एअरपोर्ट (फोटोंसह अद्दयावत)

Primary tabs

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
11 Jun 2009 - 9:20 am

शॅरलटच्या विमानतळावरचा स्टॉप-ओव्हर हल्ली त्याला आवडायला लागला होता.

कित्येक वर्षं सॅन फ्रॅन्सिस्को-लॉस एंजेलिस-वॉशिंग्टन डी सी-शिकागो-बॉस्टन अशा बडया शहरांदरम्यान प्रवास करतांना शक्यतो नॉन-स्टॉप फ्लाईट्स मिळवायच्या, आणि अगदीच थांबणं भाग असलं तर गेला बाजार निदान ह्युस्टन, डेन्व्हर, अटलँटा अशा एअरपोर्ट्सवर गेट बदलून देखील तासभर तरी मध्ये वेळ मिळेल, आणि भरपूर व्हरायटी (हो, सगळ्याच 'प्रकार'ची!) पहायला मिळेल अशा तर्‍हेने फिरायचं, असा खाक्याच होऊन गेला होता. तेंव्हा दोनच वर्षांपूर्वीपर्यंत शॅरलटसारख्या तुलनेनं लहान असलेल्या शहरात थांबावं, असा विचारही त्याला पोरकट वाटला असता.

पण ते सारं बदललं एका डी सी च्या मीटींगला जाताना. नवीन आलेल्या ऑफिस असिस्टंटने नॉन-रिफंडेबल तिकिट काढलं ती फ्लाईट कनेक्ट करत होती शॅरलटला, आणि चक्क अडीच तास मध्ये वेळ! खूप चडफडत त्याने प्रवास सुरू केला आणि शॅरलटला उतरला.

हळू हळू विमानतळ पालथा घालता घालता त्याच्या लक्षात आलं, की शॅरलटचा विमानतळ जरी इतर काही विमानतळांच्या तुलनेने विचित्र पद्धतीने पसरलेला असला, तरी त्रासाचा नव्हता. आणि त्याचं मन चक्क जिंकून घेणार्‍या दोन गोष्टी त्याला सापडल्या: एक म्हणजे एकीकडे टर्मिनल ए, बी, सी आणि दुसरीकडे डी व ई यांच्या मधल्या जागेत मोट्ठं फूड कोर्ट होतं ज्याच्या समोर, मूव्हींग वॉक वे ला लागून जवळ जवळ शंभर तरी पांढर्‍या-स्वच्छ रॉकिंग चेअर्स होत्या, आणि दुसरं म्हणजे मधोमध एका ग्रॅंड पियानोसमोर बसून एक स्त्री एका पाठोपाठ वेस्टर्न क्लासिकल रचना, आणि काही उडत्या चालीची इंग्रजी गाणी वाजवीत होती.

इतक्या वर्षांत प्रवास करतांना वेळ मिळेल तेंव्हा 'एअरपोर्टवर माणसं न्याहाळणं' हा त्याचा एक छंदच होऊन गेला होता, त्यामुळे वेस्टर्न क्लासिकल मधलं (आणि खरंच सांगायचं तर अगदी उडत्या चालीच्या इंग्रजी गाण्यांमधलं देखील) ओ का ठो कळत नसलं तरीही, रॉकिंग चेअर मध्ये पुढे-मागे झुलता झुलता, आजूबाजूची जाणारी-येणारी मंडळी कशी रिअ‍ॅक्ट करतात ते पहाणंच त्याला भावलं. दर पाचापैकी एक तरी पुरुष/स्त्री थबकून त्या पियानो वाजवणार्‍या स्त्री कडे टक लावून पहात थांबायची, अशा दर दोन-तीन थबकणार्‍यांपैकी एक तरी, तिचं एक आवर्तन संपलं की टाळ्या वाजवून तिच्या समोरच्या मोठया काचेच्या भांडयात दोन-पाच डॉलर्स टाकून जायची. मग ती स्त्री गोड हसून पुढचं वाजवणं सुरू करता करता आपल्या वादनाच्या सीडीज त्या दात्यांना दिसतील अशा पद्दतीने वर खाली करायची. मग दर दोघा-तिघांपैकी एक तरी जण (बहुतेक वेळा पुरूषच!) 'खरे गुणग्राहक' असल्याच्या आविर्भावात किंवा भीडेखातर, एक सीडी विकत घ्यायचा. पुन्हा तिचं वादन नव्या जोमाने सुरू. तिच्या डोक्यावर बर्‍याच ऊंचीवर टांगलेल्या हेलिकॉप्टरचं म्युरल मग जणू काही त्या वादनाला ठेका देत हेलेकावे खात रहायचं.

