काही ठिकाणे आणि माझ्या आठवणी -१

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
24 Aug 2016 - 2:56 pm

०१: ब्राम्हण सोसायटी -ठाणे

ब्राम्हण सोसायटी हा भाग गोखले रोड आणि महात्मा गांधी रोड ह्यांच्या कत्रीतला भाग .
ह्या भागाची आठवण म्हणजे माझी खेळ-शाळा, चिमणी पाखरे मंदिर
चिमणी-पाखरे हि बघायला गेला तर माझी पहिली शाळा. सकाळी ९ ते ११ .
एकाच वर्गखोली. एका बाजूला घसरगुंडी. म्हणजे वर्गातच.
दुसरे ठिकाण म्हणजे फडके बाईंचा चित्रकला क्लास. त्यावेळी आजच्या कर्वे हॉस्पिटल च्या बाजूला २ इमारती सोडून फडकेंचा वाडा होता त्या फडके बाई आमच्याच सरस्वती शाळेत बाळ वर्गाला शिकवायला होत्या त्या चित्रकला क्लास घ्यायच्या घरी . झोपडी , बगळा , होडी , आणि अशा इतर अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या आहेत. लहान असताना ह्या गोष्टींचा पण किती अप्रूप वाटती नाही ?

०२: तलाव-पाली -ठाणे

तलाव पाली म्हणजे सर्व ठाणेकरांचे हृदय. माझे पण. तलाव पाली ला लहान असतांना जायचो ते मुख्य म्हणजे हत्तीच्या गाडीत बसायला. आज जिथे स्टेशन वरून येणार उडाण पूल उतरतो तिथे पूर्वी एक चांगली बाग होती [ अजून पण आहे पण आता बागेचा बार झाला आहे] त्या बागेत हत्तीच्या आकाराची एक छोटी रेल्वे गाडी होती तीत बसायला मी जायचो . तसाच तलावपाळी ची बग्गी राऊंड , कोपऱ्यावरच्या विजय कुल्फी कडची पिस्ता कुल्फी , अशी खूप धमाल करायचो. अजून एक ठिकाण म्हणजे साई-कृपा हॉटेल, हे हॉटेल मला एकाच कारणामुळे आवडायचा तिथे सँडविच बरोबर भरपूर वेफर्स द्यायचे. बाकी मग तलाव पाली ला घेतलेले धनुष्य-बाण , गाडा दरवर्षी गणपती विसर्जन झाले कि घेतलेली मेणबत्ती वाली बोट , आदी अनेक गोष्टी आहेत

०३ : राजाजी रोड - डोंबिवली

४, समृद्धी सोसायटी हे माझे हक्काचे आजोळ. आई ची आई म्हणजे माझी आजी तिथे राहायची . दार शनिवारी आजोबा मला घ्यायला ठाण्याला यायचे. मग जलद लोकल पकडून डोंबिवली. आजी कडे पोचला कि मग कुरमुरे चिवडा आणि पार्ले जी अशी न्याहारी ठरलेली असायची. मग संध्याकाळी आई यायची. आजी कडे दोन धुणं वळत घालायच्या काठ्या होत्या त्या मी ट्रेन म्हणून खेळायला घ्यायचो. शनिवारी सांध्याकाळी पोलीस लाईन च्या मारुती चे दर्शन ठरलेले असायचे कधी कधी रेल्वे लाईन बाजूच्या गणपती मंदिरात पण जायचो. थानायला कशी हत्तीची गाडी तशी इथल्या बागेत मोराची गाडी होती . त्यावर पण राईड ठरलेली असायची.
मग रविवारी संध्याकाळी निघताना चणे- शेंगदाणे हि घ्यायचो . राजाजी रोड वर एक होता त्याचे च चणे शेंगदाणे मी खायचो . बाकी कुठलेच खायचो नाही. { एक टीप: बी-केबिन च्या इथे एक दाणेवाला बसतो त्याच्या कडचे शेंगदाणे फारच मस्त असतात }

बरेच दिवसात काही लिहिला नव्हता त्यामुळेच हा लेख लिहिला आहे. मिपा सदस्यांना विनंती आहे हि त्यांनी पण आपल्या आठवणी प्रतिक्रियांमध्ये नोंदवा.

यापुर्वी मी मिपावर प्रणवजोशी नावाने लेखन करत होतो.परंतू संकेताक्षर विसरलो.काही तांत्रिक कारणामुळे संकेताक्षर पुन्हा मिळवता येत नाहीये. त्यामुळे हा औरंगजेब आयडी घेतला आहे.
यापुढे सर्व लेखन याच आयडीवरुन होईल.

रेखाटन

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Aug 2016 - 3:02 pm | माम्लेदारचा पन्खा

त्रिवार वंदन.. आणि हो...मी पहिला !

तुम्हाला कुर्निसात म्हणायचे आहे का? :-)

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Aug 2016 - 4:46 pm | माम्लेदारचा पन्खा

औरंगजेबासमोर ख-या मराठ्यांनी कधीही कुर्निसात केलेला नाही !

औरंगजेब's picture

24 Aug 2016 - 6:05 pm | औरंगजेब

खरे आहे. का कोण जाणे पण औरंगजेब आयडी घ्यावासा वाटला

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Aug 2016 - 9:11 pm | माम्लेदारचा पन्खा

बाकी संगीताच्या बाबतीत खूपजण असतात औरंगजेब !

अभ्या..'s picture

24 Aug 2016 - 9:47 pm | अभ्या..

हम्म, एखादाच अझरुद्दीन.

औरंगजेब's picture

25 Aug 2016 - 10:12 am | औरंगजेब

आहो कोणी कशाला मीच आहे

तुम्ही ह्युमरचे पण औरंगजेब आहात हे कळले. धन्यवाद.

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Aug 2016 - 11:57 am | माम्लेदारचा पन्खा

आणि करा औरंगजेबाचा चार्ली चॅप्लिन !

अभ्या..'s picture

27 Aug 2016 - 12:04 pm | अभ्या..

हेहेहेहेहे.
होतय आपॉप.

मी-सौरभ's picture

24 Aug 2016 - 3:03 pm | मी-सौरभ

आपले हार्दिक स्वागत!!

औरंगजेब's picture

24 Aug 2016 - 3:45 pm | औरंगजेब

आभार

सतीश कुडतरकर's picture

24 Aug 2016 - 3:58 pm | सतीश कुडतरकर

kaay aahe he

औरंगजेब's picture

24 Aug 2016 - 4:04 pm | औरंगजेब

काही विशेष नाही असच आपल हाताला खाज आणी मेंदुला सुज आली म्हणुन लिहील. :-)

औरंगजेब's picture

24 Aug 2016 - 4:04 pm | औरंगजेब

काही विशेष नाही असच आपल हाताला खाज आणी मेंदुला सुज आली म्हणुन लिहील. :-)

एस's picture

24 Aug 2016 - 4:10 pm | एस

छान आठवणी आहेत.

थोड्या जुन्या आठवणी
पुर्वी भानुशाली हाॅस्पिटल जवळ तांबे हाॅटेल होते तिथे साबुदाणा वडा बटाटापुरी उत्तम मिळायचे
अशोक टॉकीज जवळच्या टिपटाॅपसमोर छाया स्विट होते तिथे बटाटे वडा उत्तम मिळत असे
स्टेशन समोर गोखले उपहारगृह होते आता गोखले रोडला छोटे आहे उत्तम मराठी पदार्थ व पियुष
कॅसेल मिल पर्यंत टांगे जायचे आणि तिथे मिल होती बर का

स्वाती दिनेश's picture

24 Aug 2016 - 6:03 pm | स्वाती दिनेश

हॉस्पिटलजवळ एक तांबे आहार भुवन होते आणि दुसरे तांबे पंडित हॉस्पिटलच्या शेजारी, तलावपाळीवर..
स्वाती

अभिदेश's picture

26 Aug 2016 - 10:30 pm | अभिदेश

शेजारच्या हॉटेलचे नाव तांबेज होतं. बाकी 'पूर्वीचं ठाणे आता राहिले नाही हो ' .... :-)

