन्याने मढून होर्डींगावर मिरवत असते जिथे तिथे पुण्यात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Sep 2016 - 6:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुझं लक्ष कायम होर्डिंगवर अभ्याव, भालो खूब भालो =))

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Sep 2016 - 6:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

तर सगल्या हिरविनी पुन्यात येउन राह्तील.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2016 - 4:05 pm | अत्रुप्त आत्मा

अशी आहेत तर ती ठिकाणं सगळी!

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Aug 2016 - 4:59 pm | माम्लेदारचा पन्खा

अच्चं जालं तल !

खटपट्या's picture

1 Sep 2016 - 2:06 am | खटपट्या

या की कधीतरी ठाण्यात

मामलेदार मिसळ विसरलात काय

नायतर काय मामलेदारचा उल्लेख न केल्याबद्दल नीषेध

प्रसन्न३००१'s picture

2 Sep 2016 - 4:41 pm | प्रसन्न३००१

^^

+१०००

तीव्र निषेध

आहो मामलेदार आमच्या ह्रुद्यात आहे. त्याचा वेउल्लेख करायची गरजच नाही हो कुठाल्याच आद्य ठाणेकरास.

तर पोटाचा विषय मानतो. हृदयाचा विषय असलेली मिसळ म्हणजे नाशकातली - मखमलाबादची पिंगळ्यांची आणि गंगेजवळ दादासाहेबची.

मस्त सुरु आहे खाद्ययात्रा.ठाणे खरंच मस्त शहर आहे राहायला आणि खायला!

आता जिथे आमंत्रण आहे. मामलेदार जवळ तिथे १९७८ ते १९८० दरम्यान केतकर यांचे झुणका भाकरी केंद्र होते ८० पैशात झुणका भाकरी मिळायची. वालाचे बिरडे तिथे उत्तम मिळायचे.
गोखले रोडला राजमाता नावाचे होटेल होते चांगले जेवण मिळायचे.
स्टेशन समोर हातगाड्या लागायच्या. तिथे माजी उपमहापौर शरद कोळी यांची सुद्धा गाडी होती.
खंडेलवालची मोनापली होती पण त्या माव्याच्या भानगडीत संपली.
एस टी स्टँडसमोरचे स्टार, मामलेदार, प्रभात जवळ एक जिलेबीवाला ही प्रसिध्द ठि़काणे होती.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 8:47 pm | संदीप डांगे

गोखले उपहारगृह म्हणजे वादच नाय! अप्रतिम पदार्थ, माझे ऑफिस कार्यालयाच्या पुढच्या रस्त्यावर होते, त्यामुळे रोजचे खाणे होते इकडे. मराठी पदार्थ म्हणज उत्तमच. ताजे तळून द्यायचे, कोथिंबिरवडी, अळूवडी. हरभरा कबाब, लाजवाब! मला ठाणे कधीच आवडले नाही, पण 'काही ठिकाणी' खाण्यापिण्याच्या बाबतीत अव्वल!

खटपट्या's picture

6 Sep 2016 - 10:15 pm | खटपट्या

मला ठाणे कधीच आवडले नाही

नोटेड

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 10:28 pm | संदीप डांगे

अ‍ॅण्ड आय विल स्टॅण्ड बाय दॅट!! =)) =))

ओके, आम्हाला नाशिक कधीच आवडले नाही. :)

खटपट्या's picture

26 Sep 2016 - 7:36 pm | खटपट्या

सॉरी, आम्हाला अकोला कधीच आवडले नाही... :)

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2016 - 9:06 pm | बोका-ए-आझम

जरा ठाण्यातल्या सामिष स्थळांबद्दल लिहितोय. रंगायतनमधली सोड्यांची खिचडी (एकेकाळी दर शुक्रवारी मिळायची. सध्याचं माहित नाही) आणि अभिरुची मधले खेकडे हे लाजवाब होते.

रेवती's picture

6 Sep 2016 - 9:17 pm | रेवती

कात्रजचं सुगंधी दूध पिण्याइतकी दुधाची आवड नाही पण आत्यानं आरेचं बाटलीबंद दूध प्यायला लावलं होतं.
तुमच्या आठवणीतील उपहारगृहे ऐकून आहे.

आप्पा's picture

9 Sep 2016 - 9:54 pm | आप्पा

तीन पेट्रोल पंपाजवळ खवय्या हाॅटेल होते आता आहे का
छान मराठमोळे पदार्थ मिळत होते

प्रसन्न३००१'s picture

15 Sep 2016 - 12:36 pm | प्रसन्न३००१

आता नाहीये. कधीच बंद पडलय ते.

छान मराठमोळ्या पदार्थांसाठी घंटाळी मध्ये मेतकुट नावच हॉटेल चालू झालाय. महाराष्ट्र-भरातल्या प्रत्येक भागातील पदार्थ मिळतात. कोकणी, खानदेशी, वर्हाडी, कोल्हापुरी इ.

पदार्थांना चव चांगली आहे आणि सर्विसपण उत्तम आणि तत्पर आहे

नाखु's picture

27 Sep 2016 - 4:33 pm | नाखु

आगदी कुटाणा केल्याचे आठवतेय (ठाणे-डोंबोली) मिपाकरांनी ! शेवटी मेटाकुटीवाले स्वतः येऊन इथे लिहून गेले असेही आठवते.

ता.क. मी हे मेतकूट पाहिलेले नाही फक्त घरी भाताबरबरोबर मेतकुट तूप अनुभवले आहे.

आधिक माहीती लिंकाळे भाऊजीच देऊ शकतील.

रंगासेठ's picture

27 Sep 2016 - 5:36 pm | रंगासेठ

आगदी कुटाणा केल्याचे आठवतेय (ठाणे-डोंबोली) मिपाकरांनी ! शेवटी मेटाकुटीवाले स्वतः येऊन इथे लिहून गेले असेही आठवते.

अगदी अगदी...

बाकी खवय्या मधे जेवलोय एकदाच, चांगला अनुभव होता.

अत्रन्गि पाउस's picture

26 Sep 2016 - 9:43 pm | अत्रन्गि पाउस

ह्या तील अनुक्रमे आलू गोभी आणि शिवसागर मधल्या सगळ्या बाल्टी डिशेश अहाहा

ठाणे पूर्वेला विजय स्नॅक्स मधे वडापाव आणी पोहा-समोसा . तसेच डाल-पक्वान & कैलास मधे मिळणारा आईसक्रिम फलुदा.

वरुण मोहिते's picture

27 Sep 2016 - 6:00 pm | वरुण मोहिते

पाया सूप, खिमा पाव, भेजा फ्राय, यांचा उल्ल्लेख न केल्याबद्दल निषेध !!!