मोक्ष कुणाला हवाय?

रविंद्र गायकवाड's picture
रविंद्र गायकवाड in काथ्याकूट
13 Nov 2011 - 10:16 am
गाभा: 

कोण तू वाचलं... आणि अनेक दिवस मनाच्या कोपर्‍यात राहून गेलेला प्रश्न पुन्हा डोक्यात थैमान घालतोय..
मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ???
सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Nov 2011 - 10:50 am | श्री गावसेना प्रमुख

मग मोक्षाची गरज कुणाला आहे?
(कपाळ) मोक्ष करुन घ्या आजु बाजुचे वातावरण बघुन

मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ???
सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?

रविन्द्र'जी... इथे मुळात गोडाऊन मध्येच गडबड आहे.. त्यामुळे माल चान्गला निघत नाहीये.... :)
म्हणजे, मुळात तुमच्या मोक्षाविषयीच्या, आत्म्याविषयीच्याच संकल्पनेत काहीतरी गडबड आहे.. त्यामुळे तुम्हाला कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीयेत.

मुळात "मी" म्हणजे आत्मा आहे. आणि "आत्मा" म्हणजे सूक्ष्म किन्वा स्थूल देह नाही. परन्तु.. हाच्च "मी" म्हणजे आत्मा त्याच्या कर्मपूर्ततेसाठी जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो.. पर्यायाने एका "शरीरा"त प्रवेश करतो.. तेव्हा बाय डीफॉल्ट नॉर्मल शरीराला असणार्‍या प्रत्येक उपाधि त्याला लागतात. उदाहरणार्थः मन, बुद्धी, विविध गरजा, नाती, सुखसोई, इच्छा, आकांक्षा इत्यादि इत्यादि...

तेव्हा "माझी" म्हणजे "एका आत्म्याची ओळख" म्हणजे "ते" शरीर बनते. अर्थात कर्म भोगण्यासाठी -(चान्गले वाईट दोन्ही...) असलेले आत्म्याचे माध्यम म्हणजे "शरीर" च असते. आणि पृथ्वीच्या नियमानुसार नुसता आत्मा कुणाला दिसत नाही.. त्या आत्म्याला व्यक्त होण्यासाठी ३ डायमेन्शनल शरीराचीच गरज असते. मग ते शरीर कुणाचेही असो- स्त्री / पुरुष / प्राणी / पक्षी... इ. कुणीही.
मग त्या शरीराला नाव मिळते.. आणि आपोआपच उपाधि चिकटतात.

शरीराच्या गुणधर्मानुसार मग मन, चित्त, अहन्कार इ. गोष्टी आपसूकच येतात. बाल्य तारुण्य वार्धक्य या शरीराला प्राप्त होणार्‍या अवस्था हा सृष्टीचा नियमच आहे. आणि तो मनुष्य, प्राणी, फूल, पान, वृक्ष, पक्षी या सर्वांना लागू होतो.

आता प्रश्न उरतो तो "मी" म्हणजे कोण.. हे शोधण्याचा.... मी म्हणजे "आत्मा" आहे.. असे जरी अनेक थोर पुरुष आपल्याला सांगत असले, तरी जोपर्यंत आपल्याला स्वतःहून त्याची जाणीव होत नाही.. तोपर्यन्त बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
कारण रवीन्द्र'जी...जेव्हा जेव्हा एखादा माणूस "मी" म्हणजे कोण याचा शोध घेतो.. तेव्हा तेव्हा आपल्याला पडलेले प्रश्न त्यालाही पडतात. मग सुरु होतो.. त्याचा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास!!

या प्रवासात जर "परमपूज्य" किन्वा "सद्गुरु" पदी आरूढ झालेल्या गुरु'ची मदत मिळाली.. तर गुरुसहाय्याने शरीरात राहूनही "आत्म्या"बद्दल जाणून घेणे शक्य होते.. पण ही साधना तितकीशी सोपी नही.. त्याची अनेक पथ्ये असतात.. अर्थात त्यासाठी तुम्ही तुमच्या गुरुने दिलेल्या मार्गावरून चालले पाहिजे. तत्ववेत्त्या गुरुची ओढ लागलेल्या मनुष्याला "मुमुक्षु" असे म्हणतात.
__________

मोक्षः
टीप : "मोक्ष" हा फक्त मनुष्ययोनीत जन्म घेतलेल्यांनाच्च मिळतो.. पशु, पक्षी, कृमी ,कीटक..इ. ना नाही. त्यासाठी त्यान्च्या अत्म्यान्ना मनुष्य म्हणून जन्माला यावे लागते. जेव्हा माणसाचे पृथ्वीतलावरचे कर्म, ऋण इ. सम्पतात, त्याला "स्व"त्वाची जाणीव होते..." मी " म्हणजे कोण, याची पूर्णपणे जाणीव त्याला होते... तेव्हाच त्याला पुढचा जन्म घेण्याची गरज भासत नाही. नॉर्मली एका जन्मात अपूर्ण राहिलेल्या आकान्क्षा, इच्छा, इ. पूर्ण करण्यासाठी त्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. परन्तु जेव्हा या सगळ्या वासनांपासून जेव्हा माणूस मुक्त होतो.. किन्वा अलिप्त राहतो.. तेव्हा साहजिकच त्याची सायमलटेनिअसली त्याच्या गुरुच्या सहाय्याने अध्यात्मिक उन्नती झालेली असते. तेव्हाच त्याला "मोक्ष" प्राप्ती होते. अर्थात मोक्ष प्राप्त झाल्यानन्तर जरी त्या आत्म्याला पुन्हा नवीन जन्म घेण्याची गरज नसते, तरीही तो एक पुण्यात्मा म्हणून मर्त्यलोकातील जिवन्त माणसांन्ना त्यान्च्या जेन्युइन भौतिक किन्वा अध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करू शकतो...

अर्थात... या गोष्टी खूप पुढच्या आहेत.बेसिक लेव्हलवरती या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देणे.. खरंच उचित ठरणार नाही.... :)

म्हणजे कर्म, ऋण सम्पल्याशिवाय 'मी' कोण ही जाणीव होत नाही ?हे चूक वाटते. कारण जीवन आहे तोपर्यन्त कर्म सम्पत नाही. म्रुत्युनन्तर कर्माशय बाकी असतो. मग मोक्ष कसा ?

तुम्ही मोक्षाचा अनुभव घेतला आहे का? असेल तर ते लिहा. नसेल तर तुम्ही उगाच कालापव्यय करत आहात असे समजू. (जसे आता आम्ही हापिसात असूनही करत आहोत ;) )

बाकी तुम्ही जे काही लिहिलंय ते किर्तनकार सांगत असतात, किंवा मग ते आस्था बिस्था वाले बाबा आणि बाया. तुम्हीही त्याच लाईनीतले का?

रविंद्र गायकवाड's picture

13 Nov 2011 - 11:04 am | रविंद्र गायकवाड

आम्हाला जे कळत नाही ते विचारतोय साहेब.
मी आपलं इयत्ता चौथी मधलं एखादं गणित कसं सोडवू म्हणून विवारायचं आणि तुम्ही म्हाणायचं पी.एच डी. झाली असेल तर बोल नाही तर विनाकारण टाईमपास करू नकोस.

धन्या's picture

13 Nov 2011 - 11:11 am | धन्या

अच्छा अच्छा... तुम्ही मुमूक्षू आहात तर. (च्यायला, हा शब्द बरोबर वापरला आहे ना :( )

कुठे राव मोक्षा बिक्षाच्या नादी लागताय. मागचा जन्म होता की नाही हे आपल्याला माहिती नसतं. पुढचा जन्म आहे की नाही हे ही आपण छाती ठोकपणे सांगू शकत नाही. उगा आपलं हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या पोथ्या-पुराणांमधील लिखाणावर विश्वास ठेवून आपण नाहक सैरावैरा धावत असतो.

त्यापेक्षा आता असलेला माणसाचा जन्म माणूस म्हणून जगून आयुष्याचं सोनं करणं चांगलं नाही का?

रविंद्र गायकवाड's picture

13 Nov 2011 - 11:14 am | रविंद्र गायकवाड

थोडक्यात आणि अगदी मनातलं बोललात राव.
मुमुक्षू नाही हो . मला मोक्षाचा अर्थच कळत नाही. जिज्ञासू म्हणा हवं तर.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2011 - 1:53 pm | अत्रुप्त आत्मा

त्यापेक्षा आता असलेला माणसाचा जन्म माणूस म्हणून जगून आयुष्याचं सोनं करणं चांगलं नाही का?....धनाजीराव, डॉ. आ.ह. साळुंखे लिखित ''आस्तिक शिरोमणी-चार्वाक'' हे पुस्तक तुंम्ही घ्याच.. नक्की अवडेल तुंम्हाला... :-)

रविंद्र गायकवाड's picture

13 Nov 2011 - 10:56 am | रविंद्र गायकवाड

आम्हाला अर्धवट कळतय आणि वळत तर आजिबात नही म्हणून जानकारांचा सल्ला हवाय. ज्यांना यात रस नाही त्यांनी विनाकारण मला भिती दाखवू नये.

वेताळ's picture

13 Nov 2011 - 11:12 am | वेताळ

तेच उत्तम आहे.

धन्या's picture

13 Nov 2011 - 11:15 am | धन्या

नाही हो... मोक्ष मिळावा या भावनेची तुलना आजाराशी करणं योग्य नाही. फार तर तुम्ही असं म्हणू शकता की समुपदेशकाला भेटा. (समुपदेशक म्हणजे मराठीत काउन्सेलर बरं का ;) )

रविंद्र गायकवाड's picture

13 Nov 2011 - 11:16 am | रविंद्र गायकवाड

त्या डोक्टरला काय दाखवू??
हात? (उगाच आपलं हात दाखवून अवलक्षण)

धन्या's picture

13 Nov 2011 - 11:19 am | धन्या

त्या डोक्टरला काय दाखवू??
हात? (उगाच आपलं हात दाखवून अवलक्षण)

हाहा... हे आवडलं आपल्याला.
तुम्हाला मोक्षाची आस किंवा गेला बाजार त्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असली तरी तुमची विनोदबुद्धी अजून शाबूत आहे. :)

त्यामुळे उपचार करावेत असे वाटते......तरी देखिल मोक्ष आणि त्याची प्राप्ती हा विषय जालावरुन चर्चा करुन कळाला असता तर खुपच छान झाले असते नाही? घरोघरी बुध्द जन्माला आले असते.

रविंद्र गायकवाड's picture

13 Nov 2011 - 11:25 am | रविंद्र गायकवाड

राव तुम्ही अंतरजालीय मनकवडे दिसताय.
बाय द वे तुम्हाला कसं कळलं झोप झाली नाही ते.?

वेताळ's picture

13 Nov 2011 - 11:29 am | वेताळ

असेच प्रश्न माझ्या एका मित्राला पडायचे. त्यावर त्याने योग्य उपचार घेतल्याने तो आता ठिक आहे.(निदान तो तरी तसे सांगतो). इतकच ,बाकी चालु द्या.

शिल्पा ब's picture

13 Nov 2011 - 1:38 pm | शिल्पा ब

केली का स्वताच्या लेखांची झैरात?

केली का स्वताच्या लेखांची झैरात?

हॅ हॅ हॅ
कुणीतरी केलीच असती.. ती आम्ही केली ;-)
एरव्ही काय त्या लिखाणाचं लोणचं होणार आहे तिथं राहून?

कुणीतरी केलीच असती.. ती आम्ही केली

तुम्हाला बरं कळतं कुणी तुमच्या लिंकांची पुढे खैरात करणार आहे ते. आता एव्हढं कळतंच तर तेव्हढं मोक्षाची गरज कुणाला आहे हे रविंद्ररावांना सांगून टाका. ;)

तुम्हाला बरं कळतं कुणी तुमच्या लिंकांची पुढे खैरात करणार आहे ते.

आम्हाला काय काय कळत ते इथं तुम्हाला सांगत बसलो तर घेरी येईल तुम्हाला.. म्हणून टाळतो.

आता एव्हढं कळतंच तर तेव्हढं मोक्षाची गरज कुणाला आहे हे रविंद्ररावांना सांगून टाका. Wink

मोक्षाची गरज कसली घेऊन बसलात? आम्ही थेट मोक्षच देऊन टाकला आहे रविंद्र गायकवाडांना.. विचारुन बघा त्यांना.. :)

धन्या's picture

13 Nov 2011 - 5:01 pm | धन्या

अवांतर होईल म्हणून पास. :)

अन्या दातार's picture

13 Nov 2011 - 12:48 pm | अन्या दातार

मला वाटले कायतरी स्किम आहे
मोक्ष पाहिजे असेल तर अमक्यांना-तमक्यांना भेटा वगैरे ;)
त्यावर काही फ्री वगैरे असेल असेही वाटले

हा असला मोक्ष होय, मला वाटलं हल्ली अनाथाश्रमात वगैरे मुलांची नावे अशी ठेवतात, त्यापैकी एखाद्याला द्त्तक वगैरे द्यायचं आहे का काय ?

छे हा असला मोक्ष अजिबात नकोय, त्यापेक्षा सुशीलकुमारांनी ( दोन्ही मंत्री पण आणि पाच कोटीवाले पण) मला वारस केलं त्यांच्या मृत्युपत्रात तर बरं होईल.

'सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?' यापैकी कित्येक मोठ्या स्त्री पुरुषांची कर्म आणि अहंकार नष्ट झाले नाही तर त्याचे बरेच बरे वाईट परिणाम बाकीच्यांना भोगावे लागतात. तुम्हाला सांगतो काही म्हणता काही नष्ट होत नाही.

आज जर एखाद्याची हाडं अन राख नदीत टाकली ना तर सांगतो बरोबर ११.११.११ म्हणजे ११.११.७०११ ला तुम्ही किंवा मी जे पेट्रोल भरु ना त्यामध्ये त्याचा अंश असेल् नक्की. पाहिजे तर लिहुन घ्या,

आज जर एखाद्याची हाडं अन राख नदीत टाकली ना तर सांगतो बरोबर ११.११.११ म्हणजे ११.११.७०११ ला तुम्ही किंवा मी जे पेट्रोल भरु ना त्यामध्ये त्याचा अंश असेल् नक्की. पाहिजे तर लिहुन घ्या,

म्हणजे तुम्हाला कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य आहे तर!
नाही तर ११.११.७०११ ला तुम्ही किंवा ते गाडीत कसे पेट्रोल भरणार? ;-)

म्हणजे तुम्हाला कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य आहे तर!

आलेपाक हा आल्यापासून बनतो तसा कर्मविपाक हा केलेल्या कर्मांपासून बनतो का?

''आलेपाक हा आल्यापासून बनतो तसा कर्मविपाक हा केलेल्या कर्मांपासून बनतो का?''

आलेपाक हा आपण केलेल्या नाहीतर विकत आणलेल्या आल्यापासुन बनवावा लागतो एवढं माहित आहे आणि ते पण आलं पाकात घातलं म्हणुन आलेपाक म्हणतात.

कर्म विकत घेउन पाकात घाललणं म्हणजे कर्मविपाक असावे म्हणजे आजच्या माझ्या अज्ञानी लोकांच्या भाषेत आउट सोर्सिंग.

