केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे:
- पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली.
- अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली.
- आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते.
गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही.
हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते.
जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे.
टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
प्रतिक्रिया
6 May 2025 - 2:46 pm | श्रीगुरुजी
अण्वस्त्रधारी पाकिस्तानशी मुकाबला करण्यात अडचणी असणारच. याच्या परिणामांची रास्त अशी चिंता त्या नेत्यांना वाटत असावी.
भारतही अण्वस्त्रधारी होता. पाकिस्तानवर हल्ला करणे म्हणजे भारतातील आपल्या मतपेढीला दुखावणे. त्यापेक्षा विदूषकांच्या खात्यांची आलटापालट करून कडक शब्दात निषेध केला की कर्तव्य पार पडले.
6 May 2025 - 6:56 pm | सुबोध खरे
अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे असे माओ झे डाँग यानि म्हटले आहे.
पाकिस्तान तुम्हाला अणुबॉम्बची धमकी देत आहे याच कारण पारंपरिक युद्धात भारताबरोबर जिंकण्याची त्यांना शक्यता सुतराम नाही. सर्वनाशापर्यंत पाळी आली तरच अणुबॉम्बचा वापर करता येतो.
जर पाकिस्तानने भारतावर एक जरी अणुबॉम्ब टाकला तरी भारत अख्खा पाकिस्तान बेचिराख करून टाकेल यात शंका नाही. हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे.
त्यामुळेच पाकिस्तान जेवढा (saber rattling) भूभू:कार करतो आहे तो केवळ त्यांच्या जनतेला चुचकारण्यासाठी आहे.
"एक मुसलमान १० काफिरांना भारी पडतो" हे वाक्य तेथे जन्मापासून जनतेला ऐकवले जाते. त्यामुळे तेथील अडाणी जनतेत पाकिस्तानी लष्कर किती भारीआहे याबद्दल भ्रामक कल्पना निर्माण केलेल्या आहेत.
जेवढी स्ट्रॅटेजिक डेप्थ भारताकडे आहे तेवढी पाकिस्तानकडे नाहीच.
JF १७ हे विमान पडले हि बातमी पाकिस्तान सरकारने पूर्णपणे दाबून टाकली होती. कारण चीन काय पाकिस्तान काय दोघांना या आपल्या विमानाची लायकी माहिती आहे. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची या न्यायाने हि बातमी बाहेर येऊ दिली नाही
परंतु मार्टिन बेकर हि कंपनी विमानाच्या इंजेक्शन सीट बनवते त्यांनी आपली जाहिरात करण्यासाठी JF १७ कोसळले पण आमच्या सीट मुळे वैमानिकाच्या जीव वाचला याचा व्हिडीओ जारी केला आणि हि गोष्ट उघडकीस आली. https://thedefensepost.com/2024/06/13/paf-jf-17-crashed/
पाकिस्तान कडे असेलली शस्त्रास्त्रे अत्यंत तुटपुंजी आहेत आणि त्याना तीन चार दिवसापेक्षा जास्त युद्ध चालवणे अशक्य आहे.
२०२३ मध्ये पाकिस्तानी लष्कर प्रमुख म्हणाले होते कि भारताशी युद्ध अशक्य आहे कारण रंगाड्यात आणि तोफात भरण्यासाठी पाकिस्तान कडे डिझेल नाही
do you remember — tanks are not in a condition to work, there is no diesel for the movements of cannons.
https://www.businesstoday.in/latest/story/tanks-not-in-working-condition...
Pakistan Army Runs Out Of Fuel; Suspends All Military Drills & War Exercises Till Year End
https://www.eurasiantimes.com/exclusive-pakistan-army-runs-out-of-fuel-s...
विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ १६ विमान पाडल्याचे सुद्धा पाकिस्तानने नाकारले होते पण नंतर प्रशिक्षणादरम्यान ते विमान कोसळले हे हळूच सांगितले. कारण विमानांची संख्या तर मोजता येतेच. अमेरिकेने सुद्धा यावर तोंड बंद ठेवले कारण १९६० चाय दशकातील मिग २१ ने एफ १६ पाडले हे मान्य केले तर अंतरराष्रीय बाजारपेठेत त्याची किंमत कमी होईल.
शेवटी सर्व देश स्वार्थी च असतात. सर्व देश तुमची मदत करायला तयार आहेत कारण भिकारी पाकिस्तानकडून त्यांना काय फायदा होणार आहे?
भारतासारखी उत्तम बाजारपेठ सोडून कोणता देश पाकिस्तानची मदत करणार आहे?
चीनला अरबी समुद्रात उतरून व्यापार करण्यासाठी पाकिस्तानची जमीन हवी आहे म्हणून ते पाकिस्तान ला कर्जबाजारी करून त्या पैशातून त्यांची जमीन बंदर विमानतळ घेत आहेत.
त्यांचे बंदर विमानतळ समुद्रकिनारे गहाण ठेवण्यास उपलब्ध आहेत
Lahore, Islamabad and Multan airports, M3 and Islamabad-Chakwal motorways to be pledged as guarantee to issue Islamic Sukuk bonds
https://www.geo.tv/latest/356489-pakistan-govt-decides-to-mortgage-major...
ISLAMABAD:
The federal cabinet on Tuesday approved pledging Pakistan’s seashore infrastructure, sports and tourism facilities and a few remaining major road networks to raise more debt after borrowing nearly Rs2 trillion by giving all major airports and highways in surety during the past one year.
https://tribune.com.pk/story/2362793/mortgaging-new-assets-to-get-rs2tr-...
एवढेच काय पाकिस्तान टी व्ही, पाकिस्तान रेडिओ सुद्धा गहाण पडले आहेत.
https://propakistani.pk/2017/01/05/pakistan-mortgaged-airports-motorways...
6 May 2025 - 9:00 pm | अमरेंद्र बाहुबली
एवढे सगळे असूनही पुलवामा नी पहलगाम हल्ल्यानंतर तथाकथित विश्वगुरूनी पाकिस्तानवर हल्ल्याची हिंमत का दाखवली नाही?
6 May 2025 - 9:21 pm | आग्या१९९०
काश्मिरच्या माजी राज्यपालांनी विगुंवर जोरदार हल्ला केला. आता बहुतेक त्यांची पाकिस्तानला रवानगी होईल.
https://youtu.be/3Q9Mx3zdsZs?feature=shared
6 May 2025 - 9:23 pm | अमरेंद्र बाहुबली
पुलवामाचे सत्य सत्यपाल मलिक ह्याना माहिती आहे. मागे त्याना इडीने फार त्रास दिल्याच्या बातम्या होत्या!
6 May 2025 - 7:02 pm | सुबोध खरे
On Wednesday 5th June, a Pakistan Air Force JF-17 Block 2 aircraft crashed near the Jhang district. The pilot successfully ejected using the Martin-Baker PK16LE Seat.
https://x.com/MB_EjectEject/status/1800458129873998164?lang=en
6 May 2025 - 7:23 pm | मारवा
भारतीय राज्यघटना जेव्हा आपण सर्वोच्च मानतो.
ती कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ अशी आहे.असे जेव्हा आपण मानतो.
त्या राज्यघटनेनेच सर्वोच्च न्यायालय हेच घटनेचे सर्वोच्च भाष्यकार म्हणून मान्य केलेले आहे.
त्याचं राज्यघटने आणि न्यायपालिकेवर जेव्हा आपण न्यायासाठी पूर्णपणे विसंबून असतो.
आणि त्याच सर्वोच न्यायालयाने जेव्हा राज्यघटनेचे basic structure अत्यंत clarity ने ठरवून दिलेले आहे.
आणि कितीही मोठ्या बहुसंख्य मताधिक्य असलेल्या सरकारने जरी या मर्यादेला तोडून कायदा बनविला तर असा कायदा रद्द करण्याचा.अधिकारी सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे.
अशा सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा 50. टक्केच्या वर आरक्षणाला सुस्पष्ट principal of equality चे भंग म्हणून व basic Structure च्या विरोधात हे अधिकचे आरक्षण जाईल. व ओपन वर्गाच्या मूलभूत हक्कावर equality च्या गदा येईल.म्हणून 9 जजेस च्या bench ने या सीमाभंगास नकार दिला आहे. (अती अपवादात्मक वगळता)
तर विशेष करून संविधानप्रेमी नागरिकांनी तरी या राहुल गांधी व इतर मंडळींच्या या 50.टक्के ची भिंत फोडण्याच्या प्रयत्नांचा खरे प्रामाणिक संविधानप्रेमी न्यायालयप्रेमी नागरिकांनी विरोध केला पाहिजे.
ज्यांना घटनाच नकोशी वाटते त्यांनी विरोध केल्यास ते अपेक्षितच आहे.परंतु घटनेच्या कडव्या समर्थकांनी केवळ स्वार्था वा अज्ञानातून याचे समर्थन करावे हे दुर्दैवीच आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
6 May 2025 - 9:54 pm | अमरेंद्र बाहुबली
इंदिरा गांधी असत्या तर आतापर्यंत पाकिस्तान बेचिराख असता, मिस यू इंदिराजी! _/\_