ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
7 Jan 2015 - 9:59 am

श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.

या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

7 Jan 2015 - 10:09 am | खटपट्या

खूप छान !!

जंगी सामने बघायला मिळतील अशी आशा ! आणी बरेच शिकायला मिळेल.

--बुद्धीबळात नवखा....

मुक्त विहारि's picture

7 Jan 2015 - 10:34 am | मुक्त विहारि

सेम हियर

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2015 - 10:39 am | डॉ सुहास म्हात्रे

स्पर्धेला, स्पर्धकांना, आयोजकांना आणि हितचिंतकांना (ज्यात आम्हिही आहोत :) ) मनःपूर्वक शुभेच्छा ! *clapping* *good*

या नव्या अभिनव उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा !

मृत्युन्जय's picture

7 Jan 2015 - 11:30 am | मृत्युन्जय

मला नक्कीच आव्डेल सहभागी व्हायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jan 2015 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझं नाव घ्या भो स्पर्धेत.

बाकी, या बहुगुणी माणसाचं मला लै कौतुक वाटतं. आपली सर्व कामं धामं सोडून मिपावर काही उत्तम उपक्रम राबवता येतो का याचा यांना इतका ध्यास लागलेला असतो की बस. बहुगुणी असेच. मागे एकदा यांनीच म्युझीकवरुन गाणं शोधायचा उपक्रम राबविला सर्वांना सहभागी करुन घेतलं. मिपाकरांचे दोन क्षण आनंदात गेले.

आताही बहुगुणी यांचा हा उपक्रम मी पाहतोय. ऑनलाइन कशी स्पर्धा घेता येईल, कसे प्रेक्षक असतील, कसा डाव पाहता येईल, कसा कुठून कोड आणायचा चिटकावयाचा. लोकांचा सहभाग किती असेल नी काय, सालं अशा किती न काय गोष्टी कराव्या लागत असतात. नमस्कार हे भो आपल्या चिकाटीला. आणि तहेदिलसे शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

7 Jan 2015 - 11:37 am | प्रचेतस

स्पर्धेत मी पण खेळाडू म्हणून सहभागी असेनच.

योगी९००'s picture

7 Jan 2015 - 12:33 pm | योगी९००

या नव्या अभिनव उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा !!!!

मी पण स्पर्धेत भाग घेण्यास तयार आहे. पण खेळण्याची वेळ कशी असेल?

पैसा's picture

7 Jan 2015 - 12:39 pm | पैसा

कुठून, किती स्पर्धक येतात त्यावर दोघा स्पर्धकांच्या सोयिची वेळ बघून ठरवू. वेळ कमी उरल्यामुळे प्रवेशिकांसाठी हा धागा काढलाय. बहुगुणींना वेळ मिळताच ते अधिक स्पष्ट करतील.

रक्तपिशाच्च's picture

24 Jan 2015 - 3:16 pm | रक्तपिशाच्च

मलाबी भाग घ्यायचा है …। कुठ कुठ नाव द्यावा लागल?

पैसा's picture

24 Jan 2015 - 6:03 pm | पैसा

आता स्पर्धा संपत आली! पुढच्या वेळी नक्की भाग घ्या. बाकी तुमच्याबरोबर कोण खेळायला तयार होईल माहीत नै. अग्यावेताळ खेळेल कदाचित!

दुसरा एक धागा आहे. http://misalpav.com/node/29850
तिथे रिक्वेस्टा. म्हणजे कोणीतरी सराव मॅच खेळायला सापडेल अधून मधून.

त्यांचेबरोबर अत्रुप्त आत्मा पण खेळतील असे वाटते.

मला काही नीट खेळता येत नाही, पण त्यानिमित्ताने शिकता येईल. इतर स्पर्धकांना माझ्यासारखी ''लिंबूटिंबू'' चालणार असेल तर मलाही आवडेल सहभागी व्हायला. वेळ वगैरे प्रश्न आहेतच म्हणा!

नन्दादीप's picture

7 Jan 2015 - 1:45 pm | नन्दादीप

लिंबूटिंबू गटात टाकणार असाल तरच....

बहुगुणी's picture

7 Jan 2015 - 6:22 pm | बहुगुणी

धन्यवाद!

