शेवग्याच्या शेंगा

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
9 Oct 2015 - 9:45 pm

कडुसं पडत आलं तरीबी पारुबाय कुडाला पोतारा देत बसली व्हती. आता पतुर म्हागची दोन घरं पोतारुन झालती. म्होरलं वट्यापसलं भिताड तेवढं राहीलेलं.
भाभीनं बादलीत पाणी आणुन पाटीत वतलं.
"पारे, जायच्या आगुदर तीवडी भांडीपण घास बरका" एखादं लालुच दाखवल्यासारखं भाभी म्हणाली.
"पल्लीला आणलं आसतं तर बर झालं आसतं आवं, तीवडीच भांडी घासु लागली आसती". पारुबायनं एक खडा टाकुन बघितला.
"नगं ग बया, बर झालं न्हाय आणली, नस्ती ब्याद नकु आमाला" भाभी फणकाऱ्यानं म्हणत घरात शिरली. पारुबायनं आपलं हिरमुसलेपण लपवुन ठिवलं. आताशा पारुबायला आसली कामं व्हत न्हवती. ऊन्हातान्हात जिवाला तरास व्हायचा. पल्लीला घरी यीवुन म्हैना झाला. कुठल्यातरी रोगानं तिचा नवरा लगीन झाल्यावर चार दिसांतच खपलेला. अपशकुनी म्हणुन सासरची लोकं तिलाच दोष द्यायला लागली. पोर घरी एकटीच असायची. माणसांपासून लांब राहल्यामुळं येड्यावाणी करायची. कामाधंद्याच्या निमित्तानं तिला पुन्हा माणसात आणायला पारुबायची खटपट चाललेली. गावातल्या बायका बी तिचं नाव ऐकल्यावर कसनुसं करायच्या. पारुबाय आपलं दु:ख भेगाभेगात लिपवत चालली.

जरावेळानं एक एक करत भाभीनं भांड्याकुंड्यांचा भला मोठा ढिगारा वट्यावर आणुन टाकला. पोतारा दिऊन झाल्यावर पारुबायनं भांडी घासायला घेतली.एक एक करत सगळी भांडीकुंडी खंगाळुन दिली. सगळं काम आवरल्यावर तिला बी जरा बरं वाटलं.
"लय ऊशीर झाला बघा, पली इकटीच हाय घरी, कसं व्हायचं वं माझ्या पुरीचं?" जाता जाता पारुबायनं पुन्हा एकदा विषय काढायचा प्रयत्न केला.
" ऊद्या गोधड्या न सतरंज्या ध्वायच्यात, जरा लवकर यी, आन इकटीच इगं बया" तिच्याकडं जराही लक्ष न देता भाभीनं दुसऱ्या दिवशीची कामं पुढं ठिवली.
घरातनं दोन शेर जवारी आणून तिच्यापुढं ठिवली. ह्या दोन शेरात खरतर तिचं भागत न्हवतं, पण हाजरी वाढवुन मागायची ही वेळ न्हवती.
पारुबाय कापडी पिशवीत जवारी भरुन घराकडं चालली. जाताना अंगणातल्या शेवग्याकडं बघत काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली, " भाभी, तेवढ्या चार शेंगा न्हिवका कावं?, लिकीला लय आवडत्यात, कालपस्न म्हागं लागलीय"

.............................................................................

(शब्दाचा पसारा मांडणे मला आवडत नाही. थोडक्यात बरचकाही सांगायचा नेहमी प्रयत्न करतो. कथा अर्धवट वाटू शकते, पण माझ्या दृष्टिने ती पुर्ण आहे)

कथा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

9 Oct 2015 - 10:19 pm | आदूबाळ

आवडली!

रेवती's picture

9 Oct 2015 - 10:37 pm | रेवती

कथा आवडली.

चांदणे संदीप's picture

9 Oct 2015 - 10:43 pm | चांदणे संदीप

छानच लिहिता जव्हेरगंजभाऊ!
पुलेशु!

Sandy

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2015 - 11:06 pm | बिपिन कार्यकर्ते

चांगली.

एस's picture

9 Oct 2015 - 11:20 pm | एस

तुमचे काही लेखन खरंच भारी असते. असेच लिहा. उगीच काहीबाही खरडत बसण्यात तुमची प्रतिभा वाया घालवू नका अशी विनंती.

इडली डोसा's picture

9 Oct 2015 - 11:24 pm | इडली डोसा

+१

कविता१९७८'s picture

9 Oct 2015 - 11:51 pm | कविता१९७८

लेखन आवडल

कथा आवडली. पण शेवट नाही कळला.

नाव आडनाव's picture

10 Oct 2015 - 7:56 am | नाव आडनाव

+१
चांगलं लिहिता.
शेवट मलापण नाही कळला. तुम्ही लिहिलंय तर काहितरी चांगलाच असणार नक्की.

ब़जरबट्टू's picture

10 Oct 2015 - 10:29 am | ब़जरबट्टू

हेच.. शेवग्या फंडा कळ्या नाही..

बाकी कथा मस्तच.. :)

अभिजीत अवलिया's picture

10 Oct 2015 - 7:39 am | अभिजीत अवलिया

जव्हेर भाऊ, कृपया शेवट समजावून सांगता का? बाकी तुमचे ग्रामीण भाषेतले लिखाण खूप आवडते. तुमच्या कथा वाचताना डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते.

"घिऊन जा की चार शिंगा आनी हे घे धा रूपे पोरीला खाऊसाठी."

नाखु's picture

10 Oct 2015 - 8:41 am | नाखु

आणि शब्दांवर हुकुमतही आहे.

आवडली.

हेमंत लाटकर's picture

10 Oct 2015 - 10:53 am | हेमंत लाटकर

खेड्यात कामवाली बाईकडून कमी पैशात जास्त काम करून घेतले जाते. त्यामानाने शहरातील कामवाली बाई हुशार झाली आहे. दिवाळी बोनस घेत आहे. एक टब भांडे व एक बादली कपडे धुतात. ही चांगली गोष्ट आहे. पैसे देतो म्हणजे कितीही काम करून घेता येते ही मानसिकता चुक आहे.

चांदणे संदीप's picture

11 Oct 2015 - 11:24 am | चांदणे संदीप

For रातराणी, नाव आडनाव, बजरबट्टू, अभिजीत अवलिया :

'शेवग्याच्या शेंगा हे फक्त निमीत होते, पारूबायला पल्लीचा उल्लेख जाता-जाताही करून भाभीच्या मनात तिच नाव घोळवतं ठेवायला!'

जव्हेरगंजभौ, करेक्ट मी इफ आय ॲम रॉंग!
Sandy

जव्हेरगंज's picture

11 Oct 2015 - 11:31 am | जव्हेरगंज

परफेक्ट!

चांदणे संदीप's picture

11 Oct 2015 - 11:37 am | चांदणे संदीप

धन्यवाद!

रातराणी's picture

12 Oct 2015 - 1:53 am | रातराणी

हं. मालकीणबाइंच्या डोक्यात खरंच भुंगा शिरला का याबद्दल थोडा उल्लेख असता तर स्पष्ट झालं असतं ते.

कस काय सुचतं जव्हेरगंजभौंना? आणि
कस काय जमतं सँडीदादांना?

(प्यारेसिंग : तुम्हारा कमाल तुम जानो, मुझे तो सब कमाल लगता है! ब्र्रर्र्हा!!)

-चोप्यपास्ते

चांदणे संदीप's picture

11 Oct 2015 - 6:46 pm | चांदणे संदीप

वरडा! (बोंबलाचा चुलतभाऊ!!) ;)

जव्हेरगंज's picture

11 Oct 2015 - 6:47 pm | जव्हेरगंज

Free Laughing

बाबा योगिराज's picture

11 Oct 2015 - 5:13 pm | बाबा योगिराज

भेष्ट. और दिखाओ और दिखाओ

ज्योति अळवणी's picture

11 Oct 2015 - 5:44 pm | ज्योति अळवणी

आवडली

दिवाकर कुलकर्णी's picture

12 Oct 2015 - 11:12 am | दिवाकर कुलकर्णी

खपले जाल पण तुम्हीं चं लिहीलं आहे काय
प्रस्तुत कथा लई भारी

जव्हेरगंज's picture

12 Oct 2015 - 11:24 am | जव्हेरगंज

धन्यवाद दिवाकरजी,
('खपले जाल' सारखे लेखन खरतर मिपावरच्या जिलबी मोडमध्ये अधुन मधुन लिहितो. तेवढीच गंमत.)
बाकी ग्रामीण कथा आपल्याला लिहायला जाम आवडत्यात.

सर्व प्रतिसादकांचे मन:पुर्वक आभार.

जव्हेर्भाउंनी लिहलेलं काहीही कथा म्हणून खपतं.

जव्हेरगंज's picture

12 Oct 2015 - 6:39 pm | जव्हेरगंज

हीहीही...
ह्येला आम्ही शब्बासकीच समजेन :)

तुषार काळभोर's picture

12 Oct 2015 - 11:38 am | तुषार काळभोर

आवडली..

बायदवे शेवग्याच्या शेंगा पावरबाज असतात असे आमच्या आंध्रदेशीय मित्रवर्यांकडून ऐकले आहे. सदस्यांचे काय मत / अनुभव आहे?

जव्हेरगंज's picture

12 Oct 2015 - 6:41 pm | जव्हेरगंज

तो भ्रम आहे हो.:)
कांदा लय पावरबाज..!!

फार आवडली. आईची चिंता, आई झाल्याशिवाय कळायची नाही.

जव्हेरगंज's picture

12 Oct 2015 - 6:54 pm | जव्हेरगंज

हा ही पैलू दाखवायचा होता. :)
_/\_ आभार!

शित्रेउमेश's picture

13 Oct 2015 - 11:12 am | शित्रेउमेश

छानच... मस्त आवडली....

जे.पी.मॉर्गन's picture

13 Oct 2015 - 12:12 pm | जे.पी.मॉर्गन

शब्दांचा पसारा अजिबात न मांडता थोडक्यात बरंच काही सांगून गेलात!

मस्त! आवडली कथा.

जे.पी.