✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेवग्याच्या शेंगा

ज
जव्हेरगंज यांनी
Fri, 10/09/2015 - 21:45  ·  लेख
लेख
कडुसं पडत आलं तरीबी पारुबाय कुडाला पोतारा देत बसली व्हती. आता पतुर म्हागची दोन घरं पोतारुन झालती. म्होरलं वट्यापसलं भिताड तेवढं राहीलेलं. भाभीनं बादलीत पाणी आणुन पाटीत वतलं. "पारे, जायच्या आगुदर तीवडी भांडीपण घास बरका" एखादं लालुच दाखवल्यासारखं भाभी म्हणाली. "पल्लीला आणलं आसतं तर बर झालं आसतं आवं, तीवडीच भांडी घासु लागली आसती". पारुबायनं एक खडा टाकुन बघितला. "नगं ग बया, बर झालं न्हाय आणली, नस्ती ब्याद नकु आमाला" भाभी फणकाऱ्यानं म्हणत घरात शिरली. पारुबायनं आपलं हिरमुसलेपण लपवुन ठिवलं. आताशा पारुबायला आसली कामं व्हत न्हवती. ऊन्हातान्हात जिवाला तरास व्हायचा. पल्लीला घरी यीवुन म्हैना झाला. कुठल्यातरी रोगानं तिचा नवरा लगीन झाल्यावर चार दिसांतच खपलेला. अपशकुनी म्हणुन सासरची लोकं तिलाच दोष द्यायला लागली. पोर घरी एकटीच असायची. माणसांपासून लांब राहल्यामुळं येड्यावाणी करायची. कामाधंद्याच्या निमित्तानं तिला पुन्हा माणसात आणायला पारुबायची खटपट चाललेली. गावातल्या बायका बी तिचं नाव ऐकल्यावर कसनुसं करायच्या. पारुबाय आपलं दु:ख भेगाभेगात लिपवत चालली. जरावेळानं एक एक करत भाभीनं भांड्याकुंड्यांचा भला मोठा ढिगारा वट्यावर आणुन टाकला. पोतारा दिऊन झाल्यावर पारुबायनं भांडी घासायला घेतली.एक एक करत सगळी भांडीकुंडी खंगाळुन दिली. सगळं काम आवरल्यावर तिला बी जरा बरं वाटलं. "लय ऊशीर झाला बघा, पली इकटीच हाय घरी, कसं व्हायचं वं माझ्या पुरीचं?" जाता जाता पारुबायनं पुन्हा एकदा विषय काढायचा प्रयत्न केला. " ऊद्या गोधड्या न सतरंज्या ध्वायच्यात, जरा लवकर यी, आन इकटीच इगं बया" तिच्याकडं जराही लक्ष न देता भाभीनं दुसऱ्या दिवशीची कामं पुढं ठिवली. घरातनं दोन शेर जवारी आणून तिच्यापुढं ठिवली. ह्या दोन शेरात खरतर तिचं भागत न्हवतं, पण हाजरी वाढवुन मागायची ही वेळ न्हवती. पारुबाय कापडी पिशवीत जवारी भरुन घराकडं चालली. जाताना अंगणातल्या शेवग्याकडं बघत काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली, " भाभी, तेवढ्या चार शेंगा न्हिवका कावं?, लिकीला लय आवडत्यात, कालपस्न म्हागं लागलीय" ............................................................................. (शब्दाचा पसारा मांडणे मला आवडत नाही. थोडक्यात बरचकाही सांगायचा नेहमी प्रयत्न करतो. कथा अर्धवट वाटू शकते, पण माझ्या दृष्टिने ती पुर्ण आहे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
8736 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

आवडली!

आदूबाळ
Fri, 10/09/2015 - 22:19 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

रेवती
Fri, 10/09/2015 - 22:37 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

वा!

चांदणे संदीप
Fri, 10/09/2015 - 22:43 नवीन
छानच लिहिता जव्हेरगंजभाऊ! पुलेशु! Sandy
  • Log in or register to post comments

चांगली.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/09/2015 - 23:06 नवीन
चांगली.
  • Log in or register to post comments

छान कथा.

एस
Fri, 10/09/2015 - 23:20 नवीन
तुमचे काही लेखन खरंच भारी असते. असेच लिहा. उगीच काहीबाही खरडत बसण्यात तुमची प्रतिभा वाया घालवू नका अशी विनंती.
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

इडली डोसा
Fri, 10/09/2015 - 23:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लेखन आवडल

कविता१९७८
Fri, 10/09/2015 - 23:51 नवीन
लेखन आवडल
  • Log in or register to post comments

कथा आवडली. पण शेवट नाही कळला.

रातराणी
Sat, 10/10/2015 - 01:44 नवीन
कथा आवडली. पण शेवट नाही कळला.
  • Log in or register to post comments

+१

नाव आडनाव
Sat, 10/10/2015 - 07:56 नवीन
+१ चांगलं लिहिता. शेवट मलापण नाही कळला. तुम्ही लिहिलंय तर काहितरी चांगलाच असणार नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

+1

ब़जरबट्टू
Sat, 10/10/2015 - 10:29 नवीन
हेच.. शेवग्या फंडा कळ्या नाही.. बाकी कथा मस्तच.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

जव्हेर भाऊ, कृपया शेवट

अभिजीत अवलिया
Sat, 10/10/2015 - 07:39 नवीन
जव्हेर भाऊ, कृपया शेवट समजावून सांगता का? बाकी तुमचे ग्रामीण भाषेतले लिखाण खूप आवडते. तुमच्या कथा वाचताना डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते.
  • Log in or register to post comments

"घिऊन जा की चार शिंगा आनी हे

वडाप
Sat, 10/10/2015 - 08:33 नवीन
"घिऊन जा की चार शिंगा आनी हे घे धा रूपे पोरीला खाऊसाठी."
  • Log in or register to post comments

बाज मस्त आहे

नाखु
Sat, 10/10/2015 - 08:41 नवीन
आणि शब्दांवर हुकुमतही आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

खेड्यात कामवाली बाईकडून कमी

हेमंत लाटकर
Sat, 10/10/2015 - 10:53 नवीन
खेड्यात कामवाली बाईकडून कमी पैशात जास्त काम करून घेतले जाते. त्यामानाने शहरातील कामवाली बाई हुशार झाली आहे. दिवाळी बोनस घेत आहे. एक टब भांडे व एक बादली कपडे धुतात. ही चांगली गोष्ट आहे. पैसे देतो म्हणजे कितीही काम करून घेता येते ही मानसिकता चुक आहे.
  • Log in or register to post comments

काय राव लोक्स??

चांदणे संदीप
Sun, 10/11/2015 - 11:24 नवीन
For रातराणी, नाव आडनाव, बजरबट्टू, अभिजीत अवलिया : 'शेवग्याच्या शेंगा हे फक्त निमीत होते, पारूबायला पल्लीचा उल्लेख जाता-जाताही करून भाभीच्या मनात तिच नाव घोळवतं ठेवायला!' जव्हेरगंजभौ, करेक्ट मी इफ आय ॲम रॉंग! Sandy
  • Log in or register to post comments

परफेक्ट!

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 11:31 नवीन
परफेक्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

धन्यवाद

चांदणे संदीप
Sun, 10/11/2015 - 11:37 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हं. मालकीणबाइंच्या डोक्यात

रातराणी
Mon, 10/12/2015 - 01:53 नवीन
हं. मालकीणबाइंच्या डोक्यात खरंच भुंगा शिरला का याबद्दल थोडा उल्लेख असता तर स्पष्ट झालं असतं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कस काय सुचतं जव्हेरगंजभौंना?

प्यारे१
Sun, 10/11/2015 - 18:23 नवीन
कस काय सुचतं जव्हेरगंजभौंना? आणि कस काय जमतं सँडीदादांना? (प्यारेसिंग : तुम्हारा कमाल तुम जानो, मुझे तो सब कमाल लगता है! ब्र्रर्र्हा!!) -चोप्यपास्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हा...हा...हा

चांदणे संदीप
Sun, 10/11/2015 - 18:46 नवीन
वरडा! (बोंबलाचा चुलतभाऊ!!) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

.

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 18:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जव्हेरगंज भौ

बाबा योगिराज
Sun, 10/11/2015 - 17:13 नवीन
भेष्ट. और दिखाओ और दिखाओ
  • Log in or register to post comments

आवडली

ज्योति अळवणी
Sun, 10/11/2015 - 17:44 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

खपले जाल पण तुम्हीं चं लिहीलं

दिवाकर कुलकर्णी
Mon, 10/12/2015 - 11:12 नवीन
खपले जाल पण तुम्हीं चं लिहीलं आहे काय प्रस्तुत कथा लई भारी
  • Log in or register to post comments

धन्यवाद दिवाकरजी,

जव्हेरगंज
Mon, 10/12/2015 - 11:24 नवीन
धन्यवाद दिवाकरजी, ('खपले जाल' सारखे लेखन खरतर मिपावरच्या जिलबी मोडमध्ये अधुन मधुन लिहितो. तेवढीच गंमत.) बाकी ग्रामीण कथा आपल्याला लिहायला जाम आवडत्यात. सर्व प्रतिसादकांचे मन:पुर्वक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

जव्हेर्भाउंनी लिहलेलं काहीही

द-बाहुबली
Mon, 10/12/2015 - 11:36 नवीन
जव्हेर्भाउंनी लिहलेलं काहीही कथा म्हणून खपतं.
  • Log in or register to post comments

हीहीही...

जव्हेरगंज
Mon, 10/12/2015 - 18:39 नवीन
हीहीही... ह्येला आम्ही शब्बासकीच समजेन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

आवडली

तुषार काळभोर
Mon, 10/12/2015 - 11:38 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments

बायदवे शेवग्याच्या शेंगा

बॅटमॅन
Mon, 10/12/2015 - 16:17 नवीन
बायदवे शेवग्याच्या शेंगा पावरबाज असतात असे आमच्या आंध्रदेशीय मित्रवर्यांकडून ऐकले आहे. सदस्यांचे काय मत / अनुभव आहे?
  • Log in or register to post comments

तो भ्रम आहे हो.:)

जव्हेरगंज
Mon, 10/12/2015 - 18:41 नवीन
तो भ्रम आहे हो.:) कांदा लय पावरबाज..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

फार आवडली. आईची चिंता, आई

शुचि
Mon, 10/12/2015 - 18:45 नवीन
फार आवडली. आईची चिंता, आई झाल्याशिवाय कळायची नाही.
  • Log in or register to post comments

हा ही पैलू दाखवायचा होता. :)

जव्हेरगंज
Mon, 10/12/2015 - 18:54 नवीन
हा ही पैलू दाखवायचा होता. :) _/\_ आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

छानच... मस्त आवडली....

शित्रेउमेश
Tue, 10/13/2015 - 11:12 नवीन
छानच... मस्त आवडली....
  • Log in or register to post comments

शब्दांचा पसारा अजिबात न

जे.पी.मॉर्गन
Tue, 10/13/2015 - 12:12 नवीन
शब्दांचा पसारा अजिबात न मांडता थोडक्यात बरंच काही सांगून गेलात! मस्त! आवडली कथा. जे.पी.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा