Skip to main content

‘स्त्रियांना आता काय हवे?’ - एक बुद्धीवादळ

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 19/02/2010 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
‘स्त्रियांना आता काय हवे?’ या शीर्षकाखाली नीलिमा भावे यांचा लोकसत्तच्या २३ जाने २०१० च्या http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=42176:… अंकात एक लेख आहे. मला तो आवडला याचे कारण स्त्री-शोषणाचे नेहमीचे रडगाणे न गाता खुले पणाने स्त्रीमुक्तीचा सकारात्मक आढावा या ले़खात आहे. मला या लेखातील आवडलेली वाक्ये - - ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ असा सामना आता इतिहासजमा झाला आहे. - हल्ली त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिगत खर्चासाठी त्यांच्या हातात पैसा असतो - आजच्या कुटुंबात पती आणि पत्नी हे दोघे मिळून त्यांच्या नात्याचे स्वरूप ठरवतात, त्यांच्या कुटुंबरचनेची व्यवस्था ठरवतात आणि आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतात. - गेल्या पिढीपर्यंत स्त्रिया व पुरुष यांचे ज्या विषयांवर तीव्र मतभेद होते, त्याबाबतीत आता मोठय़ा प्रमाणावर एकमत होत असलेले दिसते. - स्त्रिया आज अधिक स्वतंत्र आहेत, अधिक शिकलेल्या आहेत, आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी आहेत, पण एवढे सगळे महत्त्वाचे घटक त्यांच्या बाजूचे असूनही स्त्रियांच्या मानसिक सुखा-समाधानाचे प्रमाण कमी झाले आहे. - स्त्रियांना सुखी-समाधानी करणे, हे मुळी स्त्रीवादी चळवळीचं उद्दिष्टच नव्हतं. हे सर्व वाचल्या नंतर स्त्रीमुक्ती चळवळीचे आणि पर्यायाने मुकत स्त्रीचे एक न्यून माझ्या लक्षात आले ते असे की मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही. तीला नव-याचाच वंश वाढवावा लागतो. स्त्री वंश ही कल्पना जेव्हा पुरुष वंशाच्या बरोबरीने अस्तित्वात येईल तेव्हा स्त्री मुक्ती ही कल्पना पूर्णत्व पावेल...

वाचने 15892
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

इथे तर बॉस फुल टु धमाल आहे. जाम करमणुक होते आहे. मी पण दगड मारणार पाण्यात.

In reply to by वर्षा म्हसकर-नायर

:-) या!!! स्वागत आहे! (शेफारलेली आणि दगड) अदिती

अवांतरबंदीचं धोरण धोरणीपणाने गुंडाळून ठेवलंय की 'गाढवही गेलं नि ब्रह्मचर्य गेलं' अशी स्थिती आहे?

In reply to by धमाल मुलगा

हा हा हा असले भलते प्रश्न विचारायचे नसतात ... सगळं कसं सोई सोईने असते. नाही का ? --अवलिया या प्रतिसादात उडवण्यासारखे काही नाही हे नक्की..पण .... असो.

जोगळेकर काका, मी चिडचिड करतेय असे कशावरुन वाटलेय? चिडचिड कशाला करु हो? इथले मुद्दे काही नविन नाहीयेत चिडचिड करायला... फार जुने आहेत, आणि तुमचे ते बायका शेफारल्याचे वाक्य आहे ना, तेही फार जुने आहे....... दुसरे कोणी आणि त्यात विशेषतः बायका आपल्यापेक्षा जास्त चांगल्या परिस्थितीत आहेत ते पाहिले की पुरूषांना नेमके हेच वाक्य सुचते.