कल्याण स्टेशनातून "देवगिरी एक्स्प्रेस" सुटली, आणि आपण निदान एक आठवडा तरी मुंबईच्या मगरमिठीतून सुटलो , या भावनेने " हुश्श " केले......
कामाची आणि बाकीची सगळी " टेन्शन" सोडून फक्त धमाल करायची असं ठरवलंच होतं.
गाडी सकाळी बरोबर ५ ला औरंगाबाद ला पोहोचली
अनपेक्षितपणे वादळी गडगडाटासह "वरुण राजा" स्वागताला आला होता. मराठवाड्याच्या उष्णतेने पोळून निघण्याच्या तयारीने आलेल्या आम्हाला हा सुखद धक्काच होता.
कडाक्याची थंडी पडली होती .. (बहुतेक रात्रभर पाऊस पडलेला असणार.....) आम्ही कुडकुडत बाहेर पडलो.
MTDC बुक केलेलं होतंच, पण त्याआधी नातेवाईकांकडे उतरलो. फक्कड चहा वगेरे झाला , आमचं अजिंठ्याला जायचं planning होतं, मग "मामा" म्हणाले कि आधी लांबची ठिकाण करून या
(आम्हाला "अंबाजोगाई" ला जायचं होतं), आम्हाला काय.. कुठेतरी जायचं तर होतंच .
फ्रेश होऊन ९ ची अहमदपूर ला जाणार "स्पेशल" गाडी पकडली . जादा गाडी असल्याने रिकामीच होती. आरामात बसलो. आमचा अंदाज होतं ३ ४ तासात पोहोचू , तर मास्तरांनी बॉम्ब टाकला ३ वाजतील.
(बापरे ९ ते ३ , सहा तास? ) काय करणार "आलिया भोगासी" (औरंगाबाद-अंबाजोगाई अंतर २५० km आहे).
एकदाचे ३.१५ ला आम्ही पोहोचलो, सकाळ पासून फक्त "पोह्यावर " होतो. पोटात भूकेचा आगडोंब उसळला होता ,गेल्या गेल्या सिताफलांचे ढीग दिसले, मग काय त्याच्यावरच ताव मारला ,
एवढी गोड सीताफळं कधीच खाल्ली नवती....
आम्हाला दुसऱ्यादिवशी सकाळी "अभिषेक" करायचा होता , म्हणून मग आजच्या उरलेल्या वेळात "परळी वैजनाथ" ला जाण्याचं ठरलं. रिक्षाने जाण सर्वात सोप्पं.... पण तिकडचे रस्ते एवढे वाईट होते कि.... बस रे बस... होडीत बसल्यासारखं वाटत होतं. अतिपाव्साने म्हणे रस्ते उखडले गेले होते...
एवढे वाईट रस्ते तर मुंबईत पण बघितले नव्हते. बैलगाडीच्या वेगाने तो रिक्षा चालवत होता, १ तासाच्या अंतराला त्याने २ तास घेतले, पोहोचे पर्यंत अंधार पडलेला होता. पटापट जाऊन दर्शन घेतलं.
सुदैवाने गर्दी अजिबात नव्हती, छान दर्शन झालं. थोडावेळ थांबलो आणि लगेच निघालो
(वैजनाथाच देऊळ)
परत तोच रस्ता .. आता तर भयाण अंधार होता साथीला ..आम्ही सोडलो तर कोणीही चिटपाखरू नव्हतं आजूबाजूला, मधून मधून एखादं वाहन जायचं ... पण मला ती शांतता पण खूप भिडली होती... वेगळंच वाटत होतं.
एकदाचे पोहोचलो कसेतरी.. दिवसभराचे उपाशी. आता तरी काहीतरी खायला मिळेल या आशेवर होतो . भक्त निवासात गेलो तर ९.१५ पासून जेवण मिळेल असे उत्तर आले आणि आता तर फक्त ८ वाजले होते , एवढं वेळ थांबणे कोणाच्यानेच शक्य नव्हते
मग परत बाहेर आलो, हॉटेल नावाचा प्रकार तिथे दिसतंच नव्हता. एक पंचवटी नावाचं हाटेल दिसलं. बरं वाटलं म्हणून गेलो . थाळीची ओर्देर दिली.
पण हाय रे किस्मत ... एवढं बकवास जेवण मी कुठेही बघितलं नव्हतं आणि खाल्लंही(अन्नाला नाव ठेवू नयेत हे मान्य तरी सुद्धा.........) दिलेली रोटी ही घडी केलेल्या "टर्किश टॉवेल" सारखी होती.... भाजण्याची क्रिया केली होती कि नाही देव जाणे.
भाज्यांमध्ये एवढं तेल होतं कि भाजीत तेल घातलंय कि तेलात भाजी,तेच कळत नव्हतं. कसेबसे दोन घास गिळून बाहेर पडलो. तरी आल्यावर झोप कधी लागली ते कळलंच नाही.दुसऱ्या दिवशी आंघोळ वगेरे करून जिच्यासाठी आलोय तिचं दर्शन घेतलं "योगेश्वरी"..................
अतिशय पुरातन पण अतिशय सुंदर असं "हेमाडपंथी शैलीचं मंदिर".
(देवळात फोटो काढायची परवानगी नाही , म्हणून आंतरजालावरून साभार )
देवीची मुद्रा बघून भवताल विसरायला होतं.....
"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बक्ये गौरी , नारायणी नमोस्तुते"
हेच भाव दाटून येतात.बऱ्याच कोकणस्थ ब्राम्हणांची "कुलस्वामिनी " आहे ही. मला तिच्या चरणांशी बसून अभिषेक करण्याचा योग आला. देवीची मूर्ती सुद्धा "करारी", डोळे ऊर्ध्व दिशेकडे रोखलेले .
अभिषेक झाल्यावर नेवेद्य. पण तो १२ वाजता असतो, मग मधल्या वेळात आसपास च्या परिसरात भटकायला निघालो.
पहिलं ठिकाण कवी मुकुंदराजांची समाधी - एका डोंगरातल अतिशय रमणीय ठिकाण , इथे म्हणे मोर दिसतात. आम्हाला पण एक दिसला पण तो खूप लांब होता.समोरची दरी सुद्धा रमणीय दिसत होती.
बाकी पावसाची रिप रिप सुरु असल्याने वातावरण अतिशय "प्रसन्न" झालं होत.
त्यानंतर "योगेश्वरी" देवीचं मूळ मंदिर बघितलं.
तिथून पुढे एक "शिवाचं" प्राचीन देऊळ, इतर भग्नावशेष आणि दासोपंतांची समाधी पाहिली
धर्मशाळा
जागोजागी असे हत्ती दिसत होते..... आता सगळे भग्न झालेत पण .....
त्यातल्या त्यात माझी फोटूग्राफी
हे बघून रत्नाकर मतकरी यांच्या "गहिऱ्या पाण्याची " आठवण झाली
काही भग्नावशेष आणि तुटलेली दीपमाळा
मधेच मेंढ्यांचा कळप दिसला .. मग प्रत्येकाने फोटू काढायची हौस भागवून घेतली.
नुकताच पावसाळा संपलेला असल्याने.... रानफुलांचा जणू उत्सव त्या डोंगरावर फुललेला होता.....
त्यातल्याच काहींना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केलाय.... कॅमेरा अतिशय सामान्य असल्याने विशेष काही टिपू शकलो नाहीये...
निळाई
त्यातच वेगळी "शेड" सुद्धा .. निसर्गाची कमाल आहे
या फुलांपेक्षा लहान फुलं मी आजवर कुठेही पाहिलेली नाहीत........
हे सगळं बघेपर्यंत १२ वाजत आलेले होते, देवीच्या नेवेद्याची वेळ झालेली होती....
परतलो , जेवलो, देवीच दर्शन घेऊन ते रूप डोळ्यात साठवत.......
औरंगाबादेकडे निघालो.......
पुढच्या भागात वेरूळ दर्शन
क्रमश:
प्रतिक्रिया
17 Nov 2010 - 11:44 am | विलासराव
मस्त आहे भाग-१.
17 Nov 2010 - 12:01 pm | प्रीत-मोहर
स्पा मस्त......अंबाजोगाई आमची कुलस्वामिनी आहे......धन्यवाद अस दर्शन घडवल्याबद्दल
17 Nov 2010 - 12:07 pm | गांधीवादी
श्री. स्पा,
राजा जयपाल यांच्या 'चरित्र फलकाचा' फोटो कृपया अजून मोठा करून टाकता आला तर बघा ना, फलक व्यवस्थित वाचता येईल.
बाकी लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.
पुढच्या भागातील वेरूळ दर्शनाच्या प्रतीक्षेत.................
17 Nov 2010 - 12:14 pm | स्पा
17 Nov 2010 - 2:59 pm | गांधीवादी
धन्यवाद.
आता माहितीही मिळाली, छान वाटले.
17 Nov 2010 - 12:16 pm | पैसा
सगळेच फोटो आणि वर्णन सुंदर आलंय. वेरूळला फोटो काढायला परवानगी असली तर तो भाग आणखीच छान येईल, यात शंका नाही!
(बाल की खालः मेंढ्या म्हणून फोटो दिलायस तो शेळ्यांचा आहे.)
17 Nov 2010 - 12:34 pm | सूड
आणखी थोडी बाल की खालः 'हेमाडपंथी शैलीचं मंदिर' असं न म्हण्ता 'हेमाडपंती शैलीचं मंदिर' असं म्हणावं.
17 Nov 2010 - 12:29 pm | सूड
स्पा, वर्णन फारच छान आहे.
17 Nov 2010 - 2:19 pm | चांगभलं
फालतू आणि निरर्थक कौल काढणा बंद केल्याबद्दल आणि असं काहीतरी चान लिखाण सुरु केल्याबद्दल अभिनंदन ......!
17 Nov 2010 - 2:26 pm | स्पा
धन्यवाद.........
:| :-| :stare:
:~ :-~ :puzzled:
17 Nov 2010 - 2:32 pm | मेघवेडा
छान रे स्पावड्या! झकास वर्णन नि फोटूही! पुभाप्र. लौकर लिही.
17 Nov 2010 - 2:43 pm | सुहास..
दमदार सुरुवात !!
17 Nov 2010 - 7:54 pm | प्रभो
मस्त रे....
18 Nov 2010 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
18 Nov 2010 - 10:45 am | निखिल देशपांडे
अरे वा वा वा..
अचानक गावाची सैर घडवून आणलित मालक..
मुकुंदराजाच्या समाधीला जाउन तर मला अनेक वर्ष झालीत. तसे आता अंबाजोगाई/परळीला जाउनही ३-४ वर्ष नक्कीच झालीत.
अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत.
वैजनाथाच्या मंदिर बरेच वेळेस शांत असते. तिथे चांगले शांत दर्शन होउ शकते. या मंदिरात त्या उजवी कडे जाणार्या बाणाच्या आसपासच आमच्या एका पुर्वजाची समाधी आहे. त्यामागची कथा एकदा माहित करुन घ्यायला हवी.
अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या बाहेर कलमी पेढा घेतला की नाही?????
आता पुढे वेरुळ म्हणताय.. लवकर येउद्या वाट पाहतोय...
18 Nov 2010 - 11:00 am | स्पा
अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या बाहेर कलमी पेढा घेतला की नाही?????
होय खूप चव सुंदर होती त्यांची.....
अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत.
पोहे औरंगाबादेतच खाल्ले होते....,बीड ला फक्त चहा प्यायला थांबलो होतो.....
आता पुढे वेरुळ म्हणताय.. लवकर येउद्या वाट पाहतोय...
वेरुळच्या आधी दौलताबाद लिहीन म्हणतो...... :)
18 Nov 2010 - 11:02 am | निखिल देशपांडे
वेरुळच्या आधी दौलताबाद लिहीन म्हणतो......
उत्तम..
लिहाच... आम्ही प्रतिसादातुन भर घालुच
18 Nov 2010 - 12:29 pm | कुक
फार सुन्दर लेख लिहलात तुमच्या प्रवासा बद्द्ल . एवढ लिहता कसे तुम्ही?
प्रवास कसा झाला?
25 Nov 2010 - 2:32 am | इंटरनेटस्नेही
लेख आवडला. :) आपल्या राज्याची 'औरंगाबाद साईड' बघायलाच हवी कधीतरी..
(कोकणी) इंट्या.
20 Mar 2011 - 12:42 pm | किशोरअहिरे
मी मुळ अंबेजोगाईचा आहे.. शिक्षण १२ वी. पर्यंत तिकडेच झाले योगेश्वरी शाळा आणी कॉलेजातुन..
माझ्या वेळेसचे नं१ चे कॉलेज होते.. ई.स. २००१ .. १२ वी ला कॉलेजातुन १८ जण मेरीट ला होतो :)
तेंव्हा अंबाजोगाईला मराठवाड्याचे पुणे म्हणुन ओळखायचे
फोटु टाकल्याबद्दल आभारी ..
सीताफळ / कार (करवंद) आणी रामफळ साठी बीड जिल्हयातील धारुर(माझे जन्मगाव) प्रसिध्द आहे :)
रिक्षाने जाण सर्वात सोप्पं.... पण तिकडचे रस्ते एवढे वाईट होते कि.... बस रे बस... होडीत बसल्यासारखं वाटत होतं. अतिपाव्साने म्हणे रस्ते उखडले गेले होते...
एवढे वाईट रस्ते तर मुंबईत पण बघितले नव्हते. बैलगाडीच्या वेगाने तो रिक्षा चालवत होता, १ तासाच्या अंतराला त्याने २ तास घेतले, >>>>>>>
३ वर्षांपुर्वी रस्ते खुप चांगले होते.. नंतर पावसाने व पी डब्लु डी च्या मेंटेंनन्स विभागाने वाटुळे केले आहे..
आणि हो
अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत.
>> १०१% बरोबर.. तिकडे सर्व एस टी ट्रॅव्हेल्स च्या गाड्या थांबतात म्हणजे थांबतातच .. अहमद्पुर गाडी मस्साजोग लाच थांबते
पुन्हा कधी गेलात तर पोहे आणी स्पे. चहा मिस करु नका :)
असो त्या रस्त्याची पण आता पार वाट लागली आहे.. :(
दोन दोन मुख्यमंत्री येऊन गेले मराठवाड्याचे पण साले स्वता:चेच कल्याण करतात.. :(
एक पंचवटी नावाचं हाटेल दिसलं. बरं वाटलं म्हणून गेलो . थाळीची ओर्देर दिली.
पण हाय रे किस्मत ... एवढं बकवास जेवण मी कुठेही बघितलं नव्हतं आणि खाल्लंही(अन्नाला नाव ठेवू नयेत हे मान्य तरी सुद्धा.........) दिलेली रोटी ही घडी केलेल्या "टर्किश टॉवेल" सारखी होती.... भाजण्याची क्रिया केली होती कि नाही देव जाणे.
>>>>>
ऐकुन वाईट वाटले.. :(
बघायला पाहिजे कोण आहे हा पंचवटी हॉटेल वाला.. :(
बस स्टॅड च्या जवळ चांगले हॉटेल्स आहेत.. तशी देवीच्या मंदीरा पासुन जवळच शिवाजी चौकात पण खुप मस्त हॉटेल्स आहेत..
अगदी अनलिमिटेड आणी हाय क्वालीटी जेवण मिळाले असते.. ते पण पुण्या मुंबई मधे मिळणार नाही असे..
केवळ ४५ रु. अनलिमिटेड थाळी :) आणी तिथली लस्सी पण फेमस आहे
पुन्हा जाणार असाल तर व्य.नी तुन कळवा सर्व माहीती देईल :)
21 Mar 2011 - 11:32 am | पिलीयन रायडर
आमच्या गावाला जाऊन आलात तर...
जेवण वाईट मिळत ह्यात शन्का नाहि... एकदा तिथे माझ्या लहान भावाच्या पानात वेटर नि भाजी वाधलि जि त्याल नको होति...तो लग्गेच ओरडला कि "नकोय मला....." वेटर नि ताबड्तोब तशिच भाजि परत काधुन घेतलि...
मला अजुन्हि सम्जत नाहि कि ते चान्गल होता कि वाइट......