अनपेक्षित भाग ३

निमिष ध.'s picture
निमिष ध. in जनातलं, मनातलं
12 Mar 2013 - 7:35 pm

मी पण एकदम चमकून ती भारतीय मुलगी आताच भारतातून आली आहे हे भान येउन तिला दूर केले.

(भाग २)

तिचे समान घेऊन गाडीकडे निघलो. प्रवास कसा झाला, विमानात काय आवडले असे प्रश्न विचारून झाले. गाडीपाशी आल्यावर समान मागे टाकले आणि तिच्यासाठी दार उघडले. ती सांगत होती कि तिला गाडी आवडली. रस्त्यावर दुतर्फा असलेली गर्दी एकदम शिस्तीत होती. पहिल्यांदाच इतके बर्फ पाहून ती हरखून गेली. पण थंडी असल्यामुळे काकाडली होती. तो पर्यंत गाडीचे हिटर गरम झाले आणि तिचे काकादाने जर कमी झाले. ती बरोबर बसली होती पण माझे लक्ष मात्र सारखे घड्याळाकडे जात होते. दुपार झाली होती आणि संध्याकाळी रेनाला भेटायचे होते.

नूरीच्या घरी तिला सोडले. नूरीनी चहा तयारच ठेवला होता. अहाहा या थंडीत गरम आले घातलेला चहा म्हणजे सुख आणि तो स्वतःला करावा नाही लागला म्हणजे स्वर्ग!! अनुष्काला नूरीचे घर आवडले आणि नूरीही. त्यांचे चांगले सूत जुळले. ती तिचे समान लगेच उघडायला लागली. मीच मग म्हणालो आता इतक्या घाईने उघडायची काही गरज नाही आता आराम कर पण झोपू नको. एकदा झोपेचे वेळापत्रक नीट झाले की काही काळजी नाही.
चहा संपल्यावर तरीही तिने थोडे समान उघडलेच आणि काजू कतलीचा दाबा काढला. मग काय मी लगेच तीन - चार वाड्यांचा फडशा पडला. अहो इतक्या दिवसांनी मिठाई मिळाली की राहवत नाही. आता मात्र नूरी आणि अनुष्का दोघीही हसत होत्या. तेवढ्यात माझा फोन वाजला. रेनाचा मेसेज होता. तिला सिनेमाच्या आधी काही तरी खरेदी करायची होती. मग मी या दोघींचा निरोप घेतला आणि निघालो. अनुष्का थोडी उदास वाटली, प्रवासामुळे थकली असेल बहुदा.

रेनाबरोबर खरेदी म्हणजे काही फार गम्मत नसते पण आज चक्क तिने मला मुलांच्या विभागात नेले. दोन - तीन शर्ट काढून दिले आणि घालून पाहायला सांगितले. मला काही कळलेच नाही पण तो शर्ट माझ्यासाठीच होता. तिला घालून दाखवला तर लगेच आपल्या फोन मध्ये फोटो काढून घेतले.
सिनेमाला काही फार गर्दी नव्हती. सुरु झाल्यावर थोड्याच वेळानी तिने माझा हात हातात घेतला आणि पूर्णवेळ तसाच ठेवला. मारामारी सुरु झाली आणि पडद्यावर रक्तपात दिसायला लागली की रेना मला बिलगली. आज माहौल काही तरी वेगळाच दिसत होता.

तिला घरी सोडले आणि तिच्या दारापर्यंत चालत आलो. अचानक तिने "तू मला आवडतोस" म्हटले आणि माझ्या ओठांवर ओठ टेकवले. लगेच आत निघून गेली. आता मात्र मला काही सुचत नव्हते. तशाच तंद्रीत मी गाडी काढली. घरी पोहोचून आजच्या दिवसाचा विचार करत झोपलो.

(भाग ३)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

15 Mar 2013 - 2:35 pm | महेश हतोळकर

आजून थोडे मोठे भाग चालतील.
पु.भा.प्र.

पुढच्या भागाच्य प्रतिक्षेत.. पण हा भाग खुपच छोटा झाला का?

पूढचा भाग लौकर टाका निम्धु काका

वेटिंग ..