मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
28 Sep 2022 - 9:19 am

स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का?

भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही.

फक्त होमोसेक्श्युयल लोकच गुदमैथुन करतात हा गैरसमज आहे. आणि सर्व होमोसेक्शुयल हे करतातच असेही नाही. गुदमैथुन करताना स्वच्छता पाळावी, औषधी वंगण, कंडोम यांचा योग्य वापर करावा लागतो. अनोळखी व्यक्ती बरोबर असुरक्षित anal सेक्स केला तर गुप्तरोग पसरण्याची शक्यता असतेच. सुरक्षित सेक्सचे नियम इथे पाळले पाहिजेतच. यामधे दोघांनाही सुख मिळू शकते. कामसुत्रमध्येही याचा उल्लेख आहे. तसेच आधुनिक कामसूत्रमध्येही याचा उल्लेख आहे परंतु त्यामध्ये गुदमैथुनाला विकृत मानले गेले नाही.

शारीरिक संबंधावेळी पूर्ण नग्न व्हावेच लागते का ?

पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर संभोगात आला की अतिउच्च आनंद मिळतो. पूर्ण नग्न एकमेकांच्या मिठीत आल्यानंतर त्वचा संपर्क वाढतो व त्वचेला चांगल्या संवेदना मिळतात. कपडे घालून किंवा ठराविक कपडे घालून संभोगसुख घेताना कपड्यांनी अच्छादित केलेली त्वचा ही स्पर्शापासून लांबच राहते. संभोगावेळी थोडा ते जास्त उजेड असणे महत्त्वाचे असते. जवळजवळ ८०% लोक संभोग अंधारात करतात. डोळे असल्याचा काय फायदा ? याचा तुम्हीच विचार करा.

नवविवाहित जोडप्यांना कामजीवनाची माहिती मिळविण्यासाठी कामुक चित्रपट, पुस्तक भेट देणे योग्य आहे का ?

बिलकुल नाही ! यातून स्त्रीच्या स्तनाविषयी, योनीतील स्त्राव, कामवासना, पुरुषाचा लिंगाकार, जास्त वेळ चालणारा संभोग, रात्रीतून बऱ्याच वेळा करणारा याविषयी अतिशयोक्ती वर्णन केलेले असते. यातून संभोगाचे आसन, काय सत्य/असत्य हे जोडप्यांना समजत नाही. हे वाचून निराशा झाली की प्रचंड मानसिक दबाव दोघांवरही येतो व पहिल्याच दिवशी गैरसमज होऊ शकतात, खटके उडतात. हळव्या मनाच्या लोकांकडून आत्महत्या घडलेली आहे, हे कटू सत्य आहे.

कामवासना वाढवून शमविण्यासाठी चित्रपट, पुस्तकांचा वापर योग्य आहे, पण कामजीवनाविषयी शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला विवाहापूर्वीच घेणे महत्वाचे असते, कामुक चित्रपटमधील सत्य असत्य पुर्ण माहिती असल्याशिवाय चित्रपट पाहू नये.त्यामुळे असे चित्रपट, पुस्तक नवजोडप्यांना भेट देऊ नये.

सेक्स टॉय वापरून कामपूर्ती जरी होत असेल, तरी शरीरसुख घेणे चांगलेच आहे ना ?

विवाहित ,अविवाहित , विधवा, घटस्फोटित कुणीही सेक्स करू शकतात सेक्स toy वापरू शकतात.पार्टनर असताना वापरणे न वापरणे हे दोघांनी ठरवावे.काही नाविन्य म्हणुन वापरतात.काम पूर्ती जलद मिळावी म्हणुन करतात.कामपूर्ती कशी मिळवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सेक्समधून होणारा आजार, गर्भधारणा आणि पार्टनरची उपलब्धता यावर ठरते कसे वासना शमविता येईल. काही दोन्ही पद्धत वापरतात.शरीरसुख आणि सेक्स toy. हे चांगलेच आहे. स्थळ, काळ, देश, तेथील नियम, सेक्स विषयक विचार यावरून तिथले लोक विचार करतात. पण सेक्स ही नैसर्गिक बाब आहे. त्यावर नीतिनियमाचे बंधन घालून ते कंट्रोल करता येत नाही. उलट अशा समाजातील लोकं सेक्सबद्दल खूप खोटे वागतात आणि बोलतात असे दिसून आले आहे. काहीही असले तरी असा सेक्स करायचा की नाही ही सर्व जबाबदारी त्याची त्यांनीच घ्यायची आहे.

लिंग सरळ करायला उपचार काय ?

मुळातच लिंग उद्दीपित झाल्यावर कोणत्याही बाजूला कलू शकते. वाकडे असणे वेगळे आणि तिरके असणे वेगळे. नॉर्मल माणसात तिरके असले तरी त्याला वाकडे म्हणून पुरुष घाबरतो आणि त्याचा गैरफायदा भोंदू डॉक्टर घेतात. इथून फसवेगिरी सुरू होते. तिरक्याचे सरळ करण्याची गरज नसते. खरेच वाकडे असेल तर त्याला शस्त्रक्रिया आहेत.हस्तमैथुन, झोपेतले विर्यपतन यामुळे लिंग वाकडे वा तिरके होत नाही, हे लक्षात घ्या.

