Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रविंद्र गायकवाड on Sun, 11/13/2011 - 10:16
कोण तू वाचलं... आणि अनेक दिवस मनाच्या कोपर्‍यात राहून गेलेला प्रश्न पुन्हा डोक्यात थैमान घालतोय.. मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??? सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?
  • Log in or register to post comments
  • 22263 views

प्रतिक्रिया

Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 11/14/2011 - 19:24

In reply to आपल्याला म्हणजे नक्कि कुणाला by रविंद्र गायकवाड

Permalink

मोक्ष कुणाला हवाय? हाच प्रश्न तूम्हाला उरला आहे ना ?

As I said, आपण इथे (आपल्या अस्तित्वात) नक्कि कसे पोचलो ? हे असले प्रश्न पडायला लागणार्‍यांना मोक्ष हवाय (मोक्ष ही अश्या लोकांचीच फॅंटसी आहे) इतकचं. तो तूम्हाला/मला/अथवा इतर कोणाला or to whom it may concern "who am I" त्याला, त्याची गरज आहे अथवा तो मिळतो की नाही याबाबत काहीही माहीत नाही. तूम्ही आधीच बरीच सूंदर माहीती गोळा केलेली आहे त्याधारे अत्यंत योग्य असं ज्ञानही जे आपण मिळवलेल आहे, जे धाग्यात लिहलेलं दिसत आहे, त्याबद्दल ब्र काढण्याचीही कोणाचीच छाती नसावी असा माझा समज आहे (आता हे वाक्य अश्लील गणू नये) म्हणूनच फक्त जो शवटचा प्रश्न जो उपस्थीत केलात त्याला उत्तर दीलं इतकचं. आता त्या अनूशंगाने जर इतर प्रश्न मनात निर्माण झाले असतील तर आपलं ज्ञान आपणास जी दिशा दाखवत असेल त्याच्याशी मी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Tue, 11/15/2011 - 09:27

In reply to मोक्ष कुणाला हवाय? हाच प्रश्न तूम्हाला उरला आहे ना ? by आत्मशून्य

Permalink

धन्यवाद आत्मशून्य जी. मा़झं

धन्यवाद आत्मशून्य जी. मा़झं कनफयूजन बहुतेक माझ्या अर्धवट ज्ञानामुळेच असेल. मोक्ष म्हणजे काय? व मी म्हणजे कोण? यांची जी उत्तरे मला मा़झ्या अर्धवट ज्ञानमुळे महित आहे त्यामुळे माझे हे कन्फ्यूजन आहे. माझ्या अर्धवट ज्ञानाप्रमाणे. १) मोक्ष म्हणाजे सु़ख दुखः जन्म मृत्यू कर्म भोग यांपासून कायमची सुटका. २) नैनं छिंदंती शस्त्रानी............. च्या अर्थानुसार जो आत्मा आहे त्याला जन्म मृत्यू सुख दुखः कर्म भोग नाहीत. आत्म्याशिवाय जे काही आहे. म्हणजे स्थूल, सुक्ष्म व कारण शरिर, मन बुद्धी चित्त अहंकार इत्यादी नश्वर (काही ठिकाणी सांगितल्याप्रमाणे स्वप्न आहे.) किती ही आटापिटा केला तरी हे(आत्म्याव्यतिरिक्त इतर गोष्टी) चिरंतन होऊ शकत नाहीत. म्हणजेच जो आत्मा आहे त्याला मोक्ष म्हणजे जे असतं त्याची गरजच नाही. मग एवढ्य महान व आदरणीय संतांनी पोटतिडकीने आपल्याला संदेश दिलाय की मानवी जन्म एकदाच आहे. तो भोग विलासात वाया घालवू नको. मानवी जन्म म्हणजे मोक्ष प्राप्तीचे साधन आहे.. (अर्थात मला असं म्हणायचं नाही की त्यांनी चुकिचं शिकवलंय. मला फक्त जे कळत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.) देह चेतना वैगैरे सगळेच नश्वर आहे. आत्मा कपडे बदलल्याप्रमाणे देह बदलतो. भोग व कर्मे देहादिकांची असतात आत्म्याची नसतात. मग त्या आत्म्याला मोक्षाची गरज काय? हे जे कनफ्युजन आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतोय.. मी असं म्हणत नाही की हे चुकीचे आहे. मात्र माझ्या अल्पबुद्धीला हा केवळ एक विरोधाभास वाटतोय. अर्थान माझं ज्ञान आणि बुद्धी चुकीची असेल त्या महान संतांचं बरोबरच आहे. पण कुणी तरी माझं हे कन्फ्युजन दूर करेल का कृपा करून. मला म्हणजे रविंद्र गायकवाड नावाचा जो ...... आहे त्याला आपलं ज्ञान पाजळायचं नसून कुनीतरी कृपा करून मा़झं कन्फ्यूजन दूर कराल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 11/15/2011 - 20:33

