✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मोक्ष कुणाला हवाय?

र
रविंद्र गायकवाड यांनी
Sun, 11/13/2011 - 10:16  ·  लेख
लेख
कोण तू वाचलं... आणि अनेक दिवस मनाच्या कोपर्‍यात राहून गेलेला प्रश्न पुन्हा डोक्यात थैमान घालतोय.. मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??? सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22263 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

मोक्ष

श्री गावसेना प्रमुख
Sun, 11/13/2011 - 10:50 नवीन
मग मोक्षाची गरज कुणाला आहे? (कपाळ) मोक्ष करुन घ्या आजु बाजुचे वातावरण बघुन
  • Log in or register to post comments

मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल

मृगनयनी
गुरुवार, 01/26/2012 - 22:56 नवीन
मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??? सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे? रविन्द्र'जी... इथे मुळात गोडाऊन मध्येच गडबड आहे.. त्यामुळे माल चान्गला निघत नाहीये.... :) म्हणजे, मुळात तुमच्या मोक्षाविषयीच्या, आत्म्याविषयीच्याच संकल्पनेत काहीतरी गडबड आहे.. त्यामुळे तुम्हाला कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीयेत. मुळात "मी" म्हणजे आत्मा आहे. आणि "आत्मा" म्हणजे सूक्ष्म किन्वा स्थूल देह नाही. परन्तु.. हाच्च "मी" म्हणजे आत्मा त्याच्या कर्मपूर्ततेसाठी जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो.. पर्यायाने एका "शरीरा"त प्रवेश करतो.. तेव्हा बाय डीफॉल्ट नॉर्मल शरीराला असणार्‍या प्रत्येक उपाधि त्याला लागतात. उदाहरणार्थः मन, बुद्धी, विविध गरजा, नाती, सुखसोई, इच्छा, आकांक्षा इत्यादि इत्यादि... तेव्हा "माझी" म्हणजे "एका आत्म्याची ओळख" म्हणजे "ते" शरीर बनते. अर्थात कर्म भोगण्यासाठी -(चान्गले वाईट दोन्ही...) असलेले आत्म्याचे माध्यम म्हणजे "शरीर" च असते. आणि पृथ्वीच्या नियमानुसार नुसता आत्मा कुणाला दिसत नाही.. त्या आत्म्याला व्यक्त होण्यासाठी ३ डायमेन्शनल शरीराचीच गरज असते. मग ते शरीर कुणाचेही असो- स्त्री / पुरुष / प्राणी / पक्षी... इ. कुणीही. मग त्या शरीराला नाव मिळते.. आणि आपोआपच उपाधि चिकटतात. शरीराच्या गुणधर्मानुसार मग मन, चित्त, अहन्कार इ. गोष्टी आपसूकच येतात. बाल्य तारुण्य वार्धक्य या शरीराला प्राप्त होणार्‍या अवस्था हा सृष्टीचा नियमच आहे. आणि तो मनुष्य, प्राणी, फूल, पान, वृक्ष, पक्षी या सर्वांना लागू होतो. आता प्रश्न उरतो तो "मी" म्हणजे कोण.. हे शोधण्याचा.... मी म्हणजे "आत्मा" आहे.. असे जरी अनेक थोर पुरुष आपल्याला सांगत असले, तरी जोपर्यंत आपल्याला स्वतःहून त्याची जाणीव होत नाही.. तोपर्यन्त बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. कारण रवीन्द्र'जी...जेव्हा जेव्हा एखादा माणूस "मी" म्हणजे कोण याचा शोध घेतो.. तेव्हा तेव्हा आपल्याला पडलेले प्रश्न त्यालाही पडतात. मग सुरु होतो.. त्याचा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास!! या प्रवासात जर "परमपूज्य" किन्वा "सद्गुरु" पदी आरूढ झालेल्या गुरु'ची मदत मिळाली.. तर गुरुसहाय्याने शरीरात राहूनही "आत्म्या"बद्दल जाणून घेणे शक्य होते.. पण ही साधना तितकीशी सोपी नही.. त्याची अनेक पथ्ये असतात.. अर्थात त्यासाठी तुम्ही तुमच्या गुरुने दिलेल्या मार्गावरून चालले पाहिजे. तत्ववेत्त्या गुरुची ओढ लागलेल्या मनुष्याला "मुमुक्षु" असे म्हणतात. __________ मोक्षः टीप : "मोक्ष" हा फक्त मनुष्ययोनीत जन्म घेतलेल्यांनाच्च मिळतो.. पशु, पक्षी, कृमी ,कीटक..इ. ना नाही. त्यासाठी त्यान्च्या अत्म्यान्ना मनुष्य म्हणून जन्माला यावे लागते. जेव्हा माणसाचे पृथ्वीतलावरचे कर्म, ऋण इ. सम्पतात, त्याला "स्व"त्वाची जाणीव होते..." मी " म्हणजे कोण, याची पूर्णपणे जाणीव त्याला होते... तेव्हाच त्याला पुढचा जन्म घेण्याची गरज भासत नाही. नॉर्मली एका जन्मात अपूर्ण राहिलेल्या आकान्क्षा, इच्छा, इ. पूर्ण करण्यासाठी त्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. परन्तु जेव्हा या सगळ्या वासनांपासून जेव्हा माणूस मुक्त होतो.. किन्वा अलिप्त राहतो.. तेव्हा साहजिकच त्याची सायमलटेनिअसली त्याच्या गुरुच्या सहाय्याने अध्यात्मिक उन्नती झालेली असते. तेव्हाच त्याला "मोक्ष" प्राप्ती होते. अर्थात मोक्ष प्राप्त झाल्यानन्तर जरी त्या आत्म्याला पुन्हा नवीन जन्म घेण्याची गरज नसते, तरीही तो एक पुण्यात्मा म्हणून मर्त्यलोकातील जिवन्त माणसांन्ना त्यान्च्या जेन्युइन भौतिक किन्वा अध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करू शकतो... अर्थात... या गोष्टी खूप पुढच्या आहेत.बेसिक लेव्हलवरती या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देणे.. खरंच उचित ठरणार नाही.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

जेव्हा माणसाचे पृथ्वीतलावरचे कर्म, ऋण इ. सम्पतात, त्याला "स्व"त्

सस्नेह
Fri, 01/27/2012 - 15:51 नवीन
म्हणजे कर्म, ऋण सम्पल्याशिवाय 'मी' कोण ही जाणीव होत नाही ?हे चूक वाटते. कारण जीवन आहे तोपर्यन्त कर्म सम्पत नाही. म्रुत्युनन्तर कर्माशय बाकी असतो. मग मोक्ष कसा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तुम्ही मोक्षाचा अनुभव घेतला

धन्या
Sun, 11/13/2011 - 10:53 नवीन
तुम्ही मोक्षाचा अनुभव घेतला आहे का? असेल तर ते लिहा. नसेल तर तुम्ही उगाच कालापव्यय करत आहात असे समजू. (जसे आता आम्ही हापिसात असूनही करत आहोत ;) ) बाकी तुम्ही जे काही लिहिलंय ते किर्तनकार सांगत असतात, किंवा मग ते आस्था बिस्था वाले बाबा आणि बाया. तुम्हीही त्याच लाईनीतले का?
  • Log in or register to post comments

आम्हाला जे कळत नाही ते

रविंद्र गायकवाड
Sun, 11/13/2011 - 11:04 नवीन
आम्हाला जे कळत नाही ते विचारतोय साहेब. मी आपलं इयत्ता चौथी मधलं एखादं गणित कसं सोडवू म्हणून विवारायचं आणि तुम्ही म्हाणायचं पी.एच डी. झाली असेल तर बोल नाही तर विनाकारण टाईमपास करू नकोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अच्छा अच्छा... तुम्ही