याशिवाय थोडं इकडे तिकडे बघताना त्याचं लक्ष वेधून घेतलं ते विमानतळावरच्या एका फोटोग्राफीच्या करामतीने. मूव्हींग वॉक वे च्या बाजू-बाजूने ठराविक अंतराने रचलेल्या चौकोनी काचेच्या खांबांच्या एका बाजूला फोटो होता एका शिडीवर चढणार्‍या कृष्णवर्णीय रुबाबदार पुरुषाचा. जस-जसा पुढचा खांब येई, तस-तसा तो पुरूष त्या शिडीवर वर-वरच्या पायरीवर चढत असे, आणि ७-८ खांबांनंतर तो वरच्या छपरात गायब! आणि उलटीकडून मूव्हींग वॉक वे वर चालत आलं तर तोच माणूस एक-एक पायरी उतरतोय असं वाटायचं, त्याला मोठी गंमत वाटली या साध्याश्या किमयेची. त्या दिवसानंतर, मध्ये थांबणं भागच असेल तर, मिळेल तेंव्हा तो शॅरलटला थांबायचा, आणि प्रवासी बघण्याचा अगदीच कंटाळा आला तर झुलत झुलत, एखादी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीची रहस्यकथा वाचत बसायचा.
*****

आज असाच तो शॅरलटला उतरला होता शिकागोच्या मीटींगनंतर. फरक फक्त इतकाच, की या वेळी तो शॅरलटहून जायचा होता नूअर्कला आणि तिथून मग सरळ मुंबई! चक्क मे मध्ये महिनाभराची सुट्टी काढली होती, आणि आतापासूनच त्याला महिनाभर पुढे गेलेले पत्नी आणि मुलगा, आणि हो, आंबे ही, कल्पनेनेच खुणवायला लागले होते! मध्ये तासभर वेळ काढतांना त्याला आठवली आज पहाटेची लॉस एंजेलिसची धावपळ...आयत्या वेळेस ठरलेल्या आज दुपारी १२ वाजताच्या शिकागोच्या मीटींगमुळे जेमतेम बारा तासांत लॉस एंजेलिस-शिकागोची मीटींग-शॅरलट मार्गे नूअर्क-आणि तिथून मुंबईला प्रस्थान असा द्राविडी प्राणायाम!! लॉस एंजेलिस चं महिनाभर आधी काढलेलं तिकिट रद्द करावं लागलं आणि शिकागोहून मुंबईचं तिकिट मिळालं नाही म्हणून चिडलेल्या त्याला, बॉसने समजूत घालून आधिक खर्चाचं असलं तरीही या सुधारित मार्गाचं वन-वे तिकिट काढुन दिलं होतं, वरती रद्द केलेल्या तिकिटाचेही पैसे दिले, म्हणून तो त्यातल्या त्यात खूष होता. वन-वे अशासाठी की येतांना तो सहकुटुंब यायचा होता ते सिंगापूर एअरलाईन्सने, बायकोला आवडायची ती फ्लाईट, आणि अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याकडे भारताकडून येताना सोयीचीही.

नेहेमीप्रमाणे, अशी वन वे, आयत्या वेळी काढलेली तिकिटं असली म्हणजे व्हायची ती नाटकं आजही झालीच, टी एस ए च्या कर्मचार्‍यांना असे प्रवासी, त्यातही भारतीय वंशाचे, म्हणजे हमखास संशय! मग 'रँडम चेकिंग'च्या नावाखाली नॉन-रँडमली दोनदा, तीनदा त्याला रांगेतून बाहेर काढलं गेलं, कसून बॅगांची तपासणी, कपड्यांची तपासणी, उलटसुलट प्रश्न, आणि मग कुठेच आक्षेपार्ह काही नाही म्हंटल्यावर 'यू हॅव अ नाईस ट्रिप, सर' म्हणून सुटका. निदान शिकागोपासून बॅगा थ्रू चेक इन केल्या मुंबईपर्यंत त्यामुळे हातात फक्त लॅपटॉपची बॅग आणि एक दोनच कपडे, पासपोर्ट वगैरे कागदपत्रं आणि एक पुस्तक एवढ्याच वस्तू असलेली हलकीशी ओव्हरनाईटर बॅग इतकंच. त्याचा केवढा आनंद!

*****

शॅरलटला ई टर्मिनलला उतरून बी टर्मिनलकडे जाताना तासभर वेळ होता म्हणून तो सवयीने पियानोवालीसमोर झुलत्या खुर्चीत बसला. तो बसतोय न बसतो तोच शेजारच्या खुर्चीत बसलेला एक उंच, बिन-मिशीचा पण भरपूर दाढीचा पठाणी मुसलमान असावा असा वाटणारा तरूण ताडकन उठून चालायला लागला, आणि पाच-सहा खुर्च्या लांब जाऊन बसला. "च्यायला! टोचलो काय रे तुला मी पाकड्या?" असं मनातल्या मनात म्हणत आपला कथानायक मागे टेकला आणि मिनिटा-दोन-मिनिटात झुलायला लागला. काही क्षणातच त्याच्या मानेला एअरपोर्टच्या पश्चिमेकडून येणारं ऊन चटकायला लागलं. "अच्छा! म्हणून ते महाशय उठले वाटतं..मैं भी उल्लू हूं यार " असं मनात म्हणत तोही उठला आणि आपल्या कोत्या, विनाकारण दुराभिमानी मनोवृत्तीला दिलदारपणे शिव्या घालून सावलीत जाऊन बसला.

पंधरा एक मिनिटांनंतर, 'आता शिस्तीत वेळेवारी आपल्या गेट पाशी जाऊन बसावं' असा विचार करून स्वारी उठली, आणि खुर्च्यांना वळसा घालून वॉक वे कडे निघाली. तिथे सुरुवातीला पोहोचता पोहोचता थोडंच आधी शेवटच्या दोन खुर्च्यांमधून उठून एक कॉकेशियन सत्तरी-पंचाहत्तरीच्या पुढे मागे असलेले आजी-आजोबाही वॉक वे वर जाण्यासाठी निघाले. आजोबा थोडे पुढे पुढे, आजी बाईंसाठी न थांबता. चपळाईने वॉक वे वर चढले. त्याला येतांना पाहून आजी बाई मात्र थबकल्या. पण जन्मजात भारतीय अदबीने तो पाय रोखून थांबला.. "यू गो अहेड, मॅम! अ‍ॅफ्टर यू" म्हणाला. मंद हसून आ़जीबाईंनी हातातली रोलर डफल बॅग पट्ट्यावर ओढायचा प्रयत्न केला, पण त्या कृश हातांना ते झेपेना. तो पर्यंत आजोबा अर्ध्या वाटेत पोहोचलेले. मागे वळुन, त्रासिकपणे "नाऊ व्हॉट, कमॉन ऑलरेडी!" म्हणाले. त्याला एकदम त्याचे कणखर आणि हेकट आजोबा आणि नाजूक आजी आठवली. चटकन पुढे होत तो म्हणाला "लेट मी गेट दॅट फॉर यू, आय अ‍ॅम ट्रॅव्हलिंग लाईट एनी वे." "यू आर सो काईंड, यंग मॅन, थँक यू!" 'यंग मॅन' म्हंटल्यावर त्यालाही बरंच वाटलं ('चाळीशीत कोण सालं मला यंग म्हणतंय हल्ली')

- क्रमशः
[पुढील भाग]

विरंगुळानाट्यकथाप्रवासदेशांतर

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

11 Jun 2009 - 9:34 am | भाग्यश्री

आहा.. कसली सही सुरवात!
पटपट येऊदेत!

http://www.bhagyashree.co.cc/

Nile's picture

11 Jun 2009 - 10:20 am | Nile

लवकर येउद्या. :)

सहज's picture

11 Jun 2009 - 10:23 am | सहज

एक फोटो टाकायचा की राव, अजुन फील आला असता.

छान आहे. पुढचा भाग लवकर येउ दे.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2009 - 7:13 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्कृष्ट.

पुढचं बोला पटपट.

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

11 Jun 2009 - 7:25 pm | संदीप चित्रे

फोटोसकट विमानतळ यात्रा हवी :)

सायली पानसे's picture

11 Jun 2009 - 2:31 pm | सायली पानसे

लवकर येउदे पुढचा भाग.
उत्सुकता वाढली आहे.

अनिता's picture

11 Jun 2009 - 11:51 am | अनिता

बरयाच आठवणी जागवल्यात या ले़खाने....२-३ वर्शा॑पासुन शॉर्लेट एअरपोर्ट वर कामानिमीत्त असेच २-३ तास था॑बावे लागायचे.. त्या पा॑ढ्रया खुर्चीवरच बसुन पियानो एकत छान वाटायचे..टा॑गलेली विमाने, हेलिकोप्टर इ. बघत मस्त वेळ जायचा..

धन्यवाद.

रेवती's picture

11 Jun 2009 - 4:45 pm | रेवती

पुढे काय?
उत्सुकता लागून राहिली आहे.
रेवती

अनामिक's picture

11 Jun 2009 - 5:08 pm | अनामिक

छान लिहिलं आहे... पुढचा भाग लवकर टाका.

-अनामिक

श्रावण मोडक's picture

11 Jun 2009 - 6:28 pm | श्रावण मोडक

छान. पुढे?

अवलिया's picture

11 Jun 2009 - 7:19 pm | अवलिया

वा! मस्त !!
पुढचा भाग कधी आता?

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

चतुरंग's picture

11 Jun 2009 - 7:28 pm | चतुरंग

प्लॉट चांगला विणताय! तागा पुढे सरकू दे.

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jun 2009 - 7:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकासच... मस्त उभं केलं आहेत चित्रं!

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jun 2009 - 9:15 pm | llपुण्याचे पेशवेll

शॅरलट, शॉर्लेट, शारलेट अशा विविध प्रकारे उच्चारले जाणारे ठिकाण म्हणजे Charlotte(चारलोट्टे), NC हेच आहे का?
अजून या शार्लेटच्या स्पेलिंगचे गूढ मला त्रास देतं. पण ते एयरपोर्ट मला पण आवडले. छान आहे.
बहुगुणी साहेबांचा लेख छानच.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

बहुगुणी's picture

11 Jun 2009 - 10:14 pm | बहुगुणी

हो, हा तोच नॉर्थ कॅरोलायना (की कॅरोलिना?) इथला एअरपोर्ट.
शॉर्लेट, शारलेट अशा दोन्ही प्रकारांनी हे नाव उच्चारलेलं ऐकलंय (इथे किंवा इथे ऐका). मी आपला बर्‍याच एअरलाईन कर्मचार्‍यांच्या तोंडून जो मध्यममार्गी उच्चार ऐकला तो वापरलाय. May not necessarily be correct. By the way, याच नावाचं जर्मन, नॉर्वेजियन, फ्रेंच उच्चारण वेगवेगळं आहे हे नव्यानेच कळलं.

स्वाती दिनेश's picture

12 Jun 2009 - 1:18 pm | स्वाती दिनेश

छान लिहिता आहात, फोटो टाकलेत त्याने अजून रंगत आली आहे. पुढचं लवकर लिहा..
स्वाती

मदनबाण's picture

12 Jun 2009 - 3:13 pm | मदनबाण

मस्त लिहलं आहेत !!! :)
खुर्चीचा सामाना सकट घेतलेला फोटु ब्येस्ट हाय.

(कथा वाचक) ;)
मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

बहुगुणी's picture

12 Jun 2009 - 6:00 pm | बहुगुणी

येतोय पुढचा भाग लवकरच, सलग तासभर वेळ मिळाला तर याच शनिवार-रविवारी टाकेन, पण प्रवासात आहे (हो, ५ एअरपोर्ट ४ दिवसातः-)!) त्यामुळे थोडा उशीर लागू शकेल, क्षमस्व!

उपास's picture

12 Jun 2009 - 7:21 pm | उपास

केवळ लिहीलयस अगदी.. मी ही पहिल्यांदा पाहाताक्षणीच प्रेमात पडलो ह्या विमानतळाच्या.. आणि आता जवळच असल्याने तशीही गाठ भेट होते अधून मधून.. तासाभरावरच्या कोलंबियाच्या अगदी छोटेखानी विमानतळावर सुद्धा अशाच खुर्चा टाकून निवांत सोय आहे.. सविस्तर लिहीलस ते आवडलं, पुढच्या भागाची वाट बघतोय :)

प्रमोद देव's picture

13 Jun 2009 - 9:16 am | प्रमोद देव

मस्त लिहीलंय. अजूनही वाचायला आवडेल.
( सारखे उजवी-डावीकडे करून वाचताना त्रास होतोय. तेव्हढं पानांची रुंदी मर्यादित ठेवायचे पाहा म्हणजे वाचताना त्रास होणार नाही.
) :)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!