मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

‘स्त्रियांना आता काय हवे?’ - एक बुद्धीवादळ

युयुत्सु · · काथ्याकूट
‘स्त्रियांना आता काय हवे?’ या शीर्षकाखाली नीलिमा भावे यांचा लोकसत्तच्या २३ जाने २०१० च्या http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=42176:2010-01-22-14-53-44&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194 अंकात एक लेख आहे. मला तो आवडला याचे कारण स्त्री-शोषणाचे नेहमीचे रडगाणे न गाता खुले पणाने स्त्रीमुक्तीचा सकारात्मक आढावा या ले़खात आहे. मला या लेखातील आवडलेली वाक्ये - - ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ असा सामना आता इतिहासजमा झाला आहे. - हल्ली त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिगत खर्चासाठी त्यांच्या हातात पैसा असतो - आजच्या कुटुंबात पती आणि पत्नी हे दोघे मिळून त्यांच्या नात्याचे स्वरूप ठरवतात, त्यांच्या कुटुंबरचनेची व्यवस्था ठरवतात आणि आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतात. - गेल्या पिढीपर्यंत स्त्रिया व पुरुष यांचे ज्या विषयांवर तीव्र मतभेद होते, त्याबाबतीत आता मोठय़ा प्रमाणावर एकमत होत असलेले दिसते. - स्त्रिया आज अधिक स्वतंत्र आहेत, अधिक शिकलेल्या आहेत, आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी आहेत, पण एवढे सगळे महत्त्वाचे घटक त्यांच्या बाजूचे असूनही स्त्रियांच्या मानसिक सुखा-समाधानाचे प्रमाण कमी झाले आहे. - स्त्रियांना सुखी-समाधानी करणे, हे मुळी स्त्रीवादी चळवळीचं उद्दिष्टच नव्हतं. हे सर्व वाचल्या नंतर स्त्रीमुक्ती चळवळीचे आणि पर्यायाने मुकत स्त्रीचे एक न्यून माझ्या लक्षात आले ते असे की मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही. तीला नव-याचाच वंश वाढवावा लागतो. स्त्री वंश ही कल्पना जेव्हा पुरुष वंशाच्या बरोबरीने अस्तित्वात येईल तेव्हा स्त्री मुक्ती ही कल्पना पूर्णत्व पावेल...

वाचन 15853 प्रतिक्रिया 0