धन्या
Sun, 11/13/2011 - 11:11 नवीन
अच्छा अच्छा... तुम्ही मुमूक्षू आहात तर. (च्यायला, हा शब्द बरोबर वापरला आहे ना :( ) कुठे राव मोक्षा बिक्षाच्या नादी लागताय. मागचा जन्म होता की नाही हे आपल्याला माहिती नसतं. पुढचा जन्म आहे की नाही हे ही आपण छाती ठोकपणे सांगू शकत नाही. उगा आपलं हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या पोथ्या-पुराणांमधील लिखाणावर विश्वास ठेवून आपण नाहक सैरावैरा धावत असतो. त्यापेक्षा आता असलेला माणसाचा जन्म माणूस म्हणून जगून आयुष्याचं सोनं करणं चांगलं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविंद्र गायकवाड

थोडक्यात आणि अगदी मनातलं

रविंद्र गायकवाड
Sun, 11/13/2011 - 11:14 नवीन
थोडक्यात आणि अगदी मनातलं बोललात राव. मुमुक्षू नाही हो . मला मोक्षाचा अर्थच कळत नाही. जिज्ञासू म्हणा हवं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

त्यापेक्षा आता असलेला माणसाचा

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/13/2011 - 13:53 नवीन
त्यापेक्षा आता असलेला माणसाचा जन्म माणूस म्हणून जगून आयुष्याचं सोनं करणं चांगलं नाही का?....धनाजीराव, डॉ. आ.ह. साळुंखे लिखित ''आस्तिक शिरोमणी-चार्वाक'' हे पुस्तक तुंम्ही घ्याच.. नक्की अवडेल तुंम्हाला... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आम्हाला अर्धवट कळतय आणि वळत

रविंद्र गायकवाड
Sun, 11/13/2011 - 10:56 नवीन
आम्हाला अर्धवट कळतय आणि वळत तर आजिबात नही म्हणून जानकारांचा सल्ला हवाय. ज्यांना यात रस नाही त्यांनी विनाकारण मला भिती दाखवू नये.
  • Log in or register to post comments

दवाखान्यात दाखवा.

वेताळ
Sun, 11/13/2011 - 11:12 नवीन
तेच उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

नाही हो... मोक्ष मिळावा या

धन्या
Sun, 11/13/2011 - 11:15 नवीन
नाही हो... मोक्ष मिळावा या भावनेची तुलना आजाराशी करणं योग्य नाही. फार तर तुम्ही असं म्हणू शकता की समुपदेशकाला भेटा. (समुपदेशक म्हणजे मराठीत काउन्सेलर बरं का ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

त्या डोक्टरला काय

रविंद्र गायकवाड
Sun, 11/13/2011 - 11:16 नवीन
त्या डोक्टरला काय दाखवू?? हात? (उगाच आपलं हात दाखवून अवलक्षण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

त्या डोक्टरला काय

धन्या
Sun, 11/13/2011 - 11:19 नवीन
त्या डोक्टरला काय दाखवू?? हात? (उगाच आपलं हात दाखवून अवलक्षण)
हाहा... हे आवडलं आपल्याला. तुम्हाला मोक्षाची आस किंवा गेला बाजार त्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असली तरी तुमची विनोदबुद्धी अजून शाबूत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविंद्र गायकवाड

अहो झोप नीट नाही आली कि बरेच त्रास सुरु होतात

वेताळ
Sun, 11/13/2011 - 11:22 नवीन
त्यामुळे उपचार करावेत असे वाटते......तरी देखिल मोक्ष आणि त्याची प्राप्ती हा विषय जालावरुन चर्चा करुन कळाला असता तर खुपच छान झाले असते नाही? घरोघरी बुध्द जन्माला आले असते.
  • Log in or register to post comments

