सन २०१२-१३ मध्ये मी राज्यसेवा परीक्षेसाठी क्लास लावल्यामुळे पुण्यात राहायला होतो. त्यावेळच्या काही आठवणी.
माझा क्लास म्हणजे नव्यापेठेतील चाणक्य मंडळ परिवार.आणी मी रहायचो ते पेरुगेटाजवळ. पेरुगेटचवळचे पुना बोर्डिंग म्हणजे माझी जेवणावळ. रोज तेथुन जेवण आणणे आणी खाणे यामुळे तेथील लोकांची छान(च) ओळख झाली.
पेरुगेटवरुन मागे ज्ञानप्रबोधीनीकडे गेलं की त्या कॉर्नरला आनारसेवाला समोसे वाला आहे.त्याचे समोसे अख्या जगात ( पुणेकरांच्यामते)फेमस आहेत. बाजुलाच A1 का काय ते नाव आसलेला ज्युसवाला आहे. त्याचाकडे ज्युस/मिल्कशेक फार छान मिळतात. बाकी बादशाहीथाळी बद्दल मी बोलणे योग्य नव्हे.
क्लासच्या समोर फार सुंदर चहाही मिळायचा.त्याच्याचकडे सकाळी गेल की शिरा/सांबार+पोहे पण मिळायचे. कौल्डकॉफीपण सुमारे ३० रुपयाला मिळायची.
घरातील इतर सटरफटर वस्तुंकरता मात्र मी सरळ टिळकरस्त्यावरच्या ग्राहकपेठेत जायचो.बिर्याणी फारशी आवडत नसल्याने एसपी बिर्याणी हाउसला जायचा प्रसंग कधीच आला नाही.
बाकी टाईमपाससिठी आर डेक्कन मॉल , अ.ब.चौकात जाऊन पुस्तके विकत आणणे., कोथरुडचे जोशी रेल्वे म्युझियम , कात्रज , सारसबाग आसे अनेक पर्याय मी वापरलेत.
English-vinglish हा एकमेव चित्रपट मी आर डेक्कनला सकाळी८ च्या ब्रेकफास्ट शोला पाहिला तेसुद्धा फक्त ९० रुपयात.
बाकी क्लासमधल्या आठवणी म्हणजे दर बुधवारी श्री धर्माधिकारी सरांचा तास पत्रकार भवनाच्या बाजुला आसलेल्या एका व्रूध्दाश्रमात भरत असे. खुप मजा यायची तासाला.
जानेवारी ७-१४ भरणार्या आभ्यास महौत्सावात पण खुप दिग्गज लोकांची व्याख्याने ऐकायाला मिळाली. यापैकी किही तास हेतर चक्क केसरीवाड्यात होत. टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागी आम्ही सगळे आहोत हे फिलींगच छान वाटे.
तुमच्याकाही आठावणी आहेत का पुण्याच्या मला त्या वाचायला आवडतील तेव्हा पतिसाद मात्र अवश्य द्या.
टिप- काही ठीकाणे ही लेखमाला मीपुढच्या ३ महिन्यासाठु बंद करतो आहे.फॉकलंड युद्धाबरची अर्धवट सोडलेली मालिका पुर्ण करायचा माझा मानसइहे त्याचा पुढचा भाग पुढील शनिवारी दि.१४-जाने-२०१७ला प्रकाशित होईल. त्यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4936
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्याही काही पुण्याच्या
जरुर सांगा बाकी परत कट्टा
In reply to आमच्याही काही पुण्याच्या by प्रचेतस
पुण्यात करु.
In reply to जरुर सांगा बाकी परत कट्टा by औरंगजेब
आम्ही पुणे सोडले अन तुम्ही पुण्यात आलात :)
जीवाला खा .. जीवाला खा .. जीवाला खा ..
In reply to आम्ही पुणे सोडले अन तुम्ही पुण्यात आलात :) by कैलासवासी सोन्याबापु
अहो आग्रह वगैरे काय उगीच
In reply to जीवाला खा .. जीवाला खा .. जीवाला खा .. by आनंदयात्री
:)
बघतो ताई थोडे रुटीनला लागू दे
In reply to :) by अजया
+१
In reply to :) by अजया
+२
In reply to +१ by नंदन