In reply to धन्यवाद आत्मशून्य जी. मा़झं by रविंद्र गायकवाड

Permalink

रविंद्रजी, नागड्यापाशी उघडा

रविंद्रजी, नागड्यापाशी उघडा हीच परीस्थीती आहे ना राव. मलाच अक्कल नाय तर तूमचं कन्फ्यूशन कसलं दूर करणार ? तूमच्या समस्या तूम्हीच सोडवाल. आपली काय बी व्हेल्प/सोबत हूनार नाय.
मग त्या आत्म्याला मोक्षाची गरज काय?
अगदी बरोबर, आत्म्याला मोक्षाची गरजच नाय , संतानी सांगीतलेले बाह्योपचार हे देहानेच पाळायचे आहेत. आत्म्याने न्हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 11/14/2011 - 10:28

Permalink

कुत्रा घेवुन हिमालयात फिरायला जा

त्यामुळे देखिल मोक्षप्राप्ती होते. असे महाभारतात वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/14/2011 - 10:34

Permalink

परत जन्म घ्यायची इच्छा संपली,

परत जन्म घ्यायची इच्छा संपली, म्हणजे आसक्ती संपलेल्या व्यक्तीला मोक्षाची ओढ लागते. जो पर्यंत मी,मला,माझे...संपणार नाही तो पर्यंत मोक्षाची इच्छा होणार नाही. एक गमतीशीर गोष्ट :--- एका कुटुंबातील वॄद्ध कुटंब प्रमुख मॄत्यु शय्येवर पहुडला होता, त्याला आपला अंतीम क्षण जवळ आला आहे असे वाटताच त्याने आपल्या मुलांना,परिवार जनानां जवळ बोलावुन घेतले. सगळे जवळ आले तेव्हढ्यात त्या वॄद्ध माणसाच्या तोडांतुन आवाज आला... वा,वा,वा... मोठा मुलगा वासुदेव जवळ आला त्याला वाटले वडिल आपल्याला जवळ बोलवत आहेत तर आपल्यालास सगळी संपत्ती आणि मालमत्ता देतील. पण ते काही पुढे बोलेनाच ! नंतर त्या वॄद्ध पित्याच्या तोडांतुन शब्द आला... के के के. त्यांचा दुसरा मुलगा जवळ आला त्याचे नाव केशव. त्याला वाटले आपल्याला वडिल जवळ बोलवत आहेत... आपल्यालाच सर्व काही मिळावे हीच त्यांची इच्छा असावी !!! बराच वेळ त्या वॄद्ध पित्याचे वा वा वा, के के के असे चालु होते...शेवटी अंगात असलेला उरला सुरलेला जीव एकवटुन ते ओरडले... " अरे वासरु केरसुणी खातयं त्याला आवरा ! मरणाच्या वाटेवर उभा असताना देखील त्या वॄद्ध माणसाची या नश्वर जगातील गोष्टींशी आसक्ती दिसत होती... हीच आसक्ती जन्म मरणाच्या फेर्‍यातुन माणसाला बाहेर पडु देत नाही. थोडक्यात :--- मोक्ष म्हणजे या फेर्‍यातुन कायमची सुटका.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 11/14/2011 - 11:00

Permalink

मोक्ष कुणाला हवाय?

काय भावाने मिळतोय म्हणे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/14/2011 - 11:07

In reply to मोक्ष कुणाला हवाय? by मन१

Permalink

काय भावाने मिळतोय म्हणे?खी

काय भावाने मिळतोय म्हणे? खी खी खी लवासतला प्लॉट काय ? तिकडे स्पष्टवादी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची गच्छंती झाली आणि इकडे लवासाच्या पहिल्या टप्प्याला सशर्त परवानगी मिळाली ! ;) शेवटी ३ हजार कोटींच्या गुंतवणुकाचा गहन प्रश्न आहे ना ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 11/14/2011 - 11:18

In reply to काय भावाने मिळतोय म्हणे?खी by मदनबाण

Permalink

हो.

इथे लवासाला प्लॉट मिळणे म्हणजे "स्टेटस"वाद्यांना मोक्षच मिळाल्यासारखे आहे. खरे तर भुकेल्यासाठी मोक्ष म्हणजे भाकरी असली पाहिजे. (उच्च?)मध्यमवर्गीयांसाठी सेकंड्/हॉलिडे होम मिळ्णे म्हणजे मोक्ष. ब्याचलरसाठी... छ्या जाउ देत, इथे नको. आणि माझ्यासाठी मोक्ष म्हणजे शेजार्‍याने एकाचवेळी त्याच्या लाड्क्या कुत्र्याचे बेफाम भुंकणे,विव्हळणे आणि हिमेशची ठणाणा वाजणारी गाणी दोन्ही एकाचा वेळेस वाजवत रहायची सवय बंद करणे.(पैकी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज राहिला तरी चालेल, स्वर्गसम वाटेल अशी स्थिती आहे.) दोन्ही बंद झाल्यास आम्हाला रात्रभर मोक्ष तरी मिळेल ब्वा.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 11/14/2011 - 11:19

In reply to मोक्ष कुणाला हवाय? by मन१

Permalink

येकदम डिस्काउंटमध्ये मिळतोय.

येकदम डिस्काउंटमध्ये मिळतोय. फक्त दुकान जरा लांब है, तिथपर्यंत पोचायचे कष्ट घ्यावे लागत्यात. अजून त्यांनी होम डिलिव्हरीची सोय नाय ना राव चालू केली. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 11/14/2011 - 11:36

In reply to येकदम डिस्काउंटमध्ये मिळतोय. by धमाल मुलगा

Permalink

नै ना रे भौ....

डिस्काउंटमध्ये नस्तोय तो. उलट मोक्ष आणि अध्यात्माच्या नावानं एकाएकी झपाटले जाउन नंतर हाताला काहिच न लागलेले किंवा नंतर पस्तावलेले लोकच (दुर्दैवाने) माझ्या पाहण्यात आहेत. दारूच्या व्यसनापेक्षा अधिक बर्बाद अध्यात्माच्या नशेने झालेले बघितलेत रे. कुणी अस्सल ज्ञानी,अनुभवी असेल ,भेटेल तर बरे वाटेल. पण आजवर तरी तसे घडलेले नाही. स्वस्तात किंवा फुक्टात मिळ्णारे आध्यात्म फारच महागात पडते असे अनुभवले आहे. गड्या आपला धोपट मार्गच( थोरांच्या भाषेत कर्मयोग, (धर्म-व्याधाची, कसायाची गोष्ट ऐकली असेलच)) बरा असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/14/2011 - 11:59

Permalink

लेखन

मिपावरचे 'मोक्ष' दाता लेखक फुकट मधे मोक्ष देतात.(त्यांचा फोन नंबर पण असतो म्हणे)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/14/2011 - 12:02

In reply to लेखन by विनायक प्रभू

Permalink

खिक्क... :)

मिपावरचे 'मोक्ष' दाता लेखक फुकट मधे मोक्ष देतात.(त्यांचा फोन नंबर पण असतो म्हणे) खी खी खी... ;) हे वाचताच चित्रगुप्ताला टाळी देउन आलो... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Mon, 11/14/2011 - 12:16

In reply to खिक्क... :) by मदनबाण

Permalink

हा हा हा . =)) =)) मी पण

हा हा हा . =)) =)) मी पण मोक्ष दात्यांबद्दल मिपावरच्या जुन्या जाणत्या वारकर्‍यांकडुन खूप ऐकले आहे. त्यामुळे फॉर डिटेल्स कॉण्ट्याक्ट मिपावरचे जुनेजाणते सदस्य ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 11/14/2011 - 12:36

Permalink

तेज्यायला !

मला वाटले मोक्षचे बुकींग मिळते आहे का काय. *फटू आंतरजालाव्रुन
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Mon, 11/14/2011 - 13:35

Permalink

आदरनिय मित्रहो.. मोक्ष कसा

आदरनिय मित्रहो.. मोक्ष कसा मिळतो हा प्रश्नच नाही.. त्यासाठी काय काय करावे हाही प्रश्न नाही. श्रुती स्मृती चे दाखले वचून ऐकुन डोक्याचा भुगा झालाय. मुळ प्रश्न बाजूलाच राहिला आणि इतर विषयांवर वाद होत आहेत. मोक्ष ज्याला हवाय. किंवा ज्याला मोक्ष ज्याला मिळावा असे सांगतात तो नक्की कोण. एखादा रिप्लाय वाचन्याचा राहिला असल्यास. क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 11/14/2011 - 13:46

In reply to आदरनिय मित्रहो.. मोक्ष कसा by रविंद्र गायकवाड

Permalink

बोंबला

जरा तुमचा गोंधळ बाजूला करा आणि मग प्रतिक्रिया टंका. मोक्ष ज्याला हवाय. किंवा ज्याला मोक्ष ज्याला मिळावा असे सांगतात तो नक्की कोण. यातून फक्त शब्दांचे बुडबुडे फुटले. नक्की कुणाचा मोक्ष? कुणाला मिळायला हवा? दुसर्‍या कुणाला तरी मिळाला काय? बरं ज्याची गोष्ट त्याला मिळाली तर मग आम्हाला काय? किती अर्थ काढावेत तितके कमीच ......... जाऊदेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Mon, 11/14/2011 - 13:50

In reply to बोंबला by अन्या दातार

Permalink

आदरणिय दातार साहेब. माझी

आदरणिय दातार साहेब. माझी मराठी किती चांगलं आहे हे माझ्या शुद्धलेखनाच्या क्वालिटीवरून समजलंच असेल.. इथे मराठी व्याकरणाचा विषय नाहीये. असो आपल्यात कमालीची कल्पकता व सहित्यीक कौशल्य आहे. ते आपण इतर विषयात दाखवावे. विषय भरकटण्यात आपले मौल्यवान कौशल्य पणाला लावू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 11/14/2011 - 15:22

In reply to आदरणिय दातार साहेब. माझी by रविंद्र गायकवाड

Permalink

आमची कल्पकता, कौशल्ये व

आमची कल्पकता, कौशल्ये व व्याकरणाचा विषय गेला तेल लावत. पण तुमचा मुद्दा तरी कळूदेत ना. आधी तुम्हाला काय म्हणायचे आहे ते नीट मांडा आणि मग चर्चा करा की.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/14/2011 - 14:07

In reply to आदरनिय मित्रहो.. मोक्ष कसा by रविंद्र गायकवाड

Permalink

त्यासाठी काय काय करावे हाही

त्यासाठी काय काय करावे हाही प्रश्न नाही. श्रुती स्मृती चे दाखले वचून ऐकुन डोक्याचा भुगा झालाय. म्हणजे नक्की काय काय वाचलयं ? जरा त्या बद्धल सांगा ना.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Mon, 11/14/2011 - 14:18

In reply to त्यासाठी काय काय करावे हाही by मदनबाण

Permalink

विषयांतर नको.. आम्ही काय काय

विषयांतर नको.. आम्ही काय काय वाचले किंवा ऐकले हे सांगुन स्वत्:चा अपमान्/स्तुती करण्यात काय अर्थ आहे? बरं मी काय काय वाचलं हे सांगितल्यावर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/14/2011 - 14:32

In reply to विषयांतर नको.. आम्ही काय काय by रविंद्र गायकवाड

Permalink

आम्ही काय काय वाचले किंवा

आम्ही काय काय वाचले किंवा ऐकले हे सांगुन स्वत्:चा अपमान्/स्तुती करण्यात काय अर्थ आहे? नाही, तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर पडेल ना ! म्हणुन विचारले. बरं मी काय काय वाचलं हे सांगितल्यावर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे का? मला वाटतं तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रतिसादात विषयांतर करत आहात्.मूळ मुद्यावर बोला जरा...
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/14/2011 - 13:56

Permalink

जन्म मृत्यूच्या चक्रातून

जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??? ती तशी सुटका झाल्यावर तुम्चे नक्की काय होते? प्रोजेक्ट, बेंच , प्रीसेल्स ,प्रोजेक्ट या फेर्‍यातुन सुटका होण्यासाठी तुम्हीला कंपनी प्रमोटर व्हावे लागते
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 11/14/2011 - 15:23

In reply to जन्म मृत्यूच्या चक्रातून by विजुभाऊ

Permalink

ज्जे बात!

आमचे इजाभाऊ म्हणजे आधुनिक चार्वाक आहेत असं आम्ही म्हणतो ते का उगाच नाय! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 11/14/2011 - 15:30

In reply to ज्जे बात! by धमाल मुलगा

Permalink

हम्म्म

आमचे इजाभाऊ म्हणजे आधुनिक चार्वाक आहेत असं आम्ही म्हणतो ते का उगाच नाय!
हे कौतुक आहे का टिंगल ? तत्वांना जपणारा परा
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 11/14/2011 - 15:49

Permalink

हे कौतुक आहे का टिंगल ?

आणि टिंगल असेल तर कुणाची?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/14/2011 - 18:17

Permalink

मी एक आयटी हमाल. काम मला मारत

मी एक आयटी हमाल. काम मला मारत नाही. काम मला तारत नाही. स्तुती मला बदलत नाही टिंगल मला सुधरवत नाही. आचार्य विजुभाऊ या वर्षी चांगले काम करशील तर पुढील वर्षी चांगले अप्रेजल मिळेल असे समजू नकोस अप्रेजल चाम्गले मिळाले नाही तर ती तुझ्या वर्षभरात केलेल्या टाईमपासची फळे आहेत असे मान. काम करीत रहा. अ‍ॅप्रेजलची अपेक्षा ठेवु नकोस, या कंपनीत नाही मिळाले पुढील कंपनीत मिळेल आचार्य विजुभाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 11/14/2011 - 18:34

Permalink

रविंद्रजी आपल्या प्रश्नातच आपले उत्तर दडले

आहे.मोक्षप्राप्ती नंतर कोणतीच भावना शिल्लक राहात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 11/15/2011 - 09:32

Permalink

इथे कशाला ?

चर्चा करताय? मोक्ष देवाकडे मागावा लागतो. मेल्यावर देव विचारतो प्रत्येकाला, 'अजून काही वासना उरली आहे का ?' तेंव्हा नाही असं सांगायचं. मग देव लगेच मोक्ष देतो. आणि कोणाला हवाय या प्रश्नाचं उत्तर 'मला हवाय' हे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Tue, 11/15/2011 - 12:13

In reply to इथे कशाला ? by तिमा

Permalink

मोक्ष म्हणजे काय

मोक्ष म्हणजे काय देवाची(तुम्ही ज्याला देव समजताय त्या) मक्तेदारी आहे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Wed, 11/16/2011 - 01:35

Permalink

मोक्ष म्हणजे काय हे समजल्यावर

मोक्ष म्हणजे काय हे समजल्यावर तो कोणाला हवाय हा प्रश्न उद्भवू शकेल. काही थोडेबहुत वाचल्यावर माझ्या अल्पमतीनुसार तयार झालेले माझे मत - मोक्ष म्हणजे कर्मफळापासून मुक्तता. बाह्यजगतातले सर्व नश्वर हे जरी बरोबर असले तरी कर्मफळ तसे नष्ट होत नाही. जो कर्ता त्याच्यासोबत ते पुढे जाते. त्यानुसार आलेले भोग हे भोगावे लागतात. ते भोगण्यासाठी जन्म परत होतो. म्हणजे पुनर्जन्माचा सिद्धांत आला. मोक्ष मिळणे मनुष्य जन्मातच का शक्य? कारण इतर वेळेस आपण भोग भोगतोय याची जाणीव असत नाही. ही जाणीवच माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करते. कारण तिचा उगम बुद्धीमधे आहे. या मताप्रमाणे मनुष्यजन्मातही जर ही जाणीव नसेल तर मोक्ष शक्य नाही. ही जाणीव असणे म्हणजे वाटचालीची सुरुवात. कर्मफळ कसे नष्ट होईल? अगोदरचे कर्मफळ भोगूनच संपवावे लागेल. अन्‌ नवीन तयार कसे होणार नाही? जेव्हा आतून खरी जाणीव होईल की कर्ता कोण तेव्हा. तेव्हा वेगळी ईच्छा असणार नाही. अन्‌ ते संपले तर कर्मफळ चिकटणार नाही. साधन असणारे शरीर जोवर हे काया-वाचा-मने जाणू शकत नाही तोवर कर्मफळ चिकटत राहील अन्‌ चक्र सुरू राहील. आता तुमचा प्रश्न: मोक्ष कुणाला हवाय? अर्थातच आत्म्याला. कारण सर्वांपासून अलिप्त असूनही बिचारा जन्म-मृत्यूच्या चक्रात फसलाय. राघव
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 11/16/2011 - 10:25

In reply to मोक्ष म्हणजे काय हे समजल्यावर by राघव

Permalink

>>>>मोक्ष कुणाला

>>>>मोक्ष कुणाला हवाय? >>>>अर्थातच आत्म्याला. कारण सर्वांपासून अलिप्त असूनही बिचारा जन्म-मृत्यूच्या चक्रात फसलाय. ळिट्टीळ करेक्शण, आत्म्याला नाही जीवात्म्याला किंवा जीवाला. आत्मा हा अलिप्त'च' असतो. आत्म्याच्या बुद्धीत पडलेल्या प्रकाशाला जीव असे म्हणतात. जन्म घेतो तो जीव. हा जीव त्याचे त्याचे प्रारब्ध, वासना घेऊन आलेला असतो. थोडंसं उदाहरण घेऊन पाहू. कंदिलाची पेटलेली वात म्हणजे आत्मा. कंदिलाची काच म्हणजे बुद्धी. ही बुद्धी त्या त्या जीवाच्या वासनांनुसार असते. पुण्य अथवा चांगली कर्मे म्हणजे अत्यंत पारदर्शक ते पाप अथवा वाईट कर्म म्हणजे अत्यंत काजळी अथवा वेगवेगळे लाल, हिरवे, पिवळे रंग. साधना म्हणजे हे रंग, ही काजळी पुसणे. आत्म्याचा स्वच्छ प्रकाश दिसला की 'झाले'. दुसरे उदाहरण म्हणजे प्रोजेक्टर म्हणजे आत्मा. सिनेमाची रिळं या वासना. पडदा म्हणजे व्यक्ती. एकूण संच म्हणजे जीव. प्रोजेक्टर प्रकाश टाकतो. भक्त प्रल्हाद लावा अथवा 'भक्त प्रल्हाद' लावा. आत्म्याला फरक पडत नाही. एखादी गोष्ट करण्याची अथवा न करण्याची देखील इच्छा म्हणजे वासना. कायिक अथवा वाचिक कर्म होण्या आधी आतापर्यंतच्या कारकिर्दीनुसार वासना उत्पन्न होते. फक्त कामेच्छा एवढेच याचे सीमित स्वरुप नाही. सुंदर स्त्री पाहिली तर एखादा, 'वा, क्या आयटेम है' म्हणतो तर दुसरा सौंदर्यापुढे नतमस्तक होतो. त्याच्या त्याच्या विचार पद्धतीनुसार (वासनेनुसार) हे घडतं. याच्यापुढे 'क्रियमाण स्वातंत्र्य' हा विषय आहे. 'डोळे भरुन' 'आयटेम' कडे पाहणे अथवा आपल्या डोळ्यांना इतर कामात लावणे हे या स्वातंत्र्यावर अवलंबून. 'डोळे भरुन' पाहताना पुढच्या 'अनेक गोष्टी' ;) होतात. मनातच. कर्मे उत्पन्न होतात ती अशी.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Wed, 11/16/2011 - 11:23

In reply to >>>>मोक्ष कुणाला by प्यारे१

Permalink

माझ्या मते जीव अन् आत्मा

:) माझ्या मते जीव अन् आत्मा वेगवेगळे नाहीत. साधन अन् साध्य जेव्हा एकरूप होतात तेव्हा कर्मफळ चिकटत नाही येवढेच मला म्हणायचे होते अन् तुम्हीही बहुदा तेच म्हणत आहात. बाकी अनुभव नसतांना मी नुसताच शब्दच्छल करण्यात खरंतर अर्थ नाही. हे सर्व माहीत असूनही मला अनुभव नाही म्हणजे.. दुधाचा आस्वाद न घेता दुधाचे वर्णन ऐकून त्यावर चर्चा करण्यासारखे आहे. :) राघव
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 11/16/2011 - 11:37

In reply to माझ्या मते जीव अन् आत्मा by राघव

Permalink

ठीक आहे श्री रामचंद्र महाराज.

ठीक आहे श्री रामचंद्र महाराज. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Wed, 11/16/2011 - 13:48

In reply to >>>>मोक्ष कुणाला by प्यारे१

Permalink

प्या रे १. थोडंसं पटतय.

थोडंसं पटतय. भोग आणि कर्म जीवाला असतो हे ही मान्य. जीव जेव्हा भौतीक देह सोडून दुसर्‍या देहात प्रवेश करतो. तेव्हा त्याला पुर्व देहाचे ज्ञान/स्मरण नसते. वर सांगितल्याप्रमाणे जीव देह बदलत असतो. बरं तो जीव जर एका योनीतून दुसर्‍या असा ८४ लक्ष योनी मध्ये फिरत असतो. आता माझा गोंधळ इतका वाढलंय की टंकता येत नाही. थोडक्यात विचारतो. जीवाची आणि आत्म्याची लक्षणे सगळी सारखीच आहेत. मग जीव आत्म्याहून वेगळा कसा? की आत्मा म्हणजेच जीव?(तसे असेल तर पुन्हा तोच प्रश्न)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 11/16/2011 - 14:40

In reply to प्या रे १. थोडंसं पटतय. by रविंद्र गायकवाड

Permalink

कॄपया उदाहरण वाचा. आत्मा

कॄपया उदाहरण वाचा. आत्मा एकटाच असतो. अ‍ॅक्च्युअली तोच 'असतो'. बाकी काही नसतेच. आकाशात एखादा घडा ठेवला तर आकाश तेच पण घड्यातले आकाश वेगळे भासेल. तसे शरीरा शरीरात त्या त्या कमी अधिक प्रमाणात भेद आढळतात. आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश म्हणजे जीव. आत्म्यामध्ये बुद्धीची भेसळ म्हणजे जीव. वासना बुद्धीमध्ये राहून त्यांना ह वे तसे काम करुन घेतात. दारु प्यावी की न प्यावी ह्याचे उत्तर वासनेच्या रेट्यावरुन ठरते. इच्छा बदलली की कर्म बदलते.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Wed, 11/16/2011 - 15:52

In reply to कॄपया उदाहरण वाचा. आत्मा by प्यारे१

Permalink

सुक्ष्मदेहाचे अंतकरण पंचक

सुक्ष्मदेहाचे अंतकरण पंचक म्हणजेच स्फुरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे सुक्ष्म देहाचे भाग झाले. तेही नश्वर. म्हणजे सुक्ष्म देह म्हणजेच जीव (असे तुम्हाला म्हणायचे आहे काय). स्मरण चिंतन तर्क योजन प्रयोजन हे बुद्धीचे कार्य व घटक. तेही देहाबरोबरच नष्ट होतात. म्हणजेच यातले काहीही कॅरी फॉरवर्ड होत नाही. यांचा तर देहाबरोबरच नाश होतो. याची सांगड घालता घालता माझी बुद्धी (म्हणजे देहरुपी संगणकाचा प्रोसेसर हँग होतोय. कुठंतरी काही तरी मिस्-मॅच होतय हे कळतंय पण नक्की काय ते समजत नाहीये.) आत्म्यामध्ये बुद्धीची भेसळ म्हणजे जीव. असे म्हणावे तर बुद्धीचा नाश झाल्यावर(देहाबरोबरच) राहतो तो केवळ आत्माच. आणि तो तर असंग आहे असेही म्हटले आहे. माझ्या वाचनानुसारही जीवालाच मोक्ष हवा असतो. पन जीव म्हणजे नाकी काय? तेच विचारयचा प्रयत्न करतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 11/16/2011 - 16:48

In reply to सुक्ष्मदेहाचे अंतकरण पंचक by रविंद्र गायकवाड

Permalink

माझ्या माहितीनुसार (अनुभव

माझ्या माहितीनुसार (अनुभव नाही अजून म्हणून माहितीनुसार म्हणतोय ;) (असला तरी विस्मृत आहे) सूक्ष्म देह शिल्लक असतो. वासना असतात. त्या सूक्ष्म देहाबरोबर कॅरी फॉरवर्ड होतात. बुद्धीचा नाश होत नाही. अतिशय लहानपणी तल्लख बुद्धी, तीव्र स्मरण शक्ती, संगीत, चित्रकला इ.इ. क्षेत्रातली जाण ह्या सगळ्या पूर्वजन्मीच्या कष्टांचा परिणाम असतो. मुळात मृत्यूनंतर मिळणारा मोक्ष ही संकल्पना समर्थ रामदासांसारख्या संतांना मान्यच नाही. रोकडी प्रचिती (रोखीचा व्यवहार) त्यांना मान्य आहे. मेल्यानंतर मोक्ष मिळेल इ.इ. गोष्टी म्हणजे बरीचशी पुढच्या जन्माची तयारी असते. समर्थ आपल्याला मुद्दाम सांगतात की जे करायचे ते आत्ताच आणि ताबडतोब करुन मोकळं व्हा. उद्याचा (नंतरचा जन्म) भरवसा नाही. (दासबोध पहावा) सुखी, समाधानी जीवन जगत जगत सुखरुप होऊन शांतपणं देह सोडणं हे आणि हेच मुख्य ध्येय असलं पाहिजे. मोक्ष हे बायप्रॉडक्ट आहे. त्यासाठीच संत साहित्याचा अभ्यास, विधीनिषेध पाळणं, सत्याचरण या गोष्टी आवश्यक आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Wed, 11/16/2011 - 17:21

In reply to माझ्या माहितीनुसार (अनुभव by प्यारे१

Permalink

आता पटलं

आता पटलं
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Wed, 11/16/2011 - 13:36

In reply to मोक्ष म्हणजे काय हे समजल्यावर by राघव

Permalink

आत्मा तर कर्म आणि फळ यांपसून

आत्मा तर कर्म आणि फळ यांपसून अलिप्त आहे. मग आत्म्याला कसली आलीये कर्मफ़ळा पसून मुक्तता.???
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Wed, 11/16/2011 - 15:12

In reply to आत्मा तर कर्म आणि फळ यांपसून by रविंद्र गायकवाड

Permalink

माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट

माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा. तरीही नाही समजले तर माझी याबाबतीतली असमर्थता मान्य करत सांगू इच्छितो की याहून वेगळ्या भाषेत मला नाही ब्वॉ सांगता येत. क्षमस्व. राघव
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 11/16/2011 - 13:53

Permalink

मोक्ष वगैरे काहीही भानगड नसते

मोक्ष वगैरे काहीही भानगड नसते हो. तुम्ही प्रश्न विचारला म्हणजे मोक्ष म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहिती आहे का? आपलं शरीर तेवढं खरं. बाकी सगळ्या डोक्यातल्या कल्पना. शरीर मेलं की सगळं संपतंय आपोआप. नका टेन्शन घेऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 11/16/2011 - 14:23

Permalink

ह्म्म्म्म...

काही काही सिध्दयोगी असेही आहेत ज्यांना अस्सल पहिल्या धारेची नवटाक मारली की ताबडतोब मोक्षप्राप्ती होते. अशा अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत. -(सेमी मुमूक्षु) धम्या.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Wed, 11/16/2011 - 14:38

In reply to ह्म्म्म्म... by धमाल मुलगा

Permalink

तसला मोक्ष ठराविक लोकांना

तसला मोक्ष ठराविक लोकांना आम्ही फुकट देतो. फक्त इथपर्यंत येण्याचे कष्ट घ्यावे लागतील.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 11/16/2011 - 15:28

In reply to तसला मोक्ष ठराविक लोकांना by रविंद्र गायकवाड

Permalink

पत्ता?

आम्हा मोक्षप्राप्तीसाठी आसुसलेल्यांना कोणतेही ठिकाण वर्ज नाही. पत्ता कळवलात तर दर्शन आणि दिक्षेचा लाभ घेता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Fri, 11/18/2011 - 10:55

In reply to पत्ता? by धमाल मुलगा

Permalink

मौजे आकुर्डी. गोल्डण जिमच्या

मौजे आकुर्डी. गोल्डण जिमच्या शेजारी येऊन एक कॉल मारा. आम्ही हजर असू. फक्त शुक्र/मंगळ/बुधवारी त्या दिवशी प्रदोष नसावा. नंबरासाठी संदेश पाठवा.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 11/16/2011 - 15:30

In reply to तसला मोक्ष ठराविक लोकांना by रविंद्र गायकवाड

Permalink

कुठपर्यंत यायचं बोला,

कुठपर्यंत यायचं बोला, येण्याचं काय मजेत येउ, परत घरी सोडण्याची व्यवस्था कोण करणार ते सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Fri, 11/18/2011 - 11:00

In reply to कुठपर्यंत यायचं बोला, by ५० फक्त

Permalink

अहो.. मोक्ष मिळाल्यावर परत

अहो.. मोक्ष मिळाल्यावर परत कुठं कशाला जायचंय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Wed, 11/16/2011 - 16:32

Permalink

मायला २० मिनिटं झाली हा धागा

मायला २० मिनिटं झाली हा धागा आणि प्रतिक्रिया वाचतोय.... काहीच डोसक्यात घुसलं नाही. आता अजुन इच्छाशक्ती नाही. मला मोक्ष मिळो हिचं प्रार्थना :D :D
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 11/16/2011 - 21:36

Permalink

मोठाले लेख लिहून जेमतेम पाच

मोठाले लेख लिहून जेमतेम पाच सात प्रतिसाद येतात. चार ओळींच्या भांडवलावर इतके प्रतिसाद हा मोक्षच असू शकतो.;)
  • Log in or register to post comments

Submitted by रविंद्र गायकवाड on Fri, 11/18/2011 - 11:05

In reply to मोठाले लेख लिहून जेमतेम पाच by रेवती

Permalink

भरघोस प्रतिसाद म्हणजे तुमच्या

भरघोस प्रतिसाद म्हणजे तुमच्या मते मोक्ष असेल तर तुम्च्या अर्ध्या शब्दाच्या लेखाला ही आम्ही शेकड्याने प्रतिसाद देऊ. तुम्हाला अपेक्षित मोक्ष अम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. फक्त कळु द्या तुम्ही कुठे धागा काढलाय.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com