समर्पण..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
2 May 2008 - 11:20 am

प्रिया तुझ्या प्रितीमध्ये हृदय माझे गुंफले,
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...

हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी
मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी
आज तिचे देहभान, सागरातच गुंतले..
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...

चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली
घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली,
त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...

स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला
तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला
मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...

- प्राजु

कलाकविताप्रकटनविचारआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 May 2008 - 11:44 am | विसोबा खेचर

प्रेमकविता छान आहे..

हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी
मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी
आज तिचे देहभान, सागरातच गुंतले..

ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या, सुरेख आहेत...

त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले

क्या बात है...!

रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...

छ्या बुवा! ही ओळ अंमळ छापिल व टिप्पीकल प्रेमकवितेतली वाटली आणि फारशी भावली नाही...

आपला,
(प्रेमळ) तात्या.

इनोबा म्हणे's picture

2 May 2008 - 11:54 am | इनोबा म्हणे

हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी
मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी
आज तिचे देहभान, सागरातच गुंतले..

या ओळी छानच आहेत

चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली
घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली,
त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले

सागराच्या लाटा आणि चंद्राचे हे रुपक आवडले.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

मदनबाण's picture

2 May 2008 - 1:52 pm | मदनबाण

मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी
आज तिचे देहभान, सागरातच गुंतले..
व्वा मस्तच !!!!!

(सागरातील अवखळ लाटांचा प्रेमी)
मदनबाण

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 3:35 pm | धमाल मुलगा

चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली
घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली,
त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...

स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला
तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला
मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...

हे खास आवडले:)

मनोवस्थेचं तरल की कायसं झालं बॉ!

काळा_पहाड's picture

2 May 2008 - 4:09 pm | काळा_पहाड

चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली
घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली,
त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले
ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या. निसर्गाच्या हालचालींचे मोहक वर्णन.

स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला
तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला
मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...
निळ्या ओळी वाचताना लय थोडी बिघडल्याचे जाणवले.
कल्पनेतला अनुभव प्रत्यक्षातल्यापेक्षा अधिक सुंदररीत्या प्रकटला आहे.

शब्दही ओठी थांबला ऍवजी शब्दही ओथंबला कसे वाटेल ?
तुमच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप नव्हे. एक नम्र सुचना.
मिलिंद

मन's picture

2 May 2008 - 4:25 pm | मन

आणखी काय बोलु प्राजु ताइ,
बस तुझ्या ह्या कवितेच्या भाषेतच दोन ओळीत सांगतो काय वाटलं ते.

वाचुन ही कविता, श्वास माझा लांबला
मन बेभान होउनि,दूर देशि परतला!

आख्खी कविताच आवडली. केवळ एक (आवड्लेली)ओळ काढुन दाखवणं अवघड आहे.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे

प्राजु's picture

2 May 2008 - 4:52 pm | प्राजु

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती राजेश's picture

2 May 2008 - 5:26 pm | स्वाती राजेश

छान ओळी आहेत गं.
हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी
मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी
आज तिचे देहभान, सागरातच गुंतले..
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...
व्वा फारच छान!!!!!!

वरदा's picture

2 May 2008 - 10:54 pm | वरदा

हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी
मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी
हे सगळ्यात आवडलं...

ब्रिटिश टिंग्या's picture

3 May 2008 - 1:11 am | ब्रिटिश टिंग्या

आवडली!

चतुरंग's picture

3 May 2008 - 2:00 am | चतुरंग

चतुरंग

तिमा's picture

3 May 2008 - 5:14 pm | तिमा

आपल्याला पिरेम बिरेम काय बी कळत नाय, पन तरी ह्ये कवन वाच्ताना बरं वाटलंय बगा!

ईश्वरी's picture

4 May 2008 - 12:45 am | ईश्वरी

मस्तच जमली आहे कविता.

चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली
घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली,
त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले

ह्या ओळी खूपच सुरेख !!!
-- ईश्वरी