वरील प्रतिसादांतून आणि इतर व्य निं मधून खालील स्पर्धक भाग घेतील असं दिसतंय; या सर्वांची नावे या तक्त्यात आहेत, आधिक स्पर्धेच्छुक खेळाडूंनी शक्यतो तिथेच नावनोंदणी करावी (न जमल्यास इथे या धाग्यात मला कळवा):

  1. गणपा
  2. निराकार गाढव
  3. विअर्ड विक्स
  4. ब़जरबट्टू
  5. योगी ९००
  6. प्रा.डॉ. बिरुटे
  7. वल्ली
  8. मृत्युंजय
  9. आतिवास
  10. नन्दादीप
  11. बहुगुणी

मी १०-१९ जानेवारी या दरम्यान प्रवासात असल्याने त्या कालावधीत आयोजनात माझा सहभाग असणं कठीण आहे. संपादक मंडळापैकी कोणी जबाबदारी घेत असाल तर उत्तम, अन्यथा मला वाटतं ९ जानेवारी भारतीय प्रमाण वेळ दुपारी १२ पर्यंत जितक्या प्रवेशिका येतील त्यांतून दोन गट करून 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेऊ शकू (केवळ दहाच दिवस स्पर्धा असल्याने, आणि भारतातील व इतर देशातील कार्यालयीन वेळा टाळणं गरजेचं असल्याने 'राऊंड रॉबिन' पद्दतीने खेळणं कठीण आहे).

आपण 'लिंबू-टिंबू' आणि 'लय भारी' अशा दोन गटात स्पर्धा घेऊ शकू. इच्छुकांनी आपापली नावे आणि अपेक्षित गट लवकरात लवकर नोंदवले तर १० जानेवारीस ड्रॉ प्रकाशित करू शकेन.

सामन्यांच्या वेळेवरील मर्यादा पाहता आपण स्पर्धेसाठी 'ब्लिट्झ' ही पद्धत वापरावी असं सूचवेन (उदाहरणार्थः प्रत्येक चालीसाठी ५ मिनिटे मर्यादा, प्रत्येकी ४० अशा एकूण ८० चाली; म्हणजे एक सामना साधारण ७ तासांत संपावा.) दर दिवशी १ 'लिंबू-टिंबू' आणि १ 'लय भारी' असा सामना झाल्यास अंदाजे २० सामने १० दिवसांत संपू शकतील. म्हणजे प्रत्येक गटास १० खेळाडूची मर्यादा असावी. या हिशोबाने आणखी १० खेळाडू सहभाग घेऊ शकतील. त्यांनी आपली नावे लवकर नोंदवावी.

महत्वाचे म्हणजे आपल्याला प्रत्येक सामन्यासाठी एका निरीक्षकाची (मॉडरेटर ची) गरज असेल, नियम जाणणारे स्पर्धकांपैकीच वा इतर प्रेक्षकांपैकी कोण कोण यासाठी उपलब्ध असू शकतील तेही कळवा.

उत्साही सहभागाबद्दल आभार!

पैसा's picture

7 Jan 2015 - 7:09 pm | पैसा

मी उपलब्ध असेन. मात्र मला लेटेस्ट नियम परत वाचून काढावे लागतील. भारतीय पद्धतीचे माहीत आहेत.

बहुगुणी's picture

7 Jan 2015 - 7:12 pm | बहुगुणी

स्पर्धक म्हणूनही असालच ना?

पैसा's picture

7 Jan 2015 - 9:28 pm | पैसा

मॉडरेटर म्हणून काम करायचं तर स्पर्धेत भाग नाही घेता येणार.

खेळाची आइडिआ लय भारी. कोड मिळाला की ते डाव पटावर खेळून बघणार आहे.

बहुगुणी's picture

7 Jan 2015 - 7:15 pm | बहुगुणी

ज्यांना हवे असतील त्यांच्यासाठी बुद्धीबळाचे नियम इथे आहेत.

सत्कुल's picture

7 Jan 2015 - 11:40 pm | सत्कुल

मी इछुक आहे

नाव देणार्‍या प्रत्येकाने आपापल्या कौशल्य-गटाची माहिती देखील द्यायची आहे (खर्री-खुर्री ;-) ), म्हणजे 'लिंबू-टिंबू' की 'लय भारी', त्याप्रमाणे ड्रॉ काढणं सोपं जाईल.