राव तुम्ही अंतरजालीय मनकवडे

रविंद्र गायकवाड
Sun, 11/13/2011 - 11:25 नवीन
राव तुम्ही अंतरजालीय मनकवडे दिसताय. बाय द वे तुम्हाला कसं कळलं झोप झाली नाही ते.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

तसे काही नाहि हो

वेताळ
Sun, 11/13/2011 - 11:29 नवीन
असेच प्रश्न माझ्या एका मित्राला पडायचे. त्यावर त्याने योग्य उपचार घेतल्याने तो आता ठिक आहे.(निदान तो तरी तसे सांगतो). इतकच ,बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments

गायकवाड साहेब, हे वाचले नसले

यकु
Sun, 11/13/2011 - 12:27 नवीन
गायकवाड साहेब, हे वाचले नसले तर वाचून काढा यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट भाग एक यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट भाग दोन यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट भाग तीन यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट भाग चार यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट भाग पाच यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट भाग सहा यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट भाग सात
  • Log in or register to post comments

केली का स्वताच्या लेखांची

शिल्पा ब
Sun, 11/13/2011 - 13:38 नवीन
केली का स्वताच्या लेखांची झैरात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

केली का स्वताच्या लेखांची

यकु
Sun, 11/13/2011 - 13:40 नवीन
केली का स्वताच्या लेखांची झैरात?
हॅ हॅ हॅ कुणीतरी केलीच असती.. ती आम्ही केली ;-) एरव्ही काय त्या लिखाणाचं लोणचं होणार आहे तिथं राहून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कुणीतरी केलीच असती.. ती आम्ही

धन्या
Sun, 11/13/2011 - 16:16 नवीन
कुणीतरी केलीच असती.. ती आम्ही केली
तुम्हाला बरं कळतं कुणी तुमच्या लिंकांची पुढे खैरात करणार आहे ते. आता एव्हढं कळतंच तर तेव्हढं मोक्षाची गरज कुणाला आहे हे रविंद्ररावांना सांगून टाका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

तुम्हाला बरं कळतं कुणी

यकु
Sun, 11/13/2011 - 16:47 नवीन
तुम्हाला बरं कळतं कुणी तुमच्या लिंकांची पुढे खैरात करणार आहे ते.
आम्हाला काय काय कळत ते इथं तुम्हाला सांगत बसलो तर घेरी येईल तुम्हाला.. म्हणून टाळतो.
आता एव्हढं कळतंच तर तेव्हढं मोक्षाची गरज कुणाला आहे हे रविंद्ररावांना सांगून टाका. Wink
मोक्षाची गरज कसली घेऊन बसलात? आम्ही थेट मोक्षच देऊन टाकला आहे रविंद्र गायकवाडांना.. विचारुन बघा त्यांना.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अवांतर होईल म्हणून पास.

धन्या
Sun, 11/13/2011 - 17:01 नवीन
अवांतर होईल म्हणून पास. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मला वाटले कायतरी स्किम

अन्या दातार
Sun, 11/13/2011 - 12:48 नवीन
मला वाटले कायतरी स्किम आहे मोक्ष पाहिजे असेल तर अमक्यांना-तमक्यांना भेटा वगैरे ;) त्यावर काही फ्री वगैरे असेल असेही वाटले
  • Log in or register to post comments

