✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही ठिकाणे काही आठवणी - २ [खादाडी स्पेशल भाग]

औ
औरंगजेब यांनी
Tue, 08/30/2016 - 22:27  ·  लेख
लेख
आपण पहिला भाग वाचू शकता ह्या लिंक वर:- http://www.misalpav.com/node/37088 ०१: श्री हनुमान डेअरी - ठाणे \ श्रद्धा सर्व्हिसेस ठाणे गोड प्रचंड आवडत असल्यामुळे राम मारुती रोड वरची श्री हनुमान डेअरी म्हणजे जन्नत. गरम गरम जिलबी , काजूकातली , कलिंगड बर्फी ह्या सगळ्या गोष्टी प्राणाहून प्रिय. हनुमान डेअरी मध्ये नमकीन सुद्धा मिळत. पोहे चिवडा / कचोरी तर अगदी उत्तम. दुसरे ठिकाण म्हणजे श्रद्धा सर्विसेस. आता हे पण मिठाईचे दुकानच आहे. पण माझ्या लहानपणि ते घंटाळी बागेच्या मागे असलेल्या लष्करी बाराक सारख्या ठिकाणी असायचे सध्या ते घंटाळी देवी मंदिर समोर आहे. इथे मी आजी आणि आई बरोबर जायचो , बाकरवडी तर चितळेंपेक्षा उत्तम मिळायची आणि ताजी ताजी मिळायची. तसाच खुशखुशीत पोहे चिवडा , चकली , कडबोळी , केला वेफेर्स नारळ वाडी आहाहा तोंडाला आत्तापण पाणी सुटलंय. ०२: वृंदावन सोसायटी- ठाणे १९९७ साली आम्ही वृंदावन सोसायटी मध्ये राहायला गेलो.. मुंबई मध्ये आरे चे स्टॉल फेमस आहेत ( होते) तसेच दोन स्टॉल वृंदावन मध्ये पण होते . तिथे मी आरे मसाला दूध प्यायचो. २०० मिली च्या टिपिकल काचेच्या बॉटल मध्ये मिळायचे. 'वृन्दावन मधला अजून एक स्पॉट म्हणजे जोशी स्वीट्स सामोसा हि इथली खासियत . तसा मला सामोसा आवडत नाही पण त्याचा कव्हर खूप आवडत. मग रविवारी खास बाबांच्या मागे लागून मी सामोसा आणायला सांगायचो. मग भातात ते सामोसा कव्हर कुस्करून खायला खूप मजा यायची. वृन्दावन मध्ये एक मॉन्जिनीस पण होते इथे दांडके घायला जायचो ( ब्रेड स्टिक ना मी दांडके म्हणायचो). ०३: खंडेलवाल स्वीट्स ठाणे जेव्हा ठाण्यात टीप-टॉप हे फक्त थाळी हॉटेलक होते तेव्हा ठाण्याच्या हलवाई विश्वात खंडेलवाल स्वीट्स चा नाव मानाने घेतले जात होते. माझे आजोबा नेहेमी सुतार फेणी , सोन-पापडी अनंत असत. पण मग खराब मावा पकडला गेला आणि मग खंडेलवाल चा विश्व उध्वस्त झाला आणि टीप-टॉपचा उदय झाला. ०४: गोखले उपहार गृह- ठाणे गोखले रोड वरचे गोखले यांचे कोवळे उपहार गृह! मराठी पदार्थांसाठीचा दादर च्या प्रकाश च्या तोडीस तोड अस ठाणे मधला हे उपहार गृह . उत्तम प्रतीचे उपासाचे पदार्थ , पियुष , कोथिंबीर-अळू वाडी , दही आणि साधी मिसळ , झालेच तर सदा आणि मेंदू वाद अश्या पदार्थासाठी ठाण्यातले उत्तम दुकान . दुकान तास कळकट होता . म्हणजे एका भिंतीला कला कडाप्पा लावून तिथे लोकांना प्लेट्स ठेवायाला जागा आणि बरोब्बर दुसऱ्या बाजूला मोठा काऊंटर. आद्य ठाणेकरांना ते नक्की आठवत असेल कसा होता ते . आता मात्र एकदम पॉश झालाय रामवाडी-विष्णूनगर मध्ये गोखले हॉलच्या खाली नवीन ठिकाणी चालू झाला आहे . उत्तम आहे . खरंतर मिपाकरांच्या कट्ट्या साठी उत्तम जागा आहे. पुढचा ठाणे कट्टा इथे करूया का? ०५: कात्रज डेअरी - पुणे माझे डोंबिवली चे आजोबा-आजी पुण्याला शिफ्ट झाले आणि मग मला एक नवीन ठिकाण मिळाले . पुण्यातल्या सर्पोद्यान च्या बरोब्बर समोर कात्रज डेअरी आहे इथे सुगंधी दूध मिळते ते प्यायला मी आजोबा आणि माझे दोन्ही मावस भाऊ एकवेळ डुक्कर रिक्षा आणि एकवेळ चालत असे जायचो . आता खरंतर आमच्या तिघांच्या प्यायलेल्या दुधाची किंमत हि आमच्या रिक्षा भाड्यापेक्षा कमीच होई पण माझ्या हट्टाखातर दार वेळी मी पुण्याला धनकवडी ला गेलो कि आजोबा मला इथे घेऊन जात. तर असा ह्या खादाडी स्पेशल भाग . पुढचा भाग लवकरच टाकीन बाकी तुमच्या पप्रतिक्रियांचा नेहेमीच स्वागत आहे . मिपाकरांना विनंती आहे कि त्यांनी मागील भागाप्रमाणेच या हि भागात भरभरून प्रतिक्रिया द्याव्यात.

