✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

खूप छान !!

खटपट्या
Wed, 01/07/2015 - 10:09 नवीन
खूप छान !! जंगी सामने बघायला मिळतील अशी आशा ! आणी बरेच शिकायला मिळेल. --बुद्धीबळात नवखा....
  • Log in or register to post comments

सेम हियर...

मुक्त विहारि
Wed, 01/07/2015 - 10:34 नवीन
सेम हियर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

स्पर्धेला, स्पर्धकांना,

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/07/2015 - 10:39 नवीन
स्पर्धेला, स्पर्धकांना, आयोजकांना आणि हितचिंतकांना (ज्यात आम्हिही आहोत :) ) मनःपूर्वक शुभेच्छा ! *clapping* *good*
  • Log in or register to post comments

या नव्या अभिनव उपक्रमाला मन

सस्नेह
Wed, 01/07/2015 - 10:48 नवीन
या नव्या अभिनव उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मला नक्कीच आव्डेल सहभागी

मृत्युन्जय
Wed, 01/07/2015 - 11:30 नवीन
मला नक्कीच आव्डेल सहभागी व्हायला.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/07/2015 - 11:33 नवीन
माझं नाव घ्या भो स्पर्धेत. बाकी, या बहुगुणी माणसाचं मला लै कौतुक वाटतं. आपली सर्व कामं धामं सोडून मिपावर काही उत्तम उपक्रम राबवता येतो का याचा यांना इतका ध्यास लागलेला असतो की बस. बहुगुणी असेच. मागे एकदा यांनीच म्युझीकवरुन गाणं शोधायचा उपक्रम राबविला सर्वांना सहभागी करुन घेतलं. मिपाकरांचे दोन क्षण आनंदात गेले. आताही बहुगुणी यांचा हा उपक्रम मी पाहतोय. ऑनलाइन कशी स्पर्धा घेता येईल, कसे प्रेक्षक असतील, कसा डाव पाहता येईल, कसा कुठून कोड आणायचा चिटकावयाचा. लोकांचा सहभाग किती असेल नी काय, सालं अशा किती न काय गोष्टी कराव्या लागत असतात. नमस्कार हे भो आपल्या चिकाटीला. आणि तहेदिलसे शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Wed, 01/07/2015 - 11:37 नवीन
स्पर्धेत मी पण खेळाडू म्हणून सहभागी असेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पण...

योगी९००
Wed, 01/07/2015 - 12:33 नवीन
या नव्या अभिनव उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा !!!! मी पण स्पर्धेत भाग घेण्यास तयार आहे. पण खेळण्याची वेळ कशी असेल?
  • Log in or register to post comments

ड्रॉ बघू!

पैसा
Wed, 01/07/2015 - 12:39 नवीन
कुठून, किती स्पर्धक येतात त्यावर दोघा स्पर्धकांच्या सोयिची वेळ बघून ठरवू. वेळ कमी उरल्यामुळे प्रवेशिकांसाठी हा धागा काढलाय. बहुगुणींना वेळ मिळताच ते अधिक स्पष्ट करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

भाग घेणे बाबत

रक्तपिशाच्च
Sat, 01/24/2015 - 15:16 नवीन
मलाबी भाग घ्यायचा है …। कुठ कुठ नाव द्यावा लागल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरे देवा!

पैसा
Sat, 01/24/2015 - 18:03 नवीन
आता स्पर्धा संपत आली! पुढच्या वेळी नक्की भाग घ्या. बाकी तुमच्याबरोबर कोण खेळायला तयार होईल माहीत नै. अग्यावेताळ खेळेल कदाचित! दुसरा एक धागा आहे. http://misalpav.com/node/29850 तिथे रिक्वेस्टा. म्हणजे कोणीतरी सराव मॅच खेळायला सापडेल अधून मधून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रक्तपिशाच्च

अत्रुप्त आत्मा पण खेळतील असे

प्रचेतस
Sat, 01/24/2015 - 18:17 नवीन
त्यांचेबरोबर अत्रुप्त आत्मा पण खेळतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मला काही नीट खेळता येत नाही,

आतिवास
Wed, 01/07/2015 - 13:37 नवीन
मला काही नीट खेळता येत नाही, पण त्यानिमित्ताने शिकता येईल. इतर स्पर्धकांना माझ्यासारखी ''लिंबूटिंबू'' चालणार असेल तर मलाही आवडेल सहभागी व्हायला. वेळ वगैरे प्रश्न आहेतच म्हणा!
  • Log in or register to post comments

मी पण...

नन्दादीप
Wed, 01/07/2015 - 13:45 नवीन
लिंबूटिंबू गटात टाकणार असाल तरच....
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

बहुगुणी
Wed, 01/07/2015 - 18:22 नवीन
धन्यवाद! वरील प्रतिसादांतून आणि इतर व्य निं मधून खालील स्पर्धक भाग घेतील असं दिसतंय; या सर्वांची नावे या तक्त्यात आहेत, आधिक स्पर्धेच्छुक खेळाडूंनी शक्यतो तिथेच नावनोंदणी करावी (न जमल्यास इथे या धाग्यात मला कळवा):
  1. गणपा
  2. निराकार गाढव
  3. विअर्ड विक्स
  4. ब़जरबट्टू
  5. योगी ९००
  6. प्रा.डॉ. बिरुटे
  7. वल्ली
  8. मृत्युंजय
  9. आतिवास
  10. नन्दादीप
  11. बहुगुणी
मी १०-१९ जानेवारी या दरम्यान प्रवासात असल्याने त्या कालावधीत आयोजनात माझा सहभाग असणं कठीण आहे. संपादक मंडळापैकी कोणी जबाबदारी घेत असाल तर उत्तम, अन्यथा मला वाटतं ९ जानेवारी भारतीय प्रमाण वेळ दुपारी १२ पर्यंत जितक्या प्रवेशिका येतील त्यांतून दोन गट करून 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेऊ शकू (केवळ दहाच दिवस स्पर्धा असल्याने, आणि भारतातील व इतर देशातील कार्यालयीन वेळा टाळणं गरजेचं असल्याने 'राऊंड रॉबिन' पद्दतीने खेळणं कठीण आहे). आपण 'लिंबू-टिंबू' आणि 'लय भारी' अशा दोन गटात स्पर्धा घेऊ शकू. इच्छुकांनी आपापली नावे आणि अपेक्षित गट लवकरात लवकर नोंदवले तर १० जानेवारीस ड्रॉ प्रकाशित करू शकेन. सामन्यांच्या वेळेवरील मर्यादा पाहता आपण स्पर्धेसाठी 'ब्लिट्झ' ही पद्धत वापरावी असं सूचवेन (उदाहरणार्थः प्रत्येक चालीसाठी ५ मिनिटे मर्यादा, प्रत्येकी ४० अशा एकूण ८० चाली; म्हणजे एक सामना साधारण ७ तासांत संपावा.) दर दिवशी १ 'लिंबू-टिंबू' आणि १ 'लय भारी' असा सामना झाल्यास अंदाजे २० सामने १० दिवसांत संपू शकतील. म्हणजे प्रत्येक गटास १० खेळाडूची मर्यादा असावी. या हिशोबाने आणखी १० खेळाडू सहभाग घेऊ शकतील. त्यांनी आपली नावे लवकर नोंदवावी. महत्वाचे म्हणजे आपल्याला प्रत्येक सामन्यासाठी एका निरीक्षकाची (मॉडरेटर ची) गरज असेल, नियम जाणणारे स्पर्धकांपैकीच वा इतर प्रेक्षकांपैकी कोण कोण यासाठी उपलब्ध असू शकतील तेही कळवा. उत्साही सहभागाबद्दल आभार!
  • Log in or register to post comments

मी असेनच

पैसा
Wed, 01/07/2015 - 19:09 नवीन
मी उपलब्ध असेन. मात्र मला लेटेस्ट नियम परत वाचून काढावे लागतील. भारतीय पद्धतीचे माहीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

धन्यवाद

बहुगुणी
Wed, 01/07/2015 - 19:12 नवीन
स्पर्धक म्हणूनही असालच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

स्पर्धक म्हणून नाही

पैसा
Wed, 01/07/2015 - 21:28 नवीन
मॉडरेटर म्हणून काम करायचं तर स्पर्धेत भाग नाही घेता येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

खेळाची आइडिआ लय भारी. कोड

कंजूस
Wed, 01/07/2015 - 18:30 नवीन
खेळाची आइडिआ लय भारी. कोड मिळाला की ते डाव पटावर खेळून बघणार आहे.
  • Log in or register to post comments

बुद्धीबळाचे नियम

बहुगुणी
Wed, 01/07/2015 - 19:15 नवीन
ज्यांना हवे असतील त्यांच्यासाठी बुद्धीबळाचे नियम इथे आहेत.
  • Log in or register to post comments

बुधिबल स्पर्ध

सत्कुल
Wed, 01/07/2015 - 23:40 नवीन
मी इछुक आहे
  • Log in or register to post comments

नाव देणार्‍या प्रत्येकाने आपापल्या कौशल्य-गटाची माहिती द्या

बहुगुणी
Wed, 01/07/2015 - 23:48 नवीन
नाव देणार्‍या प्रत्येकाने आपापल्या कौशल्य-गटाची माहिती देखील द्यायची आहे (खर्री-खुर्री ;-) ), म्हणजे 'लिंबू-टिंबू' की 'लय भारी', त्याप्रमाणे ड्रॉ काढणं सोपं जाईल.
  • Log in or register to post comments

एकच ओपन ड्रॉ असु द्यावे अशी

मृत्युन्जय
गुरुवार, 01/08/2015 - 10:44 नवीन
एकच ओपन ड्रॉ असु द्यावे अशी सूचना करतो आहे. कोण लिंबु टिंबु आणि कोण प्रोफेशनल ते नाही सांगता येणार. उदा. माझ्याबाबत म्हणाल तर मी लिंबु टिंबु नसेन तरी लय भारी गटात नक्कीच नाही मोडणार. अश्या वेळेस मला कुठल्याही गटात टाकले तरी ते चुकीचेच होइल. प्राडो, संक्षी, चतुरंग, ररा सोडले तर बाकी बरेच लोक लय भारी गटात नाहिच मोडणार. त्यापेक्षा सरळ एकच गट करा. या प्रकाराने कदाचित २ संभाव्य विजेते पहिल्याच फेरीत एकमेकांशी लढतील आणि एक बाद होइल. पण नाइलाज आहे. खेळाडुंची कौशल्यसीमा माहिती नसल्याने यावेळेस असे होइल. पुढच्यावेळेसपासुन रेटिंग देता येइल शिवाय प्रत्येक चालीला जास्तीत जासत १.३० मिनिटे वेळ द्यावा अशीही सूचना करावीशी वाटते आहे.,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

+१

बहुगुणी
गुरुवार, 01/08/2015 - 11:31 नवीन
माझ्याबाबत म्हणाल तर मी लिंबु टिंबु नसेन तरी लय भारी गटात नक्कीच नाही मोडणार. हे माझ्या बाबतीत बहुतेक खरं असेल! शिवाय प्रवासामुळे सलग उपलब्धता नसल्याने मी स्पर्धेत भाग घेईनच हे नक्की नाही. तेंव्हा इतर कुणाची हरकत नसेल तर एकच ओपन गट करण्यास माझी व्यक्तिशः हरकत नाही. प्रत्येक चालीची कालमर्यादाही ५ मिनिटांवरून दीड/दोन मिनिटे इतकी कमी करण्याने सामन्याची वेळ आटोपशीर होईल हेही मान्य, त्यावर काय मतं आहेत पब्लिकची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+२

प्रचेतस
गुरुवार, 01/08/2015 - 11:33 नवीन
सहमत. एकच ओपन गट असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

बरोबरी झाली तर?

पैसा
गुरुवार, 01/08/2015 - 12:16 नवीन
काही सामने बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे. तेव्हा बाद कसे ठरवणार? सरमिसळ दोन गट करून त्यात राउंड घ्यायच्या आणि मग त्यातून पहिले येतील त्यांची फायनल असे जमेल का? किती सामने होतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

बरोबरीत सुटलाच तर त्या

प्रचेतस
गुरुवार, 01/08/2015 - 12:24 नवीन
बरोबरीत सुटलाच तर त्या जोडीमधेच अजून एक सामना खेळवावा. हे चक्र निकाली ठरेपर्यंत असे चालू राहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भाग घेण्यास इच्छुक.

Rajesh K
गुरुवार, 01/08/2015 - 00:36 नवीन
भाग घेण्यास इच्छुक.
  • Log in or register to post comments

मी अर्थातच ''लिंबू-टिंबू''

आतिवास
गुरुवार, 01/08/2015 - 00:40 नवीन
मी अर्थातच ''लिंबू-टिंबू'' गटात!
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम आहे!

अजया
गुरुवार, 01/08/2015 - 07:14 नवीन
मी आधी स्पर्धा बघेन!माझ्याही पेक्षा लिंबू -टिंबू कोणी दिसलं(मिळणं कठीण आहे.पण प्रयत्न करुन पाहू!) ^_~ की पुढच्या स्पर्धेत भाग घेईन.
  • Log in or register to post comments

छान उपक्रम..

इशा१२३
गुरुवार, 01/08/2015 - 15:29 नवीन
अजया मी तुझ्यासारखीच(लिंबु-टिंबु).भाग घ्यायचाय पण पुढच्या स्पर्धेत आत्ता प्रेक्षकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अतिशय स्तुत्य उपक्रम!

उमा @ मिपा
गुरुवार, 01/08/2015 - 09:35 नवीन
अतिशय स्तुत्य उपक्रम! स्पर्धा कशी होणार हे पाहण्यास उत्सुक आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

चालीस १- २ मिनटे वेळ पुरेसा

विअर्ड विक्स
गुरुवार, 01/08/2015 - 11:39 नवीन
चालीस १- २ मिनटे वेळ पुरेसा वाटतो. माझ्यामते प्रत्येकाने आपली वेळ उपलब्धी टाकली तर अजून बरे होईल. व स्पर्धा खुल्या गटातच व्हावी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, विअर्ड विक्स आणि वल्लीशेठ

बहुगुणी
गुरुवार, 01/08/2015 - 12:02 नवीन
आणखी काही मान्यतेची / विरोधातली मतं येताहेत त्याची वाट पाहू, आणि मग एकाच गटात आणि प्रत्येक चालीस दोन मिनिटे कालमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेऊयात. अजया, कंजूस, खटपट्या, इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता : स्पर्धा दुरून पहाण्यापेक्ष सरळ भागच घ्याना, इथे सगळेच हौशी आहेत आणि सामने खेळीमेळीनेच होतील, तेंव्हा हार-जीतीला फारसं महत्व द्यायला नको :-) या मैदानात!
  • Log in or register to post comments

मागे एकदा म्हटल्याप्रमाणे,

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/08/2015 - 19:00 नवीन
मागे एकदा म्हटल्याप्रमाणे, माझा बुद्धिबळ खेळायचा अनुभव कॉलेजच्या मेसमध्ये लंच अवरमध्ये खेळलेल्या "कम्युनिटी चेस" या व्हर्शन इतकाच मर्यादित आहे. त्या व्हर्शनमध्ये समोरासमोर बसलेल्या दोन खेळाडूंच्या भोवती असंख्य उभ्या कम्युनिटी मेंबरांचा (इतर विद्यार्थांचा) घोळका असतो आणि बसलेल्या खेळाडूंपेक्षा जास्त चाली उभे असलेले कम्युनिटी मेंबरच (प्रसंगी बसलेल्या खेळाडूचे हात पकडून ठेऊन :) ) करतात. बुद्धिबळचे हे अडव्हान्स्ड व्हर्शन मिपावर आल्यावर मी कम्युनिटी मेंबर म्हणून भाग घेईन, त्याचा माझा अनुभव फार मोठा आहे. तोपर्यंत मी प्रेक्षक असलेलाच बरा +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

ठिक आहे घेतो भाग. पण हरलो तर

खटपट्या
गुरुवार, 01/08/2015 - 22:49 नवीन
ठिक आहे घेतो भाग. पण हरलो तर हसायचे नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

एक्सल मधे नोंद करून शेअर केले

खटपट्या
गुरुवार, 01/08/2015 - 22:52 नवीन
एक्सल मधे नोंद करून शेअर केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पहिली स्पर्धा बघुन हरायचा

अजया
Fri, 01/09/2015 - 09:36 नवीन
पहिली स्पर्धा बघुन हरायचा हुरुप येईल हो! नाहीतर आमच्यासाठी वेगळे रुल ^_~ आम्ही अामचा बोर्ड आणू.आम्हाला पांढरेच पाहिजेत.चार वेळा औट तर एकदा औट =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

ऑन लाइन खेळणे जरा कठीण वाटत आहे...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/08/2015 - 12:18 नवीन
त्यामुळे, ह्या वर्षी फक्त अंदाज...
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम. माझही नाव घ्या

आनंद
गुरुवार, 01/08/2015 - 22:42 नवीन
चांगला उपक्रम. माझही नाव घ्या स्पर्धे साठी.
  • Log in or register to post comments

मंडळी...

बहुगुणी
Fri, 01/09/2015 - 03:04 नवीन
मंडळी, ९ जानेवारी भारतीय प्रमाण वेळ दुपारी ५ पर्यंत जितक्या प्रवेशिका येतील त्यांतून ड्रॉ काढून एकाच गटात 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेतली जाईल. सामने १५ तारखेपासून सुरू होतील. तांत्रिक अडचणी न येता दर दिवशी दोन सामने एकाच वेळी (in parallel) घेता यावेत असं सध्या तरी दिसतं आहे. काही कल्पना सर्वांच्या विचारार्थः
  1. प्रत्येक खेळाडूस प्रत्येक चालीसाठी दोन मिनिटे मर्यादा असेल, आणि प्रत्येकी जास्तीत जास्त ४० चालीत सामना संपवावा लागेल, म्हणजे एकूण १६० मिनिटांत (अडीच तासाहून थोड्या आधिक वेळात) प्रत्येक सामना संपेल.
  2. प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.
  3. एखादा सामना बरोबरीत सुटलाच तर त्या जोडीमधेच अजून एक सामना त्याच संध्याकाळी घेतला जाईल, आणि तोही बरोबरीत सुटला तर त्या वेळच्या पट-स्थितीत ज्या खेळाडूचे मोहोर्‍यांचे सामर्थ्य आधिक असेल (आधिक मुख्य मोहोरी आणि आधिक प्यादी) त्या खेळाडूस मॉडरेटर विजयी घोषित करतील.
सध्या १५ खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत, त्यांपैकी माझा सहभाग पहिले ४ दिवस कठीण असल्याने, आणखी २ खेळाडू आले तर १६ खेळाडूंमध्ये ड्रॉ काढून स्पर्धा निर्धारित वेळेत संपवणं शक्य आहे. तेंव्हा ९ जानेवारी भारतीय प्रमाण वेळ दुपारी ५ पर्यंत आणखी २ खेळाडूंनी नावे नोंदवावीत असं आवाहन करतो.
  • Log in or register to post comments

आत्तापर्यंत खालील १७ लोकांनी

खटपट्या
Fri, 01/09/2015 - 04:30 नवीन
आत्तापर्यंत खालील १७ लोकांनी नावे नोंदवलेली आहेत. गणपा निराकार गाढव विअर्ड विक्स ब़जरबट्टू योगी ९००  प्रा.डॉ. वल्ली मृत्युंजय आतिवास नन्दादीप बहुगुणी Rajesh K गजानन खटपट्या आनंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

१७ नव्हे १४

बहुगुणी
Fri, 01/09/2015 - 06:10 नवीन
वरच्या यादीत मी सोडून १४ जणांनी नावे नोंदवली आहेत (मी जाने. १५-१९ प्रवासात असल्याने मिपावर दीर्घकाळ येणं अशक्यच आहे.) म्हणून आणखी दोन खेळाडू सामावून घेऊ शकू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सत्कुल

पैसा
Fri, 01/09/2015 - 11:03 नवीन
सत्कुल राहिला/राहिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

धन्यवाद!

बहुगुणी
Fri, 01/09/2015 - 15:51 नवीन
सत्कुल यांचं नाव यादीत घातलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी खेळतो

प्रसाद गोडबोले
Fri, 01/09/2015 - 16:40 नवीन
मी खेळतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

तुला विरोधी कोण नाही

पैसा
Sat, 01/10/2015 - 19:25 नवीन
खेळायला आणखी स्पर्धक नाही! मॉडरेटर म्हंणून काही सामने बघ. मला एकटीला जास्त होतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ओके

प्रसाद गोडबोले
Mon, 01/12/2015 - 11:49 नवीन
ओके . मग आपण च्यॅम्पियन च्यॅलेंजर असा फॉरमेट ठेवु , सर्व फेर्‍यांच्या शेवटी जो जिंकेल त्याला मी चॅलेंजर म्हणुन आव्हान देईन , मग एक दोन मॅचेस खेळेन त्याच्याशीच :D
मॉडरेटर म्हंणून काही सामने बघ.
हेही चालेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओके . मग आपण च्यॅम्पियन

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/12/2015 - 11:58 नवीन
ओके . मग आपण च्यॅम्पियन च्यॅलेंजर असा फॉरमेट ठेवु , सर्व फेर्‍यांच्या शेवटी जो जिंकेल त्याला मी चॅलेंजर म्हणुन आव्हान देईन , मग एक दोन मॅचेस खेळेन त्याच्याशीच Biggrin हायला ! "यावर्षी पहिल्यांदा सुरू झालेल्या स्पर्धेच्या मागच्या वर्षीच्या (न झालेल्या) स्पर्धेचा विजेता मीच" इतका उच्च दावा मिपातल्या "मी, मी आणि मीच" म्हणणार्‍या चँपियन्सनाही आजपर्यंत जमलेला नाही हे जाहिर करण्यास आणंद होत आहे :) ;) +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मागच्या वर्षीच्या (न झालेल्या

प्रसाद गोडबोले
Mon, 01/12/2015 - 13:13 नवीन
मागच्या वर्षीच्या (न झालेल्या) स्पर्धेचा विजेता मीच"
>>> मी न झालेल्या स्पर्धातच जिंकतो हो एक्काकाका ;) बाकी मिपावरुन गुरुदेव गेले , मसीहांची बोलती बंद केली मिपाकरांनी , प्रवचनकारांना उप'रति' झाली बहुतेक . एकुणच काय तर मिपावरची अहंगंगा अचानकच माणगंगेसारखी कोरडी पडल्याने आम्ही थोडेफार नाशिशिझम करावयाचे ठरवले आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा