गाभा:
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
प्रतिक्रिया
1 Jan 2026 - 6:29 am | कंजूस
या वर्षी सर्वच जण फार धास्तावलेले असतील असा माझा कयास आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता बऱ्याच जणांना वाकुल्या दाखवीत आहे. मालकाकडे तो गंजलेला जादूचा दिवा आला आहे. तो घासून एक राक्षस (AI कृत्रिम बुद्धिमत्ता) उभा राहतोय तो त्याची बरीच कामे करणार आहे. कार्यालयात कर्मचारी नकोच आहेत.
1 Jan 2026 - 7:24 am | विजुभाऊ
कृबु चे आव्हान तर आहेच पण सर्वात मोठे आव्हान आहे ते युद्धाचे.
वर्षाच्या शेवाच्या आठवड्यात दोन नवीन आघाड्या उघडल्या गेल्या आहेत.
इस्राईल ने सोमालीलँड्ला सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे
सौदी ने यमन वर हल्ला करून तेथी यु ए ई ची काही मालमत्ता/सामान नष्ट केली.
इराण मधे मुल्ला राज्य पद्धतीवरून जेन झी चा उठाव चाललेला आहे.
बांगलादेशातले अराजक दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
पाकिस्तानात मुनीरचा पाया तितका भक्कम राहिलेला नाहिय्ये. दडपशाही केली तर आणि तरच तो टिकू शकेल असे दिसतेय.
नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.
1 Jan 2026 - 10:36 am | रात्रीचे चांदणे
उलट मुनीर चं स्थान अजून भक्कम झालंय. त्याला अत्ता कायाद्याच संरक्षण पण आहे.
झालेली चकमक त्यांनीच जिंकली असा गैर समज पाकिस्तानात आहे. चीन तर आहेच पण अमेरिके बरोबर चे संबंध सुधारले आहेत. बंगलादेशात झालेला सत्ता बदल पण पाकिस्तान साठी अनुकूल आहे.
1 Jan 2026 - 7:59 am | कपिलमुनी
भाजप कार्यकर्त्यांचे पाळणाघरातल्या मावशींसारखे झाले आहे, फक्त ढुंगण धुवायची.. पोर कोणाचे विचारायचं नाही.. हा गेला दुसरा आला..
1 Jan 2026 - 1:35 pm | कंजूस
एक नंबर उदाहरण.
1 Jan 2026 - 4:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ हहपुवा झाली.. =))
-दिलीप बिरुटे
1 Jan 2026 - 4:44 pm | कांदा लिंबू
पाळणाघरातील कमळामावशींचे काम आवडले!
1 Jan 2026 - 11:25 am | युयुत्सु
तिकीट वाटपामधला असंतोष भाजपाच्या ओहोटीचे कारण ठरू शकतो. इ तक्या मोठ्या आगीवर पाणी टाकून विझवणं आता सोपं नाही.
1 Jan 2026 - 3:17 pm | अभ्या..
ओहोटी वगैरे काही नाही इतक्यात.
ही गर्दी जनसेवा इच्छुक लोकांची आहे. त्यांना निवडून यायची शाश्वती, निवडून आल्यानंतर मलई ची खात्री आली खाल्लेले सगळे पचवणारी, पचू देणारी यंत्रणा हवी आहे. प्लस काहीना त्याच्या सगळ्याच नंबर chya धंद्यांना संरक्षण हवे आहे. भाजपा ते देऊ शकते त्यामुळे हे सगळे चालू आहे. भाजपचा किंवा हिंदुत्वाचा विचार वाढलाय, वाढतोय असे वाटत असले तरी कट्टर हिंदुत्ववादी मतदार (जे वाजपेयींना तर कंडम मानतातच पण मोदीही तसे थोडे मवाळ होताहेत असे मानतात) ते आणि सध्या भाजपकडे झुकणारी लाट ह्यातला विरोधाभास जितका मोठा होत जाणार आहे तितकेच भाजपाचे राजकारण अधिकाधिक सर्वांगीण आणि न्यूट्रल होत जाणार आहे. व्यक्ती अथवा विचार अथवा संस्था अशांचे महत्व त्या राजकारणात फक्त दाखवण्यापुरते असणार आहे. निवडून येण्याच्या यूएसपी मध्ये हे तिन्हीही नष्ट होण्यास केव्हाच सुरुवात झाली आहे तेव्हा दात नखे काढलेला सिंह आणि गलितगात्र सिंह हे समान मनोरंजक असतील.
1 Jan 2026 - 5:37 pm | युयुत्सु
अभ्या
तुमचं विश्लेषण मी नाकारत नाही. पण
न मे कर्मफले स्पृहा
कर्मण्येवाधिकारस्ते इ० तत्त्वज्ञाने इथे साफ हरली आहेत.
1 Jan 2026 - 6:00 pm | चामुंडराय
खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची अवस्था सध्या अशी आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
1 Jan 2026 - 6:10 pm | युयुत्सु
आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
हा हा हा हा हा
1 Jan 2026 - 7:33 pm | अभ्या..
मिपाचा आद्य ग्राफिक डिझायनर विनायक अनिवसे म्हणजेच इनोबाची ही स्वाक्षरी होती १५ वर्षापूर्वी.
3 Jan 2026 - 8:30 pm | पाषाणभेद
एक नंबर श्लोक
1 Jan 2026 - 10:22 pm | चंद्रसूर्यकुमार
कृत्रिम बुध्दीमत्तेने आधीच मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेतच. ते यापुढील काळात आणखी व्यापक होतील हे वेगळे सांगायला नकोच.
तरीही कृत्रिम बुध्दीमत्तेविषयी एक मुद्दा हल्ली वारंवार मांडला जात आहे. १९९९-२००० मध्ये इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणावर व्हायला लागल्यावर त्यावेळेसही .कॉम कंपन्यांची अशीच क्रेझ आली होती. त्या क्रेझमध्ये नावापुढे .कॉम असेल तर वाटेल तितकी इन्व्हेस्टमेंट सुरवातीच्या काळात त्यात आली होती. आता आपण भारतातही सर्रास सगळ्या गोष्टी इंटरनेटवरून घेतो पण त्यावेळेस अमेरिकेतही ते मार्केत तितके पुढारलेले नव्हते. त्यामुळे त्या कंपन्या तितक्या प्रमाणावर रेव्हेन्यू मिळवू शकल्या नाहीत- अर्थातच गुंतवणुकदारांना तितक्या प्रमाणावर परतावा देऊ शकल्या नाहीत. फेब्रुवारी २००० मध्ये पेट्स.कॉम म्हणून पाळीव प्राण्यांशी संबंधित गोष्टी (खाणे, खेळणी, कपडे वगैरे) ऑनलाईन विकणार्या कंपनीने प्रतिशेअर ११ डॉलरप्रमाणे असेच पैसे गुंतवणुकदारांकडून उभे केले. त्याला युफोरिया असेच म्हणता येईल. अकाऊंटिंगमधील पी/ई रेशो सकट सगळी गुणोत्तरे खिडकीबाहेर टाकली गेली होती. पण कंपनीचे बिझनेस मॉडेल तितका परतावा देऊ शकत नसेल तर मग या कंपनीत अर्थ नाही असे म्हणत गुंतवणुकदारांनी त्या कंपनीचे शेअर विकून दुसरीकडे पैसे गुंतविले. त्या गुंतवणुकदारांना अबक या क्षेत्रातूनच किंवा क्षयज्ञ या कंपनीतूनच परतावा मिळावा असा काही दंडक नसतो. कोणतेही क्षेत्र, कोणतीही कंपनी असेल तरी त्यातून अपेक्षित परतावा मिळायला हवा ही त्यांची अपेक्षा असते. तो मिळाला नाही तर ते तो शेअर विकून पैसे दुसरीकडे टाकतात. तेच पेट्स.कॉम बरोबर झाले. फेब्रुवारी २००० मध्ये आय.पी.ओ नंतर ११ डॉलर प्रतिशेअर लिस्ट झालेल्या या शेअरची किंमत नोव्हेंबर येईपर्यंत १९ सेंट्स प्रतिशेअर झाली होती म्हणजे जवळपास ९८% ने खाली आली. मग त्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. अशा इतर अनेक .कॉम कंपन्यांबाबत झाले.
आता कृत्रिम बुध्दीमत्तेशी संबंधित कंपन्यांच्या बाबतीतही तसेच काही होणार तर नाही ना असे अनेक ठिकाणी म्हटले जात आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेत अशीच प्रचंड गुंतवणुक चालली आहे- पण ते बिझनेस मॉडेल तितका परतावा देऊ शकेल असे आहे का? चॅटजीपीटीची ओपन एआय कंपनी एक ट्रिलिअन डॉलरचा- म्हणजे १ लाख कोटी डॉलरचा आय.पी.ओ काही महिन्यात आणेल असे दिसते. चॅटजीपीटी वापरणार्यांपैकी किती फ्री सब्सक्रायबर्स आहेत आणि किती पैसे भरतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे. असेच रॅन्डम गुगलिंग करून बघितले की चॅटजीपीटीच्या जगभरातील एकूण ८० कोटी ग्राहकांपैकी ३.५ कोटी म्हणजे साडेचार टक्क्यापेक्षा कमी पैसे भरून वापरतात. त्यापैकी १० लाख बिझनेस सबस्क्राईबर्स आहेत- म्हणजे समजा दरमहा २०० डॉलर देणारे. आणि इतर ३.४ कोटी लोक दरमहा २० डॉलर देणारे. म्हणजे चॅटजीपीटी दरमहा १० लाख गुणिले २०० = २० कोटी + ३.४ कोटी गुणिले २० = ८८ कोटी आणि इतर रेव्हेन्यू मिळून समजा वर्षाला १२०० कोटी डॉलर रेव्हेन्यू (हा रेव्हेन्यू आहे- नफा नाही) मिळवत असेल तर त्यासाठी १ लाख कोटींचा आय.पी.ओ येणार असेल तर तो कैच्याकै आकडा झाला. जे चॅटजीपीटी विषयी तीच गोष्ट इतर अनेक ए.आय कंपन्यांविषयी. ते बिझनेस मॉडेल किती प्रमाणावर रेव्हेन्यू मिळवू शकेल (निदान या घडीला) हे बघणे महत्वाचे ठरेल. नाहीतर १९९९-२००० मधील डॉट कॉम क्रॅश तसा २०२६-२७ मध्ये ए.आय क्रॅश होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
1 Jan 2026 - 10:33 pm | अमरेंद्र बाहुबली
वाह! मस्त अभ्यास!
3 Jan 2026 - 5:08 pm | कंजूस
१.विकसित देशांमधील उदाहरणे वेगळी असतात. तिकडे बँकेच्या FD मध्ये मिळणाऱ्या व्याजावर म्हातारे राहू शकतात का?
(भारतात सुरक्षित PPF गुंतवणूक ७%व्याज देते. इतर कंपन्या अधिकच देतात.) अर्थात तिकडचे गुंतवणूकदार शेअर मार्केट कडे वळतात.
२. एआइ कंपन्या चिल्लर सेवा घेणाऱ्यांवर अवलंबून असतील असे वाटते का? ते कोणी ठोक मोठ्या ग्राहकांच्यावर विसंबूनच भविष्य पाहात असणार.
6 Jan 2026 - 8:03 am | गवि
फक्त पेड सबस्क्राईबर्स एवढाच रेव्हेन्यू सोर्स नाही. अगणित कंपन्यांचे असंख्य प्रोग्राम आणि सॉफ्टवेअर्स, मायक्रोसर्व्हिसेस, saas इत्यादि ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या जीपीटी एपीयाय कीज.. प्रत्येक रिक्वेस्ट (हिट) ला मीटर चालू असतो. अशा अब्जावधी रिक्वेस्ट होत असतात. सतत चालूच..
शिवाय भविष्यकालीन भांडवल म्हणजे प्रचंड डेटा जो युजर्सकडून मिळतो..
3 Jan 2026 - 12:09 pm | मदनबाण
Year after bonds scrapped, BJP’s purse grows over 50% to Rs 6,088 crore
देशात कोणताच पक्ष दमडीचा आयकर भरत नाहीत मात्र तुमच्या माझ्या सारख्या केवळ ५-१०% लोकांकडुन तो लुटला जातो.
टॅक्स स्लॅब ही रचना तुम्ही कराच्या बाहेर विचार करु नये म्हणुन केलेली आहे. मोदी जबरदस्त खोटं बोलतात आणि अप्रतिम नौटंकी करतात.ते काला धन आणणार होते त्याचं काय झालं ? स्मार्ट सिटी चे ११ वर्षात काय झाले आणि या योजनेत किती खर्च झाले आणि किती भ्रष्टाचार झाला असे प्रश्न गोदी मिडिया कसा विचारेल?
आपल्या देशात आर्थिक द्रुष्टीनी मध्यम वर्गाचे खच्च्चीकर आयकर मोठ्या प्रमाणात करतो. आयकर हा कर नसुन तुम्ही प्रमाणिकपणे काम करता त्यासाठी यासाठी दिली गेलेली शिक्षा आहे.आनंद रंगनाथन यांनी हल्लीच एका मुलाखतीत सांगितले : गेल्या ११ वर्षातील मोदींच्या इकॉनॉमिक पॉलिसी या कॉम्युनिस्ट पेक्षा बेक्कार आहेत.
मोदीं सारखे ढोंगी आणि नार्सिसिस्ट लोकांना तुमच्याशी काही देणे घेणे नसुन ते मखाणा आणि महागडे मश्रुम खाण्यात मग्न असतात. त्यांनी विवध ठिकाणी प्रवास करुन उद्घाटन करण्यात लोकांकडुन लुटलेल्या आयकराचे कोट्यावधी रुपये फुकुन टाकले आहेत. मणीपूर जळत होते तेव्हा मोदी गळ्यात पदक घालुन घ्यायला परदेशी गेले आणि जितके मी वाचले त्यानुसार ते आजपर्यंत त्या राज्यात तोंड दाखवायला गेलेले नाहीत!
मोदी हिंदुंना विभागण्यात अग्रेसर राहिले ते असे सिद्ध होते :- SCs, STs, OBCs and poor have first right on country's resources: PM Modi
मध्यम वर्ग आणि विशेषतः खुल्या वर्गातील लोकांना मोदींची आणि भाजपाची प्रचंड चीड आलेली आहे. मोदींच्या सबका साथ सबका विकास मध्ये केवळ मुसलमान आणि आरक्षण प्राप्त लोकं येतात हे आता उघड झालेले आहे.
भाजपाची एक्सवर विवध हॅंडल्स आहेत, यातली मुख्य भाजपा मायनॉरिटी मोर्चा, भाजपा शेडुल्ड ट्राइब मोर्चा ,आजपा राष्ट्रीय अनुसुचित जाति मोर्चा व भाजपा ओबीसी मोर्चा अशी आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचे अत्यंत जातियवादी राजकरण करण्यासाठी आपल्या समाजाची कशी उघड विभागणी केली आहे ते दिसुन येते. [ ब्राह्मण मोर्चा का नाही? असे ब्राह्मण बनिया पार्टी किंवा शेठजी-भटजी पार्टी अशी एकेकाळी ओळख असल्या पक्षास कोणी विचारेल का? ]
ना खाउंगा ना खानेदुंगा असे घोषणा करणार्या मोदींनी सर्व पार्टीतील भ्रष्ट लोकांना, अपराधी लोकांना आपल्या पार्टीत घेतले आणि पवित्र करुन घेतले,त्यांनी वॉशिंग मशिन चालू केले आहे असे म्हंटले गेले आणि नंतर तो खरं तर धोबी घाट झाला आहे हे लोकांच्या लक्षात आले.
गेल्या दोन वर्षात बांग्लादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी काय केले ? असा प्रश्न विचारल्यास त्यांनी टनावारी अन्न धान्य त्या देशाला पाठवले इतके मात्र नक्की सांगता येते.
मोदींनी एएनआय ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी गुजारात मध्ये ओबीसी मधील ७० प्रकारच्या मुस्लिम जातीतील लोकांना आरक्षण दिले ही गोष्ट अनेक हिंदूंना माहिती देखील नाही.
जसा गुरु तसा चेला ! देवेंद्र फडणवीसांचे जोरदार भाषण एकदा ऐकाच : Devendra Fadnavis on Muslim Reservation
जाता जाता: तुम्हाला आठवतं का ? फडणवीसांनी टग्या च्या विरुद्ध ७२ हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला म्हणुन अख्या महाराष्ट्रात रान उठवले होते, तोच टग्या त्यांच्या मांडीला मांडी लावून आज सतेत आहे ना? हल्लीच टग्या च्या सुपुत्र्याचे जमीन व्यवहार समोर आले त्याचे काय झाले बरं?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit
3 Jan 2026 - 4:36 pm | अभ्या..
बाणा.......
तेरा तो अर्नब बन गया रे.......
कैसे?????????
3 Jan 2026 - 6:24 pm | रामचंद्र
मुद्दे तर अगदी बिनतोड मांडले आहेत त्यांनी. त्यांच्या मुद्द्यांचा कोणी भाजपसमर्थकही प्रतिवाद करू शकेल असं वाटत नाही.
3 Jan 2026 - 8:07 pm | मदनबाण
अभ्या तू सुद्धा ?
मोदींना पहिली ५ वर्ष तर मी अशीच दिली कारण तितका काळ सत्तेत बराच काळ नसलेल्या पक्षाला जम बसवायला लागतो. मग पुढची ५ वर्ष तथाकथित ५६ इंच छातीचे काय पराक्रम दिसतात ते पाहण्यात गेल्यावर मला समजले की हे आधुनिक काळातील धनानंद झाले आहेत.
कॉग्रेसला माजावर यायला बरीच वर्ष लागली पण भाजपाला माज १० वर्षातच चढला.त्यांचे दर वर्षी जिहाद्याच्या मजारीवर चादर चढवणे, सातत्याने पासमांदा पासमांदा करणे, मुस्लिम समाजाला विविध योजनां द्वारे फायदा मिळुन देणे आणि त्यावर हजारो कोटी खर्च करणे तसेच मुस्लिम देश आणि ऑरगनाझेशन ऑफ इस्लामिक कॉरपोरेझेशच्या दबावाखाली येऊन त्यांनी ५६ इंच छाती फोल्ड केली आणि मणका वाकवुन त्यांच्या समोर लोटांगण घातले व नुपूर शर्माला पार्टीतुन हाकलले [ मी मनात : देशाचा प्रधामंत्री जर स्वतःच्या पार्टीतील स्त्री ची रक्षा करु शकत नसेल तर तो इतर हिंदू स्त्रियांची काय घंटा रक्षा करणार? ] देशात धर्मांतर वेगाने होत आहे, हिंदू स्त्रिया रोज पळवल्या जात आहेत आणि त्यांचे तुकडे तुकडे केले जात आहेत तरी आधुनिक युगातील धनानंदला याची काही पडलेली नव्हती, मात्र सातत्याने आपले ड्रेस कसे बदलले जातील, फोटो शूट कसे केले जाईल आणि सेल्फी कशी मस्त येईल यात ते मग्न दिसले. गेली ११ वर्ष देशात लव्ह जिहाद घडत असताना मोदी आणि त्यांचा पक्ष याकडे पूर्णपणे काणाडोळा करुन बसला होता. २०२२ ला नड्डा म्हणाले भगवा मतलब भाजपा नही. [ भगव्याचा अपमान करुन देखील या नड्डा नावाच्या वराहाला पक्षातुन हकलले नाही.] २०२३ मध्ये त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लव्ह-जिहादवर पक्षाची भुमिका स्पष्ट केली, त्या म्हणाल्या "प्यार प्यार होता है, उसमे दीवार नही होनी चाहिए, केंद्र सरकार के अजंडे में लव जिहाद नही है"
मोदी दर सणाला वेष बदलत होते, कधी शिखांच्या गुरुद्वार्यात पगडी घालुन जात होते तर कधी परदेशी जाऊन नाचगाणी आणि लावणी नृत्याचा आस्वाद घेत होते. आत्ताच ख्रिसमसला ते चर्च मध्ये जाऊन आले, तरी नशिब त्यांनी सांताचा पोषाख घातला नव्हता!
याचा अर्थ ते आधुनिक धनानंद आणि आधुनिक गांधी हे एकाच वेळी झाले होते, बाकी ते गांधींच्या पुतळ्याला हार घालणे किंवा नविन ठिकाणी किंवा देशात गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करणे हे कार्यक्रम करत होतेच म्हणा.
तुम्ही कधी केतकी चितळे चा राग अनावर झालेला व्हिडियो पाहिला आहे का? नसेल पाहिला तर शोधुन नक्की पहा.तिला ज्यासाठी राग आला तोच राग माझ्या आणि इतर कट्टर हिंदूंच्या मनात आहे. लिहायला गेलो तर बरचं काही लिहता येईल.
या सर्व गोष्टीं बरोबरच देशात राष्ट्र प्रेमी सक्षम विरोधी पक्ष नसणे हे फार घातक झाले आहे, यामुळे धनानंद निरंकुश झाला आणि मत देऊन कोणाला देणार ? धनानंदला देणार हा घातक विचार लोकांच्या मनात पार आत रुजलेला आहे.
