‘स्त्रियांना आता काय हवे?’ या शीर्षकाखाली नीलिमा भावे यांचा लोकसत्तच्या २३ जाने २०१० च्या http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=42176:2... अंकात एक लेख आहे. मला तो आवडला याचे कारण स्त्री-शोषणाचे नेहमीचे रडगाणे न गाता खुले पणाने स्त्रीमुक्तीचा सकारात्मक आढावा या ले़खात आहे.
मला या लेखातील आवडलेली वाक्ये -
- ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ असा सामना आता इतिहासजमा झाला आहे.
- हल्ली त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिगत खर्चासाठी त्यांच्या हातात पैसा असतो
- आजच्या कुटुंबात पती आणि पत्नी हे दोघे मिळून त्यांच्या नात्याचे स्वरूप ठरवतात, त्यांच्या कुटुंबरचनेची व्यवस्था ठरवतात आणि आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतात.
- गेल्या पिढीपर्यंत स्त्रिया व पुरुष यांचे ज्या विषयांवर तीव्र मतभेद होते, त्याबाबतीत आता मोठय़ा प्रमाणावर एकमत होत असलेले दिसते.
- स्त्रिया आज अधिक स्वतंत्र आहेत, अधिक शिकलेल्या आहेत, आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी आहेत, पण एवढे सगळे महत्त्वाचे घटक त्यांच्या बाजूचे असूनही स्त्रियांच्या मानसिक सुखा-समाधानाचे प्रमाण कमी झाले आहे.
- स्त्रियांना सुखी-समाधानी करणे, हे मुळी स्त्रीवादी चळवळीचं उद्दिष्टच नव्हतं.
हे सर्व वाचल्या नंतर स्त्रीमुक्ती चळवळीचे आणि पर्यायाने मुकत स्त्रीचे एक न्यून माझ्या लक्षात आले ते असे की मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही. तीला नव-याचाच वंश वाढवावा लागतो. स्त्री वंश ही कल्पना जेव्हा पुरुष वंशाच्या बरोबरीने अस्तित्वात येईल तेव्हा स्त्री मुक्ती ही कल्पना पूर्णत्व पावेल...
प्रतिक्रिया
19 Feb 2010 - 8:01 pm | विकास
पर्यायाने मुकत स्त्रीचे एक न्यून माझ्या लक्षात आले ते असे की मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही. तीला नव-याचाच वंश वाढवावा लागतो.
आपल्याला या वाक्यातून नक्की काय म्हणायचे आहे?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
22 Feb 2010 - 9:25 am | टारझन
भां## बा### !!!
बराच वेळ गप्प बसलो होतो :) पब्लिक काय आवरंतंच नाय !!
ज्यामारी "स्त्रीयांना आता काय हवे " असल्या वांझोट्या चर्चांवर किबोर्ड खाजवण्यापेक्षा "आपल्या स्त्री ला आता काय हवे आहे?" ह्याचा विचार केला तर वैष्विक शांतता णांदेल =)) अॅटलिस्ट शी डझ्ंड वांट यू टू स्क्रु अप द किबोर्ड ऑन इम्पोटेंट अँड होपलेस टॉपिक्स ऑण अ ब्लॉगसाईट =))
हॅहॅहॅ .. आणि स्त्रीयांनी पण "आपल्या पुरूषाला काय हवे ?" ह्याचा विचार केला तर उरलेले वादही संपुष्टात येतील !
असो .. पण चर्चा उत्तम चालु आहे .. चालू द्या :) भावे बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आणि भावे बाईंचा महान विचार इकडे आणुन ( हे तर शनिवार वाड्यात कात्रजचे पाणी आल्यासारखेच) महान कार्य केल्याबद्दल सप्तपदी फेम युयुत्सु ला ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
(फक्त आपल्याशी संबंधीत स्त्रीला आता काय हवे ह्याचा विचार करणारा) टारझन
22 Feb 2010 - 9:51 am | युयुत्सु
चु चु चु!
याला वांझोटी चर्चा कसे काय म्हणता बुवा? याला 'बुद्धीवादळ' (brainstorming) असे म्हणणे जास्त योग्य होईल. मुक्त स्त्रीला सुखाचा शोध घेण्यास अशी बुद्धीवादळे उपयोगी पडतील अशी मला खात्री आहे...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Feb 2010 - 10:05 am | टारझन
वरिल प्रतिसादात तेच म्हंटलंय .. मुक्त स्त्रीच्या सुखाचा विचार करण्यापेक्षा आपल्या स्त्रीच्या सुखाचा विचार केल्या पाहिजे.. नाही तर ... असो !
23 Feb 2010 - 7:18 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री टारझन यांच्याशी सहमत. श्री युयुत्सु, 'मला काय हवे?' हा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारल्यास 'मदत' असे उत्तर येईल. काळजी घ्या.
25 Feb 2010 - 12:40 pm | वेताळ
स्त्रीयाचा वंशवादाबद्दल इतकी चर्चा चालु आहे त्याबरोबर तृतीयपंथियाचा वंशवाद ह्याबद्दल पण जाणकारानी एकादे बुध्दी वावटळ उठवावे असे वाटते.
वेताळ
25 Feb 2010 - 1:11 pm | युयुत्सु
जीवशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही अंगानी महत्त्वाचा मुद्दा.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
25 Feb 2010 - 1:29 pm | वेताळ
देवाला सोडणार्या किंवा तृथीयपंथात सहभागी होणार्याना समाज व अगदी घरच्यांकडुन खुपच त्रास होतो. त्याना कोणतेच अधिकार दिले जात नाहीत. अगदी मृत्युनंतर देखिल त्याना टाळले जाते. हे कुठे तरी बदलले पाहिजे. निदान त्याना माणुस म्हनुन जगण्याचा हक्क दिला पाहिजे.
वेताळ
25 Feb 2010 - 1:12 pm | युयुत्सु
जीवशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही अंगानी महत्त्वाचा मुद्दा.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
19 Feb 2010 - 8:21 pm | नितिन थत्ते
:& :? >:P :O ~X(
>>मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही
हे मुक्त स्त्रीला न्यून वाटते असे लेखातील कोणत्या भागावरून वाटले बरे?
नितिन थत्ते
19 Feb 2010 - 9:02 pm | युयुत्सु
आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचले नाही. हे मुक्त स्त्रीचं न्यून मला वाटते असे मी म्हटले आहे...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
20 Feb 2010 - 2:16 am | विकास
मुकत स्त्रीचे एक न्यून माझ्या लक्षात आले ते असे की मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही.
जर स्त्री मुक्त नसली तर मात्र (तुमच्याच विधानाप्रमाणे) ती तीचा वंश निर्माण करू शकते (नाहीतर नाही) असे आपल्याला म्हणायचे आहे का?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
20 Feb 2010 - 9:03 am | युयुत्सु
आपले तर्कशास्त्र अजब आहे एवढेच मी म्हणेन...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Feb 2010 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही.
मुक्त स्त्रीने कोणता वंश निर्माण केला पाहिजे असे आपल्याला वाटते ?
-दिलीप बिरुटे
[गोंधळलेला ]
22 Feb 2010 - 8:35 am | युयुत्सु
यात गोंधळण्या सारखे काहीही नाही. मुक्त स्त्रीने स्वतःचा म्हणजेच स्वतःच्या आईचा (किंवा वडिलांचा) वंश चालवावा.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
19 Feb 2010 - 9:16 pm | रेवती
मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही.
मुळात नवरा बायको व त्यांची मुलेबाळे असा परिवार अस्तित्वात येण्यासाठी दोघांचे एकमेकावर अवलंबून असणे योग्य नाही काय?
रेवती
21 Feb 2010 - 4:47 pm | युयुत्सु
हे तुमचे म्हणणे जरी बरोबर असले तरी समाजाच्या आणि कायद्याच्या दृष्टीने त्या कुटुंबाची ओळख नवर्याच्या आडनावावरून ठरते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Feb 2010 - 11:21 pm | रेवती
कायद्याच्या दृष्टीने त्या कुटुंबाची ओळख नवर्याच्या आडनावावरून ठरते.
तो झाला कायदा!
शेवटी कोणता तरी एक निर्णय कायद्याच्या दृष्टीने असायला हवा म्हणून तो आहे. कायदे हे गरजेनुसार बदलतात (उशिरानेच). त्यावेळी जर मातृसत्ताक कायदा असता तर आईचे नाव मुलांनी लावले असते. आक्षेप कुणाचे नाव मुले लावतात याला नसून 'कायदा आहे' असे म्हणत या गोष्टीचा गैरफायदा घेणे या गोष्टीला आहे. अमुक एक कायदा आहे म्हणून जर नवर्याने/बायकोने आरेरावी सुरू केली तर ती चूकच!
रेवती
22 Feb 2010 - 9:39 am | युयुत्सु
असे म्हणून सोडून देता येणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक आयुष्यात कायदा हे अंतिम सत्य आहे असे मी तरी मानतो...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Feb 2010 - 9:46 am | टारझन
आणि हल्ली बोटांचा वापर योग्य ठिकाणी न होता ह्या असल्या चर्चांवरच किबोर्ड बडवायला जास्त होतो त्यामुळेच बर्याच कपल्स ला कोर्टाच्या (पक्षी: कायद्याच्या) पायर्या चढाव्या लागतात , असे आमचा एक वकिल मित्र आम्हाला "वाढणारे घटस्फोट" च्या व्यासंगपुर्ण चर्चेत सांगतो !
बाकी चालू द्या युयुत्सुशेट ! लै भारी विषय घेऊन येता तुम्ही न्हेमी ;)
22 Feb 2010 - 12:53 pm | नीधप
खूप खूप चूक.
नवीन जन्मलेल्या मुलाचे आडनाव बापाचेच असले पाहीजे असं कायदा सांगत नाही.
आईचे आणि बापाचे दोघांचेही केवळ पहिले नाव कायदेशीररित्या लावणारे अनेक जण अस्तित्वात आहेत.
तसेच कुटुंबप्रमुख हा पुरूषच असायला हवा असं नाही.
नवरा बायको दोघांपैकी कोणीही आपले नाव बदलेले नाही. बायकोचे नाव रेशनकार्डावर कुटुंबप्रमुख म्हणून. मुलींच्या नावात पहिलं नाव आईचं नाव व मग आईचं आडनाव. हेही उदाहरण अस्तित्वात आहे. कायदेशीररित्या.
तेव्हा कायदा असं काहीही सांगत नाही.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
22 Feb 2010 - 2:03 pm | युयुत्सु
आपण दिलेली उदाहरणे स्त्री-वंश ही कल्पना वास्तवात येणं शक्य आहे हेच सूचवतात. पण ती तुरळक असल्याने त्यांची 'अपवाद' या सदरात रवानगी होते. स्त्री वंश अस्तित्वात का येऊ शकत नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Feb 2010 - 3:23 pm | नीधप
पण का? पुरूष वंश म्हणजे पितृसत्ताक पद्धती आहे तशी स्त्री वंश म्हणजे मातृसत्ताक पद्धती चालायलाच हवी असं कशासाठी?
कशाला कुणा एकाची सत्ता?
आणि मुक्त स्त्रीला स्वतःचं अश्या पद्धतीचं सत्ताकेंद्र बनवण्याची गरज वाटत नसेल तर?
मुळात पुरूषसत्ताक पद्धती इतकी का रूढ झाली? कुळाचं नाव, बापाचं नाव याला इतकं का महत्व आलं?
कारण सोप्पंय की मातृत्व जसं ढळढळीतपणे सिद्ध करता येतं तसं पितृत्व सिद्ध करणं निसर्गाने शक्य नाही. आता डिएनए चाचण्या उपलब्ध झाल्याने ते शक्य आहे. पण तोवर शक्य नव्हतेच. माता सांगेल तो पिता हेच सत्य होते. त्यातून असुरक्षिततेची भावना वाढीस लागून पितृसत्ताक पद्धती अस्तित्वात आली, रूढ झाली.
बाईला निसर्गाने ही असुरक्षितता दिलेलीच नाही. मग गरज काय मातृसत्ताक पद्धतीची?
आईने पोटात वाढवून, जन्म देऊन, सगळ्या खस्ता खाऊनही मुलगा बापाच्या कुळाचा मानला जात होता.
हल्ली बाप पण बदललेत. त्यांनाही मुलाच्या वाढण्याचं कौतुक असतं. जन्म देण्याच्या क्षणाला बायकोचा हात धरून प्रत्यक्ष शक्य नसलं तरी प्रसूतीच्या वेदना अनुभवण्या/ सहन करण्यापासून मुलाच्या वयात येण्यापर्यंत सगळ्या अवस्था अनुभवण्याची इच्छा असलेले, प्रयत्न करणारे बापही आहेत. मग केवळ मुक्तता आहे म्हणून अश्या बापाला बाजूला करून केवळ आईचंच कूळ चालवायचं पुढे?
ही अशी मालकी हक्काची, अहंची भावना मुक्त स्त्रीला तरी अपेक्षित नाही.
संसार मांडलाच असेल तर कष्टात, दु:खात ती ५०% वाटा उचलेल नी सुखात आणि श्रेयातही ५०% हक्क मागेल.
बर बाई असल्यामुळे संसार न मांडताही मूल जन्माला घालून कुटुंब निर्माण करण्याची क्षमता स्त्रीजवळ आहेच. आणि त्याचा उपयोग मुक्त स्री तिला गरज वाटली तर करेलच/ करतेच. तिथे ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःचा वंश निर्माण करत असेल कदाचित पण प्रत्येक मुक्त स्त्रीने तसं कशाला करायला हवं?
ही मालकीची भावनाच हास्यास्पद आहे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
22 Feb 2010 - 3:53 pm | युयुत्सु
स्त्री-वंश म्हणजे मातृसत्ताक पद्धती हा अर्थ आपण फारच संकुचित घेतला असं वाटत. वंश कल्पनेमधे मालमत्तेचं संक्रमण हे पण अभिप्रेत असते. मी या चर्चा सूत्रात दिलेल्या उदाहरणात हे स्पष्ट झालं असेल असं मला वाटलं होतं.
सत्ता म्हटली की जबाबदारी येते. जबाबदारी आली की मुक्तपणा वर बंधने येतात. ती मुक्त स्त्रीला गैरसोयीची वाटण स्वाभाविक आहे...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Feb 2010 - 9:58 pm | नीधप
सत्ता म्हटली की जबाबदारी येते. जबाबदारी आली की मुक्तपणा वर बंधने येतात. ती मुक्त स्त्रीला गैरसोयीची वाटण स्वाभाविक आहे... <<
आता मूळपदावर आलात.
तुम्हाला कधीही चर्चा करायचीच नव्हती हे सिद्ध झालं. तुमचा मूळ हेतू केवळ आणि केवळ बायका कशा वाईट. मुक्त स्त्री कशी वाईट याची बोंब उठवणे एवढाच आहे.
आणि वरती लिंक दिलेल्या लेखात लेखिकेने खूप स्पष्टपणे लिहिलंय की स्त्रियांना अजून काय हवे हा प्रश्न उपरोधिक अर्थाने विचारलेला नाही. ते वाचायचं राह्यलं वाटतं तुमचं.
असो. तुमचं गुर्हाळ चालू द्या.
23 Feb 2010 - 12:32 pm | युयुत्सु
मिरच्या एवढ्या झोंबतील असं वाटलं नव्हतं...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
23 Feb 2010 - 2:27 pm | नीधप
तुमचा हेतू उघड झाला म्हणून उलटा कांगावा करताय.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
24 Feb 2010 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे
कदाचित हा विषय मुक्तस्त्री मध्यवर्ती धरुन चालला आहे म्हणुन वाक्यात मुक्त स्त्री हा शब्द आपण वापरला असावा अन्यथा हे पुरुषाला ही लागु आहे. त्यामुळे मी येथे व्यक्ती शब्द घालून वाचतो.
आमचे मते स्त्री वा पुरुष हे लिंगवाचक शब्द केवळ वर्गीकरणाच्या सोयी साठी म्हणुन वापरावे लागणे असा समाज ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी या मुक्त स्त्री वा स्त्री मुक्ती असे विषयच गौण असतील
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
24 Feb 2010 - 10:13 am | शैलेन्द्र
"आमचे मते स्त्री वा पुरुष हे लिंगवाचक शब्द केवळ वर्गीकरणाच्या सोयी साठी म्हणुन वापरावे लागणे असा समाज ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी या मुक्त स्त्री वा स्त्री मुक्ती असे विषयच गौण असतील"
मस्त....
22 Feb 2010 - 3:16 pm | सुधीर काळे
इंडोनेशियातील जवळ-जवळ सगळ्याच मुली लग्नानंतर आपले आधीचे नावच चालू ठेवतात! आतापर्यंत एकच अपवाद माझ्या पहाण्यात आला आहे तो म्हणजे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष सुहार्तोंच्या पत्नीला तीन सुहार्तो (Tien Soeharto) म्हणत!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
19 Feb 2010 - 9:50 pm | शुचि
खरं आहे स्त्रियां ना आर्थिक स्वतंन्त्र्य मिळालं आहे पण काही (बर्याच) स्त्रियांनी त्याकरता कुटुंबापासून "दूर रहाणं" पत्करलं आहे. ते नको आहे. मला एवढं नक्की माहीते. आणि याचा मानसीक त्रास होतो हे देखील माहीते.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
20 Feb 2010 - 12:52 am | राजेश घासकडवी
वंश म्हणजे अमुक तमुक हा कोणाचा मुलगा अगर मुलगी म्हणून समाजात ओळखला(ली) जातो (ते) हे आपल्याला म्हणायचं आहे असं वाटलं. आडनाव पुरुषाकडून येतं हे त्याचं दश्य स्वरूप.
मुळात हा अमुकतमुकचा मुलगा हे जुन्या समाजात जास्त उपयुक्त होतं - त्याने तुमचा धंदा, जात, आणि गावात तुम्ही कुठे आहात हे पटकन कळायचं. आता या गोष्टींचं तितकं महत्त्व राहिलेलं नाही. पूर्वी समाजात कुटूंबाचं, वंशाचं प्रतिनिधित्व केवळ पुरुष करायचे. आता तेही राहिलेलं नाही. त्यामुळे हा मुलगा पुरूषाचा, व स्त्री त्याला केवळ जन्म देते, पण तो आपल्या वडलांचा वारसा घेऊन समाजात वावरतो ही संकल्पना ढासळत चाललेली आहे. तेव्हा ती पद्धती पूर्ण स्त्री-पुरुष समानता येईल तेव्हा 'आड' नावापुरतीच राहील व कालांतराने तेही जाईल असं वाटतं.
समानता किंवा तिचा अभाव हे कारण आहे, वंश कल्पनेचं महत्त्व हा परिणाम आहे.
20 Feb 2010 - 7:33 am | भाग्यश्री कुलकर्णी
पटेश.
20 Feb 2010 - 9:35 am | युयुत्सु
वंश या कल्पनेचा आपण संकुचित अर्थ घेतला आहे असे मला वाटते. लग्न झालेल्या स्त्रीच्या संपत्तीच्या वाटणीच्यावेळी (मृत्युपत्र नसेल तर) वारसांचा प्राधान्यक्रम ठरवताना नवर्याचे नातेवाईक विचारात घेतले जातात. माहेरचे नातेवाईक विचारात घेतले जात नाहीत.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
20 Feb 2010 - 9:56 am | राजेश घासकडवी
बरोबर आहे. (तीनदा सांगितल्यावर नक्कीच पटले :-) )
जर आपल्याला कायदेशीर - मालमत्ता वाटणीच्या अधिकारानुसार बोलायचं असेल तर तो अर्थ मी घेतला नव्हता हे नक्की. मला याबाबत अधिक जाणून घ्यायला आवडेल.
समजा स्त्रीचा नवरा मेलेला आहे - १ मूल आहे, १ भाऊ आहे व १ दीर आहे. या परिस्थितीत तिची मालमत्ता तिघांत वाटली जाते का? की दोघांत (मूल व दीर)? की फक्त मुलाचा अधिकार पोचतो? जर तिसरं उत्तर असेल तर, बहुतेक वेळा, याने तिच्या मुक्तपणावर काय फरक पडतो? मी असं गृहित धरतो आहे की सर्वसाधारण आयुर्मर्यादा सुमारे साठ ते पासष्ठ आहे. तोपर्यंत मुलं मोठी झालेली असतात, व त्याआधी सर्वच त्या कुटुंबाचं असतं, म्हणून विचारतोय.
20 Feb 2010 - 10:37 am | युयुत्सु
मूल असेल तर फारसा प्रश्न येत नाही. पण त्यातही एकुलती एक मुलगी असेल तर तीला इस्टेट मिळणार याचे दू:ख बर्याच नातेवाईकांना होते. मुलीला एकुलती एक मुलगी असेल तर बाप मुलीला तिचा योग्य हिस्सा द्यायला नाखुष असतात.
मूल नसेल तर मात्र दीर किंवा त्यांची मुले यांचा मृत स्त्रीच्या मिळकतीवर हक्क निर्माण होतो... म्हणजे यातील विसंगती अशी - मुलीला शिकवून उभे करण्यासाठी आई-वडिल खस्ता खातात आणि ती शिकल्या नंतर जी मिळकत निर्माण करते त्यावर उपरे अधिकार गाजवतात.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
20 Feb 2010 - 10:03 pm | JAGOMOHANPYARE
१. कमावत्या मुलीचा पगार हा एक वादाचा मुद्दा होऊ पहात आहे, यात वादच नाही..
२. समजा, एखाद्या मुलाला आईबापाने चांगले शिकवले, मुलगा खेड्यातून शहरात गेला, त्याने खस्ता खाऊन तिथे घर उभे केले आणि मग तिथे लग्न केल्यावर बायकोला दुसर्याच दिवशी नोकरी मिळून तिला चांगला पगार मिळू लागला.....
आता प्रश्न येतो..... मुलाला आईबापानी शिकवले, आईबाप खेड्यातच राहिले, मुलगा शहरात्/परदेशात गेला..... चांगले /सुखी आयुष्य/ परदेश बघण्याची/तिथे सुखात रहाण्याची संधी कुणाला जास्त मिळते? मुलाच्या आईबापाना की बायकोला??? बायकोलाच ना? मग नवर्याच्या घरात राहून बायकोने मिळवलेल्या पगाराचा प्रत्य्क्ष/अप्रत्यक्ष फायदा घेणे हा नवर्याचा का बरे हक्क नाही? ( अप्रत्यक्ष फायदे: बायको कमावती असेल, तर नवर्याला इन्शुरन्सची चिंता उरत नाही.... होम लोनला , स्वतः नवर्यानेच जरी सगळे हप्ते भरायचे म्हटले तरी त्याला बायकोच्या पगार दाखवून जास्त लोनचा फायदा पदरात पाडता येतो..)
बायको कमावती असेल, तर घरात पैसा जास्त येतो... पण कुठलीच गोष्ट फुकट मिळत नसते...... बायको हाउसवाईफ असताना सांस्कृतिक जपणूक्/परंपरा चांगल्या जोपासू शकते.... कमावत्या बायकोमुळे आपल्या घरात आता ही जपणूक होणार नाही, याचे शल्य नवर्याला नक्कीच असते....
बायकोने जर तिचा संपूर्ण प्गार तिच्या माहेरच्या रिकामटेकड्याना वाटायला सुरुवात केली, तर रिकामटेकड्या नातेवाईकांच्या घरात पुरणपोळ्या, घरचे पापड, घरचे लोणचे, सण समारंभ सगळे हायदे मिळत रहाणार .. वर फुकट पैसेही मिळणार...
आणि नवर्याच्या घरात मात्र ना पैसा ना संस्कृती..... नवर्याने हे दुहेरी नुकसान का करुण ( करुन असेच लिहायचे आहे, टायपो एरर.. पण हा शब्दही चालेल.. :) ) घ्यायचे?
नवर्याचे घर, त्याची सामाजिक्/आर्थिक स्थिती ही त्याच्या गेल्या सर्व पिढ्यांचे फलित असते.... रॉकेलचा स्टोव्ह, भाड्याचे घर, शिक्षणासाठी टीव्ही परवडला नाही.... अशा हजारो घटनांचे फलित म्हणजे नवर्याची आजची स्थिती असते...... हे बायकोला आयतेच मिळणार असते....... मागच्या पिढ्यांच्या स्त्री-पुरुषानी केलेल्या मेहेनतीचा उपभोग मात्र घ्यायचा आणि पगार मात्र सगळा माहेरी द्यायची भाषा करायची, हे कोणत्या नीतीमत्तेत बसते? बायकोने, तिच्या आईअबापाचा संभाळ आनंदाने करावा, पण तिचा एक्सेस मनी हा सासरीच राहिला पाहिजे, माहेरी नाही... निदान काही अंशी तरी हवाच......
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
21 Feb 2010 - 4:13 pm | युयुत्सु
आपण म्हणता तशी वस्तुस्थिती काही प्रमाणात असते हे मान्य आहे. विशेषतः नवर्याच्या जीवावर परदेशी जाउन मजा करणार्या स्त्रीयांच्या बाबतीत जास्त लागू पडते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Feb 2010 - 4:23 pm | प्रकाश घाटपांडे
मी चुकुन माज असे वाचले. मजा करताहेत करु देत माज करु नये अशी अपेक्षा असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
21 Feb 2010 - 6:41 pm | नितिन थत्ते
हा प्रतिसाद वाचून आपण अजून १९७५ मध्येच आहोत असा भास झाला आणि त्या लेखात दिलेल्या सर्वेक्षणावर पाणी पडल्यासारखे वाटले.
पूर्वी बायकांना लिहा वाचायला शिकवू नये कारण नाहीतर त्या आपल्या यारांना (की परपुरुषांना?) प्रेमपत्रे लिहितील असे म्हटले जाई.
त्याचप्रकारे स्त्रिया आपला पगार कसा खर्च करावा हे ठरवण्याचे हक्क/स्वातंत्र्य मागतायत म्हणजे आता त्या आपला सगळा पगार माहेरी नेऊन देणार आहेत असा अर्थ काढणे म्हणजे गंमतच आहे.
>>एखाद्या मुलाला आईबापाने चांगले शिकवले, मुलगा खेड्यातून शहरात गेला, त्याने खस्ता खाऊन तिथे घर उभे केले आणि मग तिथे लग्न केल्यावर बायकोला दुसर्याच दिवशी नोकरी मिळून तिला चांगला पगार मिळू लागला.....
यात बायकोला दुसर्याच दिवशी मिळालेली नोकरी ही आधीच्या आयुष्यात तिला/तिच्या पालकांना काही कष्ट न पडता खस्ता न खाता आपोआप आणि विनासायास मिळाली आणि मुलाने आणि त्याच्या आईवडिलांनी मात्र खस्ता खाल्ल्या. ही पण एक अजूनच गंमत आहे.
>>बायको हाउसवाईफ असताना सांस्कृतिक जपणूक्/परंपरा चांगल्या जोपासू शकते.... कमावत्या बायकोमुळे आपल्या घरात आता ही जपणूक होणार नाही, याचे शल्य नवर्याला नक्कीच असते....
नवर्याला संस्कृतीची जोपासना करण्यापासून (स्वतःच्या जिवावर...बायकोच्या जिवावर नव्हे) कोणी रोखतंय असं वातत नाही.
करावेत त्याने हरताळकेचे उपास, लक्ष्मीव्रत, घटस्थापना, लावावे पिठोरीचे दिवे. कोण थांबवतंत? संस्कृती टिकवायचा ठेका स्त्रियांकडेच कशाला?
प्रतिसादकाला विवाह/संसार या गोष्टींचा अनुभव नसावा असे वाटते.
नितिन थत्ते
21 Feb 2010 - 6:46 pm | JAGOMOHANPYARE
आता त्या आपला सगळा पगार माहेरी नेऊन देणार आहेत असा अर्थ काढणे म्हणजे गंमतच आहे.>>>>>>>>>>>>>>>>>>>
होय.... गंमतच... आणि या गमतीमुळेच पार गंमत झालेला एक संसार मला माहीत आहे.... .... :)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
21 Feb 2010 - 6:53 pm | नितिन थत्ते
एखाद्या घरात तसे (तुम्ही म्हणता तसे- सगळा पगार माहेरी देण्यास सयुक्तिक कारण न्सूनही हट्टाने पगार माहेरी देणे) झाले असेल तर ते वाईट म्हणता येऊ शकेल.
पण त्यावरून स्त्री स्वातंत्र्य या विषयी सरसकट विधान करणे जास्त होतंय असं नाही वाटत?
नितिन थत्ते
22 Feb 2010 - 6:56 pm | JAGOMOHANPYARE
मी कुठं म्हटलं सरसकट स्त्रीयाना झोडपा म्हणून... ! ( असे म्हणायला मी काय तुलसीदासाचा अवतार थोडाच आहे!! ) :) आणि माझे उदाहरण अपवादात्मक असेल, तर ते मांडू नये असे थोडेच आहे!
***************************
ढोल, पशु, गवार, शूद्र , नारी | ये सब ताडन के अधिकारी||
संत तुलसीदास
21 Feb 2010 - 1:25 pm | अन्या दातार
या पाहणीत सगळ्यात जास्त बुचकळ्यात टाकणारी जी गोष्ट पुढे आली, ती जरा वेगळीच आहे. यात असे दिसून आले की, स्त्रिया आज अधिक स्वतंत्र आहेत, अधिक शिकलेल्या आहेत, आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी आहेत, पण एवढे सगळे महत्त्वाचे घटक त्यांच्या बाजूचे असूनही स्त्रियांच्या मानसिक सुखा-समाधानाचे प्रमाण कमी झाले आहे.
पण इतकी वर्षे (स्त्रीमुक्तीच्या कालापूर्वी) हिच गोष्ट पुरुषांच्या बाबतीत होत नसावी का?
21 Feb 2010 - 2:25 pm | अप्पा जोगळेकर
एक विचित्र विसंगती अशी आहे की खेड्यांमधल्या स्त्रियांना अजिबात समानतेची वागणूक मिळत नाही. अन्याय सहन करावा लागतो. Whereas शहरांमधल्या स्त्रिया व मुली शेफारुन गेल्या आहेत.
22 Feb 2010 - 1:36 pm | सुधीर काळे
whereas शहरातल्या स्त्रिया व मुली शेफारून गेल्या आहेत
व्वा, अप्पासाहेब, जय हो!
मी १० वर्षांपूर्वी ज्या इंडोनेशियन कंपनीत काम करीत असे तिथली एक मुलगी गप्पांच्या ओघात आम्हा कांही भारतीय पुरुषांना म्हणाली होती कीं बायकांना जर संतती पुरुषांच्या सक्रीय सहभागाशिवाय झाली असती तर आम्ही मुलींनी पुरुषांकडे पाहिलंही नसतं! मला आधी युयुत्सुसाहेबांच्या "वंश निर्माण करू शकत नाहीं" या विधानाचा असाच अर्थ वाटला होता!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
23 Feb 2010 - 1:21 pm | सुप्रिया
@ अप्पाजोगळेकर,
तुमची प्रतिक्रिया वाचून भलतीच करमणूक झाली.
- (अंमळ शेफारलेली) सुप्रिया.
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
21 Feb 2010 - 10:04 pm | काजुकतली
ह्या लेखावरच्या काही प्रतिक्रिया वाचुन आपण अजुन १९३० मध्येच आहोत असे वाटले.
१९३० चा पुरूष आणि आजचा पुरूष यात एकमेव फरक म्हणजे 'बायकोने नोकरी केलीच पाहिजे' हा आग्रह आजचा पुरूष धरतो, तेव्हाच्या पुरूषाला हा विचार सुचला नव्हता बस्स...
आजच्या शिकलेल्या, आणि केवळ शिक्षणामुळेच विकसीत होणारे स्वतःचे बरेवाईट जे काही विचार आहेत ते असलेल्या स्त्रीयांनी बाहेर जाऊन पैसे कमावुन आणायचे आणि ते घरच्या पुरूषाच्या हाती देऊन मग परत मुकाटपणे मान खाली घालुन 'मेरा पती मेरा देवता है' हे गाणे त्याला जास्त त्रास होणार नाही अशा स्वरात गुणगुणत त्याचे पाय चेपत बसावे हीच पुरूषांची मानसिकता अजुनही आहे असे वरील काही प्रतिसादांतुन दिसते.
नवर्याच्या जीवावर परदेशी जाउन मजा करणार्या स्त्रीयांच्या बाबतीत जास्त लागू पडते.
बाईच्या जीवावर मजा मारणारे पुरूष तुम्हाला अजुन दिसलेतच नाहीत वाटते. तुमच्या घरात काम करणा-या मोलकरणीला विचारा तिचा नवरा काय करतो ते, बारबालांचे खुन पाडणारे बहुतेक जण तिच्या जीवावर जगणारे असतात आणि तिने दुस-या कोणाला जगवायचे ठरवल्यावर तिलाच जगातुन संपवतात, शरिरविक्रय करणा-या स्रियांचे तर विचारायलाच नको, त्यांचे सो कॉल्ड नवरेच पुढे असतात विक्रित मदत करायला........ :(
हे सगळे आपल्याला दिसते म्हणुन, बाकी पांढरपेशा मध्यमवर्गीयांमध्ये कित्येक नवरे वर्षानुवर्षे झटपट यश मिळवुन देणारा 'बिझीनेस' सुचायची वाट पाहात घरात झोपलेत आणि त्यांच्या बायका संसार चालवताहेत आणि वर नव-याच्या घरात बसुन राहायच्या 'गुणावर' पांघरुणही घालताहेत. हे कुठेच छापुन येत नाही किंवा त्याची कोणी वाच्यताही करत नाही.
एक विचित्र विसंगती अशी आहे की खेड्यांमधल्या स्त्रियांना अजिबात समानतेची वागणूक मिळत नाही. अन्याय सहन करावा लागतो. Whereas शहरांमधल्या स्त्रिया व मुली शेफारुन गेल्या आहेत.
म्हणजे नक्की काय? तुमची शेफारल्याची नेमकी व्याख्या काय? की तुम्हालाही पगार थेट तुमच्या हातात येत नाही याचेच दु:ख आहे??
बायकोला आपल्या घरात सगळॅ आयते मिळतेय याचे दु:ख असलेल्या पुरूषांनी सरळ घरजावई होण्याचा पर्याय निवडावा, म्हणजे त्यांना बायकोचे सगळे आयते मिळेल. :). आपल्या समाजात स्त्री लग्न झाल्यावर नव-याच्या घरात जाते, आता तिथे असलेल्या गोष्टी तिने वापरु नयेत काय? आता तुमची बायको तुमच्या सगळ्या गोष्टी उचलुन माहेरी घेऊन जात असेल तर तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे असे फारतर म्हणता येईल. पण म्हणुन सगळ्या बायका असेच करतात हे कशाबरुन????
स्वतःच्या व्यक्तीगत अनुभवांवरुन संपुर्ण गोष्टीबद्दल मत ठरवु नये कधी. तुमच्या नशिबी नासका आंबा आला म्हणजे जगातल्या सगळ्या हापुसच्या झाडांना नासकेच आंबे लागतात असे नाही. माझीही पुरूषांशी वडील, नवरा, भाऊ, दिर, सासरा, काका, मामा अशी विविध नाती आहेत आणि दुर्दैवाने त्यातल्या काही नात्यांचा अनुभव चांगला नाहीय, तरीही मला एकुण पुरूषजमातीबद्दल आदराची भावना आहे, कारण माझे वाईट अनुभव हे त्या त्या पुरुषाचे व्यक्तीगत दुर्गुण होते, सगळेच पुरूष तसे नसतात हे मला माहित आहे.
21 Feb 2010 - 10:13 pm | भाग्यश्री कुलकर्णी
भा .पो.ग :)
22 Feb 2010 - 8:54 am | युयुत्सु
आपण विपर्यास करत आहात असे वाटते. मूळ कारणांचा शोध घेतलात तर अशी विधाने आपल्या कडून होणार नाहीत अशी मला खात्री आहे. शोषण हे स्त्री आणि पुरुष या दोघांचे ही चालते. पुरुषांच्या लैंगिक शोषणातून (म्हणजे उपासमारीतून) वेश्या व्यवसायास उत्तेजन मिळ्ते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Feb 2010 - 2:20 pm | अप्पा जोगळेकर
काजूताई,
तुमची खूपच चिडचिड झालेली दिसते. उगी उगी.
कोणावरही वैयक्तिक टीका करण्यासाठी हे व्यासपीठ योग्य नाही हे नमूद करावेसे वाटते.
बाकी माझ्या वाट्याला नासके आंबे येणार की रसाळ हे प्राक्तन आणि काळच ठरवेल. आम्ही पडलो लहान.
सुधीर साहेबांनी दिलेले उदाहरण समर्पक आहे.
22 Feb 2010 - 2:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
(शेफारलेली, मुक्त, दु:खी, आणि दगड-न-धोंडे) अदिती
22 Feb 2010 - 3:42 pm | सुधीर काळे
अदिती,
मी तुझ्याशी सहमत आहे. खरं तर मूळ लेखापेक्षा प्रतिसादच जास्त मनोरंजक आहेत!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
22 Feb 2010 - 3:26 pm | नीधप
कोणी कसं वागायचं म्हणजे शेफारलेलं नाही हे शिकायला जोगळेकर क्लासेस लावायचे की काय?
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
22 Feb 2010 - 4:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सोड गं! उगाच कशाला गीतापठण करते आहेस? किनार्यावर बस, ये आपण दोघी पाण्यात दगड मारून मज्जा पाहू या!
(शेफारलेली, मुक्त आणि काय-न-काय) अदिती
22 Feb 2010 - 5:21 pm | चतुरंग
स्त्री नसलो म्हणून काय झालं मलाही यावसं वाटतंय दगड मारायला!! ;)
(शेफारलेला)चतुरंग
22 Feb 2010 - 5:37 pm | सुनील
मी केव्हापासून तेच करतोय!! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Feb 2010 - 7:00 pm | बिपिन कार्यकर्ते
माझा पण एक दगड रे पोरांनो...
(मुक्त... आय मीन मोकाट) बिपिन कार्यकर्ते
22 Feb 2010 - 10:17 pm | पक्या
माझाही एक दगड बरं का .
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
23 Feb 2010 - 5:49 am | Nile
मंडळी, इकडं .. वर पहा, अंगास्स! अहो इथ झाडावरुन लै बेस दिसुन राह्यलंय! या वर या! ;)
23 Feb 2010 - 10:49 am | नीधप
खरंय.. गीतापठण सोडले.. आता गंमत बघत बसते.. :)
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
23 Feb 2010 - 12:24 pm | युयुत्सु
मी मात्र १००१ गीता पठणांचा संकल्प सोडावा असं म्हणतो...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Feb 2010 - 5:29 pm | II विकास II
युयुत्सु यांची काही मते पटतात, काही पटत नाहीत.
त्यांना स्त्री म्हणुन हक्क उपटणार्या आणि वरुन स्त्री-पुरुष समानतेचा नारा देणार्या, स्वतःच्या सुखासाठी कौटुंबिक जबाबदारी नाकारणार्या स्त्रीयांविषयी चीड असावी.
असो, एकदा भेटुन चर्चा करायला आवडेल.
22 Feb 2010 - 5:59 pm | युयुत्सु
अवश्य
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Feb 2010 - 6:32 pm | JAGOMOHANPYARE
हे मला एके ठिकाणी मिळाले.... :) .... परधर्मः भयावहः....... ! :)
बायकोला चोप कधी/कसा द्यावा video बघा
१ http://www.youtube.com/watch?v=Wp3Eam5FX58
२ http://www.youtube.com/watch?v=0nUI3TUdFCk
३ http://www.youtube.com/watch?v=iWGA8i6scYY
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
22 Feb 2010 - 10:11 pm | पक्या
व्हिडियो शोधायचे एवढे कष्ट घेतले आहेतच तर नवर्यांना चोप कसा द्यायचा त्याचाही द्याना दुवा. काही नवरे फारच शेफारलेले दिसत आहेत ..त्यासाठी उपयोगी पडेल.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
23 Feb 2010 - 1:12 pm | शाहरुख
व्हिडीओ बघितले..काही बोलायला जागाच ठेवली नाहीय की !!
23 Feb 2010 - 8:59 am | अप्पा जोगळेकर
ढिशक्यँव ढिशक्यँव. सगळेजण दगड मारतायत. म्हटलं आपण थोड्या गोळ्या माराव्यात.
http://thoughtfacet.blogspot.com
23 Feb 2010 - 12:21 pm | ब्रिटिश टिंग्या
सर्वांची काही मते पटतात अन् काही पटत नाहीत!
23 Feb 2010 - 3:24 pm | Nile
टिंग्याचं हे मत पटलं नाही.
23 Feb 2010 - 3:28 pm | वर्षा म्हसकर-नायर
इथे तर बॉस फुल टु धमाल आहे. जाम करमणुक होते आहे. मी पण दगड मारणार पाण्यात.
25 Feb 2010 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-)
या!!! स्वागत आहे!
(शेफारलेली आणि दगड) अदिती
23 Feb 2010 - 4:46 pm | धमाल मुलगा
अवांतरबंदीचं धोरण धोरणीपणाने गुंडाळून ठेवलंय की 'गाढवही गेलं नि ब्रह्मचर्य गेलं' अशी स्थिती आहे?
23 Feb 2010 - 5:38 pm | अवलिया
हा हा हा
असले भलते प्रश्न विचारायचे नसतात ...
सगळं कसं सोई सोईने असते. नाही का ?
--अवलिया
या प्रतिसादात उडवण्यासारखे काही नाही हे नक्की..पण .... असो.
25 Feb 2010 - 11:41 am | काजुकतली
जोगळेकर काका,
मी चिडचिड करतेय असे कशावरुन वाटलेय? चिडचिड कशाला करु हो? इथले मुद्दे काही नविन नाहीयेत चिडचिड करायला... फार जुने आहेत, आणि तुमचे ते बायका शेफारल्याचे वाक्य आहे ना, तेही फार जुने आहे....... दुसरे कोणी आणि त्यात विशेषतः बायका आपल्यापेक्षा जास्त चांगल्या परिस्थितीत आहेत ते पाहिले की पुरूषांना नेमके हेच वाक्य सुचते.