एअरपोर्ट (३)

Primary tabs

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
16 Jun 2009 - 9:29 am

भाग १

भाग २

आतापर्यंतः

यू एस एअरवेजच्या एजंटने आता आपला कॉमलिंक वॉकीटॉकी बाहेर काढला आणि एअरपोर्ट पोलिसांना बोलावलं.
"आय हॅव अ सिच्युएशन हिअर अबाऊट अॅन अन्क्लेम्ड बॅग, नीड समवन टू कम हिअर राईट अवे."

पुढे:

**********

आजीबाई बी टर्मिनलच्या दिशेने चालू लागलेल्या पाहून यू एस एअरवेजच्या एजंटने त्यांना थांबवले
"यू नीड टू वेट हिअर, मॅम, अनटिल दिस इज रिझॉल्व्ड. बोथ ऑफ यू मस्ट वेट." आजीबाईंनी फ्लाईट चुकेल
म्हणून कुरकुर सुरू केली तेंव्हा त्यांचा बोर्डींग पास पाहून अजून पुरेसा वेळ शिल्लक आहे हे तिने ठामपणे सांगितले,
"अँड इव्हन इफ यू वेअर टू मिस दिस फ्लाईट, वी हॅव अ नेक्स्ट वन इन थर्टी मिनिट्स टू डीसी, सो रिलॅक्स!"

एव्हाना दोन एअरपोर्ट पोलिस ऑफिसर तिथे येऊन पोहोचले होते. "लेट मी सी युअर बोर्डिंग पॅसेस प्लीज"
त्यातला एक जण दोघांना उद्धेशून म्हणाला, "अॅंड युअर आय डीज टू." दोघांनी आपापले बोर्डिंग पासेस आणि ड्रायव्हिंग
लायसन्सेस त्या ऑफिसरला दाखवले. "युअर होम अॅड्रेस इज फ्रॉम नॉक्सव्हिल इन टेनेसी, मॅम, सो मे आय अॅस्क
व्हेअर इन वॉशिंग्टन आर यू हेडेड टू?" "गोईंग टू विझिट माय डॉटर इन फेअरफॅक्स फॉर अ वीक." "ओ के, यु वुड हॅव
अ रिटर्न टिकेट देन?" म्हातारीने अविश्वासाने मान हलवत पर्स मध्ये हात घालून एक छापील कागद शोधून काढला
"हिअर, दॅट्स माय आयटिनेररी." पोलिस ऑफिसर ने त्या कागदावरचा कन्फर्मेशन नंबर बघितला, "थॅंक यू." "कॅन आय
गो नाऊ?" म्हातारीने विचारले. ऑफिसरने हाताने तिला थांबायची खूण केली, आणि त्याच्याकडे वळून पहात म्हणाला
"सर, यू आर फ्रॉम लॉस एंजेलिस अँड सीम टू बी ट्रॅव्हलिंग टू नुअर्क, कनेक्टींग समव्हेअर, ऑर इज दॅट युअर फायनल
डेस्टिनेशन?" "नो" आपलं मुंबईचं तिकिट दाखवत तो म्हणाला "आय विल बी फ्लाईंग टू बाँबे टुनाईट, इन फॅक्ट इन
अनदर थ्री अवर्स, सो आय वुड हायली अॅप्रिशिएट इफ आय कॅन गेट ऑन माय वे सून!"

"लेट मी मेक वन थिंग क्लिअर टू यू बोथ," त्या ऑफिसरने दोघांना सांगितले "अनटिल वी फाईंड आउट द ओनर ऑफ दिस
बॅग, नन ऑफ यू इज गोइंग एनिव्हेअर!" त्याने वळून बरोबरच्या सहकार्‍याला काहीतरी सांगितले आणि स्वतः बाजूला जाऊन
खांद्यावरच्या फोनमध्ये बोलायला लागला. दुसर्‍या पोलिस ऑफिसरने त्याला आणि आजीबाईंना बाजूच्या खुर्च्यांवर बसायला
सांगितले. यू एस एअरवेजच्या एजंटच्या मदतीने त्याने बाजूच्या एका खोलीचं "ऑथोराईज्ड पर्सोनेल ओन्ली" असं लिहिलेलं दार
उघडलं, त्यातले एकमेकाला काळ्या इलॅस्टिकच्या पट्ट्यांनी जोडलेले, तिकिटांच्या लाईनमध्ये असतात तसे चार स्टीलचे तीन-एक
फूट उंचीचे खांब काढले आणि त्या वादग्रस्त बॅगच्या भोवती सर्व बाजूंनी चार फूट अंतर ठेवून उभे केले.

एव्हाना ज्यांच्या फ्लाईट्सना वेळ होता असे बरेचसे प्रवासी, कुतुहलाने पण सुरक्षित अंतर राखून पाहत जमा झालेले होते.
त्यांतील एका उत्साही प्रवाशाने त्या बॅगचा फोटो घेण्यासाठी आपला सेल फोन सरसावला, तेंव्हा पहिल्या पोलिस ऑफिसरने
त्याच्या दिशेने हात रोखून त्याला थांबवले "यू स्टॉप राईट देअर, मिस्टर, अँड आय होप यू ऑल अंडरस्टँड द सीरियसनेस
ऑफ दिस. देअर इज अ रिझन व्हाय वी हॅव आयसोलेटेड दॅट बॅग, फॉर युअर ओन सेफ्टी, स्टे अवे!" त्याच्या आवाजातली
जरब ऐकून आता आसपासची मंडळी आणखीन दूर सरकली.

एव्हाना वीस-एक मिनिटं झाली होती. एका एअरपोर्ट इलेक्ट्रिक कार्ट मधून आणखी चार जण त्या ठिकाणी उतरले.
थोड्या वेळापूर्वी खांद्यावरच्या फोन वर बोलणार्‍या ऑफिसर कडे चालत जाऊन त्यांनी हळू आवाजात बोलत परिस्थितीची
माहिती करून घेतली. मग हे दोघे बसलेल्या खुर्च्यांकडे येत त्यांपैकी एक जण दोघांना उद्धेशून म्हणाला,

"हलो देअर! आय अ‍ॅम बिल स्मिथ, एफ बी आय." दोघांचेही चेहेरे चांगलेच चपापले. "आय नीड टू अ‍ॅस्क यू अ फ्यू क्वेस्चन्स,
यू ओके विथ दॅट?" दोघांनी हो-नाही म्हणायची वाट न पहाता त्याने दोघांना सांगितलं की त्याच्या बरोबर आलेले तिघे जण
एक्स्प्लोझिव एक्स्पर्ट्स आहेत आणि ते त्या बॅगेची तपासणी करणार आहेत. त्यांच्यापैकी कुणाची काही हरकत आहे काय?
दोघांनीही नकारार्थी मान हलवली. त्याच्या सहकार्‍यांनी आपापल्या काळ्या ब्रीफकेसेसमधून बरीचशी छोटी-छोटी उपकरणं
काढायला सुरूवात केली. एकीकडे त्या एफ बी आयच्या आधिकार्‍याने त्याला आणि आजीबाईंना प्रश्न विचारायला सुरूवात केली.
'तुमच्या मुलीचा फोन नंबर द्या, मला तुमच्या प्रवासाच्या माहितीची सत्यता पडताळून पहायची आहे' असं त्याने म्हातारीला
सांगितलं. तिने थोड्याश्या नाखुषीनेच त्याला पर्समधून डायरी काढून एक नंबर दिला. त्याने त्या नंबर वर फोन करून, बराच वेळ
कोणी उत्तर देईना तेंव्हा, स्वतःचं नाव आणि फोन नंबर देऊन, मेसेज ठेवला "युअर मदर इज अंडरगोईंग अ‍ॅन इन्व्हेस्टिगेशन अ‍ॅट
शॅरलट एअरपोर्ट, वी नीड टू अर्जंटली व्हेरीफाय हर अकाऊंट ऑफ हर ट्रॅव्हल प्लॅन्स, प्लीज काँटॅक्ट मी इमिजिएटली." त्याने मुलीचा
सेल फोन नंबर विचारून त्याही नंबर वर फोन केला, पुन्हा 'नो रिप्लाय', पुन्हा त्याने मेसेज ठेवला. "ओह, शी मस्ट हॅव बीन ऑन
हर वे टू गेट मी, शी विल कॉल" म्हातारी म्हणाली.

आता एफ बी आयच्या आधिकार्‍याने त्याच्याकडे मोर्चा फिरवला, "हू कॅन आय कॉल टू व्हेरीफाय युअर अकाऊंट ऑफ
युअर ट्रॅव्हल प्लॅन्स, सर?" "यू कॅन कॉल माय सुपरवायजर, हिअर इज हिज नंबर", तो म्हणाला. त्याने सांगितलेल्या
नंबर वर फोन लागला. त्याच्या बॉसने एफ बी आयच्या आधिकार्‍याने थोडक्यात सांगितलेली घटना ऐकून त्याला सांगितलं
की हा माझा विश्वासू सहकारी आहे, त्याची प्रवासाची माहिती खरी आहे. "कॅन यू व्हाऊच फॉर हिज नॉट कॅरिईंग अ
रोलर डफेल?" "वेल, आय नो ही टेन्ड्स टू ट्रॅव्हल लाईट, बट आय कॅनॉट टेल यू व्हॉट ही वॉज कॅरिईंग व्हेन ही लेफ्ट
शिकागो, आय वॉजन्ट देअर. बट नोईंग हिम, आय वूड्न्ट डाऊट हिज स्टोरी."

दोघांकडे बघत एफ बी आय ऑफिसर म्हणाला, "वी आर ऑलमोस्ट बॅक व्हेअर वी वेअर, फोक्स. डझ इदर ऑफ यू वाँट टू
चेंज युअर स्टोरी?" त्याच्या डोळ्यांसमोर त्याची भारतात वाट पहाणारा ९ वर्षांचा मुलगा उभा राहिला, "आय अ‍ॅम टेलिंग यू
द ट्रुथ" तो कळवळून म्हणाला. "डु यू मीन टू से आय अ‍ॅम लाईंग?" म्हातारी त्वेषाने म्हणाली.

दरम्यान २०-३० मिनिटे एफ बी आय च्या आधिकार्‍यांच्या त्या बॅगच्या आसपासची फोटोग्राफी, स्कॅनर्स वगैरे वापरून
तपासणी करण्यात गेली. त्या एफ बी आय च्या आधिकार्‍यांच्या टीम ला आता आणखी काही नवीन चेहेरे येऊन सामील झाले
होते. त्या सर्वांचे आपापसात घाई-घाईने बोलणे सुरू होते. त्याने घड्याळाकडे पाहिलं, 'इथली तर फ्लाईट तर गेल्यातच
जमा आहे, नुअर्क च्या मुंबई फ्लाईटला कसचा वेळेत पोहोचणार आता मी? नसता भोग!' त्याने म्हातारीकडे पाहिलं आणि
त्याला स्वतःचाच संताप आला 'हिच्यात मी माझी आजी पाहिली?'

त्याने बसल्या जागेवरून हताशपणे बी टर्मिनल कडे वळून पाहिलं, आणि त्याला एकदम जाणवलं की टर्मिनलच्या सुरूवातीलाच
बर्‍यापैकी गर्दी जमा झाली होती. आणि त्याचं लक्ष गेलं अनाउन्समेंटकडे "पॅसेंजर्स ट्रॅव्हलिंग ऑन यु एस एअरवेज फ्लाईट्स
लीव्हिंग फ्रॉम टर्मिनल बी आर रिक्वेस्टेड टू नॉट मूव्ह अवे फ्रॉम देअर प्लेस. वी आर मेकिंग एव्हरी एफर्ट टू प्रॉसेस ऑल डिलेड
फ्लाईट्स अ‍ॅज अर्ली अ‍ॅज पॉसिबल. प्लीज स्टे काम, थँक यू!" त्याने एअरपोर्टच्या बाहेर पाहिलं, विमानांची बरीच गर्दी
बी टर्मिनल च्या आजूबाजूला जमा झाली होती.

त्याला वाटलं की तो गोंधळून गेलाय म्हणून त्याला भास होत असेल, पण त्याला अचानक तो तासाभरापूर्वीचा दाढीवाला दिसला.
आता तो एफ बी आय आधिकार्‍यांच्या दिशेने चालत येत होता. 'हा इथे काय करतोय' असा विचार त्याच्या डोक्यात येत असतांनाच
तो आधिकार्‍यांपर्यंत पोहोचला. "ऑफिसर, आय थिंक आय कॅन हेल्प यू.." "सर, स्टे अवे फ्रॉम द एरिया प्लीज! हू वूड यू बी?"
त्याने पाकिट उघडून आपलं बिझिनेस कार्ड काढलं. एफ बी आय आधिकार्‍याने ते पाहिलं, म्हणाला "अँड व्हॉट कॅन यू टेल अस?"
दाढीवाल्याने हळू आवाजात काहीतरी सांगायला सुरूवात केली.

इकडे आपल्या भारतीय प्रवाशाने वळून त्या बॅग कडे पाहिलं. त्याला एक गोष्ट कळेना, संशयास्पद असलेली बॅग इथे बी टर्मिनल
च्या बाहेर आहे, टर्मिनल च्या आतली विमानं सुटायला वेळ का लागावा? 'म्हणजे माझंही विमान गेलेलं नाही तर!'
'आणि म्हातारीचंही नाही आणि तिच्या म्हातार्‍याचंही नाही!!'

आणि एकदम त्याच्या लक्षात आलं की आपण त्या पुढे गेलेल्या म्हातार्‍याविषयी पोलिसांना आणि या एफ बी आय च्या माणसांना
काहीच सांगितलेलं नाही. त्याने एफ बी आय ऑफिसरकडे वळून जवळजवळ ओरडूनच सांगितलं "लिसन, आय नो दिस लेडी
डीनाईज इट, बट आय सॉ अॅन एल्डरली जेंटलमन विथ हर हू वेंट अहेड टू टर्मिनल बी विथ हिज बॅग्ज. व्हाय डोंट यू फाईंड हिम?
ही विल कन्फर्म दिस टू बी हर बॅग."

"देअर ही गोज अगेन!" म्हातारी यू एस एअरवेजच्या एजंटकडे वळून म्हणाली "आय टोल्ड यू आय अॅम ट्रॅव्हलिंग अलोन!!
डिड आय नॉट?"

"येस, यू डिड टेल मी दॅट," यू एस एअरवेजची ती एजंट म्हणाली, "बट लेट मी चेक समथिंग..." ती एफ बी आय ऑफिसरकडे
वळली. "आय अ‍ॅम गोइंग टू कॉल हर फ्लाईट गेट अँड अ‍ॅस्क इफ दे सी एनिवन विथ द सेम लॅस्ट नेम ऑन द लिस्ट..."

हे ऐकून म्हातारी एकदम संतापली आणि म्हणाली "आय डोंट बिलीव्ह दिस, यू थिंक दिस फॉरीनर इज टू बी ट्रस्टेड मोअर!!"
तिचा ओरडाआरडा ऐकून एफ बी आय ऑफिसर तिच्याकडे आला आणि म्हणाला "मॅम, फॉरीनर ऑर नॉट, ही हॅज अ‍ॅन इक्वल
राईट टू बी हर्ड सिंस ही ईज लीगली हिअर. विल यू प्ली़ज कीप क्वाएट?"

"ओह, शुअर, गो अहेड अँड ट्रबल अ‍ॅन एल्डरली पर्सन हू इज सफरींग! आय हॅव शॉर्ट्नेस ऑफ ब्रेथ, अँड यू आर सेटिंग अप
माय अस्थमा..." तिने पर्स उघडून घाईघाईने काहीतरी शोधायला सुरूवात केली. "मॅम, डू यू नीड मेडिकल अ‍ॅसिस्टन्स?"
तोपर्यंत तिने पर्स मधून एक इन्हेलर काढलं आणि नाकासमोर धरून दीर्घ श्वास घेतला. आणि काही सेकंदातच तिचा चेहेरा घामाने
थबथबून गेला. आजुबाजूचे पोलिस आणि इतर लोक तिला हात द्यायला पुढे होताहोताच म्हातारी धाडकन कोसळली.

क्रमशः
[पुढील भाग]

लेखनाट्यकथासमाजदेशांतर

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

16 Jun 2009 - 9:34 am | यशोधरा

अजून क्रमशः आहेच! मस्त लिहित आहात!

सहज's picture

16 Jun 2009 - 9:59 am | सहज

सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडतो आहे असे वर्णन.

पुढचा भाग लवकर येउ दे.

(सध्या मिपावर परा व बहुगुणी दोघांच्याही लेखमाला भलत्याच रोमहर्षक आहेत.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jun 2009 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढे??

Nile's picture

16 Jun 2009 - 11:07 am | Nile

+१.

सायली पानसे's picture

16 Jun 2009 - 10:28 am | सायली पानसे

उत्सुकता एकदम वाढली आहे. मस्त लेखन.

पर्नल नेने मराठे's picture

16 Jun 2009 - 11:55 am | पर्नल नेने मराठे

उत्सुकता एकदम वाढली आहे
चुचु

अवलिया's picture

16 Jun 2009 - 11:08 am | अवलिया

फारच छान!
येवु दे अजुन पुढचा भाग लवकर लवकर !!

अवांतर - संभाषण मराठीतुन दिले असते तर माझ्यासारख्याला अजुन लवकर समजले असते असे वाटते.

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

प्रमोद देव's picture

16 Jun 2009 - 12:00 pm | प्रमोद देव

कथा फारच रंगतदार झालेय.
मराठीतून संवादाबद्दल अवलियांशी सहमत आहे.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मराठी_माणूस's picture

16 Jun 2009 - 11:25 am | मराठी_माणूस

उत्सुकता खुप वाढलि आहे

स्वाती दिनेश's picture

16 Jun 2009 - 11:29 am | स्वाती दिनेश

पुढे काय झाले? उत्सुकता ताणली गेली आहे, लवकर टंका ..
स्वाती

नीधप's picture

16 Jun 2009 - 11:39 am | नीधप

पुढे लवकर लिहा.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मैत्र's picture

16 Jun 2009 - 12:06 pm | मैत्र

एकदम उत्कंठा वाढवत नेली आहे.
क्रमशः चं टायमिंग दर वेळी जबरदस्त आहे. (काल म्हातारीने बॅग नाकारली... आज पडलीच...)
पुढे काय चा ताण मस्त तयार केला आहे... आणि वर्णनातले बारकावे आणि प्रसंग छान मांडले आहेत.
लग्गेच लिहा.

विंजिनेर's picture

16 Jun 2009 - 1:55 pm | विंजिनेर

आयला ब(हु)गु(णी)नाना, क्रमश:चे टाईमिंग जबरा आहे.

विंग्रजीतले संवाद वातावरण अजून खुमासदार बनवित आहेत.

लवकर येऊद्या पुढचा भाग...

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

शार्दुल's picture

16 Jun 2009 - 12:07 pm | शार्दुल

लवकर लिहीरे पुढचा भाग,,,, 8|

नेहा

सुमीत भातखंडे's picture

16 Jun 2009 - 1:19 pm | सुमीत भातखंडे

उत्सुकता वाढत्ये.
लवकर येवुदेत पुढचा भाग.

मदनबाण's picture

16 Jun 2009 - 2:31 pm | मदनबाण

म्हातारी धाडकन कोसळली.

जल्ला ...म्हातारी कोसलली...बापरे !!! लिवा पटकन पुढचा पार्ट.

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

श्रावण मोडक's picture

16 Jun 2009 - 3:28 pm | श्रावण मोडक

डोक्यात घुसतीये कथा.

कस्सला गेम केला राव!!
म्हातारी लयच मुरलेली दिसतीये.
पुढे काय झालं बहुगुणीनाना ????
गोष्ट मस्त चालु आहे.
वाट पाहतोय.

पु.भा.शु.
- ध

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

यन्ना _रास्कला's picture

17 Jun 2009 - 12:41 pm | यन्ना _रास्कला

म्हातारी लयच मुरलेली दिसतीये.

१६ आने खर. हाल्ली कोनाला मदद करायाची पन सोय र्‍हायलेली नाय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!

रेवती's picture

16 Jun 2009 - 6:31 pm | रेवती

मग पुढे?

रेवती

प्राजु's picture

17 Jun 2009 - 12:53 am | प्राजु

सॉल्लिड टर्न!!!
लवकर लवकर लिहा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

17 Jun 2009 - 1:32 am | भाग्यश्री

इंटरेस्टींग !!!

http://www.bhagyashree.co.cc/

.....................................................................................................................................................................
अर्चिस

उपास's picture

17 Jun 2009 - 10:02 pm | उपास

ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझचं खर!

>>"Hope you don't have an immediate connection" आजीबाईंना उद्देशून
तो म्हणाला. त्या उत्तरल्या "No, we are OK for another hour".

आँ! म्हणजे म्हातारीच्या बरोबर अजून कोणीतरी नक्की होत तर.. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jun 2009 - 11:11 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला.. झाला का नसता ताप डोक्याला...
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

छोटा डॉन's picture

18 Jun 2009 - 6:58 am | छोटा डॉन

सुरेख लिहता तुम्ही बहुगुणी साहेब.
येऊद्यात अजुन, पहिल्या भागापासुन वाचतो आहे सर्व ...

पहिला भाग प्रवासवर्णनाचा वाटला, दुसर भाग समाजजिवनाचा वाटला, आता तिसर्‍या भागातल्या ट्विस्टने उत्कंठा ताणाली गेली आहे.
लवकर येऊद्यात चौथा भाग ...

लेखन आवडले, पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत ...

अवांतर :
जाता जाता एक विनंती , जे इंग्रजी संवाद आहेत ते कॄपया इंग्रजीमध्येच लिहावेत, कारण "आय डोन्ट केअर" असे वाचण्यापेक्षा "I don't care" हे केव्हाही सोपे जाते व शिवाय वाचनाचा फ्लो ही कायम रहातो ...
आग्रह नाही पण विनंती आहे ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)