( लपविलास तू तगडा खंबा – डोम्बलडन )

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
9 May 2024 - 10:35 pm

“सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.”

आता मुंबईत लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल. उत्तरेत थंडी पडली सुद्धा. वीस डिसेंबरपर्यंत मुंबईत
गारवा येईलच. वाईनबाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रम दिसत असतील. पण थंडी पडायला लागल्यावर वाईनबाजारात ओल्ड मन्कचा तुटवडा निर्माण होणार आणि त्या ओल्ड मन्कचा आस्वाद हवाहवासा वाटत राहणार. म्हणून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ओल्ड मन्कची चव घेऊन घेऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून थंडी संपण्यापूर्वी शेवटचा ओल्ड मॉन्कचा क्रेट मी" अपना वाईन शॉप" मधून विकत घेतो. अर्थात बाबूलाल म्हणतो तो "तगडा खंबा"

सुरवातीला हा खंबा सुरवातीला उसाचा रस अर्थात मळी असतो. तो आडीत आंबवून डिस्टिलेशन करावा लागतो. लाकडी बॅरलमध्ये रंग आणि चवीसाठी त्यात गूळ, जळलेली साखर किंवा कॅरॅमेल मिक्स करावा लागतो. तेव्हाच तो तय्यार होतो. दोन चार आठवडे आंबवलेली छान लागते. पण दीड ते दोन वर्षे खंबा नक्कीच फुल्ल तयार असतो.

ह्या वर्षी मला माझा मित्र बाबूनाथ ह्याची खूपच आठवण आली.
त्याला ओल्ड मन्कची अतिशय आवडायची.
खरंतर तो ओल्ड मन्कची व्यतिरीक्त दुसरी रम क्वचितच घ्यायचा. ओल्ड मन्कच्या त्या उंच तगड्या घाटदार बाटलीवर ज्याम खुष असायचा .. ओल्ड मन्कसाठी "तगडा खंबा" त्याचा आवडीचा आपुलकीचा शब्द. जेमतेम मॅक्डॉवेल्स रमला चांगली रम म्हणायचा. पण मॅक्डॉवेल्स वउईथ व्होडका मात्र त्याला आवडायची. तो म्हणायचा,
“मिक्स ढोसायची खायचा तर ती मॅक्डॉवेल्स वउईथ व्होडका आणि थेंब घोट घोंट आस्वाद घ्यायचा तर तो तगड्या खंब्याचा ”
गेल्या वर्षापर्यंत तो माझ्याकडे खंबा ढोसायला यायचा. त्याचं कारण गझियाबादच्या मिलिटरी कँटीन मधून मी तगड्या खंब्याचे क्रेट मागवायचो.
मिलिटरी कँटीनचे - खरं म्हणजे गझियाबाद डिस्टिलरी मधून थेट मागवलेले खंबे मस्त ढोसण्यालायक असतात. आमच्या मेरठचे खंबेसुद्धा ढोसायला मस्त लागतात.

बाबूनाथ थंडीच्या म्हणजे खंब्याच्या दिवसात आमच्या घरी आल्यावर मला म्हणायचा,
“तगड्या खंब्याचा क्रेट आणलेला दिसतो”
“तुला कसं कळलं रे?”
मी त्याची फिरकी घेत म्हणायचो.
“अरे, तगड्या खंब्याचा वास कधी लपवता येत नाही. एव्हडंच काय तर पेग मारून रिकामे ग्लास कोपऱ्यात दडवून ठेवला तरी त्याचा वास लपायचा नाही. सर्दी झाली असली तरी.”
असं मला लागलीच म्हणायचा.
मी पुढे काही बोलण्यापूर्वी,
“चल घेऊन ये ग्लास, खंबा ओपन करू. पेग भरून टेस्ट करूया. तुझा गझियाबादचा पेग खंबा मी पहिल्यांदाच ह्या वर्षी चाखणार आहे. बाहेर काय रे, खंबे विकणारे, सगळेच खंबे गझियाबादचे खंबे म्हणून सांगत असतात, ते काही खरं नसतं. तुझ्याकडचा असली मेरठचा तगडा खंबा असतो यात वाद नाही.
खंब्याचा क्रेट ठेवला होता तिकडे जायचा आणि त्यातून ऐटीत दोन तीन खंबे हातात घेऊन प्रत्येक खंबा नाकाजवळ नेऊन वास घेत म्हणायचा,
“माझी जीभ नुसती सरसरून चव घ्यायला आतूर झाली आहे. तू जरी काही म्हणालास तरी मला खंबा नको म्हणायला जमणारच नाही.”
हे सगळं बाबूनाथकडून ऐकण्यापूर्वीच मी त्याच्या चेहर्‍याकडे लक्ष देऊन पहात असायचो. हळूच माझ्याकडे बघायचा हळूच खाली बघायचा, खंब्यांचा पिवळा सोनेरी रंग न्याहाळायचा. मी त्याला म्हणालो होतो,
“अरे लाजू नकोस आणखी दोन तीन खंबे घेऊन जा घरी हवं तर. मी तुझं मन जाणतो. एकदा थंडी संपली पडला की खंब्यांची मजा उणावणार. तुझ्यापासून खंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.”
ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले. सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.
आज खंब्याचा क्रेट उघडल्यावर बाबूनाथची प्रकर्षाने आठवण आली. रेडीओवर साकृष्ण श्रीमंत यानी गायलेलं, सहज आठवलेचं गाणं लागलं होतं.

“लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

लगेचच माझ्या कवीमनाला रहावलं नाही. ह्या गाण्याचं “डोम्बलडन” सुचलं.
माझ्या मित्राला, बाबूनाथला मी ते गीत अर्पण करतो.
जणू बाबूनाथच मला सांगतोय कवितेतून,

लपविलास तू तगडा खंबा
दरवळ त्याचा छपेल का
चाखून ढोसून खपेल का?

जवळ ग्लास पण दूर ते ओपनरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
द्रव सोनेरी छपेल का?

क्षणात बघणे, क्षणात दचकणे
मनात हवे पण, दिखावा नसणे
ही पिण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे, आतूर होणे
मित्रा, तुझिया मनी पिणे
मित्रहि जाणे, मी पण जाणे
खंबा छपविणे सुचेल का?

विडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 10:54 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहा मस्त.

चौथा कोनाडा's picture

11 May 2024 - 10:06 am | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !

धन्यवाद, अमरेंद्र बाहुबली.

कर्नलतपस्वी's picture

10 May 2024 - 5:54 am | कर्नलतपस्वी

मस्तच.

चौथा कोनाडा's picture

14 May 2024 - 12:19 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद कर्नल भाऊ !

NC123L456

चौकस२१२'s picture

10 May 2024 - 6:56 am | चौकस२१२

पश्चिम महाराष्ट्रात एवढी मळी बनते , साखर कारखाने देशी दारू बनवितात पण रम चा ब्रँड का कोणी नाही बनवला का कोण जाणे कदाचित कारण हे असेल कि रम बनवयायाला नारंगी मोसंबी बनवणाया पेक्षा जास्त श्रम पडत असतील ! लाकडाची बॅरल लागतात वैगरे

असो नेहमीचे दुःख: भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( निर्गमन ) ड्युटी फ्री ला ओल्ड मन्क सारखा प्रसिद्ध ब्रँड मिळत नाही एवढी वर्षे झाली ... भारताचा तो एक मोठा ब्रँड आहे आणि जी लोक भारतीय आणि परदेशी दोन्ही "भारताची आठवण" म्हणून "घेऊन" जाऊ इच्छितात त्यांचं साठी हि सोय नाही
गावातून दुकानातून घेतलाय तर ती बाटली चेक इन मध्ये ठेवावी लागते आणि फुटायची भीती आधीक वजन !

चौथा कोनाडा's picture

14 May 2024 - 5:49 pm | चौथा कोनाडा

पश्चिम महाराष्ट्रात एवढी मळी बनते , साखर कारखाने देशी दारू बनवितात पण रम चा ब्रँड का कोणी नाही बनवला का कोण जाणे

अभ्यासाचा (आणि राजकारणाचा ही) विषय.
अ‍ॅम्बर डिस्टीलरी ही कंपनी महाराष्ट्रात पालघर येथे रम ( Kuban XXX Rum) बनवते असं त्यांच्या साईट वरून दिसतं. पण हा ब्रॅण्ड कधी ऐकण्यात आला नाही.
बारामतीला ही McDowell XXX Old Cask Rum ही रम (द्राक्षापासून ?) तयार होते असं दिसतंय ! इ त र ब्रॅण्ड ही असतील.

मध्यंतरी धान्यापासून मद्यनिर्मिती (Alcohol from grain) हा विषय चर्चेत होता असं आठवतं. सत्ताधारी भाजपनं असं जाहीर केलं होतं हे ही पुसटसं आठवतं. पुढं काय झालं कळलं नाही.

विषय मोठा आहे, प्रत्येकाची दु:खं मोठी आहेत.
असो. धन्यवाद चौकस२१२, तुमच्यामुळं मिपाकरांची चौकसबुद्धी वा ढ ते हेच खरं ! :-)

चौकस२१२'s picture

15 May 2024 - 8:58 am | चौकस२१२

शा र्क टॅंक इंडिया वर एक "गोयेची " फेणी बनवणारी ( खरे तर बनवून वितरण करणारी) कंपनी आली होती त्यांचेही पण कल्पना हि होती कि अस्सल भारतीय मद्य म्हणून याला मार्केट का करू नये , मेक्सिको कडे टकीला आणि मेसकाल आहे , स्कॉटलंड कडे स्कॉच ,
असो त्यांनी हे नाही सांगितले कि फेणीचा वास दुसऱ्या दिवशी मूत्रात आणि घामाला पण येतो ( जुना स्व अनुभव इतरांचा माहित नाही !) म्हणून कदाचित तिचा खप एवढा नाही

चौथा कोनाडा's picture

15 May 2024 - 5:24 pm | चौथा कोनाडा

फेणीचा वास दुसऱ्या दिवशी मूत्रात आणि घामाला पण येतो

या बद्दल इतर जाणकारांनी प्रकाश टाकावा !

इंडियन फेणी ... आयडिया भारीय ... पण,.. बाकी ब्रॅण्ड तयार करायचा म्हंजे खायचं काम नाही... वर्षानुवर्षे संशोधन करून, सर्व त्रूटी काढून टाकून प्रचंड जाहिराती करुन मद्यप्रेमींच्या गळ्यात मारावी (नरड्यात ओतावी) लागेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 5:27 pm | अमरेंद्र बाहुबली

दारू हा प्रकारच वाईट आहे. घरगुती हिंसाचारास दारू हे मोठ्या प्रमाणावर कारण आहे. दारू बनवणारे नी विकणारे ह्यांचा सत्यनाश होवो.
- दारू ला स्पर्श न केलेला बाहुबली.

मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला,
भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला,
उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ,
अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।।

बिना पिये जो मधुशाला को बुरा कहे, वह मतवाला,
पी लेने पर तो उसके मुह पर पड़ जाएगा ताला,

दास द्रोहियों दोनों में है जीत सुरा की, प्याले की,
विश्वविजयिनी बनकर जग में आई मेरी मधुशाला।।

कुंचला सोडला आणि कलम धरले. कहर तो लपेल का?

चौथा कोनाडा's picture

11 May 2024 - 10:07 am | चौथा कोनाडा

कुंचला सोडला आणि कलम धरले. कहर तो लपेल का?

भारी कल्पना ... हा .... हा .... हा .... !

धन्यवाद, कंजूसजी !

अहिरावण's picture

10 May 2024 - 12:48 pm | अहिरावण

हा हा हा भारी

चौथा कोनाडा's picture

12 May 2024 - 5:05 pm | चौथा कोनाडा

Jumplaugh

धन्यवाद अहिरावण !

बबन ताम्बे's picture

10 May 2024 - 1:08 pm | बबन ताम्बे

भारीच जमलेय डोंबल्डन !! तुमचा लेख आणि कविता वाचून बाबूनाथ स्वर्गात (किंवा जिथे असेल तिथे) तगड्या खंब्याचा आस्वाद घेत वाहवा, वाहवा म्हणत असेल.
साकृष्ण श्रीमन्त यान्चे गाणे :-)
मस्त जमलाय लेख !!

चौथा कोनाडा's picture

12 May 2024 - 5:07 pm | चौथा कोनाडा

लेख आणि कविता वाचून बाबूनाथ स्वर्गात (किंवा जिथे असेल तिथे) तगड्या खंब्याचा आस्वाद घेत वाहवा, वाहवा म्हणत असेल.
साकृष्ण श्रीमन्त यान्चे गाणे
:-)

Jumpjump123
धन्यवाद बबन तांबे

गड्डा झब्बू's picture

11 May 2024 - 10:49 am | गड्डा झब्बू

डोम्बलडन आल्वल्डले :-))

चौथा कोनाडा's picture

14 May 2024 - 5:52 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद !
wrteMPC008
धन्यवाद, गड्डा झब्बू !

अथांग आकाश's picture

11 May 2024 - 12:41 pm | अथांग आकाश

विडंबन आवडले :P
.

चौथा कोनाडा's picture

15 May 2024 - 5:36 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद _/\_ अथांग आकाश

Cheers1234
चीयर्स ... चांगभले !

मुक्त विहारि's picture

11 May 2024 - 4:48 pm | मुक्त विहारि

Old Monk चे आणि माझे जास्त जमले नाही...

आमचे साथीदार म्हणजे, LP mild किंवा No.1

चौथा कोनाडा's picture

17 May 2024 - 5:35 pm | चौथा कोनाडा

मुवि,
ही घ्या LP (लोकसभा / पार्लमेण्ट निवडणु़का सुरु आहेत म्हणून )

पुढच्या वेळी No.1
हा .... हा .... हा .... !
धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

17 May 2024 - 5:37 pm | चौथा कोनाडा

ही घ्या ...
M124PC007

नठ्यारा's picture

13 May 2024 - 8:13 pm | नठ्यारा

फोर्थ कॉर्नर,

डोंबल्डन झकास जमलंय. शीर्षकावरून काहीतरी भलतंच वाटलं होतं. अचानक तगडी खंबानिर्मिती झाली आणि मग तो लपवावा लागला, असं काहीतरी.

-नाठाळ नठ्या

चौथा कोनाडा's picture

17 May 2024 - 5:31 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद नठ्यारा !

sixtyone61

ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी,

आमची मुळ प्रेरणा :

लपविलास तू हापूस आंबा -- विम्बल्डन

rty4664asas