स्वाती दिनेश's picture

24 Aug 2016 - 6:04 pm | स्वाती दिनेश

छाया स्वीट्स- अप्पा कजबजेंचं.. त्यांची कचोरी प्रचंड फेमस होती.
(जुन्या ठाण्यात पोहोचलेली) स्वाती

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Aug 2016 - 10:45 pm | माम्लेदारचा पन्खा

स्टेशन रोडचं ठाणा स्वीटस्,स्टार हॉटेल,जुनं प्रशस्त कोपिनेश्वर मंदिर,प्रभात टॉकिज आणखी असं बरंच काही...

लहानपणीच्या आठवणि फार भारि वाटतात. आता कितिहि संपन्नता असलि तरि ति मजा नाहि.
लहानपण देगा देवा ... म्हटलेच आहे.

गामा पैलवान's picture

27 Aug 2016 - 3:06 am | गामा पैलवान

तांबेजच्या बाजूला व्हिडियो गेम पार्लर होतं. माझी शाळा मो.ह.विद्यालय. शाळा सुटल्यावर कारटी व्हिडियो गेम बघंत थांबायची.

तलावपाळीवर द्रोणांत कुल्फी मस्त मिळायची. रात्री जेवणं झाल्यावर शतपावली वा भटकंतीला तिथं गेलं की खाणं व्हायचंच. मजा यायची.

आईस फ्याक्टरी म्हणून एक बर्फाचा कारखाना होता गोखले रोडावर. आजूनही आहे का?

गोखले रोडावरचं यशवंत भोजनालय प्रसिद्ध होतं. कारण की त्यावर पाटी होती : यशवंत भोजनालय - फक्त राहण्याची व्यवस्था !

गोखले रोडावर गोखले वाचनालय होतं. त्यात जाण्यासाठी हमरस्त्यावरून एका इमारतीत शिरून छोटा बोळ पार करावा लागे. त्या इमारतीच्या खाली लुगड्यांचं दुकान होतं. बोळाच्या दोन्ही बाजूंस लुगडी लटकत असंत. त्यामुळे वाचनालयाच्या आतबाहेर जाणारा माणूस नऊवारी लुगड्यांच्या दुकानात शिरतोय असं दिसे. आता नऊवारी लुगडीच मिळेनाशी झाली ! कालाय तस्मै नम: !!

नेताजी सुभाषपथावर त्रिखंडप्रसिद्ध मामलेदार मिसळ मिळते. तिच्या समोर रामकृष्ण का बाळकृष्ण नावाचं छोटं उपाहारगृह आहे. तिथे काबुली चण्यांच्या आमटीत घातलेला सामोसा मिळे. अतिशय चवदार होता. थोडं पुढे आलं की कुटिरोद्योग येतं. तिथे हॉटेलात साबुदाणा वडा छान मिळे. आजून पुढे आलं की डावीकडे छोटी पोलीस बाह्यचौकी (आउटपोस्ट) आहे. त्याच्या समोर जिलबी आणि फाफडा (आजूनही) मिळतो. गोडाशी वावडं असल्याने कधी गेलो नाही. मात्र नेहमी गर्दी पहात आलोय.

आतल्या बाजूला घाऊक बाजार बसतो. त्यापुढे स्टेडियमच्या एका अंगास मटण आणि मच्छी मार्केट आहे. हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय होऊ शकेल.

जुन्या ठाण्याच्या आठवणी अखंड झऱ्यावाणी आहेत. संपता संपणार नाहीत. म्हणूनच इथे थांबतो.

-गा.पै.

अलका सुहास जोशी's picture

30 Aug 2016 - 9:45 pm | अलका सुहास जोशी

@ स्वाती
कजबजेंचं छाया स्वीट मस्त होतं. थांकू रिमाईंडून दिल्याबद्दल.
सध्या गोखलेंची आणि मोघेंची आणि भगवानची मिसळ बेश्ट आहे. मामलेदार झेपेबल नाही म्हणून.
फ्रँकी,नूडल्स,स्पागेती,मोमोज यांचं गोत्र आपल्याशी नायच जमलं बुवा.
औरंग्या....ठाणेवालोंको खाणेका बहाणा चाहिये.कीप पोस्टींग लेका.