Book traversal links for काही ठिकाणे काही आठवणी - २ [खादाडी स्पेशल भाग]

  • ‹ काही ठिकाणे आणि माझ्या आठवणी -१
  • Up
  • काही ठिकाणे काही आठवणी-३ (पुणे विशेष भाग) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
16613 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

अशुद्ध लेखनाबद्दल क्षमस्व !

औरंगजेब
Tue, 08/30/2016 - 22:32 नवीन
* गोखले रोड वरचा गोखले उपहार गृह आहे.
  • Log in or register to post comments

बाकरवडी तर चितळेंपेक्षा उत्तम

महासंग्राम
Wed, 08/31/2016 - 14:28 नवीन
बाकरवडी तर चितळेंपेक्षा उत्तम मिळायची
जाहीर निषेध... बाकरवडी खावी ती चितळेंनी तयार केलेली.
  • Log in or register to post comments

जौ द्या हो!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 08/31/2016 - 14:34 नवीन
ठाणेकर आहेत ते! उगा चितळ्यांशी कंपेअर करुन टी आर पी वाढवायचा असेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

हो तसंही ठाणे तिकडचं

महासंग्राम
Wed, 08/31/2016 - 14:36 नवीन
हो तसंही ठाणे तिकडचं सदाशिवपेठ म्हणून उदयाला येतेय. पण वर्जिनल ते वर्जिनलच म्हाराजा. चितळेंच्या बाकरवडीची सर कुणालाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

अगदी अगदी.

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 16:11 नवीन
अगदी अगदी. चितळेच्या बाकरवडीला जगात तोड नाही. थोडी वेगळ्या प्रकारची बाकरवडी खायची असेल तर चिंचवडची यशवंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

यशवंत बाकरवडी कुठे मिळते

gogglya
Wed, 08/31/2016 - 20:44 नवीन
चिंचवड मध्ये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ही मते माझी आहेत आणी राहता

औरंगजेब
Wed, 08/31/2016 - 21:31 नवीन
ही मते माझी आहेत आणी राहता राहिला प्रश्न टिआरपीचा तर मला व्यक्तिशः त्याची गरज भासली नाही.आणी गरजही पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आजच एका नातेवाईकांकडे

औरंगजेब
Sun, 09/04/2016 - 22:58 नवीन
आजच एका नातेवाईकांकडे कोल्हापुरी पुडवडी खाल्ली काय सुरेखा चव होती हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुडाची वडी मंताय काय?

असंका
Tue, 09/06/2016 - 14:41 नवीन
पुडाची वडी मंताय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: औरंगजेब

यशवंत!! वादच नाही...

पिलीयन रायडर
Tue, 09/06/2016 - 20:52 नवीन
यशवंत!! वादच नाही... आम्चे अंबेजोगाई-लातुरचे लोक नेहमी यशवंतची बाखरवडी मागवतात. चितळेही आवडतेच, पण यशवंत खमंग आहे जास्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हॅलो!

बोका-ए-आझम
Tue, 09/06/2016 - 19:58 नवीन
मुंबईची स.पे. म्हणजे पार्ले पूर्व. अगदी नखशिखांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

ख्या ख्या ख्या खरं आहे

औरंगजेब
Mon, 09/26/2016 - 18:49 नवीन
ख्या ख्या ख्या खरं आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

एकदम. चितळ्यांच्या बाकरवडीला

मृत्युन्जय
Wed, 08/31/2016 - 17:52 नवीन
एकदम. चितळ्यांच्या बाकरवडीला तोड नाही. इतर कुठे चांगली बाकरवडी मिळत नाही असे काही आम्ही म्हणत नाही पण चितळे इज द बेस्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

चितळेंनी मशिनीवर बाखरवडी

रेवती
Tue, 09/06/2016 - 21:19 नवीन
चितळेंनी मशिनीवर बाखरवडी बनवायच्या आधी किंवा खरेखुरे सुके खोबरे, खसखस हे इनग्रेडियंटस असत तेंव्हाच्या बा व ची सवय झाल्यावर आताची त्यामानाने डावी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हे ठाणेवाले चितळेंकडे शिकले असतील.

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/01/2016 - 01:18 नवीन
तसंही पुणं विद्या बालनचं माहेरघर आहेच ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

हो ना, अजून दागिन्याने मढून

अभ्या..
Fri, 09/02/2016 - 14:47 नवीन
हो ना, अजून दागिन्याने मढून होर्डींगावर मिरवत असते जिथे तिथे पुण्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तुझं लक्ष कायम होर्डिंगवर

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 09/06/2016 - 18:06 नवीन
तुझं लक्ष कायम होर्डिंगवर अभ्याव, भालो खूब भालो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ह्यो क्रायटेरिया लावाचा

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/06/2016 - 18:26 नवीन
तर सगल्या हिरविनी पुन्यात येउन राह्तील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अशी आहेत तर ती ठिकाणं सगळी!

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/31/2016 - 16:05 नवीन
अशी आहेत तर ती ठिकाणं सगळी!
  • Log in or register to post comments

हुच्च प्रतिक्रिया....

माम्लेदारचा पन्खा
Wed, 08/31/2016 - 16:59 नवीन
अच्चं जालं तल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

या की कधीतरी ठाण्यात

खटपट्या
गुरुवार, 09/01/2016 - 02:06 नवीन
या की कधीतरी ठाण्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मामलेदार मिसळ विसरलात काय

Vidyadhar1974
Wed, 08/31/2016 - 19:37 नवीन
मामलेदार मिसळ विसरलात काय
  • Log in or register to post comments

नायतर काय मामलेदारचा उल्लेख न

खटपट्या
गुरुवार, 09/01/2016 - 02:05 नवीन
नायतर काय मामलेदारचा उल्लेख न केल्याबद्दल नीषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974

^^

प्रसन्न३००१
Fri, 09/02/2016 - 16:41 नवीन
^^ +१००० तीव्र निषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आहो मामलेदार आमच्या ह्रुद्यात

औरंगजेब
Sun, 09/04/2016 - 22:56 नवीन
आहो मामलेदार आमच्या ह्रुद्यात आहे. त्याचा वेउल्लेख करायची गरजच नाही हो कुठाल्याच आद्य ठाणेकरास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आम्ही मामलेदार हा हृदयाचा नाही,

बोका-ए-आझम
Tue, 09/06/2016 - 19:56 नवीन
तर पोटाचा विषय मानतो. हृदयाचा विषय असलेली मिसळ म्हणजे नाशकातली - मखमलाबादची पिंगळ्यांची आणि गंगेजवळ दादासाहेबची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: औरंगजेब

मस्त सुरु आहे खाद्ययात्रा

अजया
Wed, 08/31/2016 - 19:38 नवीन
मस्त सुरु आहे खाद्ययात्रा.ठाणे खरंच मस्त शहर आहे राहायला आणि खायला!
  • Log in or register to post comments

खादाडी @ ठाणे जुन्या आठवणी

आप्पा
Fri, 09/02/2016 - 12:39 नवीन
आता जिथे आमंत्रण आहे. मामलेदार जवळ तिथे १९७८ ते १९८० दरम्यान केतकर यांचे झुणका भाकरी केंद्र होते ८० पैशात झुणका भाकरी मिळायची. वालाचे बिरडे तिथे उत्तम मिळायचे. गोखले रोडला राजमाता नावाचे होटेल होते चांगले जेवण मिळायचे. स्टेशन समोर हातगाड्या लागायच्या. तिथे माजी उपमहापौर शरद कोळी यांची सुद्धा गाडी होती. खंडेलवालची मोनापली होती पण त्या माव्याच्या भानगडीत संपली. एस टी स्टँडसमोरचे स्टार, मामलेदार, प्रभात जवळ एक जिलेबीवाला ही प्रसिध्द ठि़काणे होती.
  • Log in or register to post comments

गोखले उपहारगृह म्हणजे वादच

संदीप डांगे
Tue, 09/06/2016 - 20:47 नवीन
गोखले उपहारगृह म्हणजे वादच नाय! अप्रतिम पदार्थ, माझे ऑफिस कार्यालयाच्या पुढच्या रस्त्यावर होते, त्यामुळे रोजचे खाणे होते इकडे. मराठी पदार्थ म्हणज उत्तमच. ताजे तळून द्यायचे, कोथिंबिरवडी, अळूवडी. हरभरा कबाब, लाजवाब! मला ठाणे कधीच आवडले नाही, पण 'काही ठिकाणी' खाण्यापिण्याच्या बाबतीत अव्वल!
  • Log in or register to post comments

