(ही एक पूर्णतः काल्पनिक कथा आहे. कोणतेही साधर्म्य हा एक निव्वळ योगायोग मानावा)
सकाळची सवय उठल्या उठल्या फेसबुक उघडले. फोनवरच असल्यामुळे अंथरुणातून उठण्याचीही गरज नाही. तसेही सकाळी हवामान पाहणे आणि बातम्या वाचून झाल्यावर फेसबुक उघडलेच जाते पण आज सकाळी सकाळी नोटिफिकेशन मध्ये एक नवीन फ्रेंड्स रिक्वेस्ट होती. पहिले तर कोणीतरी अनोळखी कन्या होती. आताशा अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे बंदच केले आहे. तरीही कॉलेज मध्ये गेल्यावर कॉम्प वर परत फेसबुक उघडले. कन्या दिसायला तर एकदम सुंदर होती. जास्ती काही कळले नाही - प्रायव्हसी सेटिंग एकदम जोरदार होत्या. मित्रांमध्ये तीन चार ओळखीचे चेहरे दिसल्यामुळे एक्सेप्ट केली आणि नेहमीच्या कामाला लगलो.
भरपूर काम होते आणि एकाच आठवड्यात दोन परीक्षा होत्या त्यामुळे त्या सकाळच्या कन्येचा विसरच पडला. दिवसभर एकदम धावपळीत गेला. संध्याकाळी रेनाबरोबर कॉफी प्यायला गेलो. एकदम झकास मुलगी. सोनेरी केस आणि गहिरे निळे डोळे. अशा वर्णनाच्या मुली मठ्ठ असतात असा समज आहे तो हिने अगदी खोटा ठरवला आहे. वेगवेगळ्या विषयांचा व्यासंग आणि अतिशय बोलघेवडी त्यामुळे हिच्याबरोबर वेळ कसा जातो काही कळतच नाही. तिच्याबरोबर बसून रहावेसे वाटते पण सध्या कामच इतके असल्यामुळे काही पुढे जाता येत नाही. असे वाटते की आता नेहमीचीच सबब झाली आहे. मुलगी चांगली वाटती. तिच्याबरोबर दोन तीन वेळा कॉफी - खाणे पिणे होते. दोघे मिळून चित्रपट पाहणे ही होते. पण गाडी काही पुढे सरकत नाही. बहुतेक मुली कंटाळतात आणि मग कोणीतरी दुसरा शोधतत. आपण मात्र "काम आहे - वेळ नाही." आता मागच्याच महिन्यात एका कन्येबरोबर चार वेळा भेटणे झाले. चारही वेळा फक्त ती अन मी. भरपूर गप्पा झाल्या. आणि मग एकदम खूप काम वाढले आणि परीक्षा आल्या. मग दोन आठवडे फोन करायला पण वेळ नाही. शेवटी ती दिसली तर कोणी तरी तिसराच तिच्या हातात हात घालून फिरत होता. आपण आपले काम भले असे मार्गक्रमण करतो.
आज सकाळीच मातोश्रींचा मिस्ड कॉल आला. त्यांना फोन केला तर नेहमीचेच पुराण चालू झाले. लग्न कधी करतो - करून टाक आता. त्यांना पण "काम आहे - वेळ नाही" सबब ऐकवली. मागच्याच आठवड्यात परीक्षा होऊन गेल्यामुळे जरा निवांतपणा होता मग काय फेसबुक चालू केले. काम पण कमी असल्यामुळे कधी नव्हे ते कोण कोण ऑन लाइन आहे ते पहिले. कोणी जास्ती दिसत नव्हते. असे काम नसल्यामुळे नुसते पकलो होतो. वाटले आता हे बंद करून रेनाला मेसेज करावा आणि कोठेतरी बाहेर जावे. तेव्हड्यात मंजुळ आवाज झाला आणि पाहतो तर कोणी तरी Hi केले होते. पाहतो तर तीच मागच्या आठवड्यातली कन्या. मी तर तिला पूर्णपणे विसरूनच गेलो होतो.
बोलणे सुरु झाले - ओळखी पाळखी निघाल्या. कळले की अनुष्का आमच्याच कॉलेज ला होती. परंतु तीन वर्ष मागे असल्यामुळे कधीच ओळख झाली नव्हती. मित्र आणि इकडून तिकडून तिला माहिती कळली होती आणि ती सुद्धा आमच्याच युनिव्हर्सिटित शिकायला येत होती. आमच्याच कॉलेजातून शिकायला येणार म्हटल्यावर मी जर अजून चौकशी केली पण काही फार उत्तरे मिळाली नाहीत. उलट मलाच थंडी, हवामान, इतर विद्यार्थी अशा शंका विचार्य गेल्या. आणि कोणाच्या तरी ओळखीने राहण्यासाठी जागा पाहण्याची विनंती करून संभाषण संपले. आता जागा पाहणे आले असे म्हणतानाच बॉस चा ईमेल आला. काही तरी नवे काय अजून काय!
(भाग १ )
प्रतिक्रिया
23 Feb 2013 - 2:39 pm | पैसा
चांगली सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
23 Feb 2013 - 9:37 pm | निमिष ध.
धन्यवाद पैसा ताई!
26 Feb 2013 - 6:36 am | स्पंदना
अंहं! भलता बीझी दिसतो हिरो.
पु.भा.प्र.