खेड्यामधले घर कौलारू...

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in विशेष
8 Mar 2016 - 12:08 am
महिला दिन

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

नेहमीची प्रवासी ठिकाणे सोडून अनवट जागा शोधायला आम्हाला आवडते. जरा शनिवार रविवारला जोडून सुटी आली किवा सुटी घेतली की चार दिवसाचे कपडे बॅकपॅकमध्ये भरून गाडीत टाकायचे. थोडा शिधा आणि शिदोरी घ्यायची. तहानलाडू भूकलाडू घ्यायचे आणि भटकायला जायचे हा आमचा आवडता छंद!

.

आल्प्स मध्ये अशी अनेक सुंदर स्थळं लपलेली आहेत आणि त्यातही ऑस्ट्रीयन आप्ल्समध्ये.. मग फारवेर्फन नावाच्या नकाशातला एक ठिपका असणार्‍या एका चिमुकल्या खेड्यातल्या गेर्टा आजीच्या फार्महाउसवर आम्ही नेहमीप्रमाणे फोनवर बुकिंग करतो. हे अहोननेग्गर कुटुंब आता आमचे इतके चांगले परिचित झाले आहेत की फोनवर नाव सांगताच किती दिवसांनी आपले सुहृद भेटल्यासारखे बोलणे होते. २००८ साली आपल्या मिपा भ्रमणमंडळाच्या सहलीच्या निमित्ताने ह्या कुटुंबाची ओळख झाली. पावणेसहा फुटाच्या आसपास उंची असलेली. थोराड बांध्याची, पिंगटसोनेरी केसांची, प्रेमळ निळ्या डोळ्यांची आणि मंजुळ आवाजाची गेर्टा आजी आणि तिला साजेसे दणकट सहाफूट उंच, शेतात राबून रापलेला लाल गोरा रंग असलेले आणि आपल्या गुरावासरांमध्येच जास्त रमणारे हसतमुख पीटर आजोबा!

.

गेर्टा आजी, पीटर आजोबा त्यांचे घोडे, बदकं, मांजरं, नातवंडं आणि त्यांचं डोंगराच्या कुशीत लपलेलं सुंदरसं घर आणि त्या घराचं घरपण.. सगळ्याच्याच आम्ही प्रेमात पडलो आणि तिथे पुनःपुन्हा जात राहिलो आहोत. तिच्याकडे जागा उपलब्ध नसली तर ती आजूबाजूला राहणार्‍या तिच्या परिचितांकडे आमची सोय करते पण तिला भेटून जाच, असेही आवर्जून सांगते. मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा पीटर आजोबांच्या पायाला लागलं होतं. त्यातून ते बरे होऊन आता शेतावर कामही करू लागले होते. त्या घराच्या व्हरांद्यात सकाळी उभं राहिलं की समोर दिसतो तो काळसर हिरवे पाइन्स अंगावर ल्यालेला, शेळ्यामेंढ्या, गाईंना आपल्या हिरव्या मांडीवर बागडू देणारा आल्पस, त्यातून वर डोकावणारा बालसूर्य आणि त्याची सोनेरीलाल प्रभा! खाली अंगणातल्या गोठ्यातून एका हातात दुधाची चरवी आणि दुसर्‍या हातात चारा घेतलेले पीटर आजोबा तोच चार्‍याचा हात उंचावून आपल्याला 'गुटन मॉर्गन' करतात आणि मॉर्निंग नुसती गुडच नाही तर सुंदर होऊन जाते.

.

