Skip to main content

मोक्ष कुणाला हवाय?

लेखक रविंद्र गायकवाड यांनी रविवार, 13/11/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोण तू वाचलं... आणि अनेक दिवस मनाच्या कोपर्‍यात राहून गेलेला प्रश्न पुन्हा डोक्यात थैमान घालतोय.. मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??? सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?

वाचने 22335
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by रविंद्र गायकवाड

आम्ही काय काय वाचले किंवा ऐकले हे सांगुन स्वत्:चा अपमान्/स्तुती करण्यात काय अर्थ आहे? नाही, तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर पडेल ना ! म्हणुन विचारले. बरं मी काय काय वाचलं हे सांगितल्यावर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे का? मला वाटतं तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रतिसादात विषयांतर करत आहात्.मूळ मुद्यावर बोला जरा...

जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??? ती तशी सुटका झाल्यावर तुम्चे नक्की काय होते? प्रोजेक्ट, बेंच , प्रीसेल्स ,प्रोजेक्ट या फेर्‍यातुन सुटका होण्यासाठी तुम्हीला कंपनी प्रमोटर व्हावे लागते

In reply to by धमाल मुलगा

आमचे इजाभाऊ म्हणजे आधुनिक चार्वाक आहेत असं आम्ही म्हणतो ते का उगाच नाय!
हे कौतुक आहे का टिंगल ? तत्वांना जपणारा परा

मी एक आयटी हमाल. काम मला मारत नाही. काम मला तारत नाही. स्तुती मला बदलत नाही टिंगल मला सुधरवत नाही. आचार्य विजुभाऊ या वर्षी चांगले काम करशील तर पुढील वर्षी चांगले अप्रेजल मिळेल असे समजू नकोस अप्रेजल चाम्गले मिळाले नाही तर ती तुझ्या वर्षभरात केलेल्या टाईमपासची फळे आहेत असे मान. काम करीत रहा. अ‍ॅप्रेजलची अपेक्षा ठेवु नकोस, या कंपनीत नाही मिळाले पुढील कंपनीत मिळेल आचार्य विजुभाऊ

चर्चा करताय? मोक्ष देवाकडे मागावा लागतो. मेल्यावर देव विचारतो प्रत्येकाला, 'अजून काही वासना उरली आहे का ?' तेंव्हा नाही असं सांगायचं. मग देव लगेच मोक्ष देतो. आणि कोणाला हवाय या प्रश्नाचं उत्तर 'मला हवाय' हे आहे.

मोक्ष म्हणजे काय हे समजल्यावर तो कोणाला हवाय हा प्रश्न उद्भवू शकेल. काही थोडेबहुत वाचल्यावर माझ्या अल्पमतीनुसार तयार झालेले माझे मत - मोक्ष म्हणजे कर्मफळापासून मुक्तता. बाह्यजगतातले सर्व नश्वर हे जरी बरोबर असले तरी कर्मफळ तसे नष्ट होत नाही. जो कर्ता त्याच्यासोबत ते पुढे जाते. त्यानुसार आलेले भोग हे भोगावे लागतात. ते भोगण्यासाठी जन्म परत होतो. म्हणजे पुनर्जन्माचा सिद्धांत आला. मोक्ष मिळणे मनुष्य जन्मातच का शक्य? कारण इतर वेळेस आपण भोग भोगतोय याची जाणीव असत नाही. ही जाणीवच माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करते. कारण तिचा उगम बुद्धीमधे आहे. या मताप्रमाणे मनुष्यजन्मातही जर ही जाणीव नसेल तर मोक्ष शक्य नाही. ही जाणीव असणे म्हणजे वाटचालीची सुरुवात. कर्मफळ कसे नष्ट होईल? अगोदरचे कर्मफळ भोगूनच संपवावे लागेल. अन्‌ नवीन तयार कसे होणार नाही? जेव्हा आतून खरी जाणीव होईल की कर्ता कोण तेव्हा. तेव्हा वेगळी ईच्छा असणार नाही. अन्‌ ते संपले तर कर्मफळ चिकटणार नाही. साधन असणारे शरीर जोवर हे काया-वाचा-मने जाणू शकत नाही तोवर कर्मफळ चिकटत राहील अन्‌ चक्र सुरू राहील. आता तुमचा प्रश्न: मोक्ष कुणाला हवाय? अर्थातच आत्म्याला. कारण सर्वांपासून अलिप्त असूनही बिचारा जन्म-मृत्यूच्या चक्रात फसलाय. राघव

In reply to by राघव

>>>>मोक्ष कुणाला हवाय? >>>>अर्थातच आत्म्याला. कारण सर्वांपासून अलिप्त असूनही बिचारा जन्म-मृत्यूच्या चक्रात फसलाय. ळिट्टीळ करेक्शण, आत्म्याला नाही जीवात्म्याला किंवा जीवाला. आत्मा हा अलिप्त'च' असतो. आत्म्याच्या बुद्धीत पडलेल्या प्रकाशाला जीव असे म्हणतात. जन्म घेतो तो जीव. हा जीव त्याचे त्याचे प्रारब्ध, वासना घेऊन आलेला असतो. थोडंसं उदाहरण घेऊन पाहू. कंदिलाची पेटलेली वात म्हणजे आत्मा. कंदिलाची काच म्हणजे बुद्धी. ही बुद्धी त्या त्या जीवाच्या वासनांनुसार असते. पुण्य अथवा चांगली कर्मे म्हणजे अत्यंत पारदर्शक ते पाप अथवा वाईट कर्म म्हणजे अत्यंत काजळी अथवा वेगवेगळे लाल, हिरवे, पिवळे रंग. साधना म्हणजे हे रंग, ही काजळी पुसणे. आत्म्याचा स्वच्छ प्रकाश दिसला की 'झाले'. दुसरे उदाहरण म्हणजे प्रोजेक्टर म्हणजे आत्मा. सिनेमाची रिळं या वासना. पडदा म्हणजे व्यक्ती. एकूण संच म्हणजे जीव. प्रोजेक्टर प्रकाश टाकतो. भक्त प्रल्हाद लावा अथवा 'भक्त प्रल्हाद' लावा. आत्म्याला फरक पडत नाही. एखादी गोष्ट करण्याची अथवा न करण्याची देखील इच्छा म्हणजे वासना. कायिक अथवा वाचिक कर्म होण्या आधी आतापर्यंतच्या कारकिर्दीनुसार वासना उत्पन्न होते. फक्त कामेच्छा एवढेच याचे सीमित स्वरुप नाही. सुंदर स्त्री पाहिली तर एखादा, 'वा, क्या आयटेम है' म्हणतो तर दुसरा सौंदर्यापुढे नतमस्तक होतो. त्याच्या त्याच्या विचार पद्धतीनुसार (वासनेनुसार) हे घडतं. याच्यापुढे 'क्रियमाण स्वातंत्र्य' हा विषय आहे. 'डोळे भरुन' 'आयटेम' कडे पाहणे अथवा आपल्या डोळ्यांना इतर कामात लावणे हे या स्वातंत्र्यावर अवलंबून. 'डोळे भरुन' पाहताना पुढच्या 'अनेक गोष्टी' ;) होतात. मनातच. कर्मे उत्पन्न होतात ती अशी.

In reply to by प्यारे१

:) माझ्या मते जीव अन् आत्मा वेगवेगळे नाहीत. साधन अन् साध्य जेव्हा एकरूप होतात तेव्हा कर्मफळ चिकटत नाही येवढेच मला म्हणायचे होते अन् तुम्हीही बहुदा तेच म्हणत आहात. बाकी अनुभव नसतांना मी नुसताच शब्दच्छल करण्यात खरंतर अर्थ नाही. हे सर्व माहीत असूनही मला अनुभव नाही म्हणजे.. दुधाचा आस्वाद न घेता दुधाचे वर्णन ऐकून त्यावर चर्चा करण्यासारखे आहे. :) राघव

In reply to by प्यारे१

थोडंसं पटतय. भोग आणि कर्म जीवाला असतो हे ही मान्य. जीव जेव्हा भौतीक देह सोडून दुसर्‍या देहात प्रवेश करतो. तेव्हा त्याला पुर्व देहाचे ज्ञान/स्मरण नसते. वर सांगितल्याप्रमाणे जीव देह बदलत असतो. बरं तो जीव जर एका योनीतून दुसर्‍या असा ८४ लक्ष योनी मध्ये फिरत असतो. आता माझा गोंधळ इतका वाढलंय की टंकता येत नाही. थोडक्यात विचारतो. जीवाची आणि आत्म्याची लक्षणे सगळी सारखीच आहेत. मग जीव आत्म्याहून वेगळा कसा? की आत्मा म्हणजेच जीव?(तसे असेल तर पुन्हा तोच प्रश्न)

In reply to by रविंद्र गायकवाड

कॄपया उदाहरण वाचा. आत्मा एकटाच असतो. अ‍ॅक्च्युअली तोच 'असतो'. बाकी काही नसतेच. आकाशात एखादा घडा ठेवला तर आकाश तेच पण घड्यातले आकाश वेगळे भासेल. तसे शरीरा शरीरात त्या त्या कमी अधिक प्रमाणात भेद आढळतात. आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश म्हणजे जीव. आत्म्यामध्ये बुद्धीची भेसळ म्हणजे जीव. वासना बुद्धीमध्ये राहून त्यांना ह वे तसे काम करुन घेतात. दारु प्यावी की न प्यावी ह्याचे उत्तर वासनेच्या रेट्यावरुन ठरते. इच्छा बदलली की कर्म बदलते.

In reply to by प्यारे१

सुक्ष्मदेहाचे अंतकरण पंचक म्हणजेच स्फुरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे सुक्ष्म देहाचे भाग झाले. तेही नश्वर. म्हणजे सुक्ष्म देह म्हणजेच जीव (असे तुम्हाला म्हणायचे आहे काय). स्मरण चिंतन तर्क योजन प्रयोजन हे बुद्धीचे कार्य व घटक. तेही देहाबरोबरच नष्ट होतात. म्हणजेच यातले काहीही कॅरी फॉरवर्ड होत नाही. यांचा तर देहाबरोबरच नाश होतो. याची सांगड घालता घालता माझी बुद्धी (म्हणजे देहरुपी संगणकाचा प्रोसेसर हँग होतोय. कुठंतरी काही तरी मिस्-मॅच होतय हे कळतंय पण नक्की काय ते समजत नाहीये.) आत्म्यामध्ये बुद्धीची भेसळ म्हणजे जीव. असे म्हणावे तर बुद्धीचा नाश झाल्यावर(देहाबरोबरच) राहतो तो केवळ आत्माच. आणि तो तर असंग आहे असेही म्हटले आहे. माझ्या वाचनानुसारही जीवालाच मोक्ष हवा असतो. पन जीव म्हणजे नाकी काय? तेच विचारयचा प्रयत्न करतोय.

In reply to by रविंद्र गायकवाड

माझ्या माहितीनुसार (अनुभव नाही अजून म्हणून माहितीनुसार म्हणतोय ;) (असला तरी विस्मृत आहे) सूक्ष्म देह शिल्लक असतो. वासना असतात. त्या सूक्ष्म देहाबरोबर कॅरी फॉरवर्ड होतात. बुद्धीचा नाश होत नाही. अतिशय लहानपणी तल्लख बुद्धी, तीव्र स्मरण शक्ती, संगीत, चित्रकला इ.इ. क्षेत्रातली जाण ह्या सगळ्या पूर्वजन्मीच्या कष्टांचा परिणाम असतो. मुळात मृत्यूनंतर मिळणारा मोक्ष ही संकल्पना समर्थ रामदासांसारख्या संतांना मान्यच नाही. रोकडी प्रचिती (रोखीचा व्यवहार) त्यांना मान्य आहे. मेल्यानंतर मोक्ष मिळेल इ.इ. गोष्टी म्हणजे बरीचशी पुढच्या जन्माची तयारी असते. समर्थ आपल्याला मुद्दाम सांगतात की जे करायचे ते आत्ताच आणि ताबडतोब करुन मोकळं व्हा. उद्याचा (नंतरचा जन्म) भरवसा नाही. (दासबोध पहावा) सुखी, समाधानी जीवन जगत जगत सुखरुप होऊन शांतपणं देह सोडणं हे आणि हेच मुख्य ध्येय असलं पाहिजे. मोक्ष हे बायप्रॉडक्ट आहे. त्यासाठीच संत साहित्याचा अभ्यास, विधीनिषेध पाळणं, सत्याचरण या गोष्टी आवश्यक आहेत.

In reply to by राघव

आत्मा तर कर्म आणि फळ यांपसून अलिप्त आहे. मग आत्म्याला कसली आलीये कर्मफ़ळा पसून मुक्तता.???

In reply to by रविंद्र गायकवाड

माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा. तरीही नाही समजले तर माझी याबाबतीतली असमर्थता मान्य करत सांगू इच्छितो की याहून वेगळ्या भाषेत मला नाही ब्वॉ सांगता येत. क्षमस्व. राघव

मोक्ष वगैरे काहीही भानगड नसते हो. तुम्ही प्रश्न विचारला म्हणजे मोक्ष म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहिती आहे का? आपलं शरीर तेवढं खरं. बाकी सगळ्या डोक्यातल्या कल्पना. शरीर मेलं की सगळं संपतंय आपोआप. नका टेन्शन घेऊ.

काही काही सिध्दयोगी असेही आहेत ज्यांना अस्सल पहिल्या धारेची नवटाक मारली की ताबडतोब मोक्षप्राप्ती होते. अशा अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत. -(सेमी मुमूक्षु) धम्या.

In reply to by रविंद्र गायकवाड

आम्हा मोक्षप्राप्तीसाठी आसुसलेल्यांना कोणतेही ठिकाण वर्ज नाही. पत्ता कळवलात तर दर्शन आणि दिक्षेचा लाभ घेता येईल.

In reply to by धमाल मुलगा

मौजे आकुर्डी. गोल्डण जिमच्या शेजारी येऊन एक कॉल मारा. आम्ही हजर असू. फक्त शुक्र/मंगळ/बुधवारी त्या दिवशी प्रदोष नसावा. नंबरासाठी संदेश पाठवा.

In reply to by रविंद्र गायकवाड

कुठपर्यंत यायचं बोला, येण्याचं काय मजेत येउ, परत घरी सोडण्याची व्यवस्था कोण करणार ते सांगा.

मायला २० मिनिटं झाली हा धागा आणि प्रतिक्रिया वाचतोय.... काहीच डोसक्यात घुसलं नाही. आता अजुन इच्छाशक्ती नाही. मला मोक्ष मिळो हिचं प्रार्थना :D :D

मोठाले लेख लिहून जेमतेम पाच सात प्रतिसाद येतात. चार ओळींच्या भांडवलावर इतके प्रतिसाद हा मोक्षच असू शकतो.;)

In reply to by रेवती

भरघोस प्रतिसाद म्हणजे तुमच्या मते मोक्ष असेल तर तुम्च्या अर्ध्या शब्दाच्या लेखाला ही आम्ही शेकड्याने प्रतिसाद देऊ. तुम्हाला अपेक्षित मोक्ष अम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. फक्त कळु द्या तुम्ही कुठे धागा काढलाय.

मला नेहमी संत, अध्यात्म इ. ज्यांना कळते अशा ज्ञानी लोकांना प्रश्न विचारावासा वाटतो तो असा – जर तुम्हाला जन्मल्या जन्मल्या एका बंद खोलीत “”Life support system” वर ठेवले तर काय होईल ? जन्म आणि मृत्यूच्या कल्पनांचे काय होईल. मृत्यूची जर कल्पना नसेल तर परमेश्वराच्या कल्पनेचे काय होईल, मग अध्यात्माचे काय होईल ? मग माणसामधे फक्त जनावरांप्रमाणे “instinct” च उरेल का ? जे अस्तित्वात नाही त्याला मेंदू जन्म देतो का ? इ.इत्यादि....... काय होईल याची यादी मी एकदा केली आहे आणि मला ह्या सगळ्या कल्पनांचा फोलपणा लक्षात आला.

In reply to by जयंत कुलकर्णी

नाय त्याचं म्हणन जसंच्या तसच लिहलय म्हणून विचारलं ? तो सूध्दा असच म्हणायचा समजा जन्म झाल्यानंतर तूमच्यावर कोणतेच संस्कार कोणीही केले नाहीत/काहीच शिकवलं नाही तर तूम्ही कसे जगत असाल ? बस अगदी तसाच चालू क्षण व्यतीत करा.

In reply to by आत्मशून्य

प्रामाणिकपणे सांगायचे तर ओशोचे कुठलेच लिखाण मी वाचलेले नाही. ओमर खय्याम जेव्हा लिहायला घेतला तेव्हा एका रुबाईच्या वेळी अर्थ लिहिताना मनात हा विचार आला आणि तो तेथेच मांडला. कदाचित ओशो म्हणतोय तेच मीही म्हटलेले असेल पण ओशोने ही यादी केली आहे का ? असल्यास मला वाचायला आवडॅल.....

२-३ पेग मारायचे... चकणा चापायचा..आपले भाऊ गणपा करतात त्यातला एखादा पदार्थ चापायचा. खुडुक व्हायच. मद्य सत्य..मोक्ष मिथ्या...

>मोक्ष कुणाला हवाय? मला तर नकोच नको ह्या जन्मात भरपुर बघितल अबब याच्या पुढे भरपूर बघायच आहे आता विद्या बालन बिपाशा कंगना पूढ्च्या जन्मात याच्या पेक्शा भलतच असेल कस काय ?