कर्म विकत घेउन पाकात घाललणं म्हणजे कर्मविपाक असावे म्हणजे आजच्या माझ्या अज्ञानी लोकांच्या भाषेत आउट सोर्सिंग.

अशा विकत घेउन घेउन पाकात घातलेल्या कर्माला म्हणजे पैसे देउन करवून घेतलेल्या कर्माच्या बर्‍या-वाईट फळाला जबाबदार कोण असेल?

म्हणजे असे की एखादया धनवान सद्गृहस्थाने आजच्या या विज्ञानयुगात लोक काय म्हनतील म्हणून पुरोहीतांकरवी मोक्षप्राप्ती यज्ञ करवून घेतल्यास मोक्षाला कोण जाईल, यजमान की पुरोहीत? किंवा उलट, एखादया धनवान कुबुद्धी गृहस्थाने त्रयस्थास पैसे देउन एखादया व्यक्तीस टपकवल्यास त्या पापाचे फळ म्हणून चौर्‍यांशीच्या फेर्‍यात कोण अडकेल, पैसे देऊन टपकवून घेणारा की टपकवणारा?

नाडी (पट्टी) दाखवुन घ्या ;-)

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Nov 2011 - 7:20 pm | llपुण्याचे पेशवेll

ज्याना मोक्ष कसा मिळतो हे माहीत असेल ते इथे मिपावर येऊन रिकाम*टगिरी करत बसतील असे वाटत नाही.

हा प्रतिसाद मनस्वी संतापातून दिलेला आहे. तो संताप नेमका कोणत्या गोष्टीचा आहे हे सांगितलंत तर त्याच्या अनुषंगाने या धाग्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही मिळून जाईल असे आम्हांस वाटते. :)

बघा पुपेंकडे..
कधी नव्हे ते आले आणि डायरेक्ट शिरीयस झाले ;-)

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 1:08 pm | रविंद्र गायकवाड

मोक्ष कसा मिळतो हि खूप दूरची गोष्ट आहे हो.. तो का मिळवायचा हा प्रश्न ही अजून खूप पुढचा आहे. प्रश्न नीट वाचण्यात एवढेच कष्ट केलेत तर बरे होईल.

मूकवाचक's picture

14 Nov 2011 - 5:00 pm | मूकवाचक

मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही.

मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??

मन, बुद्धी, चित्त, अहंकार याहून वेगळे असूनही असे तद्दन बौद्धिक प्रश्न जो कधी जन्मलाच नाही असा विदेही मुक्तात्मा मिपावर उपस्थित करतो आहे हा एक विलक्षण चमत्कारच नाही का?

धमाल मुलगा's picture

13 Nov 2011 - 7:47 pm | धमाल मुलगा

व्हेदर यु आर इंटरेस्टेड इन मोक्ष, लिबरेशन, फ्रीडम, ट्रान्सफॉर्मशन, यू नेम इट, यु आर इंटरेस्ट्रेड इन हॅपीनेस विदाऊट वन मोमेंट ऑफ अनहॅपीनेस, प्लेजर्स विदाऊट पेन..इट इज द सेम थिंग.
.
.
.
ऑल आय कॅन गॅरेंटी यू इज दॅट अ‍ॅज लाँग अ‍ॅज यु आर सर्चिंग फॉर हॅपिनेस, यु विल रिमेन अनहॅपी!

-यु.जी. कृष्णमुर्ती.

अवांतरः लेखाच्या शेवटच्या वाक्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. जे स्थुल देहासोबत नष्ट होत नाही त्याला मोक्षाची गरज!
नैंनं छिंदन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः .....

धन्या's picture

13 Nov 2011 - 8:19 pm | धन्या

बाब्बो... काय तो व्यासंग...

ऑल आय कॅन गॅरेंटी यू इज दॅट अ‍ॅज लाँग अ‍ॅज यु आर सर्चिंग फॉर हॅपिनेस, यु विल रिमेन अनहॅपी!

परफेक्ट. द अल्केमिस्ट ची ईष्टोरी म्हणा की. किंवा मग ते तुझं आहे तुजपाशी वगैरे वगैरे...

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 1:12 pm | रविंद्र गायकवाड

आपल्यात कमालीची कल्पकता व कौशल्य आहे. ते आपण इतर विषयात दाखवावे. विषय भरकटण्यात आपले मौल्यवान कौशल्य पणाला लावू नये.

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 1:10 pm | रविंद्र गायकवाड

जो स्थूल देहाबरोबर नष्ट होत नाही तो कर्म आणि भोग मुक्त आहे. मग मोक्ष हवाय म्हणुन का रडावे?

पैसा's picture

13 Nov 2011 - 8:41 pm | पैसा

जोपर्यंत मोक्षाची इच्छा आहे, तोपर्यंत तुम्ही कसलीतरी इच्छा धरून आहात, मग मोक्ष कसा मिळेल? मोक्ष हवा असला तर मोक्षाची इच्छा पण सोडून दिली पाहिजे. हे बरोबर वाटतंय का?

धन्या's picture

13 Nov 2011 - 8:54 pm | धन्या

__/\__

धमाल मुलगा's picture

13 Nov 2011 - 9:16 pm | धमाल मुलगा

इच्छा हा शब्द जरी तसाच वापरत असले तरी मोक्षाची इच्छा आणि इतर अपुर्ण वासना ह्याही इच्छाच ह्यातला मुलभुत फरक लक्षात घेता वरचं समिकरण बरोबर वाटत नाहीए.

इच्छा धरुन असणे म्हणजे वासना. वासना आल्या की षड्रिपू आले, षडरिपू आले की मनावरचा ताबा गेला, ताबा गेला की एकाग्रता संपली, एकाग्रता गेली की प्रयत्न वहावले, प्रयत्न वहावले की प्रयोग फसलाच. :)

त्याउलट, मुमूक्षू झाले की मोक्षासाठी प्रयत्न हे ठरलं, प्रयत्न सुरु झाले की एकाग्रता करावी लागणार, एकाग्रता करु लागलं की मनावर ताबा ठेवला जाणार, मन ताब्यात राहिलं की षडरिपूंचा कोलाहल कमी होणार, षडरिपूंचा खेळ कमी झाला की आपोआप वासना कमी होत जाणार............. :)

असं हे उलट सुलट कसंही फिरणारं चक्रच म्हणा ना. कोणत्या दिशेनं ते फिरवायचं त्यावर अवलंबून आहे पुढचं सगळं. :)

काय म्हणता?

आनंदी गोपाळ's picture

14 Nov 2011 - 12:55 am | आनंदी गोपाळ

म्हणजे शब्दांचा छळ.
इच्छा म्हणजे वासना.
मग ती कशाचीही असो. अन उलट चक्र फिरवून मठ्ठ का बनायचं?? दगडासारखं?

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 1:13 pm | रविंद्र गायकवाड

मी ही हेच विचारतोय मोक्ष नक्कि कुणाला हवाय.

सस्नेह's picture

24 Jan 2012 - 4:07 pm | सस्नेह

मोक्ष जीवाला ह वाय . म्हणजे देह, मन, बुद्धी, चित्त, अहन्कार यान्चे आत्म्याशी कॉम्बीनेशन. म्रुत्युने फक्त देह सुटतो, बाकि सर्व पुढ्च्या जन्मात हि येते. तेही सुटणे म्हणजे मोक्ष. गम और खुशीमे फर्क ना महसूस हो जहा....वो मकाम म्हणजे मोक्ष . समझे ?

उत्तरायणाच्या काळात मेलं की मोक्ष मिळतो म्हणे..( संदर्भ महाभारत भीष्म शरशय्येवर उत्तरायणाची वाट बघत होते.) सगळं कर्ज माफ होते.... उत्तरायण म्हणजे साधारणपणे १४ जानेवारी ते १४ जुलै... एक्झॅक्ट तारखा भुगोल तज्ञाना विचारुन घ्या.

अन्या दातार's picture

13 Nov 2011 - 9:28 pm | अन्या दातार

>>सगळं कर्ज माफ होते
छे राव, विदर्भातल्या शेतकर्‍यांनी याच दरम्यान (उत्तरायण) आत्महत्या करायला हव्या होत्या, गेला बाजार कर्ज तरी माफ झालं असतं! ;)

आत्मशून्य's picture

14 Nov 2011 - 5:10 am | आत्मशून्य

.

आत्मशून्य's picture

14 Nov 2011 - 5:31 am | आत्मशून्य

काल इन्सेप्शन पाहीला. लूसीड ड्रीमींगवर फार चांगला चित्रपट आहे. स्वप्न कशाला म्हणावे याबाबतच्या संकल्पनातील सूटसूटीतपणा तर त्यात फार मस्त दीलाय. त्यातलच एक वाक्य घ्या, "स्वप्नात जोपर्यंत जाग्रूतपणा नीर्माण होत नाही अथवा स्वही जाणीव अथवा अर्धवट जाग येणे म्हणावं हे घडत नाही तो पर्यंत आपण स्वप्नाला सत्यच समजतो ते स्वप्न आहे हेच आपल्याला कळत नाही, म्हणूनच अशावेळी जर का आपण स्वप्नात आहोत का हे जाणून घ्यायच असेल तर स्वप्नात तूम्ही ज्या ठीकाणी अथवा प्रसंगात आहात त्याठीकाणी तूम्ही कसे आलात/पोचलात याचा विचार करा मग लक्शात येइल की त्याचं नीट/तर्कशूध्द उत्तरच मीळत नाही, स्वतःचा अहं वाढवणारी बूध्दीही देऊ शकत नाही...

कारण स्वप्न हे अचानक सूरू होतं. आपण स्वप्नातल्या जागेत घटनेत असचं अचानक जाऊन पोचतो, व जगू लागतो, तीथे आपण कधी गेलो याला सूसंबध्द भूतकाळ कधीच नसतो.... ते फक्त सूरू होतं आणी आपण जागं होत नाही पर्यंत ते सत्यच समजत राहतो, त्यातील घडणार्‍या प्रत्येक घटनेनी आनंदी अथवा चिंतीत होत राहतो, वैतागतो, घाबरतो पण एकदा जाग आली की मात्र मग जीवात जीव येतो की ते एक स्वप्नच होतं म्हणून.... स्वप्न हे असच असंत, ते जे काही आहे ते अचानक सूरू होतं व आपल्याला कंटीन्यू करण्यास/जगण्यास भाग पडतं जो पर्यंत झोपेतून जाग येत नाही....

आयूश्याचही असचं नाही का ? आपल्याला कधी जाणवलं आहे का की हे नक्की कधी कूठून सूरू झालं ते ? आपण इथे (आपल्या अस्तित्वात/घटनेमधे) नक्कि कसे पोचलो ते ? बस, नमके असलेच हे प्रश्न पडणार्‍यांना हा जागेपणा हवा असतो या मूक्कामावर असणार्‍यांच्या विचारांना सश्रध्द/अंधश्रध्द/नीश्रध्द/आनंदी/दूख्खि: वगैरे भेद नसतात. मूक्ती, जागेपणा वा मोक्ष ही याच लोकांची हवीहवीशी फँटसी आहे, कारण इतरांना तो टवाळकीचा सर्वात सोपा मार्ग भासू शकतो :)

धमाल मुलगा's picture

14 Nov 2011 - 11:21 am | धमाल मुलगा

जियो!

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 1:22 pm | रविंद्र गायकवाड

आपल्याला म्हणजे नक्कि कुणाला हे जानवायला हवं की आपन स्वप्नात आहोत..
त्याला ज्याला ही जाणिव व्हायला हवी होती त्याचाच शोध मी घेतोय.. ज्याला ह्या स्वप्नातून जागे व्ह्यायचे आहे त्याचाच शोध चालू आहे.

As I said,
आपण इथे (आपल्या अस्तित्वात) नक्कि कसे पोचलो ? हे असले प्रश्न पडायला लागणार्‍यांना मोक्ष हवाय (मोक्ष ही अश्या लोकांचीच फॅंटसी आहे) इतकचं.

तो तूम्हाला/मला/अथवा इतर कोणाला or to whom it may concern "who am I" त्याला, त्याची गरज आहे अथवा तो मिळतो की नाही याबाबत काहीही माहीत नाही. तूम्ही आधीच बरीच सूंदर माहीती गोळा केलेली आहे त्याधारे अत्यंत योग्य असं ज्ञानही जे आपण मिळवलेल आहे, जे धाग्यात लिहलेलं दिसत आहे, त्याबद्दल ब्र काढण्याचीही कोणाचीच छाती नसावी असा माझा समज आहे (आता हे वाक्य अश्लील गणू नये) म्हणूनच फक्त जो शवटचा प्रश्न जो उपस्थीत केलात त्याला उत्तर दीलं इतकचं. आता त्या अनूशंगाने जर इतर प्रश्न मनात निर्माण झाले असतील तर आपलं ज्ञान आपणास जी दिशा दाखवत असेल त्याच्याशी मी सहमत आहे.

रविंद्र गायकवाड's picture

15 Nov 2011 - 9:27 am | रविंद्र गायकवाड

धन्यवाद आत्मशून्य जी.
मा़झं कनफयूजन बहुतेक माझ्या अर्धवट ज्ञानामुळेच असेल. मोक्ष म्हणजे काय? व मी म्हणजे कोण? यांची जी उत्तरे मला मा़झ्या अर्धवट ज्ञानमुळे महित आहे त्यामुळे माझे हे कन्फ्यूजन आहे.
माझ्या अर्धवट ज्ञानाप्रमाणे.
१) मोक्ष म्हणाजे सु़ख दुखः जन्म मृत्यू कर्म भोग यांपासून कायमची सुटका.

२) नैनं छिंदंती शस्त्रानी............. च्या अर्थानुसार जो आत्मा आहे त्याला जन्म मृत्यू सुख दुखः कर्म भोग नाहीत.

आत्म्याशिवाय जे काही आहे. म्हणजे स्थूल, सुक्ष्म व कारण शरिर, मन बुद्धी चित्त अहंकार इत्यादी नश्वर (काही ठिकाणी सांगितल्याप्रमाणे स्वप्न आहे.) किती ही आटापिटा केला तरी हे(आत्म्याव्यतिरिक्त इतर गोष्टी) चिरंतन होऊ शकत नाहीत. म्हणजेच जो आत्मा आहे त्याला मोक्ष म्हणजे जे असतं त्याची गरजच नाही. मग एवढ्य महान व आदरणीय संतांनी पोटतिडकीने आपल्याला संदेश दिलाय की मानवी जन्म एकदाच आहे. तो भोग विलासात वाया घालवू नको. मानवी जन्म म्हणजे मोक्ष प्राप्तीचे साधन आहे.. (अर्थात मला असं म्हणायचं नाही की त्यांनी चुकिचं शिकवलंय. मला फक्त जे कळत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.)

देह चेतना वैगैरे सगळेच नश्वर आहे. आत्मा कपडे बदलल्याप्रमाणे देह बदलतो. भोग व कर्मे देहादिकांची असतात आत्म्याची नसतात. मग त्या आत्म्याला मोक्षाची गरज काय?
हे जे कनफ्युजन आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतोय.. मी असं म्हणत नाही की हे चुकीचे आहे. मात्र माझ्या अल्पबुद्धीला हा केवळ एक विरोधाभास वाटतोय.
अर्थान माझं ज्ञान आणि बुद्धी चुकीची असेल त्या महान संतांचं बरोबरच आहे. पण कुणी तरी माझं हे कन्फ्युजन दूर करेल का कृपा करून.
मला म्हणजे रविंद्र गायकवाड नावाचा जो ...... आहे त्याला आपलं ज्ञान पाजळायचं नसून कुनीतरी कृपा करून मा़झं कन्फ्यूजन दूर कराल अशी अपेक्षा आहे.

आत्मशून्य's picture

15 Nov 2011 - 8:33 pm | आत्मशून्य

रविंद्रजी,
नागड्यापाशी उघडा हीच परीस्थीती आहे ना राव. मलाच अक्कल नाय तर तूमचं कन्फ्यूशन कसलं दूर करणार ? तूमच्या समस्या तूम्हीच सोडवाल. आपली काय बी व्हेल्प/सोबत हूनार नाय.

मग त्या आत्म्याला मोक्षाची गरज काय?

अगदी बरोबर, आत्म्याला मोक्षाची गरजच नाय , संतानी सांगीतलेले बाह्योपचार हे देहानेच पाळायचे आहेत. आत्म्याने न्हवे.

त्यामुळे देखिल मोक्षप्राप्ती होते. असे महाभारतात वाचल्याचे स्मरते.

परत जन्म घ्यायची इच्छा संपली, म्हणजे आसक्ती संपलेल्या व्यक्तीला मोक्षाची ओढ लागते.
जो पर्यंत मी,मला,माझे...संपणार नाही तो पर्यंत मोक्षाची इच्छा होणार नाही.

एक गमतीशीर गोष्ट :--- एका कुटुंबातील वॄद्ध कुटंब प्रमुख मॄत्यु शय्येवर पहुडला होता, त्याला आपला अंतीम क्षण जवळ आला आहे असे वाटताच त्याने आपल्या मुलांना,परिवार जनानां जवळ बोलावुन घेतले.
सगळे जवळ आले तेव्हढ्यात त्या वॄद्ध माणसाच्या तोडांतुन आवाज आला... वा,वा,वा... मोठा मुलगा वासुदेव जवळ आला त्याला वाटले वडिल आपल्याला जवळ बोलवत आहेत तर आपल्यालास सगळी संपत्ती आणि मालमत्ता देतील. पण ते काही पुढे बोलेनाच ! नंतर त्या वॄद्ध पित्याच्या तोडांतुन शब्द आला... के के के. त्यांचा दुसरा मुलगा जवळ आला त्याचे नाव केशव. त्याला वाटले आपल्याला वडिल जवळ बोलवत आहेत... आपल्यालाच सर्व काही मिळावे हीच त्यांची इच्छा असावी !!!
बराच वेळ त्या वॄद्ध पित्याचे वा वा वा, के के के असे चालु होते...शेवटी अंगात असलेला उरला सुरलेला जीव एकवटुन ते ओरडले... " अरे वासरु केरसुणी खातयं त्याला आवरा !
मरणाच्या वाटेवर उभा असताना देखील त्या वॄद्ध माणसाची या नश्वर जगातील गोष्टींशी आसक्ती दिसत होती...
हीच आसक्ती जन्म मरणाच्या फेर्‍यातुन माणसाला बाहेर पडु देत नाही.
थोडक्यात :--- मोक्ष म्हणजे या फेर्‍यातुन कायमची सुटका.

मन१'s picture

14 Nov 2011 - 11:00 am | मन१

काय भावाने मिळतोय म्हणे?

काय भावाने मिळतोय म्हणे?
खी खी खी लवासतला प्लॉट काय ?
तिकडे स्पष्टवादी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची गच्छंती झाली आणि इकडे लवासाच्या पहिल्या टप्प्याला सशर्त परवानगी मिळाली ! ;) शेवटी ३ हजार कोटींच्या गुंतवणुकाचा गहन प्रश्न आहे ना ! ;)

मन१'s picture

14 Nov 2011 - 11:18 am | मन१

इथे लवासाला प्लॉट मिळणे म्हणजे "स्टेटस"वाद्यांना मोक्षच मिळाल्यासारखे आहे.
खरे तर भुकेल्यासाठी मोक्ष म्हणजे भाकरी असली पाहिजे.
(उच्च?)मध्यमवर्गीयांसाठी सेकंड्/हॉलिडे होम मिळ्णे म्हणजे मोक्ष.
ब्याचलरसाठी... छ्या जाउ देत, इथे नको.

आणि माझ्यासाठी मोक्ष म्हणजे शेजार्‍याने एकाचवेळी त्याच्या लाड्क्या कुत्र्याचे बेफाम भुंकणे,विव्हळणे आणि हिमेशची ठणाणा वाजणारी गाणी दोन्ही एकाचा वेळेस वाजवत रहायची सवय बंद करणे.(पैकी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज राहिला तरी चालेल, स्वर्गसम वाटेल अशी स्थिती आहे.) दोन्ही बंद झाल्यास आम्हाला रात्रभर मोक्ष तरी मिळेल ब्वा.

धमाल मुलगा's picture

14 Nov 2011 - 11:19 am | धमाल मुलगा

येकदम डिस्काउंटमध्ये मिळतोय. फक्त दुकान जरा लांब है, तिथपर्यंत पोचायचे कष्ट घ्यावे लागत्यात.
अजून त्यांनी होम डिलिव्हरीची सोय नाय ना राव चालू केली. ;)

मन१'s picture

14 Nov 2011 - 11:36 am | मन१

डिस्काउंटमध्ये नस्तोय तो. उलट मोक्ष आणि अध्यात्माच्या नावानं एकाएकी झपाटले जाउन नंतर हाताला काहिच न लागलेले किंवा नंतर पस्तावलेले लोकच (दुर्दैवाने) माझ्या पाहण्यात आहेत.
दारूच्या व्यसनापेक्षा अधिक बर्बाद अध्यात्माच्या नशेने झालेले बघितलेत रे.
कुणी अस्सल ज्ञानी,अनुभवी असेल ,भेटेल तर बरे वाटेल. पण आजवर तरी तसे घडलेले नाही.
स्वस्तात किंवा फुक्टात मिळ्णारे आध्यात्म फारच महागात पडते असे अनुभवले आहे.
गड्या आपला धोपट मार्गच( थोरांच्या भाषेत कर्मयोग, (धर्म-व्याधाची, कसायाची गोष्ट ऐकली असेलच)) बरा असे वाटते.

विनायक प्रभू's picture

14 Nov 2011 - 11:59 am | विनायक प्रभू

मिपावरचे 'मोक्ष' दाता लेखक फुकट मधे मोक्ष देतात.(त्यांचा फोन नंबर पण असतो म्हणे)

मदनबाण's picture

14 Nov 2011 - 12:02 pm | मदनबाण

मिपावरचे 'मोक्ष' दाता लेखक फुकट मधे मोक्ष देतात.(त्यांचा फोन नंबर पण असतो म्हणे)

खी खी खी... ;) हे वाचताच चित्रगुप्ताला टाळी देउन आलो... ;)

प्रीत-मोहर's picture

14 Nov 2011 - 12:16 pm | प्रीत-मोहर

हा हा हा . =)) =)) मी पण मोक्ष दात्यांबद्दल मिपावरच्या जुन्या जाणत्या वारकर्‍यांकडुन खूप ऐकले आहे.

त्यामुळे फॉर डिटेल्स कॉण्ट्याक्ट मिपावरचे जुनेजाणते सदस्य ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Nov 2011 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

मला वाटले मोक्षचे बुकींग मिळते आहे का काय.

*फटू आंतरजालाव्रुन

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 1:35 pm | रविंद्र गायकवाड

आदरनिय मित्रहो..
मोक्ष कसा मिळतो हा प्रश्नच नाही.. त्यासाठी काय काय करावे हाही प्रश्न नाही. श्रुती स्मृती चे दाखले वचून ऐकुन डोक्याचा भुगा झालाय. मुळ प्रश्न बाजूलाच राहिला आणि इतर विषयांवर वाद होत आहेत.

मोक्ष ज्याला हवाय. किंवा ज्याला मोक्ष ज्याला मिळावा असे सांगतात तो नक्की कोण.
एखादा रिप्लाय वाचन्याचा राहिला असल्यास. क्षमस्व.

अन्या दातार's picture

14 Nov 2011 - 1:46 pm | अन्या दातार

जरा तुमचा गोंधळ बाजूला करा आणि मग प्रतिक्रिया टंका.

मोक्ष ज्याला हवाय. किंवा ज्याला मोक्ष ज्याला मिळावा असे सांगतात तो नक्की कोण.
यातून फक्त शब्दांचे बुडबुडे फुटले. नक्की कुणाचा मोक्ष? कुणाला मिळायला हवा? दुसर्‍या कुणाला तरी मिळाला काय? बरं ज्याची गोष्ट त्याला मिळाली तर मग आम्हाला काय?

किती अर्थ काढावेत तितके कमीच ......... जाऊदेत.

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 1:50 pm | रविंद्र गायकवाड

आदरणिय दातार साहेब.
माझी मराठी किती चांगलं आहे हे माझ्या शुद्धलेखनाच्या क्वालिटीवरून समजलंच असेल.. इथे मराठी व्याकरणाचा विषय नाहीये.
असो
आपल्यात कमालीची कल्पकता व सहित्यीक कौशल्य आहे. ते आपण इतर विषयात दाखवावे. विषय भरकटण्यात आपले मौल्यवान कौशल्य पणाला लावू नये.

अन्या दातार's picture

14 Nov 2011 - 3:22 pm | अन्या दातार

आमची कल्पकता, कौशल्ये व व्याकरणाचा विषय गेला तेल लावत. पण तुमचा मुद्दा तरी कळूदेत ना. आधी तुम्हाला काय म्हणायचे आहे ते नीट मांडा आणि मग चर्चा करा की.

त्यासाठी काय काय करावे हाही प्रश्न नाही. श्रुती स्मृती चे दाखले वचून ऐकुन डोक्याचा भुगा झालाय.
म्हणजे नक्की काय काय वाचलयं ? जरा त्या बद्धल सांगा ना.

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 2:18 pm | रविंद्र गायकवाड

विषयांतर नको..
आम्ही काय काय वाचले किंवा ऐकले हे सांगुन स्वत्:चा अपमान्/स्तुती करण्यात काय अर्थ आहे?
बरं मी काय काय वाचलं हे सांगितल्यावर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे का?

मदनबाण's picture

14 Nov 2011 - 2:32 pm | मदनबाण

आम्ही काय काय वाचले किंवा ऐकले हे सांगुन स्वत्:चा अपमान्/स्तुती करण्यात काय अर्थ आहे?

नाही, तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर पडेल ना ! म्हणुन विचारले.

बरं मी काय काय वाचलं हे सांगितल्यावर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे का?
मला वाटतं तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रतिसादात विषयांतर करत आहात्.मूळ मुद्यावर बोला जरा...

विजुभाऊ's picture

14 Nov 2011 - 1:56 pm | विजुभाऊ

जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ???

ती तशी सुटका झाल्यावर तुम्चे नक्की काय होते?
प्रोजेक्ट, बेंच , प्रीसेल्स ,प्रोजेक्ट
या फेर्‍यातुन सुटका होण्यासाठी तुम्हीला कंपनी प्रमोटर व्हावे लागते

धमाल मुलगा's picture

14 Nov 2011 - 3:23 pm | धमाल मुलगा

आमचे इजाभाऊ म्हणजे आधुनिक चार्वाक आहेत असं आम्ही म्हणतो ते का उगाच नाय! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Nov 2011 - 3:30 pm | परिकथेतील राजकुमार

आमचे इजाभाऊ म्हणजे आधुनिक चार्वाक आहेत असं आम्ही म्हणतो ते का उगाच नाय!

हे कौतुक आहे का टिंगल ?

तत्वांना जपणारा
परा

आणि टिंगल असेल तर कुणाची?

मी एक आयटी हमाल.
काम मला मारत नाही. काम मला तारत नाही.
स्तुती मला बदलत नाही टिंगल मला सुधरवत नाही.
आचार्य विजुभाऊ

या वर्षी चांगले काम करशील तर पुढील वर्षी चांगले अप्रेजल मिळेल असे समजू नकोस
अप्रेजल चाम्गले मिळाले नाही तर ती तुझ्या वर्षभरात केलेल्या टाईमपासची फळे आहेत असे मान.
काम करीत रहा. अ‍ॅप्रेजलची अपेक्षा ठेवु नकोस,
या कंपनीत नाही मिळाले पुढील कंपनीत मिळेल
आचार्य विजुभाऊ

आहे.मोक्षप्राप्ती नंतर कोणतीच भावना शिल्लक राहात नाही.

तिमा's picture

15 Nov 2011 - 9:32 am | तिमा

चर्चा करताय? मोक्ष देवाकडे मागावा लागतो. मेल्यावर देव विचारतो प्रत्येकाला, 'अजून काही वासना उरली आहे का ?' तेंव्हा नाही असं सांगायचं. मग देव लगेच मोक्ष देतो.
आणि कोणाला हवाय या प्रश्नाचं उत्तर 'मला हवाय' हे आहे.

रविंद्र गायकवाड's picture

15 Nov 2011 - 12:13 pm | रविंद्र गायकवाड

मोक्ष म्हणजे काय देवाची(तुम्ही ज्याला देव समजताय त्या) मक्तेदारी आहे काय?

मोक्ष म्हणजे काय हे समजल्यावर तो कोणाला हवाय हा प्रश्न उद्भवू शकेल.

काही थोडेबहुत वाचल्यावर माझ्या अल्पमतीनुसार तयार झालेले माझे मत -
मोक्ष म्हणजे कर्मफळापासून मुक्तता.
बाह्यजगतातले सर्व नश्वर हे जरी बरोबर असले तरी कर्मफळ तसे नष्ट होत नाही.
जो कर्ता त्याच्यासोबत ते पुढे जाते. त्यानुसार आलेले भोग हे भोगावे लागतात. ते भोगण्यासाठी जन्म परत होतो. म्हणजे पुनर्जन्माचा सिद्धांत आला.
मोक्ष मिळणे मनुष्य जन्मातच का शक्य? कारण इतर वेळेस आपण भोग भोगतोय याची जाणीव असत नाही. ही जाणीवच माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करते. कारण तिचा उगम बुद्धीमधे आहे. या मताप्रमाणे मनुष्यजन्मातही जर ही जाणीव नसेल तर मोक्ष शक्य नाही.
ही जाणीव असणे म्हणजे वाटचालीची सुरुवात.
कर्मफळ कसे नष्ट होईल? अगोदरचे कर्मफळ भोगूनच संपवावे लागेल.
अन्‌ नवीन तयार कसे होणार नाही?
जेव्हा आतून खरी जाणीव होईल की कर्ता कोण तेव्हा. तेव्हा वेगळी ईच्छा असणार नाही. अन्‌ ते संपले तर कर्मफळ चिकटणार नाही. साधन असणारे शरीर जोवर हे काया-वाचा-मने जाणू शकत नाही तोवर कर्मफळ चिकटत राहील अन्‌ चक्र सुरू राहील.

आता तुमचा प्रश्न:
मोक्ष कुणाला हवाय?
अर्थातच आत्म्याला. कारण सर्वांपासून अलिप्त असूनही बिचारा जन्म-मृत्यूच्या चक्रात फसलाय.

राघव

प्यारे१'s picture

16 Nov 2011 - 10:25 am | प्यारे१

>>>>मोक्ष कुणाला हवाय?
>>>>अर्थातच आत्म्याला. कारण सर्वांपासून अलिप्त असूनही बिचारा जन्म-मृत्यूच्या चक्रात फसलाय.

ळिट्टीळ करेक्शण,

आत्म्याला नाही जीवात्म्याला किंवा जीवाला. आत्मा हा अलिप्त'च' असतो.
आत्म्याच्या बुद्धीत पडलेल्या प्रकाशाला जीव असे म्हणतात. जन्म घेतो तो जीव. हा जीव त्याचे त्याचे प्रारब्ध, वासना घेऊन आलेला असतो.
थोडंसं उदाहरण घेऊन पाहू. कंदिलाची पेटलेली वात म्हणजे आत्मा. कंदिलाची काच म्हणजे बुद्धी. ही बुद्धी त्या त्या जीवाच्या वासनांनुसार असते. पुण्य अथवा चांगली कर्मे म्हणजे अत्यंत पारदर्शक ते पाप अथवा वाईट कर्म म्हणजे अत्यंत काजळी अथवा वेगवेगळे लाल, हिरवे, पिवळे रंग.
साधना म्हणजे हे रंग, ही काजळी पुसणे. आत्म्याचा स्वच्छ प्रकाश दिसला की 'झाले'.
दुसरे उदाहरण म्हणजे प्रोजेक्टर म्हणजे आत्मा. सिनेमाची रिळं या वासना. पडदा म्हणजे व्यक्ती. एकूण संच म्हणजे जीव. प्रोजेक्टर प्रकाश टाकतो. भक्त प्रल्हाद लावा अथवा 'भक्त प्रल्हाद' लावा. आत्म्याला फरक पडत नाही.
एखादी गोष्ट करण्याची अथवा न करण्याची देखील इच्छा म्हणजे वासना.
कायिक अथवा वाचिक कर्म होण्या आधी आतापर्यंतच्या कारकिर्दीनुसार वासना उत्पन्न होते. फक्त कामेच्छा एवढेच याचे सीमित स्वरुप नाही.
सुंदर स्त्री पाहिली तर एखादा, 'वा, क्या आयटेम है' म्हणतो तर दुसरा सौंदर्यापुढे नतमस्तक होतो. त्याच्या त्याच्या विचार पद्धतीनुसार (वासनेनुसार) हे घडतं. याच्यापुढे 'क्रियमाण स्वातंत्र्य' हा विषय आहे. 'डोळे भरुन' 'आयटेम' कडे पाहणे अथवा आपल्या डोळ्यांना इतर कामात लावणे हे या स्वातंत्र्यावर अवलंबून.
'डोळे भरुन' पाहताना पुढच्या 'अनेक गोष्टी' ;) होतात. मनातच. कर्मे उत्पन्न होतात ती अशी.

:)

माझ्या मते जीव अन् आत्मा वेगवेगळे नाहीत.
साधन अन् साध्य जेव्हा एकरूप होतात तेव्हा कर्मफळ चिकटत नाही येवढेच मला म्हणायचे होते अन् तुम्हीही बहुदा तेच म्हणत आहात.

बाकी अनुभव नसतांना मी नुसताच शब्दच्छल करण्यात खरंतर अर्थ नाही.
हे सर्व माहीत असूनही मला अनुभव नाही म्हणजे.. दुधाचा आस्वाद न घेता दुधाचे वर्णन ऐकून त्यावर चर्चा करण्यासारखे आहे. :)

राघव

ठीक आहे श्री रामचंद्र महाराज. ;)

रविंद्र गायकवाड's picture

16 Nov 2011 - 1:48 pm | रविंद्र गायकवाड

थोडंसं पटतय.
भोग आणि कर्म जीवाला असतो हे ही मान्य. जीव जेव्हा भौतीक देह सोडून दुसर्‍या देहात प्रवेश करतो. तेव्हा त्याला पुर्व देहाचे ज्ञान/स्मरण नसते. वर सांगितल्याप्रमाणे जीव देह बदलत असतो. बरं तो जीव जर एका योनीतून दुसर्‍या असा ८४ लक्ष योनी मध्ये फिरत असतो.
आता माझा गोंधळ इतका वाढलंय की टंकता येत नाही.
थोडक्यात विचारतो.
जीवाची आणि आत्म्याची लक्षणे सगळी सारखीच आहेत. मग जीव आत्म्याहून वेगळा कसा? की आत्मा म्हणजेच जीव?(तसे असेल तर पुन्हा तोच प्रश्न)

प्यारे१'s picture

16 Nov 2011 - 2:40 pm | प्यारे१

कॄपया उदाहरण वाचा.

आत्मा एकटाच असतो. अ‍ॅक्च्युअली तोच 'असतो'. बाकी काही नसतेच. आकाशात एखादा घडा ठेवला तर आकाश तेच पण घड्यातले आकाश वेगळे भासेल. तसे शरीरा शरीरात त्या त्या कमी अधिक प्रमाणात भेद आढळतात.
आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश म्हणजे जीव. आत्म्यामध्ये बुद्धीची भेसळ म्हणजे जीव. वासना बुद्धीमध्ये राहून त्यांना ह वे तसे काम करुन घेतात.
दारु प्यावी की न प्यावी ह्याचे उत्तर वासनेच्या रेट्यावरुन ठरते. इच्छा बदलली की कर्म बदलते.

रविंद्र गायकवाड's picture

16 Nov 2011 - 3:52 pm | रविंद्र गायकवाड

सुक्ष्मदेहाचे अंतकरण पंचक म्हणजेच स्फुरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे सुक्ष्म देहाचे भाग झाले. तेही नश्वर. म्हणजे सुक्ष्म देह म्हणजेच जीव (असे तुम्हाला म्हणायचे आहे काय). स्मरण चिंतन तर्क योजन प्रयोजन हे बुद्धीचे कार्य व घटक. तेही देहाबरोबरच नष्ट होतात. म्हणजेच यातले काहीही कॅरी फॉरवर्ड होत नाही. यांचा तर देहाबरोबरच नाश होतो. याची सांगड घालता घालता माझी बुद्धी (म्हणजे देहरुपी संगणकाचा प्रोसेसर हँग होतोय. कुठंतरी काही तरी मिस्-मॅच होतय हे कळतंय पण नक्की काय ते समजत नाहीये.)

आत्म्यामध्ये बुद्धीची भेसळ म्हणजे जीव. असे म्हणावे तर बुद्धीचा नाश झाल्यावर(देहाबरोबरच) राहतो तो केवळ आत्माच. आणि तो तर असंग आहे असेही म्हटले आहे. माझ्या वाचनानुसारही जीवालाच मोक्ष हवा असतो. पन जीव म्हणजे नाकी काय? तेच विचारयचा प्रयत्न करतोय.

प्यारे१'s picture

16 Nov 2011 - 4:48 pm | प्यारे१

माझ्या माहितीनुसार (अनुभव नाही अजून म्हणून माहितीनुसार म्हणतोय ;) (असला तरी विस्मृत आहे)
सूक्ष्म देह शिल्लक असतो. वासना असतात. त्या सूक्ष्म देहाबरोबर कॅरी फॉरवर्ड होतात.

बुद्धीचा नाश होत नाही. अतिशय लहानपणी तल्लख बुद्धी, तीव्र स्मरण शक्ती, संगीत, चित्रकला इ.इ. क्षेत्रातली जाण ह्या सगळ्या पूर्वजन्मीच्या कष्टांचा परिणाम असतो.

मुळात मृत्यूनंतर मिळणारा मोक्ष ही संकल्पना समर्थ रामदासांसारख्या संतांना मान्यच नाही. रोकडी प्रचिती (रोखीचा व्यवहार) त्यांना मान्य आहे. मेल्यानंतर मोक्ष मिळेल इ.इ. गोष्टी म्हणजे बरीचशी पुढच्या जन्माची तयारी असते. समर्थ आपल्याला मुद्दाम सांगतात की जे करायचे ते आत्ताच आणि ताबडतोब करुन मोकळं व्हा. उद्याचा (नंतरचा जन्म) भरवसा नाही. (दासबोध पहावा)

सुखी, समाधानी जीवन जगत जगत सुखरुप होऊन शांतपणं देह सोडणं हे आणि हेच मुख्य ध्येय असलं पाहिजे.
मोक्ष हे बायप्रॉडक्ट आहे.
त्यासाठीच संत साहित्याचा अभ्यास, विधीनिषेध पाळणं, सत्याचरण या गोष्टी आवश्यक आहेत.

रविंद्र गायकवाड's picture

16 Nov 2011 - 5:21 pm | रविंद्र गायकवाड

आता पटलं

रविंद्र गायकवाड's picture

16 Nov 2011 - 1:36 pm | रविंद्र गायकवाड

आत्मा तर कर्म आणि फळ यांपसून अलिप्त आहे. मग आत्म्याला कसली आलीये कर्मफ़ळा पसून मुक्तता.???

माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा.
तरीही नाही समजले तर माझी याबाबतीतली असमर्थता मान्य करत सांगू इच्छितो की याहून वेगळ्या भाषेत मला नाही ब्वॉ सांगता येत. क्षमस्व.

राघव

नगरीनिरंजन's picture

16 Nov 2011 - 1:53 pm | नगरीनिरंजन

मोक्ष वगैरे काहीही भानगड नसते हो. तुम्ही प्रश्न विचारला म्हणजे मोक्ष म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहिती आहे का?
आपलं शरीर तेवढं खरं. बाकी सगळ्या डोक्यातल्या कल्पना. शरीर मेलं की सगळं संपतंय आपोआप.
नका टेन्शन घेऊ.

धमाल मुलगा's picture

16 Nov 2011 - 2:23 pm | धमाल मुलगा

काही काही सिध्दयोगी असेही आहेत ज्यांना अस्सल पहिल्या धारेची नवटाक मारली की ताबडतोब मोक्षप्राप्ती होते. अशा अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.

-(सेमी मुमूक्षु) धम्या.

रविंद्र गायकवाड's picture

16 Nov 2011 - 2:38 pm | रविंद्र गायकवाड

तसला मोक्ष ठराविक लोकांना आम्ही फुकट देतो. फक्त इथपर्यंत येण्याचे कष्ट घ्यावे लागतील.

धमाल मुलगा's picture

16 Nov 2011 - 3:28 pm | धमाल मुलगा

आम्हा मोक्षप्राप्तीसाठी आसुसलेल्यांना कोणतेही ठिकाण वर्ज नाही. पत्ता कळवलात तर दर्शन आणि दिक्षेचा लाभ घेता येईल.

रविंद्र गायकवाड's picture

18 Nov 2011 - 10:55 am | रविंद्र गायकवाड

मौजे आकुर्डी.
गोल्डण जिमच्या शेजारी येऊन एक कॉल मारा. आम्ही हजर असू.

फक्त शुक्र/मंगळ/बुधवारी त्या दिवशी प्रदोष नसावा.
नंबरासाठी संदेश पाठवा.

५० फक्त's picture

16 Nov 2011 - 3:30 pm | ५० फक्त

कुठपर्यंत यायचं बोला, येण्याचं काय मजेत येउ, परत घरी सोडण्याची व्यवस्था कोण करणार ते सांगा.

रविंद्र गायकवाड's picture

18 Nov 2011 - 11:00 am | रविंद्र गायकवाड

अहो.. मोक्ष मिळाल्यावर परत कुठं कशाला जायचंय.

सुहास झेले's picture

16 Nov 2011 - 4:32 pm | सुहास झेले

मायला २० मिनिटं झाली हा धागा आणि प्रतिक्रिया वाचतोय.... काहीच डोसक्यात घुसलं नाही. आता अजुन इच्छाशक्ती नाही. मला मोक्ष मिळो हिचं प्रार्थना :D :D

मोठाले लेख लिहून जेमतेम पाच सात प्रतिसाद येतात.
चार ओळींच्या भांडवलावर इतके प्रतिसाद हा मोक्षच असू शकतो.;)

रविंद्र गायकवाड's picture

18 Nov 2011 - 11:05 am | रविंद्र गायकवाड

भरघोस प्रतिसाद म्हणजे तुमच्या मते मोक्ष असेल तर तुम्च्या अर्ध्या शब्दाच्या लेखाला ही आम्ही शेकड्याने प्रतिसाद देऊ.

तुम्हाला अपेक्षित मोक्ष अम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत.

फक्त कळु द्या तुम्ही कुठे धागा काढलाय.

जयंत कुलकर्णी's picture

16 Nov 2011 - 10:10 pm | जयंत कुलकर्णी

मला नेहमी संत, अध्यात्म इ. ज्यांना कळते अशा ज्ञानी लोकांना प्रश्न विचारावासा वाटतो तो असा –
जर तुम्हाला जन्मल्या जन्मल्या एका बंद खोलीत “”Life support system” वर ठेवले तर काय होईल ? जन्म आणि मृत्यूच्या कल्पनांचे काय होईल. मृत्यूची जर कल्पना नसेल तर परमेश्वराच्या कल्पनेचे काय होईल, मग अध्यात्माचे काय होईल ? मग माणसामधे फक्त जनावरांप्रमाणे “instinct” च उरेल का ? जे अस्तित्वात नाही त्याला मेंदू जन्म देतो का ? इ.इत्यादि.......

काय होईल याची यादी मी एकदा केली आहे आणि मला ह्या सगळ्या कल्पनांचा फोलपणा लक्षात आला.

आत्मशून्य's picture

16 Nov 2011 - 10:59 pm | आत्मशून्य

नाय त्याचं म्हणन जसंच्या तसच लिहलय म्हणून विचारलं ? तो सूध्दा असच म्हणायचा समजा जन्म झाल्यानंतर तूमच्यावर कोणतेच संस्कार कोणीही केले नाहीत/काहीच शिकवलं नाही तर तूम्ही कसे जगत असाल ? बस अगदी तसाच चालू क्षण व्यतीत करा.

जयंत कुलकर्णी's picture

17 Nov 2011 - 9:09 am | जयंत कुलकर्णी

प्रामाणिकपणे सांगायचे तर ओशोचे कुठलेच लिखाण मी वाचलेले नाही. ओमर खय्याम जेव्हा लिहायला घेतला तेव्हा एका रुबाईच्या वेळी अर्थ लिहिताना मनात हा विचार आला आणि तो तेथेच मांडला. कदाचित ओशो म्हणतोय तेच मीही म्हटलेले असेल पण ओशोने ही यादी केली आहे का ? असल्यास मला वाचायला आवडॅल.....

अविनाशकुलकर्णी's picture

16 Nov 2011 - 11:53 pm | अविनाशकुलकर्णी

२-३ पेग मारायचे...
चकणा चापायचा..आपले भाऊ गणपा करतात त्यातला एखादा पदार्थ चापायचा.
खुडुक व्हायच.
मद्य सत्य..मोक्ष मिथ्या...

आद्य सत्य. मद्य सत्य
सत्यमेव जयते

रघु सावंत's picture

30 Jan 2012 - 11:45 pm | रघु सावंत

>मोक्ष कुणाला हवाय?
मला तर नकोच नको
ह्या जन्मात भरपुर बघितल
अबब याच्या पुढे भरपूर बघायच आहे
आता विद्या बालन बिपाशा कंगना
पूढ्च्या जन्मात याच्या पेक्शा भलतच असेल

कस काय ?