हा असला मोक्ष होय, मला वाटलं

५० फक्त
Sun, 11/13/2011 - 12:50 नवीन
हा असला मोक्ष होय, मला वाटलं हल्ली अनाथाश्रमात वगैरे मुलांची नावे अशी ठेवतात, त्यापैकी एखाद्याला द्त्तक वगैरे द्यायचं आहे का काय ? छे हा असला मोक्ष अजिबात नकोय, त्यापेक्षा सुशीलकुमारांनी ( दोन्ही मंत्री पण आणि पाच कोटीवाले पण) मला वारस केलं त्यांच्या मृत्युपत्रात तर बरं होईल. 'सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?' यापैकी कित्येक मोठ्या स्त्री पुरुषांची कर्म आणि अहंकार नष्ट झाले नाही तर त्याचे बरेच बरे वाईट परिणाम बाकीच्यांना भोगावे लागतात. तुम्हाला सांगतो काही म्हणता काही नष्ट होत नाही. आज जर एखाद्याची हाडं अन राख नदीत टाकली ना तर सांगतो बरोबर ११.११.११ म्हणजे ११.११.७०११ ला तुम्ही किंवा मी जे पेट्रोल भरु ना त्यामध्ये त्याचा अंश असेल् नक्की. पाहिजे तर लिहुन घ्या,
  • Log in or register to post comments

आज जर एखाद्याची हाडं अन राख

यकु
Sun, 11/13/2011 - 12:54 नवीन
आज जर एखाद्याची हाडं अन राख नदीत टाकली ना तर सांगतो बरोबर ११.११.११ म्हणजे ११.११.७०११ ला तुम्ही किंवा मी जे पेट्रोल भरु ना त्यामध्ये त्याचा अंश असेल् नक्की. पाहिजे तर लिहुन घ्या,
म्हणजे तुम्हाला कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य आहे तर! नाही तर ११.११.७०११ ला तुम्ही किंवा ते गाडीत कसे पेट्रोल भरणार? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

म्हणजे तुम्हाला कर्मविपाकाचा

धन्या
Sun, 11/13/2011 - 16:19 नवीन
म्हणजे तुम्हाला कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य आहे तर!
आलेपाक हा आल्यापासून बनतो तसा कर्मविपाक हा केलेल्या कर्मांपासून बनतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

''आलेपाक हा आल्यापासून बनतो

५० फक्त
Sun, 11/13/2011 - 17:51 नवीन
''आलेपाक हा आल्यापासून बनतो तसा कर्मविपाक हा केलेल्या कर्मांपासून बनतो का?'' आलेपाक हा आपण केलेल्या नाहीतर विकत आणलेल्या आल्यापासुन बनवावा लागतो एवढं माहित आहे आणि ते पण आलं पाकात घातलं म्हणुन आलेपाक म्हणतात. कर्म विकत घेउन पाकात घाललणं म्हणजे कर्मविपाक असावे म्हणजे आजच्या माझ्या अज्ञानी लोकांच्या भाषेत आउट सोर्सिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कर्म विकत घेउन पाकात घाललणं

धन्या
Sun, 11/13/2011 - 19:10 नवीन
कर्म विकत घेउन पाकात घाललणं म्हणजे कर्मविपाक असावे म्हणजे आजच्या माझ्या अज्ञानी लोकांच्या भाषेत आउट सोर्सिंग.
अशा विकत घेउन घेउन पाकात घातलेल्या कर्माला म्हणजे पैसे देउन करवून घेतलेल्या कर्माच्या बर्‍या-वाईट फळाला जबाबदार कोण असेल? म्हणजे असे की एखादया धनवान सद्गृहस्थाने आजच्या या विज्ञानयुगात लोक काय म्हनतील म्हणून पुरोहीतांकरवी मोक्षप्राप्ती यज्ञ करवून घेतल्यास मोक्षाला कोण जाईल, यजमान की पुरोहीत? किंवा उलट, एखादया धनवान कुबुद्धी गृहस्थाने त्रयस्थास पैसे देउन एखादया व्यक्तीस टपकवल्यास त्या पापाचे फळ म्हणून चौर्‍यांशीच्या फेर्‍यात कोण अडकेल, पैसे देऊन टपकवून घेणारा की टपकवणारा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

रामबाण उपाय म्हणजे

jaypal
Sun, 11/13/2011 - 14:09 नवीन
नाडी (पट्टी) दाखवुन घ्या ;-)
  • Log in or register to post comments