आजीचे घर तिमजली आहे. सर्वात खालच्या मजल्यावर ती दोघे आणि त्यांची मांजरं राहतात. तेथेच ब्रेकफास्टसाठी प्रशस्त हॉल आहे आणि वरच्या दोन्ही मजल्यांवर अपार्टमेंट केली आहेत आणि ती अपार्टमेंट्स आणि खोल्या हॉलिडे होमसारख्या भाड्याने देतात. पुढे मोठे अंगण आणि त्या अंगणात कोंबड्या, बदके बागडत असतात. एका भल्यामोठ्या लाकडी ओंडक्याची डोण केली आहे आणि तीत ह्या प्राण्यांसाठी पाणी असते. कोपर्‍यावर गोठा आणि तबेलाही आहे. गोठ्यात चार पाच दुभत्या गाई आहेत आणि तबेल्यात शेपट्या उडवत असलेले पुष्ट उमदे, देखणे घोडेही आहेत. मागच्या अंगणात सफरचंदाची, पेअरची झाडे आहेत आणि त्यांच्या फुलांचा मंद दरवळ किवा फळांचा गोड सुवास कोंदलेला असतो. मागच्या डोंगरातून एक ओढा वाहत येतो त्याचं खळखळ गाणं सतत चालूच असत. फारवेर्फन हे सगळं गावच मुळी डोंगरात आहे. सगळेच उंचसखल कच्चे, पक्के रस्ते! सरळ रस्ता नाहीच. एक चढण चढायची आणि दुसरी उतरायची...एकच ट्रॅक असलेलं एक अगदी लहानसंस रेल्वे स्टेशनही आहे. ते क्रॉस करून समोरच्या चढणीवरून मोठी पाणचक्की येईपर्यंत जायचं. तीच त्यांच्या घराकडे जाण्याची मोठ्ठी खूण!

.

.

..

पलीकडच्याच घरात तिचा मुलगा, सून आणि नातवंडे राहतात. तर थोडे खाली उतरून गेले की मुलीचे घर आहे आणि कोपर्‍यावरच्या घरात दुसरा मुलगा राहतो. सगळे एकमेकांना धरून आहेत आणि खूप लोकं आले तर सगळे आजीच्या मदतीला येतात. एरवी आजी आणि तिची धाकटी सून हे हॉलिडे होम चालवतात. आजोबा शेतात आणि मुले आपापल्या उद्योगात असतात. अंगणाच्या एका टोकाला गेलं की समोर दिसतो तो 'व्हेअर इगल्स डेअर' ह्या चित्रपटामधला तो सुप्रसिध्द होहवेर्फन कासेल!

.

फारवेर्फन हे इतकं चिमुकलं गाव आहे की संध्याकाळी सहा/साडेसहा वाजताच सगळं बंद होऊन जातं. हे माहित असल्याने डाळ, तांदूळ, फोडणीचे साहित्य, सूपांची पाकिटे, पास्ता, फ्रोझन पिझ्झा असे सगळे बरोबर घेऊनच जातो आम्ही. दुसर्‍या दिवशी सक्काळी तिच्या घरच्या गाईंचे दूध, अंडी, दारची सफरचंदे, तिच्या भावाच्या बेकरीतले गरमगरम पाव असा भरपेट नाश्ता करून बाहेर पडायचे हे आमचं तिथलं रुटिन.. बाहेर पडताना तिची मांजरं पायात लुडबुडतात. त्यांना गोंजारल्याशिवाय, त्यांचे लाड केल्याशिवाय आपल्याला बाहेर पडू देत नाहीत. "अगं, आता तुम्ही ओळखीचे झालात ना, लाडात येतात ती..." आजीचे उत्तर तयारच असते. एका उन्हाळ्यात आम्ही त्यांच्याकडे गेलो असता तिथल्या अंगणात एक शिंगरू दिसले. "हा नवा मेंबर आमचा..आमची घोडी व्याली आत्ता दोन आठवड्यांपूर्वी, बघ कसं गोंडस आहे ते." त्यांचा एक घोडा भारतात विकला आहे, बंगलोरला. तेव्हापासून भारताबद्दल ह्यांना विशेष प्रेम!

.

एकदा गावात कसलीशी मिरवणूक होती. त्या मिरवणूकीतले हे अहोन्ननेगर मानकरी होते. अंगणात बग्गी सजवली गेली. तबेल्यातले घोडे आणून तिला जोडले, त्यांना झुली घातल्या, गळ्यात रंगीत माळा घातल्या. पीटर आजोबा त्यांच्या पारंपारिक पोषाखात तयार होऊन बग्गीत चढले. मिरवणूक बघायला मुख्य रस्त्यावर उभे रहा असं सांगून निघून गेले. खाली दूरवर दिसत असलेल्या चर्चच्या प्रांगणात रंगीत जत्रा फुललेली मुख्य रस्त्यातल्या चौकातूनही दिसत होती. थोड्या वेळाने शिंग फुंकल्याचा आवाज ऐकू आला. मिरवणूक सुरू झाली. अनेक सजलेल्या बग्ग्या, पारंपारिक वेषातले स्त्रीपुरूष आणि मुलेही त्या मिरवणूकीत सामील झाली होती. रस्त्यावरच्या पदपथावर दोन्ही बाजूंना लोकांनी कौतुकाने ती मिरवणूक पहाण्यासाठी दाटी केली होती. एकेक बग्गी येत होती. पीटर आजोबांची बग्गी आल्यावर त्यांनी आमच्या दिशेने हात उंचावला. नंतर बग्गीतून उतरून काही स्वार पायउतार झाले आणि त्यांचा रुटमार्च सुरू झाला. नंतर लक्षात आले की पायउतार झालेले बरेचसे आजोबाच होते आणि ते सगळे झेंडे, बिगुले, फ्लूट, ट्रंपेट असे काय काय घेऊन संचलन करत होते आणि बग्गीच्या घोड्याचे कायदे बहुतेक तरुणांच्या हातात होते. तरुणाईकडे, पुढच्या पिढीकडे आपला वारसा सोपण्याचा तो संकेत असावा, असं आपलं ते दृष्य पाहून मला वाटलं. पीटर आजोबांना आम्ही तिथे थांबून एवढुशा गावातली ती मिरवणूक पाहिल्याचा फार आनंद झाला आणि आम्हाला तो आनंदाचा ठेवा मिळाल्याचा आनंद झाला होता. आमच्या ओळखीची मैत्री कधी झाली ते आमचं आम्हालाच कळलं नाही. आपला डेरा ह्या फार्महाउसवर टाकायचा आणि मग साल्झबुर्ग, हलाइनच्या सॉल्टमाइन्स, हिमगुंफा, लाइष्टनष्टाइनचा धबधबा.. इगल्सनेस्ट एक ना दोन अशी मनसोक्त भटकंती करायची अशी आम्हाला आता सवयच लागली आहे.

.

.

आल्प्सच्या कुशीतलं, निसर्गाचं भरभरून देणं लाभलेलं, अजून कोणाच्या फारसं डोळ्यात न आल्यामुळे अगदी अनाघ्रात असलेलं हे साल्झबुर्ग प्रॉविन्समधल्या पोंगाव जिल्ह्यातलं बिशोफहोफनच्या जवळ असलेलं अगदी लहानसं तुलनेने तसं अप्रसिध्दच गाव! अगदी डोंगराच्या खांद्याकुशीवर वसलेलं असल्याने गावात सरळ रस्ता नाहीच. एका घरातून दुसर्‍या घरात जरी जायचं असेल तरी एका चढावरून चढत जायचं आणि दुसर्‍या बाजूने उतरायचं. घरं सगळी लाकडी, कौलारू आणि घरांचे वर्‍हांडे रंगीत फुलांनी आणि खिडक्या लेसच्या, कलाकुसरीच्या पडद्यांनी सजवलेल्या! लाकडी, बुटकी कुंपणे किवा मग तारांचे बॉक्स करून त्यात लहान लहान दगड भरून अगदी कलात्मकतेने तयार केलेली.. अशा ह्या गावातून चक्कर मारायलाही इतके प्रसन्न वाटते. फारवेर्फन, डॉर्फवेर्फन असे ह्याचे दोन भाग आहेत. हे एवढसं गाव पाचव्या शतकापासून नोरिकमच्या राज्यात आहे. आठव्या शतकापासून रुपर्ड ऑफ साल्झबुर्गच्या अधिपत्याखाली रीतसर ख्रिश्चॅनिटीची सुरुवात झाली आणि साल्झबुर्गच्या आर्चबिशपकडे सन १३९८ पासून ह्याची मालकी आली. येथले चर्च म्हणजे दगडी बांधणीचे, पुरातन तरीही मजबूत असे १४व्या शतकातले फारकिर्श आणि सिबनम्युलं मुझेउम म्हणजे सेवन मिल्स ओपन एअर म्युझिअमही पाहण्यासारखे आहे. तेथल्या ग्रेन नेचर ट्रेल मध्ये आल्प्समध्ये पेरली जाणारी स्थानिक धान्यं, दळणाची वेगवेगळी तंत्रं, पाव बनवण्याच्या विविध पध्दती, त्याबरोबर असणार्‍या रुढी, परंपरा यांची रोचक पध्दतीने ओळख होते. नितळ निळसर हिरवे पाणी घेऊन वाहणार्‍या साल्झाख नदीच्या काठावर वसलेलं ह्या अटकर, टुमदार गावात अजून काय बघायचं? असं विचारायचंच नसतं कारण काही प्रसिध्द असं बघायला आपण इथे आलेलेच नसतो. निसर्गाच्या कुशीत, स्वत:शी संवाद करायला, गेर्टा आणि पीटरला त्यांच्या सगळ्या घरालाच भेटायला इथे यायचं असतं.

..
..

.

एका सुटीत असंच परत एकदा आप्ल्सला आणि गेर्टा आणि पीटरला भेटायला जाण्यासाठी फोन फिरवला तर पीटर आजोबा शेतात काम करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा मोठा झटका आला आणि त्याच मातीत ते मिसळल्याचं समजलं, सुन्न व्हायला झालं. आता परत जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा एका हातात चरवी आणि दुसरा हात उंचावून गुटन मॉर्गन करणारे हसतमुख पीटर आजोबा नसतील ह्या विचारांनी उदासायला होतं..

.
गेर्टी व पीटर सून व नातीसमवेत

(चित्र-किलमाउस्की)

https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Mar 2016 - 1:33 pm | सविता००१

काय मस्त गाव आहे गं.. आणि वर्णन करायला तुझी सिद्धहस्त लेखणी.
मजा आ गया. सवडीने परत निवांत वाचेन

क्या बात हैं स्वातीताई! मस्त.

स्मिता.'s picture

8 Mar 2016 - 2:00 pm | स्मिता.

वर्णन वाचून खूपच प्रसन्न वाटलं, मनातल्या मनात ठरवलं की आयुष्यात कधीतरी या घरात जायचं! पण पीटर आजोबांबद्दलचं वाचून वाईट वाटलं.

मन्जिरि's picture

8 Mar 2016 - 2:25 pm | मन्जिरि

तुमच लिखाण नेहमीच छान असत

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 6:21 pm | प्रीत-मोहर

हे आज्जी आजोबा आणि त्यांच भलं मोठं कुटुंब अतिशय आवडल.

अतिशय सुंदर आणि आज्जी आजोबांचे घर सुद्धा आवडले. आता तु सांगितलेल्या ठिकाणी जायचे असेल तेव्हा ह्यांच्याकडेच राहु. तुझ्याकडुन सगळी माहिती काढुन घेईल मी आधीच. :P

पद्मावति's picture

8 Mar 2016 - 10:07 pm | पद्मावति

मस्तं लेख. किती छान गाव आणि लोकं. सुंदर वर्णन केलं आहेस.
पण शेवटी पीटर आजोबा :(

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 11:48 am | वेल्लाभट

कसलं सही आहे हे सगळ्ळं !
वाह!

सो पीसफुल.

काय सुरेख गाव आहे … अब हमकोभी उधर होना मंगताय :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2016 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! बॅग भरून लगेच तिकडे जायला निघावे असे वाटतेय !

मोदक's picture

9 Mar 2016 - 12:25 pm | मोदक

सुंदरलेख.

गदिमांची कविता आठवली.

स्मिता श्रीपाद's picture

9 Mar 2016 - 12:59 pm | स्मिता श्रीपाद

काय गोड लिहिलय्स...मस्तच

पियुशा's picture

9 Mar 2016 - 1:00 pm | पियुशा

जावे स्वप्नाच्या गावा :)

सुमीत भातखंडे's picture

9 Mar 2016 - 1:20 pm | सुमीत भातखंडे

मस्त गाव आणि चित्रदर्शी वर्णन.

सस्नेह's picture

9 Mar 2016 - 2:49 pm | सस्नेह

फोटो पाहून आणि वर्णन वाचून सासें रुक गई सीनेमे !

हाहा's picture

9 Mar 2016 - 4:48 pm | हाहा

अगदी स्वप्नातल्या सारखं गाव दिसतंय.

पैसा's picture

9 Mar 2016 - 5:42 pm | पैसा

अप्रतिम लिखाण आणि फोटो! बघूनच खूप शांत वाटतंय!

प्रश्नलंका's picture

9 Mar 2016 - 5:56 pm | प्रश्नलंका

काय सुंदर गाव आहे !! मस्तच फोटो आणि तुझी लेखनशैली सुद्धा. मी दोनदा वाचला लेख :)

नूतन सावंत's picture

9 Mar 2016 - 6:47 pm | नूतन सावंत

स्वाती,सुरेख वर्णन आणि अप्रतिम प्रकाशचित्रे.सुरेख गाव,त्यातले कौलारू घर. मात्र पीटर आजोबांची दुखद बातमी वाचून गेर्टा आजीबद्दल वाईट वाटले.

पिलीयन रायडर's picture

14 Mar 2016 - 3:58 pm | पिलीयन रायडर

अगदी हेच म्हणते..

काश ऐसा कोई मंजर भुसारी कॉलनी में होता...असेच वाटून गेले हा लेख वाचून. खूप छान!

मधुरा देशपांडे's picture

11 Mar 2016 - 4:21 pm | मधुरा देशपांडे

या भागात जायचे ठरले की इथेच जाणार हे नक्की केलंय आता. सुंदर लेख.

पूर्वाविवेक's picture

14 Mar 2016 - 4:16 pm | पूर्वाविवेक

परदेशातील खेड्यातल घर आवडल. पीटर आजोबांनी मनात घर केल. लेख सुंदर आणि फोटो तर फारच देखणे.

सुंदर! छान लेखन! तुमच्या लेखनशैलीमुळे तुमच्याबरोबर आम्हीही भटकंती करत आहोत असेच वाटते!

जुइ's picture

19 Mar 2016 - 4:26 am | जुइ

अतिशय सुबक सुंदर गाव तसेच प्रेमळ आजी आजोबा आवडले! spring

स्वप्नातलं गाव जिथे जाता येतं , राहता येतं, खय्रा यक्ष यक्षीना भेटता येतं.

Maharani's picture

24 Mar 2016 - 11:11 pm | Maharani

कसलं सुंदर गाव...

सुधीर कांदळकर's picture

25 Mar 2016 - 6:50 pm | सुधीर कांदळकर

गाव जास्त सुंदर, की लेखन की चित्रे असा प्रश्न पडला. धन्यवाद.

रेवती's picture

26 Mar 2016 - 3:55 am | रेवती

प्रचंड गोड चित्रे आहेत. त्याला साजेसे वर्णनही! पीटर आजोबा निसर्गाशी किती एकरूप झाले होते याचे उदाहरण आहेत.
आजी आवडली.

एस's picture

26 Mar 2016 - 8:13 am | एस

सुंदर!

मितान's picture

26 Mar 2016 - 9:50 pm | मितान

अप्रतिम !!!

मितभाषी's picture

28 Mar 2016 - 11:34 am | मितभाषी

व्वा अप्रतिम !!!!!