मला ठाणे कधीच आवडले नाही

खटपट्या
Tue, 09/06/2016 - 22:15 नवीन
मला ठाणे कधीच आवडले नाही
नोटेड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

=)) =))

संदीप डांगे
Tue, 09/06/2016 - 22:28 नवीन
अ‍ॅण्ड आय विल स्टॅण्ड बाय दॅट!! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओके, आम्हाला नाशिक कधीच आवडले

खटपट्या
Mon, 09/26/2016 - 19:35 नवीन
ओके, आम्हाला नाशिक कधीच आवडले नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सॉरी, आम्हाला अकोला कधीच

खटपट्या
Mon, 09/26/2016 - 19:36 नवीन
सॉरी, आम्हाला अकोला कधीच आवडले नाही... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

औरंगजेब, माफ

बोका-ए-आझम
Tue, 09/06/2016 - 21:06 नवीन
जरा ठाण्यातल्या सामिष स्थळांबद्दल लिहितोय. रंगायतनमधली सोड्यांची खिचडी (एकेकाळी दर शुक्रवारी मिळायची. सध्याचं माहित नाही) आणि अभिरुची मधले खेकडे हे लाजवाब होते.
  • Log in or register to post comments

कात्रजचं सुगंधी दूध

रेवती
Tue, 09/06/2016 - 21:17 नवीन
कात्रजचं सुगंधी दूध पिण्याइतकी दुधाची आवड नाही पण आत्यानं आरेचं बाटलीबंद दूध प्यायला लावलं होतं. तुमच्या आठवणीतील उपहारगृहे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

खवय्या

आप्पा
Fri, 09/09/2016 - 21:54 नवीन
तीन पेट्रोल पंपाजवळ खवय्या हाॅटेल होते आता आहे का छान मराठमोळे पदार्थ मिळत होते
  • Log in or register to post comments

आता नाहीये. कधीच बंद पडलय ते.

प्रसन्न३००१
गुरुवार, 09/15/2016 - 12:36 नवीन
आता नाहीये. कधीच बंद पडलय ते. छान मराठमोळ्या पदार्थांसाठी घंटाळी मध्ये मेतकुट नावच हॉटेल चालू झालाय. महाराष्ट्र-भरातल्या प्रत्येक भागातील पदार्थ मिळतात. कोकणी, खानदेशी, वर्हाडी, कोल्हापुरी इ. पदार्थांना चव चांगली आहे आणि सर्विसपण उत्तम आणि तत्पर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आप्पा

या मेतकूट्चा

नाखु
Tue, 09/27/2016 - 16:33 नवीन
आगदी कुटाणा केल्याचे आठवतेय (ठाणे-डोंबोली) मिपाकरांनी ! शेवटी मेटाकुटीवाले स्वतः येऊन इथे लिहून गेले असेही आठवते. ता.क. मी हे मेतकूट पाहिलेले नाही फक्त घरी भाताबरबरोबर मेतकुट तूप अनुभवले आहे. आधिक माहीती लिंकाळे भाऊजीच देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न३००१

मेतकुटाचा कुटाणा

रंगासेठ
Tue, 09/27/2016 - 17:36 नवीन
आगदी कुटाणा केल्याचे आठवतेय (ठाणे-डोंबोली) मिपाकरांनी ! शेवटी मेटाकुटीवाले स्वतः येऊन इथे लिहून गेले असेही आठवते.
अगदी अगदी... बाकी खवय्या मधे जेवलोय एकदाच, चांगला अनुभव होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

शिवप्रसाद आणि शिवसागर

अत्रन्गि पाउस
Mon, 09/26/2016 - 21:43 नवीन
ह्या तील अनुक्रमे आलू गोभी आणि शिवसागर मधल्या सगळ्या बाल्टी डिशेश अहाहा
  • Log in or register to post comments

ठाणे पूर्वेला विजय स्नॅक्स

वेदांत
Tue, 09/27/2016 - 16:51 नवीन
ठाणे पूर्वेला विजय स्नॅक्स मधे वडापाव आणी पोहा-समोसा . तसेच डाल-पक्वान & कैलास मधे मिळणारा आईसक्रिम फलुदा.
  • Log in or register to post comments

ठाणे पूर्वेची आठवण काढून

वरुण मोहिते
Tue, 09/27/2016 - 18:00 नवीन
पाया सूप, खिमा पाव, भेजा फ्राय, यांचा उल्ल्लेख न केल्याबद्दल निषेध !!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा