शेवग्याच्या शेंगा
कडुसं पडत आलं तरीबी पारुबाय कुडाला पोतारा देत बसली व्हती. आता पतुर म्हागची दोन घरं पोतारुन झालती. म्होरलं वट्यापसलं भिताड तेवढं राहीलेलं.
भाभीनं बादलीत पाणी आणुन पाटीत वतलं.
"पारे, जायच्या आगुदर तीवडी भांडीपण घास बरका" एखादं लालुच दाखवल्यासारखं भाभी म्हणाली.
"पल्लीला आणलं आसतं तर बर झालं आसतं आवं, तीवडीच भांडी घासु लागली आसती". पारुबायनं एक खडा टाकुन बघितला.
"नगं ग बया, बर झालं न्हाय आणली, नस्ती ब्याद नकु आमाला" भाभी फणकाऱ्यानं म्हणत घरात शिरली. पारुबायनं आपलं हिरमुसलेपण लपवुन ठिवलं. आताशा पारुबायला आसली कामं व्हत न्हवती. ऊन्हातान्हात जिवाला तरास व्हायचा. पल्लीला घरी यीवुन म्हैना झाला. कुठल्यातरी रोगानं तिचा नवरा लगीन झाल्यावर चार दिसांतच खपलेला. अपशकुनी म्हणुन सासरची लोकं तिलाच दोष द्यायला लागली. पोर घरी एकटीच असायची. माणसांपासून लांब राहल्यामुळं येड्यावाणी करायची. कामाधंद्याच्या निमित्तानं तिला पुन्हा माणसात आणायला पारुबायची खटपट चाललेली. गावातल्या बायका बी तिचं नाव ऐकल्यावर कसनुसं करायच्या. पारुबाय आपलं दु:ख भेगाभेगात लिपवत चालली.
जरावेळानं एक एक करत भाभीनं भांड्याकुंड्यांचा भला मोठा ढिगारा वट्यावर आणुन टाकला. पोतारा दिऊन झाल्यावर पारुबायनं भांडी घासायला घेतली.एक एक करत सगळी भांडीकुंडी खंगाळुन दिली. सगळं काम आवरल्यावर तिला बी जरा बरं वाटलं.
"लय ऊशीर झाला बघा, पली इकटीच हाय घरी, कसं व्हायचं वं माझ्या पुरीचं?" जाता जाता पारुबायनं पुन्हा एकदा विषय काढायचा प्रयत्न केला.
" ऊद्या गोधड्या न सतरंज्या ध्वायच्यात, जरा लवकर यी, आन इकटीच इगं बया" तिच्याकडं जराही लक्ष न देता भाभीनं दुसऱ्या दिवशीची कामं पुढं ठिवली.
घरातनं दोन शेर जवारी आणून तिच्यापुढं ठिवली. ह्या दोन शेरात खरतर तिचं भागत न्हवतं, पण हाजरी वाढवुन मागायची ही वेळ न्हवती.
पारुबाय कापडी पिशवीत जवारी भरुन घराकडं चालली. जाताना अंगणातल्या शेवग्याकडं बघत काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली, " भाभी, तेवढ्या चार शेंगा न्हिवका कावं?, लिकीला लय आवडत्यात, कालपस्न म्हागं लागलीय"
.............................................................................
(शब्दाचा पसारा मांडणे मला आवडत नाही. थोडक्यात बरचकाही सांगायचा नेहमी प्रयत्न करतो. कथा अर्धवट वाटू शकते, पण माझ्या दृष्टिने ती पुर्ण आहे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
आवडली!
कथा आवडली.
वा!
चांगली.
छान कथा.
असेच म्हणते
लेखन आवडल
कथा आवडली. पण शेवट नाही कळला.
+१
+1
जव्हेर भाऊ, कृपया शेवट
"घिऊन जा की चार शिंगा आनी हे
बाज मस्त आहे
खेड्यात कामवाली बाईकडून कमी
काय राव लोक्स??
परफेक्ट!
धन्यवाद
हं. मालकीणबाइंच्या डोक्यात
कस काय सुचतं जव्हेरगंजभौंना?
हा...हा...हा
.
जव्हेरगंज भौ
आवडली
खपले जाल पण तुम्हीं चं लिहीलं
धन्यवाद दिवाकरजी,
जव्हेर्भाउंनी लिहलेलं काहीही
हीहीही...
आवडली
बायदवे शेवग्याच्या शेंगा
तो भ्रम आहे हो.:)
फार आवडली. आईची चिंता, आई
हा ही पैलू दाखवायचा होता. :)
छानच... मस्त आवडली....
शब्दांचा पसारा अजिबात न