Skip to main content

समर्पण..

समर्पण..

Published on शुक्रवार, 02/05/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रिया तुझ्या प्रितीमध्ये हृदय माझे गुंफले, रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... - प्राजु
लेखनविषय:

याद्या 6112
प्रतिक्रिया 13

प्रेमकविता छान आहे.. हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या, सुरेख आहेत... त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले क्या बात है...! रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... छ्या बुवा! ही ओळ अंमळ छापिल व टिप्पीकल प्रेमकवितेतली वाटली आणि फारशी भावली नाही... आपला, (प्रेमळ) तात्या.

हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. या ओळी छानच आहेत चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले सागराच्या लाटा आणि चंद्राचे हे रुपक आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. व्वा मस्तच !!!!! (सागरातील अवखळ लाटांचा प्रेमी) मदनबाण

चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...
हे खास आवडले:) मनोवस्थेचं तरल की कायसं झालं बॉ!

चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या. निसर्गाच्या हालचालींचे मोहक वर्णन. स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... निळ्या ओळी वाचताना लय थोडी बिघडल्याचे जाणवले. कल्पनेतला अनुभव प्रत्यक्षातल्यापेक्षा अधिक सुंदररीत्या प्रकटला आहे. शब्दही ओठी थांबला ऍवजी शब्दही ओथंबला कसे वाटेल ? तुमच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप नव्हे. एक नम्र सुचना. मिलिंद

आणखी काय बोलु प्राजु ताइ, बस तुझ्या ह्या कवितेच्या भाषेतच दोन ओळीत सांगतो काय वाटलं ते. वाचुन ही कविता, श्वास माझा लांबला मन बेभान होउनि,दूर देशि परतला! आख्खी कविताच आवडली. केवळ एक (आवड्लेली)ओळ काढुन दाखवणं अवघड आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छान ओळी आहेत गं. हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... व्वा फारच छान!!!!!!

हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी हे सगळ्यात आवडलं...

आवडली!

आपल्याला पिरेम बिरेम काय बी कळत नाय, पन तरी ह्ये कवन वाच्ताना बरं वाटलंय बगा!

मस्तच जमली आहे कविता. चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले ह्या ओळी खूपच सुरेख !!! -- ईश्वरी