देशात वक्फ जमिन लुटत असताना मोदींना त्याला आर्थिक मदत केली आणि हा वक्फ कायदा घटना विरुद्ध असताना आणि देशातील न्याय व्यवस्थेच्या विरोधी असताना देखील तो नष्ट न करता त्यात सुधारणा आणल्या व तो जिवंत ठेवला केवळ मुस्लिम लोकांना खूश ठेवण्यासाठीच [ जो कायदाच घटना विरोधी / घटना बाह्य आहे त्यात तुम्ही सुधारणा कश्या आणता बरं? ] सत्तेत असुन देखील मोदींनी हिंदूंच्या देवळावरील नियंत्रण सोडले नाही, इतकेच नव्हे तर या धनानंदने मुंबईतील सिद्धीविनायक मंदीराचे ४० किलो सोने स्वतःच्या स्किमच्या नावावर नेले.
संदर्भः Siddhivinayak temple commits 40 kg gold to Modi’s pet scheme
सध्या सोन्याचा दर काय आहे हे आपणा सर्वांना ठावूक असेलच, तेव्हा सिद्धीविनायक मंदिराला कितीचा फटका बसला बरं?
हा धनानंद हे ख्रिश्चन आणि मुस्लिम श्रद्धा स्थानांच्या बाबतीत असं काही का करत नाही?
माझे मोदींच्या समर्थनार्थ प्रतिसाद हे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचे आहेत. [ मागच्या निवडणुकीच्या आधी देखील मी त्यांच्या धोरणाच्या विरोधात अनेक प्रतिसाद लिहलेले आहेत व त्या आधीही लिहलेले आहे, नीट शोधले तर नक्की सापडतील. ]
भाजपाच्या विरोधातली अगदी ताजी स्थिती सांगायची झाली तर #Anti_Hindu_BJP हा हॅशटॅग ट्रेन्डिंग मध्ये आहे.
असो...
माझ्या व्यतिगत मते: मोदी आणि निर्मला सीतारामन् हे राष्ट्राला डोईजड झालेले आहेत. देशाला न्याय व्यवस्थेत रिफोर्म आणण्याची तीव्र गरज आहे. आयकर पूर्णपणे नष्ट करुन प्रामाणिकपणे कष्ट करुन पोट भरणार्या लोकांना आर्थिक जीवदान देण्याची गरज आहे आणि आरक्षण नावाच्या ड्र्ग्सच्या नशेतुन देशाला वाचवले पाहिजे.
तेरा तो अर्नब बन गया रे.......
कैसे?????????
असा अर्नब चा टॅग एकदा मुनींनी मला चिटकवायचा प्रयत्न केला होता, तो प्रकार आज आठवला. :)))
माझे प्रतिसाद नीट वाचले असते तर कैसे????????? असा प्रश्न आलाच नसता !
जाता जाता: मोदी असो वा मनमोहन ते जे चांगले काम करतील त्या कामाचे कौतुक करु पण मै चौकीदार बनुन लूट माजवाल तर त्याविरुद्ध देखील बोलु असा माझा सरळ फंडा आहे.राष्ट्र प्रेमी लोकांनी अश्विनी उपाध्याय यांचे एक्स अकाउंट एकदा तरी जरुर चाळावे, असे मी आगत्याने सुचवतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit
5 Jan 2026 - 8:50 pm | रामचंद्र
आपण ज्या नेत्याला आदर्श मानतो, त्याचीही एका टप्प्यावर त्रयस्थपणे चिकित्सा करणं यात काही गैर नाही. मात्र आपल्यासारखीच बहुसंख्य मंडळी कट्टर समर्थनापलिकडे जाऊन भक्तिभाव जोपासत असताना आपल्याला नेमक्या कोणत्या मुद्द्यांमुळं अथवा परिस्थितीमुळं (हिंदू-मुस्लीम मुद्दा सोडून, शक्यतो आर्थिक/राजकीय/सामाजिक/धोरणविषयक) विद्यमान नेतृत्वाचा पुनर्विचार करावासा वाटला यावर काही लिहिणार का?
5 Jan 2026 - 9:06 pm | स्वधर्म
असं लिखाण अजून कडवे समर्थक असणार्यांसाठी खूप डोळे उघडणारे ठरेल. पण संघ स्वयंसेवकांच्या मते हिंदू मुस्लीम हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मदनबाण यांच्याकडून काय येतं ते बघू या.
5 Jan 2026 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाय नाय, ते काही आनंदाने लिहित नाही आहेत. आपली बॉ लै फसवणूक जाहली अशा अर्थाचे अरण्यरुदन आहे. सरकार, भाजपा , मुस्लीमांचा कुठं द्वेष करतात. मा.भागवत म्हणाले की सर्वांना घेऊन चाललं पाहिजे. आरक्षण कुठं रद्द झालं, ते तर सुरुच आहे. वगैरे इत्यादि. खरं म्हणजे यांना अपेक्षित आहे की, आपलं हिंदूंचं सरकार आहे ना, मग इतर सर्व धर्मीयांनी येथून चालतं झालं पाहिजे. मग याला काय अर्थ आहे. आपल्याला सर्वसाधारण शेंगदाने ५० रु किलो आणि त्यांना किमान १५० तरी पाहिजे होता. डिझेल हिंदूंना ५० आणि इतर धर्मियांना १५० रु. लिटर पाहिजे होते. सालं सगळ्यांनाच सगळं सारखं मिळणार असेल तर आपण हे भगवे झेंडे फडकावतो कुणासाठी अशी भावना आहे. =))
रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करताना चोरांची भिती वाटू नये म्हणून सोबतीला एखादा अपंग व्यक्तीची सोबत मिळाल्यानंतर जो धीर येतो तेवढाच आधार. बाकी, त्याची काही मदत होणार नसते. पण दिल बहलाने को कुछ खयाल अच्छे होते है. ः)
-दिलीप बिरुटे
5 Jan 2026 - 11:07 pm | रामचंद्र
एखादा माणूस इतके दिवस ठाम असलेल्या मताविरुद्ध विचार, तेही ठोस कारणे देऊन व्यक्त करत असेल तर त्यालाच ठोकून काय साध्य होतं?
6 Jan 2026 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गैरसमज आहे आपला. मत बदलली नाहीत. तर, त्रागा व्यक्त करीत आहेत.
-दिलीप बिरुटे
5 Jan 2026 - 11:01 pm | रामचंद्र
ते आर्थिक बाबींचा अनेकदा परामर्श घेत असतात म्हणून विद्यमान सरकारच्या कोणत्या आर्थिक/सामाजिक/अन्य धोरणांमुळे आपल्या आजवरच्या पाठिंब्याचा त्यांना पुनर्विचार करावासा वाटला त्याबद्दल त्यांनी अधिक लिहावे असे वाटले.
6 Jan 2026 - 12:14 pm | मदनबाण
अहो असुध्या, चालायचंच. त्यांना ते काय वाटायचं आहे ते वाटु दे! त्यांचा धनानंदाचा विरोध तो तात्विक आणि आमचा तो अरण्यरुदन! ))) किंवा त्यांचा तो कढी भात आणि आमचा असतो तो ताक भात! :)))
ते म्हणतात कि : सर्व धर्मीयांनी येथून चालतं झालं पाहिजे. मग याला काय अर्थ आहे.
त्यांनी लव्ह जिहाद या अत्यंत गंभीर मुद्द्यावर सोयिस्कर मौन बाळगलेले आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. लव्ह जिहाद कोणता धर्म करतो? असे प्रश्न त्यांना पडत नसणार! नाहीतर २ शब्द त्यांनी त्यावर देखील लिहायचे कष्ट घेतले असते.
असो...
लव्ह जिहाद: हिंदुंनी आपल्या स्त्रियांना वाचवण्यासाठी जे काही करायला हवे ते सर्व करायला हवे. ही आग आज दुसर्याच्या घराला लागली आहे, उध्या ती तुमचे घर देखील जाळेल इतकं नक्की.
काही काळा पूर्वी माझ्या पाहण्यात याचा "भयानक" प्रकार आला होता तो इथे मी देऊन जातो. तुमच्या / माझ्या सकट [ हे सर्व हिंदूंना लिहले आहे ] घरी एक तरी स्त्री असेलच. मग ती आई,बहिण,मुलगी किंवा इतर कोणी जरी असेल तिच्यावर ही वेळ आली, तर काय कराल? असा विचार प्रत्येकाने करावा.
देत असलेले दुव्याने तुमचे मन यावर गंभीरपणे विचार करेल अशी आशा बाळगतो!
दुवा:
https://www.youtube.com/watch?v=LGnwB_fBOHs
https://www.youtube.com/watch?v=0YM11h3Dl4A
जाता जाता: भाजपाचे किरीट सोमय्या त्यांच्या एक्स वरील हँडलवर उगाच व्होट जिहाद व्होट जिहाद ओरडत असतात. जिहाद छे छे असं काही नसतं बरं नाही का? बरोबर ना?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Maili
6 Jan 2026 - 4:24 pm | स्वधर्म
सर,
मागे ते सोमय्या यांची एक चित्रफीत व्हायरल झाली होती, ती आठवते का तुंम्हाला? त्यात हिंदू व मराठी स्त्रिया होत्या. त्यावर काय कारवाई झाली? खरे तर स्त्रियांचे रक्षण अशा सत्तेतील लोकांपासून करण्याची अधिक आवश्यकता नाही काय? कारण सत्ताधारी असल्याने त्यांच्याविरूध्द काही होत नाही. आणि अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या संरक्षणाबाबत बाबत काही म्हटले असेल तर त्यावर तुंम्ही कितपत विश्वास ठेवणार?
बाकी लव्ह जिहाद मध्ये जर फूस लावली जात असेल तर ते नक्कीच गैर आहे.
6 Jan 2026 - 6:33 pm | मदनबाण
अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या संरक्षणाबाबत बाबत काही म्हटले असेल तर त्यावर तुंम्ही कितपत विश्वास ठेवणार?
मी लिहले आहे: व्होट जिहाद व्होट जिहाद
जी जिहाद करणारी मंडळी आहेत ते त्यांच्या पार्टी च्या विरुद्ध तो करतात असे ते म्हणतात.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Maili
6 Jan 2026 - 6:38 pm | मदनबाण
लव्ह जिहाद मध्ये जर फूस लावली जात असेल तर ते नक्कीच गैर आहे.
सर्व प्रकारच्या जिहाद मध्ये "जर-तर" असं काही नसतं.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Maili
7 Jan 2026 - 5:08 pm | स्वधर्म
आधी हिंदू स्त्रियांवर अत्याचार करणार्या तुमच्या तुमच्या पक्षातल्या माणसावर तरी कारवाई करायची हिंमत आहे का? उलट त्याच्या विधानाचाच प्रचार तुंम्ही करत आहात. अवघड आहे.
7 Jan 2026 - 7:01 pm | मदनबाण
तुम्हाला बहुधा मी काय म्हंटले ते कळलं नाही, परत सांगायचा प्रयत्न करतो. सोमय्या यांचे पुराव्यानिशी असे म्हणणे आही कि निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या विरोधात व्होट जिहाद केला जातो.
माझा कोणत्याच राजकिय पक्षासी संबध नाही आणि माझा स्वतःचा कोणत्याच राजकिय पक्षावर आणि नेत्यावर आता विश्वास राहिलेला नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
7 Jan 2026 - 10:39 pm | स्वधर्म
तुंम्हाला मात्र मी विचारलेले कळले असून मुद्दाम व्होट जिहाद असे जे सोमय्या म्हणत आहेत, त्याच्याकडेच चर्चा वळवण्याचा प्रयत्न करत आहात. खरे तर त्यांच्या स्त्रियांबाबतच्या गैरवर्तणूकीची सीडी बाहेर आली होती व गंभीर आरोप होऊन ते बॅकफूट वर गेले होते. अशा व्यक्तींपासून स्त्रियांना धोका आहे, का अशा व्यक्तीने केलेल्या कांगाव्यापासून लोकशाहीला धोका आहे हे स्पष्ट असूनही ते जणू काही घडलेच नाही अशा प्रकारे पुन्हा पुन्हा असल्या नेत्याच्या विधानाचा आधार घेणे हे नीट लक्षात येण्यासारखे आहे, झोपलेल्याला उठवणे शक्य असते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे शक्य नसते हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
8 Jan 2026 - 8:44 am | मदनबाण
किरिट सोमय्या यांच्यावर जे आरोप झाले त्याची स्थिती:
सप्टेंबर २०२३ मध्ये, मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' वाहिनीचे संपादक कमलेश सुतार आणि युट्युबर अनिल थत्ते यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला.
या दोघांवर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि मानहानीच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अश्लील आशय प्रसारित केल्याबद्दल 'लोकशाही' वाहिनीचे प्रक्षेपण ७२ तासांसाठी बंद करण्याचे आदेशही दिले होते.
खंडणीचा प्रयत्न: सप्टेंबर २०२३ मध्येच, सोमय्या यांनी तक्रार केली की त्यांना अज्ञात व्यक्तीकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून पैसे न दिल्यास त्यांचे आणखी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे.
मानहानीचा दावा: ऑक्टोबर २०२३ मध्ये, सोमय्या यांनी अंबादास दानवे,लोकशाही न्यूज आणि अनिल थत्ते यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला.
जानेवारी २०२६ पर्यंतच्या माहितीनुसार, या प्रकरणातील पोलीस तपास अद्याप सुरू असून मानहानीचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.सोमय्या यांनी याला आपल्या विरुद्ध रचलेले एक राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
व्होट जिहादच्या त्यांनी केलेल्या आरोपा बद्धलः
राजकारणात 'नैतिक अधिकाराला' मोठे महत्त्व असते. जर एखादा नेता स्वतः चारित्र्याच्या चौकशीला सामोरे जात असेल, तर त्याला दुसऱ्याच्या नैतिकतेवर किंवा देशहितावर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार उरतो का?असा प्रश्न उपस्थित होतो.अशा स्थितीत त्यांनी केलेले आरोप 'अयोग्य' ठरत नाहीत,पण ते 'कमी परिणामकारक' ठरतात.
दोन्ही प्रकराण पुढे जी काही कारवाई होईल तेव्हा त्याचे सत्य बाहेत येईल.सोमय्या यांच्यावर जे आरोप झाले ते जर सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांनी स्वतः केलेले आरोप त्यांना सिद्ध करता आले नाही तर त्यांचा खोटेपणा उघड होईल.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNES
8 Jan 2026 - 4:54 pm | स्वधर्म
आपल्या एकाच प्रतिसादात हिंदू स्त्रिया वाचवण्याची तळमळ आहे आणि त्यातच ज्याची स्त्रियांबाबत आक्षेपार्ह सीडी आली होती त्या नेत्याने केलेले आरोप ग्राह्य धरत आहात. हे लॉजिक अजिबात अनाकलनीय नाही. धर्माचे भूत मानगुटीवर बसलेल्या समर्थकांना तेच पढवले जाते, तिथे लॉजिक वगैरे चालत नसते, हे सिध्द केल्याबद्दल आभार.
बाकी दाव्यांचे जे होईल ते होईल पण तुमच्या आदरणीय नेत्याने दावा मानहानीचा केला आहे, ज्यात कोणालाही शिक्षा झाली नाही. सीडी खोटी असल्याचा केला आहे का? पण हे ही शेवटी लॉजिकच... त्यामुळे जाऊ द्या.
6 Jan 2026 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>हिंदुंनी आपल्या स्त्रियांना वाचवण्यासाठी जे काही करायला हवे ते सर्व करायला हवे.
दोनहजार चौदा पासून हिंदूंच्या बाजूने मतदारांकडून जवळ जवळ सगळं झालं आहे.
हं आता हिंदूचं सरकार असूनही सरकार हिंदूंसाठी काही करीत नाही, हे खरं आहे.
आता बरोबर आली गाडी पटरीवर. चालू ठेवा. :)
-दिलीप बिरुटे
5 Jan 2026 - 11:55 pm | कॉमी
ही रक्कम मंदिराचीच राहणार आहे.
नुसत्याच पडलेल्या सोन्यावर व्याज मिळेल.
सोबत तितकेच सोनेही मॅच्युरिटी नंतर मिळेल.
तेव्हा बाकी काहीही म्हणा इथे मात्र मंदिराचा स्पष्ट आणि सरळ फायदाच आहे. तेव्हा उगाच विश्वगुरूंना दोष नको.
6 Jan 2026 - 11:46 am | मदनबाण
माझ्या समजण्यात जी चूक झाली ती योग्य पद्धतीने निदर्शनास आणुन दिल्या बद्धल धन्यवाद!
१% च्या जागी २ /२.५% टक्के व्याज मिळेल बहुतेक, जी चांगली गोष्ट आहे. नक्की ४० किलो की १६० किलो जमा केले ते देखील पहायला हवे, कारण पीएमओ रिपोर्ट कार्ड मध्ये १६० चा उल्लेख आहे. तसेच मुदतीच्या शेवटी पैसे कि सोनं परत मिळणार? म्हणजे परताव्यासाठी यातला कुठला पर्याय निवडला आहे? किंवा असा काही पर्याय असतो का? ते देखील मला कळले नाही.
बाकी यावरुन Sovereign Gold Bond बाबतीत जे झाले ते आठवले! मला तर हे देखील किती खरे किती खोटे ते कळेनासे झाले आहे.
असो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Maili
6 Jan 2026 - 12:08 pm | कॉमी
मुदतीच्या शेवटी पैसे मिळाले तरी ते मुदतीच्या शेवटी जितक्या सोन्याचा भाव आहे तितकेच मिळतील. दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत, थेट सोने किंवा पैसे. आता हे कधी निवडायचे असते हे तपशील माहित नाहीत. पण आयदर केस सोन्याची जितकी किंमत मुदत संपण्यावेळेस आहे तितकी वसूल होईल. मग हवे तर मंदिर पुन्हा तितकेच सोने घेऊ शकते.
SGB आणि ह्या स्कीम मधला फरक -
SGB पूर्णपणे पैशांचा व्यवहार आहे. ह्यात सोन्याचा इंडेक्स फक्त आहे, खरोखर सोन्याची देवाण घेवाण कुठेच नाही.जेना ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे पण सोने साठवण्याची झंझट नको, त्यासाठी ही योजना होती.
ही स्कीम देशातले सोने द्रव्यरूपात अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी आहे. इथे खरोखरी असलेले सोने द्यावे लागते. ते वितळवले जाते. आणि शेवटी तितकेच सोने किंवा बाजारभाव मिळेल.
6 Jan 2026 - 12:16 pm | मदनबाण
ओक्के.धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Maili
7 Jan 2026 - 3:47 pm | कांदा लिंबू
भाजपाच्या विरोधातली अगदी ताजी स्थिती सांगायची झाली तर #Anti_Hindu_BJP हा हॅशटॅग ट्रेन्डिंग मध्ये आहे...संघ-भाजप-मोदी यांनी कधीही, कोणत्याही काळात, कसल्याही प्रकारची खरोखर हिंदुहिताची भूमिका घेतली नाही. मिपावर साहना यांनी हिंदूंवर अन्यायकारक शिक्षण हक्क कायद्याबद्धल भरपूर लिहिले आहे. २०१४ साली प्रचंड बहुमतात सत्तेत आलेल्या मोदींनी हा कायदा बदलला नाही.
मागच्या बारा वर्षांत या सरकारने हिंदूंच्या हिताचा एकही नवीन कायदा केला नाही; हिंदूंचे अहित थांबवणारा एकही जुना कायदा रद्द केला नाही.
असे काही बोलले की मोदीचे अंध समर्थक (किंवा विकतचे पाठीराखे) मात्र मूळ मुद्द्याला बगल देऊन "सध्याच्या परिस्थितीत मोदींना पर्याय आहेत ते त्यापेक्षा कितीतरी वाईट आहेत हे ते लक्षातच घेत नाहीत" असा खुळचट युक्तिवाद करत राहतात.
मोदींना पर्याय दुसरा कुणी आहे का? हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे मोदींनी त्यांच्या मतदारांना दिलेली expressed व implied वचने वारंवार संधी देऊनही पाळली नाहीत.
"अहो माझ्या साड्या किती जुन्या झाल्यात, एखादी तरी नवीन साडी आणा" असे बारा वर्षांपासून म्हणणाऱ्याला बायकोला "माझ्याशी संसार करण्याशिवाय तुला दुसरा शेजारचा काही पर्याय आहे का?" असे म्हणण्यासारखे आहे ते.
7 Jan 2026 - 7:03 pm | NiluMP
माझ्या व्यतिगत मते: मोदी आणि निर्मला सीतारामन् हे राष्ट्राला डोईजड झालेले आहेत.....जोपर्यंत वोटेबँक लोकशाही आहे तोपर्यंत झोपटपट्ट्या, आरक्षण, इनकम टॅक्स + ...यातून आपली सुटका नाही.
3 Jan 2026 - 5:14 pm | कंजूस
हा धुरळा खाली बसवण्याचं काम मतदारांचं आहे आणि त्याला मतदार तयार नाहीत. विरोधी पक्षांवर तर ते विश्वासही ठेवायला तयार नाहीत हे चित्र आहे. भाजपची बुलेट ट्रेन अडवणारा कुणी रजिनीकांत समोर येतच नाही.
3 Jan 2026 - 7:29 pm | रात्रीचे चांदणे
असलेल्या पर्यायापैकी बरा असलेला पर्याय लोकं निवडतात. सध्या तरी भाजपा मतदाराचा आवडता आहे हे नक्की आहे. त्यात ED, CBI चा वापर करून भाजपा त्यात भर घालतोय. लोकांना हे समजतं नाही असं नाही पण काँग्रेस वर विश्वास ठेवायला लोकं तयार नाहित.
काँग्रेसने लॉन्ग टर्म विचार करून राहुल गांधीना नारळ द्यायला पाहिजे आणि भजपाच्या चुका समर्थपने बाहेर काढायला पाहिजेत.
7 Jan 2026 - 4:13 pm | कांदा लिंबू
"आधी देश, मग पक्ष, मग स्वतः" म्हणणाऱ्या मोदींनी दुसरा देश तर सोडाच, आपला देशही सोडा, देशातील हिंदू जनता सोडा, आपले मतदारही सोडा, स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मांना वाचविण्याचा प्रयत्नही केला नाही. मुस्लिम प्रेमासाठी त्यांनी त्यांचा बळी जाऊ दिला.
शंभर वर्षांपूर्वी आर्य समाजाचे संन्याशी स्वामी श्रद्धानंद यांचा अब्दुल रशीद नामक इसमाने खून केला त्याचा, तत्कालीन मोदी (हो, तत्कालीन मोदीच, नाही का?) महात्मा गांधी यांनी निषेध तर केला नाहीच उलट अब्दुल रशिदला "माझा भाऊ" असे संबोधले. त्याच्या फ़ाशीलाही गांधींनी आक्षेप घेतला.
विसाव्या शतकात गांधींनी हिंदूंना मूर्ख बनवून देशाचे तुकडे करविले; एकविसाव्या शतकात मोदींनी हिंदूंना मूर्ख बनवून गझवा-ए-हिंद-२०४७ ची तयारी करून दिली. त्याकाळी बहुसंख्य हिंदू लोक गांधींना आपला खरा नेता समजायचे; आजच्या काळी मोदींना आपला खरा नेता समजतात.
https://en.wikipedia.org/wiki/Shraddhanand
7 Jan 2026 - 5:14 pm | शाम भागवत
मोदींच्या मनांत नक्की काय आहे माहीत नाही.
पण चीनने उईगर मुस्लिमांविरूध्द कोणतीही कृती केली तरी त्या विरूध्द जगातले कोणीही अगदी ५७ मुस्लिम राष्ट्रेही बोलत नाहीत.
चीन एवढं सैनिकी व आर्थिक सामर्थ्य प्राप्त होईपर्यंत तरी आपण सबुरीने घेतलं पाहिजे. मात्र तोपर्यंत २०४७ पर्यंत “गझवा ए हिंद” यशस्वी होणार नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत. ३७० हटवणं, वक्फ बील, तलाक वगैरे गोष्टी त्यासाठीच असाव्यात. हिंदू एकता व मुस्लिमांमधे फूट हीच नीती सध्यातरी योग्य वाटते.
मुस्लिमांची एकी व हिंदूमधे फूट या कॉंग्रेसच्या दिर्घकालीन धोरणाला हेच अचूक उत्तर आहे व ते फलदायी ठरतानाही दिसत आहे.
पण १००० वर्षांचा प्रश्न १०-१२ वर्षात सुटावा असं वाटणाऱ्यांना पेशन्स ठेवणे अवघड जातंय इतकाच त्याचा अर्थ आहे.
ही वेळ युध्दाची नाही असं मोदी म्हणतात त्यांत खूप मोठा अर्थ असावा असे वाटते. ही वेळ युध्द तयारीची आहे असा अर्थ मी तरी काढला आहे. तसेच ही युध्द तयारी भारताला २०४७ पर्यंत पूर्ण करायची आहे अशी कालमर्यादा आखली असावी असेही मला वाटते. तोपर्यंत तरी नूपूर शर्मा कितीही योग्य बोलत असल्या तरी त्यांना आवरणेच योग्य होईल.
मोदींचं राजकारण “पी हळद हो गोरी” या प्रकारचं नसावं असं माझं मत आहे. इतकेच नव्हे तर हे सगळे डावपेच मोहन भागवतांनाही माहीत असणे शक्य आहे.
असो.
7 Jan 2026 - 6:57 pm | चंद्रसूर्यकुमार
मोदी परफेक्ट आहेत का? नक्कीच नाही. काँग्रेसच्या काळात केलेले हिंदूविरोधी सगळे मोदींनी बदलले का? नाही. पण म्हणून मोदींवर टीका जरूर करावी पण ती करताना मुळात ते हिंदू विरोधी कायदे पास करणारे लोकच प्रबळ होणार नाहीत हे बघायला हवे इतकेही भान नसणाऱ्या लोकांशी आर्ग्यु करायचा खरोखरच कंटाळा आला आहे. बाकी जर समस्त डापु गँग जर मोदींवर टीका करत असेल तर याचाच अर्थ मोदी यांना अपेक्षित असेल तितके नाही तरी काहीतरी करत असले पाहिजेत हे पण समजून ज्यांना घेता येत नाही असल्या तथाकथित हिंदू हिताच्या गप्पा मारणाऱ्यांच्या कुठे तोंडी लागायला जायचे हा प्रश्न पडतोच. २०१३ मध्ये आपल्या सैन्याकडे दारूगोळाच पुरेसा नाही, चीन सीमेवर चांगले रस्तेच बांधायचे नाहीत कारण त्याचा वापर चीनचे सैन्य आत घुसल्यावर करेल असली जाहीर भूमिका असलेले सरकार होते तिथपासून आता कितीतरी प्रगती झाली आहे - ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस पाकड्यांनी पाठवलेल्या ड्रोन पैकी ९९.९९% जमिनीवर पोचू शकले नाहीत आणि एकही मिसाईल हानी करू शकले नाही याचा अर्थ कितीतरी प्रगती झाली आहे हे पण ज्यांना कळत नाही किंवा कळून घ्यायचे नसते अशा लोकांपुढे काय बोलायचे?
सुशिक्षित लोक असेच फुलपाखरू मानसिकतेचे आहेत हे बहुदा मोदींनी बरेच आधी ओळखले म्हणून इतकी वर्षे कोणतीही करात कपात न करता तेच पैसे विविध योजनांसाठी वापरून लाभार्थी ही नवी वोट बँक तयार करायचा प्रयत्न केला असावा असे वाटते. असले काही वाचून कांदाबाण वगैरे लोकांची मते नकोतच असे माझ्यासारख्याला २०२६ मध्ये समजून चुकले असेल तर ते मोदींनी अगदी २०१४ मध्येच ओळखले असेलच.
7 Jan 2026 - 7:26 pm | रात्रीचे चांदणे
चंद्रसूर्यकुमार यांच्या प्रतिसादासी सहमत. मोदी आणि भाजपा नक्कीच परफेक्ट नाहीत पण म्हणून काँग्रेसच्या हातात परत सत्ता देण सध्यातरी योग्य होणार नाही. काँग्रेस मध्ये सुधारणा दिसली तर लोकं परत काँग्रेस कढे आकर्षीत नक्कीच होतील.
पण भाजपाच्या चुकांवर मात्र योग्य टीका व्हयलाचं पाहिजे. सध्या प्रमुख मीडिया तर सगळा भजपाच्या ताब्यात आहे. कमजोर विरोधी पक्ष, एकतर्फी मीडिया ह्यामुळे भाजपाच आरामात चालून जातय.
7 Jan 2026 - 6:58 pm | रामचंद्र
'शत प्रतिशत' पटण्यासारखे स्पष्टीकरण! सर्वच 'मास्टर स्ट्रोक' सर्वांच्याच लक्षात येतातच असं नाही!!!
7 Jan 2026 - 7:07 pm | NiluMP
पण चीनने उईगर मुस्लिमांविरूध्द कोणतीही कृती केली तरी त्या विरूध्द जगातले कोणीही अगदी ५७ मुस्लिम राष्ट्रेही बोलत नाहीत. ----- चीनमधे लोकशाही नाही आणि ते मतांसाठी लाचार नाहीत.
7 Jan 2026 - 7:47 pm | मदनबाण
मोदींच्या मनांत नक्की काय आहे माहीत नाही.
Modernising Madrasas: Govt Spends Rs 1,000 Cr In 7 Years
PM Modi : Modi government will also give Saugad-e-Modi to madrasas
Aid to minority body & salaries of madrassa teachers
Maharashtra government triples salaries of madrasa teachers
Shahari Waqf Sampatti Vikas Yojana implemented by Ministry of Minority Affairs through Central Waqf Council for providing interest free loan to Waqf Institutions/Waqf Boards
लिंक बंद पडण्याची शक्यता असते म्हणुन तिथली माहिती इथे पेस्ट करुन ठेवतो:
The Minister of Minority Affairs, Smt. Smriti Zubin Irani in a written reply to a question in the Rajya Sabha today informed that this Ministry implements Shahari Waqf Sampatti Vikas Yojana (SWSVY) through Central Waqf Council (CWC). Under SWSVY, interest free loan is provided to Waqf Institutions/Waqf Boards for taking up economically viable projects on the urban waqf land such as commercial complexes, marriage halls, hospitals, cold storages etc. The annual Grants-in-aid released under the Scheme between 2017-18 to 2021-22 is Rs. 316.00 lakh, 316.00 lakh 316.00 lakh, 300.00 lakh and 100.00 lakh respectively.
The grants and subsequent instalments are released after ascertaining the viability of the project in accordance with the scheme guidelines, receipt of Utilization Certificate (UC) and satisfactory progress Report from the concerned Waqf Institution/ Waqf Board. As on date, total 4 applications are pending amounting to Rs. 487.25 lakh.
मला गंमत वाटते की रायसिन मिसळवुन लाखो देशवासी मारले जाणार होते, ( असा दावा करण्यात आला की जप्त केलेला पदार्थ “मुंबई किंवा बेंगळुरूसारखे संपूर्ण शहर” नष्ट करण्यासाठी पुरेसा होता. ) गुप्तचर संस्थाच्यामुळे / किंवा ज्या असतील त्यांच्यामुळे ते झाले नाही. लाखो लोक जर खरंच मेले असते तर?
इतक सगळं होऊन देशात सामान्य स्थिती आहे हे लोकांना कसं काय वाटतं?
जाता जाता: Won't allow dilution of SC/ST Act: PM Modi
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
3 Jan 2026 - 3:12 pm | मदनबाण
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे.
Trump 'INVADES' Venezuela; US Air Force Attacks Army Bases In Caracas | Maduro Next?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit
6 Jan 2026 - 6:56 am | निनाद
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेल्या 'ऑपरेशन अॅबसोल्युट रिझॉल्व्ह' या लष्करी कारवाईने निकोलस मादुरो यांची सत्ता संपुष्टात आणली. ट्रम्पच्या या आक्रमक पाऊलामुळे केवळ दक्षिण अमेरिकाच नव्हे, तर आर्क्टिक क्षेत्रातील ग्रीनलँड या स्वायत्त डॅनिश प्रदेशाबाबतच्या जुन्या भीती पुन्हा एकदा पटलावर आल्या आहेत. या हस्तक्षेपानंतर ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा असणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी कसे आवश्यक आहे, याचे सूतोवाच पुन्हा एकदा केले आहे.
असो, व्हेनेझुएला लोकशाहीसाठी धोका होता का तर नक्कीच होता. कारण मादुरो यांनी लोकशाही संस्था, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावर पूर्ण ताबा मिळवला होता. मादुरो प्रशासन कार्टेल ऑफ द सन्स या अमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंधित होते. याकाळात ढासळलेली अर्थव्यवस्था आणि दडपशाहीमुळे ८० लाखांहून अधिक नागरिकांनी देश सोडला. अर्थातच शेजारील लोकशाही देशांवर निर्वासितांचा प्रचंड ताण आला आहे. व्हेनेझुएलाने रशिया, चीन आणि इराण यांच्याशी घनिष्ठ लष्करी व आर्थिक संबंध प्रस्थापित केले होते. यामुळे अमेरिकेच्या अंगणात लोकशाहीविरोधी शक्तींचा शिरकाव झाला आहे.
ट्रम्पने आता तेथे 'तात्पुरते प्रशासन' चालवण्याचे जाहीर केले असून डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या मदतीने व्यवस्था राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तर कोरिया, क्युबा आणि निकाराग्वा यांसारख्या देशांच्या नेत्यांना आता आपली सत्ता सुरक्षित नसल्याचा संदेश मिळाला आहे. जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात इराणमधील जनक्षोभाने उग्र रूप धारण केले आहे. व्हेनेझुएलातील यशस्वी सत्तांतरानंतर आता सर्वांच्या नजरा इराणकडे वळल्या आहेत. इराणने व्हेनेझुएलामध्ये केलेली मोठी गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. नवीन अमेरिकन समर्थक प्रशासन इराणचे देणे देण्यास नकार देऊ शकते. इराण कमकुवत झाल्यास हिजबुल्लाह (लेबनॉन) आणि येमेनी हुथी यांसारख्या इराण समर्थक गटांना मिळणारी रसद कमी होईल, ज्याचा थेट फायदा इस्रायलला होईल. मात्र, इराणमधील हस्तक्षेप हा व्हेनेझुएलापेक्षा अधिक गुंतागुंतीचा आणि प्रदीर्घ असू शकतो.
अमेरिकेने नाटो किंवा संयुक्त राष्ट्रांच्या संमतीशिवाय ही कारवाई केल्यामुळे, जुने आंतरराष्ट्रीय कायदे आता कचर्यात गेले आहेत असे म्हणायला वाव आहे. या संदर्भाने मोदी सरकारने वेगाने केलेले सुरक्षा दलांचे आधुनिकीकरण आणि त्या संदर्भात घेतलेले वेगवान निर्णय, सुरक्षा दलांना दिलेली ऑटॉनॉमी, आता भरपूर असलेली शस्त्रे आणि दारूगोळा ही फार महत्त्वाचे पाऊले आहेत असे वाटते. (एका काळात दहशतवाद्यांवर झाडायला सुरक्षा दलांकडे गोळ्या सुद्धा शिल्लक नव्हत्या अशी मुलाखत येवढ्यातच ऐकली आहे.) यामुळे भारताला हलक्यात घेणे आता कोणत्याही देशाला शक्य नाही!
6 Jan 2026 - 7:29 am | शाम भागवत
+१
निर्वासितांचा मुद्दा मला फारसा माहीत नव्हता. बऱ्याच लोकांना ठार मारलंय हे ऐकलं होतं.
6 Jan 2026 - 10:59 pm | कपिलमुनी
मादुरो यांनी लोकशाही संस्था, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावर पूर्ण ताबा मिळवला होता...
--- हे सगळ ऐकल्यासारखे वाटते ना ??
स्वायत्त लोकशाही संस्थाचा गैरवापर, हव्या तशा निवडणूक , सर्वोच्च न्यायालयाचे हवे तसे निकाल, निवृत्त न्यायाधीश लाभाची पदे वगैरे ...
पण आपला तो बाब्या
7 Jan 2026 - 2:30 am | कंजूस
याचे उत्तर आपल्याच विरोधी पक्षांनी शोधायचे आहे. किंवा अमेरिका येथे येऊन व्हेनेझुएला करण्याची वाट पाहायची?
3 Jan 2026 - 4:32 pm | अभ्या..
सोलापूरच्या निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी आपल्या वहिनीने अर्ज मागे घेऊन सुद्धा सोशल मीडियावर होणाऱ्या चेष्टेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे सैनिकाचा भरदिवसा धारदार हत्याराने केला खून..
...
सुप्प्प्पर
4 Jan 2026 - 1:56 pm | मदनबाण
आज आर ठाकरे यू ठाकरेंच्या भेटीला सेना भवनात गेले आहेत याच्या बातम्या सगळे चॅनलवाले दाखवत आहेत. दोन्ही ठाकरेंची अवस्था बिकट झालेली असल्याने एकमेकांस सहाय्य करु या स्थीतीत दोघे आले आहेत. माझा आता कोणत्याच राजकिय व्यक्तीवर / पक्षावर विश्वास राहिला नसल्याने त्यांची चाललेली सर्कस अधुन मधुन गंमत म्हणुन पाहत असतो.
आर ठाकरेंनी काही काळापूर्वी लाव रे तो व्हिडियो हे घोषवाक्य प्रचलीत केले होते आणि धनानंदाचा विरोध करु लागले होते, मग धनानंदाने इडी लावली, सगळा आवाज शांत झाला.
मागच्या आठवड्यात धनानंद येशू चे गीत गात होता आज तो बुद्धं शरणं गच्छामि करताना दिसला आहे, धनानंदाला जन की बात करण्यात रस नसुन त्याला केवळ मन की बात करणेच आवडते.
ज्यांना मी सारखा सारखा धनानंद धनानंद का करतो आहे हे कळले नसेल तर त्यांच्यासाठी: Chanakya Neeti : The Role of a King - 1
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super Sharanya
4 Jan 2026 - 2:16 pm | अभ्या..
आता कौटील्य चाणक्याचा वारसा सांगणार्या वृंदांनी एकेकाळी ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त संबोधून तत्कालीन धनानंदाच्या जागी मोठ्य्या कौतुकाने बसवले होते. त्याच्या प्रत्येक बरोबर आणी चुकीच्या कृतीचे "हम करे राष्ट्र आराधन" अश्या समूहगीतात गोडवे गायले होते. विरोधातल्या प्रत्येक आवाजाला देशद्रोहाचे कडेलोट शासन फर्मावले होते.
दरवेळी किंगमेकर आम्हीच हाही माज करण्यात अर्थ नाही. भारतवर्षात प्रत्येक ज्ञातीला आणि समूहाला क्रांतीचा आणि क्रांतीकारकांचा इतिहास आहे.
प्रत्येक पिढीचा धनानंद वेगळा असेल तर चाणक्य आणि चंद्रगुप्तही वेगळा असणार
4 Jan 2026 - 3:22 pm | मदनबाण
ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त संबोधून तत्कालीन धनानंदाच्या जागी मोठ्य्या कौतुकाने बसवले होते.
चूक. आधीची राजसत्ता राष्ट्र विरोधी होती,भ्रष्टाचारी म्हणुन जनता पर्याय शोधत होती. एका राज्यात कार्य करणार्या व्यक्तीला पाहुन जनतेला हा चंद्रगुप्त असेल असे वाटले कारण त्या व्यक्तीने दिलेली अनेक आश्वासने आणि वचने मधुर आणि जनहीतकारी होती, खाणार नाही आणि खाऊ देंणार नाही अशी घोषणा त्याने दिली होती. तसेच त्याच्या पक्षातील इतरांनी देखील आम्ही आयकर नष्ट करु इतपर्यंत आश्वासने दिलेली होती.
संदर्भः India's main opposition party debates scrapping income tax as poll nears
When BJP considered abolishing income tax to woo middle class
त्याच्या प्रत्येक बरोबर आणी चुकीच्या कृतीचे "हम करे राष्ट्र आराधन" अश्या समूहगीतात गोडवे गायले होते. विरोधातल्या प्रत्येक आवाजाला देशद्रोहाचे कडेलोट शासन फर्मावले होते.
हे ज्यांनी केले असेल ते चूकच होते, मी काय केले ते वरती सांगितलेले आहे. माझे मत २ वेळा दिले तीसर्यांदा दिले नाही.
दरवेळी किंगमेकर आम्हीच हाही माज करण्यात अर्थ नाही.
माज राजसत्ता करते, जनता नव्हे. जनता केवळ पर्याय शोधते,जसा २०१४ ला शोधला होता.
भारतवर्षात प्रत्येक ज्ञातीला आणि समूहाला क्रांतीचा आणि क्रांतीकारकांचा इतिहास आहे.
क्रांती शिवय बदल घडतं नाही हे सर्वश्रुत आहे! सध्याचा धनानंद वयाची ७५ पूर्ण करुन देखील पद सोडण्यास तयार नाही. त्याच्या पक्षाच्या विचारां नुसार हे वय झालेला व्यक्ती मार्ग दर्शक मंडळात जाऊन बसतो म्हणे!
प्रत्येक पिढीचा धनानंद वेगळा असेल तर चाणक्य आणि चंद्रगुप्तही वेगळा असणार
आजच्या पिढीचा धनानंद सत्तेत निरंकुष बसलेला आहे.जनतेचे अहीत केले तर राजाचे देखील अहीत होते. तेव्हा जनताच पुढील बदल घडवेल.
आपल्या राजसत्तेला बहुधा शाप असावा, कारण जो जो राजा सिंव्हासनावर आरुढ होतो, तो प्रत्येक राजा { जवळपास सर्व,अर्थात अपवाद असतात. } जनतेचे अहीत करतो आणि त्यांची आर्थिक दृष्ट्या पिळवणूक करतो व यवनांची सेवा करतो.
तुम्ही स्वतः कधी इथे विरोध केला आहे का? वाच्यता केली आहे का? मी विचारणा करतोय कारण मला तुम्हाला कुठलेही लेबल लावयची इच्छा नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super Sharanya
5 Jan 2026 - 5:45 pm | स्वधर्म
तुमच्याप्रमाणे काही समर्थक आता थोडे थोडे भानावर येऊ लागलेत, पण अजूनही बहुसंख्य समर्थक आपण अमृत कालातच आहोत, देशाची शान जगात वाढलीय या भ्रमात व "मैने टच किया" नशेतच आहेत.
बाकी अर्नबचे कारण म्हणे सुधीर ला १५ कोटीचे कंत्राट दिले व त्याला पुतीनच्या मुलाखतीला बोलावले नाही हे आहे असे मानले जाते.
5 Jan 2026 - 6:05 pm | मदनबाण
हा.हा.हा... मोदी समर्थन केले तरी काहींना आवडले नव्हते आणि विरोध केला त्याचाही! :))) आज धनानंदचे जय सोमनाथ चालु आहे! :)))
ते चादरीच्या बातमीवर मात्र लक्ष ठेवा मात्र! धनानंद हिंदूंच्या सातत्याच्या विरोधाला भीक घालतो का? ते यावेळी पहायचे आहे.
अर्नबचे कारण म्हणे सुधीर ला १५ कोटीचे कंत्राट दिले व त्याला पुतीनच्या मुलाखतीला बोलावले नाही हे आहे असे मानले जाते.
सुधीर बद्धल काहीच माहित नाही मला, पुतीन चे कारण चर्चेत आले होते. मला मात्र हिरेन जोशी ची गच्छंती झाली [ खरंच झाली की नाही ते मी नीट तपासले नाही. ] ते कारण वाटले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]
5 Jan 2026 - 6:13 pm | कंजूस
News nation चानेलचे वार्ताहर मात्र सर्व कार्यक्रमांना असतात. लाडके आहेत काय?
5 Jan 2026 - 6:33 pm | मदनबाण
मला नै ठावूक.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]
7 Jan 2026 - 1:00 pm | मदनबाण
ते चादरीच्या बातमीवर मात्र लक्ष ठेवा मात्र!
SC refuses to hear plea against Prime Minister offering of chadar at Ajmer Sharif Dargah "> SC refuses to hear plea against Prime Minister offering of chadar at Ajmer Sharif Dargah
५ जानेवारी २०२६ रोजी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अजमेर शरीफ दर्ग्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'चादर' अर्पण करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) फेटाळून लावली.
न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे:
न्यायक्षेत्राबाहेरचा विषय: सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, पंतप्रधानांनी चादर अर्पण करणे हा विषय न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात (Justiciable) येत नाही.
याचिका निष्फळ: ८१४ व्या उर्ससाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या वतीने चादर आधीच अर्पण करण्यात आल्याने ही याचिका 'निष्फळ' ठरली असल्याचे न्यायालयाने म्हटले.
दिवाणी खटल्यावर परिणाम नाही: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या निर्णयाचा अजमेर न्यायालयात प्रलंबित असलेल्या त्या दिवाणी खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही, ज्यामध्ये दर्गा हा शिवमंदिराच्या अवशेषांवर बांधल्याचा दावा करण्यात आला आहे.
याचिकेची पार्श्वभूमी:
याचिकाकर्ते: ही याचिका 'विश्व वैदिक सनातन संघ'चे अध्यक्ष जितेंद्र सिंह आणि 'हिंदू सेना'चे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दाखल केली होती.
युक्तिवाद: याचिकाकर्त्यांनी असा दावा केला होता की, सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांना राज्य पुरस्कृत सन्मान देणे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे.
परंपरा: १९४७ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेली ही परंपरा तेव्हापासून सलगपणे पाळली जात आहे.
एकंदर घडामोडी पाहुन बरे वाटलं, कोणीतरी ही प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न तरी करत आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
7 Jan 2026 - 1:09 pm | मदनबाण
आधीच्च दुवा चुकला आहे, त्यामुळे परत देतो : SC refuses to hear plea against Prime Minister offering of chadar at Ajmer Sharif Dargah
‘Not justiciable’: SC rejects plea against PM’s ceremonial chadar at Ajmer dargah
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
7 Jan 2026 - 5:33 pm | कॉमी
चादर का चढवू नये पंप्रनी ?
कोणत्याही सणसमारंभाला शुभेछा देणे, मंदिरांना व इतर धार्मिक स्थळांना भेट देणे ह्या नॉर्मल PR गोष्टी आहेत. ह्यात आक्षेपार्ह काय आहे ?
7 Jan 2026 - 7:08 pm | मदनबाण
याचे कारण मी आधीच इथे दिलेले आहे: https://misalpav.com/comment/1201074#comment-1201074
तसेच तो हिंदू द्वेष्टा होता, हिंदूंचे त्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले होते..
एक गंमत म्हणजे ज्या नेहेरुंच्या नावाने धनानंदाचा पक्ष कंठशोष करत असतो त्यांनीच चालु केलीली परंपरा धनानंद आज पर्यंत चालवत आहे. :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
7 Jan 2026 - 10:35 pm | कॉमी
चिश्तींचा दर्गा अनेक वर्षांपासून मुस्लमानांसोबत बऱ्याच हिंदूंचेही श्रद्धास्थान आहे.
आजचा कॉन्टेक्स्ट सोडून इतके मागचे मुर्दे उखाडणे हे कोणत्याही दिशेस जाऊ शकते.
8 Jan 2026 - 8:47 am | मदनबाण
चिश्तींचा दर्गा अनेक वर्षांपासून मुस्लमानांसोबत बऱ्याच हिंदूंचेही श्रद्धास्थान आहे.
त्याने इतिहास आणि सत्य दोन्ही बदलत नाही.
आजचा कॉन्टेक्स्ट सोडून इतके मागचे मुर्दे उखाडणे हे कोणत्याही दिशेस जाऊ शकते.
:)))
यापुढे माझ्या बाजुने मी तुमच्या कोणत्याच प्रतिसादास उत्तर देणार नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNES
5 Jan 2026 - 8:58 pm | रामचंद्र
<सध्याचा धनानंद वयाची ७५ पूर्ण करुन देखील पद सोडण्यास तयार नाही.>
सदर व्यक्तीला तिच्या समर्थकांचा, मातृसंस्थेचा जबरदस्त पाठिंबा असेल आणि दोन्हीही कुठल्याही विधिनिषेधांची फारशी तमा न बाळगणारी मंडळी असतील तर संबंधित व्यक्ती आपणहून पदत्याग करील ही अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे. आणि जोरात चाललेला व्यवसाय स्वतःहून बंद करण्याची किती उदाहरणं आपल्याला व्यवहारात दिसतात?
7 Jan 2026 - 2:27 am | कंजूस
पुढच्या निवडणुकीत ते नसणार. काळजी करू नका. इतर खासदारांचेही तिकिट पुढच्या वेळी कापले होते. मुद्दा आपल्या सैन्याचा सेनापती कोण हा आहे.
7 Jan 2026 - 1:46 pm | रामचंद्र
देशाचं भवितव्य हा मुद्दा बाजूला ठेवल्यास, जर शरद पवार अजूनही राजकारणात सक्रिय राहण्यात काही गैर नाही तर नरेंद्र मोदीही त्यांच्या पाठिराख्यांच्या बळावर सक्रिय राहिले तर त्याला नाही कसं म्हणायचं?
7 Jan 2026 - 2:05 pm | आग्या१९९०
हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात ७५ नंतर शाल नारळ द्यायची पद्धत आहे, त्यात भेदभाव का?
7 Jan 2026 - 4:43 pm | रामचंद्र
साक्षात अवतारी नरपुंगव हा नियमाला अपवाद ठरू शकत नाही का?
13 Jan 2026 - 7:23 pm | सुबोध खरे
हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात ७५ नंतर शाल नारळ द्यायची पद्धत आहे, त्यात भेदभाव का?
पूर्व ग्रह असला कि सगळं उलटंच दिसतं
Atal Bihari Vajpayee[1] (25 December 1924 – 16 August 2018)
Prime Minister of India
In office
19 March 1998 – 22 May 2004
श्री अटल बिहारी याना कुणी कुठे नारळ दिला
Lal Krishna Advani (born 8 November 1927) is an Indian politician and statesman who served as the Deputy Prime Minister of India from 2002 to 2004 under Atal Bihari Vajpayee.
केवळ मोदी द्वेष सोडला तर काहीही दिसत नाही
7 Jan 2026 - 10:03 am | सुबोध खरे
वैफल्यग्रस्त मंडळींचं अरण्यरुदन नव्या वर्षात पण जोरात चालू असल्याचे दिसते आहे.
चालू द्या.
7 Jan 2026 - 10:35 am | चंद्रसूर्यकुमार
अशा लोकांना पेनी वाईज अॅन्ड पाऊंड फुलिश म्हणता येईल. हे लोक मुद्दे मांडत आहेत ते सगळे चुकीचे आहेत असे कोणीच म्हणू शकणार नाहीत- कदाचित बरेचसे बरोबरही असतील- म्हणजे ते पेनी वाईज झाले. पण सध्याच्या परिस्थितीत मोदींना पर्याय आहेत ते त्यापेक्षा कितीतरी वाईट आहेत हे ते लक्षातच घेत नाहीत- म्हणजे ते पाऊंड फुलिश झाले. असल्या लोकांना समजावायचा पूर्वी बराच प्रयत्न करायचो पण आता तो प्रयत्न सोडून दिला आहे. एकूणच सुशिक्षित/इंटलेक्च्युअल वर्ग सतत कुरकुर करत असतो. जर असल्या वर्गाच्या तोंडाला सगळेच पक्ष पाने पुसत असतील तर त्यांचे वर्तन पाहता त्या पक्षांचे काही चुकते असे वाटतही नाही. त्यापेक्षा फार बुध्दीची झेप नसलेल्या सामान्य लोकांना नक्की काय योग्य आहे आणि अयोग्य आहे याचे भान अधिक चांगले असते. ते पेनी फुलिश असतील पण पाऊंड वाईज नक्कीच असतात.
7 Jan 2026 - 4:03 pm | स्वधर्म
>> अशा लोकांना पेनी वाईज अॅन्ड पाऊंड फुलिश म्हणता येईल.
अगदीच बरोबर आहे सर तुमचे. बघा ना, हे लोक या सरकारच्या धोरणांमुळे डॉलर ची किंमत ९० रूपयाला गेली अशा फालतू बाबीचा कांगावा करत आहेत आणि खाकर्यावरील वस्तू सेवा कर कमी करून सर्व देशबांधवांचे केवढे मोठे भले केले ते विसरत आहेत.
7 Jan 2026 - 11:09 am | आग्या१९९०
नवीन वर्षात हॉटेलातील गिऱ्हाईके मोजण्याचे कंत्राट रद्द झाले का? सध्या शेजारच्या हॉटेलात जास्त आहात असे आढळून आले आहे.
7 Jan 2026 - 11:42 am | अमरेंद्र बाहुबली
+१
शेजारच्या हाटीलात धागेच धागे आहेत डॉक खरेंचे! :)
7 Jan 2026 - 7:51 pm | मदनबाण
कुठले हॉटेल?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
7 Jan 2026 - 8:24 pm | सुबोध खरे
खांद्याखाली बळकट असलेल्या लोकांशी कुठे वितंडवाद घालायचा?
बाकी इथलेच धागे तिथे (मायबोलीवर) प्रकशित केले म्हणू काही लोकांची जळजळ होते आहे हे पाहून अधिक मौज वाटली
8 Jan 2026 - 8:48 am | मदनबाण
इथलेच धागे तिथे (मायबोलीवर) प्रकशित केले
ओक्के, मला वाटलं कुठले नविन मराठी संकेतस्थळ सुरु झाले आणि तिथे देखील तुम्ही लिखाण करत आहात.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNES
7 Jan 2026 - 8:34 pm | अमरेंद्र बाहुबली
डॉक साहेब मीपाची अक्षम्य हेळसांड (दुर्लक्ष) करत आहेत.
13 Jan 2026 - 7:25 pm | सुबोध खरे
सध्या 6 सदस्य हजर आहेत.
सुबोध खरे
कपिलमुनी
प्रकाश घाटपांडे
कानडाऊ योगेशु
आग्या१९९०
प्रचेतस
13 Jan 2026 - 7:26 pm | सुबोध खरे
कोण मिपाची हेळसांड करत आहे?
हॉटेलचे ग्राहक कमी का झाले हा प्रश्न ग्राहकांचा नसून मालकांचा आणि ते चालवणाऱ्या व्यवस्थापनाचा असतो इतका मूलभूत नियम माहिती नाही का?
13 Jan 2026 - 9:16 pm | अमरेंद्र बाहुबली
पण मायबोलीवर धागे काढायचे नी मिपावर फक्त भाजप प्रचाराला यायचं ही हेळसांड नाही तर काय? :)
13 Jan 2026 - 9:48 pm | आग्या१९९०
तिथे त्यांच्या एका धाग्यावर त्यांची चूक निदर्शनास आणून दिली तर त्यांनी चिडचिड केली. वैतागून तेथून काढता पाय घेऊन आता पुन्हा येथे माणसं मोजणी करू लागले. :)
7 Jan 2026 - 1:05 pm | अमरेंद्र बाहुबली
निवडणूक प्रचारासाठी घरात का घुसलात अशी विचारणा करणाऱ्या दहिसरमधील मराठी आदिवासी कुटुंबाला एका उमेदवाराच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
#LokmatMumbai #MumbaiNews #election #dahisar #socialmedia #Viralvideo #CrimeNews
https://www.facebook.com/share/r/1DhzwZcUcw/
8 Jan 2026 - 4:59 pm | आग्या१९९०
पाच वर्षापूर्वी लादलेली बंधने काढून टाकल्याने आता भारतातील सरकारी कंत्राटे चीनसाठी खुली झाली आहे. मेक इन इंडियाचे यश आहे हे. आता चीनच्या सीमेवरील खोड्या बंद पडतील.
खूप दिवसांनी दोन दिवसात माझा पोर्टफोलिओ एक लाखापेक्षा अधिक नुकसान दाखवत होता. नुकसान सहन करून १००% कॅश हातात ठेवली. तीस वर्षात प्रथम पूर्ण पोर्टफोलिओ विकला. Enter The Dragon ची भीती वाटतेय.
13 Jan 2026 - 10:09 am | आग्या१९९०
मागील दहा वर्षापासून आपल्या केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल मी कायम साशंकच होतो, आता जवळजवळ खात्रीच झाली आहे की हे सरकार चालत नसून दुसरेच कोणी चालवत आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे खरे सत्य सामोरे येण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना मी कायम दीर्घकालीन नफ्याचा विचार करत होतो, आता भीतीपायी मी जवळजवळ ह्या बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार सोडून दिला आहे. आतापर्यंतचे सर्वात कमकुवत सरकार देशाला लाभले आहे.
13 Jan 2026 - 3:47 pm | स्वधर्म
आपल्या मताशी सहमत आहे. दुर्दैवाने संपूर्ण र्हास झाल्याशिवाय धर्मांध, उजवे व भाजप समर्थक आपली मते उदारमतवादी व पुरोगामी सरकार येऊ देणार नाहीत. म्हणून या वेळी ही पडझड एक दोन वर्षांची नसावी अशी वाईट शंका येत आहे. कदाचित २०४७ पर्यंत असेच राहील.
शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक करण्यासाठी काही मार्ग तरी उरले आहेत का? म्युचअल फंड, सरकारी रोखे किंवा मुदत ठेवी?
13 Jan 2026 - 4:22 pm | टर्मीनेटर
स्वधर्म साहेब दुर्दैवाने उदारमतवादी आणि पुरोगामी विचारांचे समर्थन करणारा कुठला राजकीय पक्षच आज अस्तित्वात नाही... विरोधी पक्ष नामक जे काही अस्तित्वात आहे ते एवढे नालायक आणि कुचकामी आहेत की मतदान करण्याची इच्छाच होत नाही...
13 Jan 2026 - 5:52 pm | स्वधर्म
विरोधी पक्ष नष्ट करण्याचे सुनियोजित काम गेल्या १० वर्षात झाल्यामुळे तुंम्हाला तसे वाटत असावे. खरोखरच विरोधी पक्ष संपूर्ण नष्ट झाला तर काय होईल असे आपणांस वाटते?
14 Jan 2026 - 8:28 am | टर्मीनेटर
बेबंदशाही (तशी ती सध्याही आहेच म्हणा 😀)
13 Jan 2026 - 5:56 pm | स्वधर्म
कॉमी यांना विचारले होते की बाजारातील गुंतवणूक धोक्यात येत आहे असे वाटत असेल तर इतर काही मार्ग आहेत का. बाजाराचा अभ्यास नाही पण असे भीतीचे वातावरण आहे काय?
13 Jan 2026 - 7:11 pm | आग्या१९९०
शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक करण्यासाठी काही मार्ग तरी उरले आहेत का? म्युचअल फंड, सरकारी रोखे किंवा मुदत ठेवी?
फार मोठा फंड असेल आणि दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर टॅक्स आणि महागाईचा विचार केल्यास तुम्ही विचारलेले पर्याय फार काही परतावा देऊ शकणार नाही. परंतु अभ्यास असेल आणि थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल तर, कमोडिटी, एक्विटी डेरीवेटीव , आणि क्रिप्टो करन्सी ह्यात सट्टा लावून थोडेफार पैसे कमावता येतील. दीर्घकालीन मंदी असताना derivatives मधून पैसे कमावणे फार कठीण नसते.
13 Jan 2026 - 7:29 pm | सुबोध खरे
परंतु अभ्यास असेल आणि थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल तर, कमोडिटी, एक्विटी डेरीवेटीव , आणि क्रिप्टो करन्सी ह्यात सट्टा लावून थोडेफार पैसे कमावता येतील. दीर्घकालीन मंदी असताना derivatives मधून पैसे कमावणे फार कठीण नसते.
हे म्हणजे नेसूचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. असे केवळ डोक्यावर पडलेली माणसे करू शकतात
13 Jan 2026 - 8:05 pm | आग्या१९९०
ते तर सध्याच्या केंद्र सरकारने कधीच केले आहे. :)
13 Jan 2026 - 8:06 pm | स्वधर्म
सोनेही खूप महाग झालेले आहे. राहता राहिले फ्लॅट किंवा जागेतील गुंतवणूक. सगळीकडून आत आलेल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूकीचे पर्याय काय असतात?
13 Jan 2026 - 8:26 pm | आग्या१९९०
दीर्घकालीन मंदीत सोने ठीक आहे, फ्लॅट किंवा जागेतील गुंतवणूक फार काही परतावा देऊ शकत नाही
8 Jan 2026 - 5:16 pm | विजुभाऊ
व्हेनेझ्येलाचे कित्येक टन सोने इबँक ऑफ इंग्लंड मधे पडून आहे.
त्याची मालकी कोणाची यावर आता वाद सुरू आहेत
8 Jan 2026 - 6:37 pm | कंजूस
वसाहती करण्याचा नवा प्रकार आणि उद्योग.
8 Jan 2026 - 6:51 pm | अमरेंद्र बाहुबली
हे जर खरं असेल तर आज माझ्या इतका आनंदी कुणीही नाही! अन्याय विरुद्ध लढणाऱ्या ममता बनर्जींबद्दल आणखी आदर वाढला! उद्धव ठाकरेंनी वेळीच अशी पाऊले उचलली असती तर त्यांच्या विरुद्ध अनैतिक लोक जिंकू शकले नसते! जशा तसे उत्तर देण्याची धमक ममता बॅनर्जींमध्ये आहे हे पाहून ममतांबद्दल अभिमान वाटला. जिओ ममता दीदी!
धाडी वर धाड
आज बंगाल मध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या आयटीसेल ऑफिस वर इडीने रेड टाकली. काहीही करुन, जमल्यास #घरेलु_युद्ध करून, भाजपच्या पश्चिम बंगाल मध्ये सत्ता पाहिजे आहे त्या साठी ते पुरावे शोधत आहेत दहशत पसरवत आहेत.
ममता पण काही कमी नाही, तिने रेड चालु असताना 25000 हजार पक्ष कार्यकर्ते 100 गाड्या आणि 2000 हत्यारबंद पोलीस घेऊन, ज्या दोन बिल्डींग मध्ये रेड चालली होती, त्याना घेराव घातला.
ती स्वतः आत गेली आणि इडीने ताब्यात घेतलेले रेकॉर्ड ताब्यात घेऊन इडी कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवल.
या **व्याना जशास तसेच उत्तर दिले पाहिजे परिणामांची तमा बाळगुन उपयोग नाही.
(आधारित)
Arun Dixit
https://www.facebook.com/share/1D8RWQr2Wo/
11 Jan 2026 - 8:51 pm | कांदा लिंबू
इराणमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खालील बातमी वाचनात आली. इराणमधल्या घडामोडींची वास्तव माहिती देऊ शकणाऱ्या मिपाकरांनी इथे लिहावे ही विनंती.
AppBodies Piling Up, Morgues Full: Iran's Hospitals Under Pressure Amid Protests
14 Jan 2026 - 5:44 am | कंजूस
इराणमधल्या {आणि जगातल्या} घडामोडींची वास्तव माहिती देणाऱ्या......
या साईट्सवर भरपूर माहिती मिळते. यांचे टीवी चानेल्सही आहेत.
France 24 site
https://www.france24.com/en/
Al Jazeera site
https://www.aljazeera.com/
Hindustan Times app सुद्धा पाहता येईल. निवडक बातम्या भारतातील आणि जगातील सर्व क्षेत्रातील.