मृत्युन्जय's picture

8 Jan 2015 - 10:44 am | मृत्युन्जय

एकच ओपन ड्रॉ असु द्यावे अशी सूचना करतो आहे. कोण लिंबु टिंबु आणि कोण प्रोफेशनल ते नाही सांगता येणार. उदा. माझ्याबाबत म्हणाल तर मी लिंबु टिंबु नसेन तरी लय भारी गटात नक्कीच नाही मोडणार. अश्या वेळेस मला कुठल्याही गटात टाकले तरी ते चुकीचेच होइल. प्राडो, संक्षी, चतुरंग, ररा सोडले तर बाकी बरेच लोक लय भारी गटात नाहिच मोडणार. त्यापेक्षा सरळ एकच गट करा. या प्रकाराने कदाचित २ संभाव्य विजेते पहिल्याच फेरीत एकमेकांशी लढतील आणि एक बाद होइल. पण नाइलाज आहे. खेळाडुंची कौशल्यसीमा माहिती नसल्याने यावेळेस असे होइल. पुढच्यावेळेसपासुन रेटिंग देता येइल

शिवाय प्रत्येक चालीला जास्तीत जासत १.३० मिनिटे वेळ द्यावा अशीही सूचना करावीशी वाटते आहे.,

बहुगुणी's picture

8 Jan 2015 - 11:31 am | बहुगुणी

माझ्याबाबत म्हणाल तर मी लिंबु टिंबु नसेन तरी लय भारी गटात नक्कीच नाही मोडणार. हे माझ्या बाबतीत बहुतेक खरं असेल! शिवाय प्रवासामुळे सलग उपलब्धता नसल्याने मी स्पर्धेत भाग घेईनच हे नक्की नाही. तेंव्हा इतर कुणाची हरकत नसेल तर एकच ओपन गट करण्यास माझी व्यक्तिशः हरकत नाही.

प्रत्येक चालीची कालमर्यादाही ५ मिनिटांवरून दीड/दोन मिनिटे इतकी कमी करण्याने सामन्याची वेळ आटोपशीर होईल हेही मान्य, त्यावर काय मतं आहेत पब्लिकची?

प्रचेतस's picture

8 Jan 2015 - 11:33 am | प्रचेतस

सहमत.
एकच ओपन गट असावा.

पैसा's picture

8 Jan 2015 - 12:16 pm | पैसा

काही सामने बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे. तेव्हा बाद कसे ठरवणार? सरमिसळ दोन गट करून त्यात राउंड घ्यायच्या आणि मग त्यातून पहिले येतील त्यांची फायनल असे जमेल का? किती सामने होतील?

प्रचेतस's picture

8 Jan 2015 - 12:24 pm | प्रचेतस

बरोबरीत सुटलाच तर त्या जोडीमधेच अजून एक सामना खेळवावा. हे चक्र निकाली ठरेपर्यंत असे चालू राहावे.

Rajesh K's picture

8 Jan 2015 - 12:36 am | Rajesh K

भाग घेण्यास इच्छुक.

आतिवास's picture

8 Jan 2015 - 12:40 am | आतिवास

मी अर्थातच ''लिंबू-टिंबू'' गटात!

अजया's picture

8 Jan 2015 - 7:14 am | अजया

मी आधी स्पर्धा बघेन!माझ्याही पेक्षा लिंबू -टिंबू कोणी दिसलं(मिळणं कठीण आहे.पण प्रयत्न करुन पाहू!) ^_~ की पुढच्या स्पर्धेत भाग घेईन.

इशा१२३'s picture

8 Jan 2015 - 3:29 pm | इशा१२३

अजया मी तुझ्यासारखीच(लिंबु-टिंबु).भाग घ्यायचाय पण पुढच्या स्पर्धेत आत्ता प्रेक्षकच.

उमा @ मिपा's picture

8 Jan 2015 - 9:35 am | उमा @ मिपा

अतिशय स्तुत्य उपक्रम!
स्पर्धा कशी होणार हे पाहण्यास उत्सुक आहे.
शुभेच्छा.

विअर्ड विक्स's picture

8 Jan 2015 - 11:39 am | विअर्ड विक्स

चालीस १- २ मिनटे वेळ पुरेसा वाटतो. माझ्यामते प्रत्येकाने आपली वेळ उपलब्धी टाकली तर अजून बरे होईल. व स्पर्धा खुल्या गटातच व्हावी.

आणखी काही मान्यतेची / विरोधातली मतं येताहेत त्याची वाट पाहू, आणि मग एकाच गटात आणि प्रत्येक चालीस दोन मिनिटे कालमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेऊयात.
अजया, कंजूस, खटपट्या, इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता : स्पर्धा दुरून पहाण्यापेक्ष सरळ भागच घ्याना, इथे सगळेच हौशी आहेत आणि सामने खेळीमेळीनेच होतील, तेंव्हा हार-जीतीला फारसं महत्व द्यायला नको :-) या मैदानात!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2015 - 7:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मागे एकदा म्हटल्याप्रमाणे, माझा बुद्धिबळ खेळायचा अनुभव कॉलेजच्या मेसमध्ये लंच अवरमध्ये खेळलेल्या "कम्युनिटी चेस" या व्हर्शन इतकाच मर्यादित आहे. त्या व्हर्शनमध्ये समोरासमोर बसलेल्या दोन खेळाडूंच्या भोवती असंख्य उभ्या कम्युनिटी मेंबरांचा (इतर विद्यार्थांचा) घोळका असतो आणि बसलेल्या खेळाडूंपेक्षा जास्त चाली उभे असलेले कम्युनिटी मेंबरच (प्रसंगी बसलेल्या खेळाडूचे हात पकडून ठेऊन :) ) करतात. बुद्धिबळचे हे अडव्हान्स्ड व्हर्शन मिपावर आल्यावर मी कम्युनिटी मेंबर म्हणून भाग घेईन, त्याचा माझा अनुभव फार मोठा आहे. तोपर्यंत मी प्रेक्षक असलेलाच बरा +D

खटपट्या's picture

8 Jan 2015 - 10:49 pm | खटपट्या

ठिक आहे घेतो भाग. पण हरलो तर हसायचे नाही. :)

एक्सल मधे नोंद करून शेअर केले आहे.

पहिली स्पर्धा बघुन हरायचा हुरुप येईल हो!
नाहीतर आमच्यासाठी वेगळे रुल ^_~ आम्ही अामचा बोर्ड आणू.आम्हाला पांढरेच पाहिजेत.चार वेळा औट तर एकदा औट =))

मुक्त विहारि's picture

8 Jan 2015 - 12:18 pm | मुक्त विहारि

त्यामुळे, ह्या वर्षी फक्त अंदाज...

चांगला उपक्रम. माझही नाव घ्या स्पर्धे साठी.

बहुगुणी's picture

9 Jan 2015 - 3:04 am | बहुगुणी

मंडळी,

९ जानेवारी भारतीय प्रमाण वेळ दुपारी ५ पर्यंत जितक्या प्रवेशिका येतील त्यांतून ड्रॉ काढून एकाच गटात 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेतली जाईल.

सामने १५ तारखेपासून सुरू होतील. तांत्रिक अडचणी न येता दर दिवशी दोन सामने एकाच वेळी (in parallel) घेता यावेत असं सध्या तरी दिसतं आहे.

काही कल्पना सर्वांच्या विचारार्थः

  1. प्रत्येक खेळाडूस प्रत्येक चालीसाठी दोन मिनिटे मर्यादा असेल, आणि प्रत्येकी जास्तीत जास्त ४० चालीत सामना संपवावा लागेल, म्हणजे एकूण १६० मिनिटांत (अडीच तासाहून थोड्या आधिक वेळात) प्रत्येक सामना संपेल.
  2. प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.
  3. एखादा सामना बरोबरीत सुटलाच तर त्या जोडीमधेच अजून एक सामना त्याच संध्याकाळी घेतला जाईल, आणि तोही बरोबरीत सुटला तर त्या वेळच्या पट-स्थितीत ज्या खेळाडूचे मोहोर्‍यांचे सामर्थ्य आधिक असेल (आधिक मुख्य मोहोरी आणि आधिक प्यादी) त्या खेळाडूस मॉडरेटर विजयी घोषित करतील.

सध्या १५ खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत, त्यांपैकी माझा सहभाग पहिले ४ दिवस कठीण असल्याने, आणखी २ खेळाडू आले तर १६ खेळाडूंमध्ये ड्रॉ काढून स्पर्धा निर्धारित वेळेत संपवणं शक्य आहे. तेंव्हा ९ जानेवारी भारतीय प्रमाण वेळ दुपारी ५ पर्यंत आणखी २ खेळाडूंनी नावे नोंदवावीत असं आवाहन करतो.

आत्तापर्यंत खालील १७ लोकांनी नावे नोंदवलेली आहेत.
गणपा
निराकार गाढव
विअर्ड विक्स
ब़जरबट्टू
योगी ९००
 प्रा.डॉ.
वल्ली
मृत्युंजय
आतिवास
नन्दादीप
बहुगुणी
Rajesh K
गजानन
खटपट्या
आनंद

बहुगुणी's picture

9 Jan 2015 - 6:10 am | बहुगुणी

वरच्या यादीत मी सोडून १४ जणांनी नावे नोंदवली आहेत (मी जाने. १५-१९ प्रवासात असल्याने मिपावर दीर्घकाळ येणं अशक्यच आहे.) म्हणून आणखी दोन खेळाडू सामावून घेऊ शकू.

पैसा's picture

9 Jan 2015 - 11:03 am | पैसा

सत्कुल राहिला/राहिली

बहुगुणी's picture

9 Jan 2015 - 3:51 pm | बहुगुणी

सत्कुल यांचं नाव यादीत घातलं आहे.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jan 2015 - 4:40 pm | प्रसाद गोडबोले

मी खेळतो :)

पैसा's picture

10 Jan 2015 - 7:25 pm | पैसा

खेळायला आणखी स्पर्धक नाही! मॉडरेटर म्हंणून काही सामने बघ. मला एकटीला जास्त होतील!

प्रसाद गोडबोले's picture

12 Jan 2015 - 11:49 am | प्रसाद गोडबोले

ओके . मग आपण च्यॅम्पियन च्यॅलेंजर असा फॉरमेट ठेवु , सर्व फेर्‍यांच्या शेवटी जो जिंकेल त्याला मी चॅलेंजर म्हणुन आव्हान देईन , मग एक दोन मॅचेस खेळेन त्याच्याशीच :D

मॉडरेटर म्हंणून काही सामने बघ.

हेही चालेल :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2015 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे

ओके . मग आपण च्यॅम्पियन च्यॅलेंजर असा फॉरमेट ठेवु , सर्व फेर्‍यांच्या शेवटी जो जिंकेल त्याला मी चॅलेंजर म्हणुन आव्हान देईन , मग एक दोन मॅचेस खेळेन त्याच्याशीच Biggrin

हायला ! "यावर्षी पहिल्यांदा सुरू झालेल्या स्पर्धेच्या मागच्या वर्षीच्या (न झालेल्या) स्पर्धेचा विजेता मीच" इतका उच्च दावा मिपातल्या "मी, मी आणि मीच" म्हणणार्‍या चँपियन्सनाही आजपर्यंत जमलेला नाही हे जाहिर करण्यास आणंद होत आहे :) ;) +D

प्रसाद गोडबोले's picture

12 Jan 2015 - 1:13 pm | प्रसाद गोडबोले

मागच्या वर्षीच्या (न झालेल्या) स्पर्धेचा विजेता मीच"

>>> मी न झालेल्या स्पर्धातच जिंकतो हो एक्काकाका ;)

बाकी मिपावरुन गुरुदेव गेले , मसीहांची बोलती बंद केली मिपाकरांनी , प्रवचनकारांना उप'रति' झाली बहुतेक . एकुणच काय तर मिपावरची अहंगंगा अचानकच माणगंगेसारखी कोरडी पडल्याने आम्ही थोडेफार नाशिशिझम करावयाचे ठरवले आहे =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2015 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 4:35 am | खटपट्या

प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.

सामने शनिवारी रविवारी असतील तर ठीक आहे. नाहीतर बाकीच्या दिवशी यावेळेत आम्ही ऑफीसात असू.

खेळाडूंपैकी किती जण भारताबाहेर आहेत? आणि अशांना भारतातील कोणत्या वेळी (भारतातील दिवसा ९-५ हा कालावधी शक्यतो टाळून) खेळता येईल? खटपट्या कॅलिफोर्नियात आहेत असं दिसतं आहे...

हो मला भारतातील रात्री १०:०० नंतर चालेल. आणि शक्यतो कॅलिफोर्नियाच्या शनिवारी किंवा रविवारी ठेवला तर बरे.

निराकार गाढव यांचे सर कुठाहेत? वो बहुत अच्छा बुद्धीबल खेलते हय अयसी खबर सुलतान को पंहुची हय.

बहुगुणी's picture

9 Jan 2015 - 3:59 pm | बहुगुणी

आतापर्यंत धाग्यात न आलेलं maheshw हे नाव कुणीतरी नोंदवलं आहे. हे सभासद कोण आणि ते भारतात असतात की इतरत्र? इतरत्र असतील तर भारतातील कोणत्या वेळी (भारतातील दिवसा ९-५ हा कालावधी शक्यतो टाळून) त्यांना खेळता येईल? लवकरात लवकर कळवा, म्हणजे ड्रॉ काढता येईल.

बहुगुणी's picture

9 Jan 2015 - 4:05 pm | बहुगुणी

maheshw (महेश प्रभाकर वायंगणकर) बोर्डावरच उपस्थित सापडले! मुंबई-स्थित आहेत असं त्यांच्या प्रोफाईल वरून दिसतंय. ठीक आहे, काही तासांत ड्रॉ काढला जाईल.

MaheshW's picture

9 Jan 2015 - 4:31 pm | MaheshW

वाट पाहत आहे

प्रत्येक चालीला वेळ १.५ किंवा २ मि. देण्या पेक्षा २० मि. किंवा ३ं० मि. सामने खेळ्वावेत.
चुकुन नेट कनेश्क्न गेल्यास २ मि. वेळ होवुन जाइल आणि चांगला स्पर्धक उगिचच बाद होइल.
अधिक महिती साठी www.chess.com ( live chess) बघावे.
मी. तिथे andykandy या नावाने आहे.
तेथे मी खेळ्लेले गेम बघता येइल व मी किती पाण्यात आहे ते आजमवता येइल. तसेच अजुन कोणी तिथे असेल तर सांगावे.

बहुगुणी's picture

9 Jan 2015 - 7:39 pm | बहुगुणी

मी इतक्यातच ड्रॉ अपलोड केला !! क्षमस्व!

माझा सामना वल्ली यांच्याशी?
सरळ ''बाय'' देऊन टाकावा काय?
नको.
दहा खेळ्यांत वल्ली जिंकू नयेत - इतकं जमलं तरी खूप झालं म्हणेन! ;-)

अहो मी खूप कच्चा खेळाडू आहे हो.

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2015 - 8:58 pm | श्रीगुरुजी

पूर्वी खूप बुद्धीबळ खेळलो आहे. ३ वर्षे महाविद्यालयाच्या संघात देखील होतो. पण अलिकडे बर्‍याच दिवसात सराव नाही. ऑनलाईन स्पर्धेत सामील व्हायचा मोह होत आहे. परंतु वेळ जमत नाहीय्ये. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

बहुगुणी's picture

10 Jan 2015 - 2:10 am | बहुगुणी
    • आधी लिहिल्याप्रमाणे १५ जानेवारीला स्पर्धा सुरू होईल.
    • स्पर्धेचा ड्रॉ वर दिला आहे. एकाच गटात पण दोन विभागांत 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेतली जाईल.
    • प्रत्येक दिवशी दोन सामने होतील.
    • प्रत्येक खेळाडूला विशिष्ट स्पर्धक क्रमांक दिलेला आहे, तो क्रमांक, आणि त्या त्या खेळाडूंचे लॉगिन व पासवर्ड ही सर्व माहिती या तक्त्यात आहे.
    • प्रत्येक दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजल्यापासून सामने सुरू होतील.
    • उभय खेळाडूंच्या सोयीनुसार सामना संध्याकाळी ६ ते दुसर्‍या दिवशी सकाळी १० पर्यंत केंव्हाही खेळता येईल, पण प्रत्येक सामना सुरू केल्यापासून प्रत्येकी ४० (दोन्ही खेळाडू मिळून ८०) चालीत आणि तीन तासांत संपला पाहिजे. (यामुळे, आंतर्जालाचं कनेक्शन खंडित होऊ शकण्याच्या शक्यता लक्षात घेऊन, प्रति-चाल दोन मिनिटे असे सक्त बंधन राहणार नसले तरीही एकूण वेळेच्या मर्यादेत मात्र सामना संपलाच पाहिजे.
    • एखादा सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला तर पुनर्युद्ध पुढील तीन तासांत घेण्यासाठी वेळ शिल्लक राहील. पहिला सामना बरोबरीत सुटला तर त्या जोडीमधेच अजून एक सामना घेतला जाईल, आणि तोही बरोबरीत सुटला तर त्या वेळच्या पट-स्थितीत ज्या खेळाडूचे मोहोर्‍यांचे सामर्थ्य आधिक असेल (आधिक मुख्य मोहोरी आणि आधिक प्यादी) त्या खेळाडूस मॉडरेटर विजयी घोषित करतील.
    • स्पर्धेसाठी मॉडरेटर म्हणून पैसाताई काम बघतील, त्यांचे आधीच मनःपूर्वक आभार!
    • स्पर्धकांना खेळण्यासाठी आधिक माहिती इथे आहे.
    • प्रेक्षकांना सामने पहाण्यासाठी माहिती इथे आहे.

    सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा!

बहुगुणी's picture

12 Jan 2015 - 7:50 pm | बहुगुणी

खटपट्या आणि आनंद यांनी व्यनिमध्ये विचारलं आहे की त्यांचा सामना १७ ऐवजी १८ ला ठेवता येईल का?
तुम्हा दोघांची हरकत नसेल तर तुम्ही दोघांनी तुमचा सामना १८ ऐवजी १७ ला ठेवला तर हे सहज शक्य होईल आणि इतर ड्रॉ बदलावा लागणार नाही. कॄपया इथेच होकार कळवा म्हणजे त्यांना कळेल.

खटपट्या आणि आनंद: तुम्ही अमेरिकेतील पीएसटी वेळेची विनंती केलीत. महेश आणि मृत्युंजय यांनी त्यांचा सामना १७ ला पूर्ण केला तर तुम्ही १८ ला तुमच्या सोयीने पीएसटी वेळेत खेळा.

MaheshW's picture

15 Jan 2015 - 12:08 pm | MaheshW

मृत्युंजय आपल्याला काही हरकत नसेल तर आपण आपला सामना १७ ला भारतीय वेळे नुसार संध्याकाळी ६ वाजता खेळू शकतो.

मृत्युन्जय's picture

15 Jan 2015 - 4:14 pm | मृत्युन्जय

दुपारी जमेल काय? मी ३ पासुन सुरु करु शकतो.

MaheshW's picture

15 Jan 2015 - 4:52 pm | MaheshW

मला वाटत आपण १८ लाच आपला सामना खेळूया. होणाऱ्या गैरसोयी बद्दल दिलगिरी.

मृत्युन्जय's picture

16 Jan 2015 - 1:23 pm | मृत्युन्जय

१७ ला रात्रे जमेल काय? असे निराश नका होउ. वेगवेगळ्या वेळा तर सांगा कुठल्या जमतील ते.

नमस्कार आणि भारतातील शुभ-सकाळ, मंडळी!

मिपाच्या पहिल्या-वहिल्या ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेचे पडघम वाजवतोय!

आजचे दोन सामने खालीलप्रमाणे आहेत:

१. गणपा आणि निराकार गाढव (स्पर्धक क्रमांक अनुक्रमे १ व २)

२. नन्दादीप आणि राजेश के (स्पर्धक क्रमांक अनुक्रमे ११ व १२)

खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी सूचना वरती दिलेल्या आहेत. खेळाडूंसाठी लॉगिन व पासवर्ड यांची माहिती या तक्त्यात आहे.

सर्व खेळाडूंनी त्यांच्या सामन्याच्या वेळा या तक्त्यात आणि या धाग्यात द्यायला विसरू नका, म्हणजे प्रेक्षकांना सामने पहाणे सोपे जाईल.

उभय प्रतिस्पर्धी खेळाडूंना शुभेच्छा!

आजच्या सामन्यांच्या वेळा कृपया अपडेट करा मंडळी!

आतिवास's picture

15 Jan 2015 - 4:18 pm | आतिवास

वल्ली, मी भारतीय वेळेच्या साडेतीन तास मागे आहे. पण आपला सामना रविवारी असल्याने अडचण येऊ नये.
तसाही मी दहा मिनिटं टिकाव धरण्याशी मतलब ;-)

मी पण खूप कच्चा खेळाडू आहे हो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2015 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रेक्षक म्हणुन मला लॉगीन करता येत नै ये काही उपाय ?

-दिलीप बिरुटे

आनंद's picture

15 Jan 2015 - 10:10 pm | आनंद

सामने कधी आहेत?
पहिला सामना बघण्याची उत्सुकता आहे.

पैसा's picture

15 Jan 2015 - 11:04 pm | पैसा

आजच्या दोन्ही सामन्यांच्या वेळा अपडेट मिळालेया नाहीत. आता काय करायचं? एका खेळाडूकडून काही कळलं नाही तर दुसर्‍याला पुढे चाल देता येईल. पण विअर्ड वीक्स वगळून इथे कोणीच अपडेट देत नाहीयेत.

प्रेक्षक म्हणून लॉग इन पण करता आलं नाही त्या धाग्यावर.

प्रेक्षक म्हणून लॉग इन करता येतंय, पण मला लॉगिन केल्यावर मिपा१, मिपा२, मिपा११ वा मिपा १२ यांपैकी कुणीच लॉगिन केलेलं (म्हणजे त्यांचे सामने चालू स्थितीत वा संपलेले) दिसले नाहीत! यांपैकी कुणालाच लॉगिन करता आलं नाही का?

प्रेक्षकांसाठी लॉगिन 'MiPa3' आणि password 'Watch' वापरा.

पैसा's picture

16 Jan 2015 - 8:51 am | पैसा

खेळाडूंसाठी २ लॉग इन विंडो आहेत ना, प्रेक्षकांसाठी कोणती आहे?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 8:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी खेळायला तयार आहे. भारतीय प्रमाणवेळ सायंकाळी ९.३० पासुन पुढे. कोणी ह्या वेळेत खेळायला उपलब्ध असेल तर नक्की कळवा.

मलाही तेच कळले नाही.दोन विंडो दिसतात.पण सामना कसा पहायचा?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 8:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जर कोणी तयार असेल तर व्य.नि. करा. म्हणजे दिवस ठरवता येईल..

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:04 am | पैसा

प्रगो ला पार्टनर नव्हता. गणपा आणी निराकार गाढव ऑनलाईन दिसले नाहीत. पहिल्या मॅचाइवजी तुम्ही दोघे आज खेळू शकता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 9:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चालण्यासारखं आहे. पण रात्री ९.३० ला. जर त्यांना जमत असेल तर सांगा. मी तयार आहे.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 10:46 am | प्रसाद गोडबोले

See you IST 2130 hours - Captain Barbosa =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 2:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आय आय फेलो पायरट!!!! २१३० अवर्स. ओव्हर अँड औट!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 2:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपली नावं ड्रॉ मधे दिसत नाहीयेत पण. क्या झोलझाल है?

पैसा's picture

16 Jan 2015 - 2:52 pm | पैसा

तुम्ही बारावे आणि तेरावे आहात. गणपा आणि निराकार गाढव कालपासून आजपर्यंत ऑनलैन न दिसल्याने त्यांच्याऐवजी तुम्ही खेळा म्हटले. बहुगुणी आले की ड्रॉ अपडेट करतील. तोपर्यंत कप्तान मिपा १ आणि निराकार गाढवाच्या जागी प्रगो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 8:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तोपर्यंत कप्तान मिपा १ आणि

निराकार गाढवाच्या जागी प्रगो.

अत्यंत स्फोटक वाक्यरचना. =))

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 8:28 pm | प्रसाद गोडबोले

निराकार गाढव हे आमच्या गुरुदेवांचा अगदी निराकार द्वेष करायचे , त्यांच्या जागी मला बसवुन पैसा ताईनी सूड उगवला आहे माझ्यावर गेल्या जन्मीचा .
आणि निराकार गाढव कोण आहे हे शोधुन सांग की राव असे दुसर्‍या एका संपादकाला खोदुन खोदुन विचारले तरीही त्याने ते सांगण्याचे टाळले.
शगले शंपादक दुश्त आहेत दुश्त दुदूदुदुदुदु :-\