अनपेक्षित भाग २

निमिष ध.'s picture
निमिष ध. in जनातलं, मनातलं
6 Mar 2013 - 10:02 am

आणि कोणाच्या तरी ओळखीने राहण्यासाठी जागा पाहण्याची विनंती करून संभाषण संपले. आता जागा पाहणे आले असे म्हणतानाच बॉस चा ईमेल आला. काही तरी नवे काय अजून काय!

(भाग १ )

आज संध्याकाळी कोणाचा मेसेज आहे का ते पाहत होतो. अनुष्काचा होताच. या कामाच्या रगाड्यात तिच्यासाठी कोणाला जागा आहे का ते विचारणे राहूनच गेले होते. तिला sorry म्हणून या आठवड्यात नक्की काम करतो असे सांगितले. थोडे इकडचे तिकडचे बोलून ती गेली. मी लगेच फोन फिरवला. नूरी ला विचारले तिच्या कोणी मैत्रिणी रूममेट शोधतात का. आणि काय विचारता पहिल्याच फटक्यात जागा मिळाली. नूरीचीच रूममेट सोडून जाणार होती त्यामुळे ती कोणाला तरी शोधतच होती. लगेच अनुष्काला मेसेज टाकला. म्हटले काम फत्ते. पण येताना काजू कतली घेऊन यावी लागेल खास!! तिला नूरीला फेसबुक वर भेटायला सांगितले आणि मी माझ्या जावाबादारीतून मोकळा झालो.

तेवढ्यात रेनाचा मेसेज आला. संध्याकाळी काही तरी वेगळे करायचा विचार होता. मग काय निघालो आणि जिम मध्ये जाऊन rock-climbing केले. तिच्याबरोबर कोठेही मजा असते. पुढच्या वेळेस badminton खेळायचे ठरले. रेना खरच चांगली मुलगी आहे आणि माझ्यात जर जास्तीच रस घेतीये असे वाटत होते. रॉब पण चिडवत होता काय सारखे रेना बरोबर फिरत असतो. काय विचार आहे ? त्याला आमचे ठराविक उत्तर दिले "अरे फक्त मैत्रीण आहे रे". आज`एकदम कामाचा विचार न करता मुलींचा विचार करत झोपलो.

परीक्षा आल्या आणि सेमिस्टर संपायची वेळ झाली. थंडी भरपूर वाढली आणि त्यात बर्फ हि भरपूर पडले. त्यामुळे बाहेर जाऊन काही करावेसे वाटत नव्हते. मग काय आपण आणि आपला अभ्यास. रेना पण अभ्यासात मग्न आहे त्यामुळे अजून काही चालू नाही. नाही म्हणायला अनुष्काला सूचना देणे चालू आहे. आजच तिला मेसेज केला. किती पैसे आणायचे - कसे आणायचे - पासपोर्ट नीट सांभाळ. ती म्हणाली इतक्या सूचना द्यायला मी काही कुक्कुलं बाल नाही. खूप दिवसांनी कुक्कुलं शब्द ऐकला. या अभ्यासात काही तरी विरंगुळा.

आज संध्याकाळी रेनाबरोबर सिनेमा पाहायला जायचे आहे. परीक्षा संपल्यामुळे आज जर उशिराच उठलो. फोन वाजतो आहे असे वाटले. पाहतो तर कोठला तरी अनोळखी नंबर होता. तरी उचलला. आणि काय अनुष्काचा फोन होता. ती न्यूयॉर्क विमानतळावरून बोलत होती. थोड्याच वेळात इकडे पोहोचणार होती. श्याSS विसरलोच! तिला सांगितले होते विमानतळावर घ्यायला येईन म्हणून. तिला म्हटलो काळजी करू नकोस. येतोच घ्यायला. आवरायला घेतले आणि नूरीला फोन टाकला. पाहायला हवे ती घरी आहे की नाही. सुदैवानी तिच्या लक्षात होते अनुष्का येणार आहे ते. तिनी एक खोली रिकामी करून ठेवली होती. तिला सांगितले मी येतो अनुष्काला घेऊन थोड्याच वेळात.

विमानतळावर थोडे आधीच पोहोचलो. गाडी लावून आत गेलो. कुठल्या पत्त्यावर न्यूयॉर्कहून येणारे सामान आहे ते लिहिले होते त्याच्या जवळ जाऊन उभे राहिलो. इकडे हे तरी चांगले आहे. जरा आतमध्ये उभे राहता येते. नाही तर मुंबई विमानतळावर बाहेर वाट बघताना उकाडा आणि डास अगदी हैराण करतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांचेही बरोबर वाटते. विमान आल्याची सूचना झाली आणि माझे डोळे जिन्याकडे लागले. बरेच प्रवासी उतरल्यावर अगदी शेवटी शेवटी अनुष्का हळू हळू उतरत होती. एक बावरलेला भाव होता तिच्या चेहऱ्यावर. तिचे डोळे कोणीतरी ओळखीचे शोधत होते.

आमची नजरानजर झाली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. नजरेत चमक आली आणि तिनी जोरात हात हलवून मला हाय केले. जत्रेत हरवलेल्या मुलाला त्याचे आई-बाबा सापडल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद तिला झालेला वाटत होता. ती खाली उतरून माझ्या जवळ आली. मी नकळत हात पुढे केले. तिला मिठीत घेतले. अशी मिठी मित्र-मैत्रिणींची इकडे सामान्य असते. ती सुद्धा प्रथम खुश झाली. मग मात्र बावरून लगेच दूर झाली. मी पण एकदम चमकून ती भारतीय मुलगी आताच भारतातून आली आहे हे भान येउन तिला दूर केले.

(भाग २)

कथा

प्रतिक्रिया

कथेच्या वेगाचं गणित फार सुरेख साधलयं. सहिच!

निमिष ध.'s picture

6 Mar 2013 - 11:37 am | निमिष ध.

आपल्याला कथा आवडतिये हे वाचुन आनन्द झाला.