प्रतिमा सृष्टी

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
29 Apr 2008 - 6:31 am

काल घरी गेलो.
दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही.
काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय?
तर तीही जागची गायब.
काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना.
जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:-
"अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी
जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला)
काय,चाललयं तरी काय ईथे?"

खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.)
मला आठवलं मी ईथे नवीन रहायला आलो होतो. घराला नुसतं एक दार होतं.आत रिकामी जागा होती.त्यालाच घर म्हणायचं.
म्ह्मटलं ठीक आहे.दुसर्‍या दिवशी जाउन घर लावायला घेतले.जाउन नवीन मोठ्ठा आरसा आणला.
दारातुन नेताना,दाराने जरा आवाज् काढला.म्हणलं वा! दाराला हि काच पसंत आहे म्हणायची.
आणि असणारच.किंचित सावळी,पण फ्रेश दिस्णारी,सदा तजेल्दार अस्णारी अशी ती होती.
तिच्यात स्वतःला पाहुन् ते दार चकितच झाले!
आपल्या रुबाबाची,मज्बूतिचि आणि वेगळेपणाची हे सगळे अशि तारीफ का करतात हे त्याला समजले!
दार खुश झाले!आपल्या अस्तित्वाची जाणीव त्याला तिच्यामुळे झाली.
"एरवी इतरांनी आत बाहेर करण्यापुरता आपला काय् तो वापर" असे समजणार्‍या दाराला तिच्यामुळे कळलं
"अरेच्चा! आपण नुसते ह्यांनी हलवल्यावर हलण्यापुरते नाही आहोत!आपणही हलु शकतो,बाहेरुन
धुळ येत असेल तर अडवु शकतो.बाहेरच्या वाइट नजरा रोखुन धरायचे सामर्थ्य ह्या घराचे स्वामि म्हणवितात
त्यांच्यातही नाही,पण आपल्यात आहे!"
दार रोज त्या आरशातील काचेत स्वतःचे रुपडे न्याहळत असे,आपली,आयडेंटिटी पाहुन त्याची छाती गर्वाने तट्ट् फुगुन येइ.

दाराने मग दिन रात वाइट नजरा येताच त्यांना अडवायला सुरुवात केली.
येणारी "सर्व प्रकारची धूळ्" ते दार अडवु लागले.
दाराला स्वतःची जाणीव आणखी द्रुढ् होउ लागली.
दाराचे सगळीकडे नाव झाले.कौतुक झाले.

दाराने तसुभरही त्या काचेला धन्यवाद दिले नाहीत.
आणी वेड्या काचेनेही ते अपेक्षिले नाहीत! ती रोज त्याला त्याच्या रुपाची,अस्तित्वाची जाणीव करुन देउन तृप्त होइ.
वेडी कुठली,तिच्यामुळे त्याला आपले रुप कळाले यात ती खुश होती,तिला तिचे रुप धड कळले नाही तरी!
बस झालं मग,दोघांची एकमेकांवर प्रीत जडली.
आणाभाका झाल्या. जीवाशी जीव जडले.

पण काही दिवसांनी काय झालं,
काच म्हणाली जरा बाजुच्या खोलीत जाउन येते.
चार दिस् र्‍हाउन येते.तेवढे दिवस तु आपला सांभाळ हां राज्जा.

पण दाराच्या कपाळावर पसरल्या आठ्या.डोळे झाले लाल.
"तु जाशील?अन् मग मी काय करु ईथे?कुणाला दाखवु माझा रुबाब?माझा थाट?
ते काही नाही.तु आजन्म माझी आहेस.हितुन तु जाणे मला मंजुर नाही."

"तुझी मंजुरी हवी कशाला?इथे आले ते तुझ्या मंजुरिने नाही. जाइन तीही माझ्या इच्छेने.
मी येताना तुझ्यामाझ्यासाठी एक् मूठ घेउन येइन.ती तुला बसवली ना,म्हणजे तु अजुन देखणा होशील."

"काय,?!मला, ह्या दाराला मूठ लावणार तु? बन्धनात अडकवणार?फारच चेकाळली आहेस्.
लक्शात ठेव, तु असशील काच ,मी पण आहे बलदंड दार."

काच झाली अधीर,बाहेर च्या जगाच्या उत्सुकतेने ती झाली अनावर.
"मी निघतेयं.." येवढच म्हणली आणि ताठ मानेने दाराबाहेर चालु लागली.

दार ही चिडलं,आपला "अधिकार" संपतो आहे दिसताच त्यानं अडवण्याचा प्रयत्न केला.
पण काच तरीही पुढच जाउ लागली.

"ही असली ठिसुळ,माझ्या पुढे जाते काय?" त्याचा पारा आणखीनच चढला.
त्याने जोरदार धडक दिली तिला. खाळ्कन् आवाज झाला.काच तुटली,फुटली,शत् शत् तुकडे होउन पडली.
जखमी स्थितीतही चेहर्‍यावर तिच्या होतं हसु:- "मोड्ले मी,पण वाकले नाही!"

दार आपल्याचं आनंदात मश्गुल होते."कसा शिकवला धडा! अधिकार खतम् तर् वस्तु खतम्.."
पण थोड्या वेळाने राग किंचित् कमी झाला(संपला नाही.)
आणि ह्या विजयी अवस्थेत आपण दिसतो कशे हे पाहण्यासाठी त्याने पाहिले भिंतीवर्.
काच असायची तिथे.

"अरेच्चा! पण ..पण..मी दिसत का नाहिये? हे काय झालयं?"
दाराला प्रश्न पडला आणी फक्त क्षण भरापुर्वि काय अघटीत घडलयं हे त्याला उमगलं.
पण आता त्याला स्वतःला "तो स्वतःच"सापडेना!
त्याची आयडेंटिटीच हरवली.
आयडेंटिटी नाही ,तर सामर्थ्य ही गेले.
त्याला काहीच कळेना. तो ओक्साबोक्षी रडु लागला.फुट्ली काच जोडु लागला.
पण काच आता थोडिच रिकव्हर होणार होती?ती तर गेली निघुन पार...पलीकडे...
त्या तिथल्या उंचावर्च्या हसर्‍या सरोवराच्या नितळ स्वछ पाण्यात हंसाना त्यांचे रुप् दाखवणारी
पाण्याची सप्तरंगी किनार ती बनुन गेली होती.
रडणे थांबले.पण आक्रोश नाही. तो दिङ मूढ होउन बसला. तो कायमचाच!

कथाविचारलेखअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 11:03 am | विसोबा खेचर

ऍबस्ट्रॅक्ट लेखन! पण खूप छान वाटलं...!

तात्या.

धमाल मुलगा's picture

29 Apr 2008 - 11:10 am | धमाल मुलगा

क्या बात है!

ऋषिकेश भाऊ,
मस्त. आवडलं यार.
क्षणभर तुझ्या त्या दाराची काच झाली, आणि माझं दार झालं...मीही त्यात डोकाऊन पाहिलं तर त्यात मला तेच तुझ्या गोष्टीतलं मुजोर दार दिसलं !

:)
छान लिहिलंयस.

चतुरंग's picture

29 Apr 2008 - 11:22 am | चतुरंग

मस्त वाटलं वाचून.
क्षणभर शेकडो काचांमधे डोकावून बघणारं दार डोळ्यांसमोर आलं!:)

चतुरंग

प्राजु's picture

2 May 2008 - 11:52 am | प्राजु

जबरदस्त लेखन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

29 Apr 2008 - 11:34 am | आनंदयात्री

दार आणी काचेचे रुपकं वापरुन मुक्तक छान फुलवलस.
लेखाच्या शेवटी क्षणभर आक्रंदणारे दार अन ठिकर्‍या-ठिकर्‍या झालेली काच नजरेसमोर आली. फार छान लिहिलस.

दार म्हणत असेल ..

आईने के सौ टुकडे
करके हमने देखे है..

प्रमोद देव's picture

29 Apr 2008 - 4:44 pm | प्रमोद देव

ऋसा लेख मस्तच लिहिलेला आहेस.
इतका सुंदर आशयगर्भ लेख उपक्रमाने उडवल्याबद्दल वाईट वाटते.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 5:33 pm | विसोबा खेचर

इतका सुंदर आशयगर्भ लेख उपक्रमाने उडवल्याबद्दल वाईट वाटते.

आयला प्रमोदकाका! कमाल आहे तुमचीपण! आधी च्यामारी तिकडे उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात, तिथे तो लेख उडवल्याबद्दल आता लगेच पुळका येऊन इथे बरे प्रतिसाद द्यायला आलात? जळ्ळं, इथे आम्ही काही मंडळींनी जेव्हा साठेच्या लेखाला प्रतिसाद दिले तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात??

नो डाऊट, साठेचा लेख छानच आहे. तरी तो लेखनप्रकार उपक्रमाला अपेक्षित अशी माहिती आणि विचारांची कुठली देवाणघेवाण करतो ते सांगा बरं! ज्या न्यायाने उपक्रमाने माझा रौशनीचा पहिलाच भाग एका मिनिटात उडवला होता त्याच न्यायाने मला असं वाटतं की उपक्रमाने साठेचा लेखही उडवला असावा! साठेचा लेख सुंदर आणि आशयगर्भ असला तरी तो ललितलेखनात मोडतो आणि उपक्रमावर फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेखन राहू द्यायचे असे त्यांचे घोरण आहे.

असो...

(मराठी आंतजालांवर बारीक नजर ठेऊन असणारा कट्टर मिसळपावकर!) तात्या.

धोंडोपंत's picture

29 Apr 2008 - 6:00 pm | धोंडोपंत

तात्या देवगडकरांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत.

एखाद्या ठिकाणी दिलेला प्रतिसाद, तो लेख उडवला म्हणून मिसळपाववर येऊन तो द्यावा ही गोष्ट स्वागतार्ह नाही. मिसळपाव हे खुले व्यासपीठ आहे आणि त्याला विषयांचे वावडे नाही हे माहित असतांना, त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल.

प्रमोदकाकांपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या असे आम्ही गृहित धरतो.

आपला,
(कट्टरमिसळपावकर) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 6:08 pm | विसोबा खेचर

त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल.

अगदी खरं बोललास रे धोंड्या! च्यामायला, तिकडनं उडवलं म्हणून मग इथे यायचं हा निव्वळ हलकटपणा आहे...

उपक्रम आम्हाला परकं नाही. शशांकने मिपाकरता खूप मदत केली आहे. त्यामुळे प्रमोदकाकांनी तिथे लिहिलं याचं आम्हाला काही वावगं वाटलं नाही, परंतु ते तिथून उडवून लावल्यावर प्रमोदकाकांना आमच्या मिपाची आठवण झाली याचं वाईट वाटतं!

असो, मिपा सर्वच प्रकारच्या मंडळींना घेऊन पुढे जाईल हे निश्चित!

तात्या.

प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे विनम्र आभार मानु इच्छितो.
बाकी एक दुरुस्ती :- "साठ्यांचे कार्टे" हे लयीत म्हणता येणारे नाव घेता यावे म्हणुन मी
"टोपण आड नाव"(मित्राकडुन "उधार")घेतले आहे.
मूळ नावः-ऋषिकेश खोपटिकर.

पण त्यात"कार्ट"मध्ये असलेला जोम,ठसका दिसत नाही,म्हणुन टोपण नावाचा आधार.

बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही.
(मी नवीन असल्याने असेल कदाचित पण काही ठिकाणी संदर्भ लागत नाहियेत.)

प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे.
(उपक्रमावर लेखक नाही तर नाही,पण वाचक म्हणुन रहायला आवडेल.)
(आणि माझ्या अंदाजा नुसार असे लेख "वैचारिक" म्हणुनही चालायला हरकत नसावी.
तरी ह्या अल्प मतीची चु.भु.दे.घे.)

आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी
ऋषिकेश खोपटिकर.
(उपाख्य "साठ्यांचे कार्टे", उपक्रमावरील "(जन सामान्यांचे) मन")

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 6:50 pm | विसोबा खेचर

प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे.

अरे त्यात आभार कसले? मिसळपाव तुझंच आहे. जे मिसळपाववर मनापासून प्रेम करतील, मिसळपाव त्या सगळ्यांचंच आहे..!

आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी

अरे इतके छान, अनवट लेखन इथे प्रसिद्ध केल्याबद्दल उलटपक्षी मिसळपावच तुझं ऋणी आहे..

असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा. अजूनही असं चांगलंचुंगलं लेखन येऊ दे...

तात्या.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 10:58 pm | विसोबा खेचर

बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही.

नाराज नाही होणार तर काय होणार? हा लेख तू मिपावरही लिहिला होतास. परंतु उपक्रमावरचा तुझा लेख उडवला म्हणून त्यांनी मिपावर प्रतिसाद दिला ना? साला आमचं मिपा काय रस्त्यावर पडलं आहे का? मिपाला अशी दुय्यम वागणूक त्यांनी का द्यावी? त्यांनी एकवेळ मिपावर प्रतिसाद दिला नसता तरी चाललं असतं, परंतु उपक्रमावरचा लेख उडाल्यावर त्यांना मिपा आठवलं काय?

आपला,
(संतप्त स्वाभिमानी!) तात्या.

तात्या, धोंडोपंत आणि मंडळी मी हा लेख सर्वप्रथम उपक्रमवर वाचला आणि तिथे माझा प्रतिसाद दिला. एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मला तरी समजत नाही.
परंतु पुढे हे लक्षात आले की हा लेख इथेही आहे आणि दरम्यानच्या काळात तो उपक्रमावरून उडवण्यात आलेला आहे.
म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. त्यात माझे काय चुकले? त्यात मिपाचा अथवा कुणाचा अपमान कसा काय होऊ शकतो?
मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? काय योग्य आणि काय अयोग्य हे अजून तरी मला नीट समजते ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माझ्या सौजन्याचा कृपया गैरफायदा घेऊ नये ही विनंती.

अशा तर्‍हेने मला आगाऊ सल्ला देणार्‍या सर्वांचा मी जाहीर X( निषेध करतो. खरी परिस्थिती जाणून न घेता उगाच एखाद्यावर तोंडसुख घेणे, हा असला प्रकार मला मुळीच आवडलेला नाहीये.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 11:42 pm | विसोबा खेचर

एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे?

मग आता तरी का दिलात?? उपक्रमावरचा लेख उडाला म्हणून??

म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला.

का? आधी उपक्रमावरच प्रतिसाद दिला होतात ना? मग तुमचा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा असं जर तुम्हाला वाटत होतं तर काय उपक्रमावर खरडवहीची, व्य नि ची सोय नाही??

मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय?

हे कुणीच ठरवू शकत नाही हे मान्य, परंतु प्रथम उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात ना? मग तिथून उडवल्यावर मिपावर बरे आलात? जाहीर प्रतिसाद देऊन तुमच्या भावना आधी तुम्ही लेखकापर्यंत उपक्रमावर पोहोचवल्या होतात ना? मग तिथला लेख उडाल्यावर तुमच्या भावना लेखकापर्यंत पोहोचवायला उपक्रमाचाच वापर का नाही केलात?? तिथे खरडवही आणि व्य नि ची सोय आहे की!

असो...

माझ्यापुरता हा विषय संपला आहे...

तात्या.

मनस्वी's picture

29 Apr 2008 - 4:49 pm | मनस्वी

वेगळं काहीतरी वाचायला छान वाटलं.

मन's picture

30 Apr 2008 - 2:13 am | मन

धन्य वाद!
शाबास कि बद्दल आभारी आहे.

स्वाती राजेश's picture

29 Apr 2008 - 4:52 pm | स्वाती राजेश

दोन्ही रूपके छान आहेत.
मस्त लेख.
त्याची आयडेंटिटीच हरवली.
आयडेंटिटी नाही ,तर सामर्थ्य ही गेले.

सही.......

शितल's picture

29 Apr 2008 - 5:35 pm | शितल

तुझे पहिलेच लिखाण एकदम मस्त, दार आणि काच ह्या अ॑गवळणी पडलेल्या पण तु ह्यातुन छान लेख बनवलास. दाराला आणि काचेला बोलत॑ केल॑स.

प्रशांतकवळे's picture

29 Apr 2008 - 6:02 pm | प्रशांतकवळे

दार आणि काचेचे रुपक वापरून सुंदर लिखाण.

प्रशांत.

धनंजय's picture

30 Apr 2008 - 1:18 am | धनंजय

"घराला नुसतं एक दार होतं.आत रिकामी जागा होती.त्यालाच घर म्हणायचं."
ही वाक्ये खास आशयगर्भ वाटली.

पिवळा डांबिस's picture

30 Apr 2008 - 6:50 am | पिवळा डांबिस

साठेसाहेब,
लेख्नन छान उतरलं आहे.
आम्हाला आवडलं!
भविष्यातील लेखनाबद्दल शुभेच्छा!!

विसोबा खेचर's picture

2 May 2008 - 12:23 am | विसोबा खेचर

हजारोंच्या संख्येत सभासद असलेल्या अन्य काही संकेतस्थळांवर इतक्या सुंदर लेखाला अवघे तीनच प्रतिसाद मिळावेत आणि सभासदसंख्या अवघ्या हजाराच्या घरातही गेलेली नसलेल्या मिपा या संकेतस्थळावर वादविवादाचे सोडता चांगले १० ते ११ प्रतिसाद मिळावेत ही गोष्ट मला मिपाच्या जिन्दादिलीची आणि रसिकतेची साक्ष पटवून देते!

एकंदरीत चार प्रतिसादांमधला जळ्ळा एक प्रतिसाद शुद्ध लेखनाची ट्यँव ट्यँव करणारा! त्यात मूळ लेखाबद्दल आवडला, नाही आवडला याबाबत एक अवाक्षरही नाही, ही मला अत्यंत रसिकताहीन गोष्ट वाटते!

असो, लोकांना कुठे लिहावं, कुठे लिहू नये एवढं जरी यातून कळलं तरी मिळवली! बाकी, प्रत्येकजण आपले लेखन कुठे प्रसिद्ध करावयाचे हे ठरवायला समर्थ आहेच! :)

आपला,
(कट्टर मिपाकर) तात्या.

--
तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :)

मन's picture

2 May 2008 - 3:32 am | मन

तात्या,
अगदि मनातलं बोललात.
मला ही गोष्ट जाणवायला थोडासा वेळ लागला.
पण एकुणातच लेख आधी इथेच लिहिला,प्रकाशित केला आणि त्या संकेत स्थळाचं सदस्यत्वही नंतर(अजुन कसे बसे चोवीस तासही होत नाहियेत
तिथल्या सभसदत्वाला)घेतलं ते योग्य वाटतय.(प्रथम पसंती मि. पा लाच)
(तो सुद्धा एका निरोपातील सल्ल्यावरुन. "अधिकधिक लोकांना लेख दाखवायचा असेल तर तिथेही प्रकाशित कर.(कारण
काही जण तिथले सभासद आहेत, पण इथले नाहित्.त्यांना का मिस करायचं.)" असा तो सल्ला होता.
हा सल्ला ऐकुन तिकडे गेलो.काहिंनी त्याची तिथे दखलही घेतली,पण केवळ काहिंनीच.)
मि.पा. तील प्रतिसादातुन हुरुप आला,तेवढ्या प्रमाणात कुठुनही आला नाही.

अवांतर १: -
त्याच निरोपातील आणखी एक सल्ला आहे तो असा:- "लेखन म.टा. च्या तुमचे पान
मधेही टाक्.पण त्या बाबतीत नक्की कळत नाहिये की हे देण तिथे योग्य/प्रासंगिक असेल की नाही ते."

अवांतर २:- सखाराम गट्णे चे लग्नासाठी मुली बघणे चालु आहे,त्यावरील चर्चेतुनही एक नवी छोटिशी गोष्ट सुचली आहे.
फक्त टंकित करायला वेळ लागतो आहे.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

विकास's picture

3 May 2008 - 7:21 am | विकास

आपला ललीतलेख आत्ता वाचला आणि आवडला. नक्कीच वेगळा वाटला. असेच लिहीत रहा. :)

ललीत लिहीता येत नसले तरी वाचायला आवडणारा...

विकास

बाकी हा लेख वाचून आणि नंतर वरील वादविवाद पाहून प्रश्न पडला:

या प्रसंगात (वरील वादविवादाच्या प्रसंगात) दार, खिडकी, काच, आरसा ही कोणकोणत्या पात्रांना नावे देता येतील? :))

मन१'s picture

10 Jan 2017 - 11:09 am | मन१

वेगळ्याच धाटणीचं लिखाण . माझीच एक जुनी कथा आठवली --- http://www.misalpav.com/node/1620