केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे:
- पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली.
- अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली.
- आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते.
गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही.
हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते.
जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे.
टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
वर्गीकरण
वाचने
39043
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
रास्त प्रश्न आहे
In reply to विजेंदर यांचा हा व्हिडिओ मी बघितलेला आहे by मारवा
- इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे
In reply to मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी by स्वधर्म
इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे
In reply to मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी by स्वधर्म
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत.मी कोणाच्याही गटात नाही. मी स्वतंत्र विचार करून माझी मते ठरवितो व मते लवचिक ठेवतो जेणेकरून काही नवीन माहिती मिळाली, घटना घडल्या तर आधीची मते बदलू शकतात. मी कोणाचीही अंधभक्ती किंवा अंधद्वेष करीत नाही. पी जी वुडहाऊस यांचे वाक्य थोडे सुधारून सांगतो. I neither hate nor love in plurals.तुंम्ही नसाल पण
In reply to अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील by श्रीगुरुजी
अजिबात सहमत नाही.
In reply to तुंम्ही नसाल पण by स्वधर्म
धन्यवाद
In reply to अजिबात सहमत नाही. by श्रीगुरुजी
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण म
तुंम्हाला बरोबर जाणीव आहे
In reply to अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण म by कर्नलतपस्वी
@स्वधर्म, माझ्या मते ही...
In reply to तुंम्हाला बरोबर जाणीव आहे by स्वधर्म
धन्यवाद
In reply to @स्वधर्म, माझ्या मते ही... by कर्नलतपस्वी
धन्यवाद
In reply to @स्वधर्म, माझ्या मते ही... by कर्नलतपस्वी
अपेक्षेप्रमाणे याही धाग्याचे
26-11 मुंबई अतिरेकी हल्ल्यानंतर काय झाले माहिती मिळेल का ?
26. 11 च्या मुंबई वरील
In reply to 26-11 मुंबई अतिरेकी हल्ल्यानंतर काय झाले माहिती मिळेल का ? by मारवा
26. 11 च्या मुंबई वरील अतिरेकी हल्ल्यानंतर जो पाक पुरस्कृत होता. तेव्हा तात्कालिक सरकारने नेमकी काय कारवाई केली होती याची माहिती मिळेल काय ?कडक शब्दात निषेध केला होता.म्हणजे तेव्हा नेमकी कोणती पावले पाकिस्तान विरोधात उचलली गेली होती ?कडक शब्दात निषेध केला होता.तेव्हाचे गृहमंत्री संरक्षणमंत्री कोण होते ? त्यांनी काय काय केले होते ? तसेच परराष्ट्र.मंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी काय भूमिका घेतली होती ?गृहमंत्री शिवराज पाटील होते. हल्ल्याचे वृत्त समजल्यानंतर वाहिन्यांचे बातमीदार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले तेव्हा ते सोनिया गांधीना भेटण्यास गेल्याचे समजल्यावर बातमीदार सोनिया गांधींच्या घराबाहेर जमले. काही वेळाने शिवराज पाटील बाहेर आले व बातमीदारांना म्हणाले की मी आताच सोनिया गांधीना भेटून त्यांना हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. मनमोहन सिंग फक्त नामधारी पंतप्रधान होते व सर्व कारभार सोनिया गांधी चालवित होत्या हे सिद्ध करणारा हा अजून एक प्रसंग. नंतर शिवराज पाटलांनी बातमीदारांना स्वतःच्या निवासस्थानी येण्यास सांगितले. ते घरात जाऊन काही वेळाने बाहेर आले तेव्हा शरीरावर वेगळाच पोषाख होता. नंतर परत ते घरात गेले व काही वेळाने बाहेर आले तेव्हा अजून एक वेगळा पोषाख परीधान करून आले. म्हणजे दीड तासात तीन वेगवेगळे पोषाख. या आचरटपणामुळे सोनिया गांधींनी त्यांना राजीनामा देण्याची आज्ञा केली व त्यांच्या जागी अर्थमंत्री असलेले चिदंबरम् यांची गृहमंत्रीपदावर नेमणूक केली. नंतर रिकाम्या झालेल्या अर्थमंत्री पदावर सोनिया गांधींनी तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जींंना नेमले व रिकाम्या झालेल्या संरक्षणमंत्री पदावर ए के अँटनींना नेमले. अर्थात इतका खातेपालट करूनही परिस्थिती आहे तशीच भीषण राहिली कारण सर्व ५२ पत्ते जोकर असलेला पत्त्यांचा गठ्ठा कितीही वेळा पिसला तरी वाटपानंतर सर्वांना जोकरच मिळतात.. परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, संरक्षण सल्लागार, गृहमंत्री यांची कोणतीही स्वतंत्र भूमिका नव्हती. सोनिया गांधीची जी भूमिका तीच बाय डिफॉल्ट यांची भूमिका होती.मला असे वाटते त्या तात्कालिक सरकारला सुद्धा
In reply to 26. 11 च्या मुंबई वरील by श्रीगुरुजी
अण्वस्त्रधारी पाकिस्तानशी
In reply to मला असे वाटते त्या तात्कालिक सरकारला सुद्धा by मारवा
अण्वस्त्रधारी पाकिस्तानशी मुकाबला करण्यात अडचणी असणारच. याच्या परिणामांची रास्त अशी चिंता त्या नेत्यांना वाटत असावी.भारतही अण्वस्त्रधारी होता. पाकिस्तानवर हल्ला करणे म्हणजे भारतातील आपल्या मतपेढीला दुखावणे. त्यापेक्षा विदूषकांच्या खात्यांची आलटापालट करून कडक शब्दात निषेध केला की कर्तव्य पार पडले.अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे असे
In reply to अण्वस्त्रधारी पाकिस्तानशी by श्रीगुरुजी
एवढे सगळे असूनही पुलवामा नी
In reply to अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे असे by सुबोध खरे
काश्मिरच्या माजी राज्यपालांनी
In reply to एवढे सगळे असूनही पुलवामा नी by अमरेंद्र बाहुबली
पुलवामाचे सत्य सत्यपाल मलिक
In reply to काश्मिरच्या माजी राज्यपालांनी by आग्या१९९०
On Wednesday 5th June, a
संविधानाचा सर्वात मोठा अपमान हा त्याचे मूलभूत structure तोडण्यात
इंदिरा गांधी असत्या तर