धन्यवाद आणी मिपावर स्वागत आई.

खटपट्या's picture

31 Aug 2016 - 4:22 am | खटपट्या

खपली काढलीत राव. तुम्ही जी ब्राह्मण सोसायटी म्हणता आहात तीथे पुढे उमा निळकंठ व्यायामशाळा आहे. तीथल्या मैदानात खूप खेळलोय.
गोखले रोडला पूर्वी नौपाडा मिडल स्कूल होते ते आता नाही. :( तीथल्या दुकानदाराला विचारले की इथली शाळा कुठे गेली तर माझ्याकडे बाबा आदमच्या काळातून आल्यासारखा बघत राहीला. खूप गोड आठवणी आहेत त्या शाळेतल्या.
बाकी ठाणे बाजारपेठ अजूनही जुना बाज टीकवून आहे.
मासे पकडण्याचा गळ कुठे मिळेल माहीत आहे का कोणाला? अशोक टॉकीजच्या खाली एक बोहरी बसतो तो फक्त अस्सेच आयटम विकतो.
लहानपणी मी कोपीनेश्वर मंदीरात हरवलो होतो.
तलावपाळी, रंगायतन म्हणजे आमचा अड्डा.
नौपाड्याचे चँपीयन स्पोर्टस हे एकमेव खेळसाहीत्य मिळण्याचे ठीकाण होते. गणपूले नंतर माहीत झाले.
लेखात उल्लेख केलेली बाग आहे त्यात एक आगगाडी, रॉकेट होते. आता माहीत नाही.
अजून बरंच काही आहे.

चौकटराजा's picture

31 Aug 2016 - 7:34 am | चौकटराजा

आपली एक "शाळा" चित्रपटातल्या स्टाईलची नाजूक आठवण ठाण्यात नौपाडा भागात अजूनही रहाते. अडचड अशी की ती आपली आठवण आहे आपण तिच्या खिजगणतीतही नाही. घण्टाळी भागात आपले लाडके संगीतकार ओ पी नय्यर रहात होते. ते जिच्याकडे रहात त्या राणी नाखवा ला एकदा तरी भेटण्याचा मानस आहे. बघु या काळ काय ठरवतो.

छान धागा. राजाजी रोडला पूर्वी काकू रहायची. सुट्टीत तिच्याकडे रहायला गेलं की मजा यायची कारण पूर्वी फक्त तिच्याकडे व्हिएच एस प्लेअर होता. सिनेमांची लायब्ररी लावली की सुट्टी मजेत जायची. घराजवळ एक सौधिंडियन लोकांचे देऊळ होते. तेथे येणार्‍या महिला कपाळावर अंगारा लावायच्या. पांढर्‍या साड्या व ओल्या केसांचे केसांची विशिष्ठ वेणी घालून यायच्या ते आठवले.

निश's picture

26 Sep 2016 - 7:15 pm | निश

aurangjeb saheb Lekh aawadala .... there is problem in my computer so I am not able to write in Marathi.... sorry for it. Majha Balpan Mandvikar wadi nupadyala gela asalyamule gokhale road and brahman society and ice factory manjhe dil ki baat hai. Good asel lekh yeu dya

खटपट्या's picture

26 Sep 2016 - 7:39 pm | खटपट्या

नौपाडा, ब्राह्मण सोसायटी, तलावपाळी हाच भाग पहीले हार्ट ऑफ सीटी वगैरे होता नंतर बाकी भाग वाढत गेला...

वरुण मोहिते's picture

26 Sep 2016 - 7:29 pm | वरुण मोहिते

ठाण्यात प्रत्येक ठिकाणी खादाडी केली आहे. गाडी वर खाण्या पासून पासून ते बऱ्याच हॉटेल मध्ये. कोपरी ते मुख्य ठाणे तिथपासून घोडबंदर पर्यंत .चांगला धागा ठाणेकरांनी भर टाकावी.