नपुंसकतेवर 10/20 mg तसेच 50/100mg गोळया असतात. यातली 50/100mg ही जास्त पॉवरफुल असते का ?

वेगवेगळ्या गोळ्यांच्या वेगवेगळ्या मात्रा असतात. जी गोळी 50/100 mg मात्रेत देणे बरोबर असते ती गोळी 10/20 mg देऊन चालत नाही आणि 10/20 mg ची गोळी 50/100 mg मात्रेत देणे धोकादायक असते. गोळ्यांची mg किती द्यावी हे पेशेंटनी ठरवू नये. तसेच mg किती आहे यावरून अंदाज करू नये. दोन्ही गोळ्या या त्या त्या मात्रेत चांगलेच काम करतात.प्रत्येक केस मध्ये गोळी किती मात्रेत दयावी हे तज्ञ डॉक्टर ठरवत असतो.

- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754
)

औषधोपचारविज्ञानशिक्षणलेखसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

अनिकेत वैद्य's picture

28 Sep 2022 - 1:08 pm | अनिकेत वैद्य

ह्यापूर्वीच्या लेखातही प्रश्न विचारला होता. बहुदा आपल्या ज्ञानाची खिल्ली न उडवाल्यानी आपण प्रतिसाद दिला नाहीत.

शैक्षणिक डिग्री सार्वजनिक करायला हरकत नसावी (त्यात काय खासगी आहे?).
हवंतर कॉलेजचं नाव किंवा उत्तीर्ण झाल्याचे गुण/ वर्ष नका सांगू.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Sep 2022 - 4:47 pm | प्रकाश घाटपांडे

खर आहे
अगदी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा नुसत्या डॉ उपाधीने मॉडर्न मेडिसीन ( अ‍ॅलोपथी) होमिओपॅथी की आयुर्वेद शाखेतील डॉक्टर आहेत हे समजत नाही. दवाखान्यात पाटीवर डॉक्टरांची डिग्री लिहिणे हे बंधनकारक असते. मेडिकल एथिक्स बाबत नॅशनल मेडिकल कौन्सिल ने नवीन कोड ऑफ कंडक्ट चा मसुदा शासनाला दिला आहे. महत्वाची बातमी आहे. त्यानुसार आपापल्या पॆथी व्यतिरिक्त डॉक्टरांना अन्य पॆथीची औषधे देता येणार नाहीत.
https://www.newindianexpress.com/nation/2022/may/30/nmc-prescribes-new-r...

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 5:54 pm | चौथा कोनाडा

+१
खरं आहे, असे लेख लिहिताना सुद्धा शैक्षणिक उपाधी लिहिणे गरजेचे वाटते.

आजकाल या क्षेत्रात सुद्धा सुळसुळाट झाला आहे, बरेच विना नोंदणी / बोगस डॉक्टर्स पकडल्याच्या बातम्या येत असतात.
या पार्श्वभुमीवर शैक्षणिक उपाधी आणि नोंदणी क्रमांक लिहिणे गरजेचे वाटते !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Sep 2022 - 8:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दिलेल्या लिंकवरुन डॉक्टर राहूल पाटील हे BAMS आहेत. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर ना ? अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 10:27 pm | चौथा कोनाडा

हो रे, खरंच की राव !

स्वगत: आपण ही असला एखादा धागा पडायला हवा ! :-)

प्रकाश घाटपांडे's picture

29 Sep 2022 - 9:48 am | प्रकाश घाटपांडे

अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.

पण उपचार करण्यासाठी आहे. शिवाय दिलेली माहितीचा स्त्रोत व विश्वासार्हता देखील वाचकांच्या दृष्टीने महत्वाची आहे असे प्रतिक्रियांवरुन दिसत आहे. त्यावेळी खुलासा लेखकाकडून अपेक्षित असतो. लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो हे देखील प्रतिक्रियेत आलेले आहे अशा वेळी जर लेखकाने खुलास केला तर विश्वासार्हता वाढते.

सुबोध खरे's picture

29 Sep 2022 - 10:55 am | सुबोध खरे

लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो

- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

अधोरेखित गोष्टी हेच दर्शवतात.

हे वैद्यकीय नीतितत्त्वात बसते का?

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2022 - 7:34 pm | कर्नलतपस्वी

मला आजुनही वाटतयं की असल्या ज्ञानाची इथे मिपावर जरूर आहे का?

१.बहुतेक सर्व सदस्य वयस्क आणी सर्वांनीच ती "जपानी रमलाची रात्र" अनुभवलेली आहे. बरेचसे सदस्य आयुष्याच्या विद्यापीठातून ही प्रश्न पत्रीका सोडवित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या विषयावर काही विद्यावाचस्पती सुद्धा असतील.

"तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात"

२. बरेच सदस्य या क्षेत्रातील आपापली जबाबदारी पार पाडून निवृत्त झाले आहेत.
२. स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे.
३.बरेच सदस्य माझ्यासारखेच आनंदयात्री. मुक्कामाच्या शेवटच्या गाडीची वाट पहात आहेत.
५.महिला सदस्य सुद्धा आहेत व भारतीय महिलांना अशा विषयावर सार्वजनिक पणे व्यक्त होण्यास अडचण वाटते.
६.ह्या सर्व गोष्टी वाचकांना आकर्षित करण्यासाठी वर्तमानपत्रात नियमित वाचायला मीळतात. नवीन काहीच नाही.

बाकी लोकशाही आहे त्यामुळे डाॅक्टरांनी लेख या विषयावर लिहावे अथवा नाही हा त्यांचा विषय आहे.

डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ आहेत.(MD psychology असावेत असे गृहीत धरतो)
फार चांगली गोष्ट आहे.Instead of Sexology, त्यांनी जर खालील विषयावर प्रकाश टाकला तर सदस्यांना फायदा होईल असे माझे मत आहे.

Depression
Schizophrenia and marital harmony
Psychosis
Phobia
Intellectual Disability
Psychological Disorders
Developmental Disorders.
Senile Depression
Anxiety Disorders.
इत्यादी.

आग्या१९९०'s picture

28 Sep 2022 - 8:51 pm | आग्या१९९०

स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे.
कारण काय? वात्सायनाने अनैसर्गिक मैथुनची कशास म्हटले आहे?

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2022 - 7:51 pm | कर्नलतपस्वी

OCD(Obsessive Compulsion Disorder) ,हा एक मह्त्वाचा विषय वाटतो.

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2022 - 8:01 pm | कर्नलतपस्वी

Compulsive

सुबोध खरे's picture

28 Sep 2022 - 7:51 pm | सुबोध खरे

जवळजवळ ८०% लोक संभोग अंधारात करतात. डोळे असल्याचा काय फायदा

"स्वप्नरंजन" याचे मानवी जीवनात आणि लैंगिक सुखात अपरिमित महत्व आहे.

सर्वांच्या बायका अप्सरा नसतात. त्यातून स्त्रीदेह सिनेमात, मासिकात जसा दाखवला जातो तो आदर्श असा असतो. सर्वाना अप्सरा बायको म्हणून मिळत नाही त्यातून स्त्री चिरतरुण नसते. तारुण्य काळानंतर स्त्रीदेहात बराच बदल होतो आणि तिशीनंतर हा बदल दर पाच वर्षात जाणवण्याइतका जास्त असतो. शिवाय ४५ च्या आसपास स्त्रियांची रजोनिवृत्ती होते त्यानंतर तर हे फारच वेगाने होऊ लागते.

वस्त्राच्छादित आणि वस्त्रहीन स्त्रीदेह यात प्रचंड फरक असतो.यामुळे स्पर्श होणारा स्त्रीदेह आणि स्वप्नरंजनात दिसणारा स्त्रीदेह याची सांगड घालून पुरुष संबंधाचे सुख मिळवू शकतो.

आता हा प्रश्न स्त्रियांमध्ये नाही का? आहेच

परंतु समागमात स्त्री हि सक्रिय नसते. त्यामुळे पुरुषाचा देह आवडत नसला तरी स्त्रीला लिंग उथ्थानाची गरज नसल्यामुळे तिच्या सक्रियतेची गरज नसते.

स्त्रीरोग शास्त्रात काम सुरुवात केल्यावर सुरुवातीच्या काही आठवड्यात स्त्रीदेहाबद्दल किळस निर्माण होते हा डॉक्टरांचा सार्वत्रिक अनुभव आहे. यानंतर माणसे हा कप्पा बंद करायला शिकतात.( compartmentalisation) (बाकी जीवनात सात्विक असणारी माणसे जशी व्यवसायात एकमेकांचा गळा कापू शकतात).

स्त्रीसुखात समाधानीअसणारा माणूस बाहेरख्याली होण्याची शक्यता (अंशतः का होईना) कमी होते हे पतिपत्नीत संबंध दृढ होण्यासाठी महत्त्वाचे आहेच.

त्यामुळे अंधारात समागम करणे हि अनेकांची गरज/ आवश्यकता असू शकते.

कपिलमुनी's picture

28 Sep 2022 - 10:39 pm | कपिलमुनी

बेसिक असले तरि सगळ्यंना माहिती असेल असे नाही, अशी माहिती लिहिण्यात वाईट काही नाही.

दरमहा घडामोडीचे धागे काढून राजकीय , धार्मिक पो टा़कण्या पेक्षा बरेच उत्तम.

प्रसाद गोडबोले's picture

29 Sep 2022 - 12:04 pm | प्रसाद गोडबोले

?

"लिहु नका" असं त्यांना कोणी म्हणलं आहे का स्पष्टपणे ?

सामान्यनागरिक's picture

29 Sep 2022 - 2:04 pm | सामान्यनागरिक

कोणीतरी सांगा हो त्यांना की अगदीच मूलभूत प्रश्नांवर लिहू नका. लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका