भ्रमणगाथा -६ हिमगुंफा !

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
14 Nov 2008 - 2:33 am

याआधी: भ्रमणगाथा - ५

आज सकाळीच हिमगुंफा पहायला जायचे होते त्यामुळे लवकरच उठलो.पडदे बाजूला सारल्यावर आपसूकच अऽहा आले!योहानाचे घर डोंगराच्या कुशीत, वळणावळणांची वाट, दारात असलेलं सफरचंदाचं झाडं,उजव्या हाताला हिरवेगार मखमालीचे आवार, त्यात चरणार्‍या पुष्ट गाई, त्यांच्या गळ्यातल्या किणकिणत्या (त्या कोणत्याशा सिनेमामुळे सुप्रसिध्द झालेल्या)घंटा.. पलिकडेच दाणे टिपणार्‍या कोंबड्या,वार्‍यावर डोलणारी रंगीत गवतफुले, मागच्या बाजूला उंचचउंच आल्प्स, शिशिररंगात न्हालेली ती केशरीपिवळी झाडं,थोडी वर नजर गेल्यावर दिसणारे हिरव्या शेंड्यांचे पाइन्स आणि अजून वर पाहिलं की त्या हिरव्यागार पाइन्सवर जणू खोबरं पेरावं तसं शुभ्र बर्फ!नंदनवनातल्याच एका कोपर्‍यात आम्ही आलो नव्हतो ना? रात्रीच्या अंधारात आणि आंबलेल्या शरीर आणि मनाला हे सौंदर्य दिसल नव्हत.एका अर्थी ते बरंच झालं म्हणा.. सकाळ इतकी प्रसन्नता घेऊन उगवली की पूछो मत!


जिना उतरुन खाली आलो तर योहानाने नाश्त्याची जय्यत तयारी केली होती. घरचे दूध, बटर, दारच्या सफरचंदांचा उत्कृष्ठ केक,शेतातल्या स्ट्रॉबेरीचे मार्मालाडं,अंडीही घरचीच, म्युसली,वेगवेगळ्या प्रकारचे पाव..पूर्वी ती पावही घरीच करायची पण हल्ली तिच्याच्याने होत नाही अशी माहितीही कळली. काल प्रागच्या नादात जेवणाचे तसे हालच झाले होते. मिळेल ते खाल्लं होतं. रात्रीही खूप उशीर झाल्याने खिचडीवर भागवलं होतं. आता मात्र सगळी कसर भरून काढली. सगळ्यांनी ताव मारला.योहानाही आग्रहाने काय हवे ,नको ते विचारत होती आणि आम्ही पण येऊ दे केक, आणा अजून अंडी असे सांगत यथेच्छ खाल्ले.
आता वेर्फनला जायचे होते. जगातल्या सगळ्यात मोठ्ठ्या हिमगुंफा येथे आहेत. पायथ्यापर्यंत गाडी जाते, तिथून मग साधारण अर्धा तास चढून केबलकारच्या थांब्यापाशी जायला लागते. केबल कारचा थांबा साधारण १००० मीटरवर आहे आणि रोपवेने आपण १५७५ मीटरवर जातो.नंतर परत अर्धा तास चढायचे की १६४१ मीटर उंचीवर हिमगुंफेचे द्वार!
आम्हाला पायथ्याशी सोडून देशपांडेकाका परत गेले. ते तरी किती वेळा पाहतील गुंफा? असा विचार करून आम्ही चढायला सुरुवात केली.कच्चा वळणावळणांचा रस्ता,हिरवेगार पाइन आणि दुसर्‍या बाजूला दरीतून खोलवर दिसणारी घरांची सुबक रांगोळी!आम्ही जरा तरंगतच चढायला सुरुवात केली आणि टप्पोरे थेंब आले की अंगावर.पाण्याचे ते गार ,बोचरे थेंब नक्को वाटतात त्यापेक्षा बर्फ परवडले. छत्रीचा तर उपयोग नसतोच."अरे देवा,हा बोचरा पाऊस नको रे बाबा, त्यापेक्षा स्नो चालेल.." अशी विनवणी देवाने ऐकली चक्क आणि थोडं अजून वर गेल्यावर हिमवर्षा चालू झाली.शाल्मली आणि डॉन्याचा हा पहिलाच बर्फ! (लहान मुलांना कसं आपण पहिलाच उन्हाळा,पहिलाच पावसाळा आहे म्हणतो ना अगदी तस्सं..)पण कितीही वेळा ही वर्षा पहा,अनुभवा त्यातली गंमत ताजीच राहते.आम्ही सगळ्यांनीच भरपूर आनंद घेत चढणे चालू ठेवले.झाइलबान म्हणजे रोपवेची तिकिटे आता काढायची होती.
रांगेत उभे राहिलो आणि सभोवार पाहिले तर नजर ठरेल तिथे आता फक्त हिरवा आणि पांढरा रंग होता आणि धुक्याची हलकीशी लपेटलेली शाल.. परत अऽहाहा.. आले उस्फुर्तपणे!

रोपवेने आणखी वर गेलो. आता खाली दरीत फक्त धुकेच दिसत होते. अजून वर चढायचे होते.रस्ता अजूनच कच्चा,चढणीचा आणि वळणांचा झाला होता आणि खाली दरीत फक्त धुकेच दिसत होते त्यामुळे डोंगराला चिकटूनच चालायचे होते. झाडाझाडांवर लगडलेली हिमफुले पाहून सगळेच लहान झाले. बर्फाचे गोळे एकमेकांना मारत खेळायला सुरुवात झाली. शेवटी गुंफेत लवकर पोहोचायला हवे,येताना हवे तितके खेळू असे एकमेकांना बजावत परत चढू लागलो.
गुंफेच्या दारापाशी फक्त आम्हीच ७ जण!

पाचच मिनिटात दार उघडले. आम्ही तर तिळा,दार उघड! सुध्दा म्हणालो नव्हतो. अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे केल्विनच्या पाठोपाठ आम्ही आत शिरलो. दार परत बंद झाले. आत मिट्ट काळोख. आपल्याला बॅटरी न्यायला,फ्लॅश मारुन फोटो काढायला परवानगी नाही. उष्णतेने आतील बर्फ वितळू नये म्हणून ही काळजी. आम्हाला दोघात एक कंदिल दिला. आता एकूण १४०० पायर्‍या चढणे उतरणे होते.ते अद्भुत पहायला आम्ही अधीर झालो होतो.बर्फाचा राजवाडा आणि त्यातले ते महाल केल्विन आम्हाला मॅग्नेशियमच्या ज्योतीच्या प्रकाशात दाखवत होता.तो बर्फाचा नैसर्गिक चमत्कार पाहताना किती वेळा डोळे विस्फारले गेले. बर्फामुळे तयार झालेले एका बाजूने पोलार बिअर आणि दुसर्‍या बाजूने दिसणारा गजराज असे काय काय पाहिले.बाहेर कितीही तपमान असले तरी आतमध्ये मात्र शून्य अंश से. तपमान कायम असते. बर्फाच्या लेयरवरून त्याचे वय कसे ओळखतात तेही केल्विनने सांगितले.


ह्या गुंफांचा शोध अचानकच लागला. १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी ह्या गुंफा जगाला माहिती झाल्या. इस. १८७९ मध्ये अँटोन पोझेल्ट ह्या साल्झबुर्गच्या निसर्ग शास्त्रज्ञाला आप्ल्समध्ये फिरताना ह्या गुंफा सापडल्या.त्याने त्यावर माहितीपूर्ण लेखही लिहिले पण मग विशेष काही घडले नाही.मॉर्कच्या अलेक्झांडरने पोझेल्टचे लेख वाचले आणि तो त्या गुंफापर्यंत गेला आणि मग तिथे जायचा लोकांचा ओघ वाढला.साधारण १९२० नंतरअगदी प्रिमिटिव्ह का होईना चढणीसाठी रस्ते खोदले आणि मग पुढे वर्षभरात कच्चा का होईना रस्ता तयार केला गेला आणि इस. १९५५ मध्ये रोपवे बांधला गेला.
अलेक्झांडरची ह्या गुंफांमध्येच चिरनिद्रा घ्यायची इच्छा होती म्हणून मग त्याचा अस्थीकलश ह्या गुंफांत ठेवला आहे.एका बाजूला त्याचा अस्थीकलश आणि शेजारीच तयार झालेले हिमरुपी शिवलिंग हिंदू तत्वज्ञानाची जाणीव करून देतात.

केल्विन माहिती सांगत होता आणि एकीकडे ते बर्फीय चमत्कार दाखवत होता.एरवी अशी टूअर असते तेव्हा साधारण २५ एक लोकं तरी एका गटात असतात पण आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा फक्त आम्हीच ७ जण होतो आणि त्यांची वेळ झाल्यामुळे त्याने फक्त आम्हालाच घेऊन टूअर सुरु केली. सगळ्या गुंफेत तेव्हा फक्त आम्हीच होतो साहजिकच नियम थोडे शिथिल झाले आणि आम्ही भरपूर फोटो काढू शकलो.
तृप्त मनाने जेव्हा उदंड बर्फ पाहून आम्ही बाहेर आलो तेव्हा बाहेरची गर्दी पाहून आम्ही लवकर तिथे गेल्याचा विचार किती शहाणपणचा होता हे एकमेकांना सांगत आम्ही आता उतरु लागलो. आता मात्र मुक्तपणे बर्फात खेळत, एकमेकांना बफाचे गोळे मारत, बर्फाचे लाडू भरवत मूलाहून मूल झालो. आणि जेव्हा मन भरले तेव्हा रोपवेत बसलो.

अधिक चित्रांसाठी आप्ल्सच्या कुशीत हे कलादालन पहावे.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

नंदन's picture

14 Nov 2008 - 2:40 am | नंदन

हिमगुंफेचे वर्णन आणि फोटोज मस्तच. योहानाच्या घरच्या जेवणाचे वर्णनही झकास. सध्या मिपा युरोपमय आणि मेजवानीमय झाले आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

14 Nov 2008 - 8:27 am | सहज

असेच म्हणतो.

हिमगुंफा सहीच. तुम्हीच सात लोक म्हणजे व्हि आय पी भारी टुरच की!

टारझन's picture

14 Nov 2008 - 5:00 pm | टारझन

क्लासिक आहे राव सगळंच ... आयुष्यात आम्हाला एकच सुख उपभोगण्याची इच्छा आहे ... जगातल्या जास्तित जास्त ठिकाणी भटकंती आणि तिथलं लोकल फूड खाणे .. आम्ही सुरभि किंवा लोनली प्लानेट सारख्या ठिकाणी कामासाठी हवेह होतो. स्वाती तैंची गँग जबरा आहे ... अंमळ भटकंती चालू आहे म्हणायचं .. और भी आणे दो स्वाती ताई ... जाउ नाही शकत किमान फोटू आणि वर्णनाने तरी अनुभऊ ...

आधीच वाचलं होतं स्वाती तै .. पण मला त्यावेळी मिपा गंडत असल्याने प्रतिसादवता नव्हतं आलं

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

प्राजु's picture

14 Nov 2008 - 2:53 am | प्राजु

काय चमत्कार आहे ना हा निसर्गाचा!
फोटो काढायला मिळाले हे फार बरं झालं. मस्त आहेत सगळेच फोटो. अजून एकदोन त्या गुहांचे फोटो टाकले असतेस तरी बरं झालं असतं.
मस्त वृत्तांत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

14 Nov 2008 - 3:40 am | शितल

स्वाती ताई,
खुपच छान वर्णन केले आहेस. फोटो ही मस्त काढले आहेस.
कसले छान वाटत असेल तुम्हा सर्वाना बर्फाच्या गुहेतुन जाताना. :)

भाग्यश्री's picture

14 Nov 2008 - 4:25 am | भाग्यश्री

आईग.. काय अफलातून फोटोज आहेत!! तोड नाही या फोटोंना!
वर्णन तर नेहेमीसारखं झकास! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

मदनबाण's picture

14 Nov 2008 - 8:54 am | मदनबाण

व्वा. अस काही वेगळ पहायला मिळाले की त्याची मजा काही औरच असते !! :)

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

यशोधरा's picture

14 Nov 2008 - 8:58 am | यशोधरा

नेहमीप्रमाणेच मस्तच लिहिलं आहेस गं स्वातीताई!

प्रमोद देव's picture

14 Nov 2008 - 9:28 am | प्रमोद देव

स्वाती तुझा लेख वाचून हिमगौरी आणि सात बुटके ह्या कथेची आठवण झाली.
ह्यातला फक्त समान धागा म्हणजे हिम आणि सातजण! :)

मनस्वी's picture

14 Nov 2008 - 1:54 pm | मनस्वी

स्वातीताई, सगळं वर्णन आणि फोटो स्वप्नवत आहेत!
वरचे टुमदार घर, भोवतालची फुले, हिरवेगार माळ, चरणार्‍या गाई.. वर्णन करायला शब्दच नाहीत!
हिमगुंफा पण आवडली.
आम्हालाही सफर घडविल्याबद्दल धन्यवाद :)

छोटा डॉन's picture

14 Nov 2008 - 2:16 pm | छोटा डॉन

जेवढी ट्रीप "सुंदर आणि अविस्मरणीय" झाली होती तसेच वर्णन सुद्धा "त्याच पातळीचे" आहे ...
आयला हे फोटो कधी काढलेत ? एकदम जबर्‍या आहेत ...

बाकी त्या योहानाच्या घरच्या ब्रेकफास्टची अजुन आठवण होतेय, काय सुरेख प्रकार आहे तो. मस्तच !
आणि तो गुहेतला " व्ही आय पी प्रवास" , आहाहा !!!
अजुन काय पाहिजे ?
सह्ही जमले आहे ....

काल प्रागच्या नादात जेवणाचे तसे हालच झाले होते. मिळेल ते खाल्लं होतं. रात्रीही खूप उशीर झाल्याने खिचडीवर भागवलं होतं.

हम्म्म ... खरं आहे.
पण माझी एक तक्रार आहे, त्या "केसुस्पेशल भेळ" चा उल्लेख नाही ह्यात, आम्ही कुठे खिचडी खाल्ली ? आकंठ भेळ हादडुन त्यावर आमचे भागले ना ...
( जोक करतो आहे, तक्रार वगैरे काही नाही. असेच ते आठवले म्हणुन लिहले ...)

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

14 Nov 2008 - 2:26 pm | स्वाती दिनेश

भेळ पुढच्या भागात, अजून संध्याकाळी गेलो ते ओबेरसाल्झबुर्ग कुठे लिवलय?

छोटा डॉन's picture

14 Nov 2008 - 2:30 pm | छोटा डॉन

सॉरी बरं का, गल्तीसे मिश्टेक झाली ...
चालेल फुडच्या भागात.
आमचा नेहमीचा धांदरटपणा, अजुन काय ? असो.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

जैनाचं कार्ट's picture

14 Nov 2008 - 4:59 pm | जैनाचं कार्ट (not verified)

अरे वा !

मस्त फोटो आले आहेत पाहीलच नाही आम्ही ... :)

निसर्ग निसर्ग म्हणतात तो हाच असावा !

क्या बात है !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

मिंटी's picture

14 Nov 2008 - 6:06 pm | मिंटी

स्वाती ताई.....अगं किती किती जळवशील गं?????

पण वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणेच सुरेख............. :)

अजुन येऊ देत...वाट बघतीए :)

मिंटी's picture

14 Nov 2008 - 6:06 pm | मिंटी

स्वाती ताई.....अगं किती किती जळवशील गं?????

पण वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणेच सुरेख............. :)

अजुन येऊ देत...वाट बघतीए :)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Nov 2008 - 6:07 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वातीताई, काय मस्त ठिकाणं पाहिली तुम्ही... एक से एक.

युरोप, विशेषतः मध्य / पूर्व युरोप, खूपच सुंदर आहे असे ऐकले होते. आता हळू हळू बघायला पण मिळते आहे. ढगात लपलेल्या डोंगरमाथ्याचा फोटो खूप आवडला. नुसत्या फोटोत बघून काहितरी सुंदर उदात्त शांत असं वाटलं. प्रत्यक्षात काय वाटत असेल.

साल्झबुर्ग आणि गरूडघरटं मात्र लवकर येऊ दे.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2008 - 7:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वर्णन आणि फोटो नेहेमीप्रमाणे मस्तच!

पण एक काळजीवजा प्रश्नः एवढ्या कमी तापमानात कॅमेर्‍याचे किती हाल होतात? (फिनलंडमधे गेले होते तेव्हा माझा कॅमेरा -३२ ला बंद पडला होता, परत सुरु झाला -४ ला आल्यावर.)

लिखाळ's picture

14 Nov 2008 - 9:54 pm | लिखाळ

-३२ अंशावर माणसे सुद्धा बंद पडतील..कॅमेर्‍याची काय कथा :)

मला वाटते शून्याखाली थोडे गेल्यावर कॅमेर्‍याला काही होत नसावे..झाले नाही.

स्वातीताई,
लेख मस्तच. मी लवकरच अजून काही फोटो टाकतो...
तू इतके छान वर्णन करतेस की हे सर्व मी पाहिले आहे याचा मला पुन्हा आनंद झाला:)
-- लिखाळ.

शाल्मली's picture

15 Nov 2008 - 9:21 pm | शाल्मली

<<तू इतके छान वर्णन करतेस की हे सर्व मी पाहिले आहे याचा मला पुन्हा आनंद झाला<<

खरच आहे.. मला सुद्धा परत एकदा फिरुन आल्यासारखे वाटले.. खूप छान लेख.
मजा आली.

--शाल्मली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Nov 2008 - 11:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

-३२ अंशावर माणसे सुद्धा बंद पडतील..कॅमेर्‍याची काय कथा
अजून (बहुतेक?) मी सुरु आहे त्यामुळे -३२ (अंश सेल्सियस) एवढं काही वाईट नसावं. फिनलंडला जायच्या आदल्या रात्री मी फार घाबरलेले होते, मी काही जाणार नाही अशी तक्रार करत होते तेव्हा माझा मित्र मला समजावत होता, "काही फार वाईट नसतं, उणे दहाच्या खाली कितीही काही झालं तरी फार काही फरक पडत नाही. आणि तुला फारच थंडी वाजली तर फिन व्होडका फारच उत्तम असतात, मी आहेच तुला बाटलीत सोबत म्हणून!"

पण तिकडे गेल्यावर माझा दुसरा एक मित्र मला आधी म्हणाला होता ते पटलं, "योग्य कपडे, तयारी असतील तर कोणताही ऋतू वाईट नसतो."
खाली दिनेशरावांनी उदाहरण देऊन तेच सांगितलेलं आहे.

ऋषिकेश's picture

23 Nov 2008 - 7:35 pm | ऋषिकेश

योग्य कपडे, तयारी असतील तर कोणताही ऋतू वाईट नसतो

चुक! ;)
योग्य कपडे, तयारी असतील तर ठंडी, पावसाळा आदी ऋतू वाईट नाहित... उन्हाळ्याचं काय..
थंडीतहि थंडी न वाजेपर्यंत लेयर्सवर लेयर्स चढवाल हो! उन्हाळ्यात कपडे उतरवता येतात मात्र एका मर्यादेपर्यंतच ;) सगळे कपडे उतरवूनहि उकडलं तर! ;)

-(थंड! आणि थंडीप्रिय) ऋषिकेश

दिनेश's picture

15 Nov 2008 - 12:33 pm | दिनेश

सबझिरो तपमान असताना कॅमेराच्या बॅटरीमुळे प्रॉब्लेम संभवतो.अतिशीत तपमानामुळे बॅटरीतील उर्जा रिलिज होण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरु होत नाही परिणामी कॅमेरा सुरु होण्यास अडथळा येतो.हे टाळण्यासाठी
१. कॅमेराचे व अर्थात बॅटरीचे तपमान कमी होऊ न देणे. त्यासाठी आपण आपली जशी काळजी घेतो,उदा- गरम कपडे. तशीच काळजी कॅमेराची घेणे.म्हणजेच कॅमेरा उबदार राहिल असे पहाणे.
२. ज्यादा बॅटरीसेटआपल्या जॅकेटमध्ये ठेवणे जेणेकरुन तोही उबदार जागी राहिल.
अशी काळजी घेतल्याने सबझिरो तपमानात फोटो काढायला अडचण येत नाही असा स्वानुभव आहे.

दिनेश

रेवती's picture

14 Nov 2008 - 9:09 pm | रेवती

शब्दच नाहीत. अश्या नजार्‍याचे फोटो चढवतेस आणि वर प्रतिक्रीया ती काय द्यायची?
सगळ्यात वरचे एकत्र असलेले चार फोटो बघून आनंदानं डोळ्यात पाणीच आलं.
बर्फाचे फोटो बघायला मस्त वाटतं.
शाल्मलीचा आणि डॉन्याच्या पहिल्या बर्फाच्या अनुभवाबद्दल भावना अगदी पोहोचल्या.
मलाही असेच वाटले होते. बॉस्टनला (ईस्ट कोस्ट्ला) बर्फ असतं असं ऐकून होते,
(पहिल्या वर्षी) एकेदिवशी सकाळी खिडकीचा पडदा बाजूला केला आणि रांगोळी भुरभुरतीये कि काय
असं वाटत होतं आणि मी आनंदानं ओरडलेच.
आता तर सवयच झालीये.

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2008 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास फोटो, झकास वर्णन !!!

-दिलीप बिरुटे

वेताळ's picture

14 Nov 2008 - 10:00 pm | वेताळ

प्रवासवर्णन लिहिताना ते वाचणारा देखिल मनाने तिथे पोहचला पाहिजे असे हवे.आज हे प्रवास वर्णन वाचताना हे जाणवत होते.फोटो खुप सुरेख आहेत्.विषेशतः हिमलिंगाचा फोटो अमरनाथबाबांची आठवण करुन देतो.
वेताळ

ऋषिकेश's picture

15 Nov 2008 - 1:22 pm | ऋषिकेश

स्वातीताई, प्रवासवर्णन क्वीन आहेस तू :) अफलातून वर्णन..
फोटोग्राफी तर अ१.. त्यातहि पाचवा फोटो तर अहाहा!!!.. खाली हिरव्या तारुण्याने मुसमुसलेल्या पृथ्वीची देखणी नजाकत.. आणि वर स्थितप्रज्ञ शुभ्रता.. आणि दोन पूर्णपणे वेगळ्या दुनियेच्या मधे ढगांची वेस!!!.. फोटु लई भारी.. मी स्वतःसाठी उतरवून घेऊ शकतो का?

बाकी बर्फाचे लोलक तर अप्रतिम.. पुलंनी केलेल्या जुंगफ्राऊच्या वर्णनाची आठवण झाली.. या श्वेतगुंफा आम्हालाहि बघायला मिळोत अशी इच्छा आहे :)

आता पुढच्या भटकंतीची वाट पाहतोय :)

-(भटकलेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

15 Nov 2008 - 1:39 pm | स्वाती दिनेश

घे ना फोटो तुला हवे ते, कलादालनात अजून सुंदर व मोठ्या साईझचे फोटो आहेत ते ही पहा,त्यातला हवा तरी घे..
स्वाती

चन्द्रशेखर गोखले's picture

15 Nov 2008 - 11:48 pm | चन्द्रशेखर गोखले

स्वाती ताई मस्तच !

विसोबा खेचर's picture

16 Nov 2008 - 1:01 am | विसोबा खेचर

सुंदर फोटू, सुंदर गाथा..! :)

सखी's picture

16 Nov 2008 - 6:33 am | सखी

स्वाती - ऋषिकेशशी सहमत. खरचं अफलातुन वर्णन व फोटो आहेत (आत्ताचं दिनेशने दिलेलेही पाहीले). खरतरं तुझ वर्णन सही की फोटो सही अशी तुलना चालली होती, शेवटी दोन्हीला १०० पैकी १०० गुण!

वर्षा's picture

16 Nov 2008 - 8:34 am | वर्षा

काय सुंदर आहेत फोटो! क्लासिक!!!!
-वर्षा

स्वाती दिनेश's picture

23 Nov 2008 - 6:35 pm | स्वाती दिनेश

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना धन्यवाद.
गरुडघरटे येथे वाचता येईल.
स्वाती

कपिल काळे's picture

23 Nov 2008 - 7:24 pm | कपिल काळे

वा वा, सुंदर जिवंत वर्णन

http://kalekapil.blogspot.com/