ज्याना मोक्ष कसा मिळतो हे

llपुण्याचे पेशवेll
Sun, 11/13/2011 - 19:20 नवीन
ज्याना मोक्ष कसा मिळतो हे माहीत असेल ते इथे मिपावर येऊन रिकाम*टगिरी करत बसतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद मनस्वी संतापातून

धन्या
Sun, 11/13/2011 - 19:30 नवीन
हा प्रतिसाद मनस्वी संतापातून दिलेला आहे. तो संताप नेमका कोणत्या गोष्टीचा आहे हे सांगितलंत तर त्याच्या अनुषंगाने या धाग्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही मिळून जाईल असे आम्हांस वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

बघा पुपेंकडे.. कधी नव्हे ते

यकु
Sun, 11/13/2011 - 19:30 नवीन
बघा पुपेंकडे.. कधी नव्हे ते आले आणि डायरेक्ट शिरीयस झाले ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मोक्ष कसा मिळतो हि खूप दूरची

रविंद्र गायकवाड
Mon, 11/14/2011 - 13:08 नवीन
मोक्ष कसा मिळतो हि खूप दूरची गोष्ट आहे हो.. तो का मिळवायचा हा प्रश्न ही अजून खूप पुढचा आहे. प्रश्न नीट वाचण्यात एवढेच कष्ट केलेत तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हम्म

मूकवाचक
Mon, 11/14/2011 - 17:00 नवीन
मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ?? मन, बुद्धी, चित्त, अहंकार याहून वेगळे असूनही असे तद्दन बौद्धिक प्रश्न जो कधी जन्मलाच नाही असा विदेही मुक्तात्मा मिपावर उपस्थित करतो आहे हा एक विलक्षण चमत्कारच नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

भिर्रर्र....

धमाल मुलगा
Sun, 11/13/2011 - 19:47 नवीन
व्हेदर यु आर इंटरेस्टेड इन मोक्ष, लिबरेशन, फ्रीडम, ट्रान्सफॉर्मशन, यू नेम इट, यु आर इंटरेस्ट्रेड इन हॅपीनेस विदाऊट वन मोमेंट ऑफ अनहॅपीनेस, प्लेजर्स विदाऊट पेन..इट इज द सेम थिंग. . . . ऑल आय कॅन गॅरेंटी यू इज दॅट अ‍ॅज लाँग अ‍ॅज यु आर सर्चिंग फॉर हॅपिनेस, यु विल रिमेन अनहॅपी! -यु.जी. कृष्णमुर्ती. अवांतरः लेखाच्या शेवटच्या वाक्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. जे स्थुल देहासोबत नष्ट होत नाही त्याला मोक्षाची गरज! नैंनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः .....
  • Log in or register to post comments

बाब्बो... काय तो व्यासंग...

धन्या
Sun, 11/13/2011 - 20:19 नवीन
बाब्बो... काय तो व्यासंग...
ऑल आय कॅन गॅरेंटी यू इज दॅट अ‍ॅज लाँग अ‍ॅज यु आर सर्चिंग फॉर हॅपिनेस, यु विल रिमेन अनहॅपी!
परफेक्ट. द अल्केमिस्ट ची ईष्टोरी म्हणा की. किंवा मग ते तुझं आहे तुजपाशी वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आपल्यात कमालीची कल्पकता व

रविंद्र गायकवाड
Mon, 11/14/2011 - 13:12 नवीन
आपल्यात कमालीची कल्पकता व कौशल्य आहे. ते आपण इतर विषयात दाखवावे. विषय भरकटण्यात आपले मौल्यवान कौशल्य पणाला लावू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जो स्थूल देहाबरोबर नष्ट होत

रविंद्र गायकवाड
Mon, 11/14/2011 - 13:10 नवीन
जो स्थूल देहाबरोबर नष्ट होत नाही तो कर्म आणि भोग मुक्त आहे. मग मोक्ष हवाय म्हणुन का रडावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कोणी सांगेल काय?

पैसा
Sun, 11/13/2011 - 20:41 नवीन
जोपर्यंत मोक्षाची इच्छा आहे, तोपर्यंत तुम्ही कसलीतरी इच्छा धरून आहात, मग मोक्ष कसा मिळेल? मोक्ष हवा असला तर मोक्षाची इच्छा पण सोडून दिली पाहिजे. हे बरोबर वाटतंय का?
  • Log in or register to post comments

__/\__

धन्या
Sun, 11/13/2011 - 20:54 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बहुतेक नाही तसं.

धमाल मुलगा
Sun, 11/13/2011 - 21:16 नवीन
इच्छा हा शब्द जरी तसाच वापरत असले तरी मोक्षाची इच्छा आणि इतर अपुर्ण वासना ह्याही इच्छाच ह्यातला मुलभुत फरक लक्षात घेता वरचं समिकरण बरोबर वाटत नाहीए. इच्छा धरुन असणे म्हणजे वासना. वासना आल्या की षड्रिपू आले, षडरिपू आले की मनावरचा ताबा गेला, ताबा गेला की एकाग्रता संपली, एकाग्रता गेली की प्रयत्न वहावले, प्रयत्न वहावले की प्रयोग फसलाच. :) त्याउलट, मुमूक्षू झाले की मोक्षासाठी प्रयत्न हे ठरलं, प्रयत्न सुरु झाले की एकाग्रता करावी लागणार, एकाग्रता करु लागलं की मनावर ताबा ठेवला जाणार, मन ताब्यात राहिलं की षडरिपूंचा कोलाहल कमी होणार, षडरिपूंचा खेळ कमी झाला की आपोआप वासना कमी होत जाणार............. :) असं हे उलट सुलट कसंही फिरणारं चक्रच म्हणा ना. कोणत्या दिशेनं ते फिरवायचं त्यावर अवलंबून आहे पुढचं सगळं. :) काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छळ आहे

आनंदी गोपाळ
Mon, 11/14/2011 - 00:55 नवीन
म्हणजे शब्दांचा छळ. इच्छा म्हणजे वासना. मग ती कशाचीही असो. अन उलट चक्र फिरवून मठ्ठ का बनायचं?? दगडासारखं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मी ही हेच विचारतोय मोक्ष

रविंद्र गायकवाड
Mon, 11/14/2011 - 13:13 नवीन
मी ही हेच विचारतोय मोक्ष नक्कि कुणाला हवाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मोक्ष नक्कि कुणाला हवाय.

सस्नेह
Tue, 01/24/2012 - 16:07 नवीन
मोक्ष जीवाला ह वाय . म्हणजे देह, मन, बुद्धी, चित्त, अहन्कार यान्चे आत्म्याशी कॉम्बीनेशन. म्रुत्युने फक्त देह सुटतो, बाकि सर्व पुढ्च्या जन्मात हि येते. तेही सुटणे म्हणजे मोक्ष. गम और खुशीमे फर्क ना महसूस हो जहा....वो मकाम म्हणजे मोक्ष . समझे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविंद्र गायकवाड

उत्तरायणाच्या काळात मेलं की

JAGOMOHANPYARE
Sun, 11/13/2011 - 20:54 नवीन
उत्तरायणाच्या काळात मेलं की मोक्ष मिळतो म्हणे..( संदर्भ महाभारत भीष्म शरशय्येवर उत्तरायणाची वाट बघत होते.) सगळं कर्ज माफ होते.... उत्तरायण म्हणजे साधारणपणे १४ जानेवारी ते १४ जुलै... एक्झॅक्ट तारखा भुगोल तज्ञाना विचारुन घ्या.
  • Log in or register to post comments

>>सगळं कर्ज माफ होते छे राव,

अन्या दातार
Sun, 11/13/2011 - 21:28 नवीन
>>सगळं कर्ज माफ होते छे राव, विदर्भातल्या शेतकर्‍यांनी याच दरम्यान (उत्तरायण) आत्महत्या करायला हव्या होत्या, गेला बाजार कर्ज तरी माफ झालं असतं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

+१ हा हा हा.

आत्मशून्य
Mon, 11/14/2011 - 05:10 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

काल इन्सेप्शन पाहीला. लूसीड

आत्मशून्य
Mon, 11/14/2011 - 05:31 नवीन
काल इन्सेप्शन पाहीला. लूसीड ड्रीमींगवर फार चांगला चित्रपट आहे. स्वप्न कशाला म्हणावे याबाबतच्या संकल्पनातील सूटसूटीतपणा तर त्यात फार मस्त दीलाय. त्यातलच एक वाक्य घ्या, "स्वप्नात जोपर्यंत जाग्रूतपणा नीर्माण होत नाही अथवा स्वही जाणीव अथवा अर्धवट जाग येणे म्हणावं हे घडत नाही तो पर्यंत आपण स्वप्नाला सत्यच समजतो ते स्वप्न आहे हेच आपल्याला कळत नाही, म्हणूनच अशावेळी जर का आपण स्वप्नात आहोत का हे जाणून घ्यायच असेल तर स्वप्नात तूम्ही ज्या ठीकाणी अथवा प्रसंगात आहात त्याठीकाणी तूम्ही कसे आलात/पोचलात याचा विचार करा मग लक्शात येइल की त्याचं नीट/तर्कशूध्द उत्तरच मीळत नाही, स्वतःचा अहं वाढवणारी बूध्दीही देऊ शकत नाही... कारण स्वप्न हे अचानक सूरू होतं. आपण स्वप्नातल्या जागेत घटनेत असचं अचानक जाऊन पोचतो, व जगू लागतो, तीथे आपण कधी गेलो याला सूसंबध्द भूतकाळ कधीच नसतो.... ते फक्त सूरू होतं आणी आपण जागं होत नाही पर्यंत ते सत्यच समजत राहतो, त्यातील घडणार्‍या प्रत्येक घटनेनी आनंदी अथवा चिंतीत होत राहतो, वैतागतो, घाबरतो पण एकदा जाग आली की मात्र मग जीवात जीव येतो की ते एक स्वप्नच होतं म्हणून.... स्वप्न हे असच असंत, ते जे काही आहे ते अचानक सूरू होतं व आपल्याला कंटीन्यू करण्यास/जगण्यास भाग पडतं जो पर्यंत झोपेतून जाग येत नाही.... आयूश्याचही असचं नाही का ? आपल्याला कधी जाणवलं आहे का की हे नक्की कधी कूठून सूरू झालं ते ? आपण इथे (आपल्या अस्तित्वात/घटनेमधे) नक्कि कसे पोचलो ते ? बस, नमके असलेच हे प्रश्न पडणार्‍यांना हा जागेपणा हवा असतो या मूक्कामावर असणार्‍यांच्या विचारांना सश्रध्द/अंधश्रध्द/नीश्रध्द/आनंदी/दूख्खि: वगैरे भेद नसतात. मूक्ती, जागेपणा वा मोक्ष ही याच लोकांची हवीहवीशी फँटसी आहे, कारण इतरांना तो टवाळकीचा सर्वात सोपा मार्ग भासू शकतो :)
  • Log in or register to post comments

लय भारी!

धमाल मुलगा
Mon, 11/14/2011 - 11:21 नवीन
जियो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

आपल्याला म्हणजे नक्कि कुणाला

रविंद्र गायकवाड
Mon, 11/14/2011 - 13:22 नवीन
आपल्याला म्हणजे नक्कि कुणाला हे जानवायला हवं की आपन स्वप्नात आहोत.. त्याला ज्याला ही जाणिव व्हायला हवी होती त्याचाच शोध मी घेतोय.. ज्याला ह्या स्वप्नातून जागे व्ह्यायचे आहे त्याचाच शोध चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा