Skip to main content

पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 01/05/2025 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे: - पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली. - अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली. - आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते. गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही. हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते. जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे. टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.

वाचने 39043
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

In reply to by मारवा

> इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे. > हे असे का आहे? इथे कोणते आरक्षण कार्यरत आहे? ते केवळ प्रस्थापित समाजगटात जन्म झाल्याने मिळाले नाही का? >> हे विधान नेमके उलटनप्रश्न सुद्धा उपस्थित करते >> तिथे नोकरी का मिळवू शकत नाही ? तुमचा प्रश्न रास्त आहे, पण... समाजात असे सहज दिसते ते तर नाकारता येणार नाही. समाजात आपआपल्या जातीची वर्णाची जाळी आहेत, त्यांच्या संस्था आहेत आणि तिथे संधी त्याच लोकांना मिळते. ज्यांना आधीपासून शिक्षण व सामाजिक स्थानाचा फायदा मिळाला त्यांचे जाळे आधीच तयार आहे जे अधिक वरच्या पातळीवर आणि आधिक व्यापक पसरलेले आहे. यालाच सोशल कॅपिटल म्हणत असावेत. तिथे इतर तथाकथिक कनिष्ठ समजल्या जाणार्‍या वर्णातील लोक का पोहोचू शकत नाहीत? याचे इतर कोणते स्पष्टीकरण देता येईल? उदा. तशा जातीतील सर्वच्या सर्व बुध्दीने कमी आणि आळशी निपजले असा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. आता उलट प्रश्न असाही विचारता येईलः विशिष्ट अंगमेहनतीच्या (हमाली, महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी, स्मशानभूमीवर कर्मचारी इ.) काम करणारे उच्चवर्णीय जवळजवळ आढळत नाहीत. ते का? सर्वजणच उत्कृष्ट बौध्दिक क्षमता व कष्ट करण्याची वृत्ती घेऊन जन्माले आले का? खरे तर आरक्षण हा खूप मोठा विषय आहे. जातिनिहाय जनगणनेच्या धाग्यावर बोलण्यापेक्षा स्वतंत्र धागा पाहिजे.

In reply to by स्वधर्म

- इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे.
विश्वसनीय संदर्भ वाचायला आवडतील, मग पुढे बोलता येईल.‌ तोपर्यंत हे विधान "अजून सत्यापित नाही" असे गृहीत धरता येईल का?

In reply to by स्वधर्म

इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे. मी माझ्या ऑफिसचा अनुभव सांगतो. गेले दोन तीन महिने आम्ही नवीन भरती करतोय. एवढे interview घेऊन पण योग्य candidates मिळत नाही. जातं पात बघायची म्हणलं तर शक्यच होणार नाही. Interview panel ला लाथा मारून हाकलून देतील.

अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत. मी कोणाच्याही गटात नाही. मी स्वतंत्र विचार करून माझी मते ठरवितो व मते लवचिक ठेवतो जेणेकरून काही नवीन माहिती मिळाली, घटना घडल्या तर आधीची मते बदलू शकतात. मी कोणाचीही अंधभक्ती किंवा अंधद्वेष करीत नाही. पी जी वुडहाऊस यांचे वाक्य थोडे सुधारून सांगतो. I neither hate nor love in plurals.

In reply to by श्रीगुरुजी

गोडबोले गट पाडत आहेत ना! त्यामुळे त्यांना प्रतिसाद दिला होता. असो. या बाबतीत तुमचा दृष्टीकोन ठीकच आहे पण गोडबोले यांचे धर्माचे जे काही आकलन आहे त्यानुसार ते या गोष्टीस पाप व इंदिरा गांधी यांना पापी ठरवून त्यांचा 'वध' झाला असे म्हणत आहेत. त्याच्याशी तुंम्ही सहमत आहात का?

अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत. १९८२ ते १९८५ जळता पंजाब अनुभवला आहे. अमरेन्द बाहुबली यांच्या विधानाची संपुर्ण सहमत. अतिरेकी,देशद्रोही यांचे उच्चाटन करताना कुठलाही मुलाहिजा ठेवू नये. सर्वोच्च हित देशाचे, देशवासीयांचे. पेशवे आपापसातील दुफळी,सत्तालोलुपता, डोईजड सरदार व कर्तृत्वहिन नेतृत्व या कारणांमुळेच लयाला गेले. पाप पुण्य या सापेक्ष कल्पना आहेत. मी हिन्दू आहे,देशप्रेमी आहे आणी याचा मला अभिमान आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

तुंम्हाला बरोबर जाणीव आहे कारण तुम्ही जळता पंजाब अनुभवला आहे. त्यामुळे देश वाचवण्यासाठी जे करणे आवश्यक होते ते इंदिरा गांधी यांनी त्या वेळी केले हे पटू शकेल. परंतु त्या गोष्टीची प्रत्यक्ष जराही झळ न बसलेली व्यक्ती जेंव्हा इंदिरा गांधी यांचा 'वध' झाला असे म्हणते, त्याच्याशी आपण सहमत आहात का?

In reply to by स्वधर्म

इंदिराजींची हत्या झाली आहे. नकारात्मक भावनेने, सूड उगवण्याच्या किंवा एखाद्या चुकीच्या किंवा वाईट हेतूने कोणाला जीवे मारले गेले असेल तर त्याला हत्या म्हणतात. पण समाजासाठी कल्याणकारी भावनेतून , दुर्बळांच्या रक्षणासाठी किंवा स्वरक्षणासाठी एखाद्याला जीवे मारले असेल तर त्याला वध म्हणतात. उदा. रावण वध, कीचक वध, कंस वध. हरमंदिरवर कारवाई झाली नसती तर कदाचित वेगळेच काही घडले असते याची शक्यता नाकारता येत नाही. इंदिराजीनी भारताला सक्षम नेतृत्व दिले आहे व त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे. हत्या वध हा शब्दप्रयोग ज्याच्या त्याच्या राजकीय दृष्टीकोनातून व आकां च्या इच्छेनुसार केला आहे.

26. 11 च्या मुंबई वरील अतिरेकी हल्ल्यानंतर जो पाक पुरस्कृत होता तेव्हा तात्कालिक सरकारने नेमकी काय कारवाई केली होती याची माहिती मिळेल काय ? म्हणजे तेव्हा नेमकी कोणती पावले पाकिस्तान विरोधात उचलली गेली होती ? तेव्हाचे गृहमंत्री संरक्षणमंत्री कोण होते ? त्यांनी काय काय केले होते ? तसेच परराष्ट्र.मंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी काय भूमिका घेतली होती ? कारण इंदिरा गांधी 1971 युद्धापेक्षा हा अतिशय महत्वाचा व तुलना योग्य असा हल्ला आहे. याचे सर्वात मोठे कारण या हल्ल्यावेळी पाक हा अणुशक्ती बनून चुकला होता . तर 1971 च्या अणुशक्तीशून्य पाकिस्तानची तुलना आजच्या परिस्थितीत करण्यापेक्षा 2008 या तुलनेने जेव्हा तो अण्वस्त्रसंपन्न आज सारखा आहे त्याच्याशी केल्यास योग्य आणि वास्तव वादी तुलना होईल असे वाटते. म्हणजे 26 11 विरुद्ध उरी या दोन्हीत पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न आहे.

In reply to by मारवा

26. 11 च्या मुंबई वरील अतिरेकी हल्ल्यानंतर जो पाक पुरस्कृत होता. तेव्हा तात्कालिक सरकारने नेमकी काय कारवाई केली होती याची माहिती मिळेल काय ? कडक शब्दात निषेध केला होता. म्हणजे तेव्हा नेमकी कोणती पावले पाकिस्तान विरोधात उचलली गेली होती ? कडक शब्दात निषेध केला होता. तेव्हाचे गृहमंत्री संरक्षणमंत्री कोण होते ? त्यांनी काय काय केले होते ? तसेच परराष्ट्र.मंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी काय भूमिका घेतली होती ? गृहमंत्री शिवराज पाटील होते. हल्ल्याचे वृत्त समजल्यानंतर वाहिन्यांचे बातमीदार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले तेव्हा ते सोनिया गांधीना भेटण्यास गेल्याचे समजल्यावर बातमीदार सोनिया गांधींच्या घराबाहेर जमले. काही वेळाने शिवराज पाटील बाहेर आले व बातमीदारांना म्हणाले की मी आताच सोनिया गांधीना भेटून त्यांना हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. मनमोहन सिंग फक्त नामधारी पंतप्रधान होते व सर्व कारभार सोनिया गांधी चालवित होत्या हे सिद्ध करणारा हा अजून एक प्रसंग. नंतर शिवराज पाटलांनी बातमीदारांना स्वतःच्या निवासस्थानी येण्यास सांगितले. ते घरात जाऊन काही वेळाने बाहेर आले तेव्हा शरीरावर वेगळाच पोषाख होता. नंतर परत ते घरात गेले व काही वेळाने बाहेर आले तेव्हा अजून एक वेगळा पोषाख परीधान करून आले. म्हणजे दीड तासात तीन वेगवेगळे पोषाख. या आचरटपणामुळे सोनिया गांधींनी त्यांना राजीनामा देण्याची आज्ञा केली व त्यांच्या जागी अर्थमंत्री असलेले चिदंबरम् यांची गृहमंत्रीपदावर नेमणूक केली. नंतर रिकाम्या झालेल्या अर्थमंत्री पदावर सोनिया गांधींनी तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जींंना नेमले व रिकाम्या झालेल्या संरक्षणमंत्री पदावर ए के अँटनींना नेमले. अर्थात इतका खातेपालट करूनही परिस्थिती आहे तशीच भीषण राहिली कारण सर्व ५२ पत्ते जोकर असलेला पत्त्यांचा गठ्ठा कितीही वेळा पिसला तरी वाटपानंतर सर्वांना जोकरच मिळतात.. परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, संरक्षण सल्लागार, गृहमंत्री यांची कोणतीही स्वतंत्र भूमिका नव्हती. सोनिया गांधीची जी भूमिका तीच बाय डिफॉल्ट यांची भूमिका होती.

In reply to by श्रीगुरुजी

अण्वस्त्रधारी पाकिस्तानशी मुकाबला करण्यात अडचणी असणारच. याच्या परिणामांची रास्त अशी चिंता त्या नेत्यांना वाटत असावी. जी इंदिरा गांधीच्या वेळेस 1971 मध्ये नवती. तरी किमान सर्व राजीनामे.घेतल्यानंतर व योग्य व्यक्ती पदावर बसविल्यानंतर सुद्धा अखेरीस जर काहीच कारवाई केली नसेल तर याला अपयश नाही तर काय म्हणावे ? किंवा असे.म्हणू शकतो.पॉलिटिकल will चा अभाव होता. मुद्दा इतकाच आहे की तुलना समान परिस्थितीत करता येते. खरे.म्हणजे आजची पाकची क्षमता त्याहूनही अधिक वाढलेली आहे. त्यामुळे आजचा प्रश्न सोडवण्यास अधिक व्यामिश्र आणि कठीण असा आहे.

In reply to by मारवा

अण्वस्त्रधारी पाकिस्तानशी मुकाबला करण्यात अडचणी असणारच. याच्या परिणामांची रास्त अशी चिंता त्या नेत्यांना वाटत असावी. भारतही अण्वस्त्रधारी होता. पाकिस्तानवर हल्ला करणे म्हणजे भारतातील आपल्या मतपेढीला दुखावणे. त्यापेक्षा विदूषकांच्या खात्यांची आलटापालट करून कडक शब्दात निषेध केला की कर्तव्य पार पडले.

In reply to by श्रीगुरुजी

अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे असे माओ झे डाँग यानि म्हटले आहे. पाकिस्तान तुम्हाला अणुबॉम्बची धमकी देत आहे याच कारण पारंपरिक युद्धात भारताबरोबर जिंकण्याची त्यांना शक्यता सुतराम नाही. सर्वनाशापर्यंत पाळी आली तरच अणुबॉम्बचा वापर करता येतो. जर पाकिस्तानने भारतावर एक जरी अणुबॉम्ब टाकला तरी भारत अख्खा पाकिस्तान बेचिराख करून टाकेल यात शंका नाही. हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळेच पाकिस्तान जेवढा (saber rattling) भूभू:कार करतो आहे तो केवळ त्यांच्या जनतेला चुचकारण्यासाठी आहे. "एक मुसलमान १० काफिरांना भारी पडतो" हे वाक्य तेथे जन्मापासून जनतेला ऐकवले जाते. त्यामुळे तेथील अडाणी जनतेत पाकिस्तानी लष्कर किती भारीआहे याबद्दल भ्रामक कल्पना निर्माण केलेल्या आहेत. जेवढी स्ट्रॅटेजिक डेप्थ भारताकडे आहे तेवढी पाकिस्तानकडे नाहीच. JF १७ हे विमान पडले हि बातमी पाकिस्तान सरकारने पूर्णपणे दाबून टाकली होती. कारण चीन काय पाकिस्तान काय दोघांना या आपल्या विमानाची लायकी माहिती आहे. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची या न्यायाने हि बातमी बाहेर येऊ दिली नाही परंतु मार्टिन बेकर हि कंपनी विमानाच्या इंजेक्शन सीट बनवते त्यांनी आपली जाहिरात करण्यासाठी JF १७ कोसळले पण आमच्या सीट मुळे वैमानिकाच्या जीव वाचला याचा व्हिडीओ जारी केला आणि हि गोष्ट उघडकीस आली. https://thedefensepost.com/2024/06/13/paf-jf-17-crashed/ पाकिस्तान कडे असेलली शस्त्रास्त्रे अत्यंत तुटपुंजी आहेत आणि त्याना तीन चार दिवसापेक्षा जास्त युद्ध चालवणे अशक्य आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानी लष्कर प्रमुख म्हणाले होते कि भारताशी युद्ध अशक्य आहे कारण रंगाड्यात आणि तोफात भरण्यासाठी पाकिस्तान कडे डिझेल नाही do you remember — tanks are not in a condition to work, there is no diesel for the movements of cannons. https://www.businesstoday.in/latest/story/tanks-not-in-working-conditio… Pakistan Army Runs Out Of Fuel; Suspends All Military Drills & War Exercises Till Year End https://www.eurasiantimes.com/exclusive-pakistan-army-runs-out-of-fuel-… विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ १६ विमान पाडल्याचे सुद्धा पाकिस्तानने नाकारले होते पण नंतर प्रशिक्षणादरम्यान ते विमान कोसळले हे हळूच सांगितले. कारण विमानांची संख्या तर मोजता येतेच. अमेरिकेने सुद्धा यावर तोंड बंद ठेवले कारण १९६० चाय दशकातील मिग २१ ने एफ १६ पाडले हे मान्य केले तर अंतरराष्रीय बाजारपेठेत त्याची किंमत कमी होईल. शेवटी सर्व देश स्वार्थी च असतात. सर्व देश तुमची मदत करायला तयार आहेत कारण भिकारी पाकिस्तानकडून त्यांना काय फायदा होणार आहे? भारतासारखी उत्तम बाजारपेठ सोडून कोणता देश पाकिस्तानची मदत करणार आहे? चीनला अरबी समुद्रात उतरून व्यापार करण्यासाठी पाकिस्तानची जमीन हवी आहे म्हणून ते पाकिस्तान ला कर्जबाजारी करून त्या पैशातून त्यांची जमीन बंदर विमानतळ घेत आहेत. त्यांचे बंदर विमानतळ समुद्रकिनारे गहाण ठेवण्यास उपलब्ध आहेत Lahore, Islamabad and Multan airports, M3 and Islamabad-Chakwal motorways to be pledged as guarantee to issue Islamic Sukuk bonds https://www.geo.tv/latest/356489-pakistan-govt-decides-to-mortgage-majo… ISLAMABAD: The federal cabinet on Tuesday approved pledging Pakistan’s seashore infrastructure, sports and tourism facilities and a few remaining major road networks to raise more debt after borrowing nearly Rs2 trillion by giving all major airports and highways in surety during the past one year. https://tribune.com.pk/story/2362793/mortgaging-new-assets-to-get-rs2tr… एवढेच काय पाकिस्तान टी व्ही, पाकिस्तान रेडिओ सुद्धा गहाण पडले आहेत. https://propakistani.pk/2017/01/05/pakistan-mortgaged-airports-motorway…

In reply to by सुबोध खरे

एवढे सगळे असूनही पुलवामा नी पहलगाम हल्ल्यानंतर तथाकथित विश्वगुरूनी पाकिस्तानवर हल्ल्याची हिंमत का दाखवली नाही?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काश्मिरच्या माजी राज्यपालांनी विगुंवर जोरदार हल्ला केला. आता बहुतेक त्यांची पाकिस्तानला रवानगी होईल. https://youtu.be/3Q9Mx3zdsZs?feature=shared

In reply to by आग्या१९९०

पुलवामाचे सत्य सत्यपाल मलिक ह्याना माहिती आहे. मागे त्याना इडीने फार त्रास दिल्याच्या बातम्या होत्या!

भारतीय राज्यघटना जेव्हा आपण सर्वोच्च मानतो. ती कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ अशी आहे.असे जेव्हा आपण मानतो. त्या राज्यघटनेनेच सर्वोच्च न्यायालय हेच घटनेचे सर्वोच्च भाष्यकार म्हणून मान्य केलेले आहे. त्याचं राज्यघटने आणि न्यायपालिकेवर जेव्हा आपण न्यायासाठी पूर्णपणे विसंबून असतो. आणि त्याच सर्वोच न्यायालयाने जेव्हा राज्यघटनेचे basic structure अत्यंत clarity ने ठरवून दिलेले आहे. आणि कितीही मोठ्या बहुसंख्य मताधिक्य असलेल्या सरकारने जरी या मर्यादेला तोडून कायदा बनविला तर असा कायदा रद्द करण्याचा.अधिकारी सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. अशा सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा 50. टक्केच्या वर आरक्षणाला सुस्पष्ट principal of equality चे भंग म्हणून व basic Structure च्या विरोधात हे अधिकचे आरक्षण जाईल. व ओपन वर्गाच्या मूलभूत हक्कावर equality च्या गदा येईल.म्हणून 9 जजेस च्या bench ने या सीमाभंगास नकार दिला आहे. (अती अपवादात्मक वगळता) तर विशेष करून संविधानप्रेमी नागरिकांनी तरी या राहुल गांधी व इतर मंडळींच्या या 50.टक्के ची भिंत फोडण्याच्या प्रयत्नांचा खरे प्रामाणिक संविधानप्रेमी न्यायालयप्रेमी नागरिकांनी विरोध केला पाहिजे. ज्यांना घटनाच नकोशी वाटते त्यांनी विरोध केल्यास ते अपेक्षितच आहे.परंतु घटनेच्या कडव्या समर्थकांनी केवळ स्वार्था वा अज्ञानातून याचे समर्थन करावे हे दुर्दैवीच आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.

इंदिरा गांधी असत्या तर आतापर्यंत पाकिस्तान बेचिराख असता, मिस यू इंदिराजी! _/\_